Thursday, May 2, 2013

सरबजितसिंगचा मृत्यू...





सरबजितसिंगचा मृत्यू दुर्दैवी आहे. याबद्दल आपण खेद व्यक्त केलाच पाहिजे. याहीपेक्षा मोठा खेद याचा असला पाहिजे कि भारत सरकार, विशेषत: RAW  सारखे गुप्तहेर खाते "आपल्या" माणसांना विदेशात संरक्षण देण्यात अपयशी ठरत असते. सरबजितसिंग हेर नव्हता हा भारताचा दावा स्वाभाविक आहे. भारत देश कधी काळी अन्य देशात हेर पाठवून घातपाती वा गुप्त माहिती मिळविण्यासाठी कारवाया करु शकतो यावर भारतियांचाच विश्वास नाही. पण तसे वास्तव नसते हे आमच्या भाबड्यांनी समजावून घ्यायला हवे.

मी आजवर ४५-४६ आंतरराष्ट्रीय थरारकथा लिहित्ल्या आहेत. पाकिस्तानच्या संदर्भातील किमान तीन तरे मला याक्षणीच आठवतात. "अंतिम युद्ध" असो कि "War Time", यांत मी भारत सरकार हेर पाठवते खरे पण त्यांना संरक्षण देण्यात कुचकामी ठरते याचे कारण म्हणजे भारताच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय भुमिका हे कारण दिले होते व त्यामुळे भारतीय हेरांची ससेहोलपट कशी होते हे त्यातुन दाखवले होते. आणि त्या काल्पनिकांनाही वास्तवाचा आधार होता. सरबजितप्रकरणाने ते २० वर्षांनंतर पुन्हा अधोरेखित केले एवढेच!

सरबजित दारुच्या नशेत वाट चुकला, सीमा ओलांडली आणि पकडला गेला व त्याच्यावर लाहोर आणि फैसलाबादच्या विस्फोटमालिकांमद्धे हात असल्याचा आरोप ठेवत त्याला सरळ एका वर्षाच्या आत फाशीची शिक्षा ठोठावली गेली हा सरबजितसिंगवर आणि म्हणुन भारतीय नागरिकांवर अन्याय आहे हे म्हणणे भारतियांसाठी योग्यच आहे. मनजितसिंगलाच सरबजितसिंग समजून मिस्टकन आयडेंटिटी घडुन येवून सरबजितसिंगलाच फाशी मिळाली असा दावाही भावनिकतेला धरून आहे. पण मग त्या कथित "मनजितसिंग"चे काय झाले, तो कोण होता, तो कधीच का पकडला गेला नाही, आणि मग आता तो कोठे आहे हे प्रश्न आम्हाला न पडणे स्वाभाविक असेच आहे.

आम्हाला आतंरराष्ट्रीय हेरविश्व कसे चालते, Infiltrators कसे घुसवले जातात, बोगस व्यक्तित्वे कशी आकारास आणली जातात, सेक्स, दाम, दबाव कसे उच्चपदस्थांवर राबवले जातात याची कल्पनाही नसते. भारतात अशा अनेक घटना उजेडात येत असतात.पाकिस्तानचे भारतातील हेर म्हणुन भलेभले अडकलेले असल्याचे दिसते. पाकिस्तानला तेवढी अक्कल आहे आणि भारताला (आणि म्हणुन भारतियांना) मुळातच नाही असे समजण्याचे कारण काय आहे?

पण भारत कमी पडतो तो येथे कि आपल्या हेरांना संरक्षण देण्यात तो अपेशी ठरतो. हेर उजेडात आला कि कानावर हात ठेवतो. त्याच्या सुटकांच्या ज्या पर्यायी व्यवस्था असायला हव्यात त्याचा पुरता अभाव असतो. राजकीय पातळीवर तर बोलायलाच नको. असे असतांनाही सरबजितची फाशी जवळपास २२ वर्ष लांबली हे पाकिस्तानी कायदे पाहता भारताचे एक यशच मानावे लागेल. अफजलला फाशीला उशीर होतो म्हणुन गळे काढणा-या भारतियांनी ही एक तुलना करुन पहावी.

सरबजितसिंगला फाशी देणे अशक्यप्राय आहे एवढा दबाव असल्याने पाकिस्तानने काढलेली सोपी युक्ती म्हणजे कैद्यांकरवीच खुनी हल्ला चढवणे. खरे तर फाशीची शिक्षा झालेले कैदी अत्यंत स्वतंत्र अशा विभागात ठेवले जातात. तेथे दुस-याला मारणे सोडा स्वत:लाही मारता येणार नाही अशी व्यवस्था असते. थोडक्यात तेथे कसल्याही प्रकारचे विघातक हत्यार वा हत्यार म्हणुन वापरता येईल अशी वस्तू उपलब्ध असू शकत नाही.

 तरीही सरबजितवर खुनी हल्ला झाला हे वास्तव आहे. त्या हल्ल्यानंतर सरबजित तरीही काही दिवस मृत्युशी संघर्ष करत जीवित राहिला हे त्याचे नशीबच म्हणायला हवे. परंतू पाकिस्तान सरकारने हा खुन होवू दिला हेही एक वास्तव आहे. सरबजितसिंग हेर होता कि नव्हता? हेर आहे हे कोणाला कळने हे हेराचे सर्वात मोठे अपयश असते. सरबजितसिंग निर्विवादपणे भारताचा हस्तक अथवा हेर होता हे सरबजितसिंगच्या जबान्यांतून बाहेर आलेले नाही, याचा अर्थ हा तरुण देशप्रेमी होता हे निर्विवादपणे म्हणता येईल.  अफजलबाबत वा कसाबबाबत पाकिस्तानीही असेच म्हणत असतील हेही वास्तव आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपला हिरो हा दुस-या देशाचा व्हिलन असतो. राष्ट्रांतील संघर्षात देशप्रेमींची आहूती पडणे क्रमप्राप्त असते एवढेच काय ते वास्तव उरते. खरोखर सागरी सीमाभंग करणारे कोळी अथवा भरकटुन चुकुन शत्रूसीमांत घुसलेले शेतकरी अथवा पशुपालक सरबजितसिंगाचे विधिलिखित भाळी वागवत नसतात.

माझा प्रश्न हा आहे कि आपल्या "माणसां"ना संरक्षण देण्यात आपली हेरसंस्था कमी पडते कि नाही? याचे उत्तर होय असेच आहे. सरबजितसिंगच्या वकीलांनी ज्या भुमिका बदलल्या अथवा वकील्याही सोडल्या तेंव्हा हेरखात्याने सर्व शक्ती पणाला लावून किमान विधीसेवा पुरवायला हव्या होत्या...पण तेही झाले नाही. याचे कारण भारताच्या जागतिकीकरणानंतर बदललेल्या आंतरराष्ट्रीय भुमिकांतही आहे हेही वास्तव पहावे लागणार आहे. सरबजितसिंगची पाकिस्तानी सीमारक्षकदलांकडुन झालेली अटक १९९० सालची आहे. त्यानंतर बदललेली भारतीय राजकीय परिस्थिती आणि अर्थव्यवस्था यांचीही सांगड घालता येवू शकते.


सरबजितसिंग हा पक्का भारतीय होता. आम्हा कच्च्यांपेक्षा खुपच श्रेष्ठ होता. त्याचा खुन करण्यात आला आहे हे वास्तव लक्षात घ्यायला पाहिजे. खुन्यांना अटक केली आहे...पण त्यांना खरेच शिक्षा होणार आहे काय? त्याचे उत्तर संशयास्पद आहे. सरबजितच्या मृत्युसोबतच आम्ही कच्चे भारतीय आगपाखड करुन मोकळे झालेले असू आणि नंतरचे काय त्याचा पाठपुरावा करायला विसरलेले असू.



12 comments:

  1. Aaplya hergiri waril katha kuthe upalabdh hotil?? me utsuk ahe tya wachayla... krupaya kalwawe...

    ReplyDelete
    Replies
    1. www.bookganga.com var sanjay sonawani ya navane search ghetla ki apalyala majhya anek rajkiy thararkatha pahayla milu shaktil. Thanks.

      Delete
  2. या सरबजितसिंग प्रकरणाचा रहस्यभेद होईल तेव्हा होईल. पण लेखातून सध्यापुरते केले गेलेले पृथक्करण आवडले.

    ReplyDelete
  3. एकदम माझ्या मनातले लिहिलेत सर. हे आपल्या सरकार आणि गुप्तहेर संस्थांचे अपयश आहे. मुळात २० वर्षात आपल्याला काहीच करता येऊ नये? त्याला पकडल्यावर आपणही त्यांच्या काही गुप्तहेरांना पकडून सौदा करू शकलो असतो. पण तेवढी विचारांची आणि कृती करायची आणि अशी कृती करायला पाठींबा देण्याची इच्छा नाहीये किंवा आपल्या राजकीय नेतृत्वात तेवढी धमकच नाहीये. ह्यात सगळेच आहेत. काँग्रेसी आणि भाजपा आणि बाकीच्यान्बद्दल न बोललेलच उत्तम अशी अवस्था आहे. गेल्या १००० वर्षात आपण काही शिकलो नाही आत्ताही काही शिकू अशी परिस्थिती नाहीये. उगाचच भावनिक वातावरण करून आपण आपलेच हसे करून घेतो आहोत ह्याचे प्रसारमाध्यमांना आणि आपल्या सदैव मौनात असलेल्या पंतप्रधांना कधी कळणार काही कळत नाही. पण ह्या असल्या गोष्टींमुळे नविन लोक हे असले धैर्य कशाला करायला तयार होतील? आपल्या जीवाची बाजी कोणासाठी लावायची? ह्याचे काही उत्तर नाही. अवघड आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. राजकीय नेतृत्वाला शिव्या घालून काय फायदा. ते काही स्वर्गातून किंवा नरकातून टपकत नाही तुमच्या आमच्यातून येते. ह्याचाच अर्थ कि राजकीय नेते जर नालायक आहेत असे आपण म्हंटले तर समस्त भारतीय नालायक आहेत ह्यात शंका ती काय?

      Delete
    2. अगदी मान्य आहे. राजकीय नेतृत्व आपल्यातूनच येते पण मुळातच चांगल्या लोकांना निवडून देण्याची काय सोय आहे का? इतक्या चुका होवून पुन्हा त्याच त्याच चुका आपण करतो आणि त्या थांबवण्यासाठी काही केले आहे असेही दिसत नाही. मग त्याची जबाबदारी कोणाची? कुठलीही संस्था आपापले संबंध जपण्यातच गुंग आहे आणि ह्याची जबाबदारी सत्तेच्या गणितात आहे. लष्कराला हवे असलेले साहित्य देण्यात आपले लोक काय करतात. त्या मध्ये सगळे आले फक्त राजकीय नेतृत्वाच नाही तर लष्करी पण आले. पण जबाबदारी शेवटी राजकीय नेतृत्वाचाची आहे.

      Delete
  4. हेर किंवा गुप्तचर याबद्दल एकूणच मुर्खपणा सार्वत्रिक आहे, चित्रपट व कथा कादंबर्‍यातील रमण्यातून तो मुर्खपणा आलेला आहे. कुठल्याही देशाचे हेरखाते हे मुळातच सरकारची अवैध कामे करण्यासाठी असते, याचा वाहिन्यांवरील दिवट्यांना थांगपत्ता नाही. आणि वाहिन्यांवरील पोरकट चर्चेने ज्यांना सर्वच विषयात ज्ञान प्राप्त झाले, अशी संख्या सध्या वाढली असून पारावरच्या गप्पा माराव्यात तशा गहन विषयांच्या उखाळ्यापाखाळ्या चालतात. तेव्हा सर्वजीत वा जिहाद यावर उथळ वादविवाद झाले तर नवल नाही.

    ReplyDelete
  5. मुळ मुद्यालाच हात घातलात. अभिनंदन !
    खरोखर आमची यंत्रणा आपल्या माणसाला सुरक्षितता पुरवण्यास कमी पडली.

    ReplyDelete
  6. मला माहित नाही कि सरबजीतसिंग कोण होते ? ते RAW एजंट होते कि नव्हते. पण त्यांना मनजितसिंग म्हणूनच वागणूक दिली जात होती. तुम्ही त्या मनजितसिंगविषयीच संशय व्यक्त केलेला आहे म्हणून तुम्ही खालील लिंक तपासून पहा. त्यात दिलेले आहे कि त्यांच्या बहिणीने दलबीरकौरने हे उघड करून दाखवले होते ज्याला अटक झाली आहे तो सरबजितसिंगच आहे. ज्या मनजितसिंगविषयी तुम्ही बोलत आहात तो दुसराच आहे व जो मुळचा मनजितसिंग होता त्याला वकील अवैश शेख यांच्या मदतीने त्यांनी शोधून काढले.
    कदाचित हा अफजल आणि कसाबच्या हत्येचा बदल असू शकतो. पण न्यायालयीन लढाई मध्ये कदाचित त्यांना सरबजीतला सोडावे लागले असते म्हणून त्यांनी हि पळवाट शोधून काढली. किंवा जसे अफजल आणि कसाबला फाशी देउन कॉंग्रेस सरकारने पुढील निवडणुकीची तयारी केली आहे त्याचप्रमाणे तेथील राजकीय पक्षांनीहि सरबजीतचा बळी देउन तेच केले असेल कदाचित. मला वाटते भारत सरकार या बाबतीत मुत्सदेगीरीमध्ये कमी पडले. हे एक राजकीय अपयशच आहे. आपले पंतप्रधान हे फक्त आर्थिक ज्ञानी आहेत पण ते पुरेसे आक्रमक नाहीयेत. नेहमी बोटचेपे धोरण उपयोगी पडत नसते. तसे विरोधकही या कामी कुचकामीच ठरलेत. फक्त विरोधाला विरोध करत राहायचे. सध्याचे प्रश्न कोणते आहेत आणि त्यातील महत्वाचे किती आणि कमी महत्वाचे किती हेच यांना समजत नाही. का नाही हे अश्या वेळेस PM आणि President ला भेटायला जात, जाब विचारत. वाट पाहात राहतात कि ते काय करत आहेत ते करू दे आणि मग ते चुकले कि आपण आपली पोळी भाजून घेवूया.यांना हेच समजत नाही कि PM हा पूर्ण देशाचा असतो नाकी फक्त एखाद्या पक्षाचा. ज्यावेळेस एखाद्या प्रश्नात राष्ट्रहित दडलेले असते त्यावेळेस तुम्ही दुसऱ्याची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही स्वतः आवाज उठवू शकता. सत्तेत जे आहेत त्यांना जाब विचारू शकता.

    Anyway खरेच Hats off for this brave lady !!!
    RIP Sarbjitji !!!!

    http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5117790032534357655&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20130503&NewsTitle=%E0%A4%8F%E0%A4%95%20%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88%20%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80..%20%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80..

    ReplyDelete
  7. अशा प्रकरणांमध्ये सत्य कोणालाच नको असते कारण ते अडचणीचे असते. तो हेर असल्यास एकदा तो पकडला गेल्यावर त्याच्या मुक्ततेचे मार्ग सोपे नव्हते. सरकारने काही केले नाही हे म्हणणे सोपे आहे. २२ वर्षे फाशी टळली होती ती पाकिस्तानच्या दयाबुद्धिने नव्हे. आपला एखादा कैदी सोडवून नेण्यासाठी पाकिस्तानने त्याचा केव्हातरी वापर केला असता. कसाबच्या वेळेला हे शक्य नाही हे स्पष्ट दिसत असल्यामुळे तसा प्रयत्न झाला नाही.
    सरबजितच्या म्हणण्याप्रमाणे तो स्मगलिंगसाठी पाकिस्तानात गेला असतां पकडला गेला. हे खरे मानावयाचे तर मग तो गुन्हेगारच ना? मग त्याच्या सुटकेसाठी सरकारने काय आणि किती प्रयत्न करायचे? तुरुंगात कैद्यांचे एकमेकांवर हल्ले केव्हानाकेव्हा होतच असतात. याबाबत भावनेच्या पुरात वाहून जाणे कितपत उचित?

    ReplyDelete
  8. हेर पकडला गेल्यावर त्याला प्रत्येकच देश "डीसओन’ करतो . जेंव्हा एखादा माणूस असे काम करण्याचे मान्य करतो तेंव्हा त्याला अशी वेळ येऊ शकते ह्याची पूर्ण कल्पना असते.
    हेर पकडला गेल्यावर सरकार कडून मदतीची अपेक्षा करणे गैर आहे, जरी इच्छा असली, तरीही तसे करता येत नाही .

    ReplyDelete
  9. प्रभाकारजी,
    पहिली गोष्ट-सरबजीत हा हेर होता कि नव्हता हे फक्त तो आणि आपले हेर खाते यांनाच माहित. तो जर खरच हेरगिरी करत होता तर तो त्याच्या स्वार्थासाठी तर करत नव्हता ना ? आणि त्याला या गोष्टीची पूर्णपणे जाणीवही असणार कि असे काहीतरी आयुष्यात होऊ शकते.पण ज्यांचे (तुम्ही -आम्ही) आयुष्य सुखी करण्यासाठी तो हे करत होता तेच किती संवेदनाहीन आहेत हे त्याला काय माहित? खरच देशप्रेम असणे आणि देशप्रेमासाठी मनापासून काहीतरी करणे यात खूपच अंतर आहे. (हे सर्व तो हेर होता हे गृहित धरून बोलत आहे).
    दुसरी गोष्ट-सरबजीतसाठी लढली ती त्याची बहिण नाकी आपले भारत सरकार. बाकी सरकारने त्यांच्या पातळीवर काय केले होते त्यांनाच माहित.सरकारला, २२ वर्ष फाशी टाळल्याचे श्रेय घ्यायचे असेल तर फाशीचा कलंक हि स्वीकारावा लागेल. बाकी सरकार जे या देश्यात राहतात त्यांचे उत्तरदायित्व नीटपणे स्वीकारत नाही तिथे बाहेरील लोकांचे कसे स्वीकारणार. आणि त्यातही पहिला हक्क हा युद्धकैदी जे असतात त्यांचा असतो. हेर जे असतात त्याची अवस्था हि ना घर का ना घाट का अशीच असते हे आजपर्यंतचा इतिहास आहे.
    तिसरी गोष्ट- तुम्ही म्हणता कि तुरुंगात कैद्यांचे एकमेकावर हल्ले हे होतच असतात. हे तुमचे म्हणणे म्हणजे असे आहे कि सरकार माझे असले कि मी भ्रष्टाचार करणारच त्यात चुकीचे काहीच नाही असे बोलण्यासारखे आहे.
    तुमच्या तसेच महेंद्र कुलकर्णी यांच्या तथाकथित विधानाचा मी धि:कार करतो !!!
    धन्यवाद.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...