Saturday, May 18, 2013

थोर तत्वज्ञ-महाराणी अहिल्यादेवी होळकर!





राजे-रजवाड्यांचे इतिहास जगभर घडले आहेत. पुरुष-प्रधान व्यवस्थांत केवळ भारतातच नव्हे तर जगभर स्त्रीयांचे दमनच झाले असल्याचे आपल्याला दिसते. जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तुत्वाने म्हणा कि कोणा महाराजाची पत्नी होती म्हणुन म्हणा प्रसिद्ध आहेत पण त्या इतिहासावर स्वत:चा असा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. यच्चयावत जगात अपवाद असनारी एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. होळकर घराण्याचा कट्टर शत्रू माल्कम आपल्या मध्यप्रदेशातील आठवणींत म्हणतो..." सर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातन्यांनी घातलेल्या असुनही अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजेच्या हिताचे उत्कृष्ठ प्रशासन केले त्याला जगात तोड सापडनार नाही. माळव्यातीलच नव्हे तर जिथे तिचा प्रत्यक्ष कारभारही नव्हता अशा हिंदुस्थानातील सर्वच प्रजा तिला दैवी अवतार मानते. याचे कारण म्हनजे अहिल्याबाइंची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्व कल्याणासाठीची अविरत धडपड होय!" प्रख्यात इंग्रजी कवयत्री जोआना बेलीने तर अहिल्यादेवींवर नितांत सुंदर कविताच लिहिली. एक लक्षात घ्यायला हवे कि एकोणिसाव्या शतकात युरोपात स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरु झाली तिला अहिल्यादेवींपासून प्रेरणा मिळाली. याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा. 

माल्कमच नव्हे तर असंख्य युरोपियन इतिहासकारांनी भले येथील राज्यकर्त्यांचे वाभाडे काढले असतील, पण अहिल्यादेवींवर लिहितांना   आपल्या आदरभावनेला मुक्तद्वार दिले आहे. डा. अनी बेझंट म्हणतात भारत देशाची खरी सुपुत्री म्हणजे अहिल्यदेवी होय, कारण ती नुसती प्रजहितपालक नव्हती तर राष्ट्राचे ऐक्य आणि राष्ट्रभावनेला जतन करत सर्वत्र आपल्या खाजगीतुन समाजकार्य करणारी एकमेव राष्ट्रमाता आहे. का अशी अगदी युरोपियनांचीही भावना अहिल्यादेवींबाबत बनली हेही आपल्याला समजावून घ्यायला हवे.

अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ सालचा. नगर जिल्ह्यातील चौंडी येथील. मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली ती चक्क एका भांडनातुन. पण त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हनजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला. 


अहिल्यादेवींची राजकीय कारकीर्द तेंव्हापासुनच सुरु झाली. खंडेरावाची जागा अहिल्यादेवींनी घेतली. मल्हारराव देशभर मोहिमांत व्यस्त असत. सासरा-सुनेतील पत्रव्यवहार हा अहिल्यादेवींच्या राजकीय विचारकतेचा उत्कृष्ठ नमुना होय. अहिल्यादेवींना मल्हारराव तोफा-दारुगोळ्याची मागणी ते ज्या मार्गाने ते मोहिम चालवणार आहेत त्याच्या रक्षणाच्या सुचना अहिल्यादेवींना जसे देतांना दिसतात तसेच अहिल्यादेवी आपल्या सास-याला सल्ले देतांनाही दिसतात. सासरा सुनेचे ऐकेल हा तो काळ नव्हता...आताही फारसा नाही...परंतू  मल्हाररावांसारखा मुत्सद्दी अहिल्यादेवींचे सल्ले अंमलात आणत होता यावरुनच अहिल्यादेवींची योग्यता लक्षात येते.


१७६६ साली मल्हाररावांचा वृद्धापकाळाने मृत्यु झाला. वारसाहक्काचा प्रश्न निर्माण करत संपुर्ण होळकरी संस्थान घशात घालण्याचे प्रयत्न पेशवे दरबारात सुरु झाले. अहिल्यादेवींनी सर्व कारस्थानांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. दरम्यानच्या काळात अहिल्यादेवींनी स्त्रीयांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालय सुरू केले होते. घोडेस्वारी ते शस्त्रास्त्र प्रशिक्षण या विद्यालयात दिले जात असे. तत्कालीन स्थितीत ही एक जागतीक क्रांतिकारी घटना होती. घराबाहेर पडायला जेथे बंदी तेथे महिला शस्त्रचालक बनणार ही कल्पनाही त्या काळात कोणी करु शकत नव्हते. स्वत: अहिल्यादेवी उत्कृष्ठ योद्ध्या होत्या. महिला अबला नाहीत हे त्यांनी स्वकर्तुत्वातून सिद्ध केले असले तरी सर्व महिला शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांची स्वत:ची ५०० महिला सैन्याची पलटन उभी होती. राघोबादादा पेशव्याला हे संस्थान गिळायचे होते. अ
केपार झेंडे (जे त्यांनी नव्हे) फडकाविले असा दुराभिमान अशा या महान (?) योद्ध्याने अहिल्यादेवींवर स्वारी केली.   अहिल्यादेवींनी राघोबादादाचा माज उतरविला आणि माघार घ्यायला भाग पाडले.

अहिल्यादेवींचे प्रशासन हे ब्रिटिशांनाही आदर्शभुत ठरले. सर्व देशात जेंव्हा दांडगाईचे राज्य होते,, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता त्या काळात अत्यंत सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे माळवा होते. सर जदुनाथ सरकार म्हणतात, "सर्व मुळ कागदपत्रे व पत्रव्यवहार पाहिल्यानंतर माझी अशी खात्री बनली आहे कि अहिल्यादेवींखेरीज महादजी शिंदे उत्तरेत कसलेही स्थान निर्माण करु शकले नसते, एवढ्या उच्च दर्जाची राजकीय धोरण असलेली ही महिला होती." अहिल्यादेवींनी शेतसारा असो कि शेतीसाठीचे पाणी वाटप...यासाठी नुसते बंधारे घालुन दिले नाही तर एक उत्कृष्ठ प्रशासकीय व्यवस्था घालुन दिली. राज्यात तीर्थयात्री येत. भिल्लादि समुदाय उपजिविकेसाठी नाविलाजाने वाटमा-या करत. अहिल्यादेवींनी त्यांना शिक्षा देण्यापेक्षा विधायक मार्ग निवडला. त्यांच्या गुन्ह्यांमागील कारण शोधले आणि "भिल्लाडी" ही अभिनव पद्धत सुरु केली. या पद्धतीत यात्रेकरुंना संरक्षण देण्याचे काम भिल्लांवरच सोपवले आणि यात्रेकरुंकडुन त्यासाठीचा कर घ्यायची अनुमती दिली. यामुळे यात्रेकरुही निर्धास्त झाले व भिल्लांनाही उपजिविकेचे साधन मिळाले. हा क्रांतीकारी निर्णय फक्त प्रजाहितदक्ष व्यक्तीच घेवू शकत होती. आणि तो अहिल्यादेवींनी घेतला. जगातील हे पुन्हा पहिले उदाहरण आहे.


हैदराबादचा निजाम म्हणतो...""Definitely no woman and no ruler is like Ahilyabai Holkar." अहिल्यादेवींबद्दल लिहावे तेवढे कमीच असते. अहिल्यादेवींना आम्ही करंट्या अभिमन्यांनी "एक धार्मिक महिला" असे त्यांचे रुप रंगवले आहे. त्या नक्कीच धार्मिक होत्या. महान शिवभक्त होत्या. पण धर्माच्या पलीकडेही मानवी जग असते याचे भान त्यांना होते. मोरोपंत (केकावलीप्रसिद्ध) ते अनंत फंदी यासारख्यांच्या जीवनात एका शब्दाने बदल घडवून आणण्याचे नैतीक सामर्थ्य त्यांच्यात होते. स्त्रीयांना शक्ती द्यायची तर त्यांना शस्त्रही चालवता आले पाहिजे असा क्रांतिकारी विचार करणा-या त्या पहिल्या पुरोगामी महिला होत्या. स्वत: त्या लिहा-वाचायला शिकलेल्या होत्याच, सर्व स्त्रीयांनाही लिहा-वाचायला यायला हवे हा त्यांचा हट्ट होता. पुढे क्रांतिज्योति सावित्रीबाइंनी त्यांची परंपरा अविच्छिन्न ठरवली. 


उत्कृष्ठ नागरी व लश्करी प्रशासक, नैतीकतेची आदर्श बिंदू, देशव्यापक विचार करत प्रत्यक्ष कृती करनारी, तुलनेने अल्प भुभाग स्वत:चा असुनही, एकमेव शासिका, विस्कळीत झालेल्या, अवमानित झालेल्या हिंदू धर्मात पुन्हा प्राण ओतणारी दुर्गा म्हणुन अहिल्यादेवींचे भारतीय इतिहासातील स्थान एकमेवद्वितीय महिला म्हणुन कायमच राहील. पण आम्ही करंटे आहोत. जातीय प्रेरणा आम्हाला लाजीरवाने कृत्य करायला भाग पाडतात. अहिल्यादेवी सर्वांच्या होत्या पण सर्व त्यांना मानायला कंजुसी करतात. महाराष्ट्र राज्य हे पुरोगाम्यांचे राज्य आहे असे चुकुन म्हटले जाते. या राज्यात एकाही विद्यापीठाला अहिल्यादेवींचे सोडा पण एकाही महिलेचे नांव नाही हा आमचा असला दांभिक पुरोगामीपणा आहे. या राज्यात जन्माला आलेल्या, कर्तुत्वशालीनी ज्ञानवर्धिनी अशा अहिल्यादेवी आणि सावित्रीमाई झाल्या. आणि एकाही विद्यापीठाला या महनीय रष्ट्रमातांचे नांव नसावे असा करंटेपना फक्त आम्हीच दाखवू शकतो. सोलापुर विद्यापीठाला महाराणी अहिल्यादेवींचे नांव द्यावे अशी जनमागणी जोर धरत आहे. खरे तर मुळात अशा कोणत्याही मागणीची गरजच काय? पुरोगामी महाराष्ट्राने एव्हाना या नांवांनी अनेक प्रशासकीय, शैक्षणिक केंद्रांना अहिल्यादेवी आणि सावित्रीमाइंची नांवे देत त्यांची कर्तुत्वगाथा सन्मानित करायला हवी होती. आजही वेळ गेलेली नाही. सोलापुर विद्यापीठाला महराणी अहिल्यादेवींचे तर पुणे विद्यापीठाला सावित्रीमाईंचे नांव त्वरित दिले गेले पाहिजे आणि त्यांच्या प्रेरणादायी कर्तुत्वाला सलाम केला पाहिजे. महिलांना बळ पुरवायचे असेल तर याला पर्याय नाही हे शासनाने लक्षात घेतले पाहिजे. 


तसे होणार नसेल तर हे सरकार जातीयवादी आहे असेच आम्हाला समजावे लागेल!



-संजय सोनवणी

















19 comments:

  1. वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इंस्टीटयूट
    www.vjti.ac.in/‎

    विद्यापीठ नाही पण ह्या प्रतिष्ठित संस्थेला तरी एका स्त्रीचे नाव आहे.

    ReplyDelete
  2. बाप्पा - अहो आप्पा , आजचे विचार वाचले का ?

    आप्पा - कुठले ?

    बाप्पा - अहो कुठले काय काय करता ?- विचार मांडणारे इथे आहेत कितीसे आणि निरपेक्ष लिहिणारे तरी आहेत कुठे !

    आप्पा - ते तर आहेच म्हणा !

    बाप्पा - अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल फार थोडक्यात आणि सुंदर लिहिले आहे आपल्या संजयने -

    आप्पा - संजयने ? म्हणजे हातातले पिस्तुल बाजूला ठेवून त्याने धार्मिक पुस्तके वाचायला सुरवात केली असे काल वाचले होते , आता मराठीत लिहायला पण सुरवात केली की काय ?तुरुंगात बसून -

    डोंगरीतल्या तुरुंगातून - सारखी आठवणींची निबंधमाला लिहील तो -

    बाप्पा - अहो , कमालच आहे तुमची - आपला संजय म्हणजे कोण ? ही काय पुराव्यानिशी सिद्ध करायची गोष्ट आहे का ? "आपला " म्हणजे ज्याला आपण आपला मानल आहे तो -

    आप्पा - अहो मग म्हणाना - सोनावणींचा संजय !- महाभारतात जसे त्या संजयाने धृतराष्ट्राला सर्व सत्य कथा सांगितली तशीच हा आपला संजय आपल्या लोकाना सत्य सांगत नाही का ?


    बाप्पा - तेच तर सांगायला आलो होतो - अहो त्यांनी इतके सुंदर लिहिले आहे - आणि उगीच किर्तनकाराचा फाफटपसारा नाही - उगीच फोडणी मसाला नाही - स्पष्ट आणि सत्य - फारच वजनदार झाले आहे -फक्त संजय कडून एक माहिती जर मिळाली तर -

    आप्पा - कुठली ?

    बाप्पा - त्याने लिहिलंय की केकावलीवाले तांबे आणि अनंत फांदी - त्याबद्दल जर अजून त्यानी सांगितले तर छान वाटेल


    आप्पा - आपल्याकडे अहिल्यादेवींच्या नावाने मुलींची शाळा आहेच न ? अहिल्यादेवी हायस्कूल -

    बाप्पा - पण एक सांगू मनातले -ही अशी विभागणी करत जाणे नाही पटत - विद्यापीठे ही अनेक जणांचा हातभार लागून जन्माला येत असतात -

    आप्पा -अनेक पिढ्यांची परंपरा असते त्याला - येल,शिकागो,कालीफोर्निया ,हार्वर्ड ,केम्ब्रिज , ऑक्सफर्ड अशा विद्यापिठाना चर्चिल किंवा केनेडी यांची नावे दिली गेली नाहीत - तशा संस्थापण आहेत त्यांच्याकडे - पण नव्याने निर्माण झाल्या त्या -परत परत बारसे करणे हा आपला विचार !

    आणि त्यामुळे कुणावरही अन्याय झाला नाही !नालंदा किंवा तक्षशीला ह्या विद्यापीठांना कधी बुद्धाचे नाव का दिले नाही त्या काळाच्या लोकांनी ?- तसे पाहिले तर बनारस आणि अलीगड इथे सुद्धा धर्मावर दिली गेलेली नवेपण अनावश्यक आहेत -

    अशा प्रकारे त्या श्रेष्ठ व्यक्तीना मान वंदना देण्यापेक्षा दुसरे मार्गही आहेतच नाही का ?


    आप्पा -पूजनीय अहिल्या बाईनी आरक्षण का नाही सुरु केले ? त्यांना ते शक्य नव्हते असे नाही - शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्याझाल्या का नाही आरक्षण लागू केले ? एखाद्या व्यक्तीचे महत्व आणि त्यांचे विचार जाणून घेणे महत्वाचे असते -


    बाप्पा -मुंबईला तर असे हजारो रस्ते आहेत - शोट्फोर्म झालेल्या नावांचे ! की त्यांचे खरे नावच कळत नाही - रस्ते आणि इमारती यांना नावे देण्यापेक्षा त्या व्यक्तींनी केलेले कार्य पुढे नेणे महत्वाचे आहे - नाही का संजयदादा ? आज जे. जे. नावाने किती संस्था आहेत - तसेच अहिल्यादेवींच्या नावाने कितीतरी घाट भारतभर आहेत - कितीतरी मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे - त्यांच्या काळातल्या वास्तुशैली मुळे ती कामे चटकन ओळखू येतात आणि मन अभिमानाने भरून येते - अशी राणी पुन्हा होणार नाही असे आपोआप उद्गार बाहेर पडतात

    ReplyDelete
  3. राज्य तर आम्ही उभारले !

    आमचे छोटे राजे शाहू - नाही झेपले - त्याने ते पेशव्यांवर सोपवले

    त्यांनीपण ते श्री च्या नावाने चालवले !

    बाजीरावाने पण निष्ठेने राज्य विस्तारले

    आणि सरदारांचे कोंडाळे निर्माण केले

    दाभाडे , शिंदे , होळकर अशी रत्ने मिळाली - पण कधी पेशावेपण महाराज नव्हते किंवा

    शिंदे होळकर पण कधी राज्याभिषेक झालेले राजे वा महाराजे म्हणवून घेत नसत

    मग आज एकदम अहिल्याबाइन महाराणी म्हणण्याचा घात कुणी आणि का घातला ?


    मासाहेब हे आम्हाला कुणीतरी सांगितले पाहिजे !



    तुम्ही संजय सोनवणी दिल खोलून आज सांगाच - अहिल्याबाई महाराणी कधी झाल्या

    सांगा हो संजयसेठ ! त्या पुण्यश्लोक होत्या थोर होत्या कर्तबगार होत्या - पण असे काहीतरी लिहू नका - !

    ReplyDelete
  4. संजय सोनवणी यांचे काय चुकते ?


    संजय सोनवणी यांना प्रतिप्रश्न केला तर ते त्याला सविस्तर उत्तर देत नाहीत


    कुणी विचारले की अमुक एक गोष्ट आपण लिहिता तर त्याला योग्य पुरावा द्या तर ते अशा गोष्टी टाळतात - उद्‌इच गोष्ट पहा -झाशीची राणी किंवा अहिल्याबाई या काही स्वघोषित राणीपद असलेल्या राण्या नव्हत्या किंवा त्यांना कुणीही राणीपद बहाल केल्याचे मलातरी माहित नाही -

    हा मुद्दा कुणी मांडला तर संजय साहेब पसार होतात - असे असंख्य वेळा झाले -आहे

    त्यांच्या विषयी थोदेसेजारी कुणी कडवट वा दावे उजवे लिहिले की त्यांना पटत नसावे . खरे म्हणजे त्यांनी प्रत्येक विरोधाला सर्व प्रथम प्रतिसाद द्यावा हेच निरोगी मानसिकतेचे लक्षण ठरेल !

    ReplyDelete
    Replies
    1. स्वरदा: काही प्रश्नच निरर्थक वा गमतीखातर असतील तर त्यांची उत्तरे देण्यापेक्षा ते एन्जोय करावेत. गंभीर (हीणकस भावना दर्शवत केलेल्या प्रश्नांना तर उत्य्तरांची अपेक्षाही ठेवू नये.) असो. अनेक पदव्या लोकांनी/लेखकांनी आदरापोटी निर्माण केलेल्या असतात. पुण्यश्लोक काय, महाराणी काय, राजमाता काय, महाराज काय...स्वत:हुन कोणी कोणाला म्हणुन घेत नव्हते. अहिल्यादेवी पेशव्यांच्या चाकर नव्हत्या तर स्वतंत्र पद्धतीने कारभार पाहणा-या शासिका होत्या. पेशव्यांना युद्धात मदत करणे (इच्छ असली तर) एवढेच काय ते उभयतांचे संबंध होते. स्वतंत्र शासनकर्तीला तत्कालीन पद्धतीनुसार महाराणी म्हटले जात असेल तर त्यात वावगे काय आहे? आणि म्हटले नसेल तर मग आता म्हटले तर काय बिघडले? पदव्या या शेवटी सन्मान व्यक्त करण्यासाठी असतात. स्व्यंघोषित भूदेवांपेक्षा हे बरे नाही काय?

      आप्पा-बाप्पा: नेहमीप्रमाणे Rocking!

      Delete
  5. मुद्दा चुकीचा आहे का ?

    पुण्यातल्या पेशव्यांनी कुणालाही राजा बनवले नाही -सातारच्या छत्रपतीनीही कुणाला राणी किंवा महाराणी म्हटले नाही इतकेच मला सांगायचे होते आणि त्यातून काय सुचवायचे होते ते आपणास वेगळे सांगणे न लागे !

    आपण माझ्यापेक्षा खूपच थोर आहात !त्याबद्दलही मला नितांत आदर आहे !


    फक्त मांडणीत जातीयता विनाकारण अध्यहृत पणे डोकावली की वाईट वाटते -

    आणि राग अनावर होतो - इतकेच !


    पुण्यश्लोक अहिल्या मातेने भिल्लांच्या बाबतीत जो तोडगा काढला त्याची तुलनाच होऊ शकत नाही -प्रत्यक्ष शिवाजीच्या चरित्रात सुद्धा इतका मार्मिक निर्णय कुठे दिसत नाही !


    चौथाई सर देशमुखी खाउन , पंगतीच्या पंगती रोज उठवणाऱ्या आणि दक्षिणा कनवठीस लावून तृप्त होणाऱ्या ब्राह्मणाना हे कधीच सुचले नसते आणि सातारकराना तर शक्यच नाही - हे गृहीतच आहे - इतका त्यांचा मेंदू गहाण पडला होता हे मान्य करण्यात कुणाला लाज वाटायचे कारण नाही - असो !


    त्यांनी बांधलेल्या मंदिरांच्या दगडांना जरी स्पर्श करत त्या चिऱ्या वरून हात फिरवला तरी त्या मातेचे वात्सल्य अनुभवता येऊ शकते -हा माझा अनुभव आहे



    मी मागेपण म्हटले होते की समज झाशीचे राज्य खालसा झाले नसते तर झाशीच्या राणीने अठराशे सत्तावन्न च्या समरात भाग घेतला असता का ?- तोच प्रश्न अहिल्या बाईंच्या बाबतीत सतावतो - त्या जितक्या महान तितकेच मल्हारराव महान ठरतात - त्यांच्या पारखणाऱ्या नजरेची महानता अवर्णनीय आहे - त्यांनी केलेले संस्कार पण महान ठरतात तसेच अहिल्या बाईच्या अभ्यासू वृत्तीचेपण कौतुक वाटते .

    मी लिहिले यात कुठेही कुणाची खिल्ली उडवण्याचे माझ्या मनातही नव्हते आणि असणारही नाही


    ज्यांना समजून घेण्याला हे आयुष्य पुरे पडणार नाही अशा महान लोकांची मी बापडी कशी खिल्ली उडवेन ?


    पण तरीही एकसारखे इतिहासात डोकावत सध्याच्या गरजांसाठी त्या महान लोकाना वापरणे हे नक्कीच निषेधार्ह वाटते . हा सद्गुण नाही असलाच तर दुर्गुण मानला जावा असे माझे मत आहे .

    आपण त्यांच्या नावाची खिरापत वाटत सगळीकडे त्यांच्या नावाचे बोर्ड लावत सुटणे हि त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल का आपण लिहिलेल्या लेखांसारखे अजून एकामागून एक विचार मंथन करणारे लेख लिहून त्यांच्या स्मृतीला वंदन केले तर ते जास्त संयुक्तिक ठरेल !


    ब्राह्मणांनी पेशव्याना धरायचे , मराठ्यानी शिवाजीला , धनगरांनी होळकर आणि माळी वर्गाने शिंदे सरकारला - त्यातच आपला मुद्दा पुढे रेटण्या साठी भडकपणे इतर जातीना सवंगपणे हिणवायचे - हे कुठेतरी थांबले तर बरे होईल !

    ReplyDelete
    Replies
    1. स्वरदा, तुमचा घोर गैरसमज झलेला दिसतो. सरळ प्रश्न विचारण्यापेक्षा आधी आडवळणाने आप्पा-बाप्पांच्या दिलखुलासपणाआडुन तुम्ही विचारले व माझी मनोवृत्ती निरोगी नाही (म्हणजेच रोगट आहे) असा शेराही मारता हे चुकीचे नाही काय? येथे पेशव्यांचा काय संबंध? एका महिलेवर स्वरी करणारा राघोबादादा कसा वीर ठरेल? बाजीरावोत्तर काळात सारेच सरदार स्वतंत्र झाले त्यामुळे त्यांना राजा-महाराजा बनवणारे पेशवे (व म्हणुणच सातारकरही) कोण? असो. राहिले नांव विद्यापीठांना देण्याबाबत. मुळात विद्यापीठांना व्यक्तींचे नांव देण्याची प्रथाच नसती तर हा मुद्दा येण्याचे कारणच नव्हते. पण प्रथा निर्माण केली तर पुरोगामी महाराष्ट्रात एका तरी विद्यापीठाला कोणा तरी सुयोग्य महिलेचे नांव दिल्याने असा कोणता उत्पात झाला असता? मुक्ताईंचे दिले तरी चालले असते. येथे धनगर-माळी-न्राह्मण हा प्रश्नच कोठे आला? असो. अहिल्याबाईंबद्दल तुम्हाला ममता वाटते हेही नसे थोडके. धन्यवाद.

      Delete
  6. संजय सरांचे एकूण लिखाण वाचले आणि इतरांनी त्यांच्याशी केलेला प्रतिवाद वाचला की

    पूर्ण खात्री पटते

    संजय फारच लंगडे पडतात

    त्यांना नेमकेपणे निरुत्तर केले की ते विषय बदलतात

    विषय इतका सोपा आहे - तो असा . -


    नुसती नावे देण्याने काहीही घडत नाही आणि कल्पना करा -

    जर आजच्या तथाकथित स्वयं घोषित सुधारकांचे वर्तन पाहिले तर , समजा शिवाजी अहिल्याबाई अशा व्यक्ती आज अवतरल्या तर त्या कपाळावर हात मारून घेतील अशी अवस्था आहे

    ReplyDelete
    Replies
    1. मी थोर व्यक्तींची नांवे द्यावीत या मताचा आहे. तुमचे मत वेगळे आहे. असुद्यात कि राव! त्यासाठी विषय भरकटवण्याचे कारण काय?

      Delete
    2. विषय भरकटवण्याचे कारण...

      हे असावे - http://www.youtube.com/watch?v=KLRozwuoLuE



      Delete
  7. हा वाद आहे खरे समाजकार्य करणारे आणि सोंग काढणारे यांचा !


    आम्हाला मासाहेबानी रामायण - महाभारतातील गोष्टी सांगितल्या , त्यावेळेस त्यांना आम्ही अडचणीत आणत असे नाही विचारले की - रामायण आधी घडल का महाभारत ?संस्कृत हि देवांची भाषा होती का ?हा सगळा भटा ब्राह्मणांचा खेळ आहे का हो मासाहेब ?


    आज हा संजय जो वाद घालतो आहे तो असा पोरकट आहे !

    इतके वय असून याला इतका पोच कसां नाही ?


    हे सगळे त्याचे लिखाण आजच्या राजकारणाला समोर ठेवून केले जात आहे अशी आमची खात्री झाली आहे - समाजकारण तर दूरच राहिले !


    पण अशाना सांगून समजत नाही - त्यांना परिस्थितीच डोळ्यात अंजन घालते तेंव्हा जाग येते

    अशा झोपेचे ढोंग करून झोपलेल्या ना जागे करणे आम्हालाही अशक्यच !

    ReplyDelete
    Replies
    1. पण प्रयत्न करताय राजे हेही नसे थोडके...मासाहेबांना मानाचा मुजरा सांगा!

      Delete
  8. SANJAYJI AAPAN FAAR SHAAN LEKH LIHILA PARANTU MALA EK GOSTHA VICHARAYCI TI HI KI SAVITRI BAI AANI AHILLYA BAI YANCHE JAVAL JAVAL 100,VARSHAYACHE ANTAR ASUN JAR AHILLYA BAILA TYANCHYA SASRYANI MALLAHRRAO HOLKARANI LIHAYLA VACHAYLA SIKAVLE HOTE TAR BHARTACHI PAHILI MAHILA SIKSIKA SAVITRI BAI LA KA MHANTAT MALLAHARRAVANNA KA NAHI KARAN TYANNI AAPLYA SUNELA KA HOINA SARV PRATHAM MAHILELA TYANI SIKSIT KELE BAROBAR KI NAHI -------KRUPAYA VISTAR SAHIT SAMJAUN SANGAL HI APEKSHA THEUN AAPLYEA UTTARACHI VAAPAHAT AAHO

    ReplyDelete
    Replies
    1. व्यक्तिगत पातळीवर मल्हाररावांनी जे केले ते नक्कीच कौतुकास्पस्द असले तरी सावित्रीबाइंनी स्त्री शिक्षणाची अवैदिकांसाठी द्वारे व्यापक प्रमाणात उघडली. शिवाय शिक्षणक्षेत्रातील काम एवढेच मर्यादित त्यांचे काम नाही...ब्राह्मण विधवांची बाळंतपणे, केशवपनाविरुद्धचे कार्य इ. अनेक कार्ये त्यांनी केली आहेत जी सर्वांनाच आदरभूत अशी आहेत.

      Delete
    2. SANJAYJI MALA AHILLYABAI AANI SAVITRIBAI YANCHYA KARYACHYE MULLYE MAPAN KARAYCHE NAHI KINVA YA DONIHI MAHAN MATAN MADHHE KON EK LAHAN KON EK MOTHI ASLE KAHI SANGAYCHE NAHI FAKT PAHILI SIKSIT MAHILA KON HACH MAZA SAVAL HOTA KAARAN MANSANE SATYE JANUN GHYAYLA PAHIJE HECH MAZE DHEYA AAHE

      Delete
  9. Punyashowlok Maharani Aahilyabai Holkar yanche vidyapithala nav tar dyavech lagel
    pan kanhi jananche ugich potshul ka uthale aahe yache nawak vathate.

    ReplyDelete
  10. सुंदर लेख. पुण्यश्लोक अहिल्याबाईंबद्दल परकीय शक्तींनी, भारतातील इतर राजांनी जे आदरार्थी बोललेय , लिहिलेय यावरून त्या किती महान होत्या याचा प्रत्यय येतो. आदर्श राज्य कारभार कसा आसावा याचा पाठ त्यांनी घालून दिला. एवढे महान कार्य करणारया महान व्यक्तीचे यथोचित आदर सन्मान झालाच पाहिजे.

    ReplyDelete
  11. instead of changing existing names,create new universities and give the names of the great personalities.

    ReplyDelete
  12. Mr. Sanjay Sonvani, Don’t waste your time to reply unethical questions. because no any answer will satisfy them. So, you must keep writing…and writing. Those people don’t have right to ask the question, who’s past generation spreading cultural terrorism. Ignore them; they are only threats & barriers in your writing journey! Keep it up.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...