Saturday, May 18, 2013

नाथयोगिनी मुक्ताबाई!



संत ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण एवढीच ओळख मुक्ताबाइंची नाही. चारही भावंडांना वैदिक धर्मव्यवस्थेने झिडकारले. अत्यंत छळ केला. तत्कालीन समाजव्यवस्थेत नाथ संप्रदाय हा समतेचा संप्रदाय म्हणुन अत्यंत प्रसिद्ध होता. निवृत्तीनाथ हे मुक्ताईचे थोरले बंधू. त्यांनी वैदिक व्यवस्था आपल्याला जवळ करत नाही हे पाहुन गहिनीनाथांकडुन नाथपंथाची दीक्षा घेतली. निवृत्तीनाथ आपल्या भावंडांचेही गुरू बनले. योगासाधनेने चारही भावंडांनी आपले व्यक्तिमत्व तेजस्वी आणि आत्मज्ञानाने सम्रुद्ध बनवले. ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहून नाथ तत्वज्ञानाला नवी झळाळी प्राप्त करुन दिली.

मुक्ताबाईंच जन्म १२७९ मधील. चार भावंडांत त्या सर्वात धाकट्या...आणि म्हणुन सर्वांच्या लाडक्याही. मुक्ताबाईंना अवघे एकोणिस वर्षांचे आयुष्य लाभले. परंतु नाथ योगामुळे हे आयुष्य ज्ञानाने समृद्ध आणि अत्यंत सुखमय असे बनवण्यात मुक्ताबाई यशस्वी झाल्या. निवूत्ती-ज्ञाना-सोपानासारखे उत्तुंग आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे बंधु असतांनाही त्यांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व लोप पावू दिले नाही. सुशीला कुप्पुस्वामी म्हणतात, मुक्ताबाई हे एक प्रगल्भ आणि आत्मविश्वासाने भरलेले स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. स्त्री असुनही दीनवाना स्त्रीभाव तिच्या एकाही अभंगात आढळुन येत नाही. सगुण भक्तीपेक्षा निर्गुणाच्या प्रतीतीला तिने महत्व दिले आणि हाच तिच्या योगिनी असल्याचा महत्वाचा पुरावा आहे. चांगा वटेश्वरासारख्या तत्कालीन महान योग्यालाही ज्ञानोपदेश करनारी मुक्ताबाई ही यादवकाळातील एक अत्युच्च स्त्रीवैभव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

"नाही सुख दु:ख...पापपुण्य नाही
नाही कर्म धर्म...कल्पना नाही
नाही मोक्ष...ना भावबंध नाही
म्हणे वटेश्वरा ब्रह्म नाही...सहजसिद्ध बोले मुक्ताई!

हा प्रबळ आत्मविश्वास मुक्ताईने नाथ परंपरेचे तत्वज्ञान केवढे पचवलेले होते याचे एक प्रतीक आहे. या भावंडांना वैदिक मंडळीकडुन अविरत छळ सोसावा लागला, पण मुक्ताईने कधी आपला तोल ढळु दिलेला दिसत नाही. ताटीचे अभंग मुक्ताईच्या कारुण्यशील वत्सल भगिनीच्या मनाचा एक आकांत आहेत...पण त्यात शरणागतता नाही. हीनदीन भावना नाही. आहे तो उत्कट आत्मविश्वास आणि सत्यावरील अगाध निष्ठा. आपल्या भावंडांचे तिने मातेच्या जबाबदारीने अपरंपार काळजी घेतली. नाथपरंपरेला साजेश्या पद्धतीने एका मागुन एक भावांनी समाध्या घेतल्यानंतर या विरक्त योगिनीला संसार निरर्थक वाटला असल्यास नवल नाही.

वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी मुक्ताईंनी समाधी घेतली. एक नाथ योगिनी, कारुण्यसिंधू मुक्ताई भवसागराच्या पाशातुन मुक्त झाली. मुक्ताईचे आज फारफार तर पन्नास अभंग अवशिष्ट आहेत. पण त्यातुन मुक्ताईचे भव्य दीव्य व्यक्तिमत्व ठळकपणे उभे राहते. आज त्यांच्या समाधीदिनाला ७१६ वर्ष पुर्ण झालीत. या महायोगिनीस विनम्र अभिवादन!

5 comments:

  1. Dhanyawad.Sadar 50 Abhang internetwar kuthe milu shakatil ka?

    ReplyDelete
    Replies
    1. http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/abhang/muktabai/index(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4.%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87.%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97).aspx

      yaa linkvar apalyala bahutek sarv abhang milatil!

      Delete
  2. आदरणीय संजयजी,
    पुराणकाल से ही “शोषण और युद्ध” मानवीय मस्तिष्क और करुणा का सर्वोत्तम “बीज-तत्व” बाहर लाने वाले सबसे शक्तिशाली प्रेरक माने गए है. इसके उलटे दया या रहम की भीख मांगना और अपनी व्यथा की दुकानदारी सजाना मनुष्य का एक अवगुण माना गया है. मुक्ताबाई हो या संत ज्ञानदेव, दोनों के साहित्य में उनके साथ हुए दुर्व्यवहार और अन्याय का कोई जिक्र नहीं है. है तो बस, उस शोषण से मिली मुक्ति का सुरम्य संगीत. महान दार्शनिक रूमी ने कहा भी है कि आत्मा पर होनेवाले घाव ही वे छिद्र है जहां से ज्ञान का प्रकाश भीतर आता है.
    दुखों की दुकानें तो कल्याणकारी राज्य व्यवस्था और तथाकथित नेताओं की राजनीती के चारागाह है. दुनिया में दूसरे के दुःख दूर करने से बड़ा कोई नशा नहीं है. जो काम दुखों से गुजरकर आसानी से हो सकता है, हमारी व्यवस्था उसी में लोगों का सारा जीवन फँसा देती है. ऐसे नेता, लोगों को उनके जीवन संघर्ष उन्हें स्वयं न लड़ने देकर उनके मानवीय जीवन का सबसे बड़ा अपमान करते है, फिर उनकी व्यथाओं पर अपनी दुकाने सजाते है. नतीजतन जहां जहां सरकार मजबूत है, वहाँ वहाँ समाज और मनुष्य कमजोर होता चला गया, मानवीय प्रतिभा कुंठित होती चली गई.
    मै यहां मदर टेरेसा या बाबा आमटे की बात नहीं कर रहा, जिन्होंने सेवा को जीवन का मुख्य मार्ग बनाकर अपनी आध्यात्मिक उन्नति हासिल की बल्कि उन आक्रोश से भरे नेताओं की बात कर रहा हूं, जिन्होंने प्रत्येक व्यक्ति के दुःख को सार्वजनिक दुःख के बाजार में तब्दील कर दुनिया को महान गाथाओं से सदा के लिए वंचित कर दिया है. जिन्होंने मानवीय इतिहास के सबसे बड़े भ्रष्टाचारी निजाम और दलालों की एक लंबी श्रृंखला को जन्म दे दिया है. और उस भ्रष्ट निजाम के चलायमान रखने के लिए कानून, न्यायालय, प्रशाशन, लायसेंस, कोटा, परमिट और पहरेदारों का एक विशाल जंजाल हमारे मस्तक पर सदा के लिए बिठा दिया है.
    मेरी अपनी नानी बेहद गरीब थी और उसने भूख को महीनों भोगा था किंतु किसी के सामने हाथ नहीं पसारा. नतीजतन अपनी मृत्यु के समय वह चार बेटों और बीस पोते-पोतियों का एक भरा-पूरा समृद्ध परिवार पीछे छोड़ गई. मै आज भी जब किसी तनाव का शिकार होता हूं तो उसके उन दुर्दिनों की याद करके स्वयं को खड़ा कर लेता हूं.

    दिनेश शर्मा

    ReplyDelete
  3. याच परंपरेशी नाते सांगणारा अभंग -
    "आहे आहे म्हणोनी पहावया गेलो
    नाही नाही हे जाणोनिया आलो
    विसा खेचर म्हणे मुक्ताबाई
    काही नाही हे दावूनिया जाई"

    -सचिन शिंदे

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...