Tuesday, May 14, 2013

सुर्य प्यायलेला माणुस

स्वप्नांना
मला कधीच दोष द्यायचा
नव्हता
स्वप्ने पाहणे समजा
माझी नियती होती
स्वप्न कोसळतांना पाहणे हे समजा
माझे अटळ भाग्यच होते...
असेल...

कितीदा सांगाल मला?
आणि कितीदा ऐकू मी?

मला माझी नियती आणि भाग्य
अगदीच समजत नाही
असे का बरे वाटते?
मी रातांधळा नव्हे कि
चकवा लागल्याप्रमाणे 

रातभर गोल गोल फिरणारा नव्हे
जरी टाकु पहाल मला वारंवार चकव्यात!

लक्षात घ्या
हैवानी प्रेरणा पिवून माझ्या बांधवांना
पथभ्रष्ट करणा-या सैतानांनो...

मी सुर्य प्यायलेला माणुस आहे!

No comments:

Post a Comment

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मर्यादा

     चीनच्या डीपसीकने अलीकडेच जगभर कसा हादरा दिला याचे वृत्त सर्वांनीच वाचले असेल. त्यावर चर्चाही केल्या असतील. भारतही आपने स्वत:चे ए....