Wednesday, July 24, 2013

जाणार कोठे?

मृत्यू हुंदडत असतो
चोही बाजुनं...
जाणवत असतात त्याला आपले
श्वास-नि:श्वास
भ्रमांमधले भ्रम...विभ्रम...
येथून तेथली निरंतर
व्यर्थ जीवघेणी धाव...
धपापत्या उरांचा घेत असतो तो
मोहस्पर्श
अजाणांना अजाणतेत
असतो कसा
रमवत तो!

...खेळच त्याचा असला
हसत असतो...
दशदिशांतून वाकुल्या दाखवुन...
माहित असते त्याला ठाम
कितीही धावले तरी
जाणार कोठे हे
जावून जावून?

3 comments:

  1. सुंदर रचना सर. खास करुन मृत्यु हुंदडत असतो ही सुरुवातच अप्रतिम. कल्पना कशी असावी याचे हे एक उत्तम उदाहरण आहे

    ReplyDelete
  2. काटा आला अंगावर. पुढे म्हणावसं वाटतं,

    खेळच त्याचा असला
    कधी सांगून कधी फसवून
    सावज कायम त्याच्याच हातात...

    ReplyDelete
  3. धन्यवाद संजयजी, किती प्रतिकात्मक अभिव्यक्ती. खरेच दहशतवाद्यांनी सगळीकडेच मृत्यूची जाणीव ठेवली आहे आणि त्यामुळेच सामान्य माणसाला भ्रम विभ्रम होताहेत. पण अजाणता तो सेक्युलर लोकांना रमवत असतो साध्वी आणि पुरोहितांच्या आठवणीत. सामान्य माणसाची धाव व्यर्थच. असे खेळ खेळून तो हसणारच. वाकुल्या दाखवणाच कारण त्याला ठाऊक आहे आपली बाजू घ्यायला सेक्युलर आहेतच. त्यामुळेच तर त्यांना पुरोगामी म्हणून मिरवता येईल अगदी आरामात वर शोषणाविरुध्द संघर्ष केल्याचे समाधान मोफत . बिचारा सामान्य माणूस जाऊन जाऊन जाणार कोठे ?

    ReplyDelete

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...