Saturday, August 31, 2013

आम्हाला आमचे आम्ही व्हावे लागेल!

कोणत्याही समाजाच्या नैतिकतेचे आणि प्रागतिक सुसंस्कृततेचे मापदंड म्हणजे साहित्य आणि साहित्यविचार सृजन असते. साहित्य हे इतिहास-वर्तमानाचे व्यक्तिसापेक्ष वाटले तरी वैश्विक आकलन जसे असते तसेच ते भविष्याची तेवढीच प्रगल्भ दिशाही दिग्दर्शित करीत असते. मानवी भाव-भावनांना कवेत घेण्याचा प्रयत्न करत स्वत:लाच उमगून घेण्यासाठी मदत करणारे साहित्य हे सापेक्षतेतील निरपेक्षतेची अट पाळत असते. विचारकलहांना नुसते जन्म देत ते थांबत नाही तर विचारकलहांतुनच नवसांस्कृतिक प्रवाहांना जन्म द्यायला ते सहाय्यभूत ठरते. ते सर्जनशील बंडखोर असते. दोन-सव्वादोन हजार वर्षांपुर्वीच्या गाथा सप्तशतीतील सर्जक काव्याला ओलांडू शकेल असे या मातीचे काव्य अभावानेच आहे. प्रेमचंद, शरदबाबू, भैरप्पांसारख्यांचे आदर्श ठेवण्याऐवजी पाश्चात्य साहित्यिक मापदंड आपण डोक्यावर घेतल्याने आपले असे प्रतिबिंब साहित्यात मिळणे अशक्य होत गेले. पाश्चात्य मानसिकता आपल्या देशी नायकांवर थोपत जेही काही साहित्य म्हणून निर्माण झाले ते कितीही देशीवादात बसवले तरी त्यात देशीपणा येणे शक्य नव्हते कारण त्यात "देशी" असे काहीच नव्हते आणि म्हणूनच ते आमचे अभावानेच प्रतिबिंब होते. आम्ही आमचा नव्याने सांस्कृतिक शोध घेण्याची गरज आहे ती यामुळेच!

मला आणि माझ्या आणि तुमच्या पिढ्यांना आपल्या प्रेरणा अन्य मातीतील साहित्यात शोधाव्या लागत असतील तर त्याचा नेमका अन्व्यार्थ काय? चिंतन-मंथन नको यावर?

आमच्या पिढीला पराकोटीचा भांडवलशाहीवाद सांगणा-या आयन -यंड असतील अथवा हेमिंग्वेच्या मानवतावादी कादंब-या असतील अधिक भावल्या असतील तर ते अपयश आमच्या सर्जकतेचे आहे. कारण आम्ही वैश्विक अवकाश व्यापणारे साहित्य निर्माण करायला हवे याचे भान ठेवले नाही. ज्यांनी निर्माण केले ते आपल्याच सामाजिक दोषांमुळे अडगळीत फेकले गेले. आजही आपण बदललेलो नाही. ज्या देशात लेखकाचे आडनांव बघून त्याचे लेखन वाचायचे कि नाही, वाचले तरी त्यावर बोलायचे अथवा लिहायचे कि नाही असे निर्णय होतात त्या देशाची संस्कृती अध:पतीत असते याबाबत शंका घ्यायचे कारण नाही.

पाश्चात्य लेखक कोणत्या देशाचे, वंशाचे, धर्मपंथाचे याचा विचार न करता आम्ही भारतियांनी त्यांना डोक्यावर घेतले आहे. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालो आहोत. पण आम्ही आमच्याच मातीच्या...रक्ताच्या आणि सहजीवन जगणा-या लेखकांच्या बाबतीत कुठे अकारण अतिउदार तर कोठे अतिकृपण राहिलो आहोत. म्हणून आमची साहित्य संस्कृती तेवढीच घटत्या पातळीवर राहिलेली आहे.

आम्हाला आमच्या मातीचेच सृजन हवे आहे. आम्हाला आमचेच नवविचार हवे आहेत. कारण हे आमचे जगणे आहे. आमचा भवताल अन्य देशांशी तुलना करता येत नाही. कारण संस्कृती आणि समाजमानसिकताच मुळात वेगळी आहे. तिला बदलायचे असेल तर आमच्या साहित्याला बदलावे लागेल. आमच्या लेखकांना बदलावे लागेल.

आम्हाला आमचे आम्ही व्हावे लागेल!

18 comments:

  1. संजय सर -

    अविनाश सर ,

    सुधाकर भाऊ

    आणि

    गोरख भाऊ -

    फोटोत जलपूजन करणाऱ्या संजय सरांच्या ब्लोग वर हे इतके आचकट विचकट लिहिलेले पाहून त्या नदीत जीव द्यावासा अवाटेल !- इतकी घाणेरडी भाषा - ओंगळ अर्थ - मूळ विषयाचा काहीही अर्थाअर्थी संबंध नाही अशी केलेली दुरुत्तरे आणि त्याचा चर्चेत येणारा व्यतय - हे निरोगीपणाचे लक्षण नाही हे नक्की

    - ते दोघे गोरख अविनाश किंवा सुधाकर आणि इतर एकमेकाला ओळखत नाहीत म्हणूनच असे धाडस करतात - त्यांना खात्री असते की आपण खरे खुरे निनावी चेहरे आहोत म्हणूनच ते असे अभद्र लिहित सुटतात !- मग ते आंग्ल असो वा मराठी असो-

    पण हे टाळता येईल का ?

    असे लिहिणे ही कोणाची गरज चअसल्यास त्यांना हा विचारमंच का खुला ठेवायचा?

    माझी संजय सराना विनंती आहे की ,

    त्यांनी अशा विचाराना आणि अशा मांडणीला असे व्यासपीठ मिळवू देवू नये !


    ते जर असे करू शकले तर त्यांच्या विजयाच्या दृष्टीने त्यांनी टाकलेले हे एक भक्कम पाउल असेल !

    ReplyDelete
  2. संजय सर

    आपण नेमकेपणा दाखवाल का - नाहीतर हे शब्दांचे नुसते बुडबुडे ठरतील !

    तशी तुम्हाला सवय पण आहे

    क्षणात तुम्ही मनुवाद , संस्कृत भाषेचे प्राचीनत्व , यज्ञ कर्म करणारे आर्य ,

    शैव वैष्णव , आर्य अनार्य , पार अवेस्ता आणि वेदकाल असे विषय हाताळता पण

    पेशवे होळकर ,किंवा शिवाजी हे विषय नेमकेपणे मांडतानाचा आव आणत वर्गभेद जातिभेद - ब्राह्मणवाद असे आगंतुक भरकटत विषयांतर करत बसता

    तुम्हाला राम रामायण महाभारत असेसुद्धा विषय मांडताना वर्णभेद आणि वर्गभेद याचा मोह सुटत नाही - आपली माती म्हणजे नेमके कोण ?या आपलेपणाच्या यादीत कोण कोण येते -

    का हा शब्दांचा खेळ आहे नुसता ?


    तुमच्याकडे असे प्रश्न विचारणाऱ्या लोकांवर तुटून पडणारी पाळीव फौजपण असतेच हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे



    आपण साहित्यात देश पंथ आणि वंश असा भेद करता आणि ज्या प्रेमचंद शरद्बाबुचे कौतुक करता पण त्यांच्यावर कुणाचा पगडा होता ते विसरता

    आपली पहिल्या परिच्छेदातील सर्व वाक्ये म्हणजे जाड जाड शब्दांचा चिखल आहे -

    गाथा सप्तशती कुणी लिहिली ? एकीकडे आपण हिंदू धर्मच नाही असे डौलदार वाक्य फेकता आणि एकीकडे गाथा सप्तशतिला सर्जकता चिकटवता -



    आपण आपला सांस्कुतिक शोध घ्यायचा म्हणजे काय ?अशा शोधात शैव वैष्णव करत , आर्य अनार्य आणि द्रविड करत हिंदू आणि मोहनजो दारो अशी चिकित्सा करत हाती काय लागणार आहे -आपले विचार बिनबुडाचे आणि लेखन तर अत्यंत अतार्किक आणि पोरकट असते हे आपणपण जाणताच !

    कदाचित मुठभर अशिक्षितांच्या समोर आपण उठून दिसत असाल पण कुणीही मान्यवर संशोधक आणि लेखक आपली गणती बुद्धिवादी म्हणून करत नाही हे आपणपण ओळखून

    आहात - बरोबर ? या साहित्य संमेलनाबाबत आपल्या योग्यतेचा विचार करणे सुद्धा एक विनोद ठरेल असे म्हणावेसे वाटते - पुण्याच्या साहित्य वर्तुळात आपली नोंदही घेतली जात नाही हे कसे ?का त्याला पण ब्राह्मणवाद जबाबदार ?

    कुठूनतरी चार चमकदार वाक्यांची उचलेगिरी करून त्याला जाती आणि वर्गवाद याची फोडणी देऊन चटकदार साहित्यिक पदार्थ खपवायची आपली हौस भागते इतकेच !

    ReplyDelete
  3. संजय सोनवणी यांचा अनिता पाटील यांना आशीर्वाद

    "ज्यांच्या ब्लॉगची दखल विकिपीडियाला सुद्धा घ्यावी लागली, ते मराठीतील प्रख्यातब्लॉगर श्री. संजय सोनवणी"
    "श्री. संजय सोनवणी यांनी अनिता पाटील यांच्या ब्लॉगचे
    कौतुक करून आशीर्वाद दिला आहे. त्यांनी लिहिलेले
    पत्र, त्यांच्याच भाषेत येथे देत आहे".
    .........................................................................................

    अनिताजी,

    मी सर्वप्रथम आपले मन:पुर्वक अभिनंदन करतो. आपल्या ब्लोगवर प्रतिक्रिया देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. आपण जो अत्यंत संतुलित आणि ध्येयवादाला मुळीच तिलांजली न देता जो मार्ग आता पकडला आहे तो नक्कीच प्रशंसनीय आहे. आपला लढा समतेसाठी आहे. बंधुत्वासाठीच आहे. आपले भांडण नाही. खरे तर आपले कोणाशीच भांडण नाही. आपण महान बळीराजाचे वारस आहोत. बळीराजाने आपल्या प्रजेत कसलाही भेद केला नव्हता. आपण भेदातीत जाण्यासाठी कटीबद्ध आहोत यात शंका नाही. भेद माजवु पाहणा-यांना अंधांना जागे मात्र नक्कीच करायला हवे, पण ते बळीराजाच्या व्यापक मानवतावादी द्रुष्टीकोनातुन. माणसे बदलत नाहीत असे आजिबात नाही. माणसे बदलतात कारण बदलणे हाच मानवी स्वभाव आहे. फक्त सांगण्याची पद्धत संयत/सम्यक आणि मुलभुत तत्वद्न्यानावर आधारित अशी हवी. आता तुम्ही नेमके तसेच करत आहात.

    पानिपतबाबत आपल्या लेखात काही ऐतिहासिक त्रुटी असल्या तरी त्या मुळात हेतुत: नसल्याने त्याकडे दुर्लक्षच करायला हवे. आरएसेस, गडकरी, मोदी, भागवत, हिमानी सावरकर, सनातन प्रभात ईईई हा साराच कंपु देशाच्या समतेच्या वाटचालीकडे जाणा-या मार्गातील अडसर आहेत याबद्दल शंका बाळगायचे कारण नाही. हे अडसर कसे दुर करायचे हे आपल्यापुढचे आव्हान आहे. या संघटना व त्यामागील प्रव्रुत्तींवर आपण सतत प्रकाशझोत टाकणे आवश्यक आहे व त्याच वेळीस बहुजनांना द्न्यानसत्ता, अर्थसत्ता याविषयी जागे करण्याचीही गरज आहे. या संघटनांत दुर्दैवाने बहुजनांची संख्या वाढत आहे. संघटना या प्रव्रुत्ती असतात. या प्रव्रुत्तींना सर्वच समाज (मग ते कोणीही व कोणत्याही जातीचे असोत) अजुन तरी शरण गेलेला नाही. तो जावू नये हीच आपली इच्छा असायला हवी. तुम्हीच तुमच्या ब्लोगवर म्हणता..."कोणाही जीवाचा न घडो मत्सर..." येथे मत्सर हा शब्द तुकोबारायांनी अत्यंत जाणीवपुर्वक वापरला आहे. मत्सरग्रस्त कधीही स्वत:ची वा इतरांची प्रगती साधु शकत नाहीत.

    अधिक लिहित नाही. कोणाला उपदेश करण्याची माझी योग्यता नाही. पण तुम्ही माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत जो सकारात्मक बदल घडवला ते मात्र अद्भुत आहे एवढे येथे मी आवर्जुन नमुद करतो. मी तुमचा थोरला भाउ आहे आणि हा मान तुम्ही मला दिलात हे तुमच्या परिवर्तनातुन ठळक होते. मी तुम्हाला या परिवर्तनवादी विचारसरणीला अनंत शुभेच्छा व आशिर्वाद देतो.

    -संजय सोनवणी


    ReplyDelete
  4. ।। आसारामायण ।।

    रवींद्र तहकिक

    ओम नमोजी गध्या । काय चालवलंय सध्या ।
    करोडोंच्या आराध्या । हरामखोरा ।।१।।
    लोक म्हणती तुजला बापू । तू तर निघाला खिसे कापू ।
    सत्याचा आपलापू । केलास गा ।।२।।
    कथा सांगतो रामाची । चाल खेळतो रावणाची ।
    गर्दी जमवतो मुर्खांची ।त्यासी म्हणे सत्संग ।।३।।
    रंगांची खेळतो होळी ।करितो टेकरे खाली ।
    प्रत्येक पोरगी साली । वाटते तुला ।।४।।।। .
    अकलेचे वाजले दिवाळे । साधुत्वाला फसले काळे ।
    तुझ्याहून डोम कावळे । बरे बाबा ।।५।।
    पाहून लहानग्या पोरी । नजर तुझी बावरी ।
    पाहिजे रोज एक कोरी । डिमांड तुझी ।।६।।
    अवदसा ही अशी । म्हातारपणी सुचली कशी ।
    कशी शिंकली माशी । पाऊणशीत ।।७।।
    कुणी म्हणती बापू थोर ।कुणी म्हणती बापू चोर ।
    कुणी म्हणी बापू मोर । चहाटऴ ।।८।।
    नाचताना मोर । दिसे मन विभोर ।
    मागे मात्र त्याची थोर । गांड उघडी ।।९।।
    तसेच झाले तुझे । पोथ्यांचे वाहिले ओझे ।
    गुरूत्व तुझे वांझोटे । नराधमा ।।१०।।
    गाढवही गेले । ब्रम्हचर्यहि गेले ।
    हाती काय उरले । सांग तुझ्या ।।११।।
    तेलही गेले ।तूपही गेले ।
    धुपाटणे हाती आले । भोसडीच्या ।।१२।।
    खाउन केळ नारळ । माजलास जसा पोळ ।
    बुढाप्यात म्हतारचळ । सुक्काळीच्या ।।१३।।
    साधूवर भरवसा ।ठेवावा आता कसा ।
    घसरला असा कसा । फोकलीच्या ।।१४।।
    वाटले जर वेगळा ।तुझा जीवन सोहळा ।
    पण तुही निघाला बगळा । भाडखाऊ ।।१५।।
    सांगती महिला मुली । तुझी कसाब करणी ।
    रोज हवी नवतरुणी । माय घाल्या ।।१६।।
    कधी म्हणतो ती माझी नात । कधी म्हणतो बोलते वेडात ।
    कोणत्या भ्रमात । आहेस भडव्या ।।१७ ।।
    भर सभेत नाचतो । पोरी कवेत आवळतो ।
    रासलीला सांगतो । अवचीन्द्या ।।१८।।
    नाहीते केले धंदे ।त्यानेच झाले हे वांधे ।
    आता नाकाने कांदे । सोलू नको ।।१९।।
    पापाचा भरला घडा । आता तुरुंगात सडा ।
    बरे झाले मादरचोदा । सापडलास ।।२०।।

    ReplyDelete
  5. प्रो. तहकिक सर ,

    आपण ब्राह्मण द्वेष्ट्या अनिता पाटीलचा ब्लोग चालवता असे वाटते कुठेतरी वाचलेले -

    एका अर्थाने आपण शत्रूच - तरीही -

    समयोचित आसरामायण दिले आहे

    फारच छान आणि ओघवते लिखाण झाले आहे !खास अभिनंदन - अगदी मनापासून !

    आसाराम ब्राह्मण आहे का जातीने ? ते माहित असल्यास कृपया कळवा - त्याची जी जात असेल ती कळवा साऱ्या जगाला - म्हणजे एकदा जगालापण समजुदे -


    आसाराम हा एका सिंधी व्यापारी कुटुंबात जन्माला आला - मुळ गाव पाकिस्तानात -

    एक बायको एक मुलगा आणि एक मुलगी - पण या माणसाने किती , कसे आणि कुठे शेण खाल्ले ते सर्वांनाच माहित आहे -

    आपण चांगलीच रंगतदार कुचेष्टा करत त्या नीच जनावराची ची खिल्ली उडवली आहे

    आपले अभिनंदन ! त्याला बापू म्हणण्याचा आग्रह धरणारी मंडळी तर मेंदू गहाण टाकलेली असतील असे वाटते -


    प्रो. तहकिक सर ,


    आपण ब्राह्मण द्वेष्टे आहात हेपण जग प्रसिद्ध आहे !

    तरीही

    मी आपले ,स्वतः ब्राह्मण असूनही कौतुक करते !

    केवळ स्त्री धर्म म्हणून -आपले अभिनंदन करते आहे .

    आम्ही साऱ्या जणी , देव मानत नाही - तरीही या दुष्टास शासन होण्याला त्याची मदत होणार असेल तर ( आमची निरीश्वरता क्षणभर बाजूला ठेवून )त्याच्या कडे प्रार्थना सुद्धा करायला तयार आहोत ! हे सर्वात्मका सर्वेश्वरा - या नराधमाला कडक शिक्षा दे !

    आम्हाला कुणीच वाली नाही - जाळून खाक करून टाक अगदी त्यांच्या भक्तांसकट !

    आम्हाला आर्य कळत नाही द्रविड कळत नाही - धर्म तर नाहीच नाही -शिवधर्म तर नाहीच नाही कळत - मुसलमान बौद्ध आवडत नाहीत कारण ते फसवे धर्म वाटतात - प्रतिक्रियावादी -

    हिंदू हा धर्मच नव्हे हे संजय सरांचे तत्व आहेच अभ्यासायला -

    जात कळत नाही कारण आमची जात काही जणांनी बदनाम केली आहे !

    धर्म या शब्दालाच आम्ही घाबरतो !आम्हाला मानवता वगैरे शब्दांचा पण ऐकून ऐकून कंटाळा आला आहे ! - आज राज्य हवे आहे ते नीतीमत्तेचे , कायद्याचे ,

    पण आपण जाणता त्याप्रमाणे कायदा राखणारे कायद्याला हवे तसे वाकवत आहेत !

    धर्माचा अर्थ लावण्याची जबाबदारी असलेलेच अधर्म आचरत आहेत - जर देव असेल तर तो कसा काय अशा लिंग पिसाटाना मोकळे सोडतो ? म्हणून आम्ही देवालाच रिटायर केले आहे ! आमचे तत्वज्ञान भले चुकीचे असेल - हरकत नाही - निदान आम्ही या आसाराम सारखे ढोंग करत नाही

    प्रज्ञा खांडेकर

    ReplyDelete
    Replies
    1. प्रज्ञा खांडेकर यांना ….

      रविन्द्र तहकिक यांचा स न वि वि ;
      आपली आसाराम बापूवर मी लिहिलेल्या कविते वरील प्रतिक्रिया
      वाचली . आपण कवितेला मन पासून दाद दिली त्या बद्दल आभार .
      कवितेत असभ्य भाषा आहे हे मान्यच ! परंतु ती विषय आणि आशयाची
      गरज होती . आपण लिहा वाचा च्या सदस्य आहात . आमच्या ब्लोग च्याही वाचक आहात , आपण प्रतिक्रिया खुल्या मनाने दिली आहे .
      बापू च्या कृत्या मुळे आपण हि व्यथित आणि संतप्त आहात ; एक स्त्री
      म्हणूनच नव्हे तर मानवी मूल्याची चाड असणाऱ्या कुणालाही बापू
      सारख्या छीनाल आणि महाबिलंदर बोक्याचे मुस्काट खेटरा ने बडवण्याची इच्छया होईल .
      परंतु प्रज्ञाजी आपण पत्राच्या प्रारंभी मी ब्राम्हण विरोधी लेखन करतो
      आसा उल्लेख केला तो काही सत्यास धरून नाही ; आमचा ब्लोग किंवा आमचे संपादक मंडळ ; मी स्वत : अथवा आदरणीय अनिताजी आजीबात ब्राम्हण विरोधी नाहीत , एखादी जात कधीच वाईट नसते ; आमचा विरोध
      ब्राम्हण जातीला नाही ; प्रवूत्तीला आहे . तुम्ही याला शब्दच्छल म्हणाल
      परंतु हेच सत्य आहे . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मनु स्मृती
      ची होळी करणारा एक ब्राम्हणच होता . संस्कृतातील ज्ञान मराठीत आणून बहुजनांना ज्ञानाचे अमृत देणारा एक ब्राम्हणच होता . महात्मा गांधी देखील ब्राम्हणच होते . नुकतीच हत्या झालेले नरेंद्र दाभोलकर देखील ब्राम्हणच होते , असि किती तरी नवे सांगता येतील कि जे ब्राम्हण असूनही मानवता मुल्यांची जपवणूक करण्या साठी ब्राम्हणत्वचा त्याग करून बहुजनाच्या कल्याणासाठी आणि उत्थानासाठी झटले आहेत ;
      असे सर्व ब्राम्हण आमच्या साठी आदरणीयच आहेत.
      परंतु जो कोणी ब्राम्हण तो केवळ ब्राम्हण आहे म्हणून स्वतःला
      शुद्ध ,पवित्र , श्रेष्ठ , उच्च ,ज्ञानी आणि विशेष समजत असेल ; आणि
      धर्म किंवा परंपरांचा आधार सांगत किंवा आधार घेवून बहुजनांना कमी लेखत असेल , गटबाजी आणि षड्यंत्र करून बहुजनांना संधी नाकारत असेल , त्यांची अवहेलना किंवा टिंगल टवाळी करत असेल त्या भट -बोक्यांना पोत्यात घालून बुकलुन काढण्यास आम्ही कधीही मागे पुढे पाहणार नाही . त्याच बरोबर ब्राम्हण लेखक, कवी, विचारवंत ,राजकारणी ,समाजसेवक (?) ,कलावंत , धार्मिक पंडित -महंत वगैरे लोक ज्या प्रकारे
      गटबाजी करून बहुजन समाजाला विकास आणि प्रगती पासून वंचित ठेवतात त्यांचा समाचार आम्ही घेणारच ! आधुनिक काळातीलच नव्हे तर पुरातन काला पासून आजतागायत ज्यांनी ज्यांनी हे पाप केले आहे ; करत आहेत त्या बद्दल आम्ही लिहिणार ; बहुजनांना सत्याची जाणीव करून देणे हे आमचे व्रतच आहे . परंतु आम्ही ब्राम्हण विरोधी नाही आहोत , वाळवंटात पाय पोळत धावणाऱ्या महाराच्या पोराला उचलून घेणारे संत एकनाथ आम्हाला संत तुकाराम इतकेच वंदनीय आहेत . असो ; आपण आमचा ब्लोग वाचा , आपल्या प्रतीक्रीयांचेही स्वागत आहे . चर्चा तर झालीच पाहिजे . संवाद व्हावा , सुसंवाद झाला तर उत्तमच ! वाद असू नये हि अपेक्षा . किमान गैरसमज तरी नसावेत हि इच्छा ,
      कळावे ,आपला
      रवींद्र तहकीक

      Delete
  6. रा रा रवींद्र सर

    आपण दिलेले आसारामायण खरेच इतके ओघवते आहे की आपले मनापासून दिल खुलास पणे लगोलग अभिनंदन करावेसे वाटत आहे

    आपण जरी अगदी तीव्र अशिष्ट शब्द रचना वापरली आहेत - शिव्या वापरल्या आहेत - असंस्कृत भाषा पेरली आहे पण ते सर्व कसे या हलकट माणसाला शोभून दिसत असल्यामुळे अश्लील वाटत नाही हेच या काव्याचे सर्वात मोट्ठे वैशिठ्य म्हणता येईल .

    इतर ठिकाणी असे शब्द मनाला टोचले असते - पण इथे तर उलट ते यथार्थ वाटतात

    रवींद्र सर , काल रात्री टी व्ही बघत असताना एक गोष्ट मनास लागून राहिली - फार मोठ्ठा स्त्री समूह आसारामांचे समर्थन करत होता - ही विकृती म्हणावी का काय म्हणावे ?

    आपला समाज इतका भोळा आहे का ?रात्री १२ वाजता अशा संख्येने महिला जमा होतात हे आश्चर्य आहे -कुणीतरी याच्या मागे राजकीय शक्ती आहे - ती पराभूत होणे महत्वाचे आहे नाहीतर असे अनेक आसाराम निर्माण होतील आणि - अयोध्येचा खेळ जसा शिळ्या कढीला ऊत म्हणून दरवर्ष सहा महिन्यांनी वि हिं प खेळत असते तसेच अशा बापू लोकांचे फावेल - याना रस्त्यावर ओढून त्यांचे अब्रूचे धिंडवडे काढले पाहिजेत !


    श्री संजय सर -

    हा आसाराम खरा कोण ? मारवाडी का राजस्थानी ब्राह्मण ?त्याला इतका मोठ्ठा कुणी केला ?

    आता राजस्थान आणि एम पी म प्र मध्ये निवडणुका आहेत - त्यामुळे त्याला अटक कुणी करायची असा पेच होता का ?

    त्यांच्याच आश्रमात पूर्वी कवट्या आणि हाडे सापडली होती अशा माणसामागे इतक्या मोठ्या संख्येने समाज कसा जातो ?इतका का आपला समाज नीच दर्जाला गेला आहे ?

    हि पसरत जाणारी सामाजिक विकृती आहे का ?याला बांध कसा घालावा ?आपण असा एक सर्व्हे प्रसिद्ध कराल का ?

    प्रांत निहाय आजच्या घटकेला कसे कसे संत महंत या देशात तहान मांडून बसले आहेत आणि त्यांचे अधिकृत वैभव काय आहे - फार अभ्यासपूर्ण माहिती आहाती लागेल वाचकांच्या !

    पुनीत आंबेकर

    ReplyDelete
  7. अभिनंदन

    सर आपण सुंदर कविता थोड्या वेळात लिहिली आणि एक चित्रच उभे राहिले आमच्या डोळ्यासमोर

    पांढऱ्या दाढीत लपलेला राक्षस दिसला

    ReplyDelete
  8. स्वदेशी आर्यपुत्रSeptember 1, 2013 at 2:52 AM

    मुद्दा क्रमांक एक

    "कारण आम्ही वैश्विक अवकाश व्यापणारे साहित्य निर्माण करायला हवे याचे भान ठेवले नाही."
    "आम्हाला आमच्या मातीचेच सृजन हवे आहे."
    - इति सोनवणी सर

    एकीकडे आपल्या मातीतले साहित्य वैश्विक झाले पाहिजे म्हणून आक्रोश करायचा आणि दुसरीकडे वैश्विक स्तरावर मान्य झालेले साहित्य मात्र परकीय मातीतले ठरवून देशी साहित्याचा आग्रह धरायचा.
    - ह्याला ग्रामीण मराठीत दुटप्पीपणा किंवा पुणेरी साहित्यिक भाषेत डबल ढोलकी असे म्हणतात.


    मुद्दा क्रमांक दोन

    "पाश्चात्य लेखक कोणत्या "देशाचे", "वंशाचे", "धर्मपंथाचे" याचा विचार न करता आम्ही भारतियांनी त्यांना डोक्यावर घेतले आहे."
    - इति सोनवणी सर

    "ज्या देशात लेखकाचे आडनांव बघून त्याचे लेखन वाचायचे कि नाही, वाचले तरी त्यावर बोलायचे अथवा लिहायचे कि नाही असे निर्णय होतात त्या देशाची संस्कृती अध:पतीत असते याबाबत शंका घ्यायचे कारण नाही."
    - इति सोनवणी सर

    ह्या दोन वाक्यांत काही विसंगती आहे असे वाटत नाही काय अध्यक्ष महाराज?

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. अंधारात विवस्त्र होते आसाराम बापू!

    पीडित मुलीने FIR मध्ये सांगितली आपबिती

    लैंगिक शोषणाचा आरोपात अडकलेले आसाराम बापू निर्दोष असल्याचा दावा करत आहेत. मॅडम आणि त्यांच्या पुत्राचे यामागे षडयंत्र असल्याचाही आरोप त्यांनी केला. परंतु, पीडित मुलीने आसाराम बापुंवर अतिशय गंभीर आरोप लावले आहेत. तिने दाखल केलेली तक्रार आणि एफआयआरमध्ये त्या दिवशी घडलेला वृत्तांत नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार अतिशय विकृत आहे.

    अल्पवयीन मुलीने आसाराम बापुंवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत तिने आपबिती सांगितली. 'त्यांनी (आसाराम) खोलीतील दिवे बंद केले आणि मला मागे बोलावले. त्यांनी दरवाजा बंद केला आणि माझ्यासोबत चाळे करण्यास सुरुवात केली. मी ओरडले तेव्हा माझ्या आईवडीलांना ठार मारण्याची धमकी देऊन माझे तोंड बंद केले. त्यांनी माझे चुंबन घेतले आणि आक्षेपार्ह पद्धतीने मला स्पर्श करु लागले. अंधारात ते संपूर्ण नग्नावस्थेत होते. त्यांनी माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी रडू लागले. माझे तोंड त्यांनी पुन्हा बंद केले. हा प्रकार जवळपास तासभर सुरु होता. मी खोलीतून बाहेर जाऊ लालगे तेव्हा पुन्हा गप्प राहायला सांगून धमकी दिली.'

    आसाराम बापुंनी दिलेल्या धमकीबद्दल पीडितेने तक्रारीत म्हटले आहे, की मी एक शक्तीशाली पुरुष आहे. स्वतःची तुलना त्यांनी इश्वरासोबत केली. खोलीत घडलेली कोणतीही गोष्ट बाहेर सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करु टाकेन, अशी धमकी त्यांनी दिली होती.

    त्यावेळी अतिशय घाबरल्याचे पीडितेने सांगितले. त्यावेळी कोणालाच काहीही सांगितले नाही. परंतु, आईवडीलांसोबत घरी परतल्यानंतर तिने सर्वप्रकार सांगितला. त्यानंतर दिल्लीतील कमला मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

    पीडित मुलीने पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबात म्हटले आहे, की ती मुळची उत्तर प्रदेशच्या शाहजहापूर येथील रहिवासी आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील आसाराम बापुंच्याच गुरुकुलमध्ये इयत्ता बारावीत शिकते. तिथेच वसतीगृहात राहते. एका दिवशी अचानक तिची प्रकृती खालावली. वॉर्डनने तिच्या आईवडीलांना उत्तर प्रदेश येथून बोलावून घेतले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. तिथे तिचे सीटी स्कॅन करण्यात आले. तिच्या प्रेतबाधा झाल्याचेही वॉर्डनने त्यांना सांगितले.

    आईवडील जेव्हा आश्रमात पोहोचले तेव्हा तिची प्रकृती उत्तम होती. आसाराम बापुंनी एक मंत्र पाठविला होता, त्यामुळेच ती शुद्धीवर आल्याचे त्यांना सांगण्यात आले. वॉर्डनने त्यांना जोधपूर येथे आसाराम बापुंच्या आश्रमात नेण्यास सांगितले. स्वतः आसाराम बापू तिच्यावर धार्मिक विधीद्वारे उपचार करतील. तिला तत्काळ जोधपूरला न्यावे, असेही वॉर्डनने त्यांना सांगितले होते.

    पीडितेला घेऊन तिचे आईवडील 14 ऑगस्टला जोधपूरला पोहोचले. तिथे त्यांना एक खोली राहण्यासाठी देण्यात आली. 15 ऑगस्टला सायंकाळी आसाराम बापुंना आश्रमात भेटल्याचे मुलीने सांगितले. त्यांनी तिला खोलीत बोलावले आणि कुटुंबियांना बाहेर प्रतिक्षा करण्यास सांगितले. आसाराम बापुंनी तिची विचारपूस केली. शिक्षणाबद्दल विचारले. ती संस्थेची प्रवक्ता बनू शकते, असेही तिला सांगितले. त्यानंतर तिच्या आईवडीला जाण्याची सूचना केली. धार्मिक विधीला वेळ लागेल, अशी बतावणी केली.

    पीडित मुलीला कोणताही आजार नसल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तिला आसाराम बापुंसमोर समर्पण करण्यास बाध्य करण्याचा संपूर्ण कट होता.

    ReplyDelete
  11. "झाड तेथे छाया अन बुवा तेथे बाया" हि म्हण आसारामने सार्थ ठरविली. अशा लिंगपिसाटाचा धिक्कार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  12. फारच छान

    विक्रोळीला मी संभाजी लेडीज बार पाहिला आहे- त्याचा मालक मराठी आहे पण ब्राह्मण नाही

    संभाजी बिडी तर जग प्रसिद्ध आहे

    संभाजी हेयर कटिंग सलून , संभाजी वडा पाव ,संभाजी लोटरी सेंटर मी पुण्यात पहातो आहे

    ह्या दुकानांचा मालक मराठी आहे पण ब्राह्मण नाही - असे कसे ?

    अहिल्या मटन शोप आहे - त्याचा मालक ब्राह्मणेतर आहे

    पण एकंदरीत संभाजी नगर हे पुण्याचे नाव ठेवण्याची कल्पना फारच सुंदर आहे



    संभाजीनगर मधील संभाजी पुलावरून पलीकडे जाउन संभाजी बागेच्या जवळील

    संभाजी केश कर्तनालयात संभाजी पवार नावाचा न्हावी संभाजी हिंगमिरे या गिऱ्हाइकाला

    शेजारच्या संभाजी वडापावची तारीफ सांगत होता

    वाक्य रचना आणि अर्थ यामुळे माणूस हरखून जाइल

    करूया करूया असेच करूया

    पण इतके वर्ष म न पा मध्ये आपलीच सत्ता आहे

    का बरे हा अलौकिक विचार आधी कुणाला सुचला नाही ?

    आपले पहिले महापौर बाबुराव सणस आणि उप महापौर होते पारगे - दोघेही कडवे मराठा

    पण त्याना नाही सुचले - त्यांनी लाल महाल परत नित कवला जिजामाता उद्यान संभाजी पूल आणि शिवाजी पूल असे नामकरण केले

    ज्याला सर्व पुणेकर लाकडी पूल आणि नवा पूल असेच म्हणतात

    संभाजी नगरचे उप नगर शिवाजी नगर असे काहीतरी होईल

    औरंगाबादचे नामकरण पण काय बरे आहे केलेले संभाजीनगर का शिवाजीनगर ?

    आपण परत एकदा नीट विचार करूया - मधल्या वेळात बाजीरावाचा पुतळा पर्वतीवर हलवून तिथे शहाजी -जिजाबाई ,शिवाजी आणि संभाजी - राजाराम असा ग्रुप पुतळा बसवावा

    ReplyDelete
  13. दाभोळकरांचा खूनी वर्तकच !
    रवींद्र तहकिक
    ------------------------------------------------------------------------------
    महाराष्ट्र पोलिस सध्या डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या खुन्यांना पकडण्य साठी जंग जंग पछाडत आहेत .
    परंतु खून कोणी केला याचा मागमूस पोलिसांना आजून लागलेला नाही .कारण स्पष्ट आहे : पोलिस
    चुकीच्या दिशेने तपास करीत आहेत . ही काही कुण्या सर्वसाधारण माणसाची हत्या नाही . जी कोणी
    वयक्तिक सुडाच्या भावनेतून किंवा रागाच्या उद्रेकातून केली असेल . किंवा हा खून एखाद्या फसलेल्या किंवा
    बिनसलेल्या व्यवहारातुन झाला आसेल असेही नाही . दाभोलकरांचे व्यक्तिमत्व , वर्तन आणि व्यवहार अत्यंत
    चोख , काटेकोर आणि पारदर्शी होते . त्यांचे नैतिक आचरण देखील अतिशय सरळ होते . विचारसरणी , विचारांची मांडणी आणि भूमिकेचे प्रगटन देखील नेमस्त आणि साधन शुचीत्वाच्या मर्यादा पाळणारे होते .
    असे असताना त्यांचा खुनी शोधताना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अस्तिवा पेक्षा त्यांच्या कार्याचे आस्तित्व कुणाच्या हिताआड येत होते ? कोणाच्या डोळ्यात खुपत होते ? कुणाला ते विचारानेच नव्हे तर जगण्याने देखील नकोसे झाले होते ? कोण त्यांच्या सत्यान्वेशी विचार समोर हतबल झाले होते ? आणि कोण एखादा विचार हाणून पडता येत नसेल तर माणूस हाणून पाडा ! ही ब्राम्हणी विचारधारा आपल्या संस्थेचे ब्रीद
    म्हणून मिरवतो ? हे पोलिसांनी तपासले पाहिजे .
    वर्तकला पकडा
    ---------------------
    महाराष्ट्र पोलिसांना आम्ही अगदी खात्री पूर्वक सांगतो की दाभोलकरांचे खुनी पकडण्या साठी
    सगळ्या महाराष्ट्रात सैरावेंरा धावायची आजीबात आवश्यकता नाही . कारण ज्यांनी खून केला ते
    सुपारी घेतलेले शार्पशुटर आहेत. त्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करणे , सी सी टीव्ही फुटेज तपासणे , संभाव्य
    मोटारसायकल नंबर वरून मालकाचा शोध घेत आज इकडे तर उद्या तिकडे धावपळ करणे यात वेळ आणि
    उर्जा दोन्हीचा अपव्यय आहे . आशा प्रकरणात प्रत्यक्ष खून करणाऱ्या पेक्षा खुणा मागचा सूत्रधार पकडणे
    आवश्यक असते . तो आधी पकडला नाही तर मग नंतर खुनी पकडले तरी सूत्रधार कायम पडद्याआडच
    राहतो. या प्रकरणातही अशीच शक्यता आहे . म्हणूनच आमचे पोलिसांना असे आव्हान आहे कि
    आधी सनातन संस्थेच्या अभय वर्तकला पकडा . टायर मध्ये घालून तेल लावलेल्या बेताच्या दंडुक्याने
    त्याच्या ढूगंणा वर दहा पाच टोले हाणा ; एका तासात तो पादरा बामन कटाचे कारस्थान हागेल .
    पुन्हा ती चूक नको
    -----------------------------
    मुख्य सूत्रधार सोडून खुन्याचाच तपास केल्या मुळे आपण महात्मागांधी , इंदिरा गांधी , राजीव गांधी
    यांच्या हत्या प्रकरणात फक्त प्रत्यक्ष खुन्या पर्यंतच पोहोचलो आणि त्यांना फाशी देवून मोकळे झालो .
    परंतु या खुनाचे मुख्य सूत्रधार , त्यांनी रचलेले षड्यंत्र , कट कारस्थान आज्ञातच राहिले . -ते कधीच
    बाहेर येवू शकले नाही. महात्मा गांधी हत्या नथुराम गोडसेच्याच मेंदूतून उगवलेली कृती होती ;
    असे कुणीही गुन्हेशास्राचा व राजकीय हत्यामागील कारणांचा आभ्यास करणारा अभ्यासक मान्य करणार नाही . हीच बाब इंदिरा राजीव हत्ये बाबत लागू होते , आता दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास देखील
    ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने चालू आहे त्यातही कदाचित खुनी पकडले जातीलहि ( ?) पण मुख्य सूत्रधार मात्र साळसूदपणे आसुरी आनंद घेत टीव्ही वर प्रतिक्रिया आणि चर्चा करील ! आमची पोलिसांना एकाच विनंती आहे कि महात्मा गांधीच्या वेळी केली तशी चूक पुन्हा करू नका , वेळ न दवडता सनातन संस्थेच्या अभय वर्तकला पकडा ; आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवून बोलते करा .
    वर्तकला पकडण्यासाठी सबळ पुरावे
    -----------------------------------------------
    वर्तकला पकडण्यासाठी सबळ पुरावे आहेत , सनातन संस्थेने वेळोवेळी दाभोलकर आणि त्यांच्या चळवळी
    विषयी आपल्या पुस्तिका , प्रकाशने तसेच वेब साईट वरून जे लिखाण केले आहे , हे लिखाण ज्या भाषेत
    केले आहे तो एकमेव पुरावा देखील वर्तकच्या मुसक्या आवळण्यासाठी पुरेसा आहे , या शिवाय दाभोलकर यांच्या छायाचित्रावर मारलेली लालफुली : या शिवाय आठ महिन्यांपुर्वी दाभोलकर तसेच श्याम मानव यांच्यावर पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात सनातनच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला ( धक्का बुक्की ) आणि
    त्यावर वर्तकची " यह तो बस झाकी है " हि प्रतिक्रिया ! वर्तकला बेड्या ठोकून ; पोलिस कोठडीत बर्फाच्या लादीवर पालथा झोपवून सुंद्री ने त्याचे टिंगर झोडायला आणखी कोणते पुरावे हवेत ?

    ReplyDelete
  14. संजय सर ,

    आपल्या ब्लोग वर रवींद्र यांनी जी भाषा एका जाजातीसाठी वापरली आहे तिचा आपण निषेध कराल असे वाटते

    वर्तक हाच डॉ दाभोल्कराञ्चा खुनी आहे असे बेधडक म्हणण्याचे औधत्य या प्रोफेसरात आहे

    आपण जो ब्लोग लिहित आहात त्यावर असे लिखाण आले तर ते आपण एकतर रद्द केले पाहिजे किंवा अशा लोकाना कान पिचक्या दिल्या पाहिजेत

    पोलिसांचे काम अजून चालू असताना असे निष्कर्ष प्रसिद्ध करणे योग्य नाही

    आपण एका मोठ्ठ्या पदासाठी निवडणूक लढवत आहात अशावेळी तर आपण त्वरीत अशा उद्धत वक्तव्याचा निषेध करणे अपेक्षित आहे याच प्रो. रवींद्र तहकिक ने उगीचच अनिता पाटील बाबत आपण पूर्वी कधीतरी केलेले लिखाण आपल्या ब्लोग वर लिहून पाल्याला चांगलेच कोंडीत पकडले आहे -

    वाघ्या कुत्र्याच्या बाबत काय घडले या आठवणी ताज्या असताना आपण हे सर्व कसे खपवून घेता ते एक आश्चर्य आहे आपण सत्वर या प्रो . तहकिक चा निषेध आपल्या ब्लोग वरून कराल अशी आशा आहे

    आपली नम्र

    पल्लवी सरोदे

    ReplyDelete
  15. श्री संजय सर ,

    आपण प्रो रवींद्र यांचा तीव्र निषेध कराल असे वाटते

    आपल्याला त्यांनी अगदी चांगलेच घाटात गाठले आहे


    प्रो तहकिक सर

    आपले लिखाण हे एखाद्या प्रोफेसराला शोभून दिसेल असे नसून त्याने आज या ब्लोग ची प्रतिष्ठा कमी झाली असे नाइलाजाने म्हणावे लागेल

    आपण जो लढा देत असतो किंवा विचार मांडत असतो त्यावर सखोल चर्चा होणे चुकीचे नाही परंतु घाणेरडी भाषा वापरून आपला तोल सोडून लिहिणे हे आपल्या प्रोफेसर पदाला शोभत नाही असे नम्रपणे सुचवावेसे वाटते ,आपण आपल्या देशाचा मान राखताना या देशातील सर्व नागरीकांचा मान राखला पाहिजे - मग तो हिंदू असो - मुसलमान असो किंवा ख्रिस्ती असो -जात कोणतीही असो आपण पहिल्यांदा माणूस आहोत -आपण सर्वाना समजून पुढे जावूया !

    आपले आधीचे लेख अत्यंत अभ्यासू होते पण एकदम असे विचित्र लिखाण आपल्याच हातून बाहेर पडत असेल यावर विश्वास बसत नाही - आपणास कदाचित रात्री झोप कमी झाली असेल किंवा रात्री जास्त झाली असेल

    तसे पाहिले तर आपली लायकी आपण ओळखताच ,

    पण एखाद्याच्या सात्विक पानाचा आपण गैर फायदा घेऊ नये असे वाटते !

    ReplyDelete
  16. सर

    आपल्या समयोचित दाखल घेण्याने या प्रो रवींद्र तहकिक यांचे कान आपण एकप्रकारे उपटले असे समजू - आता ते काढता पाय घेतील असे मानू -

    धन्यवाद !

    आपण असेच सतर्क रहा हि विनंती

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...