Thursday, September 12, 2013

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण?.....प्रा. हरी नरके

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. विराट साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवडला यावर्षी संमेलन होणार आहे.अध्यक्षपदाच्या रिंगणात संजय सोनवणी, प्रभा गणोरकर,अरुण गोडबोले आणि फकीरराव मुंजाजी शिंदे असे ४ साहित्यिक आहेत. १६ आ‘क्टोबरला निवडणूक निकाल घोषित होणार आहे. साहित्यबाह्य वादांमुळे ही निवडणूक गाजू नये अशी या चौघांचीही इच्छा असल्याचे त्यांनी घोषित केलेले आहे.त्यामुळे वादांची वादळे होण्याची परंपरा मोडीत निघणार की काय याची अनेकांना चिंता लागली आहे.निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही जेव्हा काही मंडळी निवडणूक नकोच असे म्हणतात तेव्हा उत्तम विनोदाचा नमुना म्हणून त्याकडे बघायला हरकत नसावी.महामंडळाच्या घटनेप्रमाणे प्रमोद आडकर या निर्वाचन अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रक्रिया सुरु होवून १ महिना झालेला आहे.
अखिल विश्वातील साडेदहा कोटी मराठी भाषकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड अवघे १०६९ मतदार करणार आहेत.याचा अर्थ लाखात फक्त एकाला मताचा अधिकार आहे. या मतदार यादीकडे एक नजर टाकली तर काय दिसते? १४ माजी अध्यक्ष, ९ महामंडळाच्या महाकोशाचे विश्वस्त, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर या चार घटक संस्थांचे प्रत्येकी १७५ याप्रमाणे ७०० प्रतिनिधी, मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, गुलबर्गा, मध्यप्रदेश मराठी साहित्य संघ, भोपाळ, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी, गोवा, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद, बिलासपूर, या ५ समाविष्ट साहित्य संस्थांचे प्रत्येकी ५० याप्रमाणे २५० प्रतिनिधी, मराठी वाड्मय परिषद,बडोदे या संलग्न संस्थेचे ११ प्रतिनिधी आणि सासवडच्या स्वागत मंडळाचे ८५ प्रतिनिधी असे हे १०६९ मतदार आहेत.
आजवर ८६ साहित्य संमेलने झालेली असून त्याच्या अध्यक्षपदावर कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चार महिला विराजमान झालेल्या आहेत. कवी अनिल आणि कुसुमावतीबाई हे पतीपत्नी अध्यक्ष झालेले होते. यावर्षी पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या पत्नी प्रभा गणोरकर या निवडणूक लढवित आहेत.फ.मु.शिंदे आणि श्रीमती गणोरकर यांची ओळख प्रामुख्याने कवी ही आहे. सोनवणी हे तरूणांचे प्रतिनिधी असून ते लोकप्रिय नी समिक्षकप्रिय कादंबरीकार,कवी, नाटककार, वैचारिक लेखक, संशोधक अशा बहुआयामी प्रतिभेचे धनी आहेत. ते मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय ब्लोगर असून त्यांच्या ब्लोगला आजवर ३लाख,६हजार,३७१ हिट्स मिळालेल्या आहेत.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जनआंदोलनाचा रेटा निर्माण करण्यासाठी आपण निवडणूक लढवित आहोत.यानिमित्ताने साहित्य, तरूण आणि सोशल मिडीया याकडे लक्ष वेधण्यासाठी आपली उमेदवारी आहे ही त्यांची भुमिका विविध थरांतून उचलून धरली जात आहे.
या मतदारांमध्ये ७७% पुरुष मतदार असून महिला अवघ्या २३% म्हणजे २४४ आहेत.मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश,येथील मतदारात ५०% महिला मतदार असून सर्वात कमी महिला मतदार म्हणजे अवघ्या ९% मतदार मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादच्या आहेत. दादा गोरे आणि सुनंदा दादा गोरे तसेच डहाके आणि गणोरकर पतीपत्नी दोघेही मतदार आहेत. मराठवाड्याच्या यादीत अमेरिकेचे अरुण प्रभुणे मतदार आहेत. मतदारांचा विचार करताना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा विचार करायला हवा. त्यांच्या जातीधर्माचा उल्लेख गैरलागू ठरणार हे स्वाभाविकच होय. तरीही सामाजिक चित्र पाहायचे झाल्यास काय दिसते? या मतदारांत २९ कुलकर्णी आहेत तर २८ पाटील आहेत.स्वागत समितीत जगताप या आडनावाचेच १५% मतदार आहेत. टक्केवारी बघायची झाली तर आजवर साहित्य क्षेत्रात ज्या पांढरपेशा समाजाची एकहाती मक्तेदारी होती ती मोडीत काढीत सत्ताधारी समाजाने या मतदारातही जोरदार मुसंडी मारलेली आहे. फार लवकरच हे प्रमाण समसमान होईल असे चित्र आहे. मुस्लीम समाजाला मतदारात अवघा अर्धा टक्का स्थान मिळालेले आहे. मतदार यादीतील जयंत साळगावकर यांचे २०आ‘गष्ट रोजी निधन झाले आहे.
अध्यक्षपदाची निवडणुकच नको असे म्हणणारे ना.धों. महानोर आणि शिरिष पै हे दोघे अध्यक्षपदाचे मतदार मात्र आहेत. या मतदारांमधील पुर्वाध्यक्षांव्यतिरिक्त सर्वात ज्येष्ट साहित्यिक म्हणजे मंगेश पाडगावकार आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी चक्क अनेक श्रेष्ठ साहित्यिक मतदार आहेत. साहित्याच्या क्षेत्रातील काही दिग्गज या मतदारात आहेत. आशा बगे, रावसाहेब कसबे, ह.मो.मराठे, अरुणा ढेरे, आनंद यादव, सदानंद मोरे,श्रीनिवास कुलकर्णी, सुधीर रसाळ,जनार्दन वाघमारे, राजन खान,आसाराम लोमटे, इंद्रजित भालेराव, प्रभाकर बागले, रा.रं.बोराडे, रामदास भटकळ, दिलीप माजगावकर, दिनकर गांगल, वसंत सरवटे, नीरजा, शंकर वैद्य, माधव भागवत,अशोक कोठावळे, प्रेमानंद गज्वी,अरुण टिकेकर, अंबिका सरकार, अशोक नायगावकर, वसंत दत्तात्रय गुर्जर, गंगाधर पाटील, मीना प्रभू,सतिष काळसेकर, अप्प परचुरे, प्रतिभा रानडे, नामदेव कांबळे, ही काही नावे वाणगीदाखल सांगता येतील.
मराठवाड्याची एकगठ्ठा मते औरंगाबादचे फमु घेणार तर अमरावतीच्या गणोरकर विदर्भाची मते खाणार अशा भाषेत काही मंडळी बोलतात तेव्हा साहित्याच्या क्षेत्रातही प्रांतवाद असतो असे म्हणायचे काय? भोपाळच्या मतदारांच्या यादीत अपवादालाही बहुजनातील फारसे कोणी नसावे आणि मराठवाड्याच्या यादीत बहुसंख्य नावे एकट्या सत्ताधारी जातीचीच असावीत हे दुर्दैव नाही काय? मराठवाडा सरंजामी मानसिकतेमधून बाहेर येताना कधी दिसणार असाही प्रश्न काहीजण विचारतात. १७५ मतदारांमध्ये ठालेपाटलांना १६ पेक्षा जास्त महिला मिळू नयेत हे कशाचे लक्षण आहे?
या मतदार यादीवर साहित्य क्षेत्रापेक्षा साहित्यबाह्य क्षेत्राचा ६० ते ७०% प्रभाव असावा हे बघून ही निवडणूक साहित्य संमेलनाची आहे की जिल्हा परिषदेची? असाही प्रश्न विचारता येईल. महाराष्ट्राबाहेरीलही मंडळी मराठीवर अपार प्रेम करतात.बेळगाव,निपाणीच्या सीमाभागातील लोक गेली अनेक पिढ्या मराठीसाठी संघर्ष करीत आहेत. पण त्यातले कोणीच या मतदारात का नाहीत? समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्था यातील मतदारात साहित्यिक किती  आहेत? त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही का नसावी?प्रश्न अनेक आहेत. तथापि प्रथमच या निवडणुकीत मतदार संख्येचा विस्तार करण्यात आला आहे, तिच्यात बर्‍याच घटकांना पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळत आहे, याचे स्वागत करायला हवे.निवडणूक प्रक्रियेत येत असलेल्या पारदर्शकतेसाठी महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांना धन्यवाद द्यायला हवेत.
अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याचा निर्णय १६ आ‘क्टोबरला लागेल. गुणवत्तेवर निर्णय व्हावा, जात किंवा प्रांतीय भावनेवर नाही एव्हढीच अपेक्षा.सर्व उमेदवारांना शुभेच्छा.
.............................................................................................
---- प्रा. हरी नरके

162 comments:

 1. विद्रोही साहित्य संमेलनाकडे दुर्लक्ष करून भटी संमेलनाकडे डोळे लावणारे कोणाचे प्रतिनिधित्व करत आहेत ते स्पष्ट झाले आहेच. क्रांतीची भाषा करणारेच प्रस्थापितांच्या पायघड्यांना महत्व देतात तेव्हा ती क्रांती फसवी असल्याचे आपोआपच सिद्ध होते.
  दुसऱ्यांच्या जातीय आणि प्रांतिक निष्ठा याबद्दल एवढाच संशय असेल तर आधी स्वत:ची जात आणि प्रांत जगजाहीर करावेत. स्वत:च्या निष्ठा कोणाच्या भुजांना बळ देत आहेत ते देखील सांगावे. मग इतरांकडे बोट दाखवावे.

  ReplyDelete
 2. aapan dilele samagra mahiti khupch uapyukt
  lekha khup aavadala.

  ReplyDelete
 3. अनिसं:- श्याम मानवांचा विवेकानंद!


  श्याम मानव हे बहुजन समाजातील प्रसिद्ध विचारवंत आहेत. त्यांच्या प्रति मला कायम आदरच वाटला व भविष्यातही वाटत राहील. महाराष्ट्रात जेंव्हा बुवाबाजी फोफावत गेली व अंधश्रद्धेचा पूर वाहू लागला तेंव्हा श्याम मानवानी या विरोधात अलौकीक कार्य उभे केले. फुले-शाहू-आंबेडकरानी सांगितलेला तर्कसुसंगत युक्तीवाद व त्या अनुषंगाने आयुष्य जगण्याचा आदर्श पार धुडीस मिळणार की काय अशी एकुण परिस्थीती निर्माण होऊ लागली होती. हा बुवा बाबांचा वाढणारा सुळसुळाट महाराष्ट्राला व ओघानेच या देशाला अंधाराच्या खाईत ढकलेल हे जाणून नागपूर वरुन याच्या विरोधात एक हुंकार आला.... तो हुंकार देणार तरुण म्हणजे श्याम मानव. त्यांची अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ पुढे उभ्या भारतला गदागदा हलवून सोडली हे आपण सर्वानी पाहिलेच आहे. या सगळ्या पार्श्वभुमीवर मला श्याम मानव साहेबांबद्दल आदर वाटतो व तो वाट्णे अगदी नैसर्गिक आहे. परवा मी त्यांचं २००४ मधील पुण्यातील व्याख्यान यु-ट्यूबवर ऐकताना एक असा संदर्भ आला ज्यामुळे मी जरा खट्टू झालॊ अन हा लेख लिहावा लागला. तर ती घटना अशी...
  २००४ मध्ये श्याम मानवांचं पुण्यात व्याख्यान होतं. त्यात ज्योतीष, खळे विकाणारे व साळगावकर अशा एकेकाचा समाचार घेत त्यांची गाडी अचानक स्वामी विवेकानंदावर आली. ते म्हणतात "मी स्वामी विवेकानंदाचा अभ्यासक असून तुम्हाला पुरोगामी विवेकानंद सांगतो..." मी अवाक! म्हटलं आता कुठला पुरोगामी विवेकानंद हे सांगणार? तर श्याम मानवांचा विवेकानंद येणेप्रमाणे....
  ...स्वामी विवेकानंद अत्यंत पुरोगामी विचाराचे होते व त्यानी ज्योतिष्यांवर कडाडून टीका केली होती. स्वामी विवेकानंद आपल्या भाषणात नेहमी एक कथा सांगत. अमुक एका गावी तमूक एक राजा होता. त्याच्याकडॆ एक अत्यंत हुशार असा प्रधानमंत्री होता. एकदा हा प्रधानमंत्री काही दिवसाच्या विदेश दौ-यावर जातो. मग राजानी एका गणितज्ञ व ज्योतीषाची तात्पुर्ती निवड करुन राज्यकारभार चालवायला सुरुवात केली. हा ज्योतिषी एके दिवशी राजाला भविष्य सांगतो व म्हणतो की तुमचं आयुष्य फक्त सहाच महिने आहे. राजा पार हादरुन जातो व त्याचं राज्यकारभारातुन मन उडतं. त्यामुळे प्रशासन अत्यंत ढिसाळ होत जातं अन शेजार पाजारचे शत्रूराष्ट्र जे आजवर दचकुन राहायचे ते आता कमकुवत झालेल्या या राज्यावर चढाई करण्याच्या तयारीला लागतात. हा हा म्हणता ही बातमी विदेशवारीवर असलेल्या प्रधानाला कळते. तो लगेच वारी थांबनुव स्वगृही परततो. थेट ज्योतीषाला गाठतात व त्यानी आपलं भविष्य बदलावं अशी विनंती करतात. पण ज्योतिष ऐकतो कुठे, त्याची अनेक मनधरणी करुनही तो आपण सांगितलेलं भविष्य बदलायला तयार होत नाही. मग दुस-या दिवशी त्याला राज दरबारात हजर होण्याचे आदेश सोडतात.CONT............

  ReplyDelete
 4. अनिसं:- श्याम मानवांचा विवेकानंद!

  दरबारात उभ्या ज्योतिषाला प्रधानमंत्री विचारतो की आत्ता तुझी कुंडली काढ व तुझं आयुष्य किती ते मला सांग. ज्योतीष लगेच स्वत:ची कुंडली तपासतो व तो आजून बरेच वर्ष जगणार असल्याचं सांगतो. मग प्रधान मंत्री पुढे सरसावतो व आपल्या तलवारीने त्या ज्योतिषाचं मुंडकं उडवतो. राजाची क्षमा मागत प्रधानमंत्री म्हणतो की मी काल सायंकाळीच राजदरबारातील सर्व खात्यांच्या प्रमुख्यांसमोर हा आदेश काढला होता की उद्या ११ वाजता मी या ज्योतीषाचं मुंडकं उडवेन. आपल्या दरबारत बसलेल्या त्या सर्व अधिका-याना हे माहीत होतं की आज ११ वाजता ज्योतिष्याचा मुत्यू होणार होता. पण खुद्द ज्योतिषमहाराजाना मात्र त्यांच्या कुंडलीत तो दिसला नाही. महाराज ज्याला स्वत:चा मृत्यू कळला नाही त्याला तुमचा काय कळला असेल? या घटनेनी राजाचे डोळे उघडतात...

  मोरल ऑफ द स्टोरी.... ज्योतीष शास्त्र खोटं आहे. मान्य!

  पण ही कथा सांगणारा कोण? स्वामी विवेकानंद! श्याम मानवांची लबाडी काय तर त्यानी स्वामी विवेकानंद वाचला आहे. त्याना चांगलं माहीत आहे की स्वामी विवेकानंदानी स्वत: ज्योतिष्य़गिरी केली होती. खेतडीचा राजा अजितसिंगला पुत्र प्राप्त होणार असं भविष्य विवेकानंदानी सांगितलं होतं. अमेरीकेत जाताना या राजाकडून पैसे व महागडे कपडॆ घेतले होते. या राजाचे मुनशी जगमोहनलाल खुद्द मुंबईत येऊन स्वामी विवेकानंदाना महागडॆ कपडॆ घेऊन दिले होते. तर हे सगळं माहीत असतानाही श्याम मानव सारख्या माणसानी विवेकानंदांची बाजू उचलुन धरण्याचे कारण काय ते कळले नाही. स्वामी विवेकानंदचे भक्त व श्याम मानव यांच्यात फरक राहीलेला नाही हे जाहीर झाले. विवेकानंदाचे भक्त आपल्या सोयीचा विवेकानंद सांगतात. विवेकानंद हा पुरोगामी होता हे सांगताना प्रतिगामी गोष्टी मुद्दाम गाळल्या जातात. अगदी श्याम मानवानी सुद्धा हेच केले. कारण ते विवेकानंदाचे चाहते... भक्त... की अभ्यासक काय ते असेल... ते आहेत. त्यानी खुशाल विवेकानंद भक्त असावं. पण एखादी गोष्ट सांगताना लबाडी करु नये एवढीच माझी किमान अपेक्षा आहे. विवेकानंद पुरोगामी आहे या हट्टाला पेटून प्रतिगामी विवेकानंद लपवावे हे मला अजिबात पटले नाही. तुम्हाला सांगायचाच असेल तर विवेकानंद जसा आहे तसा सांगा... पण सोयीचा सांगू नका. कारण श्याम मानव साहेब... तुमची प्रतीमा इतरांपेक्षा वेगळी आहे. बघा पटतं का? END.

  ReplyDelete
 5. सर्वाधिक लोकप्रिय ब्लॉगर अनिता पाटील आहेत...

  या लेखात व्यक्त झालेल्या सर्व मतांशी आम्ही सहमत आहोत. पण, संजय सोनवणी हे मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय ब्लॉगर आहेत, हा उल्लेख खटकला. मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय ब्लॉगर अनिता पाटील आहेत. अनिता पाटील विचार मंच (अपाविमं) या त्यांच्या ब्लॉगची वाचकसंख्या आता साडे तीन लाखाला स्पर्श करीत आहे.

  बाकी श्री. सोनवणी साहेबांना आमच्या शुभेच्छा. सोनवणी साहेबांना आम्ही आधीच समर्थन दिल आहे. अपाविमंवर यासंबंधीचा एक लेख आहे. वाचकांनी जरूर पाहावा. लेखाची लिन्क खाली देत आहे.

  http://www.anita-patil.blogspot.in/2013/08/blog-post_11.html

  संपादक मंडळ,
  अनिता पाटील विचार मंच.

  ReplyDelete
 6. अनिताताई

  आपण संजय सोनावणी याना पाठींबा दिला या बद्दल धन्यवाद !

  आपण महान आहात आपण थोर आहात - आपण प्रचान्द्लोक्प्रीय आहात आपण उच्च विचारवंत आहात आपल्या विचारांचा प्रकाश सर्व जगाला महान मुक्तीचा मार्ग दाखवत आहे !

  सहज जाता जाता सांगावेसे वाटते - की

  आपण सर्व हिंदू धर्म सोडणार ही आनंदाची बातमी आपल्या ब्लोगवर वाचली आणि माझा आनंद गगनात मावेना !

  आपण कधी हिंदू धर्म सोडणार आहात ?

  २०१३ मध्ये ?

  जर तुम्ही हिंदू धर्म सोडलात तर ते सर्व धर्म संभाव निर्माण करायला फार मोलाचे सहाय्य ठरेल

  त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका

  उद्या बदलणार असाल तर नको

  आजच बदला

  उद्याचे काम आज करा आणि आजचे काम आत्ताच करा !

  ब्राह्मणांचे पितळ उघडे पडेल तुम्ही हिंदू धर्म बदलल्याने !

  एक सांगू का ?

  तुम्ही बौद्ध किंवा मुसलमान व्हा

  किती छान धर्म आहेत !

  ReplyDelete
  Replies
  1. या पूर्ण टिप्पणीवर सुद्धा बुरसटलेली- ब्राह्मणी छाप आहे.

   Delete
  2. म्हंजे काय ? ते काय असतय - आमालाबी वाइच सांगाकी राव !

   तुमी कायबी म्हना

   हे तुमाला बी लई बेस जमत बगा - या बामणांच्या परिस बोलत ऱ्हांयचं

   Delete
  3. तू खूपच छोटा आहेस बाळा, तुला ते आत्ताच नाही समजणार!

   Delete
 7. आप्पा - संजय सर , आपल्याला सर्व थरातून इतका प्रचंड पाठींबा मिळतो आहे - अभिनंदन !

  बाप्पा - अनिताताई यानी तर त्यांच्या ब्लोगवर कोण या मतांच्या चढाओढीत पुढे मागे असेल ते समजण्यासाठी एक मत पेटीच ठेवली आहे - आणि त्यात सर - आपण पुढे आहात - अभिनंदन !

  आप्पा - काय हो - रायगडावरच्या त्या वाघ्याच्या समाधीवर संभाजी ब्रिगेडने घाला घातला त्यापैकीच या अनिताताई - बरोबर ना ?आणि ते प्रो रवींद्र तहकिक सर - बरोबर ना ?

  बाप्पां - आता अनीता ताई बदलल्या आहेत - त्यांना आणि संभाजी ब्रीगेडला वाघ्याच्या समाधीला हात लावल्याचा प्रचंड पश्चात्ताप झालेला दिसतो - तो पण संजय सरांचा विजयच नाही का ?या मतपरिवर्तन बद्दल प्रो रवींद्र तहकिक आणि अनिता ताई यांचे अभिनंदन !त्यांच्या ब्लोगवर हे विचार त्या छापतील का ?संजय सर आपण छापाल याची खात्री आहे - पण त्या आपल्या सारख्या दिलदार कधी होणार ?  आप्पा - संजय सर , आपल्याला आणि फुंदे सरांना ३९ मते आणि गोडबोले यांना ३३ मते असे छान चित्र दिसते आहे - संजय सर आपला विजय हा काही दिवसांवर येउन ठेपला आहे !

  बाप्पा - अनिताताईनी ही छान मते आजमावण्याची कल्पना राबवली आहे - आम्ही ताबडतोब आपली मते नोंदवून खारीचा वाटा उचलला आहे !

  आप्पा - पण ते करताना आम्हाला अनिताताई याचे एक आवाहन फार आवडल्र - आपणास पण आवडेल - सर आपण सर्वानी लवकरात लवकर हा ब्राह्मण लोकानी आपल्या कब्जात ठेवलेला हिंदू धर्म सोडून देवूया - आपण त्याचे विसर्जन करुया -

  संजय सर - आपणपण सामील व्हाल ना या पवित्र कार्यात - गणपतीबरोबर या घाणेरड्या हिंदू धर्माचेपण आपण विसर्जन करूया !अनंत चतुर्दशीला !

  आंबेडकरांचा धर्म आपण सर्वांनी स्वीकारुया !- तुमची विजयाची मिरवणूक आपण निळा रंग उधळत साजरी करूया !

  शाहू फुले यांनी का नाही इतका सुंदर धर्म स्वीकारला - ते अपूर्ण काम आपण पूर्ण करुया !


  हा आपला शेवटचा मोरया ! आता आपल्या देव्हाऱ्ह्यात फक्त डॉ बाबासाहेब असतील - आता सगळे शाळीग्राम, टाक आणि अन्नपूर्णा - लंगडा बाळकृष्ण पितळ्याच्या मोडीत टाकूया -

  तुम्ही निवडून आल्यावर हे करायचं का आधी परवा अनंत चतुर्दशीला ? शुभस्य शीघ्रम !

  अनिताताई आणि तुम्हाला कधी वेळ आहे हाच मुद्दा शिल्लक आहे - आम्ही आमचे देव पिशवीत भरून ठेवले आहेत - आजच्या बाजाराला मोडीचा भाव काय आहे ते देवच - सॉरी - बुद्धच जाणे ! निर्णय झाला पक्का - आता खूप हलक हलक वाटतंय !

  ReplyDelete
  Replies
  1. या पूर्ण टिप्पणीवर बुरसटलेली- ब्राह्मणी छाप आहे.

   Delete
  2. म्हंजे काय ? ते काय असतय - आमालाबी वाइच सांगाकी राव !

   तुमी कायबी म्हना

   हे तुमाला बी लई बेस जमत बगा - या बामणांच्या परिस बोलत ऱ्हांयचं

   Delete
  3. तू खूपच छोटा आहेस बाळा, तुला ते आत्ताच नाही समजणार!

   Delete
 8. कठीण आहे बुवा वाचकसंख्या नक्की कशाला म्हणायचे हे समजते का लोकांना? एक क्लिक झाले म्हणजे एक वाचक असे नविन समीकरण वर मांडलेले दिसते आणि गम्मत म्हणजे त्यावरून ती संख्या खाटकावी असे लोकांना वाटते. ज्यांना विकिपीडिया हा प्रकार म्हणजे फार मोठा प्रकार वाटतो त्यावरून काय प्रकारचे संशोधन करतात हे दिसते. अहो कुठल्या प्रमाण विद्यापीठात विकिपीडियाला काडीची किंमत नसते. चांगले विद्यापीठ आणि शिक्षक आणि गाईड विकिपीडियातील संधार्भ असलेले प्रभंध केराच्या टोपलीत टाकतात कारण विकिपीडियावर कोणीही काहीही लिहू शकते. हेच ह्यांना माहिती नाही आणि वर आव तर मोठ्या संशोधकाचा? कठीण आहे हे असे प्राध्यापक आणि त्यांचे कोंडले असल्याने शिक्षणाची ही अशी अवस्था आहे. चांगले कशाला म्हणायचे हेच माहिती नाही मग काय होणार. असो.

  बाकी संजय सर तुम्हाला शुभेच्छा पण तरीही कळत नाही ह्या संमेलनामधून काय सध्या होते? नुसते ठराव मांडले जातात. एक वर्ष मिरवायला मिळते पण ज्या इंग्रजी भाषेमध्ये एकाही असले संमेलन होत नाही तिथे उत्तोमोत्तम पुस्तके आणि त्यांचे प्रचंड खप होतात. पण कोशातच असलेल्या मराठी साहित्तीकांना कोण सांगणार

  ReplyDelete
 9. श्राद्ध : एक संकल्पना

  आर्या जोशी

  श्रद्धेने केली जाणारी कोणतीही गोष्ट म्हणजे श्राद्ध, ही संकल्पना आपल्यापैकी किती जणांना माहीत असते?
  दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध घालायचे ही परंपरा मुळात आली कुठून?
  श्राद्ध हा प्रामुख्याने ‘विधी’ म्हणून समाजात ओळखला जात असला तरी त्यापलीकडे एक वैशिष्टय़पूर्ण संकल्पना म्हणून तिचे महत्त्व विशेषत्वाने आहे. आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण व पूजन करण्यासाठी प्राचीन धर्मशास्त्रकारांनी ही संकल्पना मांडली. विविध देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करणे, देवतांचे पूजन करणे यांसारख्या कृतींचे आचरण केले जाऊ लागले. त्याचप्रमाणे दिवंगत पूर्वजांच्या म्हणजेच पितरांच्या स्मरण-पूजनाची स्वतंत्र व्यवस्था श्राद्धाच्या माध्यमातून योजली गेली असावी.
  िहदू धर्मसंस्कृतीतील प्राचीन ग्रंथ म्हणून मान्यता पावलेल्या संहितामध्ये पितरांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात. व्यक्तीच्या निधनानंतर केल्या जाणाऱ्या दहनकर्मप्रसंगी केलेल्या प्रार्थना ऋग्वेदामध्ये आहेत. मृत झालेल्या व्यक्तीला कोणताही त्रास न होता त्याच्या शरीराचे दहन व्यवस्थित पूर्ण व्हावे अशी भावना त्यामागे आहे. पितरांनी वैभवाचा उपभोग घ्यावा. पृथ्वीवरील भक्तांचे रक्षण करावे अशा प्रार्थनाही वैदिकांनी केल्या आहेत. यजुर्वेदामध्ये पितरांसाठी यज्ञामध्ये काही विशिष्ट आहुती देण्यास सांगितले गेले आहे. अथर्व वेदामध्ये पितरांना नमस्कारपूर्वक िपड अर्पण करण्याचे सुचविले आहे.
  देवतांप्रमाणेच आपल्या दिवंगत पूर्वजांबद्दल जो आदर वैदिकांच्या मनात होता त्याचे प्रकटीकरण करायला येथे सुरुवात झाली असावी. कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर पितरांकडून अभय, सुख, संतती, संपत्ती याची अपेक्षाही वैदिकांनी केलेली दिसते.
  संहितामधील विविध संकल्पना ब्राह्मण ग्रंथ नावाच्या साहित्यातून व्यक्त केल्या गेल्या. शुक्ल यजुर्वेदाच्या काण्व शतपथ ब्राह्मण या ग्रंथाने पितरांसाठी स्वतंत्रपणे पिण्ड पितृ यज्ञ नावाचा विधी मांडला. या विधीमध्ये मांडल्या गेलेल्या सव्य-अपसव्याच्या संकल्पना आजही श्राद्ध विधीचा महत्त्वाचा भाग आहेत. िपड पितृ यज्ञाच्या माध्यमातून दिवंगत वडील, आजोबा, पणजोबा यांच्यासाठी िपड देणे, वस्त्राची दशी अर्पण करणे, अग्नीत आहुती देणे यांसारख्या क्रियाकलापांना प्रारंभ झाला. CONTD.............

  ReplyDelete
 10. गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे यांसारख्या वाङ्मयांमध्येही पितरांसाठी स्वतंत्रपणे करावयाच्या विधीची मांडणी केली गेली. विविध काळातील आश्वलायन, बौधायन गौतम इ. सूत्रकारांनी पितरांसाठी विधीचे स्वरूप वर्णन केले. या विधीच्या जोडीनेच श्राद्धप्रसंगी कुलीन, वेदज्ञ, सदाचारी ब्राह्मणांना भोजनास बोलविण्याची संकल्पना पुढे आली. या जोडीने अशौच विचार म्हणजेच सुतकाची संकल्पनाही मांडली गेली.
  श्रद्धा महत्त्वाची
  आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण आपण साग्रसंगीत विधीपूर्वक करावे पण काही अपरिहार्य कारणाने तसे करणे शक्य नसेल तर श्राद्ध तिथीला करण्यासारखे विविध पर्याय धर्मशास्त्र नमूद करते. गाईला गवताचा भारा घालणे, श्राद्ध विधीचे वाचन करणे, गरजूला दान देणे, हे ही जमले नाही तर चक्क दक्षिण दिशेला तोंड करून रडावे! असे हे पर्याय होत. आधुनिक काळाचा विचार करता आपण आपल्या सोईने दिवंगतांचे स्मरण केले तर तेही उपयुक्त होईल. फक्त तसे करताना दिवंगताविषयीचा प्रेम, जिव्हाळा, आदर व श्रद्धा आपल्या मनात असणे अत्यंत आवश्यक आहे.
  श्राद्ध प्रसंगी समाज व पर्यावरण उपयुक्त दाने देण्यास पुराणांनी सुचविले आहे. त्यासाठी ’गरजू ओळखून दान करावे. आपल्या दिवंगत पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केलेले असते त्यामुळे आपण गुणवत्तापूर्ण आयुष्य जगू शकतो. आपल्या वंशजानांही जर असे चांगले आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी पर्यावरण रक्षण ही काळाची गरज बनली आहे. श्राद्ध प्रसंगी वृक्षारोपण अनाथ प्राण्यांना दत्तक घेणे, पाण्याच्या साठवणीच्या उपाय योजनांना सहाय्य असे उपक्रमही करता येतील. समाजाच्या हितासाठी रक्तदान, नेत्रदानाचे संकल्पही दिवंगतांच्या स्मरणार्थ करणे शक्य आहे.
  रामायण व महाभारत या महाकाव्यांमध्येही श्राद्ध विधीचे विकसित स्वरूप आढळून येते.
  राजा दशरथाच्या निधनानंतर श्रीराम वनवासात असताना भारताने दशरथाचे औध्र्वदेहिक संस्कार व श्राद्ध संपन्न केले. ब्राह्मणांना अनेक मौल्यवान दाने दिली. वनवासात श्रीरामाला ही वार्ता समजताच वनात त्याला जे सहज उपलब्ध झाले त्याचा वापर करून रामाने आपल्या वडिलांसाठी तर्पण व श्राद्ध केले.
  महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्मांनी युधिष्ठिराला श्राद्ध विधीचे महत्त्व विशद केले.
  स्मृती ग्रंथापकी मनू, याज्ञवल्क्य, नारद, शंख लिखित देवल अशा विविध ग्रंथकारांनी श्राद्ध विधीचे महत्त्व सांगून श्राद्ध विधीचे विकास पावलेले स्वरूप मांडले. श्राद्धाचे स्वरूप यावर मनूने सांगितले आहे की, कितीही शक्यता असली तरी श्राद्धाचा अधिक विस्तार करू नये. स्मृती ग्रंथांनी त्या त्या सामाजिक, धार्मिक परिस्थितीचा विचार करून समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी अनेक नियम आपल्या ग्रंथातून मांडले आहेत. CONTD.............

  ReplyDelete
 11. यानंतर पुराण ग्रंथांनीही श्राद्ध विधीला महत्त्व दिले. विशेषत: गरुड पुराण व्यक्तीच्या निधनानंतर केल्या जाणाऱ्या सर्व क्रियाकलापांची विशेषत्वाने मांडणी केली. पुराण ग्रंथांनी श्राद्धप्रसंगी दिवंगताच्या संतोषार्थ विविध दाने ब्राह्मणांना देण्यास आवर्जून सांगितले. गरुड पुराणाचा प्रेतकल्प (उत्तरार्ध) व्यक्तीच्या निधनानंतर वाचण्याची प्रथा आहे. त्यामुळे ते पुराण अशुभ मानले जाते. तथापि गरुड पुराणाच्या पूर्वार्धात आयुर्वेद, रत्नशास्त्र अशा विविध उपयुक्त विषयांवर मार्गदर्शन आहे. पण त्याकडे आपले लक्षच जात नाही.
  पितरांच्या प्रार्थनापासून सुरू झालेला हा प्रवास अशा प्रकारे विस्तृत श्राद्ध विधीपर्यंत येऊन पोहोचतो. खरे तर हा विषय प्रबंधाच्या मांडणीसाठी योग्य असल्याने येथे अगदीच सारांश रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
  या सर्व विवेचनाचा मथितार्थ असा आहे की, श्राद्ध ही श्रद्धेने करावयाची उदात्त संकल्पना आहे. आधुनिक काळाच्या दृष्टिकोनातून या संकल्पनेकडे पाहायचे झाल्यास असे म्हणावेसे वाटते की, श्राद्ध ही भावना जर पवित्र मानली जाते तर ज्या श्रद्धेतून श्राद्ध संकल्पना अस्तित्वात आली ती श्राद्ध संकल्पना अशुभ, अपवित्र का मानली जावी?
  आपल्यामध्ये वर्षांनुवष्रे वावरणारी, आपल्या मायेने, प्रेमाने आपल्यापकीच एक असणारी व्यक्ती तिच्या निधनानंतरही आपल्यावर तितकाच स्नेहभाव बाळगेल ना? त्यामुळे आपल्या दिवंगत पूर्वजाविषयी आपल्याला भय वाटण्याचे कारण काय? जिवंतपणी आस्थेने एखाद्या व्यक्तीच्या इच्छा जाणून घेऊन त्या त्यांच्या हयातीतच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी निधनानंतर कोणत्याही पक्ष्याच्या / प्राण्याच्या सहाय्याची गरज का भासावी?
  ज्ञान प्रबोधिनी या संस्थेमध्ये श्राद्धाकडे या भावात्मक भूमिकेतून पाहण्यास सुचविले जाते. सर्व कुटुंबीयांनी, स्नेहीजनांनी एकत्र येऊन दिवंगताच्या चांगल्या आठवणींना उजाळा द्यावा. त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करावे व त्यांचा आदर्श पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असा ज्ञान प्रबोधिनीचा यामागील हेतू आहे.
  पिढय़ान्पिढय़ा परंपरेनुसार श्राद्धविधी केले जातात. व्यक्तीच्या निधनानंतर केले जाते ते श्राद्ध आणि शुभकार्याच्या आरंभी पूजनात दिवंगतांचे आशीर्वाद लाभावेत म्हणून केले जाते तेही नांदी ‘श्राद्ध’च. वस्तुत: श्रद्धय़ाकृतं तेन श्राद्धम्। म्हणजेच श्रद्धापूर्वक केलेले कृत्य म्हणजे श्राद्ध.
  प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत दिवंगत पूर्वजांचे स्मरण, प्रार्थना केली जात असे. नंतर काळाच्या ओघात या प्रार्थनांच्या जोडीने पितरांसाठी काही विशिष्ट कृत्य केले जाऊ लागले. त्यानंतर केवळ दिवंगतांसाठी केल्या जाणाऱ्या विधीला ‘श्राद्ध’ असे स्वतंत्र नाव मिळाले.
  दिवंगतांच्या स्मरणार्थ विविध श्राद्धे संपन्न करण्यास धर्मशास्त्रकारांनी मार्गदर्शन केले आहे. व्यक्तीच्या निधनानंतर केली जाणारी श्राद्धे, दरवर्षी निधनतिथीला केले जाणारे वर्षश्राद्ध, पितृ पंधरवडय़ात केले जाणारे महालय, तीर्थक्षेत्री गेल्यावर करावयाची तीर्थश्राद्धे अशी विविध श्राद्धांची योजना आढळून येते.
  भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष याला ‘महालय’ म्हटले जाते. या पंधरा दिवसांमध्ये दिवंगत पितर पितृलोकातून पृथ्वीलोकात राहण्यासाठी येतात असे मानले जाते. त्यामुळे त्यांचे स्मरण-पूजन होणे आवश्यक मानले गेले आहे. मध्ययुगीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षांचा प्रारंभ होत असे. त्यापूर्वीचे मागील वर्षांचे शेवटचे दोन आठवडे पितरांच्या पूजनासाठी योजून ठेवले जात. ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे ज्यांची ज्यांची आपल्याला मदत झालेली असते अशा सर्व दिवंगतांचे स्मरण हा आपल्या संस्कृतीतील हृद्य भाग मानावा लागेल. भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञतेचे महत्त्व विशेष आहे व ते पितृपक्षाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. CONTD.............

  ReplyDelete
 12. महालय श्राद्धामध्ये आपले दिवंगत, आप्तस्वकीय, आपल्या कुटुंबात राहून गेलेले पशु-पक्षी, सेवक या सर्वाबद्दलच कृतज्ञता व्यक्त केली जाते. आई-वडील, काका-काकू, आत्या, मामा-मामी, भाऊ-बहीण, सावत्र नातेवाईक, सेवक, पशु-पक्षी या सर्वासाठी पिंडदान केले जाते. इतकेच नव्हे तर धर्मपिंडही दिले जातात. ज्यांच्यावर निधनानंतर कोणताच संस्कार झालेला नाही असे आपल्याला ज्ञात-अज्ञात असलेले सर्व जण, पशु-पक्षी, किडे-मुंगी, झाडे अशा सर्वच दिवंगत आप्तांसाठी हे धर्मपिंड दिले जातात. ‘हे विश्वचि माझे घर’ हीच भावना महालय श्राद्धामध्ये दिसून येते. अलीकडे कुटुंबांमध्ये फार तर तीन पिढय़ांपर्यंतचे आप्त माहिती असतात. त्याव्यतिरिक्त अन्य आप्तांचा इतिहास जाणून घेणे, आपला वंशवृक्ष समजून घेणे, त्यातील सदस्यांचा आदर करणे हाही महालयातील एक वैशिष्टय़पूर्ण हेतू म्हणता येईल.
  ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने महालयामध्ये श्राद्धविधी केले जातात. त्यातले केवळ दिवंगत वडील-आजोबा, पणजोबा किंवा आई-आजी, पणजी यांच्यासाठी पिंडदान प्रामुख्याने केले जाते. गेली दोन वर्षे पुण्यात सर्वशास्त्रीय ब्राह्मण सेवा संघाच्या माध्यमातून सामूहिक पिंडदानाचे आयोजन केले जाते. पुरुषांच्या जोडीने त्यात स्त्रियांनीही सहभाग घेऊन पिंडदान केले.
  विविध श्राद्धांच्या निमित्ताने विविध दाने देण्यासही आपल्या संस्कृतीने महत्त्व दिले आहे. अध्ययन- अध्यापन व पौरोहित्य यावर चरितार्थ अवलंबून असणाऱ्या गरजू ब्राह्मणांना उपयुक्त ठरतील अशी दाने दिली जात. कोरडा शिधा, वस्त्र, जानवे, छत्री, चपला, बिछाना, पाण्याचा घडा, दिवा अशीही दाने आहेत. याच जोडीने श्राद्धाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांला- ब्राह्मणाला ग्रंथ देणे, वृक्षारोपण, उद्याने बांधणे, जलाशय बांधणे, अनाथ प्राण्यांचे रक्षण करणे अशी समाज व पर्यावरणाला उपयुक्त दानेही पुराणग्रंथांनी सांगून ठेवली आहेत. त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन आधुनिक काळात आवश्यक आहे.
  बदलत्या काळाचा विचार करता श्रद्धेने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या स्मरणार्थ गरजू व्यक्ती वा संस्थांना उपयुक्त दान करणे यातून मिळणारे समाधान खचितच विशेष आहे.
  (लेखिका ज्ञान प्रबोधिनी पुणे येथील पौरोहित्य उपक्रमाच्या प्रमुख आणि धर्मशास्त्राच्या अभ्यासक आहेत.) END.

  ReplyDelete
  Replies
  1. "अध्ययन- अध्यापन व पौरोहित्य यावर चरितार्थ अवलंबून असणाऱ्या गरजू ब्राह्मणांना उपयुक्त ठरतील अशी दाने दिली जात."
   आता कसं मुद्द्याचं बोललात? लोक मेले तरी चालतील. ब्राह्मणांचा चरितार्थ महत्वाचा!

   "कोरडा शिधा, वस्त्र, जानवे, छत्री, चपला, बिछाना, पाण्याचा घडा, दिवा अशीही दाने आहेत."
   काय हो, कोरडा शिधा का? शिजवलेले अन्न का नाही बरे?

   "गरजू ब्राह्मणांना उपयुक्त ठरतील अशी दाने दिली जात. गरजू विद्यार्थ्यांला- ब्राह्मणाला ग्रंथ देणे"
   हेच दान ब्राह्मणाला न देता दुसऱ्या गरजूंना दिले तर काय पाप लागते का? की ब्राह्मणांची गरज ही इतरांपेक्षा अधिक महत्वाची आहे?
   धर्माच्या नावावर दुकान उघडणे हा प्रकार सगळ्याच धर्मांत चालतो. पण वर्षानुवर्षे एकाच जातीला त्याचा फायदा मिळणे हे फक्त ह्याच "सनातन धर्मात" होऊ शकते.

   Delete
  2. भंगार मनुस्मृतीचे गोडवे गाणारे, आणि तिचा सतत उदो-उदो करणाऱ्यांकडून अजून काय अपेक्षा करणार?

   Delete
 13. 22 प्रतिज्ञा :

  बाबासाहेबानी नाग भूमित एक अभूतपूर्व सोहळ घडवून आणला. हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा तो सोहळा म्हणजे हिंदुंच्या जातियवादावर घातलेला घणाघाती घाव तर होताच. पण धर्मांतराची दुसरी बाजू म्हणजे दास्यात खितपत पडलेल्या अस्पृश्यांना आत्मसन्मानाने जगण्याच्या नव्या वाटा दाखविणार हा सोहळा होता. दलिताना हजारो वर्ष गुलामीत ठेवणारे देव देवता नाकरणे या धम्मसोहळ्यातील एक मुख्य़ भाग होता. नुसतं धम्म स्विकारुन काही होणार नाही हे बाबासाहेब्न जाणून होते, त्यामुळे त्यानी देवाचा बंदोबस्त करणा-या बावीस प्रतिज्ञा तयार केल्या. त्या लोकांकडून वदवून घेतल्या. बाबासाहेबानी बौद्ध धर्माला दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिल प्रमाणे आहेत

  १) मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  २) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  ३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  ४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
  ५) गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
  ६) मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
  ७) मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
  ८) मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
  ९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
  १०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
  ११) मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
  १२) तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
  १३ ) मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
  १४) मी चोरी करणार नाही.
  १५) मी व्याभिचार करणार नाही.
  १६) मी खोटे बोलणार नाही.
  १७) मी दारू पिणार नाही.
  १८) ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
  १९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्याच व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो वबौद्धधम्माचा स्वीकार करतो.
  २०) तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
  २१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
  २२) इतः पर मी बुद्धांच्या शिकवणुकी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

  ReplyDelete
  Replies
  1. Really Great Thoughts!!!!!!!!!!!!!

   Delete
 14. ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर........

  मधु कांबळे, मुंबई

  हिंदू धर्मातील वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी इतर मागासवर्गातील (ओबीसी) अनेक समाजघटकांच्या संघटनांनी एकत्र येऊन राज्यभर धर्मातर अभियान सुरू केले आहे. ‘आता ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर’ असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर २०१६ ला नागपूरमध्ये लाखोंच्या संख्येने ओबीसींच्या धर्मातरासाठी ही तयारी सुरू आहे. देशातील प्रत्येक राज्यात एक याप्रमाणे पुढील तीन वर्षांत अशा परिषदा घेण्याचे नियोजन आहे.
  भारतीय समाजात संख्येने सर्वाधिक असलेल्या ओबीसी समाजाला स्वतची कसलीही ओळख नाही. हा समाज हिंदू धर्माचा एक भाग असला तरी, उच्चनीचतेच्या उतरंडीत त्याला खालचाच दर्जा दिला जातो. ओबीसींच्या नावाने करण्यात येणाऱ्या राजकारणाचा फायदा काही ठराविक नेत्यांनाच फक्त होतो. समाजाला त्याचा काहीच फायदा होत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मातर करुन बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतरच आंबेडकरी चळवळीला खऱ्या अर्थाने धार आली. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाला एक वेगळी ओळख मिळाली. बुद्धिवाद व विज्ञानवादाच्या अधिष्ठानावर संपूर्ण भारतीय समाजाची फेरउभारणी करण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न होता. तोच विचार स्वीकारण्याचा निर्णय ओबीसींनी घेतला असून धर्मातरापूर्वी या समाजात जागृती घडवून आणण्यासाठी राज्यभर अभियान सुरू केल्याची माहिती सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी दिली. धर्मातराचे अभियान सुरू करुन छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या प्रस्थापित राजकीय नेत्यांसमोर एक आव्हान उभे करण्याचाही त्यातून प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे
  ६ जानेवारीला पुण्यात परिषद
  या अभियानाला गेल्या वर्षी नागपूरपासून सुरुवात झाली. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला मुंबईत दुसरी परिषद झाली. तिसरी परिषद ६ जानेवारीला पुण्यात होणार असून त्यात ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले व डॉ. आ. ह. साळुंखे उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद व कोल्हापूरलाही अशाच सभा घेण्यात येणार आहेत.

  ReplyDelete
 15. अहाहा ! किती सुंदर !

  बौद्ध धर्माची तत्वे वाचून आनंदाने नाचावेसे वाटू लागले !

  अनिताताई आणि प्रो रवींद्र तहकिक यानी वाचले नसेल ते आपण त्यांना संभाजी ब्रिगेडच्या ब्लोग वर पाठवाल का ?

  कारण ते पण हिंदू धर्म सोडणार आहेत !

  मग ते एक सर्व समाजाला कलाटणी देणारे कार्य ठरेल

  सर्व देश जर बुद्धमय झालातर ?

  तसा तो पूर्वी झाला होताच , पण नंतर काय झाले कुणास ठाऊक - परत प्रयत्न करुया !

  हे श्राद्ध आणि पक्ष त्याना करत बसू दे !

  आता नव्या जाती झाल्यातर ?

  ९६ कुळी नवबौद्ध ?माळी नवबौद्ध ?सोनार नवबौद्ध ?एखादा ब्राह्मण जर आला आपल्यात तर ?- ब्राह्मण नवबौद्ध ?किती किती खिचडी होईल ?

  चला आता सुरवात करू या - वेळ फार थोडा आहे ! कुणापासून करायची सुरवात ?

  अनिताताई आणि प्रो.तह्किक सोडणारच आहेत हिंदू धर्म - त्याना गाठूया - चला !

  बुद्धं शरणं गच्छामि - धम्मं शरणं गच्छामि

  ReplyDelete
  Replies
  1. "अनिताताई आणि प्रो.तह्किक सोडणारच आहेत हिंदू धर्म - त्याना गाठूया - चला !"

   जो हिंदू धर्म अस्तित्वातच नाही त्याला सोडणार कसे?

   Delete
  2. ताई ताई ,

   एक सांग की ग!

   अनिताताई काहीतरी सोडणार आहेत - काय ग असेल ते ?

   धर्म नावाची एक साडी आली होती म्हणे बाजारात !

   पूर्वी बॉबी नावाची आली होती ना ?

   अनिताताई आणि प्रो तहकिकलाच माहित नेमके काय सोडणार आहेत ते !

   कारण हिंदू धर्मच नाही तर तो कसा सोडणार ?

   Delete
 16. आपण सर्वांनी साहित्य संमेलनातच धर्म बदलला तर ?

  चला तर !

  संजय सर , आणि नरके सर !

  आणि त्या अनिताताई आणि प्रो तहकिक येणारच ! मग सर्व बसून रांग लावूया !

  दोन कार्ये -संजय सरांचे अध्यक्षीय भाषण आणि आपला धर्म बदल !

  मुज्जफ़र वरून बरेचजण त्यांचा धर्म बुडवायला येणार आहेत -केरळातून पण त्यांचे क्रॉस बुडवायला काहीजण येणार आहेत - त्याना नित सासवड चा रस्ता सांगायला हवा - नाहीतर चुकून नदीकाठी स्नानसंध्या करणाऱ्या भाताच्या नादाला लागतील


  एकूण दर दिवशी ३० कोटी लोक जमतील असा प्राथमिक अंदाज आहे

  दोन दिवसाला ६० कोटी धर्मांतरे झाली तर निम्मा भारत बौद्ध झालाच की -

  डिसेंबर ला धमाल करुया -पण त्या दिवशीही थोडे धर्मांतर झालेच पाहिजे - !


  पण सगळेच सन्याशी झाले तर ?

  छानच ! आपोआप कुटुंब नियोजन होइल नाही का ?

  आणि आरक्षण पण १०० टक्के !!

  ReplyDelete
  Replies
  1. खूपच छान कल्पना, ताई !

   Delete
 17. मग सर्व बसून रांग लावूया !>> अहो नको हो. ते जेवणावळीत रांगेत बसतात पुन्हा हिंदूंच्याच पद्धती.!! इथे नविन जॉब्स कसे होतील ते पाहायचे सोडून ह्यांचे आपले धर्मांतर. अशाने आफ्रिका जी निम्मी मुसलमान आणि ख्रिश्चन झाली ते सगळ्यात पुढे असायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. फक्त खून आणि माराम्र्यात जाम पुढे. त्यापेक्षा शिका असे आंबेडकरांनी सांगितले होते पण पाहिजेल ते न शिकता फक्त द्वेष तेवढाच शिकला की काय होते हे आपण पाहतोच आहोत.

  ReplyDelete
 18. श्रीमती पल्लवी सरोदे आणि अप्पा-बाप्पा

  आमच्या ब्लॉगवरून एका संपादकाने वर एक प्रतिक्रिया येथे दिली होती. त्यासंदर्भाने काही स्पष्टिकरणे येथे देत आहोत.

  १. अनिता पाटील विचार मंच (अपाविमं) हा ब्लॉग सध्या एक संपादक मंडळ सामूहिकरित्या चालविते. आदरणीय अनिता ताई आता ब्लॉगचे काम पाहत नाहीत.

  २. येथे प्रतिक्रिया नोंदविणा-या अपाविमंच्या एका संपादकांनी वाचक संख्येसंदर्भात केलेली टिपणी अनाठायी आहे. या टिपणीशी अपाविमंचे संपादक मंडळ सहमत नाही. कोणाची वाचक संख्या जास्त आणि कोणाची कमी हा मुद्दा क्षुद्र स्वरूपाचा असून, चळवळीत काम करणाèयांनी अशा बारक्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये, असे संपादक मंडळाचे मत आहे.

  ३. श्री. संजय सोनवणी यांना अपाविमंने आधीच पाठींबा दिलेला आहे. तसेच श्री. सोनवणी यांच्याशी काही मुद्यांवर आमचे मतभेद आहेत, हे पाठींबा देतानाच आम्ही नमूद केलेले आहे. लोकशाहीत एकमेकांच्या मतांचा आदर करणे, सर्वाधिक महत्त्वाचे आहे. तेच आम्ही सोनवणी यांना पाठींबा देऊन केले आहे.

  ४. आमच्या संपादकांच्या प्रतिक्रियेवर श्रीमती सरादे आणि अप्पा-बाप्पा यांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. श्रीमती सरोदे आणि अप्पा-बाप्पा यांनी आदरणीय अनिता ताई यांना उद्देशून काही विधाने केली आहेत. आदरणीय ताई आता ब्लॉगचे कामच पाहत नसल्याने त्यांच्या संबंधाने व्यक्त झालेली मते अनाठायी आहेत, हे संपादक मंडळ आग्रहाने नमुद करू इच्छिते.

  -राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

  ReplyDelete
 19. मला एक विचारायचे आहे -

  समजा ,

  धर्मांतर करायचा अधिकार आपल्याला घटनेनेच दिलेला आहे !तर मग अडचण काय आहे ?

  ज्याला करायचे आहे त्याला करु दे -


  आपण आनंद व्यक्त करायचा इतकेच आपल्या हातात असते !


  अकबरासारखा ढोंगीपणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे नव्हता !


  शिवाजी महाराजांनीच जर इतकी निकड असती - तो जगण्या मारण्याचा मुद्दा असता तर , नवीन धर्म काढला असता - त्याला आज ४०० वर्षे होऊन तो चांगला रुजला असता - पण त्यांनी तसे नाही केले - तसे नाही झाले -

  ती त्यांची गरज नव्हती आणि आजही कदाचित नाहीये !( डॉ बाबासाहेबांच्या धर्मांतराने त्यांच्या जातीचे सर्व प्रश्न संपले का ते एकदा तपासले पाहिजे - )

  राज्य निर्माण करणारा अशा गोष्टीत श्रम खर्च करत नाही तर त्यापेक्षा कुशल संघटना बांधण्यात तो तन मन धन खर्च करतो !

  प्रश्न इतकाच आहे की हीच कल्पना साक्षात राजर्षी शाहू महाराजाना का नाही सुचली ?

  आणि ती त्यांनी अमलात का नाही आणली ?

  त्याचे कारण असे वाटते की राजर्षी अतिशय कर्तृत्ववान होते आणि त्यांना धर्म सोडायची गरज वाटली नाही - त्यांनी मोकळ्या मनाने धर्म सुधारणा केल्या - लोकाना शिकवून शहाणे केले- ब्राह्मणाना त्यांची जागा दाखवली - त्यांच्या कार्यकक्षा ते अधोरेखित करत गेले -

  त्यांचे कान पिळत त्यांना त्यांचे कर्तव्य सांगितले !


  राजर्षी ब्राह्मण द्वेष्टे नव्हते तर ते वर्ण विरोधी होते -  तीच गोष्ट संभाजी किंवा शिवाजी महाराजांची -त्यांनी स्वतः नवीन धर्म काढण्याच्या गोष्टी केल्या नाहीत - ते स्व कर्तृत्ववान - स्वयंभू होते - माणसे जोडणारे होते - माणसे तोडणारे नव्हते !

  अठरा पगड जातीना घेऊन त्यांनी स्वराज्य उभे केले - प्रत्येक जातीवर त्यांची जरब होती प्रत्येक जातीतल्या गुणावदोषाचा त्यांनी कौशल्याने उपयोग करून घेतला -

  त्यांनी आरक्षण आणि फोडा झोडा हे तत्व नाही राबवले !- माणसाला माणूस म्हणून ओळख नव्याने करून दिली - द्वेष हा देश बांधणीचे माध्यम बनू शकत नाही हे ते ओळखून होते

  नरेंद्र मोदी ना यातून बरेच शिकण्या सारखे आहे !

  ReplyDelete
  Replies
  1. धर्मांतराने दलितांना काय दिले?

   -लक्ष्मण

   मी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांर्हून अधिक काळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काढले आहेत. धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, सेक्युलर, अशा मित्रांच्या खांद्याला खांदा लावून मी २५-३० वर्षे काम केले. अलीकडे जेव्हा मी व माझ्या भटक्या विमुक्त समाजातील सहकाऱ्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा निर्णय केला, तेव्हा अनेकांचे कान टवकारले. अनेकांच्या नजरा विस्फारल्या. काहींना आता लक्ष्मणचं हे काय नवंच खूळ, असं वाटत होतं; तर काही मित्र कुत्सितपणे म्हणत होते, आता काय लक्ष्मण 'नमो तत्स.' मी म्हणायचो 'जसं होईल तसं'. एक कम्युनिस्ट नेते कैक वर्षांचे माझे मित्र. ते मित्र मला म्हणत होते, 'काय होणार तुझ्या या धर्मांतरानं? आपण सारी सेक्युलर मंडळी. धर्माकडे पाठ करून उभी असलेली. बरं ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचं तरी काय झालं? तर तुझ्या जाण्यानं नेमकं काय होईल?' तेव्हा त्यांना मी शांतपणे म्हणालो, 'होय आपण सारे सेक्युलर, तुम्ही मराठा सेक्युलर, भाई वैद्य ब्राह्माण सेक्युलर, जनार्दन पाटील कुणबी सेक्युलर, बाबा आढाव मराठा सेक्युलर, जनार्दन वाघमारे माळी सेक्युलर आणि मी कैकाडी सेक्युलर. असा आपला सेक्युलॅरिझम आहे. सेक्युलर म्हणण्यात तुमचे काय जातं? जातीचे सर्व फायदे तुमच्या ताटात पडतातच. ते तुम्ही कधी नाकारलेत? समाजाची वास्तविक प्रतिष्ठा जातीच्या उतरंडीनुसारच मिळते ना? मी सेक्युलर कैकाडीच रहाणार असेन, तर तुमचा सेक्युलॅरिझम माझ्या आणि माझ्या समाजाच्या काय कामाचा? आणि जे आधी धर्मांतरित झाले त्यांच्याबद्दल म्हणाल तर मी दोनच गोष्टी तुम्हांला विचारतो. एक महार मला असा दाखवा जो मेलेली ढोरं ओढतो आणि मेलेल्या ढोराचं मांस खातो. मी त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देतो आणि असा महार दाखवा की ज्याला सांगावं लागतंय की पोरगं शाळेत घालं. त्यालाही एक लाख रुपये देतो.' या प्रश्नाचं उत्तर मी काही गंमत म्हणून दिलं नव्हतं. धम्मचक्र प्रवर्तन अभियानामध्ये भंडाऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी प्रत्येक सभेत विचारत होतो, एक महार असा दाखवा जो मेलेल्या ढोराचं मांस खातो व मेलेले ढोर ओढतो. त्याला एक लाख रुपये बक्षीस देतो. आजतागायत असा महार मला भेटलेला नाही.

   Delete
  2. काय अर्थ या घटनेचा? कोणत्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या हिंदू धर्माचा त्याग केला होता. (मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे ३०, ३१, मे व १ व २ जून १९३६ साली चार दिवस झाली. 'मुक्ती कोन पथे?' या नावानं बाबासाहेबांंचं भाषण प्रसिद्ध आहे). १९३६ साली ते म्हणाले, 'सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे, स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे, दागदागिने घातल्यामुळे, पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे, जमीन खरेदी केल्यामुळे, जानवे घातल्यामुळे, मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे, पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदूस जोहार न घातल्यामुळे, शौचाला जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे, पंचाच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे, अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार, जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते. मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते? याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे, या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत, त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते; तीही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता, म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, उंची पोषाख घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो, उंची पोषाख करतो, तांब्याची भांडी वापरतो, घोड्यावरून वरात नेतो, तो वरच्या वर्गापैकी कुणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा? या रोषाचे कारण एकच आहे; ते हेच की अशी समतेची वागणूक त्याच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात, खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तरी कलहाला सुरुवात होत,े ही गोष्ट निविर्वाद आहे.'

   Delete
  3. मी अगदी लहान होतो, तेव्हा मी पाहिलं आहे, गावोगाव महारवाड्यांवर बहिष्कार चालू होते. माणसांना गावात येऊ दिले जात नव्हते, पाणवठे बंद होते, पिठाची गिरणी बंद होती, किराणामालाची दुकाने बंद होती. गावोगावच्या महारांनी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या दलित जनतेने बाबासाहेबांकडून धम्म दिक्षा घेतली होती. तराळकी, येस्करकी नाकारली होती. निरोप्याचे काम नाकारले होते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली निहित कर्तव्यं गावगाड्यात करावी लागणारी सर्व कामं मग, लाकूड फोडणे असेल, ढोर ओढणे असेल, सांगावा सांगणे असेल, हे सारे नाकारले होते. हे एका अर्थाने मोठे बंडच होते. शेकडो वर्षांपासून घरातील देव्हाऱ्यात पूजलेल्या ३३ कोटी देवांच्या प्रतिमा एका रात्रीत नदीत भिरकावून दिल्या. मरीआई लक्ष्मीआईची मंदिरं ओस पडली. सारे गंडे-दोरे, गळ्यातल्या माळा, डोक्यावरचे केस सर्व काढून फेकून दिले. गावागावात, वस्तीवस्तीत बुद्धवंदना निनादू लागली. सर्व आखाडे, देवळे, विठ्ठलमंदिरांचे बुद्ध विहारात रूपांतर होऊ लागले. त्यांच्या नावापुढील जात व धर्म जाऊन 'बौद्ध' असे लिहिले गेले. मुलांची, घरांची, गावांची, रस्त्यांची, संस्थांची नावे बदलली. सर्व समाज तरारून उठला. सापाने कात टाकावी, तशी कात टाकून सळसळून उभा राहिला. एक नवी अस्मिता घेऊन हा समाज अन्याय, अत्याचार, जूलूम याच्या विरोधामध्ये ठामपणे उभा राहिला. चाणी, बोटी, पड, हाडकी, हाडोळा ही गुलामीची सारी प्रतिके या समाजाने भिरकावून दिली. बुद्धकालीन इतिहास व बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब सर्वत्र दिसू लागले. माझी पिढी या सर्व घटनांची साक्षीदार आहे. बौद्ध स्थापत्यकला नवीन घरांवर विराजमान होऊ लागली. बुद्ध जयंती धूमधडाक्यात साजरी होऊ लागली. सामूहिकरीत्या लोक दारू सोडू लागले. जत्राखेत्रांवर होणारा प्रचंड खर्च, कोंबड्या-बकऱ्या बळी देणे, अंगात येणे या विरुद्धचे काहूर उसळू लागले. लग्नविधी, नामकरणविधी, अत्यंंविधी बदलले, लग्न-मरणातला बँड गेला. डफडं गेलं. हालगी गेली. गावाची चाकरी-सेवा गेली. समाज गावगाड्यातून बाहेर पडला. अंगारे-धुपारे-बुवा-बाबा मागीर् लागले. पोतराजांनी अंगावरली आईची वस्त्रं धडप्यात गुंडाळून नदीला सोडली. आपल्या मनुष्यत्वाचा शोध सुरू झाला. गुलामगिरीच्या आभूषणांना चूड लागली. लोकांनी खेडी सोडा, शहरांकडे चला हा मंत्र स्वीकारला. आणि लोक गावगाड्याच्या नरकातून, या गुलामगिरीच्या जोखडांमधून बाहेर पडले. ईश्वराच्या जोखडातून बाहेर पडले. कर्मकांडाच्या लफड्यातून बाहेर पडले. कालपर्यंत अंगात येणारी मरीआई कायमची नदीत विसजिर्त केली म्हणून काही आईचा कोप झाला नाही. कुणीही प्लेग, पटकी, कॉलरा या रोगांनी मेले नाहीत. कोणालाही हाग-वक झाली नाही. गपगुमान अंगातले देव पळून गेले. लोक दास्यातून मुक्त होऊ लागले.

   Delete
  4. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र मनोमनी या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे. आज ५० वर्षांनंतर अॅड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद मुणगेकर आणि डॉ. नरेंद जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत पुणे, मुंबई, औरंगाबाद या विद्यापीठांचे कुलगुरू झाले. युनिव्हसिर्टी गँट कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात साऱ्या देशातल्या उच्च शिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ.रेंद जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झालेले आहेत. हजारो लोक डॉक्टर आहेत, इंंजिनीअर आहेत, आकिर्टेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांचा तर सुळसुळाटच आहे. समाजाचे क्रीम समजल्या जाणाऱ्या आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्चमध्यम वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे. वेश, भूषा, भवन, भाषा सारे बदलून गेले आहे. आज 'वाडावो माय भाकर येस्कराला' हे इतिहासजमा झाले आहे. आय.ए.एस. आय.पी.एस., यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी.,या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देशात एक नंबरला ब्राह्माण आहेत आणि दोन नंबरला पूवीर्चे महार आणि आताचे बौद्ध आहेत. विद्वत्तेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या दोन समाजांचीच स्पर्धा सुरू आहे. सर्वाधिक ब्राह्माण मुलींनी पूर्वास्पृश्य असलेल्या या समाजातील तरुणांशीच आंतरजातीय विवाह केल्याचे दिसेल. रोटी-व्यवहाराची तर क्रांती झालीच पण बेटी-व्यवहाराची क्रांती या समाजात घडते आहे. बेटी-व्यवहार आपल्या बरोबरीच्या माणसांशी होतो. साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला स्वतंत्र इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादि क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्र म्हणवणाऱ्यांना तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ लिहिलेच नाही, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही. ती महाराष्ट्रातच निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या आंबेडकरी भूमीतच देशातले पहिले साहित्यातले बंड मराठीमध्ये झाले.

   Delete
  5. लोक विनोदाने म्हणतात, 'ब्राह्माणांनी मटण महाग केले आणि दलितांनी पुस्तके महाग केली' ब्राह्माणाघरी लिवणं, कुणब्याघरी दाणं आणि महाराघरी गाणं हे आंबेडकरवाद्यांनी खोडून टाकले. आता दलिताघरी लिवणं आणि बामणाघरी गाणं असे नवे सूत्र मांडायला हरकत नाही. दीक्षाभूमीवर लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्य संमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकाची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते. पण तिथे दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो ग्रंथांची झालेली गदीर् दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून 'आब-ए-जमजम' आणतात, आमचे बौद्ध बंधू मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने. ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे.

   खेडी सोडून शहराकडे चला, हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. अंधार युगातील अंध:कार कूप ठरण्याची भीती ओळखून बाबासाहेबांनी खेड्याला केंदबिंदू न ठरवता व्यक्तीला विकासाचा केंदबिंदू ठरवले होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये फार छानपणे बाबासाहेबांचा खेड्यासंबंधीचा विचार मांडला आहे. पॅसिफीक रिलेशन्स परिषदेला सादर केलेल्या प्रबंधात बाबासाहेब म्हणतात,

   अ). जोपर्यंत अस्पृश्य लोक हे खेड्याच्या बाहेर रहातात, त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नाही, त्यांची लोकसंख्या हिंदूंच्या मानाने कमी आहे, तोपर्यंत ते अस्पृश्यच रहाणार. हिंदूंचा जुलूम व जाच चालूच रहाणार व स्वतंत्र, संपूर्ण जीवन जगण्याला ते असमर्थच रहाणार.

   ब). स्वराज्य म्हणजे हिंदू राज्यच होईल. त्यावेळी स्पृश्य हिंदूंकडून होणारा जुलूम व जाच अधिकच तीव्र होईल. त्यापासून दलितवर्गाचे चांगल्यारीतीने संरक्षण व्हावे.

   क). दलितवर्गातील मानवाचा पूर्ण विकास व्हावा. त्यांना आथिर्क व सामाजिक संरक्षण मिळावे, अस्पृश्यतेचे उच्चाटन व्हावे म्हणून या परिषदेचे पूर्ण विचारांती असे ठाम मत झाले आहे की, भारतात प्रचलित असलेल्या ग्रामपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला पाहिजे. कारण गेली कित्येक वर्षे स्पृश्य हिंदंूकडून दलितवर्गाला सोसाव्या लागणाऱ्या दु:खाला ही ग्रामपद्धतीच कारणीभूत झालेली आहे. खेड्यातील दलित बांधवांची अवस्था आठवून बाबासाहेब ढसढसा रडत असत. ते म्हणत असत, 'खेडापाड्यातून रहाणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा उद्देश सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले माझे सार्मथ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे. जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात रहायला येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही. खेड्यात रहाणाऱ्या या आमच्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी रहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी कुत्र्यासारखे वागविले जाते, ज्या ठिकाणी पदोपदी मानभंग होतो, जेथे अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे? खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडिक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवनवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्ण माणूसपणाचे जीवन जगावे. तेथे नव-समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कुणी अस्पृश्य म्हणून वागविणार नाही.

   Delete
  6. गेल्या ५० वर्षांत दोन जातींनी खेडी सोडली. एक बौद्ध व दुसरे ब्राह्माण. दोघे शहरांमध्ये येऊन राहिले. पूर्वास्पृश्य असलेल्या दलितांना शेतीच्या उत्पादनव्यवस्थेत काही स्थान नव्हते. तर ब्राह्माण कुळ कायद्यामुळे व ४८च्या गांधी हत्येनंतर खेड्यांमधून शहरांकडे धावले. जातींची बहुसंख्या आणि जातींची अल्पसंख्या ही परिस्थिती भयावह आहे. घटनेमध्ये एक माणूस, एक मूल्य हा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला असला, तो घटनेने स्वीकारला असला, घटनेने स्वातंत्र्य-बंधुता-न्याय ही तत्त्वे स्वीकारली असली, तरी वास्तवामध्ये हिंदू नावाची काही गोष्टच नसते. तेथे जाती असतात आणि जातीच राजकारणाचे रूप घेऊन अल्पसंख्य, बहुसंख्य ठरवित असतात. त्यामुळे जातीने अल्पसंख्य व जातीने बहुसंख्य हेच सूत्र सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या फेरवाटपात महत्त्वाचे ठरते आहे. या स्थितीचा अल्पसंख्य जातींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटते. या देशात जात बदलताच येत नाही असे रोज सांगितले जाते. परंतु आधीच्या बौद्धांनी हे सिद्ध केले आहे की जात बदलता येते; तिचे वास्तवही बदलता येते. आता ज्यांनी धर्म बदलला नाही, त्यांची काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांमध्ये एक नंबरला पूवीर्चे महार होते; तर दोन नंबरची लोकसंख्या पूवीर्च्या मांगांची आहे. आता अस्पृश्य कुणीही राहिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यात अस्पृश्यता नष्ट केली आहे. या दोघांशिवाय बाकी छोट्या छोट्या अस्पृश्य जाती आहेत; ज्या आजही गावगाड्यात आहेत. त्यांची परिस्थीती काय आहे? त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे? मातंग समाजात एखाद-दुसरा अपवाद सोडला तर कुणीही आय.एस.आय. अधिकारी नाही. अपवादानेच एखाद-दुसरा आय.पी.एस.अधिकारी असेल. तीच परिस्थिती बाकीच्या स्पर्धापरीक्षांची आहे. ज्या ठिकाणी पूवीर्च्या महारांनी गावगाडा सोडला, गावाची सेवा-चाकरी सोडली, ती सारी कामे ही मातंगांच्यावर लादली गेली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळे एक-दोन टक्के तरी शिक्षण असेल की नाही, याची चिंता केली पाहिजे. सबंध मातंग, चर्मकार, ढोर या सगळ्यांच्या शिक्षणाचा व त्यांना ५० वर्षांत काय मिळाले याचा स्वतंत्र अभ्यास होण्याची गरज आहे. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनीअर, कलेक्टर, कमिशनर, या समाजाच्या प्रशासन यंत्रणांमध्ये काय प्रमाण या समाजाचं आहे, याचाही तपशीलवार अभ्यास होण्याची गरज आहे.

   Delete
  7. आज अन्याय, अत्याचार सर्वाधिक होत आहेत ते मातंगांवर सर्व गावगाड्यांतल्या कामाचं स्वरूप उदा. डफडे वाजवणे एवढी गोष्ट लक्षात घेतली तरी काय जाणवते? डफडे वाजविण्याचा पारंपरिक धंदा हा मातंगांच्या गळ्यात मारला आहे. मातंग समाज स्वत:ला हिंदू धमीर्यच समजतो. त्यांनी हिंदूंच्या सण, उत्सव, लग्नात डफडे वाजविलेच पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. त्याने डफडे वाजवले तरीही आणि नाही डफडे वाजवले तरीही त्याला काही मारुतीच्या मंदिरात पाया पडायला जाता येत नाही. आणि गेला तर मार बसतोच. वरात घोड्यावरून काढल्यास, चांगले कपडे घातल्यास, चांगले रहाणीमान केल्यास, शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास, सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरल्यास, सवर्णांची लहान-मोठी कामे न केल्यास जनावरांसारखा मार खावाच लागतो. अगदी अलीकडेच, म्हणजे या महिन्या-दोन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यातील साकेगाव येथील सुनील आव्हाड याने पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्यामुळे गावातील जातीयवादी गावगुंडानी त्याला जातीवाचक शिवीगाळ करून वेशीवर बांधून बेदम मारहाण केली. त्याच्या घरावर हल्ला करून कुडाची भिंत तोडली. त्याचा लहान भाऊ, वडील यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कोतळी गाव येथील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा गटनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाने, पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्याने नीना अढायके या मातंग तरुणास बेदम मारले. त्याचा मुलगा व पत्नी यांनाही मारले. या दोन्ही घटनांमध्ये अन्याय करणारे पोलिस पाटील, सरपंच तसेच इतर अनेक लोक आहेत. या अगदी अलीकडच्या घटना आहेत. रोज कुठेना कुठे अशा घटना घडतच असतात. सर्वांची नोंद होतेच असेही नाही.

   डफडे वाजवायचे की वाजवायचे नाही, हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण असे स्वातंत्र्य मातंगांना आहे काय? सोलापूर जिल्ह्यातल्या चर्मकार समाजातल्या भगिनीवर पाच-सहा महिन्यांपूवीर् अतिप्रसंग झाला. काय तिने कोणाचे घोडे मारले होते? ती हिंदू आहे, अस्पृश्य आहे आणि ती पाटील सांगेल त्या गोष्टीला हो म्हणत नाही. मग दुसरे काय होणार? जोवर हे सारे हिंदू राहतील, तोपयंत त्यांच्यावर असाच अन्याय होत राहील. तीच परिस्थिती भटक्या विमुक्तांची. दलितांचा बहिष्कृत भारत; आमचा तर उद्ध्वस्त भारत. आमच्या तर मनुष्यत्वालाच अर्थ नाही. स्वातंत्र्याला ६० वर्षे झाली; पण आमच्या शिक्षणाचे प्रमाण ०.०६ टक्के आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या कोणत्याही सुविधांचा आम्हांला स्पर्श झालेला नाही. एका जागेला हा समाजतीन दिवसांपेक्षा जास्त रहातच नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणात यांना कुणी विचारत नाही. अल्पसंख्य असणे हा यांचा गुन्हा आहे. जोवर ती माणसे लमाण, कैकाडी, माकडवाला, वडार रहातील तोपर्यंत लोकशाहीपर्यंत पोहचूच शकत नाही. लोकशाहीमध्ये त्यांचा प्रतिनिधी नसेल तर ६० वर्षांत काय स्थिती झाली आपण पहातोच आहोत. त्यामुळे जाती नष्ट करायला पर्याय नाही. ज्यांनी जात नष्ट केली, ते पुढे गेले. ते बौद्ध असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत. ज्यांनी जात सोडली नाही, जातीची मानसिकता सोडली नाही, वर्णव्यवस्थेची गुलामगिरी सोडली नाही ते वेगाने मागे पडतायत. मग ते मराठे असोत, माळी असोत, कुणबी असोत. ब्राह्माणेतरांमध्ये सर्व गरीब गट वेगाने मागे जात आहेत. या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार केल्यानंतरच मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग स्वीकारलेला आहे. सवलती मिळोत किंवा न मिळोत; आम्हाला आमच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. कारण जे पायावर उभे राहिले तेच पुढे गेलेले आहेत. लाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगणे आणि अस्मितेच्या शोधात निघणे हे मला अत्यंत गरजेचे वाटते.

   Delete
  8. धर्मांतर केलेल्या महारांनाही ब्राह्मणांच्या मुलींशी लग्न करण्यात अभिमान का वाटतो? महारांपेक्षा खालच्या जातीतील मुलींशी लग्न करण्यात अभिमान का वाटत नाही?

   धर्मांतर केलेले महार हिंदू संत चोखामेळा यांचे नाव घायला तयार नसतात, पण हिंदू महारांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या कोरेगावच्या विजयस्तंभबद्दल मात्र त्यांना आदर असतो. हे कसे काय?

   आज आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पक्षात महारांचेच प्राबल्य का? इतर जातींना सामावून घेणारी दलित चळवळ का विकसित झाली नाही?

   जातीची मानसिकता सोडून खरोखरच सोडून दिली असेल तर आज प्रत्येक क्षेत्रात "महार" समाज आघाडीवर आहे हे सांगण्यापेक्षा "बौद्ध" समाज आघाडीवर आहे हा शब्द प्रयोग उचित ठरला असता. पण ते काही तुम्हाला सुचत नाही.

   समजा इतर दलित जाती खरोखरच बौद्ध झाल्या तर त्यांना महारांच्या बरोबरीचे स्थान देऊन त्यांच्याशी आंतरजातीय विवाह करण्याची महार समाजाची तयारी आहे का?

   आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ब्राह्मण स्त्रिया मोठ्या प्रमाणात दिसतात. महारांमध्ये हे प्रमाण किती आहे? दलितांच्या चळवळीचे नेतृत्व दलित स्त्रिया कधी करणार?

   Delete
  9. "( डॉ बाबासाहेबांच्या धर्मांतराने त्यांच्या जातीचे सर्व प्रश्न संपले का ते एकदा तपासले पाहिजे - ")------------->>>>>>> इति अमित ताम्हणे.

   वरील लक्ष्मण यांचा लेख वजा उत्तर म्हणजे अमित ताम्हणे सारख्या प्रवृत्तीच्या श्रीमुखात लगावलेली एक जबरदस्त थप्पड आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

   Delete
  10. गमतीचा भाग आणि झोंबणारा विषय हाच आहे -

   राजर्षी शाहू आणि म फुले यांनी धर्म का बदलला नाही हा आमचा मुद्द्दा आहे त्याला टांग मारून लक्ष्मण एकदम दोन चार अस्पृश्य शिक्षित लोकांची नावे का उगाळत बसत आहेत ?

   डॉ आंबेडकरांनी धर्म बदलला हे जर क्रांतिकारक पाउल आहे तर तेच पाउल म फुले आणि राजर्षी शाहू यांनी का उचलले नाही - हा माझा मुद्दा आहे - अंगाशी आले की भटा ब्राह्मणावर राग काढायचा ही मखलाशी किती दिवस पुरणार हो ?आता तरी शहाणे बना -


   लक्ष्मण माने यांचे काय झाले कुणास ठाऊक ! ते एक असो !त्यांचे चाळे चालणारच ! वळणाचे पाणी वळणालाच जाणार !- आणि ताम्हाणे यांच्या सारख्या ची प्रवृत्ती कोणती ?म्हणजे काय ?-

   देशात रोजगार हमी योजना हि खेड्यातील शहराकडे येणारा लोंढा थोपवणारी एक थोर योजना होती - पण या ९६ कुळी खादाड लोकांनी त्याची वाट लावली - तिथे ब्राह्मण कुठेच नव्हते !आधी खेड्यात हल्ली औषधालाही ब्राह्मण मिळत नाही !


   अक्कल नाही काडीची आणि मिजास मुलखाची अशी यांची गत आहे - आरक्षितांची ही पिलावळ देशाला खड्यात घालणार हे दिसतच आहे ! त्यातच आता कुणबी कुणबी करत ९६ कुळी पण घुसत आहेत - एकीकडे शिवाजी महाराजांचे नाव आणि एकीकडे हे भिक मागणे - अरेरे - काय दिवस आले हे या ९६ कुळी औलादी वर !- त्यांची मदत घेत आहेत संजय राव -

   कमाल आहे - तौबा तौबा !!

   Delete
  11. अरे बाबा, म. फुलेंनी "सत्यधर्म" काढला होता, हेही माहित नाही काय तुम्हाला? पहा त्यांनीच लिहिलेले पुस्तक "सार्वजनिक सत्यधर्म". छ. शाहूंनी ब्राह्मणी हिंदू धर्माच्या नाकावर टिच्चून वेगळे बहुजन शंकराचार्य पीठ निर्माण केले होते, हेही नसे थोडके, नाही का?
   बिच्यार्यानी हे लोक सुधारतील म्हणून खूप वाट पहिली, खूप प्रयत्न केले, मात्र सुधारतील ते हिंदू कसे?
   आपणास सुधारावेच लागेल, नाहीतर म्हण आहेच "उलट्या घड्यावर पाणी".

   Delete
  12. राजर्षी शाहू हे इंग्रजांचे मांडलिक राजे होते

   ते छत्रपतींचे औरस वारसदार - रियल ब्लड - वंशज होते का ?

   त्यांनी शंकराचार्य नेमणे म्हणजे हास्यास्पद नाही का ?

   स्वराज्य या शब्दाचा विसर पडलेले राजे भो पंचम जॉर्ज असे म्हणत अखिल हिंदुस्तानातून मुंबईत जमले होते -

   शिवाजी महाराजांची खरा निर्वंश कधीच झाला होता - पुढचे सगळे -

   बोलाचा भात आणि बोलाची कढी - असा उद्योग होता आणि आजही आहे !

   Delete
  13. आर. एस. एस. चा खोटा, भडकाऊ, समाज विघातक इतिहास!

   Delete
  14. ते छत्रपतींचे औरस वारसदार - रियल ब्लड - वंशज होते का ?------------>>>>>>>>>
   विचार वंशापेक्षा कोणताही वंश-वंशज श्रेष्ठ मानणे म्हणजे स्वतःचीच दिशाभूल केल्या सारखे आहे, नाही काय?

   Delete
  15. अरेच्या! म्हणजे त्या काळी शाहू राजांच्या करवीर नगरीतील ब्राह्मण हे तर ठरले होते मांडलिकाचे मांडलिक! होय ना?

   Delete
 20. अपा वि मं च्या खुलाशाचे आप्पा बाप्पा स्वागत करत आहेत

  असेच समयोचित खुलासे सामाजिक एकजूट कायम ठेवतील आणि निरीगी वातावरण पण निर्माण करतील असा विश्वास वाटतो - मतभेद तर असतातच पण निवडीचा प्रश्न आला की त्यातल्या त्यात चाणले कोण हा विचार करावाच लागतो !

  आपल्याकडे

  none of the above हे ऑप्शन अजून नाही !राजकीय पक्षाना त्यामुळे चांगलाच शह बसेल - इथेपण तीच कथा आहे !

  अपं वि मं मनापासून धन्यवाद !

  ReplyDelete
 21. गणेशोत्सव- जल्लोष, उन्माद आणि बरंच काही.....

  प्रकाश पोळ

  गणपती हा शब्दच गणपतीचे मूळ स्वरूप दाखवून देतो. गणांचा अधिपती तो गणपती असा सरळ, साधा अर्थ आहे. शिव-पार्वतीचा पुत्र असणारा हा गणपती वैदिकांसाठी सुरुवातीला विघ्नकर्ता होता. त्याने विघ्न आणू नये म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीची आराधना करून होते. नंतरच्या काळात त्याचे मुळचे अवैदिक स्वरूप नष्ट होऊन त्याचे ब्राम्हणीकरण झाले. अवैदिक गणपतीचे वैदिक ब्रम्हणस्पतिबरोबर एकरूपत्व दाखवून गणेशाचे पूर्ण स्वरूप बदलवून टाकले. त्यासाठी जाणीवपूर्वक धार्मिक ग्रंथातून पूरक कथांची निर्मिती केली गेली.


  प्राचीन काळापासून गणेशाची पूजा घरगुती पातळीवर होतच होती. अगदी अलीकडे पेशव्यांच्या दरबारातही गणपती पुजला जायचा. नंतर काही लोकांनी सार्वजनिक गणपती उत्सव सुरु करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहत असल्याने टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीला पूरक म्हणून सार्वजनिक गणेश उत्सवाची कल्पना उचलून धरली. त्यासाठी त्यांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिले. टिळकांच्या प्रयत्नामुळे गणेश उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. समाज संघटीत व्हावा आणि त्याच्या माध्यमातून जनजागृती करून ब्रिटीशांची सत्ता या देशातून घालवून देवू असे टिळक वगैरे लोकांचे मत होते. म्हणजे गणेशोत्सव ही धार्मिक कमी आणि राजकीय गरज जास्त होती. अर्थात हा हेतू कितपत सफल झाला हाही संशोधनाचा भाग आहे.

  १८९३ साली सुरु झालेल्या गणेशोत्सवात सध्या अमुलाग्र बदल झाले आहेत. हे बदल उत्सवाच्या स्वरुपात जसे झालेत तसे त्याच्या हेतुतही झाले आहेत. सध्या गणेशोत्सवाला बाजारी स्वरूप आले आहे. एक फार मोठी अर्थव्यवस्था या सर्वांच्या पाठीशी कार्यरत आहे. आणि या माध्यमातून आपले हितसंबंध साध्य करणाऱ्या लोकांना श्रद्धेशी काहीही देणेघेणे नाही. श्रद्धा ही फक्त बोलायची गोष्ट आहे. कारण गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात समाजाचे बारकाईने निरीक्षण केले तर माझे म्हणणे सत्य असल्याचे कोणत्याही सुबुद्ध माणसाला पटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे श्रद्धेचा बागुलबुवा उभा करून त्याच्याआड या सर्व गोष्टी झाकून नेण्याचा प्रयत्नही केविलवाणा ठरेल. या दहा दिवसांच्या काळात कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीत झालेला बदल पाहता हा जल्लोष आहे कि उन्माद असा प्रश्न पडतो. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी याची प्रचीती आणून दिलीच आहे. एका महिला भक्ताला धक्काबुक्की करतानाचा त्याचा पराक्रम सीसी टीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला. लागलीच कर्तव्यदक्ष गृहमंत्री आर. आर. आबांनी अशा प्रकारची अरेरावी केली तर कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी डरकाळी फोडली. पण डॉल्बीच्या आवाजात आबांची ही डरकाळी नेहमीसारखीच फेल गेली.CONT......

  Re