Friday, October 11, 2013

हा चिंब भिजला...

हा चिंब भिजला
ओला
प्रणयी गवताळ माळ
घेऊन मिठीत
वाट ओलेती
नाजूक
आणि झुकलेले
स्नेहल
सावळे मेघाळ
आभाळ
त्यात ही रहस्यमयी
सायंकाळ
करून देत आठवण मला
तुझ्यासवेचे
ओलावेदार
आठवणींनी चिंब भिजलेले
अगणित क्षण....

सखे गं
मी स्तब्ध
नि:शब्द
निसर्गाच्या या अविरत प्रणयाने
विश्व आणि आपल्यातील प्रणयी
एकमयतेने......!

5 comments:

  1. अय्या !

    खोटी बाई म्हणजे काय ग ?

    इश्श्य !-

    खोटी आणि खरी असं असतं का कधी बाईत !

    आणि यांनी कस वळखल मी खोटी ते ?काय पाहिलं !

    आणि वर कोल्हापूरला बोलावून राहिल्येत -

    उगी आपल काहीतरी -

    आम्ही जर गेलोच नाही कधी अगदी पन्हाळ गडावर सुद्धा कोल्हापूर सोडून - तर आम्ही कुठून आणि कसं काय करायचं ?

    रावजी , अहो रावजी - इतक बिघडण चांगलं नाही -कशापायी हे सार ?

    अवो आहेत टकलावर ते सुद्धा जातील या रागापाई - कैतरी डोक्यात घुसेल असं तरी बोलाव मानसान !इतकी मस्त हवा पडली आहे ,

    संजय सर इतक्या मस्त कविता लिहित बसले आहेत -अहाहा !

    आणि तुम्ही हि धिंड कशापायी काढताय ?

    काय वाटेल संजय सराना ?कसल्या खोट्या आणि खऱ्या बायका हो ?

    सगळ्या अस्सलच असतात ! काहीतरीच आपल बोलायला लावायचं कशापायी ?

    इश्श्य !!

    संजय सरांच्या कवितांवर कुणीच बापडा लिहित नाही आणि याच मेल्याच आपल धिंड काढायचं चाललाय !

    संजय सर इतक्या मस्त मूड मध्ये आहेत आणि तुमी आपल सारख त्या शाहू म्हराजाचच घेऊन बसलात ! २०० वर्षापूर्वीच एकदम बोअर मारतय बघा ! छ्या !! -कोल्हापूरची मानस कशाला बोलावतात तिकडे ? दसरा असाच गेला - दिवाळी आली !

    अय्या - अजून नाही कळत तुम्हाला ? संजय सराना विचरा - त्यांना समद कळत म्हटलं रावजी ! बगा जरा ! इतके कसे हो तुमीबी खुळे !

    व्हा तिकड - उगी आपल छळायचं - लोक काय म्हणतील ?

    ReplyDelete
  2. Sanjay ,

    Great going !

    This is a stepping stone for the next year !

    Hope in the meantime you will plan to accomodate the readers

    in the voting process and create history

    Best luck for the future !

    Chaitanyaa

    ReplyDelete
  3. संजय सर,



    आपण या निवडणुकीच्या सुधारणा ज्या लिहिल्या आहेत - त्या अतिशय बोलक्या आहेत

    कारण ,

    आज जे चित्र दिसत आहे तो त्या सुधारणा नसण्याचाच परिणाम आहे !

    या निवडणुकीत वाचकाना कसे सामावून घेता येईल ते आपण अतिशय सजगपणे मांडले -

    पण ते आता प्रत्यक्षात कसे आणता येईल ते आपण सर्वांनी बघितले पाहिजे !

    आपल्या सक्रियतेबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन -

    हि आपल्या यशाची पहिली पायरी आहे असे अभिमानाने आपण समजू या !

    ReplyDelete
  4. संजय सर

    आपण सर्वांनी माननीय विजयी उमेदवार फ मु शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशात सहभागी होऊ या !

    हे साहित्य संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवरच सर्व प्रथम येते !

    आपण ज्या उत्साहाने हि निवडणूक लढवली त्याबद्दल आपले अभिनंदन !



    आपल्या या ब्लोगवर राजर्षी शाहू महाराज आणि इतर गोष्टींची इतकी चर्चा झाली आहे की

    मूळ विषयाकडे ( साहित्य संमेलन ) सर्वांचे दुर्लक्षच झाले आहे -

    त्या सर्वांच्या अनुमतीने आदरणीय फ मु शिंदे याना राजर्षी शाहू महाराजांची छोटीशी प्रतिकृती देणे समयोचित ठरेल का ?

    या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दलच्या आदराच्या भावना वेगवेगळ्या थरातून वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्या समोर आल्या -

    मूळ निवडणूक या विषयाशी त्याचा काहीच संबंध नसताना आपल्या ज्ञानात भर पडत गेली -म्हणून आपण सर्व सहभागी लोकांचे आभार मानूया !

    आपण संजय सर , कार्य बाहुल्यामुळे या दीर्घ चर्चेत भाग घेतला नसेल , पण इतक्या महत्वाच्या विषयावर आपल्या अनुपस्थितीत इतरांनी ती सर्व उणीव भरून काढली हे विशेषच !

    दत्ता आगाशे

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...