Wednesday, November 6, 2013

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : कुणाचा वैरी कुणाचा कैवारी?"

Photo: राष्ट्रीय स्वयंसेवक  संघ  :  कुणाचा  वैरी  कुणाचा  कैवारी   ह्या  रोखठोक  दिवाळी   अंक   आयोजित  परिसंवादात   रवींद्र  नाट्य  मंदिर ,  मुंबई   येथे  बोलताना  श्री.  संजय  सोनवणी .


वृत्तांत: 

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : कुणाचा वैरी कुणाचा कैवारी?" हा परिसंवाद ३१ आक्टोबरला मुंबई येथे "रोखठोक" दिवाळी अंकाच्या प्रकाशनानिमित्त झाला. यात माझ्यासमवेतच माधव भंडारी, प्रमोद बापट, ज्ञानेश महाराव, प्रा, नम्रता गणेरी यांचा सहभाग होता तर चंद्रकांत वानखेडे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात गणेरी यांनी रा. स्व. वरील महिला सहभागाबद्दलच्या प्रकल्पाच्या निमित्ताने आलेले अनुभव विषद केले व रा. स्व. संघ स्त्रीयांच्या दुय्यमत्वाला प्राधान्य देतो असे नमूद केले. बापट व भंडारी यांनी रा. स्व. संघ वाढत आहे, संघाला समजावुन घ्यायचे तर संघात काही काळ तरी प्रवेश करायला हवा, संघ आदिवासी-वंचित यासाठी अविरत कार्य करतो पण प्रसिद्धीच्या मागे पडत नाही वगैरे विवेचन केले. माझ्या भाषणातील ठळक मुद्दे:

१. रा. स्व. संघ हिंदुत्ववादी नसून "वैदिकवादी" आहे. वैदिकांचा धर्म नेहमीच वेगळा होता व आहे...त्याला अवैदिक हिंदुंचा पाठिंबा मिळु शकत नाही.
२. संघ वाढला याचे कारण मुस्लिम/ख्रिस्त्यांबद्दल निर्माण केलेली काल्पनिक भिती आहे. काल्पनिक शत्रु असल्याखेरीज संघटन होत नाही हे मानसशास्त्र संघाला चांगले माहित आहे.
३. हिटलर हे संघाचे आदर्श राहिले आहे. गोळवलकर गुरुजींचे "विचारधन" संघाचे बायबल आहे. ते हिटलरला आदर्श मानतात. (We, or our Nation defined)
४. पण त्याच वेळीस गंमत म्हणजे संघाला ज्यु सुद्धा प्रिय आहेत कारण त्यांचा मुस्लिमांशी सातत्यपुर्वक चालत असलेला संघर्ष. एकीकडे हिटलरही प्रिय व दुसरीकडे ज्युही प्रिय यात संघाचा वैचारिक व्यभिचार दिसून येतो.
५. आर्य सिद्धांत संघाने सोडला नाही. आता फरक एवढाच केलाय कि आर्य भारतातुन जगभर गेले. आर्य वंशवादातुन हे बाहेर मात्र पडत नाहीत. वैदिक हेच आर्य अशी त्यांची मान्यता असल्याने वेद व संस्कृत हे त्यांचे पंचप्राण आहेत व त्यांच्या दृष्टीने तीच भारतीय संस्कृतीचा मुलाधार आहे. सरस्वती पुजनाबद्दल ते आग्रही असतात कारण वेद हे सरस्वतीकाठी लिहिले गेले अशी त्यांची मान्यता आहे.
६. सरस्वती नदी नेमकी कुठली याचा अजून तपास लागायचा आहे. वेद हे सनपूर्व आठव्या शतकापार झालेले नाहीत कारण वेदांत झरथुष्ट्रच किमान तीनदा डोकावतो. ॠग्वेदाची मुळ भाषा संस्कृत (वैदिक संस्कृत) असुच शकत नाही कारण प्राकृतातुन संस्कृत कशी क्रमशा: विकसीत झाली याचे भाषिक पुरावे सनपुर्व तिसरे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळातील उपलब्ध आहेत. ही भाषाही विकसीत केली ती बौद्धांनी...वैदिकांनी नव्हे. तेंव्हा वेदांची मुळ भाषा ही व्रचदा सिंधी अथवा गांधारी होती एवढेच म्हणता येईल. परंतु भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या खुळातुन या कल्पना गुप्त काळात विकसीत केल्या गेल्या.
७. वैदिकजनांना पुष्यमित्र शृंगाबाबत भलतेच प्रेम असते पण प्रत्यक्ष पुरावे सांगतात कि तो आणि त्याचे वंशज प्राकृताचाच वापर करत होते.... कारण संस्कृत अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे भ्रमित लोकांनी चालवलेले भ्रमसत्र एवढेच संघाचे वर्णण करता येईल.
८. कोणतीही विचारधारा असो...खरी कि खोटी...पण तत्वज्ञान लागतेच. संघाकडे एके काळी गोळवलकर, एकात्म मानवतावाद मांडणारे दिनदयाळ उपाध्याय वगैरे लोक होते. मुखवटा केले गेलेले वाजपेयींनी समाजवादी गांधीवाद मांडला होता. दत्तोपंत ठेंगडी, बिंदुमाधव जोशी वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रांत संघ विचारांना नवे बळ देत होते. परंतु अलीकडे संघाची वैचारिक पातळी खालावली असून "आपण कोठे आहोत?" हे त्यांनाच समजत नाही हे सरसंघचालकांच्याच वक्तव्यांवरुन दिसते.
९. आम्ही संघाचे वैरी नाहीत. किंबहुना म. फुलेंची "एकमय समाज" व बाबासाहेबांची "सामाजिक लोकशाही" संकल्पना आम्हाला कोणाचेही वैरी होऊ देत नाही वा आम्ही कोणालाही वैरी मानत नाही. मनमुक्त विचारस्वातंत्र्याचे आम्ही पुजारी आहोत. शाखा आणि बौद्धिकांमुळे मुक्त विचारक समाज घडू शकत नाही....तर बौद्धिक क्लोन निर्माण होतात. आम्हाला सहप्रवासी हवेत...अनुयायी नकोत.
१०. जे संघ करतो त्याचीच फलस्रुती म्हणजे ब्राह्मणद्वेष्ट्या बामसेफ वा मराठा सेवा संघ यासारख्या संघटना उदयाला येतात. तुमची "समरसता" एक ढोंग आहे. लोकांची अस्मिता जेथे जागी नाही तेथेच घुसणे हे संघाचे सध्याचे कार्य आहे. मंडलोत्तर काळात ओबीसींना आत्मभान यायला सुरुवात झाली. तरी ओबीसी हा संघाचा मुलाधार बनवण्याचा प्रयत्न होतो. ओबीसी कधीच वौइदिक नव्हते त्यामुळे त्यांचे वैदिकीकरण करता येणे या देशात असंभाव्य आहे कारण वास्तव काय...आमचा धर्म काय याचे भान आम्हाला आले आहे.
११. संघाने आपली वैदिकवादी भुमिका बदलावी...नवेच वैश्विक तत्वज्ञान घेऊन पुढे चालावे. पण सध्या तरी संघाचा वैचारिक मृत्यू झाला आहे असेच चित्र आहे.

यानंतर ज्ञानेश महारावांचे भाषण झाले. चंद्रकांत वानखेडे यांने अत्यंत समर्पक शेवट केला. ते म्हणाले, भारतात मुस्लिमांनी सातशे वर्ष राज्य केले...त्यांना हा देश इस्लाममय करता आला नाही...इंग्रजांनी दिड-दोनशे वर्ष राज्य केले...त्यांना हा देश ख्रिस्तमय करता आला नाही...तेंव्हा इस्लामची भिती दाखवुन संघाने आम्हाला घाबरवायचे कारण नाही.







24 comments:

  1. आप्पा - मला तुझी कीव येते रे बाप्पा - हरलास की नाही पैज -

    बाप्पा - कमाल आहे रे बाबा तुझी - इतके कसे तुला परफेक्ट जमते रे जजमेंट

    आप्पा - अरे अगदी सोपे आहे - आपण त्या सभेला हजर होतो ना - मग तुझ्या लक्षात नाही का आले ?अरे सगळे आपापसात क्कुजाबुजात होते नाही का - त्यावरूनच मी पैज मारली -

    बाप्पा - माझ्या नाही लक्षात आले -

    आप्पा - अरे बरेच लोक कुजबुजत होते - आला का हा सोनावणी - म्हणजे आता मोहन्जदारो आणि हाडाप्पा आणि सरस्वती नदी आलीच समजा - वैदिक आणि शैव पण येणारच - एकावर एक फ्री !

    बाप्पा - खरच की ! अगदी तसेच झाले !

    आप्पा - सगळे फिदीफिदी हसत होते - त्याच वेळी मी तुला सांगितले आणि पैज मारली - बोल शंभर रुपयाची पैज - आता गाडी आपोआप संस्कृतवर घसरेल -झाले कि नाहि तसेच !


    बाप्पा - अगदी मान्य - पहिली गोष्ट आपण गेलो होतो गम्मत बघायला - ती मात्र मज्जा आली -

    आप्पा - अरे आपण नेहमी सांगत आलो आहोत आर एस एस वगैरे भ्रमाचा भोपळा आहे !शिळ्या कढीला उत आणायची ज्याना आवड आहे त्यांनी संघात जावे - आणि त्यांची भीती बाळगण्याचे तर काहीही कारणच नाही - कारण समजा ती ब्राह्मणांची संघटना आहे असे मानले तर ते सत्तेतून कधीच बाहेर फेकले गेले आहेत वर्षानुवर्षे - मग त्यांची आणि त्यांच्या तत्वांची एव्हढी दखल कशाला घेतात हे लोक ?खरच बावळट आहेत - आर एस एस एक बावळट तर हे सात बावळट -


    बाप्पा - अरे रिपब्लिकन लोकांची कोणीही दाखल घेत नाहीत तसेच खरे तर या आर एस एस चे आहे - ती एक मृत विचारधारा आहे - तिला जितके गोन्जाराल तितका त्याना उगाचच जोर येतो हा आपला अनुभव आहेच की !मग त्याना अनुल्लेखानेच मारले पाहिजे !


    आप्पा - संघाची दसरा संचलने आणि शिवसेनेचे दसरा भाषण ( शिवाजी पार्क ) म्हणजे एक विनोद असतो हल्ली - तेच तेच म्हातारे दरवर्षी असतात - एखादा गचकलेला असतो - मग त्यांच्या गप्पा रंगतात - भाऊ साहेबांचे संघकार्य अफाट ,त्यांची जनमानसावर पकड अफाट - त्यांचा वाचनाचा आवाका अफाट - म्हणजे काय ?कुणास ठाऊक - कोणत्या तरी ब्यांकेत वर्षानुवर्षे पाट्या टाकत त्यांनी विष्णू सहस्त्र् नाम वगैरे तोंडपाठ केलेले असते त्याचे इतके कौतुक ?हे भटजी सगळे असेच - परत रात्री एकेक पेग हवाच - असले हे धर्म परायण राष्ट्रभक्त - याना चिकन चालते , भगवा लागतो आणि अर्धी चड्डी पण हवी असते - याना टेबला खालून पैसेपण हवे असतात ,संप आणि पगारवाढ पण हवी असते , आणि सर्व धर्म समभाव पण हवा असतो - वेळ आली तर धडाडी दाखवायची सोडून सर्वात मागे लपणारे हेच - फक्त बोलण्यातले शूर शिपाई - रक्त पाहिले कि याना चक्कर येते !

    बाप्पा - हे घे तुझे पैजेचे शंभर रुपये १ पण आता बास ! किती भडीमार करशील त्या

    संघ वाल्यांवर - अरे घुसमटतील ना ते !एका दमात

    इतके बोलता आणि ऐकता येत नाही त्याना !


    आप्पा - अरे मला सांग इतके ठेचले आहे त्याना , पण हे परत परत कसे वर डोके काढतात ?दादर गिरगाव , पुण्यात सदाशिव कोथरूड , सगळीकडे चांगले जोर धरून आहेत - उद्योग धंदा , आणि कारखाने आणि आय टी सगळीकडे बघावे तर ब्राह्मणाच ! परदेशात उच्चपदावर पण आहेतच -याना आरक्षणाचे काहीच वाटत नाही - मजेत आहेत -

    बाप्पा - अरे तीच तर त्यांची एकजूट आहे

    आप्पा - नाहीरे - त्यांच्यात पण भरपूर दुही आहेच , पण आपले अंथरून पाहून ते पाय पसरतात हीच त्यांच्या यशाची गुरु किल्ली आहे

    बाप्पा - नाहीतर आपल्याकडे बघ - ऋण काढून सण साजरे करणे हा तर आपला जन्मसिद्ध हक्कच आहे -

    आप्पा -चला पोटात कावळे ओरडायला लागले - आधी पोटोबा मग विठोबा !

    बाप्पा - हे घे तुझे पैजेचे शंभर रुपये - आज काय मग शिकरण पोळीचा बेत काय ?मज्जा ! !

    आप्पा - पुढच्या वेळेस सोनावानिना भेट तूपण - तू पण जिंकशील पैज ! अच्छा ! !

    ReplyDelete
  2. संजयजी, तेच मुद्दे , तोच पुर्वग्रह ,तोच तीव्र द्वेष आणि जळफळाट आणि तीच ती माणसे. यातून बहुजनांचे काय कल्याण साधणार ? फक्त पुढील काही दशकांची कॉंग्रेस संस्कृती आणि त्यातील सरंजामदार मंडळींची सत्तेची सोय आपण करताहात. थोडक्यात आपल्यासारख्या विद्वानांमुळे महाराष्ट्रात राजकीय बदल तरी पुढच्या काही दशकात अशक्य आणि महाराष्ट्र दिल्लीत लीन दीनच राहणार.

    ReplyDelete
  3. महेंद्र कामत ,

    आपण अजिबात काळजी करू नका ,या लेखकाची कोणतीही पुस्तके वाचण्याच्या लायकीची नाहीत कारण यांचे विचारच पूर्ण विकसित नाहीत आणि यांची झापडे लावून विचार करण्याची वृत्ती त्याना अजूनच केविलवाणे बनवत असते अशी माणसे फार पटकन ओळखू येतात

    आप्पा बाप्पा म्हणतात ते बरोबर आहे

    या सोनावणी ला कसा इतका उत्साह वाटतो या लोकाना उघडे करण्यात तेच काही समजत नाही

    कारण याच्या विचाराना कोणीच मानत नाहीत अगदी ब्रिगेड वाले किंवा कोब्रा किंवा ओबीसी

    तसे पाहिले तर हा माणूस तेच तेच लिहिण्यात धन्य मानतो त्यामुळे याचे लिखाण हे विषयाला धरून नसते - कोणताही मुद्दा आर्य अनार्य प्राकृत - संस्कृत , आणि वैष्णव शैव असा रंगवत त्यात या ब्राह्मण वर्गाला खोटे पाडण्याचा आनंद लुटणे हा या सोनावणीचा जुनाट खेळ आहे

    काहीही झाले कि कोन्ग्रेस वाले जसे यामागे संघाचा हात आहे असे म्हणतात तस्साच हा प्रकार आहे - याना कोणीतरी पगारी सात असल्याशिवाय हे संकुचित आणि पुर्वानुग्रह आलेले लिखाण ते कसे लिहितील ?

    परिमल परचुरे - कल्याण

    ReplyDelete
  4. काही काही संशोधनाचे(?) अस्तित्व फक्त फेसबुक अथवा ब्लॉग पुरतेच मर्यादित असते.

    ReplyDelete
    Replies
    1. देशपांडे सर ,

      आपण वाक्यात अनेक गोष्टी सांगून गेला आहात त्या बद्दल आनंद वाटला

      या माणसाचे म्हणजे सोनावानीचे मी ह मो मराठे वादापासून निरीक्षण करत आहे - सगळेच कसदार वाचू इच्छिणारे - ज्यांनी सेतू माधव पगडी , य दि फडके आणि कुरुंदकर सरदेसाई अशा लेखकांचे विचार वाचले असतील त्याना असला लेखक म्हणजे काय दर्जाचा वाटणार - पण या सोनावानिला समाजात कसे नाही -

      खरेतर त्यांनी अभ्यास पुरा होण्यापूर्वी , तपःश्चर्या पूर्ण होण्यापूर्वी एखाद्या शास्त्रोक्त गायकाने जसे जलसे सुरु करावेत तसे लिखाण चालू केलेले दिसते

      त्यात गुरुचे आशीर्वाद आणि तापाचे तेज दिसत नाही

      त्यामुळे लेखन हा हास्यास्पद भाग होतो आणि त्याचे कौतुक करणारे पण कीव करण्यास पात्र ठरतात - मुळात अशा माणसाने जेंव्हा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहिले त्या वेळेसच त्याना कुणीतरी सांगायला हवे होते की दिल्ली बहोत दूर है - पण याना ?

      हे गुढग्याला बाशिंग नांधुनच निघालेले !

      आणि दुसऱ्याला अपशकून करण्यातच यांच्या करियरचे रहस्य दडले आहे

      सुज्ञास जास्त सांगणे नलगे

      संग्रामसिंह घाटगे

      Delete
    2. @समीर घाटगे, बिघडलास की काय? नाही नाही तू असे लिहिणार नाहीस हे ठाऊक आहे मला. ब्राह्मणी विचार तुझ्या नावावर खपविले जात आहेत, हे मात्र नक्की!

      Delete
    3. @संग्रामसिंह घाटगे अर्थात समीर घाटगे????

      बामनाचा कुपुत्र????

      Delete
  5. सोनावणी ,

    आपणास संघाचा राग असणे समजू शकते कारण आपल्याला संघ काय तेच माहित नाही त्याबद्दल कुणी तुम्हाला दोष देणार नाही

    बाबरी मशीद पाडली त्यावेळेस आपण तिथे हवे होतात

    तो जनसागर काहीही करू शकला असता - पण अजिबात दंगल न होता ,कुठेही जाळपोळ न होता मशीद उतरवली गेली - इतक्या शांततेने आपली मंदिरे पाडली गेली आहेत का इतिहासात ?

    तुळजापूरची देवी असो किंवा पंढरपूर असो - आपल्या नशिबात काय होते ते झाले असे समजून संघ गप्प बसायला तर सांगत नाही - तो सर्व समाजाला जागे करून इतिहासातला भ्याडपणा संपवून शांततेने इतिहास घडवायला सांगतो

    म गांधीनी जितक्या शांततेने आंदोलन केले असते तितक्याच शांततेने हे घडले

    मशीद पाडणारा प्रत्येक माणूस संघवाला नव्हता किंवा ब्राह्मण नव्हता - ते हिंदू होते - शेकडो वर्षे अपमानित झालेले हिंदू ज्याना स्वतंत्र अस्मिता मिळाली होती

    झापड लावलेल्या तुमच्या सारख्याना संघ कधीही कळणार नाही

    संघ कधीही संपणार नाही हे सत्य आपण स्वीकारा असे सांगावेसे वाटते

    दुसरे एक सांगलीकर आपले मित्र आहेत त्यानापण हीच विनंती

    झेपत नसेल तर लांब राहा दुफळीचे राजकारण करून धर्म आणि राष्ट्र बुडवू नका

    आदित्य सांगलीकर

    ReplyDelete
  6. ब्राह्मण युवकांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात. घाणेरडे धर्मग्रंथ जाळण्याची मोहीम राबवावी. सत्यनारायण, नारायण नागबळी, अभिषेक, अत्यंत खोट्या पूजा, नव-नव्या ब्राह्मणी कथा, चुकीचे लिखाण, इतिहासाचे विकृतीकरण, बहुजन महापुरुषांची बदनामी हे सारे बंद करावे. त्यात सहभागी होणाऱ्या ब्राह्मणांवर बहिष्कार टाकावा. ब्राह्मण युवकांना आमचे नम्र आवाहन आहे त्यांनी विचार करून कृती करावी.

    १. रामदासी कर्मठ ब्राह्मणांनी बहुजन हिंदू युवकांना खोट्या दंगली करायला लावून मुसलमानांविरुद्ध भडकावणे बंद करा.
    २. मंदिर-राम मंदिर, बाबरी माशीद्वाद बंद करून उत्तम दर्जाचे शैक्षणिक संकुल निर्माण करावे. सर्व एक व्हावे. हाई टेक व्हावे. बहुजनांनाही सोबत घ्यावे.
    ३. भारतातील मंदिरांत सर्व जातींच्या लोकांमधून पुजारी नेमावेत. ते पगारधारी असावेत. स्त्री-पुरुष समानता असावी. स्त्रियांना कुठेही बंदी नसावी.
    ४. पंढरपूर विठ्ठल मंदिरातून बडवे-उत्पात त्वरित हाकलावेत.
    ५. शुभ-अशुभ, पाप-पुण्या, स्वर्ग-नरक, मृत्यू-तिन्ही लोक, देव-परमेश्वर, इत्यादी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आंदोलन करणे.
    ६. शिवधर्म, बौद्ध धम्म, इस्लामधर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म ह्या सर्व धर्माबाबत समाजास सत्य माहिती द्यावी. हिंदू धर्म व त्याचे अधिकृत साहित्य समाजासमोर येवू द्यावे. धार्मिक वाद करू नयेत. सुरक्षितता व शांतता स्थापित व्हावी.

    भारतातील आजच्या तरुण पिढीतील ब्राह्मण युवक-युवती यांनी आजचा सामाजिक अभ्यास करावा. जे चाललंय ते समजून घ्यावे. एकाच वेळी देशभरातील सर्वच बहुजन समाजातील अभ्यासू-जागृत लोक काही ब्राह्मनांविरोधी भूमिका मांडत असतील तर त्यावर विचार करावा.

    ReplyDelete
  7. रा. स्व. संघ आणि विध्वंस!

    एखाद्याला संघ परिवाराबद्धल अवास्तव अभिमान असल्यास विध्वंसाकडे त्यांची डोळेझाक होणार हे ओघानेच आले. काही प्रमुख विध्वन्सांची नोंद येथे घेणे योग्य ठरेल.

    □ धार्मिक शिक्षण देण्याच्या मिषाने मुलांमद्धे पाद्दत्शीरपणे चातुर्वर्ण ओतण्याचा प्रयत्न केला. परधर्मद्वेषापोटी विकृत इतिहास शिकविला आणि तसा प्रयत्न अविरत चालू आहे.

    □ मुस्लीम -ख्रिश्चनांचा परमोच्चद्वेष म्हणजे हिंदू धर्मप्रेम हा अजब सिद्धांत संघवाल्यांनी स्वीकारल्यामुळे प्रतिक्रियावादी बनलेला तरुण हिंदू धर्माच्या कथित आणि पढिक प्रेमापायी परधर्मद्वेष्ठा बनतो.

    □ संघाचे स्वयंसेवक एक धार्मिक कृत्य म्हणून संघाच्या संघटनेकडे पाहतात आणि तन-मन-धन खर्ची घालतात. ते राष्ट्र उभारण्यासाठी नव्हे, तर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी. देशापेक्षा धर्म मोठा असे शिकवल्यास असेच घडणार.

    □ रा. स्व. संघ निश्चितपणे हिंदू-धर्मांधतेचे प्रतिनिधित्व करतो, नव्हे धर्मांधता हाच संघाच्या राजकारणाचा मूळ उद्देश आहे. त्याच दृष्ठीने लाखो हिंदूंना धार्मिक प्रश्नाच्या दावणीला बांधले जाते.

    □ हिंसा हा संघाचा स्थायीभाव आहे. हिंसा हि संघीष्ठांच्या नसानसात एखाद्या जहरी विषासारखी भिनलेली आहे. ‘मशिदी उखडून लावणे’ हे त्यांचे लाडके स्वप्नरंजन असते.

    □ महात्मा गांधींचा खून करणारा गोडसे (तथाकथित माथेफिरू ) हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक होता. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

    □ राखीव जागाविरोधी आंदोलन पेट घेते तेंव्हा रा. स्व. संघ समाज्यात ढोंगीपणे वावरताना दिसतो. अशावेळी संघ हिंदुत्ववादाला अनुसरून भूमिका घेताना दिसत नाही व दिसला नाही.

    प्रमोद शिंत्रे (इगतपुरी-नाशिक)

    ReplyDelete
  8. स्वयंसेवकांनो, कोणत्या संस्कृतीचे गोडवे गाता?

    स्वयंसेवकांना पुढील प्रमाणे आवाहन करावे, असे वाटते.

    'स्वयंसेवकांनो, तुमच्या गर्वात भंपकगिरी आहे. क्रूरता, धर्मांधता आणि चार्तुवर्ण्याचे तसेच जातीव्यवस्थेचे समर्थन तुमच्या गर्वात अध्याहृत आहे.
    या गर्वात कुठलीही मानवतेची हाक नाही, प्रेमाचा अंश नाही. अभिमान हा शेवटी धर्मविरोधी असतो. आणि गर्वाचे म्हणाल तर छोटी मुलेही ओरडतात कि, गर्वाचे घर खाली. तोच गर्व तुम्ही कपाळी लावता. तुम्हाला अखेर झाले आहे तरी काय? हिंदूंनी गर्व करून घेण्यासारखे काहीही नाही. ज्या ज्ञानेश्वरांना तुम्ही संत म्हणून बोलबाला करता; त्याच ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना तुमच्या वर्ण वर्चस्ववादी पूर्वज्यांनी जलसमाधी घ्यायला लावली आहे. तेच आज ज्ञानेशाची स्तुती करीत आहेत. कोणाला माहित ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, कि त्यांचेही काही बरे -वाईट केले?
    तुमचा धर्म खरेच छान आणि महान आहे काय? तुम्ही बदलायला पाहिजे. अत्याधुनिक वेशभूषा केली आणि इंग्रजी बोलायला आले कि, तुम्ही आधुनिक म्हणून गणले जाणार नाहीत. आपल्या धर्माची तुम्ही कठोर चिकित्सा करायला हवी. आपला सगळा इतिहासच पराभवांचा, मानभंगाचा आणि क्रूरतेचा आहे. शूद्रांना गावकुसाबाहेर ठेवणारी आमची संस्कृती महान असूच शकत नाही आणि याच संस्कृतीचे गोडवे गाणारा धर्म आणि देशही महान बनू शकत नाही. हे तुम्हाला बोचणारे आहे, पण खोट्या दंभाने स्वतःची पाठ थोपटून घेण्यात कुठले हशील आहे? तुम्हाला धर्मच हवा असेल, तर फक्त स्वतःच्या हृदयाला विचारा, तुमच्या हृदयातून येणारा तुमचा धर्म असेल!’

    विवेक (सिडको-औरंगाबाद)

    ReplyDelete
  9. सावरकरांचा माफीनामा

    भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो लोकांनी ब्रिटीशांच्या गोळ्या खावून देशासाठी आपला जीव दिला. हजारो तरूण फासावर चढले. या फासावर चढणार्‍या वा जन्मठेप भोगणार्‍या तरूणांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर तर त्यांची फासी /जन्मठेप टळली असती. पण तसे कोणी केल्याचे ऐकिवात नाही. अपवाद फक्त एकच - वि.दा. सावरकर हे लेखक. त्यांनी आपल्या लेखकीय भाषेत इंग्रजांकडे दयेची भीक मागीतली. त्यांच्या त्या ऐतिहासिक माफीनाम्याचा मुख्य भाग वाचा त्यांच्याच शब्दात:

    "मी घराबाहेर पडून घडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरंगातून सुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी असणार्‍या ब्रिटिश सरकारने माझी सुटक केली तर इंग्रज सरकारच्या घटनात्मक प्रगतीचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरीकच) तुरुंगात आहोत तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलीत आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणार्‍या सरकारचा जयजयकार करील."


    "एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील."


    "माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्याविशी वाटेल त्या पद्ध्तीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटीश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?"


    १४ नोव्हेंबर १९१३


    सावरकरांचा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काईव्हज मध्ये सुरक्षित असून तो सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशितही करण्यात आला आहे. सावरकरांनी असे एकूण सहा माफीनामे लिहिले होते! असा माणूस स्वातंत्र्यवीर कसा काय असू शकतो? त्यापेक्षा त्याला माफीवीर ही पदवीच शोभून दिसते!

    संदर्भ:
    माफीवीर सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, जिजाई प्रकाशन पुणे
    उंडो सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, मूळनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट, पुणे
    मुंबई चौफेर, ५ मे २००२
    http://www.hinduonnet.com/fline/fl2207/stories/20050408001903700.htm

    ReplyDelete
    Replies
    1. शिवाजी अहाराज तर अनेक वेळा मोघलाना आणि दक्षिणेतील बहामनी शाह्याना - ज्या गनिमी काव्याने खेळवत तसेच काहीसे त्यांचे वागणे होते असा पण विचार केला जाऊ शकतो -

      मी तुमचा चाकर आहे असे लिहून लगेच नंतर हल्ला करणे हे कसब आहे -

      सावरकर यांच्या समोर शिवाजीचे उदाहरण असणार - शरद पवारांचे खुर्चीला चिकटून बसण्याचे नक्कीच नाही

      सर्व भारतभर गुप्त जाळे विणून त्यांनी अनंत यातना सोसून सशस्त्र चळवळीला प्रोत्साहन दिले

      त्याना इतके मोठे शासन दिले ते इंग्रज काही वेडे नव्हते -

      साखळ्या घालून चक्की पिसण्या सारखी शिक्षा सोसणे - आणि तेपण देशासाठी - हे साधे काम नाही -आपल्या कोन्ग्रेस संस्कृतीत तर ते अजिबात न झेपणारे आहे - इथे चक्री उपोषण नावाचा लावलेला शोध तर अजब आहे - समाजवादी ,कोन्ग्रेस आणि भाजपा असले उपोषण करत असतात -सगळे या बाबतीत एकापेक्षा एक भोंदू !

      तो काळ तत्वांचा होता - म गांधीपण वीर सावरकरांचा आदर करत होते - क्रांतीकारकांची फाशीची शिक्षा म गांधी आपले वजन वापरून कमी करू शकले असते - पण देशभक्ती पेक्षा त्याना आपला प्रतिमेचा आणि अहिंसेचा मुद्दा महत्वाचा वाटला हे कुणीच सांगत नाही -तिथे म गान्धीपण चुकलेच !

      खरेतर मुंबईचे नाविकांचे बंड यामुळे इंग्रजांचा पाया ढासळला - त्याना थोडी उसंत मिळाली असती तर त्यांनी भारताला स्वातंत्र्य अजिबात नाकारले असते

      नाविकांचे बंड हे भारतीय स्वातंत्र्य जवळ आणण्यास महत्वाचे ठरले

      स्वातंत्र्य नुसते अहिंसा आणि कोन्ग्रेस मुळे मिळाले असे मत बनवणे म्हणजे इतिहासाशी प्रतारणा करणे होय !

      वीर सावरकर , भगतसिंग सुभाषचंद्र बोस असे अगणित सशस्त्र विचारसरणी असलेले नेते यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये इतकेच सुचवावेसे वाटते

      Delete
  10. सांप्रदायिकता

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और आतंकवाद

    आतंकवाद को एक भयावह घटना के साक्ष्य के रूप में देखा गया है। और खासकर आज के मौजूदा समय में। आतंकवाद क्या है, यह अपने आप में ही एक स्तर पर विवाद का विषय है और दूसरे स्तर पर आतंकवाद की परिभाषा व्यक्ति दर व्यक्ति, समूह दर समूह और देश दर देश बदलती रहती है।
    कहा नहीं जा सकता कि आखिर अमेरिका स्थित आतंकवाद अनुसंधान केंद्र ने, जो कि इस विषय पर अमेरिकी थिंक टैंक (विचार-विश्लेषण समूह) है, इस मुद्दे को किस तरह से कसौटी पर कसा, लेकिन उसने राष्ट्रीय स्वयं सेवक संघ, जो कि भाजपा, विहिप, बजरंग दल आदि हिंदू संगठनों का पिता है, पर आतंकवादी संगठन का ठप्पा लगा दिया है।
    संघ को विश्व के अन्य हिस्सों में बदनाम संगठनों जैसे अल कायदा, लश्कर-ए-तय्यबा, हमास आदि की श्रेणी में रखा गया है संघ की आतंकवादियों के बारे में परिभाषा और समझ को गुजरात के मौजूदा मुख्यमंत्री और आर.एस.एस प्रचारक नरेंद्र मोदी ने इस प्रकार व्याख्यायित किया : ‘‘सारे मुसलमान आतंकवादी नहीं हैं, किंतु सारे आतंकवादी मुसलमान है।’’ ऐसा कैसे हुआ कि मुसलमानों के खिलाफ आग उगलने वाले संगठन पर खुद ऐसा ठप्पा लग गया।
    ऐसा लगता है कि आतंकवाद से संबंधित प्रचलित विभिन्न परिभाषाओं में से उस एक को इस केंद्र ने आधार बनाया है, जो कि राजनीतिक लक्ष्य प्राप्ति के लिए मासूम लोगों की जान लेता है। यह कहना जरूरी नहीं है कि इस परिभाषा में सामान्यतः सरकारें शामिल नहीं हैं। पिछले दिनों कुछ देशों को आतंकवादी कहा गया है और भारतीय जनता पार्टी अमेरिका से आग्रह करती रही है कि पाकिस्तान को आतंकवादी राष्ट्र घोषित किया जाए। कुछ देशों को अमेरिका ने खुद आतंकवादी देशों की सूची में डाला हुआ है। हम राज्य की हिंसा और उसके लक्ष्यों की यहां चर्चा नहीं करेंगे, जो कि काफी जटिल मामला है। हम आतंकवाद को परिभाषित करने वालों के पक्षपात पर भी बात नहीं करेंगे। सीमित रूप में हम ‘राजनीतिक लक्ष्यों के लिए मासूम लोगों की हत्या करने’ की परिभाषा पर बात करेंगे। हम यह देखने की कोशिश करेंगे कि अमेरिका स्थित इस केंद्र का मूल्यांकन सही है या नहीं।
    CONT.........

    ReplyDelete
  11. यहां यह समझना आवश्यक है कि आतंकवाद लक्ष्य-विशेष वाले समूहों की विचारधारा से पैदा होता है। यह समझना और भी अहम है कि वे सभी, जो उस विचारधारा और लक्ष्य को निर्मित करते हैं, जो कि हिंसा की ओर ले जाती है, आतंकवादी है या वे ही असली आतंकवादी हैं। और यदि दोष का बंटवारा किया जाए तो जो तलवार, गोलियां या ए-के-47 का इस्तेमाल करते हैं या जो डब्लू.टी.सी पर विमान जा टकराते हैं या इसी तरह की अन्य कार्यवाई करते हैं, उन्हें ज़्यादा ज़िम्मेदार माना जाना चाहिए। निश्चय ही राष्ट्रीय स्वयं सेवक संघ के प्रचारक कभी किसी को मारने के लिए व्यक्तिगत तौर पर हथियार नहीं उठायेंगे। यहां तक कि संघ की शाखाओं में प्रशिक्षण मात्र लाठी व डंडा चलाने के लिए दिया जाता है। हां, समय से ताल मिलाते हुए संघ की संतानों, बजरंग दल और दुर्गा वाहिनी ने बंदूकों का प्रशिक्षण तथा विहिप ने त्रिशूल रूपी छुरों का हजारों की संख्या में वितरण करना शुरू कर दिया है, लेकिन संघ की शाखाओं में इस पर सख्त मनाही है। लाठी चलाने के अलावा प्रशिक्षण का दूसरा हिस्सा बौद्धिक है। यह प्रशिक्षण अल्पसंख्यकों के खिलाफ जहर उगलने, धर्मनिरपेक्ष व लोकतांत्रिक मूल्यों के खिलाफ नफरत फैलाने पर आधारित है। वह यहां तक कहता है कि हिंदुओं के इस देश में, अन्य यानी मुसलमान और ईसाई विदेशी हैं। इसके अलावा कम्युनिस्ट, मुसलमान और ईसाई हिंदू राष्ट्र के लिए आंतरिक खतरा हैं।
    नफरत का जहर हर समुदाय के लिए बना-बनाया है। मुसलमानों की तुलना यवन सर्पों से की गयी है।

    ReplyDelete
  12. CONT..........
    प्रोफेसर बिपन चंद्रा, शाखा में प्रशिक्षण में क्या होता है, इसको सुनने का अपना अनुभव बताते हैं। रोज सुबह टहलते हुए उन्होंने शाखा में जाने वाले लड़कों को यह बतलाया जाते हुए सुना है कि मुसलमान सांप की तरह होते हैं। सपोले को मारना, सांप को मारने से आसान होता है। इस बौद्धिक अभ्यास का संदेश बिल्कुल साफ है। नफरत की यह प्रेरणा और पद्धति नाजी जर्मनी से लिए गए है।
    संघ के सिद्धांतकार गोलवालकर ने इसको कुछ इस तरह से व्याख्यायित किया हैः ‘‘जर्मनों का नस्लीय गौरव आज जीवंत विषय बन गया है। देश की शुद्धता और संस्कृति को बचाए रखने के लिए जर्मनी ने सेमेटिक नस्लों-यहूदियों का, देश से सफाया कर दुनिया को स्तब्ध कर दिया है। यह राष्ट्र गौरव का चरम है। जर्मनी ने यह भी दिखला दिया है कि आधारभूत तरीके से भिन्न नस्लों का समिश्रण होकर एक होना असंभव है। हम हिंदुस्तानियों के लिए यह एक अच्छा पाठ है, जिसे हमें सीखना चाहिए और उसका फायदा उठाना चाहिए।’’
    (एम.एस.गोलवलकर, वी एंड अवर नेशनहुड डिफांइड, नागपुर 1938, पृष्ठ-27)
    कभी आश्चर्य होता है कि क्या वास्तव में आर.एस.एस इस पर विश्वास करता होगा। पर स्तब्ध करने वाली बात यह है कि संघ के एक वरिष्ठ सिद्धांतकार ने एक बातचीत के दौरान कहा कि अगर गांधी जैसा कद्दावर व्यक्ति ‘मुस्लिम समस्या’ को हल नहीं कर पाया तो आज के छुटभैये छद्म धर्मनिरपेक्षतावादियों से क्या होने वाला है! उसके अनुसार (और प्रत्यक्षतः संघ के अनुसार) इस समस्या का एक ही हल है, जो ‘अंतिम समाधान’ के रूप में जाना जाता है। यह नफरत की विचारधारा है, जो बाल प्रशिक्षुओं के दिमाग में कूट-कूट कर डाल दी जाती है, और यही वह आधार है जिस पर सांप्रदायिक हिंसा की नींव पड़ती है। आर.एस.एस. की विचारधारा सबसे पहले जिस रूप में साकार हुई, वह थी गोडसे द्वारा गांधी की हत्या। जाहिर है कि संघ ने कभी भी इस तथ्य को स्वीकार नहीं किया कि गोडसे आर.एस.एस प्रशिक्षित था और हिंदू महासभा में शामिल होने से पहले संघ का प्रचारक था। उसके भाई गोपाल गोडसे ने अपने अलग-अलग साक्षात्कारों में बार-बार कहा है कि उसने और नाथूराम ने संघ कभी नहीं छोड़ा था।

    ReplyDelete
  13. CONT..........
    सांप्रदायिक हिंसा पर जांच आयोगों की अधिकतर रिपोर्टों (जस्टिस रेड्डी, वितयातिल, वेणुगोपाल, मदान आदि) में यह बात स्पष्ट रूप से सामने आयी है कि हर हिंसक वारदात में किसी ऐसे संगठन की भूमिका रही है जो या तो संघ से संबंधित था या फिर किसी प्रचारक द्वारा चलाया जा रहा था। रणनीति एकदम साफ है। संघ स्वयं सेवकों को प्रशिक्षित करता है जो उसके काम को किसी अन्य संगठन से जुड़कर या कोई अलग संगठन बनाकर आगे बढ़ाते रहते हैं। इस रणनीति का फायदा यह है कि दंगों का दोष सीधा संघ पर नहीं लग सकता।
    यह बात याद करने लायक है कि 1937 के चुनाव में धर्म का वास्ता देकर भी चुनाव न जीत पाने के बाद मुस्लिम लीग और हिंदू महासभा ने, दूसरे-से-नफरत-करो की अपनी मुहिम तेज कर दी थी। नफरत के ये जहरीले बीज इस दौरान सक्रिय रहे और इनमें 1980 के बाद फल लगने लगे। यह दूसरे-से-नफरत-करो की विचारधारा अलग-अलग कनवेयर बैल्टों से गुजरती है और इसका आखिरी पड़ाव वहां पड़ता है जहां भोले-भाले गरीब समुदाय नफरत की विचारधारा के नशे में धुत, जो कि इच्छित परिणाम के लिए धर्म की भाषा में लपेट कर पिलाई जाती है, हथियार उठा लेते हैं।
    हर आतंकवादी संगठन का अपना ही एक एजेंडा होता है अल कायदा को सी.आई.ए. द्वारा वाया पाकिस्तान प्रशिक्षित किया गया ताकि वह अफगानिस्तान पर समाजवादी रूस के कब्जे को उखाड़ सके। तमिलों पर सिंहलियों के प्रभुत्व की प्रतिक्रिया लिट्टे के रूप में हमारे सामने है। खालिस्तान सिख समुदाय की आर्थिक और सांस्कृतिक आधार पर गहरी असंतुष्टि की प्रतिक्रिया था। उल्फा भी जातीय समस्या को असंवेदनशील तरीके से हल करने की अभिव्यक्ति है। संघ और लीग, विभाजन के पहले, सामंतवादी तत्वों के भय की अभिव्यक्ति थे। क्योंकि उन्हें लगता था कि आधुनिक शिक्षा, औद्योगिकरण, आजादी, समानता तथा भाईचारे के मूल्य, संघर्षरत जनता की मुख्य विचारधारा बनते जा रहे हैं, उनके मूल्य और मान्यताओं के लिए खतरा बनते जा रहे हैं। दूसरे, मध्यवर्ग का यही डर, अस्तित्व को लेकर चिंता, संघ की राजनीति में एक निश्चित रूप ले चुकी है। और दलितों और महिलाओं का सामने आना स्वयं के लिए सामाजिक और लैंगिक न्याय की मांग करना है।

    ReplyDelete
  14. गूढ़ सामाजिक एजेंडा कुछ भी हो, संघ के काम के तौर तरीके और प्रणाली, विहिप, बजरंग दल और दुर्गा वाहिनी जैसों को बढ़ावा देते हैं। संभवतः संघ की कार्यप्रणाली के गतिविज्ञान की इसी गहरी समझ के चलते इस अनुसंधान केंद्र ने उसे आतंकवादी संगठन बतलाया हो।
    आर.एस.एस का प्रशिक्षण दुतरफा होता है। एक है शारीरिक, खेल वगैरह। दूसरा है बौद्धिक। यह जो दूसरा प्रशिक्षण है वह अपनी संतानों को प्रेरित करता है कि वे लोगों को हथियार उठाने को भड़काएं और ‘दूसरों’ यानी ‘दुश्मन’ को बेदर्दी से कत्ल करें। किसी भी हिंसा या दंगे की चीरफाड़ बहुत ही दिलचस्प और जटिल होती है। कैसे एक आम दलित, आदिवासी, खाली पेट और अनिश्चित भविष्य वाला मजदूर आर.एस.एस के एजेंडे के सिपाही के रूप में परिवर्तित हो जाता है, यह ऐसा पेच है जिसे समाज-विज्ञानियों को समझना होगा। हो सकता है कि आर.एस.एस प्रचारक जब बैठकर धैर्यपूवर्क ‘हिंदू मूल्यों’, ‘हिंदू राष्ट’ª पर चर्चा कर रहा हो, तो आर.एस.एस विचारधारा जनसंख्या के एक हिस्से को मासूमों को मारने के लिए और हिंसा का तांडव मचाने के लिए अपनी गिरफ्त में ले रही हो। इससे संघ हिंदुओं के एक हिस्से को आर.एस.एस के साथ करने का राजनीतिक लक्ष्य तो प्राप्त होता ही है। यह उनकी सत्ता में वापसी या उसकी अपनी ताकत को और मजबूत करता है। जिस परिभाषा से हमने शुरू किया था वह थी सत्ता या राजनीतिक एजेंडा के लिए मासूमों की हत्या करना आतंकवाद है और आर.एस.एस का काम ठीक यही है।
    कभी-कभार ऊपरी तौर पर उलझन पैदा कर सकता है कि जैसे ओसामा या विश्व के विभिन्न हिस्सों में एके-47 चलाने वाले आतंकवादियों के विपरीत आर.एस.एस के स्वयं सेवक चुप्पी की मूर्ति नजर आते हैं। और आर.एस.एस के अभियान का यह सबसे ज्यादा चातुर्य से भरा तथा धूर्ततापूर्ण हिस्सा है। स्वयं बिना हथियार उठाए अल्पसंख्यकों को पिटवाना तथा मरवाना और अपने लक्ष्य को पाना। हिंसा सामाजिक और मनोवैज्ञानिक चालबाजी के जरिए दूसरे लोगों के जिम्मे छोड़ दी जाती है। यूं समझिए कि एके-47 निशाना चूक सकता है किंतु आर.एस.एस द्वारा प्रचारित नफरत की विचारधारा द्वारा सक्रिय और जहर भरे गए दिमाग कभी न कभी, कहीं न कहीं, हिंसक बनकर निकलेंगे ही, सवाल मात्रा समय का है। इस संगठन ने आतंकवादी लक्ष्यों के लिए बड़ी चालाकी से संस्कृति का एक झूठा लबादा धारण कर रखा है। यह आतंकवादी संगठन एक पत्थर से कई शिकार करता है, ये चिड़ियाएं हैं समाज के कमजोर वर्ग और अल्पसंख्यक समुदाय। यह ज़ाहिर है कि इस अनुसंधान केंद्र की सूची से आर.एस.एस के नाम को हटाए जाने के लिए काफी हो-हल्ला मचाया जाएगा पर भारत के अल्पसंख्यकों के बड़े हिस्से और समाज के कमजोर वर्गों के लिए आर.एस.एस की संस्कृति आतंकवाद ही है।
    ................................................................................................................

    ReplyDelete
    Replies
    1. प्रोफेसर विपिनचन्द्र जैसे नक्सल समर्थक मार्क्सवादी लोग संघ के बारे में क्या कहते है उनके लिए इतना ही कहना है कि मार्क्स के चाहनेवालो ने विश्व के सबसे भीषण नरसंहारों को जन्म दिया. जोसेफ स्टालिन ने रशिया के अपने शासनकाल में लगभग ७० लाख लोंगो की जानें ली तो माओत्से तुंग ने साढ़े पांच करोड़ लोगों के रक्त से चीन की सांस्कृतिक क्रांति का रक्ताभिषेक किया. पोलपोट ने कम्बोडिया में कम से कम बीस लाख लोगों का सफाया कर दिया तो उत्तरी कोरिया में किम सुंग द्वितीय ने कम से कम १७ लाख लोगों को यातना ग्रहों में मरने के लिए मजबूर कर दिया. और दुर्भाग्य से यह सारा कुछ उन गरीबों के नाम पर किया गया जिनके हालात बद से बदतर होते चले गए. उन अभागे लोगों से उनकी आस्थाएं छीन ली गयी, उनके मंदिर नष्ट कर दिए गए और उनके भगवानों के स्थान पर अपने नेताओं के स्मारक खड़े किए गए. आज भी दुनिया में सबसे ज्यादा हत्या कौन कहाँ पर कर रहे है? क्या वहाँ पर भी संघ वाले मौजूद है? आज भी २२ भाषाओं. सात विश्वस्तरीय धर्मो और तिन हजार जातियों के बाद भी यदि यह देश एकजूट है तो क्या संघ द्वारा फैलाये गए दंगो के कारण है?
      आजादी के बाद भारत के सबसे बड़े दंगे भारत पाकिस्तान सीमा पर हुए जिसमे ३० लाख लोफ़ मारे गए और उसके बाद सबसे बड़ा नरसंहार दिल्ली में १९८४ में हुआ जिसमे ३ हजार सिख मारे गए. क्या इनमें संघ का हाथ था? प. बंगाल में पिछले ३० सालों में लगभग ५५ हजार राजनैतिक हत्याएं हुयी है. क्या वहां संघ कार्यरत था?
      मैं संघ का समर्थक नहीं हूँ. किन्तु संघ विरोधियो का पक्षपात पूर्ण प्रलाप मजबूर कर देता है कि हम विश्व के बाकि हिस्से में क्या चल रहा है यह भी देखे. आज भी जम्मू कश्मीर से हिंदू पलायन कर रहे है. क्या वहाँ पर संघ सरकार में है? भारत के किसी भी शहर से मुस्लिम पलायन या ईसाई पलायन का कोई समाचार नहीं है. क्या आप इसे संघ की असफलता कहेंगे? संघ के विरोधियो को यह भी देखना चाहिए कि संघ नहीं होता तब ही भारत को वे खतरे झेलने ही पड़ते जो उसे आज झेलने पड़ रहे है. आतंकवाद और धर्मांधता केवल भारत का आंतरिक मामला नहीं है. जब तक पैसो और तलवारो के बल पर लोगों की आस्थाएं बदली जाती रहेगी तब तक संघ हो या कोई और समूह, वह अतीत का गौरव याद दिलाने का काम करता ही रहेगा.
      दिनेश शर्मा

      Delete
  15. Sanjyji ,
    I hope the event at which you and Mr. Dyanesh Mahrao gave speeches is videotaped. Please share the video on YouTube or if it is already there please share the link.
    Abhay Tarange

    ReplyDelete
  16. SHOSHAN fukt MANUSMRUTI mule zale ase manane murkhapanache

    ahe. Nahitar LAXMAN MANE sarkha AMBEDKARI mhanawanara dalit

    mahilanwar bakatkar karato,mhanun Ambedkar wad chukicha mhanawe

    lagel.

    SANJAY SONAWANI YA sarakhe lekhak(?) prasiddhisathi wa Rajakarani

    sarnjam-daranchya krupesathi asale wad khelat astat.

    AJUN 100 WARSHANE GNYANESHWAR ASATILCH,PUN SONAWANI

    SARKHYANCHE NAW SUDDHA SAMAJ LAKSHAT THEWANAR NAHI.

    ReplyDelete
  17. म. फुलेंची "एकमय समाज" व बाबासाहेबांची "सामाजिक लोकशाही" संकल्पना आम्हाला कोणाचेही वैरी होऊ देत नाही...........................far chhan..............
    prakash pol sahyadribana.com

    ReplyDelete
  18. " चंद्रकांत वानखेडे यांने अत्यंत समर्पक शेवट केला. ते म्हणाले, भारतात मुस्लिमांनी सातशे वर्ष राज्य केले...त्यांना हा देश इस्लाममय करता आला नाही."

    Is this true ?Whether RSS is right in creating fear or not is debatable issue.

    But today's Pakistan and Afaganistan ( in part ) was once part of India ( Hindustan ) and was follower of Hindu religion ( and Buddhism , Vaidik ,Shaiv ). But was sure not a Muslim land. Same hold true for Bangla Desh.
    Sanjayji : please comment.

    ReplyDelete
  19. भंडारींनी मांडलेला मुद्दा बरोबर होता. ’ संघाला समजुन घ्यायचे असेल तर काही काळ तरी संघात जायला हवे’ . बाहेर राहुन ऐकीव आणी वाचीव माहितीवर आधारीत मत बनवणे सोपे आहे. आणि संघावर टीका करणे तर एकदम सोपे आहे. तसे केले की आपण पुरोगामी असे सिद्ध होते असा एक समज आहे.
    आणि जर हिटलर आदर्श असेल तर त्यात वावगे काय आहे? हिटलरचे अत्याचार हे आदर्श नाहीत. इंदिरा गांधींनी सुद्धा हिटलरच्याच पावलावर पाऊल ठेउन राजकारण केले. आणि त्यात त्या यशस्वी सुद्धा झाल्या. फक्त त्यांनी कुठेही असा उल्लेख केलेला नाही. आणि आज जर कुणी अशी तुलना केली तर त्याला दगडाने ठेचला जाईल.
    पण शेवटी एक मान्य केले पाहिजे की हिटलरने जर्मन युवकांमधे राष्ट्रधर्म जागृत केला. जर्मनीचा उदय झाला. आज असे करु शकणारे कोणी भारतात आहे का?
    आज आपल्यात माणसाला चांगला नागरिक बनवण्य़ाची कुठलीही संस्था नाही. कुठल्याही शाळा, विद्यालयात किंवा अभ्यासक्रमांत ते शिकवले जात नाही. संघ हीच एक विचारधारा आहे जी माणसाला एक चांगला नागरिक बनवते. केवळ असे शिक्षण नसल्याने आज सगळीकडे स्वैराचार बोकाळला आहे. मी आणि फक्त माझे कुटुंब ! बस दुसरा विचार नाही. कुठेही मला फायदा कसा होईल हाच विचार दिसतो. मग देश, समाज गेला xxxxत.
    शेवट परत एकदा :
    ’ संघाला समजुन घ्यायचे असेल तर काही काळ तरी संघात जायला हवे’

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...