Friday, November 8, 2013

जीवन फार सुंदर आहे...!

जीवन फार सुंदर आहे
ते मी करीत असलेल्या
जीवनावरील अथांग प्रेमामुळे
आणि माझ्या भावनांमुळे
माहित आहे मला
मृत्युच्या महाकाशाच्या पार्श्वभुमीवर
हेलकावे घेत असलेला
हा जीवन-बुडबुडा
फुटेल कोणत्याही 
फसव्या क्षणी
अनंतात विसावण्यासाठी
पण तरीही
मी जीवनावर अपार प्रेम करतो...
सर्वांच्याच! 

मी जगत गेलो
त्याचेच गाणे बनत गेले
मी चालत गेलो
महारस्ते बनत गेले
मी वाईटाला वाईट म्हणत गेलो
निर्भयपणे
चांगले ऋतू फुलू लागले...
मी माणुस बनायचा अविरत 
प्रयत्न करत राहिलो
माणुसकीचे मळे सर्वत्र 
डोलतांना दिसू लागले...
...
सर्वांनी 
बनावे असेच
एक दिवस
प्रार्थनेला
उगवत्या सुर्याचे दिवस 
दिसू लागले!

(आणि खात्री आहे मला...
येईल असा एक दिवस
कारण आशा अजरामर आहेत
आणि माणुसकीचे हुंकार 
अजून विझलेले नाहीत!)

18 comments:

 1. संजयजी

  आम्ही तुम्हाला एक श्रेष्ठ कवी मानतो

  मागच्या वेळेची कविता हृदयाचा ठाव घेणारी होती

  क्षमा करा पण,ही कविता नाही

  भेळेच्या फाटक्या कागदावरच्या सापडलेल्या काही लिखाणाच्या नकला आहेत या !

  कोणतेही संदर्भहीन लिखाण असते तशा !

  अगदीच निराशाजनक -

  तुम्ही कविता करू नका ना गडे !

  हो ना गडे !

  परिणीता धायगुडे

  ReplyDelete
 2. Sanjay Sir ,

  anek paane lihun aaani kityek taasaanche chintan Karun je aapalyaa lekhanitun utarel te aapan lilayaa kaahi olimadhe shabd baddh kele aahe !

  hi kavitaa vaachane haa aapalyaa pratyek

  kavite pramaane avismaraniy anubhav hota

  abhinandan !

  sudam navale

  ReplyDelete
 3. सर,

  अतिशय सुंदर कविता आहे

  मी जगत गेलो आणि त्याचेच गाणे बनत गेले

  आणि शेवट,

  माणुसकीचा हुंकार अजून विझलेला नाही

  या आशावादी ओळी मोठा संदेश देतात कि

  जीवनावर प्रेम करणाऱ्या माणसाला मृत्यू घाबरवू शकत नाही

  आपण असेच लिहित रहा असे सांगावेसे वाटते

  खरेतर आम्हाला कधी कधी आपण काय लिहित आहात ते समजत नाही

  पण आपण हल्ली जास्त जास्त सोपे करत आपल्या भावना आर्व थरातील लोकांपर्यन्त

  पोचतील याची काळजी घेत आहात हे पाहून आपले आभार मानावेत असे वाटते

  नंदिनी सहस्त्रबुद्धे

  ReplyDelete
 4. संजय सोनावणी ,


  आपला माणुसकीचा हुंकार हा शैव आहे का वैष्णव का चक्क ब्राह्मणी आहे - म्हणजे आफतच - सगळा जन्म ब्राह्मणद्वेष करण्यात घालवल्यावर जर असले सुंदर विचार मांडावेतसे

  आपल्याला वाटत असेल तर फारच छान , आम्ही या कवितांच्या मोबदल्यात आपला ब्राह्मण द्वेष हसत हसत सहन करू

  गांधीवधानंतर आम्हाला सहन करायचे शिक्षण मिळाले आहे

  त्या वेळेस एका माथेफिरूने आम्हाला रस्त्यावर आणले पण आमची शब्दांची भूक संपली नाही -

  माणुसकीची तहान आटली नाही -

  एका वेडया माणसाच्या चुकीच्या कृत्यामुळे आम्ही भरडले गेलो - आमच्या इतक्या पिढ्या भरडल्या गेल्या - घरदार गेले शेती वाडी गेली -आमचा माणुसकीवर विश्वास होता

  आणि आजही आहे - म्हणूनच आम्ही अशा कविता वाचल्या की सैरभैर होतो  एक कविताप्रेमी ब्राह्मण - मिरज

  ReplyDelete
  Replies
  1. मित्रा मी ब्राह्मणद्वेष्टा आहे हा सर्वांनी जोपासलेला भ्रम आहे. चुका दाखवण्याला व त्या दुरुस्त करण्याच्या आग्रहाला द्वेष म्हणायचे असेल तर मग मार्गच खुंटला. चिकित्सेला नाकारले तर मग संशोधनच होणार नाही. राहिले शिव-विष्णू वैदिक याबद्दल...त्यात काय वावगे आहे? तुम्ही व असंख्य ब्राह्मण शिवभक्त आहात तेंव्हा त्याबद्दल आक्श्ढेप असण्याचे कारण समजत नाही. मी "एकमय" समाजाच्या बाजुला आहे तेंव्हा कोणाच्या विरोधात असण्याचा संबंध येत नाही. एकमेकांना समजावुन घेत पुढे जावे लागेल.

   Delete
  2. Please comment related to topic only.

   Delete
 5. हा कविताप्रेमी माणूस रेल्वेलाईनच्या बाजूला सकाळी बसलेला असतो

  बाजूला डबडे घेऊन इकडे तिकडे उडणाऱ्या

  चिठोऱ्यावर याचे लक्ष असते कधी स्वामी समर्थ तर कधी प्रियांका चोप्रा

  तर कधी कधी सुभाषचंद्र बोस -

  अशा याच्या मनाच्या खेळात भाग घेणारे भिडू असतात -

  वाऱ्याने चुकून समोर उडून आलेले -


  याच्या भावना क्षणापुरत्या चाळवतात

  कधी गुरुदेव दत्त तर कधी दीपिका पदुकोण  एखादी फास्ट लोकल गेली की हा फिदीफिदी हसतो - जरा साडी वर झाली की -

  आशाळभूत नजरेने चुकून पडलेल्या वडापावच्या तुकड्यावर झडप मारतो -

  तो माणूस मला माहित आहे -


  याचे पूर्वज तलवारी आणि भाले घेत मराठी राज्यासाठी जीवाचा कोट करत लढले !


  फंदफितुर मिरवत याच्या घरावरून पुढे गेले - पुढे याचे घरही गेले -


  याच्या आजोबांनी मिल च्या संपात लाल बावटा घेतला !-लाठ्या काठ्या खाल्या !

  याच्या काकाने घरून वीट नेली अयोध्येला - पुढे काय झाले त्याला आठवत नाही -  तो नुसताच हसतो - चीठोऱ्याकडे बघत -

  तुमची छापलेली कविता समोर अशा रुपात आली असेल तर ?

  त्याला ना ब्राह्मणांचे प्रेम ना कवितांचा सोस !

  - एक भ्रमिष्ट !-

  तो कोणाला समजून घेणार ?

  ReplyDelete
 6. Nice poem!! Positive attitude towards life!!

  ReplyDelete
  Replies
  1. देशपांडे यांचा संदीप ,


   एक काम करशील का ?

   Please comment related to topic only.

   Nice poem!! Positive attitude towards life!!

   अशा एकमेकांशी असंबद्ध वाटणाऱ्या मत प्रदर्शनामुळे आपले मत नीट समजले नाही

   संदीप तू खुलासा करशील का ?

   related to topic म्हणजे काय ?

   काय ?

   Delete
  2. इथे कवितेच्या बाबतीतच टिप्पणी करा. ब्राम्हण, ब्राम्हणद्वेष शैव,वैष्णव याचा इथे काही संबध येत नाही असे मला वाटते.
   ब्लॉगवर संबधित विषयावरील पोस्ट वर अश्या टिप्पणी कराव्यात.

   Delete
 7. श्री देशपांडे यांचे मत प्रदर्शन नेमके काय सुचवते ?

  ReplyDelete
 8. अरेच्या , संदीप रुसला !

  अस नाही करू संदीपा - अरे दीपु,तुला कविता आवडली ना ?

  आणि त्यात परत तुला इतक्या लहान वयात राग पण येतो !छान !

  आता तू म्हणशील -" मैं बच्चा नही हू !"

  अस करू नये ,तुला दिलेला दिवाळीतला घरचा अभ्यास झाला का ? सांग बर ?

  एकोणीसचा आणि एकोणतीसचा पाढा येतो का ?

  आता सांग पटापट - चुकला कि मग धम्मक लाडू आणि चापट पोळी !  चारा पंचे ? वीस -बरोब्बर !-

  तीन सक अठरा ! - शाब्बास !

  साही सक्कं ? बेचाळीस ! - चुकला रे चुकला !

  साही सक्कं नसतच मुळी -सहासहा छत्तीस अस असत आपल्या मराठीत - हो कि नाही ?  तुला ही कविता होती का ? "आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक" ?

  बाबाना होती ? बघ किती छान आहे ना ? बाबाना माहित आहे त्यांनी तुला सांगितली म्हणून तुला आवडली - हो कि नाही ?

  मलातर औटकी दिडकी सगळ येत -

  मला " बघ आई आकाशात सूर्य हा आला "- किंवा -" हिरवे हिरवे गाल गालिचे "

  किंवा "तसाच उरलो कसा पतित मी नसे काय की "- अशी वेगवेगळ्या वृत्तातील कविता अगदी तोंडपाठ आहेत -

  पण नंतर क्रांती झाली म्हणे - चित्रकलेत झाली , संगीतात झाली आणि कवितेत झाली - कादंबरीत झाली - वृत्तातून कविता मुक्त झाली

  पण त्यालाच मुक्त छंद म्हणू लागले

  बर का संदीप - झोप आली का तुला ?

  तू आवडता बाबांचा , तुजवरी जीव आईचा

  तू हसताना पूरची ये आनंदाचा

  चांदोबा तू या नभीचा

  गुणी बाळ असा जागसी कारे राजा - - -

  अरे देवा - झोपलाच कि हा चक्क - पुढे मला पार संजय सोनवणी पर्यंत यायचे होते ते राहिलेच !

  झोप झोप - परत कधीतरी ! आनंदाचा पूर - किती मस्त कल्पना आहे ना ?
  तुझी बेबी मावशी

  ReplyDelete
 9. बेबी मावशीनी अगदी माझ्या मनातले भाव व्यक्त केले आहेत !

  ReplyDelete
 10. बेबी मावशी,बेबी मावशी !  तू तर चक्क जुन्या जमान्यातल्या वाटतेस -खरच ! तुझी शप्पथ

  मग इतके टायपिंग कोण करून देते तुला ?

  आमची आज्जी पूर्वी रवीने ताक घुसळत छान गाणी म्हणायची -

  आत्ता थंडीत काकड आरती म्हणायची - सगळ्यांना लोणी साखर देत असे

  आम्हाला झोपवताना म्हणायाची -

  माडीखाली माडी माडीखाली चिरा

  तेथे तोंड धुतो हिरा शंभू बाळ - असे अगणित - त्याचे लेखक माहित नाहीत !


  रात्री आरतीचा शेवट तर किती गोड असे - सांगू -


  तुला देवाधिशा आजवरी सखा मी समजले

  येरे जारे कारे बहु सलगीचे शब्द वदले

  अवज्ञा मी केली मजकडून ही चूक घडली

  क्षमा त्याची मागे पदर पसरुनी दास मी - -


  आम्हाला प्रश्न पडायचा की आमची आजी इतकी छान आणि ती इतकी का देवासमोर दुष्ट माणसा सारखी क्षमा मागत्ये -ती तर आम्हाला खाऊ देते ,गोष्टी सांगते , मग हिला असं का वाटत ?

  नंतर समजल की सर्व भाषात देशात आणि धर्मात हे संत लोक असाच देवाचा धावा करतात

  हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा -

  हो ना ग बेबी मावशी ?

  मावशी ग अशीच भेटशील ना - नाहीतर बघ हं ! आम्ही संजय काकांनाच तुझ नाव सांगू आणि तुझ्या त्या देवा बरोबर गट्टी फु करू !  शंभुबाळ

  ReplyDelete
 11. संजय सर ,

  आपण भाग्यवान आहात ,आपला ब्लोग वाचक किती रमला आहे तुमच्या भाव विश्वात !

  पार हरवून गेला आहे - नशीबवान आहात

  इतकीशी चिमुरडी मुले आजीच्या ओव्या आणि अंगाई गीते सांगताहेत

  पण ती कोण आहेत ?

  ब्राह्मण का ९६ कुळी का बौद्ध ?

  काय म्हणता ? आई आणि आज्जीला जात धर्म काहीही नसते ?

  खरच ! आपणच आपले शत्रू आहोत कि काय असे वाटू लागते कधी कधी !

  तुम्ही जीवनाचे संगीत मांडले आणि सर्वांनी आपापल्या आठवणीनी मजा आणली


  प्रतीक्षा - येरवडा ,पुणे

  ReplyDelete
 12. पुन्हा एकदा महापुरुषांचा पराभव,


  शालेय जीवनात असतांना एक धडा कि कविता वाचलेली, "महापुरुषांचा पराभव " ! जसजसा मोठा होत गेलो तस तसा शिवरायांचा , बाबासाहेबांचा , फुल्यांचा , गांधींचा किंवा अन्य महापुरुषांचा त्यांच्याच अनुयायांकडून दररोज होणारा पराभव याची देही याची डोळा जवळून बघत आलो.
  लहानपणी एका धड्या पुरते वाचलेले आमचे "लोहपुरूष" म्हणजेच सरदार वल्लभ भाई पटेल गेली ६ ० वर्षे गांधी - नेहरू प्रेमात आकंठ बुडालेल्या काँग्रेस च्या कृपेने कुठे तरी अडगळीत पडले होते, आणि आम्ही सज्जन - सरळ भारतीयांनी हि त्यांना एक - दोन शालेय धडे किंवा लेखांपुरते मर्यादित ठेवले . थोडक्यात या सर्वांपासून दूर आजवर सुखात असणारे आमचे सरदार - लोहपुरूष गेल्या काही दिवसात पुनच्छ एकदा आमच्या राजकीय मैदानात उतरवले गेले.

  निमित्य होते त्यांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे. विचारांचे लोणचे घालून केवळ पुतळे आणि स्मारकांच राजकारण करणाऱ्या या देशात हा हि कार्यक्रम अगदी नेहमीप्रमाणे डोळे दिपवून ठेवणारा झाला, असही आमची महापुरुषांच्या दिव्य विचारांना बघण्याची दृष्टी थोडी अंधुकच त्यात दिपवणारे स्वप्न दाखवले म्हणजे झालेच…. आम्ही पुढचे काही वर्षे पुन्हा झोपायला तयार.

  तर असो … सांगायचा मुद्दा हा कि बराच काळ सुखात असणर्या आमच्या लोह्पुरुशाची अचानक खेचाखेच सुरु झलि…

  ज्या लोकांच्या बलिदानाने, त्यागाने हा देश स्वतंत्र झाला त्याच लोकांचा गेली साठ वर्षे सोयीने विसरून विस्मृतीत गेलेली कॉंग्रेस अचानक जागी झाले कारण आता यांचा वारसा सांगणारे आमचे नवे ' सरदार' म्हणजे 'वारसदार' हो …. नेहमिप्राने अगदी दणक्यात म्हणजे काय ते ब्रांडीग का काय करून लोकांच्या समोर अवतरीत झाले. मग काय अगदी महाभारतापासून सुरु असणारा फ़ेमस खेळ वारसा हक्काचा खेळ सुरु झाला … आता हा खेळ आला म्हणजे एकमेकांचे वस्त्रहरण होणार हे हि ओघाने आलेच.

  मग काय दोन्ही बाजूंनी 'सरदार 'आमचेच कसे हे सांगण्याचा प्रयत्न सुरु केला.

  ज्या बापूंचे पटेल हे कट्टर अनुयायी होते त्याच बापूंची हत्या करणारी विचारसरणीला देखील सरदार आणि त्यांचा निधर्मी पणा आपलासा वाटू लागलाय …. तर एवढी वर्ष अडगळीत फेकेलेले पटेल हे आमचेच हे सहसा न बोलणारे आमचे पंतप्रधान देखील ठासून सांगायला बाह्या सरसावून पुढे आले.

  सरदारांच्या विचारांची उंची एवढी मोठी होती (त्यांच्या होणाऱ्या पुतळ्या पेक्षाही) कि त्यांच्यामुळे आजच्या ह्या अखंड देशाची निर्मिती झाली, तुकड्या तुकड्या मध्ये प्राप्त झालेल्या या देशाचे खरे पालकत्व स्वीकारले ते पटेलांनी. विखंडावस्थेत असणाऱ्या या देशाला जोडण्याचे काम च केले नाही तर या लोह्पुरुशाने या देशाला लोखंडासारखी मजबुती हि दिली .

  आज त्यांचे हेच सर्व तथाकथित अनुयायी धर्म - भाषा - जात - प्रांत यांच्या जोरावर समाजाला तोडण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत आणि याच तुटलेल्या तुकड्यांवर आपली मतांची झोळी भरण्याचे धंदे करीत अहे.

  थोडक्यात काय तर … सरदार हे केवळ महापुरुष नव्हते तर लोहपुरूष देखील होते, त्यांना तोडणे किंवा ओढणे दोन्ही हि अवघड, पण आता हे हि शिव-धनुष्य त्यांच्या अनुयायांनी उचलले आहे, पुन्हा एकदा एका महापुरुषाचा पराभव त्यांच्याच अनुयायांच्या हाताने होणार .

  आता तुम्हाला आणि आम्हाला ठरवायचे आहे कि पटेलांच्या विचारांना गगन भरारी द्यायची का त्यांच्या गगनचुंबी पुतळ्याला पराभवाचा "हार" घालायचा .

  जय हिंद - जय महाराष्ट्र

  -- अमोल

  ReplyDelete