Friday, March 7, 2014

मराठ्यांना आरक्षण मिळनार?


मराठा आरक्षणाच्या मागणीचे वादळ गेली दोन वर्षे घोंगावत आहे. मराठा तरुण आरक्षणाकडे डोळे लावून बसला असून आरक्षण मिळाले कि आपल्या सर्वच समस्या दूर होतील या भ्रमात नेण्यात मराठा आरक्षणवादी नेते यशस्वी झाले आहेत. केंद्र सरकारने नुकतेच जाट समाजाला ओबीसींत घेऊन आरक्षण दिल्यामुळे मराठा तरुणांची आशा अजून पल्लवीत झालेली आहे. हे सारे खरे असले तरी वास्तव काय आहे? आरक्षणाच्या निमित्ताने मराठा तरुणांच्या भावनांशी खेळ खेळला जात आहे काय? किंबहुना मुस्लिमांसाठीही आरक्षण देण्याबाबतच्या चर्चा अधून मधून झडत असतात यामागे नेमकी राजकीय नेत्यांची रननीति नेमकी काय आहे? कोनत्याही समाजाचे आरक्षण बहाल केल्यानेच कल्याण होईल अशी जी भावना निर्माण झालेली आहे ती कितपत संयुक्तिक आहे? या प्रश्नांवर आपल्याला गांभिर्याने विचार केलाच पाहिजे. आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक यांच्या भुमिकाही नव्याने तपासून पाहिल्या पाहिजेत.

आधी आपण मराठा आरक्षणाबाबतचा इतिहास पहायला हवा. खरे तर कोणत्या जातीला कोणत्या गटात घ्यायचे, किती टक्के आरक्षण द्यायचे या बाबी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अखत्यारीत येतात. मराठा आरक्षणाची मागणी जुनी असून आजतागायत सहा वेळा राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही अशीच भुमिका घेतली आहे. तरीही मराठा आरक्षणवादी विनायक मेटेंसारख्या नेत्यांनी, प्रसंगी आक्रमक होत, मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे अशी भूमिका घेतली. त्याची फलश्रुती म्हणजे नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक पाहणी समिती नेमली गेली. या समितीने नुकताच आपला अहवालही सादर केला आणि तो अहवाल स्वीकारण्यापुर्वी राज्य मागासवर्ग आयोग आणि कायदेतज्ञांकडे मत मागवण्यासाठी सोपवला गेला. इतक्या अल्पावधीत अहवालाचा सखोल अभ्यास करून दोन्हीकडून मत नोंदवले जाण्याची शक्यता नाही हे मंत्रीमंडळाला माहित असलेच पाहिजे. आता आचारसंहिता लागू झाल्याने याबाबतीतील निर्णय लोकसभा निवडणुकींनंतरच लागू शकेल...आणि तो काय असेल याचे भाकित वर्तवण्याआधी आपण मराठा आरक्षनाचे इतर पैलू पाहुयात.

घटनाकारांनी आरक्षण अशाच समाजघटकांना दिले आहे जे सामाजिक व्यवस्थेत एकुणात दुर्लक्षित, शोषित आणि वंचीत घटक आहेत.   ज्यांना राजकीय व्यवस्थेत निर्णयप्रक्रियेत कधीही स्थान मिळालेले नाही व आरक्षनाखेरीज ते मिळणेही शक्य नाही. त्यामुळे शिक्षण, नोक-या आणि राजकीय प्रतिनिधित्व असे एकत्रीत प्यकेज आरक्षणात सामाविष्ट केले गेलेले आहे. यात मराठा समाज कोठे बसतो हे आपण बघितले तर लक्षात येईल कि मराठा समाज कोठे गरीब असेल पण तो कधीही शोषित, वंचित आणि दुर्लक्षित समाज नव्हता व नाही. किंबहुना गांवगाड्यातील प्रतिष्ठित असाच हा वर्ग होता व आजही या परिस्थितीत फरक पडलेला नाही. त्यामुळे आरक्षनाचे मुलतत्वच या समाजाला लागू पडत नाही व त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागासवर्गीय मानण्यास नकार दिला होता हे वास्तव मराठा तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व. राणे समितीच्या मते मराठा समाज ३०% आहे. समजा जरा वेळ ते खरे मानले तरी राजकीय प्रनिनिधित्वात या समाजाचा वाटा हा ६५% आहे. म्हनजेच लोकसंख्येच्या दुप्पटीपेक्षा अधिक प्रतिनिधित्व हा समाज उपभोगतो आहे. यावरील युक्तिवाद असा कि काही विशिष्ट घराणीच हे प्रतिनिधित्व राखून आहेत. परंतू हा युक्तिवाद कामाला येत नाही कारण ग्राह्य धरली जाते ती प्रतिनिधित्वाची आकडेवारी. विशिष्ट घराण्यांच्या हाती सत्ता एकवटली असेल तर तो दोष घटनेचा नसून समाजाचा आहे. याशिवाय आजची ग्रामीण अर्थव्यवस्था व शिक्षणव्यवस्था (साखर कारखाने, सुतगिरण्या, पतसंस्था, जिल्हा सहकारी ब्यंका, शिक्षनसंस्थामुळे) यावर प्राबल्य मराठा समाजाचेच आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. 

पण एकुनात या बाबींचा विचार न करता आरक्षणवादी नेत्यांनी मग दुसरी मागणी पुढे रेटायला सुरुवात केली कि आम्हाला राजकीय आरक्षण नको...फक्त शिक्षण आणि नोक-यांत द्या. यातील लबाडी अशी आहे कि फक्त शिक्षण आणि नोक-यांत आरक्षण देता येत नाही. आरक्षण हे प्यकेज आहे. ते तोडून द्यायचे तर घटनादुरुस्तीच करावी लागेल. त्यामुळे राज्य सरकारने समजा फक्त शिक्षण व नोक-यांत आरक्षण दिले तर कोणीही मराठा सर्वोच्च न्यायालयात जाऊन सहजपणे राजकीय आरक्षणही पदरात पाडून घेऊ शकेल. हे आरक्षणवादी नेत्यांना माहित आहे. तरीही महत्वाचा प्रश्न असा उरतो कि मुळात मराठ्यांना आरक्षण देता येईल का, हा. 

मराठा तरुण शिक्षणात मागास असून गरीबीत आहे असा दावा सुरुवातीपासून केला जात आहे. या दाव्यात तथ्य नसेल असे नाही. गरीबी ही सापेक्ष संकल्पना असून त्या दृष्टीने सर्वच समाजांत गरीब आहेतच. ज्यांना आरक्षण आहे अशा समाजघतकांतही आजही गरीबी मोठ्या प्रमानात आहेच तसेच उच्चवर्णीय म्हनवल्या जाणा-या ब्राह्मणादि समाजातही गरीबी आहे. परंतू मुळात आरक्षण हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. गरीबी दूर करण्यासाठी अन्य असंख्य शासकीय योजना आहेत व त्याचे लाभार्थी कमी नाहीत. शिक्षणातही फीमद्धे गरीबांना सवलतीची सोय आहेच. त्यामुळे मराठा समाजात गरीबी आहे हा मुद्दा कोणत्याही तत्वावर आरक्षनासाठी टिकत नाही.  

दुसरा मुद्दा आहे तो आरक्षनावरील ४९% मर्यादेचा. राणे समिती तमिळनाडुच्या धरतीवर आरक्षनाची मर्यादा वाढवता येऊ शकते असे म्हनते. वास्तव हे आहे कि तमिळनाडू सरकारचा अधिक आरक्षण देण्याचा निर्णय मंडल आयोग लागू करण्याआधीचा होता. सर्वोच्च न्यायालयाने ती अपवादात्मक बाब असल्याचे सांगत ४९% हीच आरक्षणाची मर्यादा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळेही मराठ्यांना आरक्षण दिल्याने ४९% ची मर्यादा ओलांडली जानार असल्याने घटनादुरुस्ती केल्याखेरीज हे आरक्षण प्रत्यक्षात येणे शक्य नाही हे उघड आहे. राज्य सरकारने असे आरक्षण जरी दिले तरी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल हेही सुर्यप्रकाशाइतके उघड आहे. अशा स्थितीत हा घाट का घातला जात आहे यावर आपण विचार करायला हवा.

मराठा व्होट ब्यंक पक्की करण्यासाठी आरक्षणाचा हा घाट कोंग्रेस/राष्ट्रवादीने घातला आहे असा जो आरोप होतो तो वास्तवच आहे. निवडणुकीच्या तोंडावरच आजवर मराठा आरक्षनाचा विषय रेटला जातो व थातुर-मातुर प्रयत्न केल्याची नाटके केली जातात हेही लपून राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकींनंतर आम्ही आरक्षण देवू असे सांगत लोकसभेचे रणमैदान सर करण्यासाठी राणे समितीचा अहवाल वापरला जाईल हे उघड आहे. किंबहुना महाराष्ट्रातील कोंग्रेस/राष्ट्रवादीचा प्रचार आरक्षणकेंद्रित असेल असे दिसते. परंतू हा प्रकार त्यांच्याच अंगलट येण्याची तेवढीच शक्यता आहे.

याचे कारण म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी व मराठा समाजात संघर्ष सुरु झाला हे एक सामाजिक वास्तव आहे. ओबीसी कोट्याला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल असे राणे समिती जरी म्हणत असली तरी यातून आधीच्या आरक्षित घटकांचे नुकसानच आहे. याचा अर्थ नीट समजावून घ्यायला हवा. आरक्षण ५०% च्या मर्यादेत असले तरी आरक्षित घटक खुल्या जागांतुनही शिक्षण-नोक-यांत प्रवेश घेऊ शकतात. नव्हे तो त्यांचा अधिकारच असतो. त्यामुळे उर्वरीत ५०% खुल्या गटातुनही निवडून जाण्याची संधी उपलब्ध असते. मराठ्यांना समजा शिक्षण व नोक-यांत अधिकचे २०% आरक्षण दिले तर ओबीसींचा खुल्या गटाचा पर्याय ३०% वर घसरेल. याचा फटका केवळ ओबीसी व अन्य एस.सी./एस.टी या आरक्षण असलेल्या घटकांनाच नव्हे तर जे पुर्वीच खुल्या गटांत आहेत अशा ब्राह्मणादि सर्वच घटकांना संधी नाकारली जाण्याची परिस्थिती निर्माण होईल. यातून जो रोष निर्माण होईल त्यामुळे मराठा व्होटब्यंक जरी मजबूत करता आली तरी बाकीचे समाजघटक कोंग्रेस/राष्ट्रवादीपासून दूर जाण्याची शक्यता निर्माण होईल. म्हनजेच मराठा आरक्षणाच्या निमित्ताने कोंग्रेस/राष्ट्रवादी एका परीने मोठ्या धोक्याला आमंत्रित करत आहेत. तेही जे आरक्षण ते देऊच शकत नाहीत, दिले तरी टिकनार नाही अशा कारणासाठी! पण यामुळे सामाजिक सद्भावाला तडा पाडन्याचे काम सुरु झाले आहे आणि ती अत्यंत दुर्दैवी व राज-वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. 

मुळात आरक्षण हाच कोणत्याही घटकाचा सामाजिक विकासाचा एकमेव पर्याय वाटावा यातच आपले धोरणात्मक अपयश आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.  राजकीय नेत्यांनी केवळ स्वार्थासाठी आरक्षण हे हत्यार वापरले आहे हे उघड आहे. निवडणुकीच्या तोंडावर जाट समाजाला ओबीसींमद्धे प्रवेश देत केंद्र सरकारने राजकारणच साधले आहे. मुस्लिम/ब्राह्मण/जैन अशा समाजांनाही आरक्षण देण्याच्या चर्चा अधून-मधुन झडत असतात. जणु काही आरक्षण दिल्याखेरीज कोणत्याही समाजाचे भले होऊ शकत नाही अशी मानसिकता रुजवण्यामद्धे राजकारण्यांनी हातभार लावला आहे असे आपल्या लक्षात येईल. यामुळे आरक्षण असलेले आणि आरक्षण नसलेले असे दोन गट उभ्या देशात पडले असून त्यांच्यातील सुप्त-जागृत संघर्ष हा एकुणातील समाजाचे स्वास्थ घालवत आहे हे वास्तव का दुर्लक्षिले जाते? यातून सामाजिक ऐक्याची भावना न बळावता समाजविघातकता वाढेल हा धोका वारंवार का पत्करला जातो?

शिक्षण-नोक-यांत आरक्षनाची मुळात गरज वाटते ती मुळात सीट कमी आणि दावे करणारे जास्त यामुळे. शिक्षण ही संपुर्नतया शासनाची जबाबदारी असुनही शिक्षणाचे अत्यंत वेगाने खाजगीकरण केले जात आहे. शिक्षणाच्या दर्जात गुणात्मक वाढ तर नाहीच पण ते दिवसेंदिवस महागडे होत चालले आहे. खाजगीकरनाच्या धोरणामुळे सरकार बहुतेक उद्योगांतुन हात काढून घेत असल्याने सरकारी नोक-या घटल्या तर आहेच, पण पुढे त्या दुर्मिळ होत जानार आहेत. शासकीय कर्मचा-यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा आता वाढवल्याने त्याचाही नवीन नोक-या निर्माण होण्यावर मर्यादा येणार आहेत. अशा परिस्थितीत किमान शिक्षणाचे खाजगीकरण करू नये, ते सरकारच्याच अखत्यारीत असावे आणि सर्वांना उपलब्ध असावे ही मागणी मात्र कोणीही करतांना दिसत नाही. कारण ती राजकारण्यांनाच अडचणीची आहे. बहुतेक शैक्षणिक संस्थानांची मालकी आज त्यांच्याचकडे आहे हे वास्तव आहे.

आपली शिक्षणव्यवस्था मुळातच बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने आहेत. पदवीधर साक्षर होतो खरा पण जगण्याचे कसलेही कौशल्य विकसीत करू शकत नाही अशी आपली मागासलेली शिक्षणरचना आहे. येथून रोजगार मागनारेच व तेही व्हाईट-कोलर रोजगार मागणारे उत्पन्न केले जातात. रोजगार देण्याची क्षमता असनारे शिक्षित मात्र अत्यल्प असतात. श्रमप्रतिष्ठा, उद्यमकौशल्याचा विकास करण्यात आपण पुर्णतया अयशस्वी झालेलो आहोत. याबाबत विचारपुर्वक दिर्घकालीन धोरण आखत त्याची अंमलबजावणी व्हावी असा सूर कोठुनही उमतत नाही. आरक्षण हे जादुची कांडी वाटते व त्यामुळेच सर्व समाजांचे कल्याण होणार आहे असे चित्र राजकारणी/समाजकारणी/चळवळे उभे करत असतील तर आपण विनाशाकडे वाटचाल करत आहोत असेच म्हनावे लागेल.

आरक्षनामुळे वाटतो तेवढा लाभ आजवर आरक्षित घटकांनाही झालेला नाही हे एक वास्तव आहे. ओबीसींना २७% आरक्षण असले तरी लाभार्थी फक्त ४.८% एवढेच आहेत. एससी/एसटी घटकांबाबतही चित्र वेगळे नाही. ८०% भटक्या-विमुक्तांना (भटकेपनामुळे) मुळात शिक्षणाची मुलभूत सोयच नसल्याने तेही आरक्षण असुनही त्याचा पुरेसा लाभ उठवू शकलेले नाहीत. त्यामुळे आरक्षण हे वंचित समाजांना उत्थानाचे एक साधन असले तरी ते एकमेव आणि अंतिम असू शकत नाही, आपल्याला मुळातच आर्थिक/शैक्षणिक धोरणात्मक व्यापक बदल घडवायला हवेत हे लक्षात घ्यावे लागणार आहे. 

19 comments:

 1. संजय सोनावणी सर ,
  आपण सविस्तर विवेचन केल्यामुळे अनेक जणाना ,या सर्व राजकारणाचा अर्थ लागला आहे
  कधीही प्रत्यक्षात न येणारी गोष्ट जवळ जवळ होत आली आहे असा आभास निर्माण करणे हा तर मराठा समाजाशीच प्रतारणा करण्याचा भाग झाला

  सुप्रीम कोर्ट आणि तामिळनाडू याबाबत दिलेली माहिती सर्वांनाच माहित असेल असे नाही ,ती आपण दिल्यामुळे बरे झाले , तरीही याचा अर्थ किती जणाना कळला असेल त्याबाबत शंका वाटते !
  कारण भडक भाषणे आणि आकर्षक भाषा यामुळे माणसे फसतात

  समाजात एक विचारप्रवाह नेहमी दिसतो असुरक्षितता असल्यामुळे बहुतेक लोक आपापल्या जातीच्या बॉस असलेल्या ऑफिसात रुजू होऊ इच्छितात तिथे त्याना आपला माणूस अशी वागणूक मिळेल असे वृथा वाटत असते त्यामुळे गुजराथी हा गुजराथ्याकडे ,ब्राह्मण हा ब्राह्मणाकडे ,असे सुरु होऊन त्यांच्याच जातीच्या माणसाकडून त्यांची पिळवणूक चालू होते असे दिसते आणि जे भरवशाचे मानले सुरक्षित मानले तिथेच प्रगती खुंटण्याची मालिका सुरु होते इथेच त्यांचे जातीय शोषण खुद्द त्यांच्याच जातीच्या बॉस कडून सुरु होते आपापल्या सुरक्षिततेची किंवा असुरक्षित पणाच्या भ्रामक वृत्तीची ती किंमत असते .असो .

  दुसरा मुद्दा आपण फार चांगला मांडला आहे +तो म्हणजे आरक्षणाने सर्व साध्य होते असे वाटणे !
  आपल्याला जे घडवायचे आहे ,बनायचे आहे त्यासाठी जी जिद्द चिकाटी आणि सातत्य लागते ते जर आरक्षणाबरोबर टिकले तर ठीक , पण आरक्षणा नंतर जर माणूस सुस्तावला तर ?समाजाने त्या वर्गासाठी एकप्रकारे त्यांच्या उद्धारासाठी हा त्यागच केलेला असतो !त्याच्याशी प्रतारणा होईल ,असे वर्तन होता कामा नये !
  आपण जे कायदेशीर मुद्दे उपस्थित केले आहेत त्यासाठी मराठी च्यानलचा वापर करून
  श्री मेटे आणि मंडळी यांचा हा फार्स लोकांसमोर मांडता येईल अगदी दस्तुरखुद्द नारायण राणे आणि श्री मेटे यांचे वैचारिक वस्त्रहरण होणे अत्यंत आवश्यक आहे +
  संजय सर आपण अपावि मं ची मदत घेऊन अशा जीवघेण्या फसव्या घोषणांचे पर्दाफाश करत त्यांचे वस्त्र हरण केले तर सर्व महाराष्ट्रातील मराठा आणि इतर समाज आपणास धन्यवाद देईल !
  आपल्यासारख्या जनजागृतीशी प्रामाणिक राहणाऱ्या विचारवन्तांकडून इतकी माफक अपेक्षा बाळगणे चुकीचे नसावे असे वाटते !
  आपण अशी चळवळ उभी कराल का ?

  ReplyDelete
 2. अनिता पाटील विचार मंचाने खरेतर हा सगळा डाव समजावून घेत खरी न होणारी स्वप्ने लोकाना
  विकत स्वतःचे महत्व वाढवत राजकारणात एक स्थान निर्माण करणारे श्री मेटे साहेब आणि आपल्या रिपोर्ट मधील भंपकपणा लपवणारे श्री नारायण राणे यांचे पितळ उघडे पाडले पाहिजे
  आता उघड उघड मराठा मनाशी हा आततायी खेळ करून खरेतर हे नेते आणि कोन्ग्रेस , राष्ट्रवादी एक अत्यंत हिडीस प्रकार करत आहेत याची नोंद मराठा वर्ग सहजा सहजी घेणार नाही , कारण त्यांचा आपल्या नेत्यांवर अध विश्वास असतो !पण योग्य प्रकारे समाजाला याबाबतीत शिक्षण दिले तर या स्वप्नातील फोलपणा त्याना समजेल आणि निदान काय योग्य भूमिका घेतली पाहिजे ते समजेल क़ारन बरेच लोक हे एकामागून एक जाणारे असतात ,आणि या नेत्यांच्या वागण्यातून पुढे जी निराशेची लाट येईल तिची पण आपण जाणीव करून द्यायला पाहिजे आणि आपल्या बरोबर जर अपावि मंच आणि तत्सम संघटनाना जन जागृतीसाठी बरोबर घेतले तर या विचार मंथनास एक धार येईल !

  ReplyDelete
  Replies
  1. अनिता पाटील विचार मंच हे काय आहे?

   Delete
 3. अहो मेटे साहेब ,
  आपले डोके ठिकाणावर आहे ना ?
  किती लोकांचे तळतळाट घ्यावे लागतील ?
  मराठा समाजास आज सांगितले पाहिजे की श्री मेटे साहेबांचा अभ्यास तरी कमी पडतो आहे किंवा पवार काका पुतण्यावर आंधळी श्रद्धा ठेऊन आपण स्वताची फसवणूक करत आहोत
  संजय सर ,
  आपण अतिशय ठामपणे " हे कधीही होणे शक्य नाही " असे जे मतप्रदर्शन केले आहे त्यातील सत्य इतके भयानक आहे की यांच्यावर समाजास चुकीची स्वप्ने दाखवल्याबद्दल , फसवणुकी सारखा गुन्हा दाखल केला पाहिजे - हवेत एक अफवा पसरवून देत त्यातून स्वतःची पोळी भाजून घेण्याची हि नीच वृत्ती लाजिरवाणी आहे !त्याबाबत मराठा समाजात जागृती करणे हाच योग्य उपाय आहे !
  त्यापेक्षा त्यांनी जर आरक्षणाव्यतिरिक्त दुसरी स्वप्ने ठेवली असती तर तिचा याना फायदातरी झाला असता ,
  पण बुडत्याचा पाय खोलात !आता कोन्ग्रेस आणि राष्ट्रवादीला कोणीही जवळ करणार नाही
  अजित पवार तर अगदीच भोंदू आणि भ्रष्ट ठरले आहेत !
  त्यांनी पद सोडले पण सत्तेची उब त्याना खुर्चीपासून दूर ठेवेना त्या वेळेस आपणहून ते परत चिकटले , हे लोकांच्या लक्षात आहे
  इतके हसे झाल्यावर हे आरक्षणाचे गाजर दाखवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे होय !
  पवारांची पात राहिली नाही हेच सत्य आहे !

  ReplyDelete
 4. सोनावणी सर , आपण मराठा आरक्षण या विषयाची योग्य वेळी योग्य रीतीने चिकित्सक चिरफाड करून मेटे साहेबाची दांडी गुल केली आहे आणि पवार साहेबाना योग्य तो चिमटा काढला आहे त्याबद्दल अभिनंदन
  त्यातून सावधपणे नारायण राणे या मुर्खाशी चार हात अंतर ठेवून जर काका पुतणे राहिले तर निदान स्वतःची लाज राखतील
  आज मतदार अतिशय चिडला आहे त्याला सर्व चालींची जाणीव आहे आणि खोटी वचने ऐकण्याच्या मनःस्थितीत आता मतदार नाही त्याच्याकडे अनेक ऑप्शन आता आहेत याची जाणीव ठेवली तरच राष्ट्रवादी तरेल नाहीतर ती बुडणार हे सत्य आहे

  ReplyDelete
 5. आरक्षणावरूनकेले केले जाणारे राजकारण हा काही नवीन मुद्दा नाही, फार पूर्वीपासून हे आपल्याकडे चालत आलेले आहे. परंतु त्यावर कडाडून टीका करणारे फार थोडे… ते आपण केल्याबद्दल आपले आभार. खरच खूप चांगले विश्लेषण…
  http://feelthetext.blogspot.com

  ReplyDelete
 6. Dear Sanjayji,
  My article on this subject is published on my blog. I am fully convinced with your view. If have time you can read my view too.
  जाट और मराठा आरक्षण: लुटे-पिटे सेठ की दरियादिली

  http://dgsharma.com/blog/article_det.php?id=11#comment

  ReplyDelete
 7. अंकुश सुळे साहेब ,
  वैदिक द्वेषाची प्रखरता किती आहे ? मानवतावादाच्या पेक्षा जास्त ?
  मुसलमान सोडून वैदिक ठेचावा असे वाटते का ?
  त्यापेक्षा " अवघे धरू सुपंथ " असे का वाटत नाही ?
  एखाद्या तत्व ज्ञानाच्या आहारी किती जायचे ? इतका तत्व ज्ञानाचा पगडा असणे ही एक मानसिक आजाराची स्थिती असावी असे नाही का वाटत ?
  पुस्तके वाचावीत पण त्यांचे गुलाम नसावे ! डॉक्टर असे वागतो का ? तुका म्हणे ऐशा नरा वगैरे ठीक आहे ,तसे तुकाराम महाराज बरेच काही म्हणतात , अनेक वेळा परस्पर विरोधीही बोलतात
  वैष्णव आणि शैव एकच असल्याचे पण सांगतात !तुकाराम हे ब्राह्मण नाहीत ही एकाच गोष्ट आपणास आकर्षक वाटते का ? सदानंद मोरे यांनी असेच सुरु केले आहे -एकनाथांची आठवण होत नाही त्याचे कारण तुमच्या तोंडातून येईल का ?
  याच विषयावर इथेच वाघ्या धनगर अशा नावाने कुणीतरी किती छान लिहिले आहे
  संत तुकाराम वैष्णव असे भेद मानत होते का त्याचा पण संदर्भ दिला आहे त्या ठिकाणी !
  त्रिशुलावरी काशीपुरी चाक्रावारती पंढरी
  दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे
  एक विभूतीचा गोळा एका केशर कस्तुरीचा टिळा
  एका भूजंगाची माळ एका वैजयंती हार
  एका अर्धांगी पार्वती एक लक्ष्मीचा पती
  एक नंदीवरी असे एक गरुडावरी वसे
  तुका म्हणे हरिहर एका वेलांटीचा फेर
  आणि
  आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना
  प्राकाराच्या संगे रवी बिघडला
  रवी बिघडला प्राकाराची झाला
  सागराच्या संगे नदी बिघडली
  नदी बिघडली सागराची झाली
  परिसाच्या संगे लोह बिघडले लोह बिघडले सुवर्णची झाले
  पांडूरंग संगे तुका बिघडला
  तुका बिघडला पांडुरंग झाला
  एका जनार्दनी गोपी बिघडल्या
  गोपी बिघडल्या श्रीकृष्णमय झाल्या

  या सर्वाना हे पुरुषसुक्त ऐकू येतच असेल , पण त्यांच काहीच बिघडलं नाही !
  किती साली हे सुरु केले त्या ब्राह्मणांनी याचा पुरावा आहे का काही ?
  संपूर्ण वारकरी चळवळ हे पुरुषसुक्त पांडुरंगा समोर चालू आहे म्हणून अडून नाही बसली
  मग तुम्हीच असे कसे ?
  राजकारण करायचे आहे का ? हा हा हा sss करा करा करा !!!
  तुमचा आत्मा शांत होऊ दे एकदा !किती दिवस असे स्वतःला फसवत राहाल ?
  माझी काही समजूत वेगळीच होती कारण म फुले असोत किंवा इतर कुणी सर्वांचे म्हणणे एकाच आहे की त्याना देवाकडे जाताना ब्रोकर नको आहेत ,ब्राह्मण नको आहेत कारण त्यांच्या हातात देवळाच्या चाव्या आहेत - इथपर्यंत समजू शकते पण हाच ब्राह्मण द्वेष ज्या वेळेस सामाजिक रूप धारण करतो त्यावेळेस ती विकृती होते ,मन्दिराबाहेर्चा ब्राह्मण द्वेष हि विकृती आहे !

  संजय सोनावणी ,
  आपण आदर्श समाज रचना आपल्या मनात काय आहे ते सांगाल का ?
  आदर्श धर्म कल्पना काय आहे ते सांगाल का ?आपण नुसते बडबडे आहात असे अनेकाना वाटते , अगदी भल्याभल्याना , म्हणुनतर आपण आहात तिथेच आहात असे ते समजतात हे आपल्या कानावर आले असेलच , पण त्यामुळे आमच्या सारख्याना फार फार वाईट वाटते कारण आपल्याकडे वाद घालायचे कौशल्य आहे , मांडणीची जाण आहे , आणि मला एक सांगा , अगदी मनापासून , असा एक दिवस उजाडला ,
  समजा ,
  असा दिवस उजाडला -सर्व वैदिक वाग्मय वैदिकांनी स्वतःच नष्ट केले
  सर्व समाज शैव झाला किंवा अवैदिक झाला तर सर्व समस्या संपतील का ?आपले जगणे एकदम सोपे होईल का ? आपण असे प्रश्न अनुत्तरीत ठेवू नका !उत्तर द्या !
  अनेकतेतच एकता आहे हा भारताचा आत्मा आहे

  ReplyDelete
 8. आपण सार्वजण मिळून कल्पना करू की सर्व वैदिक विचार नष्ट झाले आहेत , वैदिक पुस्तकांची होळी झाली आहे आणि सर्वांचे शैव धर्म हा श्रेष्ठ असे मत झाले आहे आता यामुळे सर्व प्रश्न सुटणार आहेत का ? धार्मिक एकजीवता येणार आहे का ?
  आता प्रत्येक ठिकाणी प्रथम तुला वंदितो कृपाळा अशा गणेशाला वंदन होणार आहे का ?
  गणेशाचे मराठी संस्कृतीत पेशवाईत अवडंबर माजले म्हणून गणेशोत्सव हा ब्राह्मणी संस्कृतीचा अवशेष नष्ट केला पाहिजे अस ठरवूया -
  शिव पार्वतीला खरेतर एकच षडानन हा पुत्र होता आणि पेशव्यांनीच त्यांचा गणपती शंकराच्या मांडीवर बसवला असा संजय सोनावणी यांनी आत्ताच शोध लावला आहे म्हणून सर्व ठिकाणाची शिव पार्वती आणि गणपतीची चित्रे जप्त करून त्याची पण होळी करावी
  भारत हा फुलांचा गुच्छ आहे येथे अनेक फुले एकत्र येउन सांस्कृतिक पुष्प गुच्छ बनला आहे !हा देश फक्त हिंदुंचा नाही आरक्षण आणि ब्राह्मण विरोधाच्या नावाखाली हिंदू समाजाचेच राजकारण महत्वाचे केले जात आहे
  सर्व धरून ५० % हिंदू जातींच्या याद्या वाढवत सुरक्षित होत आहेत आणि उर्वरित ब्राह्मण वर्ग आर्थिक दुबळ्या वर्गात टाकून हा देश हिंदूंचेच हित साधत आहे याचा आम्ही निषेध करत आहोत
  यामागे रा स्व संघ आणि कॉंग्रेस यांचा हात आहे !
  राहुल कांबळे

  ReplyDelete
 9. संजय सर ,
  " एक सांगू का , अनेक वर्षे माझ्या मनात इच्छा आहे की कोल्हापुरात प्रसादाचे लाडू वळायचे काम स्त्री वर्गाने करावे , अनेक , हजारो स्त्रियांची तशी इच्छा असेल !
  पण हा विटाळाचा मुद्दा आड येतो + आता याबाबतीत तू पुढाकार का घेत नाहीस , म्हणजे तुझे पुरोगामी मुखवट्याचे सोंग सर्वाना कळेल आणि तुझा ढोंगीपणा पण जग जाहीर होईल "

  हे अंकुश सुळे ला केलेले आवाहन अतिशय आवडले
  अंकुश हा अतिशय पुरोगामी विचारांचा आहे आणि तो फक्त ब्राह्मण द्वेष्टा नाही
  समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तो कोणतेही धाडस करायला तयार असतो आणि मला तसेच अनेकाना खात्री आहे की अशा नेक कामात तो कच खाणार नाही
  आज तो या विटाळ विरोधी आंदोलनाची घोषणा करेल अशी मला खात्री वाटते !आम्हा स्त्रियांचे परम दैवत असलेल्या आणि अनेक हिंदू मराठी कुटुंबांची कुलस्वामिनी असलेल्या महालक्ष्मीला वैदिकांच्या शृंखलेतून आणि खोट्या श्र्द्धापासून सोडवणूक करण्याचे इतके मोठे कार्य अंकुश सुळेकरणार आहेत याचा आम्हाला परम अभिमान वाटतो !
  महालक्ष्मीला विटाळा सारख्या ब्राह्मणी विचारातून सोडविण्यासाठी असे बदल झालेच पाहिजेत !
  ब्राह्मणांचे वर्चस्व आता नष्ट होईल आणि सर्व स्त्रीयांचा , अगदी विधवांचा प्रसादाचे लाडू वळायला हातभार लागो हीच आमची विनवणी !
  तेजस्विनी भोईटे

  ReplyDelete
 10. अविनाश आणि अंकुश
  सर्व तरुण पिढीचे नेतृत्व करत कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई च्या देवळातील हि अंध श्रध्दा निर्माण करणारी प्रतिगामी प्रथा बंद करा अशी आमची तुम्हाला विनवणी आहे !स्त्रियांच्या वितालाचा आणि लाडू वळण्यासाठी लागणाऱ्या पवित्रतेचा काहीही संबंध नाही
  मंदिरातील अशा प्रथा पाडणाऱ्या ब्राह्मण वर्गाचा निषेध असो !
  अंकुश आणि अविनाश आगे बढो !

  ReplyDelete
  Replies
  1. Sanjay Sir ,
   I personally discussed this matter with the pujari class of the mahalkshmi temple of kolhapur on 14th of this month
   and i was astonished to learn that the brahmin class have no objection for the preparation of laddus by the women
   Actually they informed us that some very rich maratha class people are objecting for the same and pressuring the pujari people
   "we have nothing to earn from this " said the brahman shri joshi from the temple .
   Now I request the people not to blame the priest class of Mahalaksmi mandir for the policy decisions
   though the high class maratha caste is objecting I very strongly oppose their idea and request the women of Kolhapur State to participate in preparing the Mahaprasad . If any Brahmin or priest is indulging in the matter please point it out to the govt appointed body so that it will be clear + who is the culprit !and the suitable legal action will be taken instantly
   I am very thankful to the mandir team of pujaris for explaining the matter in length ,
   pruthviraj ghorpade

   Delete
  2. Sanjay Sir,

   I also discussed this matter with the pujari class of the mahalkshmi temple of kolhapur. I was astonished to learn that the brahmin class have strong objection for the preparation of laddus by the women
   They informed us that some very rich maratha class people are supporting for the same and pressuring the pujari people.

   "we have strong objection to woman for this cause" said the brahman shri Kulkarni from the temple . I humbaly request the people teach a lession to priest class of Mahalaksmi mandir. I very strongly oppose this idea and request the women of Kolhapur State to participate in preparing the Mahaprasad .

   If any Brahmin or priest is indulging in the matter please point it out to the govt appointed body. so that suitable legal action will be taken instantly

   Delete
  3. काळ सुंदर नावाचा हिजडा पद्मा थिएटर जवळ दिसतो तो हाच का ?

   Delete
  4. होय तो हाच. पद्मा थिएटर जवळ तो तुझ्या बापाच्या शेजारी बसतो. घरी जाऊन बापाला विचारून एकदा खात्री करुन घे.

   Delete
 11. ज्यांना-ज्यांना आंबाबाईचे प्रसादाचे लाडू नको असतील त्यांनी-त्यांनी तिथून प्रसाद म्हणून फक्त चणे फुटाणेच घेऊन का जाऊ नये? ज्यास्तच खुमखुमी असेल तर दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःच संघर्ष का करू नये? आणि हो ते सुद्धा काम-धंदे वगैरे सर्व काही सोडून देवून! त्या आंबाबाईला (महालक्ष्मीला) मासिक पाळी येत नव्हती काय? उगीच काहीतरी नाटक? इतरांना कामाला लाऊन हे मात्र नामानिराळे? जावा भवानी मंडपात तळ ठोकून रहा जोपर्यंत भट-ब्राह्मण लोक प्रसादाचे लाडू स्त्रियांना वळायला परवानगी देत नाहीत तो पर्यंत! समजा भटांनी परवानगी दिली नाही तर तुम्हीही गेलात खड्यात आणि तुमची देवीही! ह्या न्यायाने तुम्ही वागणार काय?

  श्रुती शर्मा

  ReplyDelete
 12. अरेरे !!! काय ही अधोगती! मराठ्यांचे आरक्षण ह्यासारख्या ज्वलंत विषयावर केवळ बारा प्रतिक्रिया? कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही.

  ReplyDelete
 13. माझ्या लेकरा , कस रे अस बोलवत ? इतका सुसंस्कृत तू !आणि तो दुसरा पण !
  तू मम्मी म्हणतोस का आईला ? आई हे किती सुंदर नाव आहे ,
  मासाहेब तर त्याहून भावपूर्ण !हि कुठली अवदसा आठवली ?
  मग वडिलांना पप्पा म्हणत असशीलच ! अरेरे !
  असो तुझे म्हणणे काय , तर मम्मीला पाठवू ! लेका , ऐक माझे वेडा हट्ट धरू नकोस , आमची म्हातारी असल काही वापरत नाही रे बाबा !शेंण गोठा करत जन्म गेला तिचा आणि गाईची वासर सांभाळत, आणि २५ माणसांचा राबता सांभाळत बसल्यावर तिला कसलं देव देव जमतंय ?
  हे जे लिहितो आहेस ते + आम्हा बाया माणसांची अब्रू तुम्ही दोघे पुरुष माणसे अशी उघड्यावर टांगणार ?
  तुम्ही दोघ निनावी पोर कशाला आपली जीभ विटाळवताय ?
  देवाच नाव घ्या , असाल घान घाण लिहिण्यात कुणाचाच फातादा नाही , त्यापेक्षा देवाचा अभंग म्हणा ! देव तुमचे भल करो !

  ReplyDelete
  Replies
  1. मी मम्मीला आई म्हणतो आणि पप्पाला बाबा! आता बोल!!

   Delete