Friday, March 7, 2014

ज्ञान म्हणजे काय? (४)


आपण ज्ञानाची चर्चा करतांना माहितीचे "संहितीकरण" हा शब्द वापरला होता हे आपल्या लक्षात असेल. या संहितीकरणावर जरा विचार करुयात...समजावून घेऊयात.

आपल्याकडे माहिती येते ती सलग क्रमाने व सातत्याने येत नसते. माहिती ही नेहमीच खंडित व क्रमविरहित असते. म्हणजे माहिती कोणत्या क्रमाने हाती येईल याचा अंदाज अभ्यासकांनाही नसतो. जी हवी ती माहिती कोठेतरी उपलब्ध असली तरी ती अभ्यासकाला मिळेलच याची ग्वाही देता येत नाही. अनेक प्रकारच्या जुन्या माहित्या या त्रुटित स्वरुपात उपलब्ध असल्याने मुळात संपुर्ण काय होते हे समजायचाही मार्ग नसतो. प्रत्येक अभ्यासक जगातील यच्चयावत भाषा व लिप्यांचा तज्ञ असू शकत नाही हे अद्याहृत असल्याने भाषांतरे हेच एक साधन बनून जाते. भाषांतरांतही एकवाक्यता असेल असे सांगता येत नाही.

माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेखांच्या वाचनांतच अनेक विवाद आहेत. मग पुरातन भाषांबाबत बोलायलाच नको. त्यात सिंधू लिपीसहित अशा काही लिप्या आहेत ज्यांचे वाचन अद्याप झालेलेच नाही. शिवाय अनेक साधनांची कालनिश्चिती ही अक्षरश: अंदाजाने केलेली असते व त्यातही वाद असतात. उदा. वेदांचा आणि अवेस्ताचा काळ नेमका कोनता याबाबत हजारो वर्षांचा फरक पडेल एवढे विद्वानांचेच अंदाज आहेत. ही उदाहरणे अशासाठी दिली कि माहिती क्रमाने तर कधी खंडित तर कधी त्रुटित अशा स्वरुपात आपल्याकडे येत असते, याकडे आपले लक्ष वेधण्यासाठी. आणि शिवाय माहितीत निर्विवाद परिपुर्णता असेल याची ग्वाहीही देता येत नाही.

उदाहरणार्थ आर्यभटाने पृथ्वी स्थिर नसून स्वत:भोवती फिरते असे निर्विवाद पहिले सिद्धांतन केले हे सिद्धांतनही निर्विवाद नाही. अलीकडे मी आणि डा. आनंद दाबक यांनी मिळून याबाबत जरी स्पष्टीकरणात्मक लिहिले असले तरी ते सर्वमान्य नाही. म्हनजे माहितीत त्रुटी आहे की आकलनात त्रुटी आहे? आर्यभटाने पृथ्वीच्या स्वांगपरिभ्रमणाचा सिद्धांत प्रथम मांडला हे आकलन पुर्वग्रहदोषांमुळे दुर्लक्षिले जाते काय? परमादीश्वर ते नंतरच्या सर्वच भौतिकविदांनी त्याकडे पुर्वग्रहरहित आकलनाच्या अभावात दुर्लक्ष केले कि स्थिर पृथ्वी सिद्धांतच सोयीचा वाटत असल्याने आर्यभटाच्याच माहितीचे स्वत:च्या सिद्धांताला सोयिस्कर होतील असेच अर्थ घेतले?

म्हणजे माहितीच्या संहितीकरणातील ही त्रुटी नव्हे काय?

आपल्याला यावर गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. हाती येणारी प्रत्येक माहिती निरपेक्षपणे, कोणताही पुर्वग्रह मनात न ठेवता त्या माहितीचे आकलन करणे ही ज्ञानाची पहिली पायरी असेल आणि अनेक विद्वान या पहिल्या पायरीवरच स्वहस्ते गारद होत असतील तर त्यांच्या माहितीच्या संहितीकरनाला आणि नंतरच्या सिद्धांतनाला काय अर्थ राहतो? ते सिद्धांतन कसल्याही स्थितीत विशिष्टज्ञान या अवस्थेलाही आलेले नसणार हे उघड आहे. ज्ञानाची तर गोष्टच वेगळी!

माहितीचे संहितीकरण निरपेक्ष आकलनाच्या अभावात प्रामाणिकपणे होणे शक्य नाही हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. स्वत: आदी शंकराचार्यांवर आरोप आहे कि त्यांनी आपल्या ईश्वर आणि ब्रह्म या दोहोंत भेद आहे या त्यांच्या सिद्धांतनाला त्यांनी जरी उपनिषदांचाच वापर केला असला तरी मुळात खुद्द उपनिषदांतच त्याला काही आधार नाही. पण आपले सिद्धांतन निर्विवाद आहे असे भासवण्यासाठी अनेक विद्वान आपल्या कथित माहितीचे संहितीकरण करतांना इतरांच्या अज्ञानाचा उपयोग करून घेतात, हेही एक वास्तव आहे. त्यापेक्षा आपले सिद्धांतन स्वत:चेच आहे, नव्य आहे हे सांगण्यात ते आपली बुद्धी खर्च का करत नाहीत? ही लबाडी नव्हे काय?

त्यामुळे आपण दोन प्रश्नांशी येऊन भिडतो. माहितीचा प्रामाणिकपणा म्हणजे काय आणि माहितीचे पुर्वग्रहदोषामुळे करुन घेतले जाणारे आकलन उपयुक्त ठरु शकते काय हे ते दोन मुलभूत प्रश्न होत!
आणि या प्रश्नांची उत्तरे आपण जोवर शोधत नाही तोवर आपण ज्याला आजवरचे उपलब्ध ज्ञान आहे असे म्हणतो ते तरी कितपत खरे आहे हे समजणार नाही.

पुर्वग्रहदुषित माहितीचे पुर्वग्रहदुषित मनांचे आकलन हे सर्वच क्षेत्रांत असल्याचे आपल्याला दिसून येईल. मग ते कायदेशास्त्र अथवा विज्ञान का असेना. त्यामुळे होणारी अभिव्यक्ती ही अज्ञानपुर्ण असून अगदी विशिष्ट-ज्ञानाचीही पायरी ते गाठू शकत नाही हे आपल्या लक्षात येईल. एखाद्या सिद्धांतनाच्या अनिवार प्रेमात पडून सारी घटिते त्याच सिद्धांतनाच्या चौकटीतून पाहिल्याने काय अनर्थ होऊ शकतात हे आपण भौतिकी शास्त्राच्याच क्षेत्रात पाहत आहोत.

हा मानवी गूण आहे कि दुर्गूण?

कि त्याचेही सिद्धांतन करणे आवश्यक आहे?

यावरही आपल्याला विचार करने आवश्यक आहे. आपण माहितीकडे जोवर निरपेक्षपणे पाहत नाही, जोवर आपण सोयीची माहिती घेत गैरसोयीची माहिती अकारण टाळतो आणि सोयीच्या माहितीच्या आधारे तिचे संहीतीकरण करत कोणतेही सिद्धांतन करतो ते "विशिष्ट-ज्ञान" या पातळीलाही कधीही येवू शकनार नाही.
मग ज्ञान काय हे समजणे तर लांबची गोष्ट राहिली.

(क्रमश:)



11 comments:

  1. आप्पा - ज्ञान म्हणजे काय (१) (२) (३) (४) ---(५०)-- (१००)
    बाप्पा - संपणार की नाही हि गाडी ?
    आप्पा - खिलाडी , खिलाडीयोंके खिलाडी ,खतरोंके खिलाडी किंवा रॉकी १ रॉकी २ रॉकी ४० -५०
    आप्पा -मनमोहन देसाई झाला संजयचा !
    बाप्पा - आणि शब्द किती जाड जाड - बापरे ! संहितीकरण ,सिद्धान्तन ,
    आप्पा - दुसरे म्हणजे आपल्याला सर्वज्ञान झाले आहे असेपण भास होतात हल्ली त्याला असे वाटू लागले आहे . कारण आधी एके ठिकाणी त्यांनी अंकुश सुळे आणि संदीप देशपांडे यांच्या मध्ये पडून , सूत्रे हाती घेत , एकदम संदीप देशपांडे वर भडीमार करताना इतके तारतम्य सोडले आहे !
    बाप्पा - हो ना , आणि वर त्याला दोष देण्याचा प्रयत्न ! म्हणजे कहरच !
    आप्पा - खरेतर ज्ञानाने माणसे अंतर्मुख होतात , पण इथे वेगळेच चालले आहे,मंडई झाली अगदी !
    बाप्पा - आर्यभट आणि आद्य शंकराचार्य यांच्या चुका ! आणि त्यांची दुरुस्ती !लोकाना परत विचारतात ,अहो तुम्ही वेद वाचले आहेत का ?जसे काही यांचे वेद पाठच आहेत !खरेतर वेद हि गोष्ट इतकी जुनी वगैरे झाली आहे की त्याची झळ आत्ताच्या दिवसात कुणालाच बसता कामा नये ,
    आप्पा - आज आपण शिवाजीच्या चुका काढत बसतो का ?आणि पुरुषसुक्त वाचल्यावर अजिबातच त्यात कुणाचा अपमान केला आहे असे वाटत नाही - संजयने हा आव का आणला आहे तेच कळत नाही ! आजच्या शेरोशायरी आणि गझल मध्ये अशा कितीतरी गोष्टी असतात वेद म्हणजे शेवटी काय आहे ? नियमावली थोडीच आहे ?
    बाप्पा - जर पुरुषसुक्त म्हटलेले चालत नसेल तर "शिलाकी जवानी " म्हणत जा - मिरवणुकीत गणपतीसमोर नाहीतरी असला भादवा बघायला मिळतोच !
    आप्पा - मला खरच कळत नाही , रा चिं ढेरे हे संशोधन करतात , य दि फाटक करत , - सेतुमाधव करत , पण ते असली रिकामटेकडी शब्द बंबाळ वादावादी करत नसत ,खरच हिमालयासारखे लिखाण करूनही शांत !मनाने आणि विचाराने समृद्ध आणि परिपक्व !
    बाप्पा -आपला विषय आणि त्यावर अजून चिंतन , सखोल मनन ,न संपणारी क्रिया आणि यातून सतत आत्म परीक्षण ! असा हा त्यांचा ज्ञान यज्ञ असायचा !
    आप्पा - आणि इथे बघावे तर सतत वैदिकांची हेटाळणी , ब्राह्मणांची नाचक्की !
    बाप्पा - यांची अवस्था आप पार्टी सारखी झाली आहे !
    आप्पा - दे टाळी ! अगदी एका शब्दात संपवलास बघ विषय - मानला तुला !
    बाप्पा - खरच पाया पडावेसे वाटते हि आपली सवयच आहे !पण हे असले लेखक ब्राम्निरास करतात
    आप्पा - सर्वच ,साळुंखे असोत , सुळे असोत नाहीतर सागर भंडारे असो ,सगळेच ब्राह्मण द्वेषाची कावीळ झालेले + कीव येते असल्या लोकांची !
    बाप्पा - चला फुले शाहू आंबेडकर वाले , ऐसा मोका गवाना मत - निवडणुका ज

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा-बापा, आदी शंकराचार्यांवर मी आरोप केला नसून तो गेली हजार वर्ष आहे...! चुकीच्या आकलनातुन येणारा सिद्धांत कितपत मान्य हौ शकेल याची चर्चा करण्यासाठी तो घेतला आहे. आर्यभटावर जुनेच स्थिर पृथ्वी सिद्धांताला पुढे नेण्यासाठी परमादीश्वर ते नंतरचे सारे भारतीय भौतिकविदांनी त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. त्यावर माझा-आनंद दाबकांचा लेख ब्लोगवर आहे.
      राहिले पुरुषसुक्ताबाबतच्या वादाचे...तो राहणार कारण दुसरी बाजू दुराग्रही आहे. संतांची वेदांबाबतची वचने फेकून पुरुषसुक्ताचे समर्थन करता येत नाही. या सुक्तातुनच ऐतरेय ब्राह्मण ते मनुस्मृतीतून असा विषमतेच्या तत्वज्ञानाचा फैलाव झालेला आहे. त्याला तुमचेही समर्थन असेल तर तुम्ही धन्य आहात एवढेच!

      Delete
  2. पांडुरंग हिंदुंचा देव असेल तर त्यावर लिहिताना तसे लिहा ,
    मध्येच हिंदू हा धर्मच नाही , असे म्हणायचे
    पांडुरंग हा बौद्ध आहे किंवा जैन आहे अशा चर्चा करत बसायच्या , मध्येच पुंडलिक आणि शैव संबंध याबद्दल लिहायचे आणि परत म्हणायचे कि इथे पुरुषसुक्त म्हणू नका
    पुरुषसुक्त म्हटलेले चालत नसेल तर म्हणू नका ,
    शिव काय किंवा विष्णू काय इतके विनोदी आहेत + सदा सर्वदा भोळेपणा आणि आपले भक्तप्रेम यामुळे सगळ्या जगाला संकटात टाकत राक्षसाला नको ते वर देत असतात ! हे इतकेही यांना कळत नाही ?या कथाही ब्राह्मणानीच रचल्या असतील तर तशी बोंब मारा आणि सगळ्या कथांची होळी करा आणि या दोन्ही देवांची किंवा अशा फालतू आशीर्वाद देणाऱ्या सर्व देव + देवींची एकत्रित यादी करून एक सभा घेऊन हेटाळणी करा !
    अहो संजय सोनावणी - देव असतो का कधी ? उगीच कशावरून काहीतरी वाद पेटवत ठेवायचा बिनडोकपणा का करत असता आपण ?देव आणि हे अवतार सर्व थोतांड आहे !
    बोल बोल आता तोंड लपवू नका !
    ज्या श्रद्धेवर तुमचा विश्वासच नाही अशा श्रद्धांची काळजी कशाला करत बसताय ?

    ReplyDelete
  3. आप्पा -कोणताही सुजाण माणूस देव हि कालबाह्य कल्पना आहे असे सांगेल तसेच आमचे आहे
    बाप्पा - चिंता एकच आहे ,आपण सरळ सरळ एखादी चळवळ का नाही उभी करत नाही ?
    आपण महान आहातच आपणास सर्व मार्ग माहित आहेत काय कसे घडवून आणायचे त्याबाबत जान आहे त्याबद्दल आम्हास अभिमान पण वाटतो आपला ! आम्हास इतकेच म्हणायची इच्छा आहे !
    बाप्पा - कोणाचे समाधान होणार आहे पुरुषसुक्त बंद केल्याने ?आपण जे जितके सुक्त दाखवले त्याच्या वाचनात काहीच गैर जाणवले नाही एक समाजाचा भाग हा कल्पनेने पुरुषाचा पाय आहेएक हात आहे असे म्हणत गेले तर काय बिघडले ?पाय हा हातापेक्षा गौण आहे हा शोध म्हणजे अतीच होते आहे !
    आप्पा - आणि दुसरे म्हणजे सरळ सरळ पांडुरंगासमोर निदर्शने करावीत , नुसते लेख लिहून चुकीचे मार्ग दर्शन होते असे आम्हास वाटते कारण प्रत्यक्ष कृती करणे महत्वाचे !
    बाप्पा - आम्हास धर्म देव काहीच मान्य नाही , पण आम्ही तसे ओरडा करून जगास का सांगावे ? ते योग्य होणार नाही - या वैयक्तिक गोष्टी आहेत पहाटेच्या पूजेत समजा पुरुषसुक्त म्हणत असतील तर एखाद्या समाज घटकाचे समाधान होत असेल म्हणून तर ते चालू आहे आपणास दुसरे काही हवे असेल तर तसे योजन करता येईल ,त्यात काही गैर नाही वाटत , उलट हि जागृती स्वागतार्ह आहे ,परंतु एखादी गोष्ट बंदच पाडूया असा आग्रह हा योग्य आहे का ? कुणी काही चुका केल्या असतील तर त्याची उजळणी करत जायचे आणि दुरुस्ती करायचे ठरवले तर मग श्रीराम , श्रीकृष्ण ,शिवाजी महाराज ,
    म गांधी असे करत आपणास आयुष्य पुरणार नाही असा उद्योग करावा लागेल -
    आप्पा - शेवटी अशी अवस्था होईल - संजय सोनावणी काय करतात हल्ली ?
    बाप्पा - अहो ते जुने कागदपत्र धुंडाळत सारखे पुटपुटत असतात सत्यनारायण बंद करा ,गीतापठन बंद करा ,विष्णूला बेल वहा आणि शिवाला तुळस वहा ,पांडुरंग हा खरेतर देवच नाही खरा पंढरपूरचा देव आहे पुंडलिक !
    आप्पा - आम्हाला इतकेच आदरपूर्वक सांगायचे आहे की कधीकधी संशोधन एक सांगते आणि परंपरा दुसरीच असते ,शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेले किल्ले हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत पण आज श्रेय देताना आपण सर्व शिवाजीलाच देतो ,तानाजी पूर्वी कोंढाणा अनेक वर्षे आहेच ,म्हणून शिवाजीने कधी तो संपूर्ण भगव्या रंगाने रंगवला नाही किंवा गंगाजलाने धुतला नाही ,बाप्पा - म गांधी यांनी बेरजेचे राजकारण केले ,पण आजकाल चालले आहे ते सुडाचे राजकारण !
    आम्ही नेहमी सांगत असतो त्याचा अर्थ ब्राह्मणाना नोकऱ्या बंद झाल्यावर ते स्वखर्चाने कर्ज काढून शिकून परदेशात जाऊ लागले त्यात भारताचा फायदाच असतो !नोन रेसीदंट भारतीय म्हणजे ते भारतीयच असतात ,फक्त इथले वातावरण गढूळ असल्यामुळे ते इथून अधिक चांगल्या ठिकाणी जातात
    आप्पा - आणि घुसमटून जाणारे राजकारण आल्यावर इथून निघून विश्वभर जाणे आणि आपल्या कक्षा रुंदावणे हे नैसर्गिकच नाही का ?मेंदू आणि बाहू शाबित असेल तर पुरुषार्थ दाखवण्यात काहीच गैर नाही ! आणि एन आर आय असणे हे राष्ट्राला भार नसून अभिमानाची गोष्ट असते , सरकार त्याना जास्त सूत देत असते !त्यांचे नेहमी इथे स्वागत असते !ते का ?
    बाप्पा - आत्ताच्या काळाचे नियम पुर्वासुरीना लावत बसायचे ठरले तर शिवाजीने अनेक लग्ने केली हा टीकेचा विषय होईल , पांडव क्षत्रिय असताना आपली जबाबदारी न ओळखता आपले राज्य जुगारात हरले हा क्षत्रीयांवर ठपका येतो , म्हणूनच आजचे गुणदोष हे आजचे आहेत , त्याना मागे ढकलता येत नाही नाहीतर कुंतीला तुरुंगवासाच होईल !कर्णाला त्यगल्याबद्दल !

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा बाप्पा, काय रे दुतोंड्या ! अगोदर आग लावायची, नंतर त्यात तेल ओतून भडकवायचे आणि शेवटी शेंडी वरून पाणी गेलेकी स्वतःला नामानिराळे करायचे. मग काय, देवच कालबाह्य. मस्तच!

      Delete
  4. अंकुश सुळे साहेब ,
    वैदिक द्वेषाची प्रखरता किती आहे ? मानवतावादाच्या पेक्षा जास्त ?
    मुसलमान सोडून वैदिक ठेचावा असे वाटते का ?
    त्यापेक्षा " अवघे धरू सुपंथ " असे का वाटत नाही ?
    एखाद्या तत्व ज्ञानाच्या आहारी किती जायचे ? इतका तत्व ज्ञानाचा पगडा असणे ही एक मानसिक आजाराची स्थिती असावी असे नाही का वाटत ?
    पुस्तके वाचावीत पण त्यांचे गुलाम नसावे ! डॉक्टर असे वागतो का ? तुका म्हणे ऐशा नरा वगैरे ठीक आहे ,तसे तुकाराम महाराज बरेच काही म्हणतात , अनेक वेळा परस्पर विरोधीही बोलतात
    वैष्णव आणि शैव एकच असल्याचे पण सांगतात !तुकाराम हे ब्राह्मण नाहीत ही एकाच गोष्ट आपणास आकर्षक वाटते का ? सदानंद मोरे यांनी असेच सुरु केले आहे -एकनाथांची आठवण होत नाही त्याचे कारण तुमच्या तोंडातून येईल का ?
    याच विषयावर इथेच वाघ्या धनगर अशा नावाने कुणीतरी किती छान लिहिले आहे
    संत तुकाराम वैष्णव असे भेद मानत होते का त्याचा पण संदर्भ दिला आहे त्या ठिकाणी !
    त्रिशुलावरी काशीपुरी चाक्रावारती पंढरी
    दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे
    एक विभूतीचा गोळा एका केशर कस्तुरीचा टिळा
    एका भूजंगाची माळ एका वैजयंती हार
    एका अर्धांगी पार्वती एक लक्ष्मीचा पती
    एक नंदीवरी असे एक गरुडावरी वसे
    तुका म्हणे हरिहर एका वेलांटीचा फेर
    आणि
    आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना
    प्राकाराच्या संगे रवी बिघडला
    रवी बिघडला प्राकाराची झाला
    सागराच्या संगे नदी बिघडली
    नदी बिघडली सागराची झाली
    परिसाच्या संगे लोह बिघडले लोह बिघडले सुवर्णची झाले
    पांडूरंग संगे तुका बिघडला
    तुका बिघडला पांडुरंग झाला
    एका जनार्दनी गोपी बिघडल्या
    गोपी बिघडल्या श्रीकृष्णमय झाल्या

    या सर्वाना हे पुरुषसुक्त ऐकू येतच असेल , पण त्यांच काहीच बिघडलं नाही !
    किती साली हे सुरु केले त्या ब्राह्मणांनी याचा पुरावा आहे का काही ?
    संपूर्ण वारकरी चळवळ हे पुरुषसुक्त पांडुरंगा समोर चालू आहे म्हणून अडून नाही बसली
    मग तुम्हीच असे कसे ?
    राजकारण करायचे आहे का ? हा हा हा sss करा करा करा !!!
    तुमचा आत्मा शांत होऊ दे एकदा !किती दिवस असे स्वतःला फसवत राहाल ?
    माझी काही समजूत वेगळीच होती कारण म फुले असोत किंवा इतर कुणी सर्वांचे म्हणणे एकाच आहे की त्याना देवाकडे जाताना ब्रोकर नको आहेत ,ब्राह्मण नको आहेत कारण त्यांच्या हातात देवळाच्या चाव्या आहेत - इथपर्यंत समजू शकते पण हाच ब्राह्मण द्वेष ज्या वेळेस सामाजिक रूप धारण करतो त्यावेळेस ती विकृती होते ,मन्दिराबाहेर्चा ब्राह्मण द्वेष हि विकृती आहे !

    संजय सोनावणी ,
    आपण आदर्श समाज रचना आपल्या मनात काय आहे ते सांगाल का ?
    आदर्श धर्म कल्पना काय आहे ते सांगाल का ?आपण नुसते बडबडे आहात असे अनेकाना वाटते , अगदी भल्याभल्याना , म्हणुनतर आपण आहात तिथेच आहात असे ते समजतात हे आपल्या कानावर आले असेलच , पण त्यामुळे आमच्या सारख्याना फार फार वाईट वाटते कारण आपल्याकडे वाद घालायचे कौशल्य आहे , मांडणीची जाण आहे , आणि मला एक सांगा , अगदी मनापासून , असा एक दिवस उजाडला ,
    समजा ,
    असा दिवस उजाडला -सर्व वैदिक वाग्मय वैदिकांनी स्वतःच नष्ट केले
    सर्व समाज शैव झाला किंवा अवैदिक झाला तर सर्व समस्या संपतील का ?आपले जगणे एकदम सोपे होईल का ? आपण असे प्रश्न अनुत्तरीत ठेवू नका !उत्तर द्या !
    अनेकतेतच एकता आहे हा भारताचा आत्मा आहे

    ReplyDelete
    Replies
    1. "असा दिवस उजाडला -सर्व वैदिक वाग्मय वैदिकांनी स्वतःच नष्ट केले"-------------------->

      तर तो दिवस जगातील मानवी स्वातंत्र्याची नांदी ठरेल !

      Delete
    2. अंकुश ,
      अरे लबाडा !
      आता मला सांग आपण नियतीच्या साक्षीने १५ ऑगस्ट ला आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो , नंतर त्याच देशाची डॉ आंबेडकर यांनी इतर अनेक लोकांसह घटना लिहिली - त्यामध्ये बाबू राजेंद्र प्रसाद , कन्हैयालाल मुन्शी , चक्रवर्ती राजगोपालचारी ,वल्लभभाई पटेल ,गोविंद वल्लभ पंत , सरोजनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित असे लोक होते ती ती कृष्णाम्माचारी होते सर्वांनी डॉ आंबेडकर याना अध्यक्ष नेमले आता इतके सर्व झाल्यावर १९५० ला आपण सार्वभौम प्रजासत्ताक झालो आणि आपली घटना हा आपला कायदा बनला आणि जे काही करायचे ते त्या चौकटीतच करायचे असे ठरले
      अरे अंकुश बाळ , आता परत कसली मानवी स्वातंत्र्याची गोष्ट ? आपण बनवली ती काय जनावरांची घटना होती का ?
      बेटा , एक सांग मला ,तुझे वय किती आहे , तुला लिहिता वाचता नक्कीच येते ,मग तुला थोडे चिंतन करायला काय हरकत आहे , जमेल हळूहळू ,पहिल्या वेळेस कंटाळा येईल ,
      सगळ्याच बाबतीत पहिल्या वेळेस त्रास होतो , आईला विचार !
      नंतर कळेल तुला की आपण बोलतो तितके हे सोपे नाही बदल करणे वगैरे !
      एक सांगू का , अनेक वर्षे माझ्या मनात इच्छा आहे की कोल्हापुरात प्रसादाचे लाडू वळायचे काम स्त्री वर्गाने करावे , अनेक , हजारो स्त्रियांची तशी इच्छा असेल !
      पण हा वितालाचा मुद्दा आड येतो + आता याबाबतीत तू पुढाकार का घेत नाहीस , म्हणजे तुझे पुरोगामी मुखावात्याचे सोंग सर्वाना कळेल आणि तुझा ढोंगीपणा पण जग जाहीर होईल
      बघू या आता कसा प्रतिसाद देतो ते , विषय टाळू नकोस !यात ब्राह्मण असतील तर त्यांचा विरोध कर , चळवळ कर , पुरोगामित्व सिद्ध करायचा इतका सुंदर मोका परत येणार नाही ,
      जे काही करायचं ते आईला विचारून कर आणि शाळा न बुडवता कर हं

      Delete
  5. संजय सर ,
    " एक सांगू का , अनेक वर्षे माझ्या मनात इच्छा आहे की कोल्हापुरात प्रसादाचे लाडू वळायचे काम स्त्री वर्गाने करावे , अनेक , हजारो स्त्रियांची तशी इच्छा असेल !
    पण हा विटाळाचा मुद्दा आड येतो + आता याबाबतीत तू पुढाकार का घेत नाहीस , म्हणजे तुझे पुरोगामी मुखवट्याचे सोंग सर्वाना कळेल आणि तुझा ढोंगीपणा पण जग जाहीर होईल "

    हे अंकुश सुळे ला केलेले आवाहन अतिशय आवडले
    अंकुश हा अतिशय पुरोगामी विचारांचा आहे आणि तो फक्त ब्राह्मण द्वेष्टा नाही
    समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तो कोणतेही धाडस करायला तयार असतो आणि मला तसेच अनेकाना खात्री आहे की अशा नेक कामात तो कच खाणार नाही
    आज तो या विटाळ विरोधी आंदोलनाची घोषणा करेल अशी मला खात्री वाटते !आम्हा स्त्रियांचे परम दैवत असलेल्या आणि अनेक हिंदू मराठी कुटुंबांची कुलस्वामिनी असलेल्या महालक्ष्मीला वैदिकांच्या शृंखलेतून आणि खोट्या श्र्द्धापासून सोडवणूक करण्याचे इतके मोठे कार्य अंकुश सुळेकरणार आहेत याचा आम्हाला परम अभिमान वाटतो !
    महालक्ष्मीला विटाळा सारख्या ब्राह्मणी विचारातून सोडविण्यासाठी असे बदल झालेच पाहिजेत !
    ब्राह्मणांचे वर्चस्व आता नष्ट होईल आणि सर्व स्त्रीयांचा , अगदी विधवांचा प्रसादाचे लाडू वळायला हातभार लागो हीच आमची विनवणी !
    तेजस्विनी भोईटे

    ReplyDelete
  6. अविनाश आणि अंकुश
    सर्व तरुण पिढीचे नेतृत्व करत कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई च्या देवळातील हि अंध श्रध्दा निर्माण करणारी प्रतिगामी प्रथा बंद करा अशी आमची तुम्हाला विनवणी आहे !स्त्रियांच्या वितालाचा आणि लाडू वळण्यासाठी लागणाऱ्या पवित्रतेचा काहीही संबंध नाही
    मंदिरातील अशा प्रथा पाडणाऱ्या ब्राह्मण वर्गाचा निषेध असो !
    अंकुश आणि अविनाश आगे बढो !

    ReplyDelete
  7. आभार तेजस्विनीभोइटे ताई
    आणि धन्यवाद संजय सोनवणी सर +
    अविनाश आणि अंकुश सुळे यांची दातखीळ बसली
    आता या विटाळाच्या भ्रामक समजुतीला दूर करण्याचे आवाहन केल्यावर दोघांनी शेपूट घालून पळ काढला !हे औत घटकेचे पुरोगामी असेच असतात ,यांना स्पेसिफिक कार्य क्रम दिला की हे बोलबच्चन
    धूम ठोकतात

    श्री देशपांडे यांची कोंडी करून या भडक बटबटीत लोकांना काय साधायचे होते ?
    मोहिनी तिनी सुंदर विचार मांडले आहेत
    संत तुकारामांनी शैव आणि वैष्णव यांच्यावर केलेला अभंग थोरच आहे !

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...