Monday, March 24, 2014

तरच आपण स्वतंत्र असतो!

लोकांना आजही भाकडकथा सांगत,
कोणाचे तरी काल्पनिक भय दाखवत,
ठसवत,
प्रसंगी आक्रमक होत
वैचारिक गुलाम निर्माण करणा-या
संघटनांचे
आणि त्यांचे गुलाम असणा-या
कथित विचारवंतांचे
आज प्राबल्य वाढत आहे.

मित्रहो, काल्पनिक भयाने भयभित होऊ नका...
भयदायक असे संपुर्ण विश्वात काहीएक नाही
स्वत:ची स्वतंत्र बुद्धी वापरा...
संघटना बनवणे हाच मुळात गुलामीकडे जायचा
आणि इतरांनाही
वैचारिक गुलामीच्या गटारात
नेण्याचा मार्ग आहे
त्यापासून नेहमीच सावध रहा!

आदिमानवाने झुंडी बनवल्या
काल्पनिक भयापोटी
टोळ्या बनवल्या
तो टोळीवाद आजही जीवंत किती!

भेकड लोकच झुंडी बनवतात...टोळ्या बनवतात...
संघटना बनवतात...
भेकडांना अधिकच भेकड बनवतात
भेकडाची हिंसकता अधिकच भयावह असते
आणि यच्चयावत विश्वात
अशा भेकडांच्या यादीत जावू नका
स्वतंत्र व्हा
स्वत:चे विचार विकसनशील ठेवा
कोणाही गतकाळातील
वर्तमानातील
महापुरुषांना अंतिम मानू नका
विश्वात मुळात अंतिम असे
काहीएक नाही
पुढे चाला...
अग्रगामी व्हा...जसा काळ अग्रगामी असतो...

तरच आपण स्वतंत्र असतो.
तीच ख-या स्वातंत्र्याची महत्ता आहे! 

16 comments:

  1. खूप छान रचना...

    ReplyDelete
  2. एक अत्यंत विचारी लेखन !प्रतिभा आणि विचार आणि चिंतन यातून साधलेली उत्तम कविता
    अनेक १०० पाणी पुस्तकांचे काम करून जाते ही कविता !
    अभिनंदन संजय सर +

    ReplyDelete
  3. faarach mast zaali aahe buva !!!
    bhatti mast jamali aahe
    ti pelayala kunitari natsamratach hava =
    " पृथ्वीची उलथापालथ तर झाली नाही ना ? "
    अशी पल्लेदार फेक करणारी मर्दानी फुफ्फुसे हवीत
    हे ब्राह्मणी पुळचट लोकांचे काम नाही
    त्यांनी संस्कृत पोकळ पाठांतर करत त्यावर जगावे !

    ReplyDelete
    Replies
    1. जिकडे तिकडे आपला ब्राह्मणद्वेष दाखवून यांना कोणते सुख मिळते, कुणास ठावूक. कशाचाही संबंध फक्त ब्राह्मणांविरुद्ध लावण्याची कदाचित नवीन प्रथा सध्या चालू आहे असे दिसते.

      Delete
    2. काय हो करंजकर ,कारंजकर
      तुम्ही ब्राह्मण आहात का हो ?
      कोकणस्थ , देशस्थ , यजुर्वेदी,ऋग्वेदी ,कऱ्हाडे , देवरूखे का शेणवी ?
      आपस्तंभी, अश्वलायन नेमके कोणते ?
      इतका राग आलाय नाकावर म्हणजे कोकणस्थच असणार !
      कारण बाकीचे ओळखूच येत नाहीत ,
      म्हणायचे नावाला ब्राह्मण बाकी सर्व आनी पानी गावढळ !
      समिता गोखले

      Delete
    3. म्हणायला देशस्थ ब्राह्मण आहे, पण सध्या फक्त माणूस म्हणून जगतो, आणि राग म्हणाल तर तुमच्या सारख्यांचा कधी येतच नाही. हां, पण तुमची कीव करावीशी वाटते. चिखलात राहणाऱ्या बेडकाला समुद्राचे काय महत्त्व असणार. चालू द्या तुमचे. व्यत्यय आणल्याबद्दल क्षमस्व. गटारातच आनंदी असा.

      Delete
  4. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
    संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

    चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
    अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको

    नास्तिकपणात शिरुन जनांचा बोल आपणा घेउ नको
    भलीभलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको


    मायबापावर रुसू नको
    तू एकला बसू नको
    व्यवहारामधे फसू नको
    कधी रिकामा असू नको
    परी उलाढली भलत्यासलत्या पोटासाठी करू नको
    संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

    वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलु नको
    बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा; झटु नको
    मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहु नको
    एकाहुनि एक चढि जगामधि थोरपणाला मिरवु नको

    हिमायतीच्या बळे गरिबगुरिबाला तू गुरकावु नको
    दो दिवसांची जाईल सत्ता, अपयश माथा घेउ नको
    बहुत कर्जबाजारी हो‍उनी ओज आपुला दवडू नको
    स्नेह्यासाठी पदरमोड कर परंतु जामिन राहु नको

    विडा पैजंचा उचलु नको
    उणि तराजू तोलु नको
    गहाण कुणाचे बुडवु नको
    असल्यावर भिक मागू नको
    नसल्यावर सांगणं कशाला, गाव तुझा; भिड धरु नको
    कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेची चोरी नको

    दिली स्थिती देवानं तीतच मानी सुख, कधि विटु नको
    आल्या अतिथ्या मुठभर द्याया मागं पुढती पाहु नको
    उगिच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
    बरी खुशामत शाहण्याचि ही, मूर्खाची ती मैत्रि नको

    आता तुज ही गोष्ट सांगतो, सत्कर्मा ओसरू नको
    असल्या गाठी धनसंचय कर, सत्कार्यी व्यय हटु नको

    सुविचारा कातरु नको
    सत्संगत अंतरू नको
    द्वैताला अनुसरू नको
    हरिभजनविण मरू नको
    गावयास अनंत फंदीचे फटके मागे करू नको

    सत्किर्तीनं मतीचा डंका वाजे मग शंकाच नको

    अनंत फांदीची आठवण करा !!!

    ReplyDelete
  5. आदिशक्ती आणि आदिनाथ यांच्या वरद हस्ताने संजय सोनावणी यांच्या प्रतिभेला नवे नवे धुमार फुटत आहेत ,सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर असे मार्मिक भाष्य करणे फार अवघड आहे पण त्यांनी ते समर्थपणे केले आहे आणि त्यातही कुणावर कोणतीही खाजगी टीका न करता हे विशेष !
    आजच्या सारख्या परिस्थितीत लोक आपले स्वातंत्र्य गहाण ठेवून त्याच्या बदल्यात स्थिरता आणि समृद्धी मिळवण्याचा नादानपणा करतील हा धोका आहेच ! आणि नरेंद्र मोडी यांच्या सारखे नेतृत्व असल्यावर , हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती यांचा उदोउदो करण्याचे तंत्र लोकप्रिय होण्यास वेळ लागणार नाही ,आणि आपण हि शेवटची खुली निवडणूक झाल्याचे पुढील गुलामीत आठवत बसू असापण धोका आहे !त्यामुळे हा जागे राहण्याचा संजय सोनावणी यांचा सल्ला कवितेच्या रूपाने मांडून त्यांनी त्या विचाराला अमर बनवले आहे
    अशावेळी खालील जिब्रान यांच्या कवितेची आठवण होते !

    ReplyDelete
  6. सोनवणी यांचे कौतुकाच केले पाहिजे !
    एकप्रकारे हा मुक्तछंदातील फटकाच आहे ,
    कुणीतरी अनंत फंदी यांचा फटका प्रतिसाद स्वरूपात देऊन मजा आणली आहे !
    २०० वर्षांनी अनंत फांदी नंतर असा योग आला !याचे क्रेडीट कुणाला ? ढासळलेल्या परिस्थितीला ? का संजय यांच्या जिवंत प्रतिभेला ? का हा कालाचा महिमा आहे ?
    आपण जर नीट विचार केला तर समाजातील वाईट गोष्टींची भीती तमा न बाळगता आपण आपला मार्ग निर्धाराने क्रमात राहणे हेच आजच्या परिस्थितीत एक महान समाजकार्य आहे आपले विचार आपण श्रद्धेने आचरणे हीच आज देशसेवा आहे !

    प्रथमेश अरगडे

    ReplyDelete
  7. "वैचारिक गुलाम निर्माण करणा-या
    संघटनांचे
    आणि त्यांचे गुलाम असणा-या
    कथित विचारवंतांचे
    आज प्राबल्य वाढत आहे."

    - हे खुद्द सोनावणींकडे पाहूनच लक्षात येते!

    ReplyDelete
  8. आप्पा - आपण सोनावणींच्या बद्दल असा ग्रह करून घेणे अत्यंत दुर्दैवी आहे !
    बाप्पा - सोनावनिंचे दुर्दैव नाही तर तुमचे दुर्दैवी म्हटले पाहिजे
    आप्पा - संजय अजिबात वैचारिक गुलाम निर्माण करणा-यासंघटनांचे
    आणि त्यांचे गुलाम असणा-याकथित विचारवंतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत
    बाप्पा - आम्हीसुद्धा तांची भरपूर खिल्ली उडवली आहे
    आप्पा - आणि ती त्यांनी अत्यंत हसत खेळत परतवली आहे आणि तेच त्यांच्या स्वभावाचे बलस्थान आहे
    बाप्पा - सौंदर्य आहे !
    आप्पा - वैचारिक मतभेद असूनही एखाद्याच्या लिखाणातील बल स्थानाने ते भारावले जातात हेच त्यांच्या सुसंस्कृत पणाचे उदाहरण होय !अशी व्यक्ती सामाजिक जीवनात वैचारिक मार्ग दर्शन करताना काहीसे हट्टीपणाने आपले सिद्धांत पुनः पुन्हा मांडत कदाचित इतरांवर अन्याय करतही असेल ! पण म्हणजे त्यांनी कोणाची वैचारिक गुलामी पत्करली आहे असे नाही !
    बाप्पा - अशी उथळ टीका करणे आपण थांबवून पुनर्विचार करणे योग्य ठरेल !

    ReplyDelete
    Replies
    1. या विश्वासाबद्दल धन्यवाद आप्पा-बाप्पा. मते पटणे अथवा न पटणे, विरोध करणे अथवा शिव्या घालणे याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे आणि त्यांचा अनादर माझ्याकडून कधी झाला नाही आणि होणारही नाही. मल जे वाटते ते मी मनापासून लिहितो, एवढेच!
      आपल्याला सहप्रवासी हवेत, अनुयायी नकोत हीच माझी भुमिका आहे.

      Delete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...