Friday, April 4, 2014

संतश्रेष्ठ तुकारामांचा खून झाला का?


तुकाराम बीजेच्या दिवशी संत तुकारामांचा खून काही ब्राह्मणांनी केला, प्रेताची विल्हेवाट लावली आणि ते सदेह वैकूंठाला गेले अशी अफवा पसरवली असे काही लोक गेल्या आठवड्यात फेसबूकवर पसरवत आहेत हे पाहिले. तसा हा आरोप नवा नाही. या आरोपावर लिहावे असेही काही नव्हते परंतू गुढीपाडव्याचा संबंध शंभूराजांच्या हत्येशी जोडणे चुकीचे आहे असे मी लिहिल्यानंतर मला तुकाराम महाराजांच्या खुनाच्या बाबतीत सत्य काय हे विचारणारे बरेच खाजगी संदेश व फोनही आले.

या बाबतीत उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर सहज लक्षात येणा-या बाबी अशा-

१) तुकाराम महाराजांच्या जन्मतिथी व वर्षाबद्दल एकमत नसल्याने ते मृत्युसमयी किती वयाचे होते हे सांगता येत नाही. काही तज्ञ तुकारामांचे जन्मवर्ष १५७७, १६०२ वगैरे देतात तर देहुकर परंपरेने १६०९ हे वर्ष देतात. म्हणजे जवळपास ३२ वर्षांची तफावत येते. ही थोडकी तफावत नव्हे हे सहज लक्षात येईल.

२) तुकारामांचा देहांत सन १६५० मद्ध्ये झाला याबाबत मात्र दुमत नाही. जर जुन्यातील जुने जन्मसाल १५७७ मानले तर तुकाराम महाराज मृत्युसमयी ८३ वर्षांचे होते व १६०९ मानले तर ४१ वर्षांचे होते असे मानावे लागते.

३) देहू व लोहगांव ही स्थाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपर्यंत आळीपाळीने कधी आदिलशाही तर कधी निजामशाहीत होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न १६४५ पासून सुरु केला. देहू-आळंदी ही गांवे तत्पुर्वी शहाजी महाराजांच्या (नंतर शिवाजी महाराजांच्या) जहागिरीत येत होती कि नाही याबाबत ठामपणे सांगता येईल असे पुरावे मला उपलब्ध नाहीत. परंतू ही गांवे पुण्याच्या निकट असल्याने ती जहागिरीतच असावीत असा तर्क करायला वाव आहे.

४) तुकाराम महाराज हे आपल्या हयातीतच अत्यंत प्रसिद्ध संत बनले होते हे त्यांच्या जीवनचरित्रावरून लक्षात येते. मंबाजीशी त्यांचा झालेला संघर्ष विख्यात आहेच. एक शूद्र गुरु बनतो, उच्च प्रतीची काव्यरचना करतो, समतेची भाषा करतो-पसरवतो हे तत्कालीन कर्मठ ब्राह्मणांना सहन होणे शक्य नव्हते, त्यामुळे संघर्ष होणे स्वाभाविक होते.

५) असे असले तरी ब्राह्मण असलेली बहिणाबाई त्यांची शिष्या होती. त्यांचे चवदा टाळकरी प्रसिद्ध असून महिपतीनेही त्यांची नोंद केली आहे. त्यात महादजीपंत कुलकर्णी, रामेश्वरभट्ट बहुळकर, आबाजीपंत लोहगांवकर, मल्हारपंत कुलकर्णी ई. सामील होते. हे चवदापैकी चारही ब्राह्मण होते.

६)  १६४५ नंतर स्वत: शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन व्हायला सुरुवात झाली. १६४८ नंतर शहाजी महाराजांच्या आदिलशहाद्वारे अटकेमुळे जरी शिवाजी महाराज स्वराज्याच्या उभारणीत थंडावले असले तरी त्यांचे प्रयत्न पुन्हा १६४९ पासून सुरु झाले.

७) तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, आणि प्रत्यक्षात तसे घडणे कालत्रयी शक्य नाही, तुकारामांचे प्रेतही मिळाल्याचे कोठे उल्लेख नाहीत म्हणजे तुकारामांचा खुनच झाला असला पाहिजे असा तर्क आहे. पण समजा तसे घडले असते तर-

अ) तुकाराम सामान्य व्यक्ती नव्हते कि सहज त्यांचा खून करावा आणि कोणालाही न समजता प्रेताची विल्हेवाट लावून सदेह वैकुंठाची अफवा पसरवून द्यावी आणि ती पचेल.

ब) तुकारामांचे शिष्य खून झाला असता तर गप्प बसतील, कोठेही फिर्याद गुदरणार नाहीत हे अगदी मोगलाई असती तरी शक्य नव्हते.

क) शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते असे देहुकर आणि तथाकथित पुरोगामी चळवळीतील लेखक हिरिरीने सांगत असतात. त्या दाव्यांकडे दुर्लक्ष केले तरी शिवाजी महाराज हे प्रजाहितदक्ष राजे होते व तुकोबांची किर्ती त्यांच्या कानावर असनार हे उघड आहे. तुकोबारायांचा संशयास्पद मृत्यू अथवा अदृष्य होणे या प्रकाराची त्यांनी दखल घेतली नसती असे म्हणने शिवरायांवरच अन्याय करणारे आहे.

८) याचा अर्थ एवढाच होतो कि तुकोबारायांसारख्या किर्तीसंपन्न संताचा खून करता येणे आणि तो पचवने आणि लोकांनीही वैकुंठगमनाच्या भाकडकथेवर न पाहताच त्यावर सहज विश्वास ठेवणे असंभाव्य आहे.

९) संताजी तेली जगनाडे तुकोबांच्या मृत्युसमयी हजर होते असे त्यांचे चिरंजीव बाळोजीने लिहिलेले आहे. यातील सत्यासत्यता दूर ठेवली तरी "तुकोबा कोणासही न दिसता अकल्पितपणे नाहीशे झाले." असा एकही उल्लेख त्यांच्या समकालीनांनी, त्यांच्या सोबत्यांनी करून ठेवलेला नाही. जे काही घडले ते सर्वांसमक्ष असाच आविर्भाव तत्कालीन अभंगात आलेला आहे. मंबाजी व अन्य हत्यारे ब्राह्मण खोटे बोलत होते हे गृहित धरले तरी तुकोबारायांचे शिष्य असत्य बोलतील हे संभवत नाही. त्यामुळे ब्राह्मणांनी आवई पसरवली आणि शिष्यांनी ती बिनतक्रार स्विकारली असे मानता येत नाही.

१०) याचाच अर्थ असा कि तुकोबारायांचा खून झालेला नाही. सदेह वैकुंठवास हे लाक्षणिक अर्थाने घेतले पाहिजे. भक्ती संप्रदायात संतांच्या भोवती चमत्कार गुंफले जाने हे आपल्या समग्र संतसाहित्यात नवीन नाही. तुकोबांचे सदेह वैकुंठगमन हा त्यातीलच एक भाग आहे.

97 comments:

  1. असेच चिंतनपर मत प्रदर्शन आपण इतर संतांच्या , विशेषतः ज्ञानेश्वर एक की अनेक , तसेच हि चारही भावंडे अत्यंत कमी वयात आणि एका मागोमाग मृत्यू पावली असे दिसते , त्यावर आपण नवीन प्रकाश टाकू शकाल का ?
    चांगदेव ज्ञानेश्वराला शरण गेले का ?
    ज्ञानेश्वरांच्या काळातली संत मालिका पटकन नजरेत भरते , तशी एक चळवळ तुकोबांच्या काळात दिसत नाही , ते एकटे शिलेदार वाटतात

    ReplyDelete
    Replies
    1. संताचे अभंग वाचा... कूठलीही शंका संत चरित्र बद्दल येणारं नाही

      Delete
    2. dada sarvat halkat jat kon ti dada sanga

      Delete
  2. मार्मिक विश्लेषण
    आजकाल ब्राह्मण विरोधासाठी संत तुकाराम यांचाही वापर काही शक्ती करताना दिसतात त्यांना हि एक चपराक आहे
    आपण नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या बाबत असेच लिहिले असले पाहिजे ते पुन्हा उर्धृत करणे शक्य आहे का ?
    चांगदेव हे नाथ पंथी होते का आणि त्यांचा पराभव माउलिनि केला असेल का ?
    का फक्त गर्व हरण ? मुक्ताबाईचे ते प्रसिद्ध वाक्य = हा तर अगदीच कोरा आहेरे दादा = हे ऐतिहासिक असेल का ?
    मुरली संपत

    ReplyDelete
  3. आप्पा - अभिनंदन!
    बाप्पा - अहो , अगदी मन लाऊन अभिनंदन कोणाचे चाललय ?
    आप्पा - आपल्या संजयचं ,फार सुंदर लेख लिहिला आहे
    बाप्पा - थांब थांब , मोहोन्जोदारो का सरस्वती नदी + कशावर आहे हा लेख , इतक कौतुक चाललय तो !कारण संजय सरांचा व्यासंग अफाट आहे , इतक काही खुट जरी झालं तरी ते चालले पार एकदम मोहनजो दारोला !सगळी सुरवात तिथपासून ! नाहीतर वेदापासून !

    आप्पा - असं बोलू नको , मला राग येईल ,कारण आजचा विषय फार महत्वाचा आहे ,एक विचार कर , प्रत्येक प्रांतात ई स . १००० पासून ते पार शिवाजी १६०० १७०० १८०० असे अनेक साधुसंत झाले
    प्रत्येकजण जवळजवळ त्या त्या वेळच्या धार्मिक सत्तेला बळी पडलेला दिसतोच !मग तो नरसी मेहता असेल , मीराबाई असेल , कबीर असेल नाहीतर आपले ज्ञानेश्वर असतील कर्मकांडाला कंटाळून ज्यांनी ज्यांनी भक्तिमार्ग धरला त्याना सर्वाना हा त्रास झालेला दिसतो !

    बाप्पा - आणि त्याबरोबरच त्यांच्या अंताच्या बाबत अनेक प्रवाद ऐकू येतात , अनेक मिथके लोकप्रिय होतात आणि त्यांच्यावर झालेले अन्याय मिथकांचे पांघरून घालून झाकायचा प्रयत्न दिसतो हे सत्य आहे आणि तो भक्तिमार्गाचा एकप्रकारे विजयच आहे कारण या संतांचा जो अहिंसक लढा होता त्यामुळे लब्ध प्रतिष्ठित असलेल्या कर्मकांडवाद्यांचा तो पूर्ण पराभवच नाही का नंतर आलेल्या साईबाबा , अक्कलकोट स्वामी आणि गजानन महाराज यांच्या बाबतीत पण काही प्रमाणात हा छळ दिसतो !

    आप्पा - आपले हे संत आधी कवी होते , नवा विचार मांडणारे तत्वज्ञानी होते आणि मग नंतर ते संत आणि थोर मानले गेले ,त्यांच्या विचारामुळे आणि नवीन दृष्टिकोनामुळे ते संघर्षानंतर संत पदाला पोहोचले + तसे या नंतरच्या संतांचे दिसत नाही त्यांचा थोरपणा चमत्कारावर आधारीत दिसतो !

    बाप्पा - समाजमनाला अतिप्राचीन थोर व्यक्तींपेक्षा तुलनेने अलीकडचे महात्मे आपल्या इच्छापूर्तीसाठी सोयीचे वाटत असावेत ,म्हणजेच आपण तुकाराम एकनाथ नामदेव आणि ज्ञानेश्वर याना देवत्व चीकातावायाची घाई करत नाही कारण ते आपली कुठलीही स्वप्ने काहीतरी नवस केला म्हणून पुरी करत नसतात !

    आप्पा - मीराबाई किंवा नरसी मेहता आणि संत कबीर हे पण असेच संतपदाला पोचलेले एका चळवळीचे नेतेच म्हणता येतील ,लोकांच्या गरजापण किती गमतीदार असतात नाही का ?

    बाप्पा - हो ना ! माउली आणि तुकोबा हे संत अवतारी नव्हते आणि १८५७ नंतरचे स्वामी आणि महाराज हे अवतारी होतेअसे म्हटले जाते त्यामुळे हा फरक अभ्यास करण्यासारखा आहे , १८५७ च्या संग्रामानंतर आलेले हे अवतारी पुरुष कुटुंबाची दुःखे दूर करणारे होते , साक्षात्कारी होते ,चमत्कारी होते पण मुलभूत क्रांतिकारी विचारधारा मांडणारे नव्हते आणि हाच खरा मुद्दा आहे

    आप्पा - ज्ञानेश्वर काय किंवा नामदेव आणि कालांतराने एकनाथ - तुकाराम काय , हे एक्विचारी नसले असले तरी एक चळवळ पुढे नेणारे होते आणि अशा लोकांचा एकाच विरोधी पक्ष असतो तो म्हणजे प्रस्थापित धार्मिक सत्ता !ज्याना बदल नको असतो + हे वैश्विक सत्य आहे -पृथ्वी भोवती सूर्य फिरत नसून उलटे आहे हे सत्य स्वीकारायला चर्चने किती शतके लावली हेपण बघण्यासारखे नाही का ?
    बाप्पा - संजय सरांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ह्यांचा खून झाला नाही असा निर्वाळा देऊन एक ऐतिहासिक कार्य केले आहे ,कारण आजकाल एक विशिष्ठ विचारधारा सर्व इतिहासातील अन्यायकारक गोष्टींचा खलनायक हा ब्राह्मणवर्ग असला पाहिजे असे एक प्रमेय लोकप्रिय करण्याच्या उद्योगाला लागलेला दिसतो आहे !त्याना असे खून अगैरे विचार म्हणजे माकडाच्या हाती कोलीत असेच ठरेल !संजय सरांनी त्याना वेळीच वेसन घालून एक अनर्थ टाळला आहे

    आप्पा - असाच विचार एका ठिकाणी वाचला होता की चारही भावंडांनी कंटाळून आत्महत्या केली नसेल ना ? निवृत्ती आणि सोपान मुक्ता यांनी जीवन एका मागोमाग कसे संपवले त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही हे विशेषच आहे आणि काहीही झाले तरी ते ब्राह्मणच ! असा एक सूक्ष्म विचारही असू शकतो , त्यांचीही कुणी हत्या केली नसेल कशावरून , कारण तो काल तर अजूनच कर्मठ मतांचा होता ,असेही वाटून जाते ,निवृतीची समाधी त्रीम्बाकेश्वराला आहे
    आणि सोपान देवाची सासवडला , आणि असे सांगतात की तापी नदीकाठी मुक्ताबाई वादळात उडून गेली , म्हणजे हा प्रकारपण संत तुकाराम यांच्याच धर्तीवर असावा असे वाटते ! एक वर्षात सर्व जातात म्हणजे मनात संशयाची पाल चुकचुकतेच !
    बाप्पा - अनेक संतांची अशीच कथा आहे ! मुक्ताई हि चांगदेव यांची गुरु होती आणि चांगदेव हे मूलतः तांत्रिक होते आणि नंतर माउलिना शरण गेले होते ,
    बाप्पा - भारतात मुसलमानी आक्रमण हाताळण्यात राजे महाराजे यांच्या बरोबर संतांचा वाटा फारच मोठा आहे , कारण म्हणजे विचार आणि तत्वांचा समूळ फरक !आपल्या संतांनी सर्व जळमटे नष्ट करत पुन्हा आपल्या मातीतील विचाराना नवसंजीवनी दिली आहे !

    ReplyDelete
  4. सर्वात आधी संजय सरांनी न घाबरता एक कटू सत्य लोकांपुढे मांडले आहे त्याबद्दल त्यांची वाहवा केली पाहिजे कारण अशा फेसबुक आणि तत्सम प्रचारी लीखानामुलेच समाजात तेढ वाढते आहे
    आणि आपल्या संजय सरांनी केलेली मांडणी अगदी शंभर टक्के बिनतोड आहे
    छत्रपति शिवाजी महाराज हे इतके तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे होते की पुन्यजवलच्या देहू गावी असे काही घडले असल्यास त्याना त्याची खबरच नाही असे कसे होईल हा मुद्दा अगदी बिनतोड आहे !
    आजकाल जे विकृत लिखाण चालू आहे त्यावरून असे दिसते की हे लोक त्यांची दाल शिजत नाही असे पाहून समर्थ रामदास हे संतश्रेष्ठ तुकाराम यांच्या हत्येच्या कटात सामील होते असेही म्हणू लागतील ,तो दिवस फार दूर नाही !
    आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की संत तुकाराम हे एक अप्रतिम प्रतिभावंत होते आणि परंपरेने त्याना भक्तीपंथाचे आकर्षण वाटून ते त्यात आकंठ बुडाले होते आणि त्यातून ज्या रचना झाल्या त्या खरोखर फारच उच्च प्रतिभेचा स्पर्श झालेल्या आहेत असे लिखाण ताबडतोब सर्वामुखी होत असते ,आजकाल एखादी सोपी चालसुद्धा एखादे हिंदी सिनेमा गीत अमर करून जाते हे आपण बघतोच ! त्यामुळे घाथा इंद्रायानीतून वर आली वगैरे दैवी चमत्कार हापण नाकारावाच लागतो , आणि तुकारामांनी सर्व भाविकांची मने जिंकली होती आणि आपल्या प्रतिभेने सर्व संस्कृत क्लिष्ट पोथ्यांची जागा रसाळ अभंगाना मोकळी करून दिली होती !
    त्याकाळात इंग्रज भारतात पाय रोवत होते , पोर्तुगीज भक्कम पाय रोवून होते अशा काळात देवी भवानीने महाराजाना तलवार देणे आणि अभंग इंद्रायणीतून वर येणे किंवा सदेह वैकुंठाला जाणे हे पटत नाही !मग देवीने बंदुका का नाही दिल्या ?
    एक गोष्ट मात्र नक्की ,आता हे छुपे गनिमी काव्याचे वैचारिक युद्ध आता असेच चालणार आहे , कारण प्रगती असली की ती न बघवणारे पण असणारच , आणि ज्याना सर्व फुकट मिळवायची सवय लागली आहे किंवा ज्यांनी असे पिढ्यानपिढ्या केले आहे त्याना असे विषाणू पसरवन्यातच धन्यता वाटत असणारच !
    खरे कर्मयोगी याकडे दुर्लक्ष्य करत आपल्या मार्गाने पुढे जात राहणार ,
    पण तरीही मुळातच कुणीतरी या विषाणू ला उत्तर द्यायला हवेच ते कार्य कुणी पोक्त ब्राह्मणाने करायच्या ऐवजी श्री संजय सोनावणी नी केले आहे आणि तेही थेट आणि अशा विकृत लोकांची तमा न बाळगता ! हा निर्भिड पणा प्रशंशनीय म्हणावा लागेल आणि स्वतः श्री संजय सोनावणी हे फक्त आंधळे ब्राह्मण द्वेष्टे नाहीत हेपण यातून रेखांकित होते आहे याची पण नोंद घेतली गेली पाहिजे
    प्रथमेश कुलकर्णी

    ReplyDelete
    Replies
    1. तुकोबारायांची हत्या करण्यात आली?

      तुकोबारायांची हत्या करण्यात आली, असे खूप विचारवंतांची म्हणणे आहे. हे मत सिद्ध करण्यासाठी अमरावतीचे सुदाम सावरकर यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे एक प्रचंड संदर्भ-ग्रंथ असून सावरकरांनी हे एक फार मोठे काम केले आहे. पां. बा. कवडे यांनीही असेच मत मांडले आहे.

      कवडे म्हणतात," 'फाल्गुन वद्य द्वितीया' हा दिवस महाराष्ट्रातील आबालवृद्धांच्या विशेष माहितीचा असतो. या दिवसाचे ओंगळ स्वरूप जाणत नाही असा मनुष्य सापडणे अशक्य! सभ्य व समंजस माणसास ह्या दिवसाबद्दल अप्रीती असते. स्त्रियांस या दिवसाबद्दल अत्यंत तिरस्कार असतो. कारण पुरुषवर्ग माणुसकी विसरतो. लहानमोठा भेद मावळतो. मर्यादेचे उल्लंघन होते. विचार अस्थिर होतात.वाणीस धरबंध नसतो. आअपलि वागणूक माणूसकीस सोडून आहे, त्यामुळे आपल्या आयाबहीणीस किती वाईट वाटत असेल, याबद्दलचा विचार पुरुषवर्ग विसरतो. त्यामुळे स्त्रिया घराबाहेर पडणे सुद्धा मुष्कील होते. असे या द्वितीयेचे घाणेरडे व ओंगळ स्वरूळ असते......सन १९५२ मध्ये शिमग्याच्या बीभत्स आचारास आळा घालावा म्हणून मुंबईतील जाणत्या लोकांनी सरकारात अर्ज केला होता. अशा फाल्गुन महिन्यातील वद्य २ हाच दिवस देवाने तुकाराम महाराजांना वैकुंठास नेण्यासाठी निश्चित करावा व त्यासाठी अगदी सुर्योदयास विमान का पाठवावे, हा प्रश्न चिकित्सक दृष्टीच्या द्वारे मानवी मनाचे समाधान करू शकत नाही".

      ते आणखी म्हणतात," मानवी हिताच्या वैऱ्यांनी कट करून त्यांना इंद्रायणी नदीतील डोहात ढकलून देणे शक्य आहे. अशा संधीची ते वाट पहात असतील. कारण त्या दिवशी सबंध गाव शिमग्याच्या सणामुळे बेभान झालेले. परस्परांच्या अंगावर धूळ, राख, चिखल, पाणी वगैरे टाकून थट्टा मस्करीचा रूढीहक्क बजावण्यात दंग. कोण कोणाकडे लक्ष्य देतो? शिवाय, करंजाईचे बेट हे गावापासून दोन फर्लांग लांब! गावातील धामधूम सोडून इतक्या दूरवर आपले दुष्ट कृत्य पाहण्यास कोणास सवड होणार? कदाचित झाली व पाहिलेच तर शिमग्यातील थट्टा मस्करीच्या रूढीखाली हे दुष्ट कृत्य झाकण्याचा प्रयत्न करता येईल. कारण, या दिवशी अंगावर घाण उडविणे, अगर पाणी टाकणे अथवा चिखलात किंवा पाण्यात ढकलणे हे हक्काचेच! शिवाय, असे करण्यात त्या दिवशी लहान मोठा भेद आडवा येत नसतो".

      स. कृ. जोशी यांनी तुकारामांवरील चरित्रात्मक लघुकथेमध्ये तुकारामांच्या हत्येची शक्यता पुढीलप्रमाणे मांडली आहे," इतक्यात गावचा मांग भिवा धावत-पळत आला. तो सांगत होता की,' सालो मालोचे नि मंबाजीचे कपडे रक्ताने डागाळलेले त्याने पाहिले. तुकोबांना घेऊन ते जंगलात गेले होते. ते त्यांचा खून करून ही दुक्कल आली असावी".

      वरील विवेचन तुकोबारायांची हत्या झाली असावी, असेच सुचित करते.

      वेदांत देशपांडे

      Delete
  5. अरे कुलकर्ण्या कसले रे तुझे लिखाण ?
    तुला लाज कशी वाटत नाही कुलकर्णी म्हणवून घेताना ?
    रेखांकित काय करतोस बिनडोक गृहस्था ? अधोरेखित तरी म्हण !
    औरंगजेबाने आपले भाऊ मारत दिल्लीची गाडी मिळवली आणि बापाला कैदेत टाकले
    हि झाली त्यांची संस्कृती ,
    आणि
    आपण कितीही वाद घातले तरी असे एकमेकांचे जीव घेणार नाही हे मात्र नक्की हे जर कळले तर मग संत तुकाराम हे नैसर्गिक रित्या मृत्यू पावले यावर विश्वास बसेल फार फार तर त्यांनी
    प्रायोपवेषण केले असेल
    आणि कुलकर्णी साहेब आपण जे लिहिले ते मात्र मनापासून लिहिले आहे पुढच्या वेळी शुद्धलेखन सुधारा !तुमचे वाडवडील नक्कीच कुठेना कुठेतरी कित्ता मास्तर किंवा अक्षर मास्तर असणारच !

    ReplyDelete
  6. संजय यांनी आता कितीही कोंबडे झाकण्याचा प्रयत्न केला तरी दिवस उगवायचा राहणार नाही. संतश्रेष्ठ तुकारामांचा खूनच झाला होता, होय आणि तो हि मनस्मृतीच्या आधारेच आणि तोही शुद्र ब्राह्मणांनीच केला होता हे आता गुपित राहिलेले नाही.
    धुलवडी (धुलीवंदन) दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले अशी भाकडकथा आपण ऐकत आलो आहोत.
    तुकाराम महाराजांच्या काळात लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला यात त्यांची काहीच चुक नाही कारण विज्ञानाशी त्यांचा दुरुनही संबंध नव्हता.आणि मंबाजींसारखे समाजातील लब्धप्रतिष्ठीत लोक खोटं कशाला बोलतील,असाही एक समज होता.
    पण आजच्या काळात आपण अश्या भाकडकथांवर विश्वास ठेवणे म्हणजे या विज्ञान युगाचा अपमान करणे होय.
    तुकाराम महाराजांचा धुळवडीच्या दिवशी खून झाला होता,मंबाजी व त्याच्या काही साथीदारांनी त्यांचे प्रेतही सापडू नये अशी व्यवस्था केली होती.पण महाराज गेले कोठे या प्रश्नाला काहीतरी उत्तर शोधणे भाग होते,
    त्यातूनच या भाकडकथेचा जन्म झाला.यातून त्यांचा दुहेरी फायदा झाला.

    1. तात्कालिक फायदा असा की खून पचला आणि त्यापेक्षाही मोठा दिर्घकालीन फायदा असा झाला की त्यांना त्या तुकारामालाही मारता आले जो त्यांच्या विचारांमध्ये जिवंत राहू शकला असता.

    2. सदेह वैकुंठगमणाच्या घटनेने तुकारामांची प्रतिमा चमत्कारी बाबांची झाली आणी तेव्हाच त्यांचा खरा मृत्यू झाला.

    समकालीन धुर्त लोक महान लोकांना अशाच रितीने मारण्याचा प्रयत्न करतात.आधी तर ते त्या व्यक्तीकडे लक्षच देत नाहीत,पण जेव्हा ती व्यक्ती इतकी मोठी होते की तिच्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य ठरते तेव्हा ते त्या व्यक्तीवर टिकेची झोड उठवतात,त्याला परोपरीने बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.(तुकाराम महाराजांकडे वेश्येला पाठवण्याचा प्रकारही याच गटात येतो.) अन् जेव्हा त्या व्यक्तीला बदनाम करणेही अशक्य होते तेव्हा ते त्या व्यक्तीचा जाहीर उदोउदो करून पद्धतशीर तिच्या विचारांना मारतात.म्हणजे ती व्यक्ती फक्त नावाला अमर होते अन् ज्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीनं जन्मभर जीव जाळला ती गोष्ट तशीच राहते.

    विश्वजित जाधव.

    ReplyDelete
    Replies
    1. सन २०१० ते २०१८ ह्या काळात किती खून झाले आणि पचवले कि नाही ते पाहता तुकारामाचा खून करून पचवला नसेल ह्या संजय सोनावणींच्या म्हणण्याला काही अर्थ वाटत नाही. ते कश्यासाठी आणि कोणत्या सबळ पुराव्याच्या आधारे असे लिहितात हे काळात नाही.

      Delete
    2. विश्वजित...खुप छान विश्लेशण केलंत तुम्ही.

      Delete
    3. अध्यात्माशी काडीचाही संबंध नसलेल्या तुमच्यासारख्या लोकांना तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन भाकडकथाच वाटणार. कारण तुमच्या दृष्टीने तो फार मोठा चमत्कार आहे आणि तो होणे अशक्य आहे असा गैरसमज आहे. तुकाराम महाराज ब्रम्हद्न्यानी होते. ब्रम्हज्ञान ही काय चीज असते ते तुमच्यासारख्या टुकार लोकांना काय समजणार . सो कॉल्ड विज्ञान त्या ब्रम्हज्ञानाच्या पुढे तसूभरही नाही. ईश्वराशी एकरूप झालेल्या अश्या योगसमार्थ्य संपन्न , ब्राम्हज्ञानी व्यक्तीचा फुटकळ लोकांकडून खून तर जाऊदे पण त्यांच्या केसालाही धक्का लावणे शक्य नाही. गरीब गाईला कोंडून तिला काठीने जीव जाईपर्यंत मारहाण करणाऱ्या मंबाजीला लब्धप्रतिष्ठीत म्हणणाऱ्या लोकांची लायकी ती काय असणार ? सदेह वैकुंठगमन काय असतं हे त्यांना काय समजणार ?

      Delete
  7. संत तुकोबाराय हे संकट प्रसंगी लढणारे होते, रडणारे नव्हते.

    असाध्य ते साध्य |
    करिता सायास ||
    कारण अभ्यास |
    तुका म्हणे ||

    प्रयत्न केल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही...म्हणून प्रयत्न करत राहा असा संदेश देणारे तुकोबाराय..विज्ञानवादी & प्रयत्नवादी होते.भाकड गोष्टींवर त्यांचा विस्वास नव्हता...त्यांनी समाजातील दांभिकपानावर कडाडून टीका केली..स्वर्ग -नरक नाकारला...या धर्तीवरील निसर्गाशी नाते जोडले.."वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" सांगितले..तुकाराम महाराज्जांनी अतिउच्च "सायुज्यपद'(क्लास वन मोक्षपद) नाकारले...कधीहि भंगणार नाहीत असे "अभंग" निर्माण केले...शिवरायांसारखे वारकरी आणि धारकरी तुकोबारांच्या अभंगातून घडले...नामदेवे रचीयला पाया~तुकोबा झालासे कळस...तुका केव्हढा -केव्हढा तुका आकाशाएव्हढा !!
    तुकोबारायांचे निधन झाले त्यावेळी तुकोबारायांचे वय केवळ ४२ वर्षाचे होते...हे वय काही देहत्याग करण्याचे वय नाही... आणि विमान तुकोबांनाच घ्यायला का आले ? इतरांना का नाही ? विमानाचा तेव्हा शोध तरी लागला होता का ??अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मनुवाद्यांकडे नाही...संघर्ष करू इच्छिणारे तुकोबाराय वैकुंठाचा विचार कसा करतील ???
    तुकोबारायांनी अभंगाद्वारे स्वत: वैकुंठ नाकारलेला आहे..ते म्हणतात--

    "सांडूनी सुखाचा वाटा |
    मुक्ती मागे तो करंटा ||
    का रे न घ्यावा जन्म |
    काय वैकुंठी जाऊन ||
    येथे मिळतो दहीभात |
    वैकुंठी ते नाही मिळत ||
    तुका म्हणे न लागे मुक्ती |
    राहीन संगे संताचिया ||"
    --संत तुकोबाराय.

    पण तुकोबारायांचा खून केल्यावर भटांनी लोक देह कुठे असे विचारतील म्हणून सदेह वैकुंठी जात आहेत/ गेले असे सांगितले..त्यादिवशी धुलवलीचा (रंगपंचमी) दिवस असल्यामुळे लोक उत्सवात होते..पण ग्रेट तुकोबारायांना मुकले होते...काही लोकांनी विचारले की "तुकोबाराय वैकुंठी जाताना आम्हाला कसे दिसले नाहीत" यावर भटांनी कावा करून सांगितले की "ज्यांना दिसले नाहीत ते दोन बापाचे आहेत"
    बहुजन समाज गुलामीत राहावा म्हणून मनुवादी अश्या पद्धतीने धार्मिक दह्शदवादाचा वापर करतात...

    प्रसिद्ध कवी सुर्यकांतजी डोळसे म्हणतात की-
    आता पाप पाप म्हणून
    कुणी उर बडवू शकत नाहीत.
    कुणाच्याही गाथा,
    पुन्हा इंद्रायणीत बुडवू शकत नाही्त

    सदेह वैकुंठाचा अर्थ
    हळूहळू का होईना कळतो आहे.
    तरीही एखादा मंबाजी,
    जमेल तसा छळतो आहे.

    खोटा इतिहास पुन्हा
    कुणी लिहू शकत नाही.
    आणायचे म्हटले तरी
    ते विमान पुन्हा येऊ शकत नाही.

    रंगपंचमी / धूळवळीच्या दिवसी मंबाभटाने तुकोबारायांचा खून केला आणि तो खुनाचा सत्य बाजू पुढे आली तर सामान्य लोक फोडून फेकतील म्हणून सदेह वैकुंठाची थाप मारली...तुकोबारायांची हत्त्या झाली म्हणून त्यांचे मोठेपण कमी होत नाही...सत्य स्वीकारा...आणि ठरवा की तुकोबारायांचा आणि त्यांचा खून करणाऱ्यांचा धर्म कसा काय एक असू शकतो...मी स्वत:ला वारकरी धर्मीय समजतो.. वाचकांनी यावर गांभीर्याने विचार करावा आणि ठरवावे की जो तुमच्या आमच्यासाठी काळा दिवस ठरला त्या दिवसी तुकोबारायांची गाथा वाचून त्यांना अभिवादन करायचं का प्रस्थापितांच्या रंगात रंग उधळून गुलामीत धुंध व्हायच !

    जय नामदेवराया !! जय तुकोबाराया !!

    -सुनील चौधरी, जळगाव.

    ReplyDelete
  8. सोनवणी भाऊ आपण हे क्षणभर धरून चाललो की "संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥"असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते.तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने,किती आत्मियतेने पाहिले असते.तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते.तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते.त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता.तुकोबांचे एखादे भव्य स्मारक उभारून तेथे नित्यमहोत्सवाचा कसा जल्लोष उडवून दिला असता आणि तुकोबांची अम्रुतवाणी मिळेल तेथून संग्रहीत करुन तो प्रचंड गाथा कसा अगदी सुरक्षीत करून ठेवला असता.त्या पुण्यस्थळाची माती मस्तकी लावण्यासाठी व अभंग उतरून नेण्यासाठी दर्शकांची कशी रीघ लागली असती.अगदी स्वाभाविकपणेच हे सारे घडणे अनिवार्य होते.परंतू असे काही घडले आहे का ? ऐतिहासिक आधार काय सांगतात ? आपणास आश्चर्य वाटेल की इतिहास याबाबतीत स्पष्टपणे विरुद्ध साक्ष देत आहे.
    इतिहास स्वच्छ सांगतो की संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वणानंतर महिना-दोन महिन्यातच तुकोबांच्या संपुर्ण परिवाराला देहू गाव सोडून जाणे भाग पडले.संपुर्ण कुटुंबाला देहुतून परागंदा व्हावे लागले.तुकोबांच्या निर्वाणानंतर जिजाबाई आपल्या लहान मुलास घेऊन खेडला जाऊन राहिल्या.कान्होबा सुदुंबरे येथे जाऊन राहिले.त्यामुळे विठ्ठलटिके पडिक राहिले(तु.संतसांगाती-मंबाजी)’.’मंबाजीकडे नुसत्या देवाच्या पुजेऐवजी देऊळवाड्याची वगैरे सर्वच व्यवस्था आली होती.अशा व्यवस्थेत ती मंडळी देहुत राहणे शक्य नव्हते.’(तु.सं.सां.-बहिना)कचेश्वर ब्रम्हे यांना,निर्वाणानंतर एक-दिड तपाने देहूस १०-५ अभंगाखेरीज तुकोबांची अम्रुतवाणीही मिळू शकली नाही.(तु.सं.सां.-कचेश्वर).तुकोबांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निर्वाणानंतर तडकाफ़डकी गाव का सोडले,याचा संकेत कान्होबांच्या तत्कालीन अभंगातच मिळतो.आपल्या शोकमय अभंगात ते त्यावेळचे नि:सहाय व भयास्पद वातावरण सुचित करतात की-
    आक्रंदती बाळे करूणावचनी । त्या शोके मेदिनी फ़ुटो पाहे ॥(२९८८)
    असो आता काई करोनिया ग्लांती ? कोणा काकुलती येईल येथे ?
    करिता रोदना बापुडे म्हणती । परि नये अंती कामा कोणी ॥ (२९९०)
    माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार ।
    लाविली काहार । तारातीर करोनि ॥(३००६)
    काही विपत्ती अपत्या । आता आमुचिया होता ।
    काय होईल अनंता ? पाहा,बोलों कासया ? ॥(३०११)
    अर्थात आपली मुलेबाळे सुद्धा निराधार झाली,दारोदार लागली व त्यांचेवर कोणत्या क्षणी काय विपत्ती कोसळेल याचा नेम उरला नाही,या भयग्रस्त भावनेनेच प्रिय पुत्रबंधुंनी आपली जीवाभावाची भुमी ताबडतोब सोडली हे स्पष्ट दिसून येते.
    त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट ही की,तुकोबांच्या परिवारापैकी एकाही व्यक्तीने पुढील वीस-एकवीस वर्षात देहूच्या भुमीवर पाऊल सुद्धा टाकले नाही.आपल्या महान पित्रुदेवताच्या वार्षिक निर्वाणमहोत्सवाला देखील नाही ! आणि हा उत्सव तरी होत होता कोठे ? जिजाईच्या म्रुत्यु नंतर एकवीस वर्षाचा नारायणबुवा बंधुसह देहुस आला.तो देखील कचेश्वर यांच्या सत्पुरुषाने त्यांना प्रेरित केल्यानंतर.तुकोबांच्या मुलांनी पुन्हा देहुस ठांण दिल्यानंतर तिकोबांबद्दल जाग्रुती निर्माण झाली.विशेषत: तुकोबांचे व्रुंदावन नारायणबाबाने इ.स.१७०४ मध्ये बांधून पुण्यतिथी साजरी करावयास लागल्यानंतर तुकोबांचा किर्तीमहिमा वाढण्यास आधिकाधिक भर पडू लागली.(सं.तु.प्रास्ताविक प्रु.८) त्यापुर्वी महादेव,नारायण आदि तुकोबांच्या सुपुत्रांनी नुसती देहुच सोडली होती असे नव्हे तर विठठल देव देखील सोडला होता.त्यांनी मधल्या काळात विठोबाच्या पुजेअर्चेकडे लक्षच दिले नाही कारण विठोबा मुळेच त्यांच्या घराण्याची धुळधान उडाली अशी त्यावेळी त्यांची समजुत झाली होती.(सं.तु.प्रु.११२).श्री.वा.सी. बेंद्रे यांचे सारे संशोधन बरोबर असेल तर,तुकोबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या परिवाराची झालेली वाताहत, ही दुरवस्था व विचित्र मनोरचना एकच गोष्ट ओरडून सांगत आहे असे म्हणावे लागेल की तुकोबांचे सदेह वैकुंठगमन झालेले नसून प्रत्यक्ष खूनच झाला आहे यात शंका नाही.

    विशाल चव्हाण

    ReplyDelete
  9. संत तुकारामांच्या हत्येला जात जबाबदार ?

    तुकोबांचे हे खुनी म्हणजे मंबाजीसारखे एका विशिष्ट जातीचे असेच म्हणता येईल का ? छे:! तुकोबांच्या या खुनाला विशिष्ट जात जबाबदार आहे असे समजून जे कोणी जातीय तेढ अथवा जातीद्वेष वाढवू पाहतात त्यांना तुकोबा मुळिच कललेले नाहीत असे म्हणजे भाग आहे.गुणकर्मवादी तुकोबा जन्माने ठरलेल्या कोणत्याही जातीला अथवा वर्गजमातीला एकाच काठीने हाकायला तयार नाहीत.ते म्हणतात,"नाही यातीकुळ फ़ासे ओढी तयासी" अर्थात गळेकापू ठगाला जातकुळी कसली ?.जो दुर्जन असेल तो कुळाने मांग असो वा ब्राह्मण त्यांची जात एकच त्यामुळे तुकोबांचा खुन करणारी ती एक विशिष्ट मनोव्रुत्ती आहे.मंबाजी वगैरे केवळ तिचे प्रतिक,केवळ प्रतिनिधी! नुसत्या जन्मजातीवरून अथवा पंथादिकावरून उच्चनिचतेचा टेंबा मिरवून मोठेपणाची मिरासदारी वा त्याद्वारे स्वार्थसाधनाची मक्तेदारी कायम ठेवु पाहणारी आणि त्यासाठी हवे ते करू शकणारी दुष्ट मनोव्रुत्ती हीच तुकोबांच्या खुनाला जबाबदार आहे.शुद्र समाजनेते व्हायला लागले तर आम्हाला कोण विचारणार ? या द्वेषमुलक शुद्रस्वार्थी व वर्णांहंकारी कूविचाराचा खदखदता लाव्हारस कर्मठ समाजात आतल्या आत तीव्रतेने धुमसत आला.त्याचा मंबाजी आदिंच्या माध्यमातून झालेला परिस्फ़ोट म्हणजेच मानवतावादी वैष्णवाग्रणी तुकोबांचा अमानुष खुन.श्री नरहर चव्हान यांचे म्हणजे अक्षरश: सत्य आहे की "तुकारामाला बिना पेट्रोल च्या विमानात बसवुन सदेह वैकुंठाला पाठवण्याची पोपटपंची पुन्हा पुन्हा कथन करणे म्हणजे हा तुकारामावर अन्याय केल्यासारखे होईल".हा माणुस सामाजिक विषमता,वर्णवाद्यांची मिरासदारी व बडव्यांचे उपद्व्याप दूर करण्याच्या प्रयत्नात त्या काळात स्वत:च्या बलिदानाने हुतात्मा झाला,असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल!.तसेच कुठलाही वर्णद्वेष न वाढविता जन्माधिष्ठित उच्चनिचतेचे समाजातून समुळ उच्चाटन करून "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ" ही विचारप्रणाली जीवनात सर्वत्र प्रतिष्ठित करणे हीच तुकोबांविषयीची खरीखुरी भक्ती म्हणता येईल.

    अक्षय पोळ

    ReplyDelete
  10. संत तुकाराम महाराज्यांकडे २०० एकर जमीन होती, महाजनकी होती, शेतकऱ्याची कर्ज खाते बुडवली आणि त्यांना कर्जातून मुक्त केले,
    अश्या तुकोबांनी छत्रपती शिवराय घडवले तेच हलकट बामणांच्या डोळ्यात खुपले,
    असे तुकोबा परत घडू नये म्हणून "सेझ", "जैतापूर" सार...खे प्रकल्प आणून बहुजनाच्या जमिनी काढून घेतात व त्यांना उपाशी मारण्याचा डाव खेळतात हि विषारी सापाची लाही लाजवेल अशी भटा-बामनाची औलाद !!!!

    ReplyDelete
  11. जगतगुरू तुकोबांच्या विद्रोही विचारांचा सामना बामनांना असह्य झाला म्हणून त्यांनी धुळवडीच्या दिवशी तुकोबांचा खून केला,
    व तो खून पचविण्यासाठी त्यात थोतांड मांडले कि ते वयकुंठला गेले, बहुजानांनो जागे व्हा !!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. अरे मुर्खा ज्या श्री विठ्ठलाच्यासेवेमधे त्यांनी जीवनभर भजन केले तो माझा देव खून होऊन देईल कसा महाराजांचा अभंग आहे,मागे पुढे उभा राहे सांभाळीत! आलीया आघात निवाराया!!
      बाकी काही नाही फक्त ब्राम्हण द्वेष तुकोबांच्या वैकुंठाला गेले आहेत चचचचचच
      माऊली नलवडे पाटील मराठा 96 कुळी

      Delete
  12. सोनावणी सरांनी किती अचूक सांगितले की काही लोक कोणाच्या तरी नादी लागून ब्राह्मण द्वेषाला बळी पडत आहेत यावरून त्यांच्यातील द्रष्टेपणा आपल्याला दिसतो आणि ते किती अभ्यासू आहेत ते पण कळते
    आधी सरांचे समर्थन करणारा अभ्यासू प्रतिसाद आणि नंतर ब्राह्मण द्वेषाची कावीळ झालेल्यांची भाषा असे दोन प्रवाह दिसतात !
    मुक्ताबाई पण अशीच वादळात उडून गेली आणि ती चांगदेवाची गुरु होती हि नवी माहिती मिळाली
    शिवाजी महाराजांनी या खुनाचा छडा का लावला नाही ते कळत नाही
    तुकाराम कुणबी आणि महाराज प्युअर ९६ कुळी असे नक्कीच नसणार , पण त्यांनी काहीच कॉमेंट केलेली इतिहासात दिसत नाही , आणि तुकोबा जर महाराजांचे गुरु असतील तर त्यांचे सरकारी इतमामाने अंत्य संस्कार झालेले दिसत नाहीत ,
    कुणीतरी तुकारामांनी पण डॉ बाबासाहेब यांच्या प्रमाणे बुद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता असे म्हटले आहे तुकाराम आणि डॉ आंबेडकर यांचे विचार किती जुळत होते हे पाहून दोघांच्या बद्दल आदर वाढतो ,चला आपण सर्वांनी बुद्ध धर्म स्वीकारुया !कदाचित शिव छत्रपातीना तुकोबांनी हा कानमंत्र दिलाही असेल असे वाटते !आणि शिवाजी महाराजही वयाच्या ५० व्या वर्षी बुद्ध धर्म स्वीकारणार होते असे नुकतेच श्री टेक्सास गायकवाड यांच्या कडून ऐकले कदाचित राजा आणि राजगुरू दोघेही बौद्ध होणार म्हणून ब्राह्मणांनी दोघानाही कात करून संपवले असेल असे नक्की वाटू लागते भात ब्राह्मणांचा निषेध असो !आपण बौद्ध धर्म स्वीकारून २०१५ ची शिव जयंती आणि तुकाराम बीज साजरी करुया !
    श्रीशैल्य मालपाणी

    ReplyDelete
  13. संजयजी, बाकी जाऊदे कारण हे नेहमीच्याच पठडीतले पुरस्कार आणि प्रसिद्धीलोलूप 'पुरोगामी' संशोधन कारण यामध्ये निष्कर्ष एकच ब्राह्मण षड्यंत्री वगैरे . माझ्या एकाच प्रश्नाचे उत्तर द्या की जर आंबेडकरानी धर्म परिवर्तन केले नसते किंवा बुद्ध धर्मा व्यतिरिक्त इतर कोणताही धर्म स्विकारला असता तर वारकरी विचारासह प्रत्येक विचरात बुद्ध तत्त्वज्ञान शोधले गेले असते ? या विचारवंतानी प्रत्येक महानता फक्त तिथेच शोधली असती?

    ReplyDelete
    Replies
    1. खरेतर शिवाजी मराठा आणि मिर्झा राजे जयसिंग हा राजपूत आणि औरंगजेबाने मिळून ब्राह्मण वर्गा विरुद्ध एक कट रचला होता ,त्यांची परीक्षा करण्यासाठी शिवाजी महाराज आग्र्याला गेले आणि त्यांना पकडले कैदेत ठेवले असा ओरडा त्यांनी केला .
      इकडे ब्राह्मण वर्गाने आनंदाने पुण्यात जेवणावळी घातल्या
      आणि त्याच वेळी शिवाजी महाराजाना निरोप देऊन फौलाद्खान याने भोजन समारंभ करून बिदा केले , महाराज पुण्यात आले , ते पाहून रामदास आणि ब्राह्मण बिथरले त्यांनी शिवाजीला तोतया ठरवले , शेवटी ब्राह्मण वर्गाने क्षमा मागितली त्यानंतर कधीही त्याना शिवाजीने उच्च पद दिले नाही आणि रामदास ठोसर याची कानउघाडणी केली आणि तुकाराम याना राजकीय संत घोषित केले !असे संशोधन नुकतेच श्री संजय सोलावनी यांनी प्रसिद्ध केले आहे असे कानावर आहे ,परंतु आमचे संजय सोनावणी सर त्याचा समाचार घेतील असा विश्वास आहे कारण ते ब्राह्मण वर्गावर आगपाखड करण्यात निष्णात आहेत !त्याना अनेक वर्गातून त्याबद्दल प्रशंसा लाभली आहे !
      थोडक्यात सर्व समाज हा मनुवादी तत्वाना धूळ चारण्यासाठी हजारो वर्षे एकत्र येत आहे , मुस्लिम राजपूत मराठा कुणबी हे अनेक वर्षे , हेच करत आहेत , आजच त्याचे वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही असे श्री मकबूल मोमीन कळवतात आणि अशाच विचाराने अनेक मराठा वर्गातील लोकांनी मते कळवली आहेत असे समजते ,
      शहाजीराजे यानितर अनेक वेळा पक्ष बदलले आणि स्वतहाचे भले केले असा ओरडा ब्राह्मण समाज नेहमी करत आलेला आहे ह्याचापण आम्ही निषेध करतो !
      परीक्षित गुप्ते

      Delete
  14. आप्पा - श्रीशैल्य मालपाणी यांनी अगदी प्राथमिक विचार मांडले आहेत आणि संजय सरांनी पण तसेच म्हटले आहे छत्रपति शिवाजी महाराज यांचे जर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे राजगुरू असतील तर छत्रपति शिवाजीचे हेरखाते इतके जगप्रसिद्ध होते ते काय करत होते ?त्या हेरानापण ब्राह्मणांनी पैसे खाउन भ्रष्ट केले होते ? तसे शक्यच नाही , कारण तुकाराम तर शिवाजीचे गुरु म्हणजे मामला नाजूक होता ,मग ह्या खुनाला वाचा का नाही फुटली ?

    बाप्पा - ब्राह्मण इतके पॉवर फुल नव्हते की त्यांनी सर्व सरकारी क्षेत्रात आपले हातपाय पसरले असावेत
    यापूर्वी जनहितासाठी शिवाजीने भल्याभल्या ब्राह्मणाना अगदी तत्काळ शासन केले आहे मग इथेच तो गाफील राहील असे वाटत नाही , एकच शक्यता असू शकेल की , तुकाराम आणि शिवाजी दोघेही बौद्ध धर्म स्वीकारणार असतील आणि ती बातमी फुटली असेल आणि मनुवादी ब्राह्मणांनी
    दोघानाही विष प्रयोग करवून मारले असेल ,

    आप्पा -कारण शिवाजीचा मृत्यू पण सरळ वाटत नाही . शिवाजीचा सर्व धर्म समभाव आपण आत्ताच्या पाठ्य पुस्तकातून वाचतोच आहोत ,त्याने अफझलखानाला मारले नाही , तो चुकून अपघाताने मारला गेला एका ब्राह्मणाकडून आणि त्याबद्दल शिवाजीने त्या ब्राम्हणाची कान उघडणीही केली असे डॉ टेक्सास गायकवाड सांगतात .तसेच पुण्यात लाल महालात चुकून दरवाजात बोटे अडकून शाहिस्तेखानाची बोटे तुटली तर याच ब्राह्मणांनी शिवाजीवर सारा मामला ढकलून त्याला बदनाम केले अशा रीतीने शिवाजी आणि अफझलखान+ शाहिस्तेखान असा गैरसमज करून देऊन ब्राह्मणवर्ग त्यांच्यात आणि मराठा लोकात तेढ वाढवायचे गुप्त प्रयत्न करत होते हेच सिद्ध होते

    आप्पा - शिवाजी आणि तुकोबा याना अहिंसा फारच प्रिय होती आणि ब्राह्मणवर्ग स्वतःच्या भल्यासाठी त्याना मुसलमान समाजाच्या विरुद्ध भडकवत असे ,दोघानाही कार्ले आणि भाजे लेणी फार आवडत असत आणि ते दोघेही तिथे जाउन बौद्ध धर्मावर अभ्यास करत असत ,चिंतन करत असत विठोबा हा बुद्धच आहे +असेच एकदा चिंतन करताना ब्राम्हणानी मुघल सैन्याला बातमी दिली आणि ते तिथे पकडायला आले (पुरावा +संत तुकाराम हा चित्रपट )पण तुकोबांनी शिवाजीला वाचवले आणि ब्राह्मणांची फजिती झाली बुद्ध स्वतः मुघलाना फसवायला आला होता
    बाप्पा - तसेच नंतर उपरती होऊन दोघांनी बौद्ध धर्म स्वीकारायचे फ़ायनल केले
    त्यापूर्वीच ब्राह्मणांनी त्यांचा खून केला हा सुसूत्र विचार डॉ राहुल गायकवाड पीएचडी यांनी
    ( शिवाजी तुकाराम बुद्ध आणि डॉ आंबेडकर ) अशा प्रबंधात मांडला आहे त्यामुळे प्रभावित अनेक मराठा आणि वारकरी आता बौद्ध अनुयायी झाले आहेत - होणार आहेत ,पण त्याला उत्तर म्हणून ब्राह्मणांनी आपल्या दशावतारात बुद्धाला घुसडले आहे त्याचा अखिल नवबौद्ध नीळा बावटा संघ आणि देहूकर वारकरी मंडळ निषेध करत आहे असे आम्ही कालच ऐकले

    आप्पा - सांगायची महत्वाची गोष्ट एकच , प्रत्येक ठिकाणी लोकाना ब्राह्मणद्वेष दिसतो पण ब्राह्मणांच्या गुप्त कारवाया दिसत नाहीत !खरेतर वघ्याला पण बौद्ध धर्म स्विकारायचा होता पण कुत्र्यांना बौद्ध करून घेत नाहीत म्हणून त्याने शेवटी प्राणार्पण केले !वाघ्या जन्माने हिंदूच राहिला याचे महाराजाना फार वाईट वाटले !

    बाप्पा - असे महाविचार मांडणारे डॉ राहुल यांचे आपण आभार मानले पाहिजेत !
    आप्पा - आणि सर्व जानाव्यांची होळी केली पाहिजे , तसेच सर्व शेंडीधारी वर्गावर बहिष्कार टाकत त्याना हिंदू धर्मातून हद्दपार केले पाहिजे !
    बाप्पा - चलातर , ६ डिसेंबर २०१४ ला शिवाजी पार्क वर ! या ब्राह्मण वर्गावर शेवटचा वैचारिक हल्ला करून त्याना पार पळवून लावूया !

    ReplyDelete
    Replies
    1. ब्राम्हण हा मनुष्य जातीतला एक एकदम फालतु प्रकार आहे..शास्त्र, पुराण,विष्णूचे अवतार,मळाचा काल्पनिक गणपती त्याला हत्तीचे तोंड लावून सामान्य लोकांच्या माथी मारला..देवा धर्माच्या नावाखाली पिढ्यानपिढ्या फसवत आलेली औलाद ज्यांना आता कुत्रपण विचारत नाही..

      Delete
  15. very good comment aappa bappa great thought s !

    ReplyDelete
  16. Shivaji was a maratha Sardar his origin was in raajasthan and his religion
    How can Tukaram be his Guru ?
    Tukaram is Kunabi , a very backward cast in maharashtra !
    All Shivsji's close people were either CKP, Saraswat or Brahman
    Shivaji's Guru in the early days is Dadoji Kondadev

    ReplyDelete
  17. आप्पा बाप्पा संधिसाधू लोकांची उत्तम चेष्टा करतात आणि त्यांना उघडे पाडतात ,उपहास आणि अतिशयोक्ती यांचा योग्य वापर करत ते विषयातले मर्म सांगतात या बद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे
    हा विषय अतिशय नाजूक आहे
    कारण सर्व मराठी बंधू भगिनीना संत तुकाराम हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा विषय वाटतो ब्राह्मण मराठा आणि इतर सर्व जाती सर्वांनाच तुकोबा आपले वाटतात आणि अशा वेळी ३०० ४०० वर्षापुर्वीच्या दंतकथा जागवून त्याला इतिहास असा शिक्का मारत आत्ताच्या द्वेषमुलक जाती संघर्षाला खतपाणी घालायची खेळी कोण करत असेल हे सांगायची गरज नाही !
    हे असे का घडते ? याच्या मागे " असे द्वेष पसरवणे साधून आपण आपली सत्ता टिकवू शकू " असा सिद्धांतच आहे हे उघड आहे हा एकमेव सर्व्हैव्हल = तगण्याचा तोडगा फार भयानक आणि सर्वनाश करणारा आहे हे या उद्दाम लोकाना काळातच नाही
    समजा , हे असेच चालू राहिले तर काय होईल ?
    ब्राह्मण चेचले जातील ? संपतील ?ते जरी कोणाचे स्वप्न असेल तरी तसेच कधीही घडणार नाही !
    सर्व जगाचा जरी सर्व्हे केला तरी असे दिसेल की ब्राह्मण हे बौद्धिक क्षेत्रात आघाडीवर आहेत ,अमेरिकेपासून जपान पर्यंत सर्वत्र त्यांनाच मागणी असते , असे का ? तर , त्यांची शिस्त , कामातील उत्साह आणि एकाग्रता आणि परदेशातही आपले अस्तित्व टिकवून त्या त्या देशाशी जुळवून घेण्याची इच्छा यामुळे अत्यंत कुशाग्र आणि तरल ,म्हणून त्याना अग्रक्रमाने मागणी असते हे विचार करण्यासारखे आहे !
    त्याना कायम इथे टीकेचे लक्ष करत हिणवत जर ठेवले जाउन त्यांच्याकडून उत्तम कामगिरीची हुकमी मागणी होणार असेल तर त्याना जगाची द्वारे कायम खुणावत असतात आणि ते जाणारच ! मानाने राहणार !ते जाणे हा तुमचा पराभव आहे आणि त्यांचा उत्तम वापर करून घेणे हे तुमचे कौशल्य आहे
    आज नासा सारख्या संस्थेत त्यांची संख्या पाहिली की धक्का बसतो !आणि अभिमानही वाटतो !
    आज अमेरिका आणि गर्मानी , ब्रिटन ,फ्रान्स इथे संस्कृत शिकवायला आधुनिक जगात आपल्याकडील लोकाना बोलावणे येते !हजारो तंत्रज्ञ लोक आज जगात आपल्या देशाचे नाव उज्वल करत स्वताचीही प्रगती करून घेत आहेत आणि आपण त्याना हिणवतो ,आपल्या इथे उघड उघड देशाची लूट चालली आहे - सर्व प्रकारे ! दगड माती वृक्ष पाणी वाळू खनिजे जे दिसेल आणि असेल ते कवडीमोलाने परदेशाला विकले जात आहे !शेतजमीन कमी होत आहे ,आणि कोणतेही न्सुयोजन नसल्याने देश बकाल होत चालला आहे ! सत्ता स्तानी असलेल्यांना बुद्धिमान लोकांची अडचण होत आहे !म्हणून जातिभेदाचे सूत्र वापरून बुद्धिमान लोकांची पद्धतशीर हकालपट्टी करण्याचे पाशवी राजकारण चालू आहे !गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होतो आहे आत्महत्या वाढत आहेत घटस्फोट वाढत आहेत बलात्कार वाढत आहेत खून आणि हत्या वाढत आहेत ! स्त्रियांचे शोषण चालू आहे बालके उघड्यावर उपासमारीने नवी व्यसने आणि नवी स्वप्ने यांच्या कात्रीत उपासमारीचे जीवन जगताना काळ्या कामांच्या विळख्यात सापडत आहेत
    चित्र भीषण आहे आणि त्याचे खापर जाइत्चे राजकारण साधून ब्राह्मण वर्गावर फोडले जात आहे !
    हा सर्व एक खेळ आहे तो नियतीचा निश्चितच नाही - तो मानव निर्मित आहे !त्यात ब्राह्मण आणि पददलित दोघेही भरडले जात आहेत !
    "शहाणे करून सोडावे सकळ जन "अशी परंपरेने जबाबदारी असलेल्या वर्गालाच हिणवत देशाबाहेर काढले जाते आहे मग या देशाचे काय होणार ?
    पूर्वी डांगे लिमये एसेम जोशी , दंडवते अशा लोकांनी समतेचे राजकारण चालवले आता समता हा विनोदाचा विषय झाला आहे आणि आठवले सारखे लोक अजूनच स्वतःचे आणि त्यांच्या विचारांचे हसे करून घेत आहेत !

    ReplyDelete
  18. विश्वजित दादा ,
    ऐक ना रे दादा , अरे मी काय म्हणत्ये ते तुला कळलंच नाही बघ !
    अरे आपले संजय सर आहेत ना त्यांनीच असा सिद्धांत मांडला आहे
    की तुकाराम महाराजांचा खून होण्याची शक्यता किती आहे आणि शिवाजी महाराज याना त्याचा पत्ता लागला नाही आणि असेल तर त्याची कागद पत्रे कशी मिळत नाहीत ?
    वेडा रे वेडा ! लहानपणा पासून काहीतरी भादल लिहायची तुझी सवय अजून जात नाही , अरे आता तू मोठा झाला आहेस , जरा नित बोलत जा कि रे दादा , आमच्या सर्व मैत्रिणी म्हणतात की तुझा दादा किती सभ्य आहे , विचारांनी किती प्रगल्भ आहे , आणि तू असे जर बोलू लागलास तर कसे चालेल ? काही शाल तरी तूपण राखी बांधतोस ! मग असे परकर आणि पाचकळ बोलणे चांगल आहे का ?आईला आवडेल का ? किती वाईट वाटेल तिला !
    अरे संजय सर म्हणजे किती हुशार माणूस ! डोंगरा एव्हडी त्याची बुद्धी ! तो कसा चुकीचे लिहील ?
    विश्वजित दादा , संजय सर रागावले तर ?अस चार चौघात बोलणे थांबव ! नाहीतर मी तुझ्या आईबाबाना सांगेन !
    आणि दादा दादा - एक सांगू का , सगळे ब्राह्मण वाईट नसतात ,सगळे मराठा वाईट नसतात !आणि कोणतीच जात वाईट नसते , मन साफ असेल तर वाईट काहीच नसेल !
    आपल्या तोंडाची गटारगंगा कशाला करायची ?संजय सरांनी एक फटका मारला तर तुझी काय अवस्था होईल ?

    ReplyDelete
    Replies
    1. मोहिनी परकर,
      अगं बाई संजय सोनवणी आणि अप्पा-बाप्ता हे एकच आहेत.
      सोनवणी हेच अप्पा-बाप्पा या टोपण नावाने लिहित असतात.
      इतकी साधी गोष्ट तुला माहिती नाही का?

      -विश्वजित

      Delete
    2. @Anonymous April 7, 2014 at 3:43 AM

      माझ्या नावाने टिप्पणी लिहिलेल्या ह्या माणसाचे डोके गहाण पडले आहे काय ?

      विश्वजित.

      Delete
    3. हा विश्वजित म्हणजे अगदीच यड छाप दिसतो आहे !
      याला बहुतेक टमटमपुरचाटिल्लुटोम
      वगैरे नाटके आवडत असणार !
      कारण एकदम त्याने जी भूमिका ती कशी गमतीदार आहे !पळपुटे पणाच !
      माझ्या नावे कुणीतरी डमी लिहिले आहे ! अगदी बालसुलभ थाप !
      जाऊ दे लहान दिसतो आहे !

      Delete
    4. @Anonymous April 8, 2014 at 9:53 PM (बेवारस)

      आता समजले ती (April 7, 2014 at 3:43 AM) टिप्पणी महामूर्ख माणसा तूच लिहिली होती.

      विश्वजित.


      Delete
  19. संजय सर ,
    माननीय श्री विश्वजित यांचा तीव्र निषेध आणि त्यांनी सौ मोहिनी पारकर बाबत केलेले वक्तव्य लगेचच रद्द करावे ही नम्र विनंती !

    संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम किंवा संत नामदेव यांनी परकीय आक्रमण चालू असताना कधीही नाराजी व्यक्त केली नाही !
    हे विश्वाची माझे घर अशी तात्विक बैठक असल्यामुळे या संतांची वैचारिक भूमिका फार वेगळी ठरते ,अशा कविहृदयाच्या चांगल्या मनाच्या लोकाना संत म्हणणे योग्यच धरले तर मग त्यांच्या कर्तृत्वाच्या सीमा पण अभ्यासल्या पाहिजेत ,त्यांच्या विषयात ते श्रेष्ठ ठरतील पण राजकारण करणारी शिवाजी ,पेशवे आणि शिंदे-होळकर मंडळी अशा संतांच्या आहारी किती जात असतील हे नीट अभ्यासले पाहिजे
    हे संत देश काळाच्या सीमा ओलांडून मानवतेचे गुणगान गात असतात ,त्यांचा केवळ जीवनकाळ समान असल्यामुले कोणतीतरी उपाधी चिकटवून मारून मुटकून राजगुरू वगैरे म्हणणे अत्यंत मूर्खपणाचे ठरेल . उठसुठ पांडूरंगाच्या पायी शरण जाणाऱ्यां मंडळींपासून राजकारणी लोक चार हात दूरच राहणार !गुरु शिष्य नाते नेमके काय असते ?
    शिवाजी महाराजांनी कोणत्याही जिवंत संताला अतीव श्रद्धेने प्रचंड जहागिरी ,वतन किंवा त्यांच्या पायाशी बसून नजराणे दिल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही , ते रणदेवतेचे सर्वप्रथम पुजारी होते !थोडाफार दानधर्म केलाही असेल पण संतांच्या आहारी जाणारे राजे नव्हते हे नक्की !
    त्यांनी कोणत्याही ब्राह्मणाला , पुजाऱ्याला लाडावून ठेवले नाही - ती चूक पुढे पेशव्यांनी मात्र केलेली दिसते आणि त्यापुरते ते पूर्णपणे दोषी ठरतात
    सौ मोहिनी पारकर आणि आप्पा बाप्पा यानी छान विश्लेषण केले आहे आणि त्यामुळे संत श्रेष्ठ तुकाराम यांचा खून झाला असेल असे अजिबात वाटत नाही , तसेच ते राजयोगी , शिवाजीचे गुरु असतील असेही वाटत नाही तीच गोष्ट रामदासांची !
    शिवाजी महाराज तुकारामांच्या सल्ल्याने किंवा रामदासांच्या विचाराने राज्यशकट हाकत असतील असे अजिबात वाटत नाही ,त्यांनी आपले पिताश्री शहाजीराजे आणि इतर नातेवाईकाना सुद्धा हातभर लांबच ठेवले होते आणि ते अतिशय बुद्धिमान होते , गुप्तता हा त्यांच्या यशाचा एक मोठा कानमंत्र होता आणि कविमनाच्या लोकांना किती जवळ करायचे हे त्याना नक्की माहित होते !घरातील लोक आणि राजकारण या दोन गोष्टी आहेत असे ते मानत असत !

    महाराजांवर जर पानिपताला जायची वेळ आली असती तर त्यांनी कधीही कुटुंब कबिला बरोबर नेण्याचा पेशव्यांसारखा मूर्खपणा केला नसता - असो !काशियात्रेचा घाटही त्यांच्या कुटुंबात कोणी घातला नसता अशी महाराजांची शिकवण होती !

    रामदेवराव यादवानेही कधी ज्ञानेश्वर किंवा नामदेवांचा सल्ला मागितला नाही. त्यांची दखलही घेतली नाही ! यांचे मार्ग वेगळे , आणि संतांचे मार्ग वेगळे !चांदोबा किंवा तत्सम बाल पुस्तकाच्या प्रमाणे विचार करणे म्हणजे शुद्ध वेडेपणा ठरेल !औरंगजेबानेही मतलबापुरते मुल्ला मौलवीना जवळ केले होते हे इतिहासप्रसिद्ध सत्य आहे . खरे राज्यकर्ते सदासर्वदा असेच वागतात ,धर्म आणि काळ आणि देश कोणताही असो
    तात्पर्य श्री विश्वजित यांनी अत्यंत हिणकस पाने सौ मोहिनी यांच्यावर जी अनावश्यक शेरेबाजी केली आहे ती अशा ब्लोगला शोभा देत नाही आणि ती निषेध करून श्री संजय सरांनी रद्द करावीत अशी नम्र विनंती आहे
    श्री संजय सर आपलाच ब्लोग वाचत असतील अशी आशा आहे !
    रामचंद्र मोहिते

    ReplyDelete
  20. संजय सर , आमच्या शेजारच्या लोकांच " विश्वजीत "नावाच कुत्र इतक छान शांत आणि चांगली शिकवण असलेले आहे की , मला असं उगाचच वाटत की विश्वजित नावाच कोणीही , म्हणजे , बैल हत्ती घोडा किंवा माणूस हा चांगलाच असणार !
    पण अरेरे , हा विश्वजित किती ठोम्ब्या आहे बघा ना !अगदीच ढ आहे !
    त्याला जर माहित आहे कि संजय आणि आप्पा बाप्पा एकाच आहेत तर तोआप्पा बाप्पा ला नवे ठेवतो म्हणजे सरांनाच नावे ठेवतो नाही का ?म्हणजे ज्याच्या ब्लोगवर लिहायचे त्यालाच शिव्या घालायच्या ?कोणतेही आईवडील असा कृतघ्न पणा शिकवणार नाहीत ,
    आमच्या माहितीतला विश्वजित घोडा अस्सल जातीवान आहे , कुत्रापण उच्च जातीतला आहे आणि बैल तर अगदी खिलारी जोडीतला आहे , फक्त याचेच काय ते तोच जाणे
    पूर्वी एक म्हण होती " फटे निरोधाके बच्चे !"- म्हणजे याच्या आई वादिलानापण हा जन्माला यायला नको होता !अरेरे !याला आपलं नावही नीट लिहिता येत नाही जी दीर्घ पाहिजे !
    आणि संजय सरांबद्दल असे बोलताना तुझी जीभ झडत कशी नाही ?

    ReplyDelete
    Replies
    1. VIVEKANAND SERAO

      लिहिताना थोडे तारतम्य बाळगत जा! वेड्या माणसा तुला अक्कल कधी येणार? हा गावंढळ कधीच सुधारणार नाही!

      अनघा

      Delete
    2. अनघा ,
      अरेरे !
      तेच तेच काशाला ! किती लहान आहेस ? कोणत्या शाळेत जातेस ? लिहिलेले समजते का ? तारतम्य म्हणजे काय ग ? ते काय असत ? आणि का असत ? जर विश्वजित म्हणतो कि " परकर वर कर " तर इतराना तू आग्रह का करतेस की तारतम्य वापरा ?
      आणि गावढळ म्हणजे काय आणि तो चांगला नसतो का ? गावढळपणा - यात किती गोडवा असतो , सौंदर्य असते ते संजय सराना विचार !
      आता किती मार्क पडतात ?थांब , तुला एक कोडे घालु या !
      वाघ शेळी आणि गवत असे एका नदीच्या काठाला आहेत , आणि नावेतून तुला त्या सगळ्याना पलीकडे घेवून जायचे आहे - एका वेळेस एक - जमेल का ? सांग कसे ते !
      तूच नाव चालव आणि डोके वापर !
      अरेच्या , तुला माहित्ये वाटत , बर याचे उत्तर दिलेस की अजून भारी भारी आहेत कोडी माझ्याकडे , तू हरे पर्यंत !

      Delete
    3. Vivekanand Serao is a wild dog!!!

      Delete
    4. No No Not at all ,
      He is not a wild dog + A thorough gentleman - A Good Samaritan !
      I donot know who this lady anagha is , but she is not reading the comments carefully
      the storey started , and Vishwajit started spitting the words and spoiling the environment , and then suddenly enters this Lady Anagha and starts defending him .
      This is very childish ! Who bothers ! have you seen what words Vishvjeet has used about Mrs mohini ? He should be ashamed of it !

      Delete
    5. @Anonymous April 9, 2014 at 8:07 AM

      You are peak of madness, you go to hell, friend !!!!!!!!!!

      Rakesh Jog

      Delete
  21. अरे विवेकानंदा , तुला कोड्यात बोलायची सवय दिसते आहे !, तुला सरळ बोलता येत नाही , तुझी चालही वाकडी , आणि विचारही तिरके आणि वर्तनही नागमोडी !
    तू गावढळ नक्कीच नाहीस तर रानटी मात्र आहेस !

    अंघा

    ReplyDelete
    Replies
    1. ANAGHA MAUSI IS A DIRTEST LADY I HAVE EVER COME ACROSS
      THE NAME HAS A BEAUTIFUL MEANING AND SHE WAS EARLIER A VERY PIOUS ONE -BUT SHE CHANGED A LOT !AND NOW NOONE SPEAKS ABOUT HER PAST - IT IS A DARK HISTORY " MAUSI "
      HER OLD FRIEND

      Delete
  22. आपला विषय काय चाललाय ? संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि कुठे वहावत चर्चा ? हि कोण कोण विश्वजित ? असेच जर चालू राहिले तर मग ब्लोग वाचण्यात ,
    जो येईल तो आपलीच आंधळी मते आणि खुळचट कल्पना मांडत बसले तर हा ब्लोग म्हणजे एक भ्रमिष्ट लोकांचा अड्डाच बनेल आणि मूळ उद्देश बाजूलाच पडेल
    संजय सर इतक्या सुरेख कविता आणि ऐतिहासिक लेख लिहित असतात , त्यांचा इतिहासाचा अभ्यास मन थक्क करणारा आहे , विषयाची अगदी नव्या तर्हेने आणि दृष्टीने मांडणी करायची ताकद हि उपजत आहे का अभ्यासाने तयार झाली आहे ते माहित नाही , पण दर विषयात त्यांचा स्वतःचा शेवटी एक टच असतोच आणि त्यासाठीच सर्वजण जणू व्याकुळ झालेले असतात !
    पण हे असले विचित्र लोक जर विकृत मनाने लिहित बसतील आणि वारंवार अडथळे आणतील तर ?
    मग एका चांगल्या ब्लोग चे वाटोळे होण्यास वेळ लागणार नाही !
    एक लीस्तच बनवता येईल अशा लोकांची !! जे आगांतुकपणे आपली मते नोंदवून विनाकारण चाहु दिशांनी विचारमंथन असलेल्या चर्चेत बिब्बा घालतात !
    अनघा तुपे ( आधीची अनघा आणि विश्वजित पैकी नाही )

    ReplyDelete
  23. यथार्थ आहे अनघाचा राग !
    विश्वजित एक लहान मुलगा आहे आणि त्याच्याशी बोलताना - निरोध वगैरे - किती लज्जास्पद वाटते !त्याने काही धाडसी विचित्र लिहिले असेल तर त्याला उदार मताने क्षमा करावी ! अशाच निनावी लेखनातून हळवी मने आततायी कृतीला बळी पडतात आणि मग अश्रू ढाळून काहीही उपयोग नसतो !
    विवेकानंद तुझ्या फटकेबाजीला आवर घाल !

    ReplyDelete
  24. संतश्रेष्ठ तुकारामांचा खूनच झाला होता. तुमच्या पूर्वजांनी केलेल्या अघोरी चुकांचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. आता सारवासारव करून काहीही साध्य होणार नाही, मात्र त्या कृत्याचे जर तुम्ही समर्थन करीत असाल किंवा ते नाकारत असाल तर तुम्हाला त्याची फळे भोगावी लागणार, हे नक्की! सर्वच बहुजन महापुरुषांच्या खुणांमागे एकच जात / वर्ण कसा काय हा एक संशोधनाचा विषय आहे.

    शहाजी पाटील

    ReplyDelete
  25. तुकोबारायांची हत्या करण्यात आली?

    तुकोबारायांची हत्या करण्यात आली, असे खूप विचारवंतांची म्हणणे आहे. हे मत सिद्ध करण्यासाठी अमरावतीचे सुदाम सावरकर यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे एक प्रचंड संदर्भ-ग्रंथ असून सावरकरांनी हे एक फार मोठे काम केले आहे. पां. बा. कवडे यांनीही असेच मत मांडले आहे.

    कवडे म्हणतात," 'फाल्गुन वद्य द्वितीया' हा दिवस महाराष्ट्रातील आबालवृद्धांच्या विशेष माहितीचा असतो. या दिवसाचे ओंगळ स्वरूप जाणत नाही असा मनुष्य सापडणे अशक्य! सभ्य व समंजस माणसास ह्या दिवसाबद्दल अप्रीती असते. स्त्रियांस या दिवसाबद्दल अत्यंत तिरस्कार असतो. कारण पुरुषवर्ग माणुसकी विसरतो. लहानमोठा भेद मावळतो. मर्यादेचे उल्लंघन होते. विचार अस्थिर होतात.वाणीस धरबंध नसतो. आअपलि वागणूक माणूसकीस सोडून आहे, त्यामुळे आपल्या आयाबहीणीस किती वाईट वाटत असेल, याबद्दलचा विचार पुरुषवर्ग विसरतो. त्यामुळे स्त्रिया घराबाहेर पडणे सुद्धा मुष्कील होते. असे या द्वितीयेचे घाणेरडे व ओंगळ स्वरूळ असते......सन १९५२ मध्ये शिमग्याच्या बीभत्स आचारास आळा घालावा म्हणून मुंबईतील जाणत्या लोकांनी सरकारात अर्ज केला होता. अशा फाल्गुन महिन्यातील वद्य २ हाच दिवस देवाने तुकाराम महाराजांना वैकुंठास नेण्यासाठी निश्चित करावा व त्यासाठी अगदी सुर्योदयास विमान का पाठवावे, हा प्रश्न चिकित्सक दृष्टीच्या द्वारे मानवी मनाचे समाधान करू शकत नाही".

    ते आणखी म्हणतात," मानवी हिताच्या वैऱ्यांनी कट करून त्यांना इंद्रायणी नदीतील डोहात ढकलून देणे शक्य आहे. अशा संधीची ते वात पहात असतील. कारण त्या दिवशी सबंध गाव शिमग्याच्या सणामुळे बेभान झालेले. परस्परांच्या अंगावर धूळ, राख, चिखल, पाणी वगैरे टाकून थट्टा मस्करीचा रूढीहक्क बजावण्यात दंग. कोण कोणाकडे लक्ष्य देतो? शिवाय, करंजाईचे बेट हे गावापासून दोन फर्लांग लांब! गावातील धामधूम सोडून इतक्या दूरवर आपले दुष्ट कृत्य पाहण्यास कोणास सवड होणार? कदाचित झाली व पाहिलेच तर शिमग्यातील थट्टा मस्करीच्या रूढीखाली हे दुष्ट कृत्य झाकण्याचा प्रयत्न करता येईल. कारण, या दिवशी अंगावर घाण उडविणे, अगर पाणी टाकणे अथवा चिखलात किंवा पाण्यात ढकलणे हे हक्काचेच! शिवाय, असे करण्यात त्या दिवशी लहान मोठा भेद आडवा येत नसतो".

    स. कृ. जोशी यांनी तुकारामांवरील चरित्रात्मक लघुकथेमध्ये तुकारामांच्या हत्येची शक्यता पुढीलप्रमाणे मांडली आहे," इतक्यात गावचा मांग भिवा धावत-पळत आला. तो सांगत होता की,' सालो मालोचे नि मंबाजीचे कपडे रक्ताने डागाळलेले त्याने पाहिले. तुलोबांना घेऊन ते जंगलात गेले होते. ते त्यांचा खून करून ही दुक्कल आली असावी".

    वरील विवेचन तुकोबारायांची हत्या झाली असावी, असेच सुचित करते.

    वेदांत देशपांडे

    ReplyDelete
  26. तुकोबारायांची हत्या करण्यात आली?

    तुकोबारायांची हत्या करण्यात आली, असे खूप विचारवंतांची म्हणणे आहे. हे मत सिद्ध करण्यासाठी अमरावतीचे सुदाम सावरकर यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे एक प्रचंड संदर्भ-ग्रंथ असून सावरकरांनी हे एक फार मोठे काम केले आहे. पां. बा. कवडे यांनीही असेच मत मांडले आहे.

    कवडे म्हणतात," 'फाल्गुन वद्य द्वितीया' हा दिवस महाराष्ट्रातील आबालवृद्धांच्या विशेष माहितीचा असतो. या दिवसाचे ओंगळ स्वरूप जाणत नाही असा मनुष्य सापडणे अशक्य! सभ्य व समंजस माणसास ह्या दिवसाबद्दल अप्रीती असते. स्त्रियांस या दिवसाबद्दल अत्यंत तिरस्कार असतो. कारण पुरुषवर्ग माणुसकी विसरतो. लहानमोठा भेद मावळतो. मर्यादेचे उल्लंघन होते. विचार अस्थिर होतात.वाणीस धरबंध नसतो. आअपलि वागणूक माणूसकीस सोडून आहे, त्यामुळे आपल्या आयाबहीणीस किती वाईट वाटत असेल, याबद्दलचा विचार पुरुषवर्ग विसरतो. त्यामुळे स्त्रिया घराबाहेर पडणे सुद्धा मुष्कील होते. असे या द्वितीयेचे घाणेरडे व ओंगळ स्वरूळ असते......सन १९५२ मध्ये शिमग्याच्या बीभत्स आचारास आळा घालावा म्हणून मुंबईतील जाणत्या लोकांनी सरकारात अर्ज केला होता. अशा फाल्गुन महिन्यातील वद्य २ हाच दिवस देवाने तुकाराम महाराजांना वैकुंठास नेण्यासाठी निश्चित करावा व त्यासाठी अगदी सुर्योदयास विमान का पाठवावे, हा प्रश्न चिकित्सक दृष्टीच्या द्वारे मानवी मनाचे समाधान करू शकत नाही".

    ते आणखी म्हणतात," मानवी हिताच्या वैऱ्यांनी कट करून त्यांना इंद्रायणी नदीतील डोहात ढकलून देणे शक्य आहे. अशा संधीची ते वाट पहात असतील. कारण त्या दिवशी सबंध गाव शिमग्याच्या सणामुळे बेभान झालेले. परस्परांच्या अंगावर धूळ, राख, चिखल, पाणी वगैरे टाकून थट्टा मस्करीचा रूढीहक्क बजावण्यात दंग. कोण कोणाकडे लक्ष्य देतो? शिवाय, करंजाईचे बेट हे गावापासून दोन फर्लांग लांब! गावातील धामधूम सोडून इतक्या दूरवर आपले दुष्ट कृत्य पाहण्यास कोणास सवड होणार? कदाचित झाली व पाहिलेच तर शिमग्यातील थट्टा मस्करीच्या रूढीखाली हे दुष्ट कृत्य झाकण्याचा प्रयत्न करता येईल. कारण, या दिवशी अंगावर घाण उडविणे, अगर पाणी टाकणे अथवा चिखलात किंवा पाण्यात ढकलणे हे हक्काचेच! शिवाय, असे करण्यात त्या दिवशी लहान मोठा भेद आडवा येत नसतो".

    स. कृ. जोशी यांनी तुकारामांवरील चरित्रात्मक लघुकथेमध्ये तुकारामांच्या हत्येची शक्यता पुढीलप्रमाणे मांडली आहे," इतक्यात गावचा मांग भिवा धावत-पळत आला. तो सांगत होता की,' सालो मालोचे नि मंबाजीचे कपडे रक्ताने डागाळलेले त्याने पाहिले. तुकोबांना घेऊन ते जंगलात गेले होते. ते त्यांचा खून करून ही दुक्कल आली असावी".

    वरील विवेचन तुकोबारायांची हत्या झाली असावी, असेच सुचित करते.

    वेदांत देशपांडे

    ReplyDelete
  27. जगतगुरू तुकारामांचा खून ब्राह्मणी, मनुवादी, वर्णवर्चस्ववादी विचारधारेतूनच झाला आहे, हे पूर्ण सत्य आहे. हे सुज्ञास सांगणे न लगे !

    संजय अन्वयार्थ डोके शांत ठेऊन लावायला शिका.

    पुरुषोत्तम ढगे.

    ReplyDelete
  28. संजयने वरील लेख ब्राह्मणांची मर्जी सांभाळन्यासाठी लिहिला आहे यात अजिबात दुमत असू नये! हा बहुजन समाजापासून दूर चालला आहे, बरोबर ना ?

    संजय हे मात्र लक्षात ठेव :

    १. तुकारामांची हत्या अपेक्षितही आणि अटळही; यांनी वैर ओढावून घेतले, कोणतीही तडजोड केली नाही.
    २. तुकारामांचा छळ काय दाखवितो?
    ३. छळाला धर्मग्रंथांचा पाठींबा होता
    ४.धुळवडीच्या दिवशी तुकारामांची धुळवड केली
    ५. मृत्यू नंतरच्या घटना काय दर्शवितात?
    ६. दुसऱ्याच दिवशी जिजाईने ब्राह्मणांना घरदार दान दिले की त्यांना हाकलून दिले ?
    ७. कायमच्या माहेरी का गेल्या ?
    ८. कान्होबा कायमचे गाव सोडून का गेले?
    ९. इस्टेट कोणाच्या ताब्यात गेली?
    १०.मुलेही पंचवीस वर्षे फिरकली नाहीत
    ११.आजही तीच धर्मशास्त्रे आपल्या नैतिकतेचा आधार मानायची?
    १२. विचारांची कत्तल हि शारीरिक हत्येपेक्षाही भीषण
    १३.क्षमतेइतके फुलू न देणे हीही हत्याच
    १४.अभंग बुडविणे हीही एक हत्याच
    १५.विकृतीकरण ही आणखी एक हत्या
    १६.तुकारामांच्या नावावर इतरांचे लेखन, जाणीवपूर्वक प्रक्षेप
    १७.प्रक्षेपांच्या विरोधात आठ अभंग
    १८.दिशाभूल करणारा अन्वयार्थ लावणे हीही हत्याच
    १९.छळणारा दुराभिमानीही शुद्धच?

    सारंग दवे

    ReplyDelete
    Replies
    1. तुकारामांनी तत्ववेत्ते व महाकवी अश्वघोष लिखित 'वज्रसुची' ह्या संस्कृत ग्रंथाचा मराठीत अनुवाद करून घेतला होता आणि तो बहिणाबाईंनी अनुवाद केला होता. इसवी सणाच्या सुमारे पहिल्या शतकात ह्या ग्रंथाची निर्मिती झाली होती, अश्वघोष यांनी या ग्रंथात अतिशय प्रबळ युक्तीवादांच्या आधारे वर्णव्यवस्थेचे खंडन केले आहे.
      हा मुद्दा सुद्धा वरील माहिती मध्ये समाविष्ट होऊ शकतो.

      Delete
  29. सारंग सेठ , अगदी खर आहे तुम्ही म्हणता ते १०० टक्के सत्य आहे
    तो अन्याय होता , धुलवडीच्या दिवशी असला प्रकार सहज शक्य होता
    आणि तसेच झाले असेल संत तुकाराम यांच्या गावाची त्या काळातली लोकवस्ती पाहिली तर एका बाजूला असा प्रकार घडला तरी तो सहज पचून जाइल अशी स्थिती असणार
    संत तुकाराम ही व्यक्ती अभंगातून भक्तीपर विचार मांडून नुसतेच टाळ कुटणारी नव्हती
    त्यानी क्रांतिकारक विचार मांडले आहेत समाज प्रबोधनाचे विचार सांगितले आहेत !त्याना समाजात बदल अपेक्षित होते आणि ते बदल अचा मार्गही ते सांगत होते हे फारच महत्वाचे आहे !
    ब्राह्मण धर्मपीठाने घातलेल्या कुंपणाला भेदून एक नवा विचार रुजत होता हे धर्मपीठाला सहन होत नव्हते !
    प्रस्थापित धर्म मतांच्या विरुद्ध भूमिका घेणाऱ्या सर्वच लोकाना हे भोग भोगावे लागले आहेत !
    युरोपात असेच घडले आहे ! तिथे जिवंत जाळण्याचे प्रसंग घडत होते हा प्रकार भयानक आहे !
    आजही कमीजास्त प्रकारे हेच चालू आहे आसाराम आणि इतर आधुनिक साधुसंत ही त्यांचीच पिल्ले आहेत !आडवे येणाऱ्या लोकाना हिंसेने दूर करण्याचे धाडस करणारी हि मंडळी समाज विघातक आहेत !
    परिणीता मांगले

    ReplyDelete
  30. संत तुकाराम यांचा खुनाच झाला आहे हे कोणी मान्य करो वा न करो ,
    त्यांचेच नाही तर ज्ञानेश्वर आणि भावंडांचे पण असेच काहीतरी झालेले आहे !
    मीराबाईचे पण असेच झाले आहे
    आज जसे पुतळे उभारून स्मारके करून लोक परत पापे करायला मोकळी होतात तसेच हेपण आहे !

    ReplyDelete
  31. तुकोबांच्या वेळी राजसत्ता मात्र सनातन्य्याच्या हाती नव्हती म्हणूनच म्हणूनच सर्वांना नकळतच तुकारामांना इंद्रायणीच्या डोहात डोहात गुप्तपणे बुडवून ठार करावे लागले.नाहीतर सोक्रेटीस आणि येशू प्रमाणे उघड उघड त्यांनी तुकोबांना ठार केले असते..

    ReplyDelete
  32. संत तुकाराम यांच्या विषयी चुकीचा, पूर्वग्रहदुषित विचार सोनवणी यांनी मांडला आहे. त्यांनी तुकाराम यांच्या संदर्भातील वाचन अधिक प्रगल्भ केल्यास ते या अविचारापासून दूर होतील अशी आशा वाटते!

    सौ. विभावरी यादव

    ReplyDelete
  33. संत तुकाराम यांचा खून का झाला?

    १. वैदिक पंडितांचे वर्चस्व असलेली जीवनपध्दती व धार्मिक व्यवस्था यांना जोरदार हादरे बसतील, अशा आचार विचारांचा पुरस्कार तुकाराम आपल्या अभंगांतून करीत होते.

    २. तुकारामांच्या या हल्ल्यांमुळे त्या पंडितांची सामाजिक प्रतिष्ठा, समाजावरील नियंत्रण, आर्थिक उत्पन्न आणि त्यांचे एकूणच हितसंबंध यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, यात शंका नाही.

    ३. पिढ्यानपिढ्या पुष्ट होत असलेला त्यांचा अहंकार दुखावला गेला.

    ४. आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी तुकारामांचे तोंड बाद करणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटू लागले.

    ५. शुद्र असल्याकारणाने वेदाचा अधिकार नसताना तुकारामांच्या तोंडून वेदवाणी बाहेर पडणे, हे पंडितांच्या पचनी पडणारे नव्हते.

    ६. अनेक ब्राह्मणांनी तुकारामांना गुरुपद बहाल केल्यावर पंडितांचे पित्तच खवळले. ब्राह्मण पंडित जिवंत असताना गुरुत्व एका शुद्राकडे जात आहे, हा तर त्यांच्या दृष्टीने मोठा आघात होता.

    ७. धर्मशास्त्रानुसार मृत्युदंड हि एकमेव शिक्षा असल्या कारणानेच तुकारामांचा खून करण्यात आला.

    संत तुकारामांना सुद्धा हे लोक आपला घात करतील याची पूर्ण कल्पना होती, हि त्यांची भावना खालील अभंगांवरून स्पष्ट होते....

    लावूनि कोलित | माझा करितील घात || १ ||
    ऐसे बहुतांचे संधी | सापडलो खोळेमधी || २ ||
    पाहातील उणे | तेथे द्वती अनुमोदने || ३ ||
    तुका म्हणे रिघे | पुढे नाही जाले धींगे || ४ || ३४२१

    रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग | अंतर्बाह्य जग आणि मन || १ ||
    जीवाही आगोज पडती आघात | येउनिया नित्य नित्य करी || २ ||
    तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे | अवघियांचे काळे केले तोंड ||३ || ४०९१

    जरी माझी कोणी कापितील मान | तरी नको आन वदो जिव्हे || ५४९.१

    मरणाही आधी राहिलो मरोनी | मग केले मनीं होते तैसे || २४.१

    -विश्वनाथ सांगलीकर

    ReplyDelete
  34. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  35. नाही वैकुंठाला गेला ।
    तुका मारूनी टाकला ।
    डाव्या हाताचा कलंक ।
    उजव्या हाताने झाकला ॥१॥
    ऐसे बोलीले बयान । आले नेण्यासी विमान ।
    त्यात बैसुनिया तुका ।
    गेला निघुनी गुमानं ॥२॥
    खरे काय , काय खोटे । सत्य
    जाणूनी घेवावे ।
    मीही सांगितले म्हणुनी । नाही विश्वासी रहावे ॥३॥
    गीतेवरी भाष्य ग्रंथ ।
    तुका लिही मंत्रगीता । त्याने
    भडकला तेंव्हा । वेदाभिमान्यांचा
    माथा ॥४॥
    वर्णव्यवस्था तयाने । सारी येईल धोक्यात ।
    वेदाविरोधाचे ज्ञान । कैसे भरले
    तुक्यात ? ॥५॥
    रामेश्वर भटा सांगे । सांगे
    मंबाजी चुगली ।
    मन कर्मठांची मने । तुका रोषाने फ़ुगली ॥६॥
    रामेश्वराच्या दिवाणी । न्याय
    मागूनी घेतला ।
    तुकोबांचा ग्रंथसाठा । इंद्रायणीत
    फ़ेकला ॥७॥
    होते तुकाचे अभंग । बहु लोकायच्या तोंडी ।
    पुन्हा आले जनलोकी । कैसी होणार
    गा कोंडी ॥८॥
    रामेश्वर मंबाजीने । मारियले तुकोबास ।
    आणि सांगिले जगाला ।
    तुका गेला वैकुंठास ॥९॥

    -टॉम मोर्वोलो रिडल

    ReplyDelete
  36. संत तुकाराम यांचा खून का झाला?

    १. वैदिक पंडितांचे वर्चस्व असलेली जीवनपध्दती व धार्मिक व्यवस्था यांना जोरदार हादरे बसतील, अशा आचार विचारांचा पुरस्कार तुकाराम आपल्या अभंगांतून करीत होते.

    २. तुकारामांच्या या हल्ल्यांमुळे त्या पंडितांची सामाजिक प्रतिष्ठा, समाजावरील नियंत्रण, आर्थिक उत्पन्न आणि त्यांचे एकूणच हितसंबंध यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, यात शंका नाही.

    ३. पिढ्यानपिढ्या पुष्ट होत असलेला त्यांचा अहंकार दुखावला गेला.

    ४. आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी तुकारामांचे तोंड बंद करणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटू लागले.

    ५. शुद्र असल्याकारणाने वेदाचा अधिकार नसताना तुकारामांच्या तोंडून वेदवाणी बाहेर पडणे, हे पंडितांच्या पचनी पडणारे नव्हते.

    ६. अनेक ब्राह्मणांनी तुकारामांना गुरुपद बहाल केल्यावर पंडितांचे पित्तच खवळले. ब्राह्मण पंडित जिवंत असताना गुरुत्व एका शुद्राकडे जात आहे, हा तर त्यांच्या दृष्टीने मोठा आघात होता.

    ७. धर्मशास्त्रानुसार या अपराधास मृत्युदंड हि एकमेव शिक्षा असल्या कारणानेच तुकारामांचा खून करण्यात आला.

    संत तुकारामांना सुद्धा हे लोक आपला घात करतील याची पूर्ण कल्पना होती, हि त्यांची भावना खालील अभंगांवरून स्पष्ट होते....

    लावूनि कोलित | माझा करितील घात || १ ||
    ऐसे बहुतांचे संधी | सापडलो खोळेमधी || २ ||
    पाहातील उणे | तेथे द्वती अनुमोदने || ३ ||
    तुका म्हणे रिघे | पुढे नाही जाले धींगे || ४ || ३४२१

    रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग | अंतर्बाह्य जग आणि मन || १ ||
    जीवाही आगोज पडती आघात | येउनिया नित्य नित्य करी || २ ||
    तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे | अवघियांचे काळे केले तोंड ||३ || ४०९१

    जरी माझी कोणी कापितील मान | तरी नको आन वदो जिव्हे || ५४९.१

    मरणाही आधी राहिलो मरोनी | मग केले मनीं होते तैसे || २४.१

    -विश्वनाथ सांगलीकर

    ---------------------------------------->१००% सहमत !

    विजय शिंदे, पनवेल.

    ReplyDelete
  37. संत तुकारामांनी वीस वर्षात भल्याभल्यांना जेरीस आणले, त्यांच्या तोंडचे पाणी पळविले, त्यांना पळता भुई थोडी केली. वैदिक पंडित, श्रोत्रिय, याज्ञिक, योगी, गुरु इ. नानाविध नावांनी व रूपांनी वावरणाऱ्या, परंतु प्रत्यक्षात भोंदुगिरी करणाऱ्या ढोंगी लोकांचे बुरखे फाडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. अशा लोकांवर शब्दांचे कठोर हल्ले करून त्यांनी त्यांना घायाळ केले. गरीब लोकांना छळणाऱ्या टवाळ लोकांचे थोबाड फोडण्याची भाषा केली. मग्रूर आणि मस्तवाल लोकांना आव्हान दिले. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इ. क्षेत्रात अत्यंत प्रस्थापित व सामर्थ्यशाली असलेल्या, पण अनीतीने वागणाऱ्या व दुबळ्यांवर अन्याय करणाऱ्या खळांची सिंहासने त्यांनी गदगदा हलवली. धर्माच्या नावावर अधर्म करणाऱ्या सर्वांवर शब्दांचे आसूड सपासप ओढले. हे करताना अन्यायी व ढोंगी लोकांचे पद, प्रतिष्ठा वा समाजातील स्थान यांची पर्वा केली नाही. दुखावल्या गेलेल्या या लोकांचा खुनशीपणा वा घातकता यांची फिकीर केली नाही. त्यांनी हा जो संघर्ष केला, तो काही एखाद दुसऱ्या व्यक्तीबरोबर केला नाही. समाजात इकडे तिकडे चोहीकडे अन्यायाचे ठेकेदार लोकांना फसवत होते, छळत होते. त्यांच्या मोठ्या संख्येची पर्वा न करता तुकाराम त्यांच्यावर तुटून पडले. त्यांनी किती लोकांचे वैर ओढवून घेतले, याला सीमा नाही. हजारो वर्षांच्या परंपरेचे बळ ज्यांना लाभले होते, अशा लोकांचे अगदी कडवे शत्रुत्व त्यांनी जाणीव पूर्वक स्वीकारले. खरेतर त्यांनी आपल्या उरावर स्वतःच्या हातांनी धगधगते निखारे ओढून घेतले. एक विध्वंसक ज्वालामुखी स्वतःच्या अंगावर खुचून घेतला. धर्माच्या ठेकेदारांना हे विचार आवडणारे नव्हते, परवडणारे नव्हते आणि याचीच परिणीती तुकारामांच्या हत्येत झाली, यात अजिबात शंका असण्याचे कारण नाही.

    अक्षय घोटेकर

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय वास्तववादी चित्रण, धन्यवाद!

      प्रीतम चोरगे.

      Delete
  38. संत तुकारामांनी वीस वर्षात भल्याभल्यांना जेरीस आणले, त्यांच्या तोंडचे पाणी पळविले, त्यांना पाळता भुई थोडी केली. वैदिक पंडित, श्रोत्रिय, याज्ञिक, योगी, गुरु इ. नानाविध नावांनी व रूपांनी वावरणाऱ्या, परंतु प्रत्यक्षात भोंदुगिरी करणाऱ्या ढोंगी लोकांचे बुरखे फाडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. अशा लोकांवर शब्दांचे कठोर हल्ले करून त्यांनी त्यांना घायाळ केले. गरीब लोकांना छळणाऱ्या टवाळ लोकांचे थोबाड फोडण्याची भाषा केली. मग्रूर आणि मस्तवाल लोकांना आव्हान दिले. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इ. क्षेत्रात अत्यंत प्रस्थापित व सामर्थ्यशाली असलेल्या, पण अनीतीने वागणाऱ्या व दुबळ्यांवर अन्याय करणाऱ्या खळांची सिंहासने त्यांनी गदगदा हलवली. धर्माच्या नावावर अधर्म करणाऱ्या सर्वांवर शब्दांचे आसूड सपासप ओढले. हे करताना अन्यायी व ढोंगी लोकांचे पद, प्रतिष्ठा वा समाजातील स्थान यांची पर्वा केली नाही. दुखावल्या गेलेल्या या लोकांचा खुनशीपणा वा घातकता यांची फिकीर केली नाही. त्यांनी हा जो संघर्ष केला, तो काही एखाद दुसऱ्या व्यक्तीबरोबर केला नाही. समाजात इकडे तिकडे चोहीकडे अन्यायाचे ठेकेदार लोकांना फसवत होते, छळत होते. त्यांच्या मोठ्या संख्येची पर्वा न करता तुकाराम त्यांच्यावर तुटून पडले. त्यांनी किती लोकांचे वैर ओढवून घेतले, याला सीमा नाही. हजारो वर्षांच्या परंपरेचे बळ ज्यांना लाभले होते, अशा लोकांचे अगदी कडवे शत्रुत्व त्यांनी जाणीव पूर्वक स्वीकारले. खरेतर त्यांनी आपल्या उरावर स्वतःच्या हातांनी धगधगते निखारे ओढून घेतले. एक विध्वंसक ज्वालामुखी स्वतःच्या अंगावर खेचून घेतला. धर्माच्या ठेकेदारांना हे विचार आवडणारे नव्हते, परवडणारे नव्हते आणि याचीच परिणीती तुकारामांच्या हत्येत झाली, यात अजिबात शंका असण्याचे कारण नाही.

    अक्षय घोटेकर

    ReplyDelete
  39. विज्ञानवादी तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन कि त्यांचा धुळवडीच्या दिवशी खून???......
    फाल्गुन व.द्वितिया! म्हणजेच तुकाराम बीज.च्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले अशी भाकडकथा आपण ऐकत आलो आहोत.तुकाराम महाराजांच्या काळात लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला यात त्यांची काहीच चुक नाही कारण विज्ञानाशी त्यांचा दुरुनही संबंध नव्हता.आणि मंबाजींसारखे समाजातील लब्धप्रतिष्ठीत लोक खोटं कशाला बोलतील,असाही एक समज होता. पण आजच्या काळात आपण अश्या भाकडकथांवर विश्वास ठेवणे म्हणजे या विज्ञान युगाचा अपमान करणे होय. तुकाराम महाराजांचा धुळवडीच्या दिवशी खून झाला होता,मंबाजी व त्याच्या काही साथीदारांनी त्यांचे प्रेतही सापडू नये अशी व्यवस्था केली होती.पण महाराज गेले कोठे या प्रश्नाला काहीतरी उत्तर शोधणे भाग होते , त्यातूनच या भाकडकथेचा जन्म झाला.यातून त्यांचा दुहेरी फायदा झाला.तात्कालिक फायदा असा की खून पचला आणि त्यापेक्षाही मोठा दिर्घकालीन फायदा असा झाला की त्यांना त्या तुकारामालाही मारता आले जो त्यांच्या विचारांमध्ये जिवंत राहू शकला असता. सदेह वैकुंठगमणाच्या घटनेने तुकारामांची प्रतिमा चमत्कारी बाबांची झाली आणी तेव्हाच त्यांचा खरा मृत्यू झाला. समकालीन धुर्त लोक महान लोकांना अशाच रितीने मारण्याचा प्रयत्न करतात.आधी तर ते त्या व्यक्तीकडे लक्षच देत नाहीत,पण जेव्हा ती व्यक्ती इतकी मोठी होते की तिच्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य ठरते तेव्हा ते त्या व्यक्तीवर टिकेची झोड उठवतात,त्याला परोपरीने बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.(तुकाराम महाराजांकडे वेश्येला पाठवण्याचा प्रकारही याच गटात येतो.)अन् जेव्हा त्या व्यक्तीला बदनाम करणेही अशक्य होते तेव्हा ते त्या व्यक्तीचा जाहीर उदोउदो करून पद्धतशीर तिच्या विचारांना मारतात.म्हणजे ती व्यक्ती फक्त नावाला अमर होते अन् ज्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीनं जन्मभर जीव जाळला ती गोष्ट तशीच राहते.

    ReplyDelete
  40. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री. बी. जी. कोळसे पाटील यांचे तुकारामांच्या हत्येसंदर्भातील सेलू येथे भरलेल्या लोकन्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगीचे विचार :

    "तुकाराम महाराजांचे तुकडे-तुकडे करून त्यांना मारण्यात आले. परंतु लोकांना सांगण्यात आले की, ते सदेह पुष्पक विमानाने स्वर्गाला गेले, अन आजही आपण या भाकड कथांवर विश्वास ठेवतो."

    ReplyDelete
  41. तुकोबारायांनी अभंगाद्वारे स्वत: वैकुंठ नाकारलेला आहे..ते म्हणतात--

    "सांडूनी सुखाचा वाटा |
    मुक्ती मागे तो करंटा ||
    का रे न घ्यावा जन्म |
    काय वैकुंठी जाऊन ||
    येथे मिळतो दहीभात |
    वैकुंठी ते नाही मिळत ||
    तुका म्हणे न लागे मुक्ती |
    राहीन संगे संताचिया ||"

    --संत तुकोबाराय.

    ReplyDelete
    Replies
    1. तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥
      मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥
      तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥
      तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥
      तिर्थाच्या ठिकाणी जाण्याची इतकी धडपड आपण करतो, आणि कळत नकळत लुटले जातो. तुकाराम म्हणतात, संतसंग हाच खरा सर्व भावनिक गरजांचा उतारा आहे. नाहीतर कोणीतरी म्हटलेच आहे ना की...
      रांड़, सांड़, सीढ़ी, सन्यासी | इनसे बचे तो काशी ।
      तुकारामांनी तर सांगितले आहे की पूजा करताना संतमंडळी घरी आली तर आधी त्यांचा सत्कार करावा आणि मग देवाची पूजा.
      करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥
      देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥.
      शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥
      तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥

      Delete
  42. तुकाराम महाराजांचा खून हा रामेश्वर भट, मंबाजी भट व सालोपालो या तीन कर्मठांनी मोठ्या शिताजफीने करून पचवला, व त्यातील रामेश्वर भटाने वैकुंठगमनाची एक सुरस कथा बनवून आजही लोकांना अंधारात ठेवले आहे. याचा पुरावा म्हणजे त्यांचे सर्व लिखित वाङमय व पुरावे यांच्या आधारे तथाकथित वैकुंठ गमनावेळी केवळ रामेश्वरंच कसा हजर होता, महाराजांची सावली असलेले टाळकरी हे तेव्हा का नव्हते..?? कारण ते उपस्थित असल्याचा एकही मान्य पुरावा इतिहासात नाही.

    मधुकर माने

    ReplyDelete
  43. शिवरायांवर ज्यांच्या शिकवणूकीचा प्रभाव पडला ते संत तुकाराम यांना मात्र आध्यात्मिक मुक्तीसाठी अमानुष छळ भोगावा लागला. ' बरे झाले देवा कुणबी झालो ', असे म्हणणारे तुकाराम स्वत:ची आध्यात्मिक मुक्ती मिळवता मिळवता आजुबाजूच्या सामाजिक रुढींवरही शेलक्या भाषेत तुटून पडत असले पाहिजेत. त्या शिवाय त्यांच्या विरोधात मंबाजींसारखे धर्ममार्तंड उभे ठाकलेच नसते. संत तुकारामांचा धर्ममार्तंडांनी खून केला. तुकोबांनी घेतलेली सर्वसामान्य जनतेच्या हिताची भूमिका व या भूमिकेशी शतकानुशतके उभा दावा मांडलेले धर्मरुढी परंपरेचे ठेकेदार यांचा इतिहास पाहता प्रतिपादनात सत्य असल्याचे जाणवते.

    ReplyDelete
  44. The day of murder

    And on one such day taking advantage of the situation when villagers were
    busy in activities of hassles of *Dhulvad* (second day of Holi) and
    inebriated, a group of rowdy Brahmins entered the town sprinkling colors,
    beating drums, making loud noise and surrounded Tukaram. As a part of fun of
    Holi, this was ignored by all. But the women got suspicious. There was hue
    and cry. But the sound of drums subdued all and caused confusion. Brahmins,
    Rameshswar Bhat, Salomalo Bhat and others dragged Tukaram to the banks of
    Indrayani River and killed him there. They tied a stone to his body and
    threw it in the running water, thus making the dead body untraceable. The
    date was 9th March 1649.
    Shivaji's activities

    That time, Shivaji was nineteen years of age. He was stationed in Rajgad.
    His father Shahaji was under detention under custody of Adil Shaha. Shivaji
    was yet to be fully well known to the masses. The fort of Purandar was under
    siege of Fatekhan, a Sardar of Adil Shah. He had won back some area of the *
    Swaraj*. The town Dehu of Tukaram Maharaj was under the area of fort of
    Kondana. Adil Shah had a suspicion that Tukaram is guiding Shivaji, and
    hence he was against Tukaram. In January 1647, by the order of Dadoji
    Konddev, the literature of Tukaram was drowned in the river Indrayani and
    Tukaram was excommunicated by the Brahmins.

    Those were the days of festival of Holi, and the Day of Dhulwad. King
    Shahaji was in prison. Shivaji was under siege of fort Purandar. All the
    warriors like Veer Baji Pasalkar, Baji Jethe, Godami Jagtap, Shivimkar,
    Yesaji and all others were busy in fighting the siege. Jijau, mother of
    Shivaji was on Rajgad, busy in affairs of administration and justice. This
    was the opportunity, the Brahmins sought, and a radical terrorist group of
    Brahmins murdered Tukaram. This is the history.

    When Tukaram was murdered, Shivaji himself had not become stable fully. He
    was not crowned as Chatrapati. He had just started somehow assembling the *
    Mavales*, and building *Swaraj*. Strong enemies like Moghul and Adil Shahi
    was in opposition. Therefore, Tukaram was murdered in spite of presence of
    Shivaji. There is nothing to wonder or be surprised about it. His murder is
    the truth.
    Appeal to the masses

    During recent years, John Kennedy the President of USA was murdered. Two
    Prime Ministers of India, Indira Gandhi and Rajiv Gandhi were murdered by
    cruel extremists. In history, Bahidrath, the grandson of Emperor Ashok, was
    murdered by his own Brahmin commander. When the Kings and Prime Ministers
    under heavy security can be murdered, how easy it is to murder an unarmed
    saint. This was shown by Nathuram Godse by murdering M. Gandhi. Godse also
    was a Brahmin. Gandhi was Father of Nation. That Gandhi would be murdered
    was known to Morarji Desai. Godse killed Gandhi under guidance of Sawarkar.
    The same Sawarkar is now being taught in the schools as a national hero and
    has reached the premises of Loksabha.

    Therefore, the Marathas, the Varkaris, the devotees of Tukaram, the *
    kirtankars*, all are appealed not to be emotional. Tukaram Maharaj, who
    himself denied the existence of *vaikuntha*, how can he go to *Vaikuntha*?
    The Brahmin society is taking advantage of our ignorance to conceal their
    brutal cruelty.

    'Do not believe only because it is said by many; use your own judgment what
    is true and what is untrue'. This is what Tukaram Maharaj preached. That
    preaching should be accepted. After death of Tukaram, his wife Jijai went to
    her parents. Later Sambhaji helped them. Narayan Maharaj started *Palkhi *to
    Pandharpur. Brahmins stopped singing the *aarati* of Tukaram in the
    Dnyanoba's *vari*. Crores of us Varkaris we are tolerating this. Even then
    we are being asked how it is possible for Brahmins to murder Tukaram during
    rule of Shivaji. This is called '*bhaitad panaa*' (stupidity) of Marathas.

    ReplyDelete
    Replies
    1. Very nice crystal clear interpretation !

      Delete
  45. Saint Tukaram was killed due to terrorism. This was not physical terrorism, but in the words of Tukaram, “I will not be so sad if I lose my life, but if my abhangas, literature is destroyed then it will be my real death. And I am seeing my death daily”. This type of terrorism where one can see his death daily, is the most fearful terrorism. If any person is killed due to attack on him, the terrorism ends there itself. But looking at one’s own death daily when he is alive is the worst kind of terrorism and not bearable. For thousands of years our people are suffering from this type of terrorism.

    ReplyDelete
  46. संत तुकाराम यांचा खून दहशतवाद निर्माण करण्यासाठी केला होता. हा भौतिक दहशतवाद नव्हता, पण तुकाराम यांच्या शब्दात, "मी माझे आयुष्यात गमावल्यास मला दु: ख होणार नाही, परंतु माझे अभंग, साहित्य नष्ट होत असेल तर तो माझा वास्तविक मृत्यू होईल. आणि मी "रोज माझ्या मृत्यू पहात आहे". ते दररोज स्वतः मृत्यू पाहू शकतात हा दहशतवादाचा एक प्रकार आहे, सर्वात भयंकर दहशतवाद आहे. कोणत्याही व्यक्तीला नष्ट करण्यासाठी त्याच्यावर हल्ला करून ठार केल्यास, दहशतवाद वाढेलच तो स्वतः हून संपणार नाही. पण जी व्यक्ती जिवंत असताना स्वतःचा मृत्यू रोज बघत आहोत असे म्हणते हा वाईट दहशतवादाचा प्रकार आहे आणि हे चांगले नाही. हजारो वर्षांपासून आमच्या लोकांना दहशतवादाचा हा प्रकार सहन करावा लागत आहे.

    ReplyDelete
  47. During his 41 years, Tukaram composed over 5,000 abhangs. Many of them speak of events in his life, which make them somewhat autobiographical. Yet, they are focused on God, Pandurang, and not Tukaram. His abhangs became very popular with the masses of common people. It was this very popularity that caused the religious establishment (the high caste Brahmins) to hate and persecute Tukaram. as, he was causing them to lose their power over the people. There are many miracles attributed to Tukaram. ..
    Though these yester year saints would have choosen other means to make changes in societies, it probably would not have made any sense at that time, when just speaking out aginst hindu varnashrama would have made them killed by the hindu terrorists, so they might have wisely choosen "In the Name of God" pathway, but would have completely involved in what they were doing. Neverthless, it is their great talents and power over the ordinary, mundane people that make them saints, not the godly worshiping or craps like that. Many of the listed saints here took that path as the hindu's were barbarians and kill at sight if any lower caste people trying to come up, but the god worshiping pathway probably saved all these saints, but eventually Tukaram was got killed, Nandanar was god killed by Brahmins and the list goes on and on.....!

    ReplyDelete
  48. वारकरी तत्वज्ञान समाजात रुजविण्यासाठी संत रविदास, संत कबीर, संत सज्जन कसाई, संत सेना न्हावी, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई, संत तुकाराम, संत बहिणाबाई इत्यादी संतांनी पुढे सतराव्या शतकापर्यंत कार्य केले. या सर्व संतांचे तत्वज्ञान नाथ, दत्त, महानुभाव विचारधारांचे मिश्रण होते. मुळातच ते ब्राम्हणशाही नाकारणारेच होते. वारकरी कीर्तनातून गावोगाव सामाजिक सुधारणा होऊ लागल्या. वर्णभेद, जातीभेद कमी होऊ लागला. त्यामुळे वैदिक ब्राम्हण या वारकरी संताविरोधात एकत्रित व संघटीत होवू लागले. त्यासाठी धर्मसत्ता व राजसत्ता यांचा गैरवापर करून प्रमुख नेत्याविरोधात घातपातांची कृत्ये करू लागले. महात्मा बसवेश्वर व चक्रधर स्वामींची हत्या करण्यात आली होती. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, व मुक्ताबाई या चार भावंडांना ब्राम्हणांनी अतोनात छळले. तरुणपणीच एकाच वर्षात या चारही भावंडांचा घातपाती मृत्यू झाला. सन १३३८ मध्ये मंगळवेढ्यास संत चोखोबा व त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांचा अअसाच घातपाती मृत्यू झाला. त्यावेळी संत नामदेव महाराज पंजाबात होते. त्यांनी परतताच संत चोखोबांची समाधी श्री विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधली भारतभर या संतांना वैदिक ब्राम्हणांचा त्रास सहन करावा लागला.त्यातून पुढे संत नामदेव महाराजांचाही त्यांच्या सोळा कुटुंबियासह घातपाती मृत्यू झाला. संत रविदास, संत कबीर यांनाही हेच सोसावे लागले. तर जगतगुरू संत तुकाराम महाराजांना सन १६५० मध्ये अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी विज्ञानाचा स्फोट होत असतांना पुष्पक विमानातून वैकुंठी जावे लागले. वास्तवात त्यांचीही हत्या करण्यात आली आणि वैकुंठाची अफवा पसरविली.

    ReplyDelete
  49. विषमतावादी वैदिक-ब्राम्हणी धर्मव्यवस्थेविरोधात लढा पुकारणारा जगतगुरु योद्धा संत तुकाराम !
    जगतगुरु विद्रोही तुकाराम महाराजांच्या व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यातून विषमतावादी वैदिक व्यवस्था नेस्तनाबूत झाली. म्हणूनच तुकाराम महाराजांच्या विद्रोही कीर्तनावर मंबाजी व सालोमालो या वैदिकांच्या छावणीने बंदी घातली. तुकाराम महाराजांची अभंग गाथा देहू येथील इंद्रायणी नदीत बुडविण्यात आली. कारण की तुकाराम महाराजांनी वैदिक धर्माविरुद्ध एक मोठा वारकरी संघर्ष चालविला होता. संत नामदेवापासून ही वारकरी प्रेरणा तुकाराम महाराजांना मिळाली होती. विठ्ठल हे वारकरी समतावादी चळवळीचे प्रतिक होते. देहू हे वारकरी चळवळीचे केंद्र होते. तुकाराम महाराजांच्या प्रभावाने अनेक लोकं त्यांचे शिष्य झाले होते. तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहून वैदिक-ब्राम्हण हतबल झाले होते. विषमतावादी वैदिक धर्माच्या शोषणाविरोधात अभंगाच्या माध्यमातून बहुजन समाजाचे प्रबोधन करणे हे वारकरी धर्माचे लक्ष्य होते. त्यासाठी तुकाराम महाराजांनी रात्रंदिवस वैदिक धर्माविरुद्ध युद्ध पुकारले. यासाठी जीवाच्या आकांताने त्यांनी हे आंदोलन पुकारले. म्हणूनच त्यांच्यावर वैदिक-ब्राम्हणांनी दोनदा शारीरिक हल्ले केले. व तिसऱ्यांदा धुळवडीच्या दिवशी इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर सदेह इंद्रायणीत गाडले. घातपातातून ही हत्या घडविण्यात आली. व संशय येऊ नये म्हणून देहू गावात वैकुंठगमनाची अफवा पसरविण्यात आली. तुकाराम महाराजांनी चालविलेली वारकरी चळवळ ही भक्तीची चळवळ नव्हती. तर ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध पुकारलेला लढा होता. म्हणूनच त्यांना वयाच्या ४२ व्या वर्षी घातपाताने मारण्यात आले. तुकाराम महाराज म्हणायचे मी चमत्कार करीत नाही, मी चमत्कार जाणीत नाही, व चमत्कार करणारा भोंदू असतो. जे तुकाराम महाराज चमत्काराला नाकारतात. त्यांच्याच गाथेत चमत्कार कुणी घुसडले.

    ReplyDelete
    Replies
    1. तुकोबारायांची "ब्रह्मरुप काया" ऐन उमेदीत नाहिशी झाल्याने त्यांच्या परीवाराचे,देशाचे आणि धर्माचे देखील अपरिमित नुकसान झाले.हे खरे असले तरी ती काया नाहीशी कशी झाली याचे गुढ आता उकलून काही खास लाभ होण्याचा संभव आहे का ? अजिबात नाही आणि या संशोधनाचा उद्देश तो असूच नये.पण त्यांच्या देहाबरोबर त्यांचे श्रेष्ठ तत्वज्ञानच लोपवून टाकण्याचा जो प्रयत्न ’सदेह वैकुंठगमना’ची कल्पना पसरवणार्यांनी कळत-नकळत केला.तो हाणून पाडणे हेच काय ते प्रयोजन असले पाहिजे."पावलो पंढरी वैकुंठभवन"(३८९९) म्हणणार्या तुकोबांना कुठल्या दुरस्थ वैकुंठी जायचे होते की हे विश्वच वैकुंठरुप करायचे होते ? हे जरी स्पष्ट झाले तर मानव समाजाला ते हितावह ठरणार हे सांगायलाच नको.तुकोबांना वैकुंठातून भुमीवर आणणे हे लोकाद्धारासाठीच उपयुक्त आहे.नाहीतर कुठले तरी वैकुंठ हेच भाविकांचे ध्येय ठरून,आकाशाकडे पाहत त्यांची भुमीवर अस्ताव्यस्त पावले पडणे व "परलोका"च्या ठेकेदारांना त्याची मनसोक्त लुट करता येणे चालूच राहणार हे लक्षात घेता,हे संशोधन म्हणजे गडे मुर्दे उकरणे नव्हे तर "खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढले ठेवणे समर्थांचे"(८८३)याची जाणीव ज्ञात्यांना झाल्याखेरीज राहणार नाही.
      संतशिरोमणी तुकोबा आणि इतर संत महात्म्य..
      आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन व तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन असे या महापुरुषांचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते.त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो.याबाबत खरा विचार करायला हवा की खरेच का असली बाब हीच त्या महापुरुषांचे सर्वश्रेष्ठत्व दर्शवणारी आहे ? त्यांच्या संतत्वाची गमक काय ? आद्यशंकराचार्यापासून तर समर्थ रामदासांपर्यंत एकालाही- श्री ज्ञानराजाला सुद्धा-सदेह वैकुंठी सुयोग लाभला नाही,म्हणून त्या सर्वांच्याच संतत्वाचा दर्जा तुकोबारायांपेक्षा कमी असे लेखण्याचे मनोधैर्य आपल्यात आहे काय ? समाधीजीवन, पुनर्जीवन किंवा सदेहवैकुंठगमन हेच आपले खरे पुर्णत्व किंवा हेच मानवजीवणाचे परमलक्ष्य होय.असे तरी त्या महात्म्यांनी स्वत: कोठे सांगून ठेवले आहे काय ? तसे जर नाही तर या गोष्टीला इकडे पराकोटीचे महत्व देण्याला तरी काय अर्थ आहे ?
      वैकुंठगमनालाच खराखुरा अर्थ आहे असे जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याचा पुरेपूर छडा लावणे हे तरी प्रत्येक जाणत्या भक्ताला अत्यावश्यक का वाटू नये ? निव्वळ ’पीछेसे आयी आगे धकाय” अशी मुर्दांड श्रद्धा जपून ठेवण्याला काही किम्मत आहे का ? "वंदिले वंदावे निंदिले निंदावे" अशी "न धरावी चाली करावा विचार" हीच तुकोबांरायांची शिकवण आहे आणि याच शिकवणीनुसार त्यांच्या "सदेह वैकुंठगमना" च्या अथाशक्य सर्व पैलूंवर त्यांच्याच वाणीचा विवेकपुर्ण प्रकाश पाडताना अनेक प्रश्न-शंका उभे ठाकतात,"ज्या महापुरुषाचा इहलोकी अभंगरचना करण्याचा देखील अधिकार तीव्रपणे नाकारण्यात आला,त्या महापुरुषाला एकट्यालाच सदेह वैकुंठगमनाचा सर्वाच्च अधिकार मात्र खुशाल बहाल केला जातो यातील मख्खी काय कळत नाही. शिवाय,ज्या कुटुंबातील प्रमुख देवपुरुष ’सकळा पुसून’ देवासह सदेह वैकुंठी जाण्याचे अभूतपुर्व कार्य करून दाखवितो,त्या कुटुंबाला त्या भाग्यशाली घटानेनंतर महिन्याभरातच सर्वस्व टाकून त्या पावन पित्रुभुमीतून पळून जावे लागते याचा अर्थ काय ? इत्यादी शंकांच्या संदर्भातही अथाशक्य समग्र विचार करणे प्रत्येक तुकोबांच्या सदभक्तांचे कर्तव्य आहे."

      Delete
  50. आधुनिक काळात संत तुकारामाना प्रभात फिल्म कंपनीने मारले
    त्या सिनेमात इतके चमत्कार आहेत की तुकाराम हा जादुगार वाटतो !
    शांताराम वनकुद्रे यांचा निषेध असो

    ReplyDelete
  51. डॉ आंबेडकरांनी दलितांसाठी खूप विचार करून ठेवला आहे त्याचा आपण सर्वांनी थोडा अभ्यास केला पाहिजे कारण त्यातच आपल्या भावी भारताची प्रगतीची चावी आहे आपण आजवर अनेक ऋषीमुनी आणि अनेक संस्कृत लिखाणे यांच्या आहारी जाउन नेहमी ब्राह्म मध्यावर ठेवून विचार केला !पण आता डॉ आंबेडकर काय म्हणतात हे पाहून पुढे जायला पाहिजे !
    समजा अमेरिकन सरकारला इथे काही गुंतवणूक करायची असेल तर आपण डॉ आंबेडकर काय म्हणाले असते ते पाहिले पाहिजे
    ज्या वेळेस कोका कोला आणि पेप्सी आले त्यावेळेस असे करायला हवे होते निदान दलिताना स्वस्त योजनेत ते मिळाले पाहिजे !
    नवे धारण बांधले की त्याच्या दोन्ही अंगाने दलिताना जमीन कसायला जमीन दिली पाहिजे , किंवा
    डॉ आंबेडकर कसे वागले असते ते पाहिले पाहिजे
    समजा चीनने भारतावर आक्रमण केले तर डॉ आंबेडकर काय वागले असते ते तपासले पाहिजे
    आपल्याला समुद्रात खोलवर तेलसाठे मिळाले तर डॉ आंबेडकर यांनी काय केले असते ?
    अशा अनेक गोष्टी आहेत त्यात डॉ आंबेडकर कसे वागले असते त्याबाबत लोकसभेतून अहवाल मागवून तसेच वागले तर कोणाही दालीतावर अन्याय होणार नाही !
    डॉ आंबेडकरांनी घटना लिहिली आहे त्यामुळे त्यांचा मान राखत त्यांची आठवण काढत जर हा देश चालवला तर काहीच अडचणी येणार नाहीत !
    बागेत भेळेच्या गाड्या असाव्यात का ?शाळेत इंग्लिश मिडीयम असावे का ?प्रादेशिक भाषा आणि हिंदीचे काय नाते असावे ?मोफत बस वाहतूक आणि मोफत रेल्वे दलिताना असावी का ?नोकरीत दलिताना सर्वात आधी नोकरी राखून मग इतराना उरलेल्या नोकऱ्या द्याव्यात हे धोरण ठेवावे
    परराष्ट्रात आपण जास्तीतजास्त दलिताना पाठवावे म्हणजे आपली भारताची सांस्कृतिक ओळखही होत राहील आपण सर्व शाळात नीला शर्ट आणि प्यांट असा युनिफोर्म ठेवावा आणि सर्व शक्य त्या ठिकाणी बुद्धाचे पुतळे ठेवावेत ,एअर पोर्ट वर बुद्ध असावा रेल्वे स्टेशन वर बुद्ध असावा आणि एसटी स्थानकावर बुद्ध असावा

    ReplyDelete
  52. सोनवणी भाऊ,

    आपण हे क्षणभर धरून चाललो की
    "संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥"

    असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते. तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने, किती आत्मियतेने पाहिले असते. तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते.तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते. त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता.तुकोबांचे एखादे भव्य स्मारक उभारून तेथे नित्यमहोत्सवाचा कसा जल्लोष उडवून दिला असता आणि तुकोबांची अम्रुतवाणी मिळेल तेथून संग्रहीत करुन तो प्रचंड गाथा कसा अगदी सुरक्षीत करून ठेवला असता.त्या पुण्यस्थळाची माती मस्तकी लावण्यासाठी व अभंग उतरून नेण्यासाठी दर्शकांची कशी रीघ लागली असती. अगदी स्वाभाविकपणेच हे सारे घडणे अनिवार्य होते.परंतू असे काही घडले आहे का ? ऐतिहासिक आधार काय सांगतात ? आपणास आश्चर्य वाटेल की इतिहास याबाबतीत स्पष्टपणे विरुद्ध साक्ष देत आहे.
    इतिहास स्वच्छ सांगतो की संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वणानंतर महिना-दोन महिन्यातच तुकोबांच्या संपुर्ण परिवाराला देहू गाव सोडून जाणे भाग पडले. संपुर्ण कुटुंबाला देहुतून परागंदा व्हावे लागले. तुकोबांच्या निर्वाणानंतर जिजाबाई आपल्या लहान मुलास घेऊन खेडला जाऊन राहिल्या. कान्होबा सुदुंबरे येथे जाऊन राहिले. त्यामुळे विठ्ठलटिके पडिक राहिले (तु.संतसांगाती-मंबाजी)’.’मंबाजीकडे नुसत्या देवाच्या पुजेऐवजी देऊळवाड्याची वगैरे सर्वच व्यवस्था आली होती. अशा व्यवस्थेत ती मंडळी देहुत राहणे शक्य नव्हते.’(तु.सं.सां.-बहिना) कचेश्वर ब्रम्हे यांना, निर्वाणानंतर एक-दिड तपाने देहूस १०-५ अभंगाखेरीज तुकोबांची अम्रुतवाणीही मिळू शकली नाही. (तु.सं.सां.-कचेश्वर). तुकोबांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निर्वाणानंतर तडकाफ़डकी गाव का सोडले, याचा संकेत कान्होबांच्या तत्कालीन अभंगातच मिळतो. आपल्या शोकमय अभंगात ते त्यावेळचे नि:सहाय व भयास्पद वातावरण सुचित करतात की-

    आक्रंदती बाळे करूणावचनी । त्या शोके मेदिनी फ़ुटो पाहे ॥(२९८८)
    असो आता काई करोनिया ग्लांती ? कोणा काकुलती येईल येथे ?
    करिता रोदना बापुडे म्हणती । परि नये अंती कामा कोणी ॥ (२९९०)
    माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार ।
    लाविली काहार । तारातीर करोनि ॥(३००६)
    काही विपत्ती अपत्या । आता आमुचिया होता ।
    काय होईल अनंता ? पाहा,बोलों कासया ? ॥(३०११)

    अर्थात आपली मुलेबाळे सुद्धा निराधार झाली, दारोदार लागली व त्यांचेवर कोणत्या क्षणी काय विपत्ती कोसळेल याचा नेम उरला नाही, या भयग्रस्त भावनेनेच प्रिय पुत्रबंधुंनी आपली जीवाभावाची भुमी ताबडतोब सोडली हे स्पष्ट दिसून येते.
    त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट ही की, तुकोबांच्या परिवारापैकी एकाही व्यक्तीने पुढील वीस-एकवीस वर्षात देहूच्या भुमीवर पाऊल सुद्धा टाकले नाही. आपल्या महान पित्रुदेवताच्या वार्षिक निर्वाणमहोत्सवाला देखील नाही ! आणि हा उत्सव तरी होत होता कोठे ? जिजाईच्या म्रुत्यु नंतर एकवीस वर्षाचा नारायणबुवा बंधुसह देहुस आला.तो देखील कचेश्वर यांच्या सत्पुरुषाने त्यांना प्रेरित केल्यानंतर.तुकोबांच्या मुलांनी पुन्हा देहुस ठांण दिल्यानंतर तिकोबांबद्दल जाग्रुती निर्माण झाली. विशेषत: तुकोबांचे व्रुंदावन नारायणबाबाने इ.स.१७०४ मध्ये बांधून पुण्यतिथी साजरी करावयास लागल्यानंतर तुकोबांचा किर्तीमहिमा वाढण्यास आधिकाधिक भर पडू लागली.(सं.तु.प्रास्ताविक प्रु.८) त्यापुर्वी महादेव, नारायण आदि तुकोबांच्या सुपुत्रांनी नुसती देहुच सोडली होती असे नव्हे तर विठठल देव देखील सोडला होता. त्यांनी मधल्या काळात विठोबाच्या पुजेअर्चेकडे लक्षच दिले नाही कारण विठोबा मुळेच त्यांच्या घराण्याची धुळधान उडाली अशी त्यावेळी त्यांची समजुत झाली होती.(सं.तु.प्रु.११२). श्री.वा.सी. बेंद्रे यांचे सारे संशोधन बरोबर असेल तर, तुकोबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या परिवाराची झालेली वाताहत, ही दुरवस्था व विचित्र मनोरचना एकच गोष्ट ओरडून सांगत आहे असे म्हणावे लागेल की तुकोबांचे सदेह वैकुंठगमन झालेले नसून प्रत्यक्ष खूनच झाला आहे यात शंका नाही. याचा विचार तुम्ही का करीत नाही ? याचेच आश्चर्य वाटते.

    विशाल चव्हाण

    ReplyDelete
    Replies
    1. तुकोबांच्या हत्येची शक्यता ?
      यापुर्वीचे बरेच विचारवंत आणि आजच्या सामाजिक संघटनांच्या मते तुकोबांची हत्या झाली असावी.याचे मुख्य कारण त्यांचे क्रांतिकारक तत्वज्ञान.कर्मकांडांच्या बडिवारापेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व ते सांगत होते.वर्णश्रेष्ठत्वापेक्षा सदचाराचा महिमा ते गात होते."वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा" असे गर्जत "भेदाभेद अमंगळ" म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात तुकोबांनी समतेचा झेंडा रोवला होता.त्यामुळे प्रतिष्ठितांच्या प्रतिष्ठेवर आघात होत होते.त्यांच्या प्रस्थापित वर्णवर्चस्वाला होणार्या खंद्या विरोधामुळे मंबाजी सारखे अहंकारी भट मत्सराने जळू लागले होते.याचा पहिला प्रत्यय तुकोबांना आला तो त्यांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला सांगण्यात आले तेंव्हा.वर्णवर्चस्वाच्या स्वार्थापलीकडे कुठलाही शास्त्रार्थ यामागे नव्हता.

      या प्रसंगानंतर कालांतराने तुकोबांना आपल्यावरील प्राणांतिक संकटाची कल्पना आली."लावुनी कोलीत माझा करतील घात" ह्या अशा अनेक उद्गारावरून हे स्पष्ट होईल.त्याप्रमाणेच शेवटी झाले.सालो-मालो,मंबाजी यासारखे दुर्जन भट तुकोबांच्या विरोधात जळफ़ळत होते.त्यांनीच तुकोबांच्या खुनाचा डाव रचला आणि सिद्धिसही नेला.तुकोबांच्या त्या अंत्यकालीन संकटाची जाणीव संत बहिनाबाईंच्या अभंगाद्वारे होते.संत बहिनाबाईंनी पाहिलेला मंबाजी "मारु पाहे घात चिंतुनीया" असे स्पष्ट वर्णन केले आहे.
      तुकोबांचा खुन झाला असावा असे आत्तापर्यंत अनेकांनी म्हंटलेले आहे.श्री दयानंद पोतदार यांच्या "संत तुकाराम आणि त्यांच्यावरील आक्षेप" या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी म्हंटले आहे की तेंव्हा तुकोबांचा कोणीतरी गुप्तपणे वध केला असावा आणि खर्या गोष्टीच तपास लावण्याकडे कोणाची मती वळू नये म्हणुन प्रारंबी यात्रेची,नंतर जलसमाधीची व त्यानंतर सदेह वैकुंठगमनाची अशा एकेक कंड्या वातावरणात सोडून दिल्या असाव्यात असा तर्क संभवणीय वाटतो."
      दुसरा पुरावा असा की तुकोबांचा नैसर्गिक म्रुत्यू आला असता किंवा ते खरोखरच सदेह वैकुंठाला गेले असते तर त्यांचे बंधू कान्होबा यांना "दु:खे दुभागले ह्रुदयसंपुष्ट" इतका शोक करण्याचे काय कारण होते ? वस्तुस्थिती अशी दिसते की तुकोबांच्या अंतानंतर त्यांचे सगळे कुटुंबच देशोधडीला लागले.पुढे अनेक वर्षापर्यंत तुकोबांचा एकही वंशज देहूला नव्हता.याचे कारण काय असावे ? ह्या सर्व गोष्टी विचारवंतांनी प्रतिपादन केलेल्या प्रमेयाला पुष्टीच देतात.

      Delete
  53. तुकोबारायांचा खून केल्यावर भटांनी लोक देह कुठे असे विचारतील म्हणून सदेह वैकुंठी जात आहेत/ गेले असे सांगितले..त्यादिवशी धुलवलीचा (रंगपंचमी) दिवस असल्यामुळे लोक उत्सवात होते..पण ग्रेट तुकोबारायांना मुकले होते...काही लोकांनी विचारले की "तुकोबाराय वैकुंठी जाताना आम्हाला कसे दिसले नाहीत" यावर भटांनी कावा करून सांगितले की "ज्यांना दिसले नाहीत ते दोन बापाचे आहेत"
    बहुजन समाज गुलामीत राहावा म्हणून मनुवादी अश्या पद्धतीने धार्मिक दह्शदवादाचा वापर करतात...

    -अजय जगताप

    ReplyDelete
    Replies
    1. कोणी सदेह वैकुंठाला पोहोचविले, कोणी काशी यात्रेला पाठविले, कोणी अचानक कीर्तनातून अदृश्य केले, कोणी तुकडे-तुकडे करून मारले, कोणी गळ्यात दगड बांधून इंद्रायणीत फेकून दिले, किती तरी कारणे फक्त हत्या लपविण्यासाठी? एकाच व्यक्तीला इतक्या प्रकारे मारून टाकल्याचे जगाच्या इतिहासातील हे एकमेव प्रकरण असावे, नाही काय?

      विजय मोहिते.

      Delete
  54. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणासंबंधी आजपर्यंत अनेकांनी चर्चा केली आहे."महाराष्ट्र सारस्वत"कार भावे यांच्या पासून ते आत्तापर्यंतचे साहित्यिक यात आहेत.श्री वा.सी.बेंद्रे यांसारखे संशोधकही यामध्ये आहेत.यांच्या मालिकेत आजच्या सामाजिक संघटनांचा देखील समावेश करावा लागेल.संत तुकारामांचा खुनच केला असावा असे स्पष्टपणे प्रतिपादन करणारेही बरेच होऊन गेले.इतकेच काय पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही "मेला की मारला कळेना । म्हणती वैकुंठाला गेला ।" या आपल्या उद्गारात याच प्रमेयाकडे संकेत केला आहे.
    निर्वाण अभंग आणि अभंगपत्रे
    संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वानाचा प्रश्न त्यांच्याच अभंगाच्या द्वारे सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.मग त्यात मत-मतांतरे का निर्माण व्हावीत ? यातील एक महत्वाची गोष्ट अशी की, संतांच्या आज ज्या गाथा आढळतात त्यात त्यांनी हे लिहिलेले अभंग कालानुक्रमाने दिलेले असतात असे मुळीच नाही.संत तुकारामांच्या अभंगातही असेच झालेले आहे.आपल्या आयुष्यात अभंगरचना करताना कदाचित स्वत: तुकाराम महाराजांनी किंवा त्यांच्या लेखनिकांनी ते क्रमश: लिहुन ठेवलेलेही असतील.पण आज कालानुक्रमाने लिहिलेल्या अशा अभंगाचा अस्सल गाथा उपलब्ध नाही.आहे त्या अभंगाची विषयावार विभागणी करून ते छापलेले आहेत.उपलब्ध गाथ्यात सर्वत्र ही विषयविभागणी आणि त्यात अंतर्भूत केलेल्या अभंगाची संख्या ही सारखी आढळते अशी नाही.अशा विषयविभागणीच्या प्रयत्नातूनच तुकाराम महाराजांच्या अंत्यकाळाविषयीच्या अभंगाचे प्रकरण निर्माण झाले आहे.
    निरनिराळ्या गाथ्यात आढळणार्या अशा निर्वाण प्रकरणातील अभंगाची तर्ककठोर बुद्धीने छाननी केली तर समजुन येईल की हे निर्वाणाचे अभंग केवळ संकलनात्मक आहेत.प्रत्येक संपादकाने वेगवेगळ्या अभंगसंचातून आपल्याला सोईचे वाटतील असे किंवा ओढून ताणून उपयोगी आणता येतील असे असंबद्ध विषयींचे अभंग आपापल्या संपादणीतील निर्वाण प्रकरणात संकलीत केले आहेत.इतकेच नाही तर तुकोबांच्या निर्वाणासंबंधी आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ काही प्रक्षिप्त अभंगही त्यात घातले गेले आहेत.या संकलनाबाबत एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
    १] "क्र.१५९६ या अभंगात गरुडावर बसून चतुर्भुज हरी वैकुंठाहुन तुकोबांच्या घरी येतात..क्र.१६०६ मध्ये श्रीरंगाशेजारी गरुडावर बसण्याऐवजी तुकोबा एकदम कुडीसहीत गुप्त होतात...गुप्त झाल्यानंतरही अभंग सुरुच असतात.क्र.१६०७ मध्ये तर आत्तापर्यंतच गरूड विमानात परिवर्तीत होतो आणी तुका बैसला विमानी हे द्रुष्य़ संत लोचनी पाहू शकतात. याच अभंगाच्या शेवटी तुका वैकुंठासी नेला तरी देखील १६०८ हा अभंग जन्मास येतोच.त्यात तर तुकोबा ’क्षीरसागर शयनी’ पोहचून सिंहासनी बसले आहेत.तो अभंग इहलोकी कसा म्हंटला गेला ? आणि क्षीरसागरी पोहचल्यानंतर वाराणसीपर्यंत असो सुखरूप (क्र.१६०९) असा काशीला पोहचल्याचा निरोप कसा काय आला ? या शेवटच्या अभंगात आपण येथून निजधामास जाणार असे तुकोबा म्हणतात..येथे तुकोबांबरोबर देव नाही पण गरूड मात्र आहे ! ..अशी ही सारी विसंगतीची चमत्क्रुती !"
    २] "चार कोसांवर विमान थांबवून जर हे अभंग लिहिले तर ’सकळही माझी बोळवण करा’ हे म्हणजे भुमीवरचे की आकाशातले ? ’उठा एक ऐका सांगतो तुम्हासी’..अशी सहा ओळीत तीनदा सांगण्याची पुनुराव्रुत्ती व्हावी,हे तुकोबांना सर्वथा अमान्य असणार्या रचनाशैथिल्याची कल्पना आणुन देण्यास पुरेसे नाही का ? स्वपत्नीसाठी येतो काकुलती मनी धरा म्हणून ’पदर पसरून दाढी ओठी’ धरून केविलवाणीने लोकांची मनधरणी करावी..देवासह वैकुंठी जाण्याचे अपुर्व भाग्य लाभले असताही ’अहो देवा ! कैसी घरबुडवण केली’ म्हणून आकांत करावा आणि ’देवांचे ते मुळ शोधू नये कोणी’ असा भलताच उपदेश करावा हे सारे तुकोबांच्या व्यक्तित्वाशी सुसंगत असेच आहे का ? ..’म्हणे मज आता निरोप द्यावा- ऐसे बोलो निया गुप्त झाले’ ही सारी रचना तुकोबांचीच आहे असे म्हणता येईल का ?..."

    ReplyDelete
  55. श्री तुकोबा महाराज विमानात बसुन सदेह वैकुंठाला गेले असे मानणार्या प्राचीनांनीच त्यांची ’विमानातून लिहिलेई अभंगरुप पत्रे’ निर्माण केली आहेत.असे का म्हणू नये ? ’चौकोशावरी थांबवली विमाने । पत्र हे तेथून तुम्हा लिहिले’ व ’स्वर्गलोकीहुनि आले हे अभंग’ या वचनांमधील ’तेथून’ व ’आले’ हे शब्द स्पष्टच सुचवितात की ते शब्द प्रुथ्वीवरील व्यक्तीच उच्चारू शकते.शिवाय ’चौकशा’वर ’स्वर्गलोक’ असू शकत नाही.’सप्त अभंगी पत्र’ व ’बारा अभंगी पत्र’ या दोन्ही बरोबर ’टाळगोधडी’ चा उल्लेख आहेच.तेंव्हा,तुकोबांबरोबर ’टाळगोधड्या तरी किती कल्पाव्या ? "तुकोबांचे निर्वाण झाले द्वितीयेस तर टाळगोधडी मिळाली पंचमीस ! हे साहित्य नेमके देहुलाच पडले" हे वास्तवतेच्या पलिकडचे नव्हे काय ? अशा भाकडकथा सांगणारे अभंग प्रक्षिप्त नव्हे तर काय म्हणावे ?.
    शुद्ध संशोधनासाठी
    देवधर्म आणि अंधश्रद्धा यांमध्ये बुडालेले कोणी भक्त म्हणतील की लोकमाणसात वैकुंठगमनाची दिव्य कल्पना शेकडो वर्ष द्रुढमुल झाली असता आता हे नव्याने मांडून कोणते कल्याण होणार आहे ? "जाले तेंव्हा जाले मागील ते मागे । आता वर्म लागे ठावी झाली ॥" हे सत्य असले तरी गडे मुर्दे उकरून लाभ काय ? हा प्रश्न बराच महत्वाचा आहे..खरे तर कोणत्याही बाबतीतले सत्यदर्शन हे निरपेक्षपणे स्वत:च अत्यंत मुल्यवान असते हे खरे.असत्यावर आधारलेली कल्पना दिव्य असली तरी ती कांचनम्रुगाप्रमाणे फ़सवी असते. ’जगरुढीसाठी घातले दुका” असे ’पोटदंभाचे पसार’ मांडणारे धर्माचे घाऊक व्यापारी ’चालीचाचि वाहो’ कायम ठेऊन आपल्या ग्राहकांच्या भ्रांत भावनांची खुशाल जपणूक करोत,पण संत मात्र तो मुलामा उडवून लावणेच हितावह समजतात.कारण भ्रामक कल्पनांनी कोणाचा कधीच उद्धार होत नसतो.उलट असत्याभिमान व डोळे बांधलेली श्रद्धा यांच्या पोटी शेकडॊ पापेच जन्मास येतात.
    "तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे " हे कसे विसरता येईल ? म्हणूनच तुकोबाराया निक्षून सांगतात-
    "अहो श्रोतेवक्ते । सकळही जन ! बरे पारखून बांधा गाठी ॥
    तुके तरी तुकी खर्याचे उत्तम । मुलामांचा भ्रम कोठवरी ?"
    भक्तांच्या भावना दुखावतील एवढ्यासाठी सत्य दडपून टाकायचे हा धर्म आहे का ? "लटिके ते रुचे । सत्य कोणाही ना पचे ॥" म्हणून असत्यच घोपटायचे की काय ? "धर्म आहे वर्माअंगी" याची वारंवार जाणीव करून देणार्या तुकोबांनी स्वष्ट केले आहे की कोणाच्या भिडेसाठी अथवा भावनेसाठी सत्य डावलता कामा नये.’नये भिडा सांगो आन’ व ’काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडले अंतर न पाहिजे॥.’त्यामुळे इथे कोरड्या कल्पना जुगारून यथार्तवादच स्विकारायला हवा.

    ReplyDelete
  56. तुकारामांचा खून पचविण्यासाठी ह्या लोकांनी किती-किती खोटी कारणे दिली असतील याची गिनतीच नसेल!

    ReplyDelete
  57. सूर्यप्रकाशासारखे एकदम स्पष्ट आहे की तुकोबारायांचा खूनच झाला होता. कोणी मानो अथवा न मानो! पुरावा म्हणून काय तुम्हाला video shooting हवे आहे काय? काय तरीच आपलं ?????????

    गणेश मिस्त्री

    ReplyDelete
  58. Now it is cleared and proved that murder of Sant Tukaraam done by mean/stupid Brahmins only!

    Pratap Veer.

    ReplyDelete
  59. संत तुकाराम फ्लीम मध्ये तुकाराम सदेह गरुडावर बसून जाताना दाखवले आहेत ,
    मग काय ते खोटे आहे का ?

    ReplyDelete
    Replies
    1. Yes, this is completely untruth!

      Delete
  60. संजय सोनवणी सर वाचकांच्या प्रतीक्रीयांमधून एक मुद्दा अधोरेखित होत आहे कि तुकाराम महारजांचा खुनाच झाला आहे ..........
    त्यासाठी त्यांनी विविध अभंगांचा आणि तत्कालीन सामाजिक परिस्थिती कशी होती याचा आधार "साधार" घेतलेला दिसत आहे ....आणि कितीतरी मुद्दे पाटाविक दिसत आहेत ....म्हणजे ते उगीच फालतूपणा म्हणून सोडून द्यायला माझे मन आणि कित्येक वाचकांचे मन पण असे सहजासहजी तयार होणार नाही....
    मग आता सर तुमचे म्हणणे खरे मानले तर तुम्ही वरील comments बाबत तुमचे म्हणणे काय काय आहे???

    ReplyDelete
    Replies
    1. दुसरे, तिसरे काही नाही तर आता सोनवणी यांची दात खिळी बसली आहे! बरोबर ना?

      अर्जुन सूर्यवंशी

      Delete
  61. संत तुकाराम आणि चमत्कार...

    आमचे प्राचीन धर्मग्रंथ हे चमत्कारांनी खचाखच भरलेले आहेत. मुळात माणूस हा धर्मवेडा आहे, आणि जेव्हा धर्मग्रंथच चमत्कारांचे समर्थन करताना दिसतात तेव्हा तो साहजिकच डोळे झाकून विश्वास ठेवतो. पिढ्यानपिढ्या हे चालत आले असल्याने ह्या विज्ञान युगात तरी वेगळे काय पाहायला आणि ऐकायला मिळणार? आणि म्हणूनच घरात बसवलेला शाडूचा गणपती भक्ताच्या वाटीतले दुध पितो!

    चमत्कार म्हणजे तरी काय? तर 'जे अशक्य ते शक्य करून दाखवणे' म्हणजे चमत्कार! ज्याला दैवी शक्ती प्राप्त झालेली असते अशी व्यक्ती चमत्कार करू शकते, अशा प्रकारची लोकसमजूत आहे; आणि त्यामुळेच भोंदू बुवा, बाबा काही तरी चिल्लर स्वरूपाची हातचलाखी करून हवेत मोकळा हात फिरवून सोन्याची साखळी काढून दाखवतात. तर काही विज्ञानाचे एखादे तत्त्व वापरून पाण्याचा दिवा पेटवून दाखवितात. पण हे खऱ्या अर्थाने चमत्कार नसतात.

    'चमत्काराशिवाय नमस्कार नसतो' हे भोंदुगिरी करणाऱ्या बुवा, बाबांनाही माहित असल्याने प्रत्येक भोंदूबाबा वरील प्रकारचा एक चमत्कार करून दाखवत असतो. बुवाबाजी करण्याचे चमत्कार हे एक प्रमुख साधन आहे.

    चमत्कार म्हणजे फक्त कार्य. त्यात कारणाचा पत्ताच नसतो.वास्तविक कुठलेही कार्य कारणाशिवाय घडत नाही; परंतु 'चमत्कार' या प्रकारात हा कार्यकारणभाव शोधूनही सापडत नाही.

    साधू, संत, महंत, महात्मे ह्यांचा मोठेपणा आणि महत्व वाढविण्यासाठी त्यांचे भक्त वा अनुयायी त्यांच्या चरित्राला हरतऱ्हेचे चमत्कार चिटकवतात. अश्या वेड्या, आंधळ्या भक्तांनी "मी चमत्कार जाणत नाही" म्हणणाऱ्या तुकारामानाही सोडले नाही. 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार त्यांच्या बारा बंदीला ठिगळासारखा का होईना पण जोडलाच! अशी आहे आमची 'चमत्कार' या अंधश्रद्धेविषयीची मानसिकता!

    चमत्काराविषयी तुकाराम म्हणतात :-

    कपट काही एक | नेणे भुलवायाचे लोक ||१||
    तुमचे करितो कीर्तन | गातो उत्तम गुण ||२||
    दाऊ नेणे जडीबुटी | चमत्कार उठाउठी ||३||
    नाही शिष्यशाखा | सांगो अयाचित लोका ||४||
    नव्हे मठ-पती | नाही चाहुरांची वृत्ति ||५||
    नाही देवार्चन | असे मांडिले दुकान ||६||
    नाही वेताळ प्रसन्न | काही सांगे खाण खुण ||७||
    नव्हे पुराणिक | करणे सांगणे आणिक ||८||
    नेणे वाद घटा पटा | करिता पंडित करंटा ||९||
    नाही जाळीत भणदी | उदो म्हणोनि आनंदी ||१०||
    नाही हालवीत माळ | भोंवते मेलवुनि गाबाळ ||११||
    आगमीचे नेणे | स्तंभन मोहन उच्चाटणे ||१२||
    नव्हे यांच्या ऐसा | तुका निरयवासी पिसा ||१३|| (१३७)

    वरील आत्मकथनातून आपण कोण आहोत? आणि कोण नाही आहोत? याविषयी तुकाराम अतिशय प्रांजळपणे आपली भूमिका स्पष्ट करतात. आपण कोण नाही, हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पुढील प्रकाराचा निषेधच केला आहे. लोकांच्या फसवणुकीसाठी कपट कारस्थान करणे, लोकांना जडीबुटी देणे, चमत्कार दाखवणे, शिष्य करून घेणे, मालकीचा मठ असणे, मालकीची जमीन असणे, देव्हाऱ्ह्यात पुजेची उपकरणे, पूजा द्रव्यांचा पसारा असणे, वेताळ प्रसन्न असणे, आचार विचारात विसंगती असणारा पुरोहित असणे, भंदे खेळणारा देवी भक्त असणे, घटाकाश, पटतंतू विधी करणारा वैदिक असणे, करंटा विद्वान असणे, माळ ओढणारा जपी असणे, जारण मारण, उच्चाटन, मोहन करणारा मांत्रिक, तांत्रिक असणे.

    वरील सर्व प्रकार हे तद्दन खोटे असल्याने कर्मकांडी स्वरुपातल्या त्या अंधश्रद्धाच आहेत. त्यांचा धिक्कार करणारे तुकाराम खरोखर पारदर्शी व्यक्तिमत्वाचे आहेत. एवढा एक अभंग अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, कर्मकांडे ह्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना मूठमाती देण्यास पुरेसा आहे. आपल्या घणाघाती प्रहाराने तुकारामांनी त्याचा चक्काचूर केला आहे.

    पण यातली गम्मत अशी की, जे तुकाराम 'मला चमत्कार दाखवता येत नाही' असे प्रांजळपणे सांगतात. त्यांच्याच नावावर 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार लोकांनी खपवावा, हा हास्यास्पद प्रकार असून धक्कादायकही आहे, तसाच तो तुकारामांवर अन्याय करणाराही आहे; पण चमत्कार वेड्यांना त्याचे काय?

    ReplyDelete
  62. Tukaram Maharj Yanchya natar va tyanchya agodar konich ka sadeha vaikunthala nahi gele

    ReplyDelete
  63. चांगली चिकिस्ता केली आहे !

    ReplyDelete
  64. Sanjay Sir, I got surprising info in last month. I went to one of my Tamil friends house in USA and I saw photo of Sant Tukaram in his house. I was amazed to see The Great Marathi Philosopher's photo in Tamil house. I inquired about photo and come to know that Dharmapuri district of Tamilnadu has Odaspatti village where it has a big tree and below that it has statue of Sant Tukaram. People there believe that Sant Tukaram went to Vaikuntha from that place. Is this information available in any reference document??

    ReplyDelete
  65. अतिशय उपयुक्त माहिती आहे

    ReplyDelete
  66. न्या. लोया यांची खून केस दडपली गेलीच ना . उगाच आपलं काहीतरी तर्क लावून जे खरं आहे ते दडपायचा प्रयत्न

    ReplyDelete
  67. संत तुकारामांचे अभंग एका इंग्रज अधिकाऱ्याने गोळा करून आताची गाथा बनवली हे खरे आहे का?

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...