Monday, April 7, 2014

पीएम म्हणून कोणी...

पीएम म्हणून कोणी
मोदींस हाक मारी
कित्तेक भगव्या जनांशी
होय हर्ष भारी...
विकासपुरूष मोठा
राम पायी विसावे
जणू हनुमंत कि हो साचा
रामास कौल लावे
"हे रामा दिसेना कुठेही
विकास मला...जगाला
माझाच गुजरात
भकास किहो केला...
"आता उघडॆ चित्र पडले
सारे प्रचार फेल गेले
आता तुच अवतारी
रामा मजशी तारी...
"मजला तुच एक त्राता
मजला तुच एक हेका
बाकी जाहीरनामा
आहेत फक्त फेका..
"या सर्व लोका आता
सर्वत्र तुच तू दिसावे
विकासांचे ढोल ताशे
सर्वांनी विसरावे
"रामात राम आहे
जाहिरनाम्यात राम आहे
रामाविना जगाचे
कसले कल्याण आहे?"
(हे सर्व गंमतीत घ्यावे...)

1 comment:

  1. आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
    ती हाक येई कानी, मज होय शोककारी

    नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
    आई कुणा म्हणू मी, आई घरी न दरी

    चार मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
    गोठ्यात वासरांना, ह्या चाटतात गाई
    वात्सल्य हे बघुनी, व्याकूळ जीव होई

    येशील तू घराला, परतून केधवा गे ?
    रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
    आई कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी
    स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारीअत्यंत सुंदर विडंबन केले आहे
    झेंडूची फुले आत्ता बहरतात - चैत्रात - त्याची आठवण झाली
    जिओ संजय जिओ !
    निवडणुकीच्या आधी हि फुले मिळाली हे जास्त महत्वाचे !१७ मार्च नंतर शिळी झाली असती
    काव्याची टाकत अफाट असते , आणि
    विडम्बनाची तर त्याहूनच !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...