Sunday, June 15, 2014

कोण आहे ही हिंदू राष्ट्र सेना?


 
feature size
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांचं विकृतीकरण करणारे फोटो फेसबुकवर फिरू लागले आणि उभ्या महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. बसगाड्यांची तोडफोड, दुकानं बंद करण्यासाठीच्या धमक्या याचा गदारोळ उडाला. आपला समाज अनेकदा विक्षिप्ततेचे इरसाल नमुने दाखवत असतो. मनोविकृतांना जे हवं असतं नेमकं तेच आपले लोक करतात, तणाव वाढतात. ज्याने कोणी असलं कृत्य केलं ते दूर बसून तमाशा पाहतात. पण यात सर्वात मोठा विकृतीचा कळस गाठला तो हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी… नमाज पढून मित्रासोबत घरी परतत असलेल्या शेख मोहसिन मोहम्मद सादिक या २४ वर्षीय तरुणाची २ जून २०१४ रोजी निर्घृण हत्या केली. अनेकांवर हल्ले करून त्यांनाही जखमी केलं. या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे संभाव्य दंगलीचा धोका टळला. खून प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या १७ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय. सर्व आरोपी महाविद्यालयीन विद्यार्थी असून यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यालाही या प्रकरणात अटक झाली होती. आता तो अन्य गुन्ह्यांत इतर पोलीस स्टेशन्सच्या ताब्यात आहे.
यात विकृतीची अजून पडलेली भर म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी ‘पहिली विकेट घेतली’ अशा स्वरूपाचे संदेश सर्वत्र पसरवायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर हडपसरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली म्हणून शेख मोहसिनला ठार मारलं गेलं असं धादांत वृत्तही पसरवलं जाऊ लागलं. हिंदुत्ववाद्यांचा उन्माद हा अलीकडे बदललेल्या राजकीय समीकरणांनी कसा उच्छाद मांडू लागला आहे हे या निमित्ताने लक्षात यावं.
हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक धनंजय देसाई नावाचा युवक ३४ वर्षीय आहे. हा मुळचा मुंबईचा. पुण्यात आल्यावर त्याने या कडव्या हिंदुत्ववादी संघटनेची स्थापना केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये त्याने बर्यापैकी आपलं जाळं पसरवलं. महाराष्ट्रभर या संघटनेच्या अनेक शाखा आहेत. कडवा हिंदुत्ववाद आणि मुस्लीम द्वेष हा संघाचाच अजेंडा आक्रमकपणे राबवणं हे त्याचं इति कार्य राहिलं आहे. आजवर भडकाऊभाषणं देणं, धार्मिक तेढ वाढवणारं आक्षेपार्ह साहित्य प्रसारित करणं याबद्दल त्याच्यावर जवळपास २३ गुन्हे दाखल आहेत. या व्यतिरिक्त पोलीस त्याला वेळोवेळी नोटिस पाठवत राहिले आहेत… त्यांना आपण केराच्या टोपलीत फेकून देतो असं तो जाहीरपणे सांगत असतो.
श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक, अभिनव भारतच्या हिमानी सावरकर, सनातन प्रभातचे विक्रम भावे हे त्याचे निकटवर्ती असून अनेक कार्यक्रमांत ते एकत्र आलेले आहेत. मालेगाव स्फोटाच्या संदर्भातील साध्वी प्रज्ञा सिंग आणि ले. कर्नल प्रसाद पुरोहितच्या समर्थनार्थही या सेनेने आक्रमक आंदोलनं केलेली आहेत. याव्यतिरिक्त अनेक उपद्व्याप हिंदू राष्ट्र सेनेच्या नावावर जमा आहेत.
‘हिंदू राष्ट्र’ हे या संघटनेचं ध्येय आणि सर्वोच्च स्वप्न. म्हणजे हे कोणाच्या आयडिऑलॉजीवर चालतात हे वेगळं सांगायची गरज नाही. सध्या याच आयडिऑलॉजीवर अंतिम विश्वास ठेवणारं सरकार केंद्रात असल्याने विकासाचे मुद्दे भ्रामक ठरत धार्मिक विद्वेषाला वाढवण्याचं कार्य होईल की काय अशी सार्थ भीती वाटणं स्वाभाविक आहे. महापुरुषांचं विडंबनही तेढ वाढवण्यासाठीच अशाच काही संघटनांनी केलं की काय अशी शंकाही येणं स्वाभाविक आहे. ‘पहिली विकेट पडली’ असा उन्माद करणारे पुढच्या विकेटी घेण्यासाठी अजून काय करतील हे सांगता येत नाही.
हेतू काय?
पुणे हे पेशवाईपासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रितीने हिंदुतवाद्यांचं केंद्र राहिलं आहे. इतिहास पाहिला तर नथुराम गोडसेची ‘वैचारिक’ वाढ पुण्यातच झाली आहे. दलितांवर कठोर बंधनं लादणारं हे पुणेच होतं. त्याची री नंतर अन्य भागांनी ओढली. खरं तर महापुरुषांची बदनामी झाल्यानंतर शोकसंतप्त तणाव सर्वत्रच होता. पण पुण्यात ज्या पद्धतीने या तणावाची अभिव्यक्ती झाली ती पाहता यातून नेमका कोणता संदेश सर्वत्र देण्याचा उद्देश होता यावरही विचार करणं गरजेचं आहे.
तसं पाहता पुणे हे हिंदुत्ववाद्यांचं माहेरघर आहे. दंगली, शारीरिक हिंसा यापासून पुणे सहसा अलिप्त राहिलं असलं तरी हिंदुत्ववादी मंडळींना तत्त्वज्ञान पुरवणार्या विद्वान आणि कार्यकर्त्यांची इथे नेहमीच रेलचेल राहिलेली आहे. वैदिक धर्माची फेरमांडणी बनारस येथील चौखंबा प्रकाशनाकडून सातत्याने मांडली जाते. त्याखालोखाल पुण्याचा नंबर लागतो हे एक कटू वास्तव आहे. भाजपा सरकार येण्याआधी आणि नंतर तर अधिकच ज्या पद्धतीने पुणेरी हिंदुत्ववाद्यांत चेव चढलेला प्रत्यक्ष पहायला मिळतो आहे ते पाहता सर्व छुपे आणि उघड अजेंडे राबवण्यासाठी ही मंडळी मोदींपेक्षा अथवा त्यांच्या इच्छेविरुद्धही अधिक सज्ज झाली आहेत कीकाय असं वाटावं असं चित्र आहे.
हिंदू राष्ट्र सेनेचं हे अमानुष कृत्य या नजरेतून पहावं लागेल. महाराष्ट्रात सध्या तरी अस्तित्वहीन असं आघाडीचं सरकार आहे. त्यांना स्वतःच्याच अस्तित्वाचा प्रश्न भेडसावत असल्याने त्यांना भविष्यातील या संभाव्य संकटाचा प्रतिकार कसा करावा यावर विचार करण्यासाठी कितपत वेळ आहे वा इच्छा आहे हा प्रश्नच आहे.
मात्र या घटनेने समाजमानस ढवळलं आहे हे निश्चित. असहिष्णुतेचे, द्वेषाचे आगडोंब पेटवण्याचे प्रयत्न होत असताना सहिष्णू प्रवृत्तीही जाग्या होत आहेत हे जरी स्वागतार्ह चित्र असलं, मोहसिन शेखच्या दुर्दैवी हत्येबद्दल खेदाचे स्वर उमटत असले तरी पुढचं चित्र आशादायक आहे असं म्हणता येत नाही. काही मुस्लीम बांधवांशी चर्चा करताना या अंतरातील खदखदीची जाणीव जशी होते तशीच हिंदुत्ववाद्यांचा उन्मादी आनंद पाहता भविष्यातील गुजरातही दिसू लागतं.
वैदिकवादी हे वेगवेगळ्या प्रयोगशाळा राबवण्यात वस्ताद आहेत. हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून पुणे ही एक छोटी का होईना प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न झाला. पुणे पोलिसांचे संभाव्य संकट टाळण्यासाठीचे प्रयत्न नक्कीच अभिनंदनीय असेच आहेत. पण पोलीस यंत्रणा अनेकदा सरकारांनी आपलं हत्यार म्हणून वापरल्याची उदाहरणं कमी नाहीत. नजिकच्या निवडणुकीत सत्तापालट होण्याचा धोका सध्याच्या निष्क्रिय सरकारने ओढवून ठेवला आहे. भविष्यात पोलीस यंत्रणा अशा घटनांत निःपक्षपाती राहिल काय असा प्रश्न भयभीत जनतेच्या मनात उभा ठाकला तर त्यात नवल वाटायचं काहीएक कारण नाही.
अशा परिस्थितीत जनतेचीच जबाबदारी मोठी आहे. मुळात द्वेष पसरवणारं वृत्त आलं की ते विशिष्ट समाजानेच केलं असेल या मूर्खपणाच्या भावनिकतेतून बाहेर पडत पोलीस यंत्रणा खरे आरोपी पकडेल आणि त्यांच्यावर कारवाई करेल याची वाट पाहिली पाहिजे. हे प्रकरण घडून आठवडा उलटला असला तरी अद्याप पोलिसांना महापुरुषांची बदनामी करण्यामागे नेमकं कोण होतं हे शोधता आलेलं नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं रहस्यही अद्याप गुलदस्त्यातच आहे. तपासी यंत्रणांचं हे अपयश म्हणावं की त्यांना सत्यशोधनात रसच नाही? मग सामान्य नागरिक या स्थितीत काय करू शकतात?
आपण सद्भावनेचा त्याग न करता सौहार्द जपण्याचाच अधिकाधिक प्रयत्न करत राहिलं पाहिजे, एवढंच म्हणता येईल. आम्ही नवं सरकार विकासाच्या मुद्यावर निवडून दिलं आहे, तथाकथित हिंदुत्वाच्या नाही हे सर्वांनाच उच्च स्वरात सांगावं लागेल. या घटनांचं राजकारण करण्याचा अद्याप तरी कोणी प्रयत्न केला नसला तरी पुण्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी आधी जी प्रतिक्रिया दिली होती ती गुजरातचीच आठवण करून देणारी होती. कोणीही असो, हे लक्षात घेतलं पाहिजे की निरपराधांचे बळी घेण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं नाही!
- संजय सोनवणी

17 comments:

  1. पक्का दहशतवादी ! धनंजय देसाई याची दाभोलकर हत्या प्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे.

    प्रकाश राउत.

    ReplyDelete
    Replies
    1. choukashi tu tujya docter javal kar ki tu mard aahesh kay namard..

      kay gandu tu kunala boltosh mahit aahe ka ?

      Delete
  2. या राऊतच डोक तपासून पाहिले पाहिजे !
    दाभोळकर सरांचा मृत्यू हा कात असून त्यामागे ज्यांचे हित संबंध दुखावले ते असणार ! ते कोण ?
    तर अनेक अंधश्रद्धा पसरवणारे वैदू आणि जादूटोणा करणारे ,हातचलाखी करणारे कुडमुडे हे त्यांच्या वाइतावर असणार हे इतके उघड आहे की आज पर्यंत खुनी पकडला जाणे अपेक्षित होते
    पण या राउतासारखे , आपली अक्कल विनाकारण पाजळवत असतात ,
    आम्ही धनंजय देसाइचे समर्थन करत नाही ,पण परिस्थितीचे भान ठेवत अभ्यास पूर्ण अर्थ लावणे सोडून भडक टीका करण्यात काय अर्थ आहे ?

    ReplyDelete
    Replies
    1. First of all check your brain, you are written false sentences. Do not blame on wrong peoples, Hindu Rashtra Sena may be responsible for the murder case. Pratibha Parkar, Are you sister of Dhananjay Desai?

      Prakash Raut

      Delete
    2. First of all check your brain, you are written false sentences. Do not blame on wrong peoples, Hindu Rashtra Sena may be responsible for the murder case. Not Pratibha but Mohini Parkar, Are you sister of Dhananjay Desai?

      Prakash Raut

      Delete
  3. धनंजय देसाई असो किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना असो प्रत्येकाचा अजेंडा असतो "हिंदूराष्ट्र" पण यांची ही संकल्पना निव्वळ मुस्लिमद्वेषावर आधारीत आहे. ब्रिगेड किंवा बामसेफ़ पण एवढा ब्राह्मणद्वेष करत नसतील एवढा मुस्लिमद्वेष या हिंदूत्ववादी संघटना करतात.सामान्य हिंदूंची यांना अजिबात काळजी नाही हिंदूंनो एक व्हा ! कशासाठी ? तर मुस्लिम (हिरवी पिलावळ) संपवण्यासाठी बस्स..हे हिंदूराष्ट्र

    ReplyDelete
    Replies
    1. मग काय मुस्लिम लोकांना तू काय घरी बसून ठेवणार. हिंदू राष्ट्र सेना या सारख्या सेना आहेत. म्हणून तर हे मुस्लिम लिक गप्प आहेत.
      मध्ये एका मुलीला अपहरण करून तिला धर्म परिवर्तन करून तिच्यावर जबरजस्ती केली तीच जर तुजी बहिण असती तर तू काय त्यांना दाजी दाजी मानून घरी पाऊन चार करणार.

      करोखर तू एक नामर्द हिंदू आहेस. जा आणि हातात बांगडी घाल आणि जोगवा मागत फिर.

      Delete
    2. tu to shivaji maharaj yan cha photo profile varun kad kar tu ek khara shiv shinik nahi aahesh. karan tu dhananjay desai yana kami samju nakosh.
      hindu sathi turugat jarnare lokanchi kimat tujya sarkhya bhadvya la kay kalanar. jevya UP madye eka mulila apharan karun tila madarsha madhe jabardsti kar ti muslim dharm shvikarala bhag padnyat aale.aai tiche eka muslim bhadya sobat marriage karnyat aale. tich jer tuji bhahin aasati ter tu kay tya bhadyala daji daji manun kay gari ghenar hotas kay.


      Delete
  4. mr raut
    your thoughts are very clear and one must appreciate the sincerity
    you can work in tht direction and advice the people
    you can one day advice the modi govt .
    great work!
    what is the secrate of your great brain ?
    and afterall what is your age , because mohoni parkar is not a sister od dhananjay desai
    are you ok mr dhananjay raut ?
    samir ghatage

    ReplyDelete
  5. आप्पा -अहो बाप्पा , ऐका तरी या राउताचि बडबड !
    बाप्पा - काय झाल ?
    आप्पा - म्हणतोय की मोहिनी ही धनंजय देसाईची बहिण आहे !
    बाप्पा - अगदीच वेडा दिसतो आहे !पण त्याचा प्रोब्लेम तरी काय आहे ?
    आप्पा - अरे काय सांगू , आपल्या संजय ला उद्योग नाही , त्याने लिहिले की हिंदू राष्ट्र सेना हि काय आहे ते !अगदी खरे आहे की या देसाई सारख्याना भर चौकात टांगून मारले पाहिजे !कारण आपले कार्य गप्प पाने करावे ते सोडून जगभर याना आपली टिमकी वाजवायची दळभद्री सवय आहे !
    खरेतर ही ठाण्याची अवलाद अशीच असते हे काहीही करू शकत नाहीत नुसते भुंकतात ,
    म्हणून आपणपण कशाला आपली जीभ विटाळायाची ?
    बाप्पा - संजयला असली भांडणे उकरून काढायची विकृत आवड आहे !हे अनेकदा सिद्ध झालेले आहे
    संजयाने निर्भीडपणे काश्मीर आणि भारताच्या पूर्ण एकत्रिकरनचा कार्यक्रम राबवला तरी सारा महाराष्ट्र त्याला डोक्यावर घेईल ! पण त्याचे वांझोटे विचार त्याला इतरत्र खेचत नेतात आणि मग त्याची वेद वैदिक ,शिव वैष्णव , असली कुतारोध सुरु होते ,एकीकडे तो स्वतःला निरीश्वरवादी म्हणवतो आणि पंचातपणे उगीचच असले वाद मांडतो !
    आप्पा -इतका कोडगा माणूस मी पाहिला नाही !कसली आल्ये समतेची लढाई ?उगीच थोतांड बोलत असतो , त्याची पाळलेली कुत्री दाभोलकर हा विषय घेत भुंकायला लागतात ,जणू ब्राह्मण लोकांनीच दाभोलकर याना मारले असे तर या राउतला सुचवायचे नाही ना ?किती हिणकस आहे हा राउत !
    बाप्पा - आणि कसे क्षुद्रपणे विचारतो की मोहिनी धनंजयची बहिण आहे का शी शी शी
    आप्पा - देसाई आणि पारकर बहिण भाऊ कसे असतील ?

    ReplyDelete
    Replies
    1. संजय सोनवणी, आप्पा बाप्पा (स्वतःचे खरे नाव लपवून लिहिणारा) सारख्या हरामखोर, लापाट, फालतू माणसाची अभद्र भाषा तुम्ही कशीकाय सहन करता? याचेच नवल वाटते!

      अलोक वीर

      Delete
    2. Appa Bappa give your real name and address immediately.

      Delete
  6. संजय सोनवणी यांचा दणदणीत पराभव !
    आता तरी त्यांनी मेटे साहेबांपुढे शरणागती घ्यावी !
    काका पुतणे सर्वाना भारी ठरले !
    आणि सोनवणी नुसतेच टीव्हीवर भाषणे देत चर्चा करत राहिले !
    आता सर्व मुसलमान आणि मराठा मते काका पुतणे पळवणार !
    संजय राव तुम्ही नुसते होळकरांची दिंडी घेऊन फिरत बसा !
    तुम्ही आता फक्त कोर्टाची वात बघत बसून कड्या घालायचे काम करा , सुप्रीम कोर्ट काय करणार आता ?बसा फक्या मारत आता हसन हुसेन आणि शिवाजी संभाजी एक होऊन या बामनाञ्चा काटा काढणार आणि त्यांचा कायमचा बंदोबस्त करणार !
    संजय , बघा , सुंता करून घेताय का ? नोकरी पक्की !
    घाबरू नका , कोणीही काहीही म्हणणार नाही !-

    ReplyDelete
    Replies
    1. @Anonymous June 26, 2014 at 7:36 AM,
      भूसनळ्या,
      मराठा आरक्षण काय किंवा मुस्लिम आरक्षण काय, कायद्याच्या चौकटीत कदापि बसणारे नाही. सर्वोच्च न्यायालयात सरकारची चांगलीच जिरणार आहे. हे वेळ आल्यानंतर समजेलच. मतांसाठी आरक्षणाचे राजकारण, बाकी काहीही नाही!

      अविनाश

      Delete
  7. ha dhanya desai ek number cha halkat ani dwesh mulak rajkaran karnara manus ahe. apan tyacha full dhikkar karto

    ReplyDelete
  8. आप्पा बाप्पा या बोगस नावाने लिहिणाऱ्या माणसाचा जाहीर धिक्कार !!!!!!!!!!!
    संजय सर हा फडतूस माणूस तुमच्या विषयी काहीही लिहितो आणि तुम्ही त्याला प्रसिद्धी देता, हे काही बरोबर नाही.
    समीर घाटगे नावाने लिहिणारा माणूस सुद्धा अतिशय हीन पातळीवर जावून लिहित असतो. कृपया ह्या दोघांच्या लिखाणास प्रसिद्धी देणे ताबडतोब बंद करावे हि नम्रतेची विनंती!

    अर्जुन बडे

    ReplyDelete
  9. आप्पा बाप्पा या बोगस नावाने लिहिणाऱ्या माणसाचा जाहीर धिक्कार !!!!!!!!!!!--------------------------> complete truth........

    Anand

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...