Friday, July 11, 2014

सावित्रीमाईचा मनमोकळेपणे उद्घोष करा...

पुणे विद्यापीठाला अखेर सावित्रीमाईंचे नांव दिले गेले. गेले काही दिवस मी सर्व थरांतील प्रतिक्रिया पाहत आलो. (खाजगीतीलही). हे नामांतर अथवा नामविस्तार अत्यंत अहिंसक मार्गाने झाले याबद्दल एका हिंसक आंदोलनानंतर नामांतर झालेल्या काही समाजघटकांना रोष वाटलेला दिसला तर पुण्यातील शैक्षणिक क्रांती घडवणारे अन्य महापुरुष शासनाला/समाजाला कसे दिसले नाहीत असा प्रश्न काही समाजघटकांना पडलेला दिसला. त्याच वेळीस इतर समाजघटकांनाही इतर विद्यापीठांना आपापल्या समाजातील महनियांचे नांव आता लवकर दिले गेले पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले तर आता या देशात आमचे स्थान पुसण्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही काहीजनांना वाटले.

सावित्रीमाईंचे नांव पुणे विद्यापीठाला दिले जाणे यात जो खरा सांस्कृतिक अन्वयार्थ होता व आहे याचे भान मात्र अवैदिक बहुजन समाजाला आले आहे याचे पुसटसेही चिन्ह मला दिसले नाही.

महात्मा फुले हे वैदिक संस्कृती/धर्म या विरोधात बळीराजाची (म्हणजे पुरातन असूर शिव-संस्कृतीची) कड घेणारे पहिले महात्मा होत. सावित्रीमाईंचा कवितासंग्रह मुखपृष्ठावर शिव ते पहिले नमन शिव येथून सुरु होते. उभयतांनी बहुजनांत वैचारिक क्रांतीची मुहुर्तमेढ रोवली. वैदिकांचे अत्याचार अन्याय बहुजन सहन करत आहेत असे असुनही वैदिकांबाबात द्वेषभावना न ठेवता योग्य तेथे सख्यच ठेवले, आदर व सहकार्यही केले. ख-या अर्थाची बळीराजाची उदार हृदयी संस्कृती पुन्हा जीवित केली.

या देशातील सर्वच महिलांना ज्ञानाचे, जागृतीचे आणि आत्मनिष्ठेचे बळ सावित्रीमाईंनी पुरवले. त्यासाठी अगणित अवमान आणी शेवटी एका निष्पाप प्लेगग्रस्त मुलाला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला...आणि प्राणही त्यागले.

पण समजा हेही महत्वाचे नाही. संस्कृती कोणाची आणि कशी याचे दर्शन कितीही छपवले गेले तरी छपत नाही. इतर कोणी महान नव्हते असे नाही. पण स्वत: महात्मा फुले म्हणत कि सावित्री त्यांच्याही उद्वेलित स्थितीत आदर्श गुरुचे कार्य करायची. त्यांना महाधीर व्हायची.

या देशात कोणाची संस्कृती अजेय आहे? ती आहे बळीराजाची संस्कृती. आधुनिक काळात एखाद्या महान तत्ववेत्याप्रमाने म. फुलेंनी त्या संस्कृतीचा उद्घोष केला. स्त्रीयांना समता देणारी बळीराजाची संस्कृती कशी असते हे सावित्रीमाईंच्या रुपात दाखवले. आता पुणे विद्यापीठाला सावित्रीमाईंचे नांव दिले गेले तेथेच कोणाची संस्कृती खरी मानवीय, सहृदय आणि ज्ञानवादी आहे हे सिद्ध झाले. मध्यंतरीच्या काळात पुसट झाली असली तरी ही बळीराजाच्या संस्कृतीच्या स्थापनेची उद्घोषना आहे...आणि म्हणुन त्याचे सांस्कृतिक माहात्म्य अपार आहे.

जे कोणी बळीराजाची पूजा बांधतात....त्या सा-यांनी म. फुले आणि सावित्रीमाईंना वारंवार वंदना करायला हवी कारण त्या संस्कृतीचा आधुनिक उद्गार ते दांपत्य आहे. ते माळी होते, मग इतरांचे काय काम असा जे विचार करत असतील ते बळीराजाच्या संस्कृतीचे कसे वारसदार असू शकतात?

ते महात्मा फुलेंच्या एकमय समाजाच्या भावनेचे कसे पाईक असू शकतात?

ते माळी असणे ही त्यांच्या अस्तित्वाची खुण नव्हे तर ते कोणत्या संस्कृतीचे पाईक होते हेच खरे त्यांच्या अस्तित्वाचे महनीय उर्जाकेंद्र आहे.

पुरुषसुक्ताचा उद्घोष एकीकडे काही लोक करत असतांनाच बळीराजाच्या संस्कृतीची उद्घोषना करणा-या, शिवमय विश्वाची स्वप्ने पाहणा-या सावित्रीमाईंचे नांव पुणे विद्यापीठाला मिळावे हा बहुजनीय बळीराजाच्या संस्कृतीचा विजय आहे. त्यात जातीय कोतेपणा करू नका.

सावित्रीमाईचा मनमोकळेपणे उद्घोष करा...!

43 comments:

  1. या नाम विस्तारात कुठेही सामाजिक प्रदूषण झाले नाही हे पुण्यातील इलाईट वर्गाच्या शालीनतेचे उत्तम उदाहरण आहे तसेच इतर वर्गानेही अत्यंत खिलाडू वृत्तीने हे प्रकरण मार्गी लावले त्या बद्दल आनंद होतो आहे
    फक्त पुणेच नव्हे तर आता देशातही सर्वत्र सर्व शिक्षण मोफत करायची चळवळ सुरु झाली पाहिजे
    आज पतंग राव कदम यांच्या सारख्या धन दांडग्या लोकाना हे समजात नाही की
    समाज सावित्रीमाईंचे नाव विद्यापीठाला देत आहे म्हणजे याचा अर्थ काय ?
    पतंगराव कदम आणि तत्सम शिक्षणाचा बाजार करणाऱ्या लोकांबद्दल समाजाच्या काय भावना आहेत तेपण आपण समाजासमोर मांडावे , त्यात शरद पवार पण आलेच हेही सांगावे
    आपल्या देशात शिक्षण इतके महाग होत चालले आहे की काही वर्षांनी ते सामान्य होतकरू माणसाच्या हाता बाहेर जाइल त्याच्यावर एकाच उपाय - तो म्हणजे - मोफत शिक्षण आणि सर्व शिक्षक आणि प्रोफेसर यांना एक महामंडळ करून त्यावर सर्व विद्यापीठाची जबाबदारी सोपवावी
    थोरांचे नाव विद्यापीठाला देणे इष्टाच आहे , पण असेही सांगावेसे वाटते की हे सर्व वरवरचे उपाय झाले , पण सर्व मागास आणि मध्यम वर्गाला शिक्षणाचा लाभ होण्यासाठी कदम नवले पवार आणि डी वाय पाटील असा जो बाजारू निर्लज्ज धंदेवाईक पणा आला आहे त्यासाठी आपण एक जन जागृती केली पाहिजे
    समीर घाटगे

    ReplyDelete
  2. maharashtar sarkarne obc lokanchi mate aplyakde odnyasathi ha game kela he samjnyaitke loka murkha nahit, aaj pune vidyapith tyacha disal ani halgarji karbharasathi famous zale aahet, vidyapithat sushan ani shista aananyastahi kunich andolan karat nahit, narke, ramteke sarkhya lokani aap aaplya jatiche pudhari vatun ghetle aahet. tumhi shikli savreleli manse ajun pan jaitla ghatta chiktun bastat hyache dukhha hote.

    ReplyDelete
  3. आप्पा - संजय , अभिनंदन , आम्ही वाटच बघत होतो - तुझे विचार कधी लिहितोस ते !
    बाप्पा - आता एकाच काळजी घ्यायला पाहिजे ,आप्पा बळवंत चौक चे जसे एबीसी चौक झाले आहे तसे नाम विस्तार झाल्यानंतर एसपी पुणे विद्यापीठ असे संक्षिप्त रूप होण्याचे टाळावे - कारण जनमानसात अशी सहज प्रवृत्ती असते बनारस विद्यापीठाचेच बघा ना
    आप्पा - असेच नामविस्तार अजून करता येतील त्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे
    बाप्पा -पुण्यातील एफ सी रोड किंवा जे एम रोड यांना अहिल्याबाई होळकर आणि यशवंतराव होळकर मार्ग करायला काय हरकत आहे ?डेक्कन बस स्टोप ला मल्हार राव होळकर टर्मिनस असे म्हणता येईल पुण्याच्या रेस कोर्स ला राजर्षी शाहू यांचे नाव देता येईल
    आप्पा - आता काका पुतण्याला इतर बाबतीत लक्ष घालायला वेळ नाही !
    बाप्पा - खरेतर विद्यापीठातील लोकांनी नाम विस्ताराला फारच वेळ लावला - थोडेसे मारून मुटकून हे झाले असेच काहीना वाटते तशी चर्चा आपण म्हणता त्याप्रमाणे ऐकूही येते , परंतु आपण या विषयाचा अनेक वेळा पाठ पुरावा केला आणि गोष्ट मार्गी लागली
    आप्पा - नदी काठाचा होणारा रस्ता हा आजपासूनच अशाच महान व्यक्तीच्या स्मरणाचे कारण ठरेल असा असावा यासाठी प्रयत्न व्हावेत
    बाप्पा - नदीकाठाला अनेक प्रातः स्मरणीय लोकांचे पुतळे उभारावेत
    आप्पा - शक्य झाल्यास बाल गंधर्व समोरचा झाशीच्या राणीचा पुतळा नदी पात्रातील रस्त्यालगत हलवून त्याची सुरवात करता येईल राजाराम पुलानंतर नरवीर शेलारमामा आणि रायबा असे पुतळे बसवून त्या रस्त्याचे नाव पावन करावे
    आप्पा - संजय सर , आपले पुन्हा एकदा अभिनंदन !

    ReplyDelete
    Replies
    1. narke, ramteke ani sonavani mhanve aata punyache pan nav badla, gautambudh nagar or ambedkar nagar kara.

      Delete
    2. हा बोगस आप्पा बापा पुन्हा थिडपडलाच!

      Delete
    3. पुणे विद्यापीठ चौकाचे संजय सोनवणी चौक असे नामांतर करावे
      आणि मुख्य इमारतीला आप्पा बाप्पा स्मृती मंदीर असे नाव द्यावे म्हणजे दोघांचेही आत्मे शांत होतील आणि आप्पा बाप्पा असले तर्कट वांझोटे लिखाण करणार नाहीत

      Delete
  4. प पू सावित्रीबाई यांचे नाव देण्याने काय साधणार आहे ?
    पुणे विद्यापीठाचा कारभार स्वच्छ होणार आहे का ?अशी नावे दिल्याने आणि बदलल्याने हाती काय लागते ? ही खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आजकाल कोणीही ब्राह्मण माणूस कुणाही ब्राह्मणाचे नाव अमुक रस्त्याला द्या किंवा वास्तूला द्या असे म्हणत नाही , कारण मूळ प्रश्न बाजूला राहून हा एक नावे बदलणे हा फार्स बनला आहे
    विद्यापीठावर ज्या वेळेपासून बीसी ओबीसी असे लोक खुर्चीत बसु लागले त्या वेळेपासून कारभार बिघडला आणि उघड उघड जातीचे राजकारण सुरु झाले पूर्वीचे एकेक अतिरथी महारथी नावे आठवली आणि आज काळाची दळभद्री नावे वाचली की चिंता वाटते
    राष्ट्रीय शिक्षण मिळावे म्हणून लो टिळक आणि आगरकर यांनी किती कष्ट घेतले ,म फुलेयांनी किती यातना भोगल्या आणि आजकालचे शिक्षण सम्राट पाहिले की या लोकाना त्या खुर्चीत बसायचा तरी अधिकार तरी आहे का असा प्रश्न पडतो - संजय सोनावणी आणि इतर सावध पंडिताना चांगला मंच मिळत असूनही ते पुरेश्या स्वरूपात या नादान चांडाळ चौकडीचा विरोध करत नाहीत हेच दुःख आहे
    डी वाय पाटील नवले पतंगराव कदम आणि शरद पवार हे निगर गट्ट लोक नेते म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत प्रचंड आर्थिक उलाढाल असलेले शिक्षण हे एक प्रचंड दुकान बनले आहे त्याची नोंद घेऊन आपण त्यांचे बुरखे फाडून त्याना जाणते समोर खेचले पाहिजे
    हे काम फक्त संजय सारच करू शकतील
    त्यांना आमचा पूर्ण पाठींबा आहे !
    पद्मजा

    ReplyDelete
    Replies
    1. i agree with padmaja, peoples like hari narke, m d ramteke, sonavni are not still living in society with their cast name sticked on their fore head, these educated peopels are not ready to ferget their cast that is the main problem.

      Delete
  5. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला अखेर दिले गेले!
    अभिनंदन !!!!!
    अभिनंदन !!!!!
    अभिनंदन !!!!!

    कुजकट प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध!!!!!

    ReplyDelete
  6. सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला....

    बहुजनांचा खूप खूप मोठा विजय.

    ReplyDelete
  7. बामणांच्या नाकावर टिच्चून नामांतर, अतिशय गोड बातमी.

    ReplyDelete
  8. खूप उशिरा सरकारने घेतलेला अगदी योग्य निर्णय!

    ReplyDelete
  9. "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ"
    भारतातील पहिल्या साक्षर महिला आणि पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा योग्य सन्मान.

    आरती झगडे.

    ReplyDelete
  10. पुणे विद्यापीठ नामविस्तार!
    पुणे विद्यापिठाचे नामविस्तार विधानसभेत पास झाल्यावर काही लोकाना पोटशूळ उठले असून विद्यापिठाना कोणत्याही व्यक्तीचे नाव देऊ नये असा युक्तीवाद करणारे सर्वत्र हिंडताना दिसत आहेत. विद्यापिठाना फक्त स्थलनाम लागू असावा असा यांचा आग्रह आहे पण आजवर नावावरुन अस्तित्वात असलेल्या अनेक विद्यापिठांविरुद्ध या लोकानी कधी ब्र शब्द उच्चरलेला दिसत नाही. अगदी भारतातच नाही तर जगभरात असे दिसून येते की विद्यापिठाना फक्त स्थलनामच नाही तर व्यक्तीचे नाव देण्याची पद्धत आहे. जगातील नंबर दोनचे विद्यापिठ म्हणून ज्याची ख्याती आहे ते अमेरीकेतील प्रसिद्ध विद्यापिठ हारवर्ड युनिव्हर्सिटी हे व्यक्तीनामाचे सर्वज्ञात उदाहरण आहे. अमेरीकेतील प्रसिद्ध उद्योगपती जॉन हारवर्ड यांचे नाव या विद्यापिठाला दिले असून सन १६३६ पासून हे विद्यापिठ अस्तित्वात आहे. शैक्षणीक वर्ष २०१३-१४ मध्ये जगात ११ क्रमांकावर असलेली अमेरीकेतीलच येले युनिव्हर्सिटी सुद्धा एलिहू येले याच्या नावे आहे. जगात ३५ व्या क्रमांकावर असलेली McGill University,Canada सुद्धा व्यक्तीच्या नावे आहे. जगात ३६ व्या क्रमांकावर असलेली Karolinska Institute, Sweden सुद्धा त्यांचा राजा Karl तेरावा याच्या नावे आहे. जगात ६५ व्या क्रमांकावर असणारे Rice University, ही सुद्धा अमेरीकेतील व्यक्तीनाम असलेली युनिव्हर्सिटी आहे. ही तर फक्त टॉप-१०० यादीतली नावं आहेत. जे वरील यादीत मोडत नाहीत अशा सगळ्या विद्यापिठांचा अभ्यास केल्यास शेकडो विद्यापीठं सापडतील जी व्यक्तींच्या नावे आहेत.
    खरंतर सावित्रीमाईच्या नावाला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. भारतातील स्त्रीशिक्षणाचा पाया घालणा-या सावित्रीमाईचे नाव पुणे विद्यापिठाले देणे म्हणजे एका अर्थाने विद्यापिठाचा सन्मान करणे होय. युजीसीच्या साईटवर रामानंद तीर्थ, स्वामी विवेकानंद, कोणतातरी आचार्य, कोणीतरी गुरु, कवी कालीदास, चाणक्य, विनोबा भावे पासून अटलबिहारी वाजपेयी व तिकडे दक्षीणेत तर नटांच्या नावा पर्यंत मजल गेलेली दिसते. या सगळ्यांच्या नावाने विद्यापीठ असू शकते. अमेरीकेत उद्योगपतीच्या नावे असू शकते. तर पुण्यात ज्यानी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला त्या सावित्रीमाईचं नाव पुणे विद्यापिठाला देताना सगळ्याना अभिमान वाटायला हवं होतं, ऊर भरून यायला हवं होतं. माईचं कार्य पाहता त्यांचं नाव देण्यात कोणालाच, कोणतीच अडचण व्हायला नको होती. तरी काहीना मात्र त्रास होतोय... अन युक्तीवाद काय तर म्हणे व्यक्तीनाम नको...! बरं मग खाली मी ६४ विद्यापिठांची यादी दिली आहे जे स्टेट युनिव्हर्सिटीज असून व्यक्तीच्या नावे आहेत. त्यावर तुम्ही कधी बोललात का? नाही बोललात तर का नाही बोललात? अन एवढे सगळे व्यक्तीनाम असलेले विद्यापीठ देशभर अस्तित्वात असताना नेमक्या सावित्रीमाईच्या वेळीच तुमच्या पोटात का दुखू लागले आहे? असा थेट सवाला आहे.
    साधू संत, गुरु-बाबा, भोंदू महाराज व शेंडीधा-यांच्या नावे असलेली विद्यापीठं तुम्हाला भुषणावह वाटतात, पण उदात्त हेतूने समाजात शैक्षणीक क्रांतीचा पाया घालणा-या बहुजन व्यक्तीचे नाव मात्र वर्ज्य...! का? तर, या व्यक्तीच्या कामाचा अंतीम परिणाम जातीयवाद्यांच्या प्रतिगामी तत्वावर हतोडा चालवित आहे. अनेक पिढ्या पासून बांधलेले सनातनी किल्ले सावित्रीच्या कार्यातून उध्वस्थ होत आहेत. संवर्णांच्या हातून सगळी सत्ता खेचून घेण्याचे व बहुजनांच्या हाती देण्याचे कार्य पार पडत आहे. ही आहेत विरोधाची खरे कारणे. म्हणून काहींच्या पोटात दुखू लागले आहे. या दुखण्यावर एकच उपाय... जरा जुनी मळमळ ओकून टाका व नव्या विचाराचा स्विकार करा. आहात तसेच रहाल तर त्रास आम्हाला नाही, तुम्हालाच होणार आहे. बघा पटतं का!

    ReplyDelete
    Replies
    1. if u wnat to compare puen university with others compare it for education quality and reputation, not for person's name.

      Delete
    2. hi sarva vidyapthe vyakatichya navani sthapan zaleli aahte, tyanche namkaran zaleele nahi. hi gosht murkhana lakshat yet nahi.

      Delete
    3. Aho, junya chuka durust karane mhanajech namvistar karane hoy. He suddha hya murkh manasachya lakshat yet nahi.

      Delete
  11. भारतात अनेक विद्यापिठाना महान व्यक्तींची नावे दिली आहेत. युजीसी (युनिव्हर्सीटी ग्रांट कमिशन) च्या यादीत खालील विद्यापिठे दिसतात.

    सेंट्रल युनिव्हर्सिटीज
    १ 1 मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सीटी, हैद्राबाद.
    2 हरिसिंग गौर विश्वविद्यालय, सागर (मध्य प्रदेश)
    3 इंदिरा गांधी नॅशनल ट्राईबल युनिव्हर्सीटी, (मध्य प्रदेश)

    स्टेट युनिव्हर्सिटीज
    1 Acharaya N.G.Ranga Agricultural University, Hyderabad
    2 Acharaya Nagarjuna University, Guntur
    3 Adikavi Nannaya University, Rajamundry, AP
    4 Damodaram Sanjivayya National Law University, Visakhapattanam.
    5 Dr. N.T.R. University of Health Sciences, Vijaywada.
    6 Dr. Y.S.R. Horticultural Univerity, AP
    7 Jawaharlal Nehru Architecture and Fine Arts University, AP.
    8 Jawaharlal Nehru Technological University, Kukatpalli.
    9 Osmania University, Hyderabad
    10 Kavi Kulguru Kalidas Sanskrit Vishwavidyalaya, Ramtek.
    11 Shivaji University, Kolhapur.
    12 Smt. Nathibai Damodar Thackersey Women's University, Mumbai.
    13 Arybhatta Knowledge University, Patana.
    14 Bhupender Narayan Mandal University, Bihar.
    15 Chanakya National Law University, Patana.
    16 Jai Prakash vishwavidyalaya(university), Patana.
    17 Kameshwar Singh.Darbhanga Sanskrit Vishwavidyalaya, Bihar.
    18 Lalit Narayan Mithila University, Bihar.
    19 Maulana Mazharul Haque Arabic & Persian University, Bihar.
    20 Rajendra Agricultural University, Bihar.
    21 Veer Kunwar Singh University, Bihar.
    22 Dharmsinh Desai University, Gujrat
    23 Hemchandracharya North Gujarat University, Gujrat
    24 Krantiguru Shyamji Krishna Verma Kachchh University, Gujrat.
    25 Krishnakumarsinhji Bhavnagar University, Gujrat.
    26 Chaudhary Sarwan Kumar Himachal Pradesh Krishi Vishvavidyalaya, Himachalpradesh.
    27 Dr. Y.S.Parmar University of Horticulture & Forestry, HP
    28 Vinoba Bhave University, Jharkhand.
    29 Shree Sankaracharaya University of Sanskrit, Kerala.
    30 Thunchath Ezhuthachan Malayalam University, Kerala.
    31 Atal Bihari Vajpayee Hindi Vishwavidyalaya, MP
    32 Awadesh Pratap Singh University, MP
    33 Barkatullaah University, MP
    34 Devi Ahilya Vishwavidyalaya, MP
    35 Mahaishi Panini Sanskrit Vishwavidyalaya, MP
    36 Maharishi Mahesh Yogi Vedic Vishwavidyalaya, MP
    37 Makhanlal Chaturvedi Rahtriya Patrakarita National University of Journalism, MP
    38 Rani Durgavati Vishwavidyalaya, MP
    39 Biju Patnaik University of Technology, Orisa.
    40 Fakir Moham University, Orisa.
    41 Shri Jagannath Sanskrit Vishwavidyalaya, Orisa.
    42 Veer Surendra Sai University of Technology, Orisa.
    43 Bidhan Chandra Krishi Vishwavidyalaya, West Bengal
    44 Kazi Nazrul University, WB
    45 Netaji Shubhash Open University, WB
    46 Rabindra Bharati University, WB
    47 Chandr Shekhar Azad University of Agriculture & Technology, UP
    48 Choudary Charan Singh Univeersity, UP
    49 Deen Dayal Upadhyay Gorakhpur University, UP.
    50 Dr. Ram Manohar Lohia Awadh University, UP.
    51 Dr. Shukantla Mishra Uttar Pradesh Viklang Vishwavidyalaya, UP.
    52 Narendra Deo University of Agriculture & Technology, UP.
    53 Sampurnanand Sanskrit Vishwavidyalaya, UP.
    54 Veer Bahadur Singh Purvanchal University, UP.
    55 Alagappa University, TN
    56 Anna University, TN
    57 Annamalai University, TN
    58 Bharathiar University, TN.
    59 Bharathidasan University, TN.
    60 Mother Teresa Women's University, TN.
    61 Tamilnadu Dr. M.G.R.Medical University, TN.
    62 Rani Channamma University, Karnatka.
    63 Vesveswaraiah Technological University, Karnatka.
    64 Vijayanagara Sri Krishnadevaraya University, Karnatka.

    टीप: वरील सर्व युनिव्हर्सिटीज हे युजीसीच्या साईटवरुन घेतले असून मोजक्याच पाच-सहा स्टेटस मधून काढलेली यादी आहे. तुम्ही स्वत: खालील युजीसीच्या वेबसाईटवर जाऊन बाकी यादी पाहू शकता.

    ReplyDelete
  12. ज्ञानज्योती सावित्रीमाईंना विनम्र अभिवादन !

    ReplyDelete
  13. I am proud that Pune university is now named after Savitribai. There is no point in opposing such a good move. Also all the people who oppose (in your opinion Shendiwale) this move very well know that women from upper castes have benefitted maximum by education. I doubt how many lower caste women benefitted from education. But one point of difference in data which you have provided, is that many of these universities were established with these personal names. And their names were not changed afterwords. You notice the difference?

    Amit

    ReplyDelete
  14. संजय सोनवणी,
    तुमच्या ब्लोगवर लिहिले आहे की आपण कुणीच जात विसरू शकत नाही हे खरे वाटू लागते
    आपल्या देशाला लागलेला हा रोगच आहे रामटेके नरके आणि स्वतः खुद्द तुम्ही सुद्धा हे टाळू शकत नाही आणि ब्राह्मण द्वेषाचे म्हणाल तर अनिता पाटील ,संभाजी ब्रिगेड आणि तुम्हाला एकत्र आणणारा तो एकमेव दुवा आहे ,
    आपण एक ढोंगी आहात आणि त्याचीच किळस येते
    माझे मत तुम्ही छापणार नाही हे उघड आहे तरी लिहितो आहे
    तुम्ही तुमच्या भोवती इतकी घाण जमवली आहे - त्याची तुलना होऊ शकत नाही - एक लक्षात ठेवा - तुम्ही ब्राह्मण वर्गाचे काहीही वाकडे करू शकत नाही - ते महान आहेत आणि कायम अग्रेसर राहतील
    विशेषतः कोकणस्थ लोक तर महानच आहेत
    एक गोडसे वाईट असेल म्हणून सर्व जातीला बदनाम करणे हे योग्य नाही
    कोकणस्थ लोकांची परंपरा अपाहिली तरी नतमस्तक होतो आपण !
    न्या रानडे यांच्या पासून आज पर्यंत अनेक लोकांनी त्याग आणि अभ्यास यांच्या रूपाने आपली छाप इतिहासावर सोडली आहे
    त्या विरुद्ध आजच्या शिक्षणसम्राटाना भर चौकात जोड्याने मारावे अशी अवस्था आहे
    हा देश सडण्याची प्रक्रिया या ९६ कुळी नेतृत्वाने सुरु केली
    काही ना काही रूपाने आपण वसामि विवेकानंद आणि तत्सम थोर लोकाना सुद्धा तुम्ही बदनाम करता हे दुर्दैव आहे तुमचे !कारण या थोर लोकाना सारे विश्व मानते !

    ReplyDelete
    Replies
    1. विशेषतः कोकणस्थ लोक तर महानच आहेत
      एक गोडसे वाईट असेल म्हणून सर्व जातीला बदनाम करणे हे योग्य नाही
      कोकणस्थ लोकांची परंपरा अपाहिली तरी नतमस्तक होतो आपण !----------------------------------------------------------------->>>>>>> चित्पावन अर्थात कोकणस्त ब्राह्मण यांचा एकदम खरा-खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वाचा "मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किमतीचे पेशवे" हे दिनकरराव जवळकर लिखित पुस्तक !
      गर्वहरण झाल्याशिवाय राहणार नाही!

      Delete
    2. यावरुन मला "देशाचे दुष्मन" हे दिनकरराव जवळकर लिखित १९२५ सालचे पुस्तक आठवते. त्यावेळी नगरपालिकेत फुल्यांच्या पुतळ्याचा वाद निर्माण झाला होता. त्याला उत्तर म्हणुन जवळकरांनी हे पुस्तक लिहिले.त्यातील भाषा अत्यंत विखारी वाटावी अशी आहे.केशवराव जेधे यांनी ते प्रकाशित केले होते. पुस्तकाला केशवराव बागडे यांची प्रस्तावना आहे. त्यात ते म्हणतात,"या पुस्तकातील भाषापद्धती अगर विचारप्रदर्शनपद्धती ब्राह्मणांना आवडणार नाही; परंतु त्यामुळे रुष्ट न होता, सदर गृहस्थांचे पुस्तक वाचून त्यावर एकंदर पुर्व परिस्थिती ध्यानात घेउन विशेषतः रा. चिपळुणकर यांनी केलेली महात्मा फुले यांची निंदा लक्षात घेउन शांतपणे मनन केले पाहिजे. क्रियेस प्रतिक्रिया हा निसर्गदेवीच्या साम्राज्यातील अबाधितपणे व अव्याहतपणे परिणामकारक होणारा नियम आहे. तदनुरोधाने महात्मा ज्योतिराव यांची निंदा करणार्‍यांना प्रत्युत्तर मिळणे साहजिक आहे. या प्रत्युत्तरादाखल केलेल्या प्रयत्नाने चिडुन जाउन प्रत्याघात करण्याचाही मोह कित्येकांना अनावर होण्याचा संभव आहे. परंतु त्यायोगे जनतेचा अगर देशाचा फादा न होता तोटाच होणार ही गोष्ट सर्वांच्या नजरेस आणणे माझे कर्तव्य आहे...."

      Delete
  15. SANJUBABA--- TUMACHE SO CALLED AWAIDIK BAHUJAN HI MENDHRE,
    .
    AHET.
    2) WAIDIKANI PURANKALA PASUN ITAKI SUNDAR BHESAL

    (SHAIWA ANI WAIDIK) KELI AHE ,KI YATIL FARAK MATTHA

    BAHUJANANA KALNAR NAHI.

    3)TUMHI SHAKTI /BAHUBAL WPRA AMHI DOKE WAPRU.

    4)MARATHA ARASHN ZALECH AHE ,PUDHIL PAUL BRAHMAN

    ARASHAN AHE.


    BC/OBS ARASHANALA WIRODH KARU SHAKAT NAHI,PUN

    UCCHA JATINA ARASHAN DEUN,EKUN ARSHANA CHA

    PATTERN NIRATHAK KARATA YETO.

    3)MARATHE RAJ-KARNACHYA SOYISATHI BRAHMAN DWESH

    DAKHAWTAT,PUN MANATUN <OBC< CHA DWESH KARTAT.

    ReplyDelete
  16. kalach baramaticha tagya eka sabhet bolala ki jalgav che uattar maharashtra vidyapitahche bahinabai chaudhari vidyapith ani solapurche ahilyadevi holkar vidyapth ase namkaran karyache aahe. aata narke, ramteke ani sonavani la ajun ek mudda bhetla ahhe.

    ReplyDelete
  17. सरस्वती हि विद्येची काल्पनिक देवता आहे, तर सावित्रीबाई ह्या विद्येची आणि स्त्री शिक्षणाची खरीखुरी जननी आहे.

    अश्विनी मोरे.

    ReplyDelete
  18. "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" किती सुरेख नाव आहे! ह्या विद्यापीठाची कीर्ती अशीच वृद्दिगत होत राहावे हीच इच्छा.

    -रोहन जोग

    ReplyDelete
  19. क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांना मानाचा मुजरा !!!!

    ReplyDelete
  20. भारतातील पहिली भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका,
    स्त्री-शूद्र व अनाथकांची माता आणि स्त्री-मुक्ती
    आंदोलनाच्या प्रणेत्या म्हणून सावित्रीबाई फुले यांचे
    जीवन अमर झाले आहे. महात्मा फुले यांनी आपल्या
    दिव्य ज्योतीने प्रज्वलित केलेली ही एक दिव्य ज्योत
    आहे. जोतीरावांप्रमाणेच सत्य, समता आणि मानवता
    यांसाठी त्यांनी सर्व हयाभर प्रखर विरोधाला व
    छळाला टक्कर देऊन यशस्वी लढा दिला. स्त्री ही एक
    मानव आहे आणि पुरुषाइतकीच कर्तबगारी ती करू
    शकते, हे सावित्रीबाईंनी स्वतःच्या कृतीने सिद्ध करून
    दाखविले. आणि म्हणूनच स्त्री-पुरुष समानता
    प्रतिपादणार्‍या आद्य महिला; आणि स्त्रीची प्रतिष्ठा
    प्रतिपादन करणारी पहिली भारतीय स्त्री सावित्रीबाईच
    ठरते.

    मा. गो. माळी.

    ReplyDelete
  21. सावित्रीबाई फुले :

    (जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१ - मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाईंचा आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

    सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

    १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.

    १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तरी भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.

    सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

    ReplyDelete
  22. cont......

    शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

    जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

    केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

    इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.

    इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

    सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.
    End.

    ReplyDelete
  23. सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य[संपादन]
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका : शैलजा मोलक)
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : ना. ग. पवार)
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (लेखक : नागेश सुरवसे)
    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (विद्याविकास) (लेखक : ज्ञानेश्वर धानोरकर)
    त्या होत्या म्हणून (लेखिका : डॉ. विजया वाड)
    साध्वी सावित्रीबाई फुले (लेखिका : फुलवंता झोडगे)
    सावित्रीबाई फुले (लेखक : अभय सदावर्ते)
    सावित्रीबाई फुले (लेखिका : निशा डंके)
    सावित्रीबाई फुले (लेखक : डी.बी. पाटील )
    सावित्रीबाई फुले -श्रध्दा (लेखक : मोहम्मद शाकीर)
    सावित्रीबाई फुले (लेखिका : प्रतिमा इंगोले )
    सावित्रीबाई फुले (लेखक : जी.ए. उगले)
    सावित्रीबाई फुले (लेखिका : मंगला गोखले)
    सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (लेखक : ना. ग. पवार)
    ’व्हय मी सावित्रीबाई फुले’ हे नाटक (एकपात्री प्रयोगकर्ती अभिनेत्री : सुषमा देशपांडे)
    ज्ञान ज्योती माई सावित्री फुले (लेखिका : विजया इंगोले)
    ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (लेखिका उषा पोळ-खंदारे)
    Savitribai - Journey of a Trailblazer (Publisher : Azim Premji University)
    हाँ, मैं सावित्रीबाई फुले -(हिंदी), प्रकाशक : अझिम प्रेमजी विद्यापीठ

    ReplyDelete
  24. पुणे विद्यापीठ आता झालंय सावित्रीबाई फुले विद्यापीठ!

    स्त्रीशिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.

    गेल्या अनेक दिवसांपासून पुणे विद्यापीठ नामांतराची मागणी होत होती... त्याला आजच्या कॅबिनेटमध्ये मूर्त स्वरुप देण्यात आलं... आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाईंचं तर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं नाव द्यावं, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केलीये.

    यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विद्यापीठाच्या नामांतर प्रस्तावाला विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये मंजुरी दिली होती.

    महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामांमुळं, सावित्रीबाईंचं नाव पुणे विद्यापीठाला द्यावं, अशी मागणी नामांतर कृती समितीची होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी यासाठी लढा उभारला होता. त्यांची ही मागणी आता पूर्ण होताना दिसत आहे.

    ReplyDelete
  25. हिंदुधर्मातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पिढीजात अनिष्ठ रुढी परंपरेविरुद्ध अफाट धर्मांध शक्तीच्या विरोधात ज्योतिबा फुलेंच्या पावलावर पाऊल टाकून, त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जातीभेदाच्या व धर्मरुढीच्या बेडया तोडून, समदु:खी स्त्रियांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांच्यावर लादलेल्या गुलामगिरीतून कायमची मुक्तता करण्यासाठी रणमैदानी उतरल्या. हालअपेष्टा, यातना सहन करुन व अपमानाची पर्वा न करता बहुजन समाजाची विशेषत: सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांची निस्वार्थपणे अविरत सेवा करण्यासाठी मोठया धैर्याने पुरुषासारखा संघर्ष करावा लागला. स्त्री उद्धाराकरीता संपूर्ण आयुष्य चंदानसारखे झिजून बहुजन स्त्रियांची कायमचीच मुक्तता केली. स्त्री व पुरुषांवर क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी अनंत उपकार करुन ठेवले आहेत. त्यांच्या या प्रभावी प्रेरणेने जीवनमान प्रकाशमय झाले असून, स्त्रियांना भक्कम पाठबळ प्राप्त होऊन एकप्रकारची चालना मिळाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या कार्यामुळेच आज स्त्री ही स्त्री स्वातंत्र्याच्या हक्कासाठी पुरुषांना आव्हान करीत मोठया हिम्मतीने बंड करण्यास पुढे येऊ लागली आहे.

    भानू चौगुले

    ReplyDelete
  26. डेव्हिड ससून सारखा माणूस स्व खर्चाने या मातीतल्या लोकांसाठी एक हॉस्पिटल उभारतो - तो जन्माने ज्यू होता पण त्याने पुण्यासाठी किती मोठे काम केले आहे !
    आपले संत नुसते टाळकुटे होते असे म्हणावेसे वाटते !
    काव्य करायची ज्यांना शक्ती होती त्यांनी ती पांडूरंगाच्या अभंगात वाया घालवली
    हे अभंग आणि इतर धार्मिक रचना करून या संतानी फार मोठा गुन्हाच केला आहे - खरेतर जसे वेद जाळून टाकले पाहिजेत तसेच हे संत वाग्मय नष्ट केले पाहिजे कारण सामाजिक ऐहिक प्रगती साठी त्याचा काहीही उपयोग नाही उलट अडचण आहे
    सर्व वारकरी लोक श्रमदान करून छोटे बंदारे का नाही बांधत , त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातली वाढेल आणि शेतकरी वर्गाचेच कल्याण होईल
    अभंग गात हिंडत बसण्याचा वेडेपणा आता थांबला तर बरे होईल

    आपण माझे मनोगत सर्वा समोर मांडणार की नाही याची शंका आहे
    पण मी माझे ,आत स्पष्ट आणि सभ्यपणे मांडले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. संतांचे कार्य हे त्या काळाला अनुरूपच होते, त्या काळाचे ते समाज सुधारकच होते.

      Delete
  27. अरे बाप्पा ! मांडलिक प्रश्न हा चांगलाच चर्चेचा ठरलाय रे बाबा ,
    पण अजून एका मुद्द्याचे का बोलत नाहीस रे ?
    अरे आप्पा -१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात कोल्हापुरच्या राजांनी स्वातंत्र्य सैनिकांवर हल्ला करून त्यांची कत्तल केली हा उल्लेख आपण डोळेझाक करून वेगळा ठेवतोय - त्याचे काय ?

    -बाप्पा -आणि तो स्वतः घाटगे सांगतो आहे की
    राजर्षी शाहूंचे राज्य हे प्रोटेक्टेड स्टेट होते - तिथे ब्राह्मणी विचारांचा प्रश्नच कुठे आला ?
    एखाद्या ९६ कुळी माणसाने भगवद्गीता तोंडपाठ केली तर त्याला तुम्ही ब्राह्मणाची औलाद म्हणणार का ?का त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करणार ?

    आप्पा -१८५७ च्या समरात कोल्हापूर हे मांडलिक राजा प्रमाणेच वागले आणि आपल्या देशाच्या सैनिकाना त्यांनी ठार मारले - - हि कोणती देशभक्ती -
    माझी आपणास एक विनंती -
    बाप्पा -आपण इतरांच्या आया बहिणींबद्दल बोलण्यापेक्षा कोल्हापूर ग्याझेटीयर का वाचत नाही -मी सांगतो -रा रा घाटगे साहेबांनी सांगितलेले सर्व त्यात
    "सरकारी मजकूर "म्हणून आहे ! -
    बाप्पा -आप्पा आणि एक लक्षात घ्या - आम्ही काही राजर्षी शाहूंचे वैरी नाही -
    आम्हाला प्रचंड आदर आहे त्यांच्या बद्दल - पण आपण ज्या अर्थी दुसऱ्या लोकांच्या आजी आजोबा पर्यंत पोचत आहात त्या अर्थी आपले भान सुटले आहे - आपल्याला सगळीकडे ब्राह्मण द्वेषामुळे कावीळ झाल्या सारखे ९६ कुळी पण ब्राह्मण वाटू लागले आहेत -
    आप्पा -एखाद्याविषयी आदर असावा - पण आपण इतिहासाचा अर्थ समजावून घेणे पण आवश्यक आहे !
    बाप्पा -संरक्षित राज्य असे मराठीत भाषांतर आहे ना ?- त्याचा अर्थ असा की काही ठराविक अटींवर या राजाचे आणि राज्याचे इतर राज्यांपासून इंग्रजांनी संरक्षण करायचे !
    आणि त्या मोबदल्यात इंग्रजाना मांडलिक राजाने काही सुविधा द्यायच्या - असा करार सर्वच संस्थानांनी केलेला होता तसाच तो कोल्हापूरच्या संस्थानाने केला ! - म्हणजे काय ?- ते इंग्रजांचे मांडलिक झाले -
    आप्पा -पाचवा जॉर्ज आणि किंग एडवर्ड यांच्या वेळेस दरबारात सर्व राजाना इंग्रजाना सलाम करावा लागत होता -
    बाप्पा -मुंबई बंदरावर किंग एडवर्ड -गेट वे ऑफ इंडिया ला उतरला - त्यावेळचे फोटो आणि टाईम्स मध्ये माहिती आपण वाचावी - आजच्या कोणत्याही माणसाला शरम वाटेल अशी ती माहिती आहे !
    आप्पा - या अनानिमास्ला पुरावा म्हनाजेव काय हवे आहे ?
    बाप्पा - सगळे जग इंग्रजांचे झाले होते - त्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता - अशा वेळी भारतात सार्वभौम राजा कसा असेल ?
    गमतीचा भाग - अफगाणिस्थान मात्र त्यांनी कधीच जिंकले नाही - पूर्णपणे - त्यात पण तडजोड करून त्याना शांत केले !
    पण आपले सर्व राजे आणि महाराजे पद भूषवणारे हे म्हणजे खरे सम्राट नसून नात सम्राट होते
    आप्पा -आजकाल लहान मुले जसे खोटे शिक्के लाऊन हिंडतात तसेच हे मांडलिक राजे इंग्रजांनी वाटलेले बिल्ले कौतुकाने मिरवत असत -
    म. गांधींचा साधेपणा कुठे आणि यांची बेगडी राज्ये कुठेत -
    एक उघडाबंब म्हातारा - त्याने या सत्तेला हलवून सोडले - आणि ते परस्पर ज्या वेळेस गेले त्यावेळेस - " आपले कसे होणार " म्हणून हे बिल्लेवाले रडत बसले !
    त्यांचे तनखे इंदिरा गांधीनी बंद करे पर्यंत हे निर्लज्ज राजे असा फुकटचा तनखा खात होते !
    कोल्हापुरच्या र्राजानी का स्वातंत्र्य मिळाल्यावर आपला तनखा सरकारी तीजोरीत जमा करावा असे सांगितले नाही ?वल्लभ भाई पटेल आणि इंदिरा गांधी यांनी यांच्या मुसक्या बांधल्या !-
    भारत सरकारशी लढण्याचे सामर्थ्य नाही म्हणून , मिळेल त्या तनख्यावर हे भारत सरकारचे अंकित झाले !
    जोधपुर जयपूर कोल्हापूर ,अवध,हैद्राबाद असे शेकडो राजे किताब असलेले मंडलिक तिथे सलाम करायला जमले होते - !
    आपण मुळातच कमी वाचता आणि जास्त बोलता -लिहिता असे वाटते !
    आपण आपला अभ्यास वाढवा - म्हणजे आपला राग शांत होईल
    आपण माझ्या आई वडिलाना नावे ठेवलीत किंवा इतरांच्या आई वडिलाना नावे ठेवलीत तर तो आपला मूर्खपणा आहे हे कुणीही सुशिक्षित ठरवू शकेल - त्यामुळे माझा अपमान होत नाही तर तो तुमच्या घराच्या संस्कारांचा अपमान ठरतो !आपण सभ्यपणा सोडणार नाही अशी आशा आहे !खरेतर श्री संजय सोनावणे अशा गोष्टीना प्रतिबंध करतील असे वाटत होते - चर्चा जास्तीत जास्त निरोगी वातावरणात झाली पाहिजे -
    आपणास काही मानसिक आजार नाही ना ?

    Reply

    ReplyDelete
  28. स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते. कांबळे: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर पाच हजार वर्षे अन्याय केलात, आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत. इंग...्रज आले नसते, तर आम्हाला कळलंच नसत की आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही अजून काही वर्षे अंधारात खिचपत पडलो असतो.

    जोशी: अहो कांबळे, तुमच्यावर अन्याय झाला हे खरच!! आणि इंग्रजांच्या राज्यातच हे जे चालले आहे ते चूक आहे हे विचारवंतांच्या लक्षात आले. त्यांनी समाजप्रबोधन केल. हे विचारवंत कोण होते तुम्हाला माहीत आहे का?

    कांबळे: हो!! फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी भटांवर टीकेचे आसूड ओढले.

    जोशी: अहो कांबळे, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात का झाले? उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश मध्ये का झाले नाहीत?

    कांबळे: मी नाही समजलो; तुम्हाला काय म्हणायचं आहे?

    जोशी: सांगतो. अहो महाराष्ट्रात ८०० वर्षांची संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदासस्वामी ह्या सर्वांनी जातीपातीच्या कृत्रिम भिंती मोडा आणि सर्वांनी एकोप्याने, समतेने, गुण्यागोविंदाने रहा, विठ्ठलाची भक्ती करा असा संदेश दिला. ह्यातले ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदासस्वामी हे ब्राम्हण होते.

    ReplyDelete
    Replies
    1. ज्ञानेश्वर हे मुळीच ब्राह्मण नव्हते, त्यांची मुंज सुद्धा झालेली नव्हती. ते केवळ संन्यासाचे पोर होते. त्यांनी चातुर्वर्ण्याचे हिरीरीने समर्थन केले. ब्राह्मणांनी त्यांना व त्यांच्या भावंडांना जातीबहिष्कृत केले होते. त्यांना पुन्हा जातीमद्धे जायचे होते; त्यामुळे त्यांनी रूढ चातुर्वर्ण्याच्या कल्पना उचलून धरल्या व समाजापुढे कच खाल्ली.
      एकनाथ यांना अस्पृशांचा विटाळ चालत होता हे खरे न्हवे तर गंगा स्नानाने सर्व विटाळ, पापे पूर्णपणे धुतली जाऊन आपण पापमुक्त होतो अशी त्यांची धारणा होती. ते म्हणतात,

      " अंत्यजाचा विटाळ ज्यासी |
      गंगास्नाने शुद्धत्व त्यासी |
      ते गंगास्नान अंत्यजाशी |
      शुद्धत्वास अनुपयोगी |"
      (एकनाथी भागवत : अध्याय २८, ओवी १९१)

      रामदासांचे तर सांगायलाच नको, पूर्ण आयुष्य ब्राह्मणांच्या हितसंबंध जोपासण्यापलीकडे काहीही केले नाही. ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाची उच्चरवाने घोषणा करणाऱ्या रामदासांची भूमिका वर्णश्रेष्ठत्वाचा पुरस्कार करणारी आहे. 'गुरु तो सकालांशी ब्राह्मण | जरी तो असला विद्याहीन | तरी तयाशीच शरण अनन्यभावे असावे | ही रामदासांची भूमिका जाती दुराभिमानाने ग्रासलेली होती.

      विनायक पाठक.

      Delete
  29. Bhajanat yekee ani bhojanat beki !!!!

    ReplyDelete
    Replies
    1. "संत ज्या जातीत जन्मले व ज्या जातीत वाढले त्याच जातीत मेले" संत हे सरळ-सरळ प्रतिगामी होते.

      Delete
  30. सतीची प्रथा , केश वपन , या विषयी तुमच्या टाळ कुट्या संतानी कधीच आवाज उठवला नाही - असे का बरे ?तुकारामाना एकही अभंग रचता आला नाही - की केशवपन आणि सती जाणे हे अधर्म आहे , धर्माविरुद्ध आहे ?ते जर शिवाजी महाराजांचे राजगुरू होते असा खोटा डंका आजकाल पिटला जातोय तर त्यांनी एकदाही छत्रापतीना याबाबत सांगितले नाही ?
    सर्व संत जर बहुजन समाजाचे सुधारक होते आणि लाखोंच्या संख्येने ते आशाधी कार्तिकी करत होते तर त्यांनी या सामाजिक सुधारणा का नाही केल्या !
    संजय साहेब तुम्ही तरी उत्तर द्या !

    ReplyDelete
    Replies
    1. संतांचे कार्य हे त्या काळाला अनुरूपच होते, त्या काळाचे ते समाज सुधारकच होते.

      Delete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...