Saturday, August 2, 2014

माणसाचा अहंकार.....

माणसाचा अहंकार एवढा तीव्र आहे की जणू हे सारे विश्व आपल्यासाठीच बनले आहे असा त्याचा दृढ समज आहे. त्याच्या अहंकाराची झेप एवढी मोठी कि त्याच्या देवदेवताही मानवासारख्याच तो चितारतो, त्याच्यासारख्याच भावभावना देवतांत आहे असे तो मानतो. पुरातन मिथके पाहिली तर त्यात माणसाचे हे अहंकार प्रदर्शन अधिकच तीव्र असलेले दिसेल.

माणूस आजही बदललेला नाही. ज्या वेगाने त्याने निसर्गाचा "उद्धार" सुरू केला आहे त्या वेगाने कही दशकांतच तो नैसर्गिक, जैविक संपदा संपुर्ण संपवुनच टाकेल. असंख्य जीव त्याने भुतलावरून नाहीसे केले आहेत तर अगणित नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाशी जुळवून नव्हे तर त्याच्याशी अजरामर स्वार्थापोटी वैर घेऊनच तो वागतो आहे.

हेच वैर मग जेंव्हा निसर्ग प्रकोपातून व्यक्त करतो तेंव्हाची माणसाची उथळ हवालदिलता शरम आणते. निसर्गाशी संघर्ष एक दिवस माणसालाच या भुतलावरून नष्ट करेल याचे भान स्वत:ला बुद्धीमान व परमेश्वराचे लाडके अपत्य समजणा-या माणसाने कधीच बाळगलेले नाही.

आणि मनुष्य येथील निसर्गाचा भाग आहे ही कल्पनाच चुकीची असावी...खरेच तो डोनिकेन म्हणतो त्याप्रमाणे परग्रहावरून येथे आला असावा म्हणूनच त्याला स्वार्थापलीकडे येथील निसर्ग-जीवसृष्टीबाबत आत्मीयता वाटत नसावी हेच कधीकधी खरे वाटू लागते!

माणसाने अन्य सृष्टीला नष्ट करण्याचा नादात स्वत:लाही नष्ट करण्याचा चंग बांधला आहे हे मात्र निश्चित!

7 comments:

  1. संजय सर ,
    आपले अभिनंदन !
    आम्हाला आधी कळले असते तर आम्ही जरूर आलो असतो !
    आपण आपल्या ब्लोगवर सुद्धा आपले असले कार्यक्रम जर आधी जाहीर केले तर आपल्या भाशनाचा आनंद आम्हास घेता येईल , कारण प्रत्यक्ष भाषण ऐकणे आणि वृत्तांत वाचणे यात फरक नक्कीच असतो , तो आनंद औरच !
    आपण ज्या मोकळेपणे दोन्हीही नेत्यांचे वर्णन केले आहे त्याबद्दल बरेच काही बोलता येईल
    एखाद्या नेत्याचे नेतृत्व तितकेच का फुलते याच्या तळाशी बर्याच गोष्टी असतात
    टिळक कोकणातून आले , पुण्यात त्याना जे प्रथम दिसले ते त्यांनी मित्रांसमवेत चालू केले - राष्ट्रीय शिक्षण संस्था !त्यानंतर लगोलग ते राजकारणात उतरले - सावधपणे त्यांनी क्रांतीकारकानाही मदत केली - ती भारतीय राजकारणाची सुरवात होती - त्यौले म गांधींच्या काळात आलेला अतीशुद्धपणा तेंव्हा दिसत नाही - मुळात लोकमान्य जहालच !त्याना सवर्ण असल्यामुळे इंग्रजी शिकायला मिळाले का ? त्यांना ब्राह्मण असल्यामुळे समाजात मानाचे स्थान आपसूक मिळाले का ?तसेच त्याना मिळालेल्या संधीचे केले का ?
    त्या काळातल्या चालीरीती प्रमाणे त्यांनी चहा प्यायला म्हणून प्रायःश्चित्त घेतले - आज आपल्याला या गोष्टीचे हसू येते - पण ते सत्य आहे - समाजाला बरोबर घेताना आपल्याला किती मर्यादित परिघात काम करावे लागते तेपण अभ्यासण्या सारखे आहे -तीव्र प्रखर बुद्धिमत्तेला सुजाण तर्काची जोड मिळाली तर त्या आयुष्याचे सोने होते ! तुरुंगवास हा सुद्धा त्यांनी कसा सुंदर नियोजन करून वापरला त्याचे कौतुक वाटते -
    पण हे सर्व करताना त्यांनी आपणा बरोबर घेतले का ? याचा अभ्यास काही दुसरेच प्रश्न निर्माण करत असतो !ताईसाहेब प्रकरण आणि शाहू महाराज हे एक दुर्दैवी प्रकरण आहे
    अण्णाभाऊ साठे यांचे जीवन फारच कष्टाचे ! त्यांचे लेखन दलित चळवळीशी नाते सांगणारे आहे -
    लो टिळक गेले आणि अण्णाभाऊ जन्माला आले - म गांधींचा उदय झाला होता अंत्योदय कल्पना रुजली होती आणि कोन्ग्रेस राष्ट्रीय चळवळ हि समाज सुधारणेची चळवळ बनत होती - अशातच समाजवादी विचार पक्का होत होता - त्यामुळे स्वातंत्र्यानंतर अण्णाभाऊ दलितांचे प्रवक्ते बनले आणि लिखाण होत गेले - त्याना सापडलेला सोपा लेखनाचा फॉर्म म्हणजे लावणी आणि तमाशा !
    लेखनाची उर्मी हे एक महान आश्चर्य आहे !!आणि अगदी सामान्य माणसाच्या मनात किती वादळे असतात ते त्यांच्या लेखनातून दिसते !
    पण अशा वादळाची सुद्धा पद्धतशीर खातेवारी होत जाते आणि लेबले लाऊन सत्कार करून त्याना परत एका वर्गाचे नेते म्हणून उल्लेखले जाते आणि बोळवण केली जाते हि आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे
    त्यांचा मृत्यू १९६९ ला झाला -
    आपल्या लोकशाहीला चीनच्या दगाबाजीचा दणका बसला होता - ग्जागातिक पटावर अनेक थोर नेत्यांचा अस्त झाला होता - लेनिन केनेडी आणि नेहरू पडद्याआड गेले होते समाजवादी चळवळ फसली का असे वाटू लागले होते अशा काळात अण्णाभाऊ लिहित गेले अमरशेख , अण्णाभाऊ अशा लोकांनी आणि राष्ट्र सेवा दलाने सुद्धासमाजवादी चळवळीला पाठबळ दिले मला कधीकधी असे वाटे की पारीतोशाके माणसातल्या कर्तृत्वाला मारक ठरतात -लक्ष्मण माने , दया पवार अशी अनेक उदाहरणे देता येतील - एकतर तथाकथित अशिक्षित लोकनेते व्यसनाधीन होत त्याना निराशेने घेरले जाउन ते लवकर कालौघात नष्ट होतात - पण अण्णाभाऊ मात्र याला अपवाद होते - ते शेवट पर्यंत लिहित होते - २२ वर्षे झोपडपट्टीत राहून मरणा अगोदर १ वर्ष त्याना बांधीव घर सरकारने दिले - तसे ते दुर्लक्षितच राहिले !आपल्या समाजाची ही क्रूर वृत्ती म्हणावी का हा कालाचा महिमा - का भांडवलदारी वृत्तीने केलेली चेष्टा ?
    लोकमान्य टिळक असोत किंवा अण्णाभाऊ असोत त्यांच्या त्यांच्या परिघातून ते बाहेर पडू शकले का ?भौतिक दृष्ट्या ते लोकोत्तर ठरले पण त्याना हवे ते त्यांनी साधले का ?
    त्याना काय हवे आहे ते त्याना समजले होते का ?
    असे अनेक प्रश्न आपले डोके व्यापून टाकतात !
    म गांधी आले आणि त्यांनी सारे चित्रच बदलून टाकले

    ReplyDelete
  2. "Remember that Bengali households still are known for their amazing food culture and this fact is known world-wide :)

    tanSEN was bengali my dear friend, so were a lot of other people! want to see the entire list as it stands today? so was subash chandra bose and sri aurobindo :)

    and i can name a million others and i am proud to say our greateness can be exerted beyond our national borders.
    we are the fifth largest speakers!

    we bengalis have won pretty much every award in the world stage you name it we have it and we are damn proud of what we have :)

    its the only country in the world which took rebellion because it couldn’t speak its mother tongue and it won! and won so hard that the UN had to adopt that day as the international language day, which celebrates languages from all over the world.

    did you know that the FAMOUS SEARS TOWER is architectured by another bengali?"

    KAMONASISH AAYUSH MAZUMDAR
    (MBA, IMT Ghaziabad)
    Bengaluru, Karnataka

    ReplyDelete
  3. टिळकांना ऐन तारूण्यात आपल्या जीवनाचे ध्येय सापडले व त्यावरून त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली तेव्हा देश त्यांच्या मागे गेला. आपले जगण्याचे ध्येय निश्चित न होणे ही माणसासाठी शोकांतिकेची गोष्ट आहे.

    ReplyDelete
  4. मीपणा हा जीवनाचा अपरिहार्य भाग आहे
    मीपणा हा ज्ञानेश्वरानाही आणि तुकारामानाही चुकला नाही - जे जे सज्जन समाज सुधारणेसाठी लिहितात , ओव्या अभंग रचतात - त्याना अहंकार असतोच !
    समजा त्यांनी असे समजले की मरुदे ! या लोकाना सांगत बसणे म्हणजे मूर्खपणा आहे !
    हे असेच मरणार - पण नाही - ते झक मारत एव्हडी शाई वाळवतात - त्याने जग बदलले का ? चोऱ्या - बलात्कार थांबले का ? समाजाचे शोषण थांबले का ?
    या संताना समाजाला इतके सांगायची हौस का असते ?

    सावरकराना तुरुंगात कोंडले पण त्यांनी तिथून सागरा प्राण तळमळला - असे गाऱ्हाणे आळवले ,लोकमान्यांना मंडालेत ठेवले तर त्यांनी गीतारहस्य लिहिले -हा प्रपंच ते का करत होते ?आपला अहंभाव जागृत ठेवण्यासाठी ?
    दुसरी गोष्ट - आपली नैसर्गिक संपत्ती आपण इतर देशाना विकतो - त्याचा वापर करून ते अस्सल तांबे ,जस्त किंवा पोलाद आणि इतर धातू बनवतात प्रक्रिया करण्याची हिम्मत आपल्यात नाही -म्हणून आपण तीच गोष्ट बाजारात त्यांच्याकडून विकत घेतो !
    आपला ट्रेडर फक्त विक्री बघत असतो ,नफा तोटा इतकेच त्याचे विश्व असते !
    आपला निर्माता उद्योजक , आपल्या मालाला मार्केट कसे मिळेल या चिंतेत असतो - म्हणून त्याला आणि त्याच्या राष्ट्रीय अभिमानाला सीमा आहेत -
    आपल्या समाजात भांडवल्रदाराकडे अजूनही सन्मानाने बघितले जात नाही - जणूकाही नफा कमावणे म्हणजे " पाप " आहे असे समाजवादी संस्कार झालेल्या भारतीयांची भूमिका आहे !

    ReplyDelete
  5. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बद्दल जो वाद चालू आहे त्याबद्दल शेवटी सर्वच दमलेले दिसतात ,
    आता हा विषयही खूप चर्चा करण्या सारखा आहे
    अहंकार - म्हणजे इगो - हा माणसाच्या कार्तुत्वासाठी आवश्यक आहे असे म्हणावेसे वाटते -
    भारतीय तत्त्वज्ञानात एक प्रकारचे औदासिन्य वाटते - सगळेच नश्वर - त्यामुळे मनावर असा काही परिणाम होतो की शाश्वत काहीच नसेल तर मग या जीवनाचा अर्थ तरी काय ?
    आम्हाला एक प्रश्न पडतो की ,
    समजा पृथ्वीच्या पोटातील तेल हळूहळू काढले तर काय होईल ?फार तर १०० वर्षाच्या ऐवजी १५० वर्ष पुरेल - पण शेवटी दुसरे मार्ग शोधावेच लागतील - पृथ्वीच्या पोटातील सर्व धातू संपले तर काय ? त्याकाळात काहीतरी कायदे निर्माण होतील - रिसायकलिंग होत राहील -त्यासाठी आत्तापासून रडारड संजय सोनावणी का करत आहेत ?-पूर्वी बैलगाड्या होत्या मग कार रेल्वे विमान अशी प्रगती झाली -
    युरोपातून आपण फिरलो तर काय दिसते - त्यांनी इतकी प्रचंड पर्यावरणाची काळजी घ्र्तली आहे की मन आनंदित होते - आपणपण तसे कायदे आणि मुख्य म्हणजे कृती करू शकतो !आपण कमी पडतो ते इथेच - आपले कायदे कागदावरच राहतात - अनेक मंत्रालये आणि त्यांच्यात एक्वाक्यतेचा अभाव यामुळे समाजाच्या मुलावर उठलेल्या नफाखोर लोकांचे फावते -
    आपल्याकडे थोडेसे विषयांतर करून असे विचारावेसे वाटते -
    धुम्रपान करण्यास मनाई आहे आणि शाळेपासून ठराविक अंतरावर सिगारेट विक्री बंदी आहे - परंतू शहरातून हि साधी गोष्ट राबवली जाते का ?ह्या राबवणार्या यंत्रणेला आपण कसे भाग पाडू शकतो ? त्याचा पाठपुरावा कोणाकडे करायचा ?इंग्रजी चित्रपटात एखादी पत्रकार प्रदुशानाबद्दल लढते आणि न्यायालयात केस जिंकते हे दाखवतात - आपल्या कडे काय दिसते ?
    रस्त्यावर पान खाउन थुंकणे गुन्हा आहे , रस्त्यात धुम्रपान करणे गुन्हा आहे - मी समजा कुणाला पकडून पोलिस चौकीत नेले तर काय घडेल ?याबाबत वर्तमान पत्रात जनजागृती होणे महत्वाचे आहे - पोलिसाना अशा गुम्ह्याची नोंद करायला सांगताना कोणते कलम वापरावयास सांगायचे याची जन सामान्याना जर कुणी माहिती देईल तर फार मोठ्ठी समाज सुधारणा होऊ शकते
    कारण
    आजही अनेक लोक धाडसाने कायदा राबवायला पुढे यावयास तयार आहेत पण ,
    त्यांना योग्यती माहिती नसते
    संजय सरांनी अशा नियमांबद्दल एक लेख लिहिला पाहिजे
    सार्वजनिक जागा म्हणजे कोणती -तिथे काय कायदा लागू होतो
    पोलिसाना आपण स्वतः जर कलम सुचवले तर फारच बहार येईल कारण ते अजिबात या सुधारणा करण्याच्या बाजूने नसतात -
    आताचे जिवंत उदाहरणाच बघा !
    इतका भलामोठ्ठा जीवघेणा प्रकार घडला , आणि त्यावर उपाय काय काढला ? तर एक नवी शाखा काढली मुख्यमंत्र्यांनी - त्यात नवीन भरती होईल करोडो रुपये घालून नवीन गोष्टी घेतल्या जातील - पण ऐन वख्ताला शून्य भोपळा !
    खारेयार अशा प्रकारात , तेथील तहसीलदाराला जाब विचारला पाहिजे - जमिनीबाबत काहीही बदल - जमीन वापर असो शेती असो किंवा सपाटीकरण असो - त्यावर तहसीलदाराची देखरेख असणार हे गृहीत आहे
    पण इथे सगळाच आनंद !

    ReplyDelete
  6. सर नमस्कार ,
    आपली फेसबुक वरची गाणी ऐकत ऐकत लिहित आहे
    आपल्या रचना आपल्याच आवाजात ऐकताना मजा आली , आणि दुसरे " हि रिमझिम श्रावणाची " हे राहुल दातार यांनी गायलेले गीत पन आवडले आपला हा पैलू आनंदाचा धक्का देऊन गेला
    त्यांचापण आवाज गोड आहे शब्दोच्चार स्पष्ट अगदी सुधीर फडके यांची आठवण करून देणारे आहेत
    आपले संगीत सुंदर आहे
    फारच छान
    दुसरे म्हणजे आपण आजच्या प्रस्थापित राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाला आव्हान करावे की आपल्याला धनगर आरक्षण मान्य करताना आयोगाची गरजच काय ?धनगरांचे प्रश्न हे काही नवे नाहीत
    ज्या तत्परतेने मराठा आणि मुसलमानाना आरक्षण मिळाले तसेच ते धनगर समाजाला मिळाले पाहिजे असा रेटा आपण लावून धरला पाहिजे
    आपले गाण्यातील शब्दोच्चार जरासे - अगदी जरासे सुधारता आले तर आशयात अजून भर पडेल असे सुचवावेसे वाटते
    मी आपणास नेहमीच शुद्ध लेखन आणि शब्दोच्चार त्याबाबत विनंती करत असतो - त्याचे कारण - आमचे काही ब्राह्मण कोकणस्थ - वाई आणि भोर येथे राहून राहून त्यांची पण भाषा उच्चारात मार खाते - म्हणून ही विनंती !
    आपला नम्र
    दत्ता आगाशे

    ReplyDelete
  7. आप्पा - अरे बाप्पा ,इकडे ये , काय म्हणायचं ?
    बाप्पा - काय झाल ते तरी सांग
    आप्पा - अरे हे बहुजन समाजातील लोक इतके सुंदर लिहायला लागले आहेत की आनंदाने त्या आपल्या अविनाशचे कधी एकदा अभिनंदन करीन असे झाले आहे
    - खूप कष्ट घेतले त्याने बहुजनांसाठी - दिवसरात्र एक करून शिकवले ,प्रसंगी स्वतःचे पैसे खर्च केले - एकवेळ उपाशी राहिला
    बाप्पा - आणि आपल्या सारंग दवेने सुद्धा किती बहुजनांसाठी अर्पित भावनेने काम केले त्याचे आज मनापासून कौतुक करुया !सारंग देव यानेतर प्रसंगी आपली आयुष्यातील सर्व कमाई लोकोद्धारासाठी अर्पित केली -आता त्याना काही अडचणी आल्या आहेत त्या अविनाश आणि सारंगने सोडवल्या पाहिजेत असे मला सांगावेसे वाटते -
    आप्पा - आता हेच बघ ना - एका अनामिकाने सुचवले होते की अमुक करा तमुक करा - त्यावर कुणा बहुजन समाजातील नव्या विचारांच्या तरुणाईने दाखल घेत भाष्य केले आहे - भाषेत थोडा टच गावठी असेल पण आज त्याने धाडस केले ,आपल्याला तेच हवे आहे - बहुजन समाजाने हृदय मोकळे केले पाहिजे - ज्याला प्रश्नच पडत नाही तो माणूस ठोम्ब्याच - पण आज बहुजन माणूस बोलतो आहे याचाच आनंद आहे - कुणीतरी सुचवले आहे की हिंदू दरम आणि त्याचे अधिकृत साहित्य याची इतराना माहिती द्यावी ,देव परमेश्वर अशा अंधश्रद्धा दूर कराव्या !
    बाप्पा - हे जरा अवघडच आहे - एकदम बहुजानाना इतका मोठ्ठा डोस झेपणार नाही
    आप्पा - हो तेच ते - त्यांनी म्हणूनच इतके प्रश्न विचारले असतील कुणा ब्राह्मणाला - आणि गोंधळ अजूनच वाढला - जर अविनाश आणि सारंग ने जरा अजून इंटरेस्ट घेऊन हिंदू धर्माची पुस्तके अधिकृत कोणती , जाळायची कोणती रद्दीत घालायची ,आणि कोणती फाडायची ते सांगितले तर किती बरे होईल - काय होतंय माहित्ये का - कुणीतरी बहुजनातील साजाची काळजी करणारा असे काहीतरी अर्धवट सांगतो आणि मग गोंधळ वाढतो -
    बाप्पा -सध्या घरोघरी श्रावणाची गडबड आहे - सारंग आणि अविनाश आणि त्यांचे हजारो मित्र यांनी जर गौरी गणपती , नाग पंचमी , हरतालिका , असे सण साजरे करू नका - ते अधिकृत हिंदू सण नाहीत , किंवा सत्यनारायण वगैरे थोतांड आहेत , सार्वजनिक गणपती तर अजिबात बसवू नका असे सांगितले तर खुद्द बहुजन काय करतील ते बघण्या सारखे असेल - सार्वजनिक गणपती बंद केले तर आजच्या घडीला खरेतर मध्यम वर्गीय ब्राह्मण लोकच सुटकेचा निःश्वास सोडतील अशी गत झाली आहे या उत्सवाची !
    आप्पा - चला तर आपण बडबड थांबवू आणि अविनाशला जर बहुजन वर्गाशी बोलायला वेळ देवूया बाप्पा - आणि सारंगला पण बरेच काही सांगायचे असेल -

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...