"जग
बदल घालूनी घाव" अण्णा भाऊ म्हणाले होते. जगात कोणी शोषित, वंचीत आणि
पिडीत राहणार नाही यासाठी त्यांचे तगमग होती. आम्ही उलटी सुरुवात केली.
आम्ही घाव घातले पण याच शोषित-वंचितांच्या स्वप्नांवर. आशा आकांक्षांवर.
आम्ही जग बदलले...पण कसे? जगाला निर्दय, सवेंदनहीण आणि उथळ बनवले. दीड
दिवसांची शाळा न शिकता जीवनाच्या शाळेत अण्णा भाउंनी ज्ञानार्थीच रहात
साहित्यात उंच झेपा घेतल्या. जगभरच्या २७ भाषांत त्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले. त्यांनी भारतीयच नव्हे तर जगभरच्या वंचित-शोषितांच्या स्वातंत्र्याची कामना केली.
टिळकही खरे हाडाचे ज्ञानार्थी. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी संग्राम केला, पण त्यांची ज्ञानतृष्णा त्याहीपेक्षा मोठी होती. त्या काळी संदर्भग्रंथ मिळवणे हे अत्यंत वेळखाऊ व किचकट काम असतांनाही "गीतारहस्य" सारख्या नीतिशास्त्रातील एक जागतिक दर्जाचा ग्रंथ लिहिला. ते गणिताचे व संस्कृतचे पंडितही होते. अण्णा भाऊ आणि टिळक हे समाजाच्या दोन टोकातून आलेले, वेगळ्या संस्कारांत वाढलेले...दृष्टीकोणही त्यामुळे वेगळे. पण म्हणून टिळकांबाबतचा आदर व्यक्त करतांना अण्णा भाऊ कोठे संकोच करत नाहीत. याला मानवतेची विश्वव्यापकता म्हणतात.
आज आमच्या पिढ्या संगणकयुगात आल्यात. इंटरनेट हातातल्या मोबाईलवर आलेय. म्हणजे जागतीक ज्ञान हातात आलेय. पण ते तेथेच आहे. त्या आधुनिक साधनांचा वापर आमच्या पिढ्या ज्ञानासाठी करत नाहीत तर उथळ सवंगपणासाठी करतात. जशी संगत तसा माणूस बनतो हे सत्य लक्षात घेतले तर या सवंगपणात वाहून जाणारी पिढी भावी ज्ञानात काय भर घालणार? चकचकीत प्रतिष्ठांच्या मागे लागलेले, जीवन हरपून बसलेले कोणत्या प्रकारची जीवनशैली घडवणार?
थोडक्यात आम्ही उथळ आणि म्हणुणच नालायक पिढ्या घडवायचा चंग बांधला आहे. जग आम्ही बदललेय पण ते सवंगपणात बदलवले आहे. त्याला ठोस आधार नाही. मग हा देश कसा महासत्ता होणार?
असेच जर असेल तर मग विगतातील महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साज-या करण्याचा आम्हाला कोणी अधिकार दिला, जर आम्हाला त्यांच्यापासून काही चांगले घ्यायचेच नसेल तर?"
(काल ५१२ खडकी येथे लो. टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या संयुक्त कार्यक्रमात बोलतांना मी. )
प्रिय संजयजी,
ReplyDeleteजानकारियों की सर्वत्र उप्लब्धता ने मानो ज्ञान पिपासा ही खत्म कर दी है. जब स्कूलें घर से पांच दस किलोमीटर दूर थी, पढ़ने के लिए दीपक में तेल तक डालने के पैसे नहीं थे, उसी दौर में समाज ने अपने सबसे महान ज्ञानी पैदा किये. ज्ञान मानो एक लंबी यात्रा का प्रसाद था, आज की तरह घर घर भेजा गया सरकारी सीदा नहीं. मनुष्य के पुरुषार्थ को जब जब भी चुनौती मिली है, उसकी प्रतिभा तब तब नए प्रकाश पर्व का दीप बन कर जली है. संकटो ने जहाँ विश्व प्रतिभा को जन्म दिया है, सुविधओं ने उसे सदा नष्ट किया है. शायद इसीलिए राजा के एक पुत्र ने रात के गहन अंधेरों में सत्य के लिए अनुभव जन्य पीड़ा का रास्ता चुना था.
क्या आपको नहीं लगता कि आज की ज्यादातर सरकारी नीतियां हमारे भीतर के विद्रोह को हमारे ही घर की दहलीज पर खत्म करने के काम आ रही है? क्या बीपील के कार्ड अन्ना भाऊ के ज़माने में होते तो उनके साहित्य में वही आग और करुणा का संगम होता?
दिनेश शर्मा
संजय सर ,
ReplyDeleteआपले अभिनंदन !
आम्हाला आधी कळले असते तर आम्ही जरूर आलो असतो !
आपण आपल्या ब्लोगवर सुद्धा आपले असले कार्यक्रम जर आधी जाहीर केले तर आपल्या भाशनाचा आनंद आम्हास घेता येईल , कारण प्रत्यक्ष भाषण ऐकणे आणि वृत्तांत वाचणे यात फरक नक्कीच असतो , तो आनंद औरच !
आपण ज्या मोकळेपणे दोन्हीही नेत्यांचे वर्णन केले आहे त्याबद्दल बरेच काही बोलता येईल
एखाद्या नेत्याचे नेतृत्व तितकेच का फुलते याच्या तळाशी बर्याच गोष्टी असतात
टिळक कोकणातून आले , पुण्यात त्याना जे प्रथम दिसले ते त्यांनी मित्रांसमवेत चालू केले - राष्ट्रीय शिक्षण संस्था !त्यानंतर लगोलग ते राजकारणात उतरले - सावधपणे त्यांनी क्रांतीकारकानाही मदत केली - ती भारतीय राजकारणाची सुरवात होती - त्यौले म गांधींच्या काळात आलेला अतीशुद्धपणा तेंव्हा दिसत नाही - मुळात लोकमान्य जहालच !त्याना सवर्ण असल्यामुळे इंग्रजी शिकायला मिळाले का ? त्यांना ब्राह्मण असल्यामुळे समाजात मानाचे स्थान आपसूक मिळाले का ?तसेच त्याना मिळालेल्या संधीचे केले का ?
त्या काळातल्या चालीरीती प्रमाणे त्यांनी चहा प्यायला म्हणून प्रायःश्चित्त घेतले - आज आपल्याला या गोष्टीचे हसू येते - पण ते सत्य आहे - समाजाला बरोबर घेताना आपल्याला किती मर्यादित परिघात काम करावे लागते तेपण अभ्यासण्या सारखे आहे -तीव्र प्रखर बुद्धिमत्तेला सुजाण तर्काची जोड मिळाली तर त्या आयुष्याचे सोने होते ! तुरुंगवास हा सुद्धा त्यांनी कसा सुंदर नियोजन करून वापरला त्याचे कौतुक वाटते -
पण हे सर्व करताना त्यांनी आपणा बरोबर घेतले का ? याचा अभ्यास काही दुसरेच प्रश्न निर्माण करत असतो !ताईसाहेब प्रकरण आणि शाहू महाराज हे एक दुर्दैवी प्रकरण आहे
अण्णाभाऊ साठे यांचे जीवन फारच कष्टाचे ! त्यांचे लेखन दलित चळवळीशी नाते सांगणारे आहे -
लो टिळक गेले आणि अण्णाभाऊ जन्माला आले - म गांधींचा उदय झाला होता अंत्योदय कल्पना रुजली होती आणि कोन्ग्रेस राष्ट्रीय चळवळ हि समाज सुधारणेची चळवळ बनत होती - अशातच समाजवादी विचार पक्का होत होता - त्यामुळे स्वातंत्र्यानंतर अण्णाभाऊ दलितांचे प्रवक्ते बनले आणि लिखाण होत गेले - त्याना सापडलेला सोपा लेखनाचा फॉर्म म्हणजे लावणी आणि तमाशा !
लेखनाची उर्मी हे एक महान आश्चर्य आहे !!आणि अगदी सामान्य माणसाच्या मनात किती वादळे असतात ते त्यांच्या लेखनातून दिसते !
पण अशा वादळाची सुद्धा पद्धतशीर खातेवारी होत जाते आणि लेबले लाऊन सत्कार करून त्याना परत एका वर्गाचे नेते म्हणून उल्लेखले जाते आणि बोळवण केली जाते हि आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे
त्यांचा मृत्यू १९६९ ला झाला -
आपल्या लोकशाहीला चीनच्या दगाबाजीचा दणका बसला होता - ग्जागातिक पटावर अनेक थोर नेत्यांचा अस्त झाला होता - लेनिन केनेडी आणि नेहरू पडद्याआड गेले होते समाजवादी चळवळ फसली का असे वाटू लागले होते अशा काळात अण्णाभाऊ लिहित गेले अमरशेख , अण्णाभाऊ अशा लोकांनी आणि राष्ट्र सेवा दलाने सुद्धासमाजवादी चळवळीला पाठबळ दिले मला कधीकधी असे वाटे की पारीतोशाके माणसातल्या कर्तृत्वाला मारक ठरतात -लक्ष्मण माने , दया पवार अशी अनेक उदाहरणे देता येतील - एकतर तथाकथित अशिक्षित लोकनेते व्यसनाधीन होत त्याना निराशेने घेरले जाउन ते लवकर कालौघात नष्ट होतात - पण अण्णाभाऊ मात्र याला अपवाद होते - ते शेवट पर्यंत लिहित होते - २२ वर्षे झोपडपट्टीत राहून मरणा अगोदर १ वर्ष त्याना बांधीव घर सरकारने दिले - तसे ते दुर्लक्षितच राहिले !आपल्या समाजाची ही क्रूर वृत्ती म्हणावी का हा कालाचा महिमा - का भांडवलदारी वृत्तीने केलेली चेष्टा ?
लोकमान्य टिळक असोत किंवा अण्णाभाऊ असोत त्यांच्या त्यांच्या परिघातून ते बाहेर पडू शकले का ?भौतिक दृष्ट्या ते लोकोत्तर ठरले पण त्याना हवे ते त्यांनी साधले का ?
त्याना काय हवे आहे ते त्याना समजले होते का ?
असे अनेक प्रश्न आपले डोके व्यापून टाकतात !
म गांधी आले आणि त्यांनी सारे चित्रच बदलून टाकले
जग बदल घालूनी घाव ! सांगून गेले मला भीमराव !
ReplyDeleteगुलामगिरीच्या या चिखलात ! रुतून बसला का ऐरावत !
अंग झाडुनी निघ बाहेरी ! घे बिनीवरती धाव !!
धनवंतांनी अखंड पिळले ! धर्मांधांनी तसेच छळले १
मगराने जणू माणिक गिळिले ! चोर जाहले साव !!
ठरवून आम्हा हीन कलंकित ! जन्मोजन्मी करुनी अंकित !
जिणे लादुनी वर अवमानित ! निर्मून हा भेदभाव !!
एकजुटीच्या या रथावरती ! आरूढ होऊनी चल बा पुढती !
नव महाराष्ट्रा निर्मून जगती ! करी प्रकट निज गाव !!
-अण्णाभाऊ साठे