Tuesday, September 9, 2014

ओबीसींच्या हितासाठी...






१. इतिहास केवळ सत्ताधारी आणि धर्माधिशांचा होता या भ्रमातून ओबीसींनी बाहेर यायला हवे. ओबीसी म्हनजे "निर्माणकर्ता समाज" पुरातन काळापासून नवनवे जीवनोपयोगी शोध ते त्यांचे व्यवसाय चालवत या निर्माणकर्त्यांनी संस्कृती घडवली व तिला आकारही दिला. जगभर निर्मित वस्तुंचा व्यापार झाल्याने सांस्कृतिक देवाण-घेवाणी होत जेवढे जग जवळ आले तेवढे राजा-महाराजांच्या आक्रमणे व युद्धांमुळे जवळ आलेले नाही. त्यामुळे संस्कृतीत आपण दुय्यम आहोत आणि आपल्याला इतिहास नाही या निर्माण केल्या गेलेल्या भ्रमातून बाहेर पडा. आज जगाचा जोही काही पुरातन इतिहास उत्खननांतून सापडतो तो आम्हाला तेथील घरे, खापरे, अलंकार, जीवनोपयोगी अन्य साधने इ. साधनांवरुन अंदाजिता येतो...आणि त्यांची निर्मिती ही निर्माणकर्त्यांची आहे. निर्माणकर्त्यांनाच खरा वास्तवदर्शी इतिहास आहे, इतरांचा केवळ नांवांवर संपतो हे लक्षात घेतले पाहिजे.

२. ओबीसी हक्क परिषदा भरतात. पण हक्क म्हणजे नेमके काय हे कोणाला माहित नसते. हक्कांची राबवणुक करून घ्यायला नेमके कोणते मार्ग चोखाळावेत याचेही ज्ञान नसते. जातीय नेत्यांची झुडपे तेवढी त्यातून वाढतात...हक्क मिळत नाहीत. हक्क हक्क करून लोकांना हक्कच समजत नाहीत मग जबाबदा-यांचा संबंध तरी कसा येणार?

३. अर्थसत्ता, ज्ञानसत्ता आणि राजसत्ता हा निर्माणकर्त्यांचा मुलमंत्र असला पाहिजे. निर्माणकर्ते नेहमीच अर्थसत्तेचे मुख्य आधारस्तंभ राहिले. ज्ञानाची जोपासना केल्याने उत्पादन पद्धतीत विकास होत राहिला. पण दहाव्या शतकानंतर बदललेल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीमुळे वातावरण सकारात्मक राहिले नाही. गेल्या दोन-अडिचशे वर्षात हतबलता आणि न्युनगंडाचे प्रमाण वाढत गेले. शिकले पण ज्ञान आले नाही. आधुनिक तंत्रज्ञानांचा आपल्या पारंपारिक व्यवसायांत कसा उपयोग करावा ते नीट समजले नाही.

वाचनाचे प्रमाण याच समाजगटात सर्वाधिक कमी आहे. एखाद्या नोकरीत "चिकटने" आणि त्यातच इतिकर्तव्यता मानत झापडबंद आयुष्य घालवणे यात ओबीसी आत्ममग्न आहे. त्याला समाजाच्या एकुणातील परिस्थितीचे भान नसते. असलेच तर फक्त स्वजातीचे असते. तेही जातीचा नेता म्हणवून मिरवण्याइतपत. त्यामुळे ओबीसी-बजेट सारख्या ख-या मुद्द्याकडे तो ढुंकनही पाहत नाही. पारंपारिक व्यवसाय करणा-यांना विना-तारण कर्ज मिळालेच पाहिजे असे शासकीय धोरण असुनही ते दिले जात नाही. यासाठी ब्यंकांवर कोणाचा मोर्चा निघाल्याचे ऐकीवात नाही. आरक्षण सर्व समाजाचे भले करू शकत नाही. आरक्षणाची तेवढी व्याप्तीही नाही. शासकीय नोक-या घटताहेत याचे भान नाही. स्वबळावर उभे ठाकणे व गरज पडली तर आणि तरच आरक्षण वापरणे यातच ओबीसींचे भले आहे. परंपरागत व्यवसायांबरोबरच कोकणातील निर्मित फळे-मासे यांवर प्रक्रियाउद्योग काढण्यास प्रचंड वाव आहे. पण तिकडे कोणाचे लक्ष नाही.

४. जाती या व्यवसायामुळे पडलेल्या आहेत. त्या कोणी निर्माण केल्या नाहीत. वैदिकांचा त्याशी काडीइतकाही संबंध नाही. जाती बंदिस्त झाल्या त्याची कारणे वेगळी आणि स्वतंत्र आहे. गुरव हे पुरातन काळापासून हिंदुंचे खरे नैसर्गिक पुरोहित आहेत. पण त्यांनीही धर्माभ्यासाची कास सोडल्याने वैधर्मी लोक त्यांनाच खरा-खोटा धर्म सांगत असतील तर गुरवांनीही आता बदलायला पाहिजे. वैदिक जोखडे झिडकारत ख-या समतेचे तत्वज्ञान अंगिकारले पाहिजे. पण ओबीसी नुसत्या आपल्यातीलच जातींना उच्च-नीच मानून थांबत नाहेवे तर आपल्यातीलच पोटजातींत विश्झमता पाळतो. हे वैदिक गुलामीचे लक्षण आहे. ही मानसिक गुलामी सोडण्याची गरज आहे.

५. कोकणचा क्यलिफोर्निया करण्याची स्वप्ने दाखवली जातात. सरकार अपेशी आहे तेवढेच कोकणचे रहिवासीही अपेशी आहेत. घाणेरडे बीच, साध्या कोकनी खाद्य स्पेश्यलिटीजचा  अभाव, रहायच्या आणे पर्यटकसेवांतील गैरसोयी यामुळे जगभरचे पर्यटक कसे इकडे येणार? कोकणचा क्यलिफोर्निया सोडा, केरळही करता आलेला नाही, याला शासनाबरोबरच आम्हीही जबाबदार आहोत.

६. ज्या घटकांना नवे आरक्षण हवे वा प्रवर्गबदल हवेत त्या घटकांनी केवळ आंदोलने करून ते मिळणार नाही. आंदोलने हा आपली मागणी समोर आनण्याचा एक मार्ग आहे. पण जातीय नेत्यांना आरक्षणांत खरा रस नसतो हे त्या त्या जातीयांनाही समजत नाही. त्यामुळे आपली मागणी नेमकी कोणत्या फोरमसमोर आणि कशी गेली पाहिजे या दिशेने नेतेही प्रयत्न करत नाहीत आणि अज्ञानामुळे कार्यकर्तेही नेत्यांना ते विचारत नाहीत. नेते फक्त प्रसिद्धीत खुष असतात. पण नवीन आरक्षणाची प्रक्रिया ही सखोल माहिती, पुरावे आणि युक्तीवादाच्या आधारे होते याचे भान ठेवले गेले पाहिजे तरच मागण्या मान्य होण्याच्या थोड्यातरी शक्यता आहेत.

(काल चिपळून येथील ओबीसी हक्क परिषदेत मी मांडलेले हे काही मुद्दे. या परिषदेचे आयोजन श्री. माधव गवळी व विजय बोडेकर यांनी केले होते.)

11 comments:

  1. प्रिय संजयजी,
    आपकी बात से ९५% सहमत हूँ. जातीय अस्मिता व्यपारी और उद्योजक समाजों की बीमारी नहीं है, उनके जातीय गुण उनके लिए प्रगति के रास्ते खोलते है जबकि जिन्होंने अपना व्यापार और उद्योग कर्म छोड़ दिया है, उनको दूसरे लोग हांकते रहते है, भले ही खुद को उनका भला करनेवाला नेता बताए. मैं जिस राजस्थानी समाज से आता हूँ वहाँ का हर जाति का बच्चा अपना व्यापार और उद्योग कर्म करने के लिए दुनिया के अलग अलग देशों में जाता है, वे ज्यादा पढ़े- लिखे नहीं है, ज्यादा आय क्यू वाले भी नहीं है, किंतु उद्योगी है. नतीजे में आपको हर गांव में हर देश में मिल जायेंगे. उनके जातिभेद बाहर से किसी को दिखाई भी नहीं देंगे. वहाँ भी सैकड़ों जाति के लोग रहते है, आपसे ज्यादा छुआ छूट मानते है, किंतु वहाँ किसी सभा, फोरम पर इतने उन्माद से जाति के पक्ष या विरोध में चर्चा ही नहीं होती, क्योंकि वह विषय ही नगण्य है. सभी लोग मुसीबत में एक दूसरे का साथ देते है, मंदिर बनाते है, भजन गाते है, आप जैसे बुद्धिमानों की स्केल पर वे पिछड़े हुए अंधविश्वासी लोग है, किंतु उनमें एक लय है एक समन्वय है जो मुझे यहाँ नहीं दिखता. यहाँ लोग अदृश्य दुश्मन से लड़ रहें है और भीतर से बीमार हो रहें है. हमारे महापुरुषों ने इनके व्यापार इनसे फेंकवाकर इनके हाथों में किताबें देकर इनका और महाराष्ट्र समाज का बंटाधार कर दिया है. कल जब इन महापुरुषों के कामों का सामाजिक ऑडिट किया जायेगा तब तक तो ये समाज शायद अपने औजार रखने की जगहें भी भूल चुके होंगे.
    रहा सवाल आपके वैदिक और अवैदिक की बहस का, मेरा उस पर इतना ही कहना है कि आज भी भारत के सबसे बड़े उद्योजक उसी धरती से आते है जो धरती आपके अनुसार कभी अवैदिक सभ्यता की जन्मभूमि थी. आज वहाँ वैदिक सभ्यता हावी है किंतु उनके गुणसूत्र वही है. वैदिक हो जाने से उनके स्वभाव नहीं बदले, वे आपस में लड़े नहीं, ना ही वे ज्यादा जंगली हो गए. आज भी वहाँ के देवता सभी वर्णों के, सभी जातियों के लोगों के देवता है जिसे वे पूरी शान से पूजते है. सभी साल में एक तो भी बार अपने देवता के पास जाकर मन्नते मांगते है और मन्नत पूरी होने पर प्रसाद चढ़ा कर आ जाते है. उनके देवता घर के बूढ़े बुजुर्ग की तरह उनकी जिंदगी का रोजमर्रा का हिस्सा है. कोई बाहरी दुनिया की अदृश्य शक्ति नहीं. यहाँ तो मुझे बाहर का देवता गायब हो गया उससे ज्यादा लोगों के भीतर की जो दिव्यता लुट गई है उसको देखकर फ़िक्र होती है. यहाँ हर कोई केवल बहस कर रहा है, अपने अधिकार मांग रहा है, मुफ्त का माल उड़ाने की योजनायें बना रहा है, आराम की जिंदगी जी रहा है. किंतु वह नहीं जानता कि उसके हिस्से की मेहनत कोई और कर रहा है.
    क्षमा करना, ज्यादा बोल गया. बाकी और कभी
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
  2. संजयजी नमस्कार, आपण आरक्षणाचे समर्थन करता का? तुम्ही योग्यप्रकारे मुद्दा मांडला कि "नवीन आरक्षणाची प्रक्रिया ही सखोल माहिती, पुरावे आणि युक्तीवादाच्या आधारे होते" पण संजयजी, जर आपल्या समाजातील बुद्धिवंत हीच प्रक्रिया, सखोल माहिती आणि युक्तीवाद यांचा वापर समाज स्वयंपूर्ण होण्यासाठी आणी कुणालाही आरक्षणाची गरजच पडणार नाही, असे बदल आणी अशा संधी निर्माण करण्यासाठी का नाही वापरत? संजय सर, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, देशातील नेते आणी सर्व बुद्धिवंतांनाही माहिती आहे कि एखद्या समाजातील ५%,१०% लोकांना आरक्षण देऊन १००% समाजाचे कधीही भले होऊ शकत नाही. मग हे आरक्षण कशासाठी? हा सर्व खटाटोप, हे आंदोलने, हि परिषद यांचे औचित्य काय?
    ...
    धन्यवाद,
    शिवचंद्र, पुणे.

    ReplyDelete
  3. दिनेश शर्माजी ,
    नमस्कार , आपने आपके राजस्थान के बारेमे जो लिखा है वह पढकर मुझे आनंदभी हुआ और आपने जो मराठी लोगोन्के बारेमे टिपण्णी कि है वह पदके दुखभी हुआ ,आपने बिलकुल सही लिखा है हम मराठी लोग आज दिशा भूल चुके है , सही विचार करके हम चालना नाही चाहते - हमे आज इझी मनी चाहिये - क्षमा करे - मी मराठी लिहिण्याचे स्वातंत्र्य घेत आहे आणि मला आशा आहे की आपणास ते समजेल - आपण म्हणता त्याप्रमाणे सगळा दोष आमच्या नेत्यांचा आहे - मी कोकानातालाच आहे - अगदी चिपळूण जवळचा - मला जे दिसते ते भयानक आहे - आज बहुतेक लोक , अगदी दापोली पासून श्रीवर्धन पर्यंत - जमिनी विकून पैसे करायच्या मागे लागले आहेत - जे पुण्याच्या आसपास चालले आहे तेच तिकडे चालले आहे - पुण्यात जसे गुंठेवाले नेते झाले आहेत तसेच कोकणात होत आहेत - समाजाला हे कसे मार्गदर्शन करणार ?
    आपण अतिशय सुंदर उत्तर दिले आहे - शैव आणि वैदिक हे संजय सोनावणी यांचे मेंदूचे दुखणे असावे असे वाटू लागावे इतके ते त्या विचाराने झपाटले आहेत - खरेतर इतका हा मुद्दा प्रत्येक इतर विचारांच्या जोडीला मांडायचे कारणच नाही - अतिशय अनावश्यक आणि कमकुवत विचार आपोआप फेकला जातो - कष्ट आणि फक्त कष्ट - कष्टाला पर्याय नाही - आज बाहेरून येउन राजस्थानी , बिहारी , युपी आणि आतातर सिक्कीम पूर्वांचल कडले लोक इकडे यशस्वी पाने आपले जीवन जगात आहेत - इथल्या भुमिपुत्राना इथल्या प्रत्येक नव्या प्रोजेक्ट मध्ये काम मिळाले पाहिजे हा विचारही अत्यंत दांभिकपणाचा आहे असे मला वाटते - कारण इथले लोक अजिबात कष्ट करू इच्छित नाहीत - आज फक्त इथले ब्राह्मणाच अफाट कष्ट करून आपले स्थान भक्कम करत आहेत - कारण त्यांना या आरक्षणामुळे खरी जाग आली आहे - आरक्षण हे माणसाला दुबळे करते -
    जाती आणि पोटजाती यामुळे आपण म्हणता तसे राजस्थानात सुद्धा भेद आहेतच , पण बाहेर पडले की सगळे एक होतात , तसेच ब्राह्मण लोक आज परदेशात जात आहेत - त्याना पण एक फोउनच रहावे हा विचार कळला आहे - त्यामुळे आज सर्वदूर मराठी ब्राह्मण समाज एक होत आहे
    आरक्षणाने फार मोठे उपकार मराठी ब्राह्मणांवर केले आहेत असेच म्हणावेसे वाटते -
    शैव आणि वैदिक हा मुद्दा अडगळीतला आहे आणि अशा व्यासपीठावर हा मुद्दा हास्यास्पद ठरतो हे पण संजय सोनावणींच्या लक्षात येत नाही - त्यांचे तुणतुणे चालूच असते - -
    दिनेश शर्माजी , आपसे बार बार नियमिततासे आपके विचार पढनेकी हम उम्मीद रखते है

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिय बंधु,
      मुझे राजस्थानी समाज की श्रेष्ठता नहीं बतानी है ना ही मैं महाराष्ट्रिय समाज को कम आँक रहा हूँ. जिस समाज के पास संत ज्ञानेश्वर, शिवाजी और आंबेडकर जैसो की विरासत हो वह दुनिया में सबसे आगे होना चाहिये था. दुर्भाग्य से यह नहीं हुआ. क्योंकि इनकी महानता हमे बड़ा नहीं बना रही बल्कि हमारी शूद्रता को ही बाहर ला रही है. उनके नाम लेने वाले अपने जीवन में सिर्फ चालाकियां करते है और मजा मारते है. आंबेडकर के बाद कोई भी दमदार आदमी यह समाज पैदा नहीं कर सका क्योंकि सभी उनकी पूजा में लग गए. शिवाजी के बाद वीरता यहाँ बाकी रही जिसके कारण भारतीय स्वाधीनता आंदोलन के सबसे ज्यादा सेनानी महाराष्ट्र ने दिए.
      कभी महाराष्ट्र और बंगाल जो सोचता था वही बाद में देश सोचता था. किंतु बंगाल को साम्यवादियों ने तबाह कर दिया और महाराष्ट्र को जातिवादी राजनीति ने. इसलिए आंबेडकर के राज्य में मायावती पैदा नहीं होती वह तो उसी रामकृष्ण की वैदिक भूमी में होती है जो बदलने को तैयार है और किसी की हांकने से हंकती नहीं है. किसी मोदी का जन्म शिवाजी की भूमी पर नहीं हो सका, वह उस स्वामीनारायण की धरती पर हुआ, जो सिर्फ और सिर्फ जोड़ना जानते थे.
      महाराष्ट्र के बारे में जो सबसे आश्चर्यजनक बात मुझे लगती है वह यही कि यहाँ समाज को तोड़नेवाले खुद को विचारक समझते है और जो जोड़ने वाले है उनको पिछड़ा और गंवार समझा जाता है. यहाँ के विश्वविद्यालय ऐसे कमजोर दिमाग के लोगों के आरामगाह है और सरकारी पैसा ना हो तों उनके दिमाग में शायद विचार भी कभी ना जन्मे.
      दिनेश शर्मा

      Delete
    2. दिन्या, बोलघेवड्या तुला महाराष्ट्रात राहायचे आहे की नाही?

      Delete
    3. अरे तू कोणाबद्दल बोलतो आहेस , तुझी जीभ झडत कशी नाही रे अभद्रा ? कुणी जन्माला घातला रे तुला ? भुईला भार !

      Delete
    4. @Anonymous September 11, 2014 at 8:50 AM

      Are murkha, abhadr ani bhuila bhaar tu, tuzi aai-baba, tuze purn khaandan, samajale ka?

      Delete
  4. आप्पा - अहो बाप्पा , होतात कुठे , गौरी गेल्या गणपती गेले , पावसाने थैमान मांडले आहे
    बाप्पा - अहो काय सांगू , आजारी होतो , नेहमीचच सर्दी ताप , पण पाउस मात्र छान पडला ,
    आप्पा - हे वाचाल का तुम्ही , कुणीतरी विचारतय कि संजय , तुम्ही आरक्षणाचे समर्थन करता का
    बाप्पा - यांना संजय माहीतच नाही वाटते ? कोकणात येउन याने लो टिळकांचा विसर पाडत भाषणाच्या व्यासपीठावर शिवाजी शाहू आंबेडकर फुले आणि अहिल्याबाई असे फोटो मांडले होते
    आप्पा - कोकण असो नाहीतर खानदेश हे जातीयवादीच म्हणायचे - यांचा धंदाच हा आहे की शैव वैदिक अशी हाकाटी करत ब्राह्मण द्वेष पेटवायचा - तरी स्वतःच म्हणत आहेत की ओबिसिना आरक्षणाचे फायदे घेता आले नाहीत -म्हणजेच घोड्याला आपण तळ्यापर्यंत नेऊ शकतो असेच ना -
    आप्पा - तो नारायण राणे तरी काय करत आहे ? त्याला वाटते आपण मराठा वर्गाला आरक्षण मिळवून बाजी मारली - पण उपयोग काय ?त्याची लोकप्रियता संपली आहे - अगदीच कचरा झाला आहे त्या राणेचा - बाप आणि २ मुले अगदी नाग आहेत - पक्के गुंड वाटतात !
    बाप्पा - कोकणातला सुपारी उदयग किती फोफावला आहे ते मी डोळ्यांनी पाहातो आहे
    त्याची प्रतवारी आणि आर्थिक गुंतवणूक सर्व काही कोकणस्थ ब्राह्मणांच्या हातात आहे आज कोकणातील वाड्या कोकणस्थ ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत नवे तंत्रज्ञान वापरून त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे , तसेच कोळी वर्गाने नवीन तंत्रज्ञान वापरून आपले उत्पादन प्रचंड वाढवले आहे - आज त्यांच्या घरात सोन्याचा धूर निघतो आहे हे त्यांच्या कष्टाचे यश आहे !व्यसनापाइ वय गेलेला वर्ग पण बराच आहे त्यांना आरक्षण असो नाहीतर सरकारी मदत असो - काहीही उपयोगाचे नाही - कष्टाला पर्याय नाही !

    ReplyDelete
  5. गुरव समाज हाच अवैदिक समाजाचा नैसर्गिक पुरोहित आहे हे ओबीसींच्या कार्यक्रमात सांगितलेले खटकण्याचे कारण नाही. वैदिक आमचे पुरोहित नव्हेत. कोणत्याही समाजाचे उत्थानासाठी जेवढी आर्थिक, ज्ञानात्मक आणि राजसत्तात्मक तत्वांची गरज असते तशीच धर्मात्मक बाबींचीही गरज असते. आम्हाला फसवून घ्यायचे नाही.

    ReplyDelete
  6. मजा येते ,सोनवणी यांची भाषणे पाहिली की प्र बा जोग यांची आठवण होते
    ते शनिवार वाड्यावर उभे रहात , तास दीड तास बोलत असत , आणि हळूहळू प्यांट काढत , कमरेचा पट्टा सैल करत , टाय उकडते म्हणून उतरवत असत , घड्याळ काढत असत - लोकाना हसून हसून मजा येत असे - ते बोलतात काय यापेक्षा संध्याकाळ मजेत गेली हाच पुणेकरांचा सारांश असायचा -
    सोनावणी यांच्या बाबतीत असेच होत असेल - लोक घड्याळ लावून बेटिंग घेत असतील - कितव्या मिनिटाला हा माणूस शैव आणि वैदिक अवैदिक हे शब्द उच्चारतो !- दहाव्या - विसाव्या - का तिसाव्या मिनिटाला ? यावर पैजा मारत असतील लोक - त्यांचे हसणारे चेहरे पाहिले की तसेच वाटते - संजय काही विनोदवीर नाही किंवा पु ल देशपांडे नाही - एक शून्य मी लिहिण्याची त्याची ताकद नाही -किंवा सभा जिंकण्याची पत नाही ! बिचारा स्वस्तातला वक्ता आहे - बोलायची हौस आहे , अभ्यासू असल्याचा त्याचा समाज आहे - चालू द्या , अधून मधून टाळ्या वाजवल्या की बाप्पू खुश ! रात्र नंतर रंगात आली की सगळेच खूष !- असा हा मामला आहे - कोकणी लोक भल्या भाल्याना आडवे करतात !

    ReplyDelete
  7. संजय महाराज , आपण प्रवचन - भाषण सुरु करण्यापूर्वी " मी देव मानत नाही त्यामुळे धर्मही मानत नाही " असे का सांगत नाही ?
    आपण भाषण सुरु करण्यापूर्वी शैव आणि अवैदिक वैदिक यावर बोलून मग मूळ विषयाला हात घालावा म्हणजे रसभंग होणार नाही
    कोकणातल्या लोकाना समजलेच नाही की काय चालले आहे ?
    कितीजण उठून गेले सैल करून आले , बिदिकाडी झाली तरी आपले पुराण चालूच , चंही मोकळी केली , तरी तुम्ही थांबतच नव्हता - इकडे येउन आम्हाला बोअर कशाला करता - आम्ही बरे आणि आमची कोकणातली वस्ती बरी - आमहे विषय वेगळे , आवडी वेगळे - उगी आपल छळायच !
    असा त्रास दिलात तर मग राणेंना सांगावे लागेल - कसे ?

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...