Wednesday, January 7, 2015

दहशतवाद- भीषण, निर्दयी, अमानवी.......


काल प्यरिसमद्ध्ये चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दहा पत्रकारांसहित १२ ठार तर २० जखमी झाले. अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. नववर्षाची सुरुवातही अमानवी रक्तपाताने व्हावी हे दुर्दैवी आहे. मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढले म्हणून मुस्लिम दहशतवाद्यांनी हे अमानवी कृत्य केले असे मानले जाते. हा विकृत मुर्खपणा आहे. पैगंबरांची चित्रे काढली गेली नाहीत असे एकही शतक नाही. मोझेस, येशूची व्यंगचित्रेही असंख्य वेळा काढली गेली आहेत. पैगंबरांची काढली तर एवढा गजहब का? हा तद्दन मुर्खपणा...विकृती आणि मेंदुच नसल्याचे लक्षण आहे. इस्लाम जर असा असेल तर हा धर्मच इस्लामियांनी स्वहस्ते अरबी समुद्रात एकदाचा दफन करुन टाकावा. अशा घटनांची चिंता/प्रतिकार उर्वरीत जग करेलच...गरज आहे मुस्लिमांनीच पुढाकार घ्यायची...आवाज उठवायची.

खाली माझा साहित्य चपराक मद्ध्ये या महिन्यात प्रसिद्ध झालेला लेख वाचा आणि आपण कोठे चाललो आहोत यावर क्षणमात्र का होईना विचार करा!
=============
दहशतवाद - भीषण, निर्दयी, अमानवी.

२०१४ वर्ष भिषण, निर्दय, अमानवी हे शब्दही शरमतील एवढ्या दहशतवादी हत्याकांडांनी हादरले. पेशावरमद्ध्ये तहरिके तालिबानच्या दहशतवाद्यांनी १३२ शालेय विद्यार्थांची बेछूट गोळ्या घालून हत्या केली. या हत्याकांडाने संपुर्ण जग हादरले. कासाविस झाले. भारतात काही गट या घतनेने खूश होतात न होतात तोच आसाममद्ध्ये बोडो अतिरेक्यांनी ६८ व्यक्तींची कत्तल केली. त्यातही स्त्रीया अधिक तर होत्याच पण सात वर्षाच्या कोवळ्या मुलीवरही गोळ्या झाडल्या गेल्या. याच दरम्यान आयसिसने याच दरम्यान आयसिसने जिहादींशी लग्नाला नकार देणा-या दिडशे स्त्रीयांना गोळ्या घालून ठार मारले. याच आयसिसने जिहाद सोडुन आपापल्या देशात/घरी  पळु पाहणा-या २०० तरुण जिहादींची हत्या केली. या सर्व घटनांमधील दुर्दैवी धागा एकच आहे, या सर्व प्रकारात मारणारेही एकाच धर्माचे होते आणि मारले गेलेलेही मारणा-यांच्याच धर्माचे होते. दहशतवाद शेवटी स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवतो असे म्हणतात ते खोटे नाही.

पण हे असे विकृत दहशतवादी गट का जन्माला येतात? त्यांच्यात ही निर्दयता कोण भरते? या सा-या हिंसाचारामागे कोणाचे स्वार्थ आहेत हे पाहू गेलो तर अजून विदारक चित्र स्पष्ट होते. मुस्लिम हा धर्मच दहशतवादी आहे अशी सर्वसामान्य मान्यता आहे. पण बोडो हे कोठे मुस्लिम आहेत? विकृतीला बाहेर पडायचा फक्त मार्ग हवा असतो.

आयसिस (इस्लामिक स्टेट्स ओफ इराक) ही संघटना सिरिया आणि इराकमद्ध्ये कार्यरत आहे. नांवातच संघटनेचे हेतू स्पष्ट आहेत. २००४ मधील अमेरिकेने इराकवर लादलेले युद्ध आणि सद्दाम हुसेनची जाहीर फाशी या घटनांचा प्रचंड प्रभाव यावर आहे. इराकवर अमेरिकेने पुर्वीही युद्धे लादली होतीच. इराक बेचिराख केला गेला. तरीही सद्दामला संपवता आले नाही म्हणून इराकमद्ध्ये जैव-रासायनिक अस्त्रे आहेत असा आरोप करत त्यावर युद्ध लादले गेले. विनाश केला गेला. पळून गेलेल्या सद्दामला एका  खंदकात पकडून तडकाफडकी फासावरही चढवण्यात आले. ज्यू-ख्रिस्ती विरुद्ध मुस्लिम हा संघर्ष हा पुरातन, म्हणजे इस्लामच्या स्थापनेपासूनचा आहे. आजही तो सुरुच आहे. प्रतिक्रिया म्हणून ज्या दहशतवादी संघटना वर आल्या त्यातीलच ही आयसिस. ही संघटना कृर आहे. पण जगभरातील मुसलमान या संघटनेला भावनिक आधार देतात, प्रचार-प्रसाराला मदत करतात. भारतातील अनेक मुस्लिम तरुण चक्क तिकडे जाऊन त्यांना सामीलही झाले होते हे वास्तव आपल्याला माहित आहे.

इस्लामवर टीका करतांना भुराजकीय दृष्ट्या त्यांचे किती शोषण झाले आहे हे पाहिले पाहिजे. इराण-इराक-कुवेत येथील तेलखाणी यावर अमेरिकेचा डोळा राहिलेला आहे. किंबहुना "तेलावर वर्चस्व त्याचे जगावर वर्चस्व!" ही जोर्ज बुश यांची उक्ती जगप्रसिद्धच आहे. आणि त्याच धोरणाने अमेरिकेने व युरोपियन राष्ट्रांनी इस्लामी राष्ट्रांत फुट पाडणे, त्यासाठी शिया-सुन्नी हा वाद पेटवत राहणे आणि तेलखाणींवर वर्चस्व मिळवणे यासाठी सर्व शक्ती, मुत्सद्देगिरी पणाला लावली आहे. सीआयएचा यातील रोल खूप मोठा आहे. २०११ मधील सिरियातील गृहयुद्ध त्याचाच परिपाक मानला जातो. पण त्यातून ही संघटणा प्रबळ झाली व जगभरातुन मुस्लिम अतिरेक्यांची भरती सुरु केली. सिरिया व इराकमद्ध्ये दहशतवादी अड्ड्यांचे नेटवर्क उभारले जाऊ लागले. अर्थात यात कडवेपणा, कट्टरता या बाबींचा समावेश होणे हे अपरिहार्य होते.

मुस्लिम लोकशाहीला अनुकुल नसतात याचे खरे कारण विनोदी आहे. लोकशाही ही युरोपिय, म्हणजेच ख्रिस्ती राष्ट्रांची देणगी असल्याने मुस्लिमांना ती इस्लामविरोधी वाटते. त्यामुळेच शरियाचा आग्रह मुस्लिम राष्ट्रांत धरला जातो...इतके हे हाडवैर पुरातन आहे. खलिफातची स्थापना हे नेहमीच दहशतवादी गटांचे उद्दिष्ट त्यामुळेच राहिले आहे. यातुनच अबु बक्र बगदादीची खलिफा म्हणून नियुक्ती केली गेली आहे व जगभरच्या मुस्लिमांचे एकच एक राज्य व्हावे असे या संघटनेचे ध्येय आहे याची नोंद भारतीय वाचकांनी घेतली पाहिजे. असो.

या संघटनेने केलेल्या दहशतवादी कृत्यांची वाचकांना वृत्तपत्रांतुन माहिती मिळतच् असल्याने त्या खोलात न जाता, सध्या या संघटनेचा विरोधाच्या आगडोंबामुळे पाया डळमळू लागला आहे. अनेक जिहादी तरुण पळत आहेत अथवा त्या प्रयत्नांत आहेत. जिहादींशी लग्न करायला मुस्लिम स्त्रीया नकार देत आहेत आणि त्याच नैराश्यातुन स्त्रीयांनाच ठार मारले गेले आहे. लहान मुलांच्या हाती बंदुका दिल्या गेलेल्या आहेत. हा संघर्ष अजून खुप मोठा रक्तपात होऊनच संपेल व नव्या संघर्षाची बीजे रोवेल असे स्पष्ट दिसते.

पाकिस्तान

 दहशतवादाचे पाठिराखे असेलेले पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्य यांच्या आयुष्यातील काळाकुट्ट दिवसही उगवुन गेला. थरिके तालिबानच्या सहा आत्मघातकी दहशतवाद्यांनी पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलमद्ध्ये घुसून शाळकरी पोरांना वेचून गोळ्या घालून मारले. १३२ पोरं मेली. इतरही काही ठार झाले. पाकिस्तानसह सारे जग सुन्न बधीर व्हावे व क्रौर्यालाही शरमेने मान खाली घालावे लागेल असले अधमतम कृत्य केले. एकीकडे दहशतवादाच्या या भिषण घटनेचा जगभर निषेध होत असता "बरे झाले, सापाची पिल्ले मेली..." अशा आशयाच्या प्रतिक्रियाही, अगदी भारतातुनही, उसळल्या.

तालिबानला अफगान-रशिया संघर्षाच्या वेळीस कोणी जन्म दिला, कसे प्रशिक्षण ते शस्त्रास्त्रे पुरवली हे जगाला माहित आहे. पाकिस्तानला अमेरिकेने नेहमीच आपल्या अंकित ठेवले आहे. युद्ध संपल्यावर तालिबानचा एक्दा जन्म घातलेला भस्मासूर आपल्यावरच उलटणार याची कल्पना केली नसेल काय? अमेरिकेचे हस्तक बनत असतांना आपण स्वविनाशही ओढवून घेत आहोत हे पाकिस्तानलाही समजले नसेल का? प्रश्न अर्थात निरर्थक आहेत कारण तालिबान अमेरिकेवर उलटली. न्युयार्कमधील ट्विन टोवर्स चक्क विमाने धडकवून कोसळवण्यात आले. पाकिस्तानमधील पेच अजून वाढला. अमेरिकेने आपल्याच अपत्याविरुद्ध युद्ध छेडले आणि भुमी वापरली पाकिस्तानची.

पाकिस्तानी सैन्यालाही या "दहशतवादाविरुद्धच्या लड्यात उतरावेच लागले. पाकिस्तानात शिया-सुन्नी संघर्ष पेटला आणि मशिदीही स्फोटांत उडवल्या जावू लागल्या. बलोची-पख्तुन खरे तर स्वातंत्र्यप्रेमी नागरिक. त्यांना स्वतंत्र राष्ट्र हवे ही जुनी मागणी. तालिबान्यांच्या तळांवर पाकिस्तानी सैन्याने हल्ले करतांना स्त्रीया व मुलांनाही ठार मारले याचा राग त्यांच्या मनात होता. सुडातून सुड जन्म घेतो आणि त्यातुनच तालिबान्यांनी कच्च्या-बच्च्यांची निघृण हत्या केली.

आता पाकिस्तान दहशतवाद्यांना फासावर चढवने, अतिरेक्यांविरुद्ध कारवाई तीव्र करणे हे उद्योग करत आहे, पण त्यातून शांती येणार आहे काय या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच आहे.

बोडोल्यंड

.फुटीरतावादी बोडो अतिरेक्यांनी ६८ आदिवासींचे निघृण हत्याकांड घडवले, स्त्रीया-मुलेच त्या हत्याकांडातील सर्वाधिक बळी ठरले. निरपराधांच्या रक्ताचे टिळे आपल्याही भुमीला लागले. शेजारच्या देशातील हत्याकांडांवर खुष होणा-यांनी याची अधिक गांभिर्याने दखल घेतली पाहिजे.

बोडोल्यंडला स्वायत्त करा या मागणीपासून सुरु झालेला हा प्रवास बोडोल्यंडला स्वतंत्र देशाचे अस्तित्व द्या या मागणीपर्यंत पोहोचला. या संघर्षाने रक्तरंजीत रुप घेतले. आसाम-भुतान सीमेवर बोडो (एन.डी.एफ़ बी.) अतिरेक्यांचे अड्डे आहेत. भुतानी सैन्याने अनेकदा ते अड्डे उध्वस्त करायचा प्रयत्न केला असला तरी त्यात यश आले नाही. १९९२ पासून आजवर या अतिरेक्यांनी हजारो आदिवासी, निमलष्करी जवानांची हत्या केली आहे. महत्वाचे म्हणजे बोडो हेही आदिवासीच आहेत. जवळपास ९०% बोडो हे हिंदू आहेत तर ख्रिश्चन ९.४०% आहेत. बाकी बोडो आपला आदिम आदिवासी धर्म पाळतात. या फुटीरतावाद्यांना चीनचा सक्रीय पाठिंबा आहे हे कधीच लपून राहिले नाही. उत्तर-पुर्वबाबत असंवेदनशील असलेल्या भारतीयांना तेथील घटनांशी विशेष देणे-घेणे नसते. उदा. २६/११ झाल्यावर काही दिवसांतर ग्वहत्ती येथे स्फोटांत ५० नागरिक ठार झाले होते, पण माध्यमांनी त्याची यत्किंचितही दखल घेतली नव्हती. सरासरी प्रत्येक महिन्यात आजवर छोटी-मोठी हत्याकांडे होत आली आहेत. "न्यशनल डेमोक्रटिक फ्रंट ओफ बोडोल्यंड" ही संघटना भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेली आहे, पण त्याचा विशेष उपयोग झालेला नाही. तेथे आदिवासी कोब्रा फोर्स ही प्रतिदहशतवादी संघटनाही आहे व या दोघांतही अनेकदा संघर्ष झालेला आहे.

आसाममद्धे संथाल, उराऊं आणि आणि मुंडा या आदिवासी जमाती प्रमूख असून हे चहामळ्यांवर काम करण्यासाठी ब्रिटिशकाळात आजुबाजुच्या राज्यांतून आले व तेथेच स्थायिक झाले. यांना बोडो क्षेत्रांतून हुसकावने हे त्यांचे उद्दिष्ट आहे. स्थलांतरीत बांगलादेशी मुस्लिमही त्यांच्या कारवायांना बळी पडले आहेत. एन.डी.एफ़ बी. ही संघटना ख्रिस्ती प्रभावाखालील असल्याचे मानले जाते. त्याला तोंड द्यायला हिंदु आधिक्य असलेली बोडो लिबरेशन टायगर्स फोर्स ही फुटीरतावादी दहशतवादी संघटना निघाली होती, पण २००३ मद्ध्ये या संघटनेने शरणागती पत्करली.

बोडोल्यंडमधील संघर्षालाही धार्मिक परिमान आहेच! हिंदू आणि ख्रिस्ती हे ते परिमान. ख्रिस्ती दहशतवाद्यांना जगभरातील चर्चेस कडून पैसे मिळतात तर चीनकडून शस्त्रास्त्रे. पुर्वोत्तर भागावर चीनचा डोळा आहे हे कधीही लपून राहिलेले नाही. भारतातील माओवादी दहशतवादी हे चीनचेच अपत्य. बांगलादेशी मुसलमानांचा द्वेष करणारे हिंदुत्ववादीही या हिंसाचाराचे समर्थक आहेत हे विशेष. हिंदुत्ववादी नेता त्या भागात येऊन भाषण ठोकून गेला कि पाठोपाठ हिंसाचाराच्या घटना घडतात हे तेथे राहुन आलेल्या मित्रांनी सांगितले आहे.

मुळात बोडो असोत वा अन्य आदिवासी समूह, त्यांना आम्ही राष्ट्रीय प्रवाहात भावनिकदृष्ट्या सहभागी करुन घेण्यासाठी काय केले हा खरा प्रश्न आहे. यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे उर्वरीत भारतीय आणि उत्तरपुर्व यात एक राष्ट्र म्हणून भावनिक, सांस्कृतिक धागा जोडण्यात आम्हा नागरिकांना अपयश आले आहे. २००२ मद्ध्ये माझी अरुणाचल प्रदेशच्या एका मंत्र्यांशी दिल्लीत भेट झाली होती. त्यांनी तेथील नागरिक भारताला आपले मानत नाहीत ही खंत व्यक्त केली होती. पर्यटनांसाटही आम्हाला जग दिसते पण आम्ही तिकडे सहसा फिरकत नाही. तेथील पुण्या-मुंबईत शिकायला येणा-या विद्यार्थ्यांना "चिंकी" म्हणुन  हिणवले जाते. ट्र्यफिक पोलिस तर चक्क त्यांच्याकडे पासपोर्ट मागतात! हे चित्र खेदजनक आहे.

या भावनिक तुटलेपणातून व सांस्कृतिक अस्मितेतून स्वतंत्र राष्ट्राची मागणी होत असेल तर आपणही गांभिर्याने विचार करायला नको काय?

आपण वर तीन दहस्तवादांबद्दलची चर्चा केली. खरे तर या दहशतवादाचे भूत निर्माण करणारे अमेरिका व चीन. त्याची फळे भोगताहेत आपापसात लढणारे त्या त्या भुभागांतील रहिवासी. जागतिक शांततेबाबत, तसे व्यापक नवे तत्वज्ञान निर्माण करण्यात जागतिक तत्वज्ञ व विचारवंतांना घोर अपयश आले आहे हे उघड आहे. किंबहुना त्यात भरच घालण्याचे कार्य हे तत्वज्ञ करतात. वर्चस्वतावादी भुमिकेतुनच दहशतवादी लोकांना लढत ठेवायचे कार्य ते करतात. मग अंगलट येवू लागले की त्यांची कोंडी करायचा प्रयत्न करतात. शस्त्राशिवाय कोणतीही भाषा न शिकलेले भ्रमिष्ठ होत नैराश्यातुन आपलीच माणसे, स्त्रीया-मुले यांची कत्तल करत सुटतात. साळसुद लोक धर्मावर बोट ठेवून मोकळे होतात. पण भुराजकीय तिढे समजाऊन घेतले तर लक्षात येईल कि अरबी राष्ट्रांत कोणताही धर्म असता तरी हे घडणे अपरिहार्य असेच होते. हा अस्तित्वाचा प्रश्न असतो...धर्म फार फार तर एक हत्यार बनतो...मग तो कोणताही असो. म्यानमारमद्ध्ये बौद्ध अतिरेकी रोहिंग्या समाजाविरुद्ध हत्याकांडे करत असतात, पण आम्ही तिकडील बातम्या कधी पाहत नाही. त्या दृष्टीने पाहिले तर दहशतवादी नाही असा एकही समाज नाही.

आपल्या मानवी जगाला एकंदरीत जगाबद्दलच नव्याने विचार करायची गरज आहे!

5 comments:

  1. जगातील पहिला दहशतवादी हल्ला ज्यू लोकांच्या नावे असला तरी मुस्लीमांचा आतंकवाद हा सगळ्यांचा कळस आहे. स्वतंत्र भारताचा पहिला अतिरेकी हा नथुराम गोडसे पुणेरी ब्राह्मण होता. तो "राष्ट्रीय स्वयंसेवी संघ" या ज्वलंत हिंदुत्ववादी संघटनेचा सदस्य होता. हिंदू व ख्रीश्चनांच्या नावेही आतंकवादी हल्ले असले तरी ते हल्ले प्रतिकात्मक होते, पण मुस्लीमांचं तसं नाहीये. ज्यू व हिंदू हे जरी कट्टर व कठोर असले तरी ते संवादासाठी सदैव तयार असतात. बदल स्विकारण्याची त्यांची वृत्ती तर असतेच पण त्याच बरोबर एका विशिष्ठ पातळी पर्यंत ते सहिष्णूही आहेतच. हे सगळे पर्याय बंद झाल्यावर त्यांच्यातील हिंसा बाहेर पडली याची इतिहासात नोंद आहे. पण धर्मांध मुस्लीमांच मात्र उलट आहे. सहिष्णू तर सोडाच पण त्याना संवाद सुद्धा वर्ज्य आहे. ते जरी आधुनिक जगात जगत असले तरी विचारानी मात्र आजही रानटी व हिंस्त्र टोळीखोरच आहेत. जिथे मुस्लीम आहे तिथे हिंसा आहे. हा समाज जिथे जिथे गेला तिथे घाण केली. अगदी घरात घाण, त्यांच्या वस्तीत घाण, त्यांचं राहणीमान घाणेरडं ईथ पासून त्यांच्या विचारातही घाण आहे. एवढच नाही तर हा हिंस्र समाज ज्या देशात राहतो त्याच देशाशी गद्दारीही करतो. हे राहतात भारतात अन यांची निष्ठा पाकिस्तानाशी. अमेरीकेत जाऊन स्थायीक होतात पण बांधील असतात अरब देशाना. फ्रान्समधे अनेक पिढ्यांपासून राहतात खरे पण मागणी काय तर आम्हाला बुरखा घालू द्या.. हे असले देशद्रोही प्रकार जगभर सर्वत्र चालू आहेत.

    ReplyDelete
  2. दक्षिण पूर्वी देशात जिथे मुस्लिम लोकसंख्या वाढली तिथे शांतीप्रिय बौद्ध लोकांविरुध्ह दंगे आणि बंड केले. म्यानमार रोहिंग्या, फिलिपिन मोरो, थायलंड मलय पत्तानी, इंडोनेशिया जेमा इस्लामिया, कंबोडिया चाम विद्रोही मुस्लिम आहेत. मलेशिया ८५% मुस्लिम बहुल आहे, तिथे अनेक तमिळ हिन्दु मंदिरे पाडली गेली तसेच त्यांनाही इस्लामी कायदा थोपण्याचा प्रयत्न केला गेला.जगात सर्वत्र मुस्लिम दंगे करतात. रशियातील दागेस्तान, चेचेन्या, चीन मधील झीझीयांग, फ्रांसमध्ये अल्जेरियनबहुल प्यारीसची उपनगरे, इंग्लंडमधील म्यान्चेस्तर, बर्मिंघम, सारखे बांगलादेशी, पाकिस्तानीबहुल शहरे, अगदी स्पेन, हॉलंड या देशांनाही हा मुस्लिम त्रास जाणवत आहे. आफ्रिकेत नायजेरिया, चाड, माली, सुदान येथे जीहादिंचा नंगा नाच चालू आहे. पूर्वेकडे म्यानमार, फिलिपिन्स, थायलंड, इंडोनेशिया येथेही मुस्लिम बंडखोर आणि कट्टरवादी खून पाडत आहेत. बाकी इस्लामबहुल पाकिस्तान, सिरीया, बांगलादेश, अफगाण, इराक येथे आनंदच आहे. इस्लाम आणि शांतता हे विरोधी शब्द आहेत.

    ReplyDelete
  3. "म्यानमारमद्ध्ये बौद्ध अतिरेकी रोहिंग्या समाजाविरुद्ध हत्याकांडे करत असतात, पण आम्ही तिकडील बातम्या कधी पाहत नाही".

    वा रे वा संजय "उलटा चोर कोतवाल को डाटे".

    ReplyDelete
  4. हिंदू दहशतवादाचे समूळ उच्चाटन कधी होणार?
    स्वातंत्र्योत्तर भारतात तीन अत्यंत महत्वपूर्ण अशा राष्ट्रीय नेत्यांच्या हत्या घडल्या.
    १. महात्मा गांधी २. इंदिरा गांधी ३. राजीव गांधी

    इंदिरा गांधींची हत्या १९८४मधे शीख समाजातील दहशतवादी संघटनेकडून झाली. स्वतंत्र खलीस्तानच्या आंदोलनातून शीख समाजामध्ये काही दहशतवादी संघटना उदयास आल्या होत्या. ऑपरेशन ब्लू-स्टार च्या निमित्ताने भारतीय सैन्याने केलेल्या सशस्त्र कारवाई च्या प्रतिक्रिया स्वरूप इंदिरा गांधींची हत्या केली गेली. परिणाम असा झाला कि पुढील २-४ वर्षात खलिस्तानची मागणी आणि शीख दहशतवाद दोन्हीचे उच्चाटन झाल्याचे दिसून येते.

    राजीव गांधींची हत्या तमिळ अतिरेकी संघटनेकडून १९९१ मध्ये करण्यात आली. स्वतंत्र तमिळ राष्ट्राच्या मागणीसाठी श्रीलंकेत सशस्त्र आंदोलन करणाऱ्या ह्या संघटनेला राजीव गांधीच्या श्रीलंकेत शांतीसेना पाठविण्याचा निर्णय खटकला होता. पुढील काही वर्षात श्रीलंकेतून तमिळ अतिरेकी आणि LTTE चे उच्चाटन झाल्याचे दिसून येते.

    महात्मा गांधींची हत्या देखील १९४८ साली अशाच एका दहशतवादी घटनेतून झाली. गांधीहत्या हि स्वतंत्र भारतातील पहिली दहशतवादी घटना. अखंड हिंदुस्तान, हिंदू राष्ट्रवाद, मुस्लिमविरोधी कट्टरता वाद इ. हिंस्त्र विचारसरणिवर आधारित हिंदू दहशतवादी संघटनांकडून महात्मा गांधी ची हत्या घडवून आणली गेली.

    गांधी हत्येमधील आरोपी नथुराम गोडसे ह्याला फाशी झाली परंतु वीर सावरकर पुराव्या अभावी सुटले. ह्या हत्येमागे सावरकरांचा ब्रेन असल्याचा संशय होता. त्यांची हिंदू महासभा हि नामधारी हिंदुत्ववादी संघटना नंतर नामशेष झाली. रा.स्व.संघालाहि दहशतवादी संघटना घोषित करून त्याच्यावर बंदी देखील घातली होती. नंतर ती उठवली गेली. आजचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप (पुर्वश्रमीचा जनसंघ) हा देखील ह्या संघाचीच निर्मिती आहे. रथयात्रा, राम मंदिर, बाबरी विध्वंस, गुजरात दंगली, बॉम्बस्फोट आणि आता मोदी इ. मार्गाने त्यांचा छुपा हिंदू दहशतवाद सातत्याने आजही कार्यरत आहे. बजरंगदल, सनातन इ. धर्मांध पिलावळी आजही कार्यरत आहेत.

    ह्या हिंदू दहशतवादाला धर्मनिरपेक्षता, लोकशाही, राज्यघटना, तिरंगा इ. भारतीय राष्ट्रवादाचे वावडे आहे. त्यांचा स्वत:चा सोयीस्कर असा हिंदू राष्ट्रवाद आहे. हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व असेही त्यांचे स्वयंघोषित राष्ट्रीयत्व आहे. जयतु हिंदू राष्ट्रम नावाचे तथाकथित ब्रीदवाक्यहि आहे. ह्या भगव्या दहशतवादाला धर्मनिरपेक्षता किंवा सेकुलर ह्या शब्दांचाही भयंकर तीटकारां आहे असेही दिसून येते.

    इंदिरा आणि राजीव हत्येच्या नंतर ज्या वेगाने शीख आणि तमिळ दहशतवाद नष्ट झाला ते पाहता गांधीहत्येनंतरहि हिंदू दहशतवादाचे मात्र अजूनही उच्चाटन झाल्याचे दिसत नाही. विविध मार्गांनी आणि विविध पातळ्यांवर हा दहशतवाद आजही डोके वर काढताना दिसतो. त्याचे समूळ उच्चाटन कधी होणार?

    ReplyDelete
  5. काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांकडून होणाऱ्या दबावामुळे..............

    ...म्हणून लेखकाने मरण ‘पत्करले’

    दक्षिण भारतील एका नामवंत लेखकाने आपण या पुढे लेखन करणार नसल्याचे जाहीर करत आपला मृत्यू झाल्याची पोस्ट टाकून सगळ्या वाचकांना धक्का दिला. काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांकडून होणाऱ्या दबावामुळे त्या लेखकाने अशी पोस्ट फेसबूकवर टाकल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असल्याची माहिती इंग्रजी वृत्तपत्रातून देण्यात आली आहे.

    लेखक पेरूमल मुरुगन यांचा मृत्यू झाला आहे. कारण ते काही देव नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा लिहिता येणार नाही. यानंतर पी. मुरुगन केवळ शिक्षक म्हणून जिवंत असतील, असे पेरूमल मुरुगन यांनी पोस्ट केले आहे. तसेच आपल्या चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादासाठी त्यांचे आभारही पेरुमल यांनी मानले असून पुस्तकं मला परत करा किंवा जाळून टाका असेही म्हटले आहे. तसेच आपली पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांना देखील पुस्तके बाजारातून परत मागण्याची आणि विक्री बंद करण्याची विनंती केली आहे.

    आपल्या निवेदनाच्या शेवटी पेरुमल यांनी जाती, धर्म आणि राजकीयपक्षांशी जोडलेल्या संघटनांना देखील आपल्या विरोधात सुरू असेलेले आंदोलन मागे घ्यावे असेही म्हटले आहे. सोमवारी रात्री अशी पोस्ट करण्यात आली आल्याचे वृत्तपत्रात म्हटले आहे.

    या आधी मुरुगन यांच्या २०१०मध्ये प्रकाशित झालेल्या 'माथोरुभागन' पुस्तकासंदर्भात विवाद झाला होता. कोंगू वेल्लाला गाउंडर समाजातील लोकांनी त्यांच्या पुस्तकाचा विरोध केला होता. या समाजातील लोकांचे म्हणणे होते की, पुस्तकातून महिलांचा अपमान करण्यात आला आहे आणि हिंदू धर्माला देखील हलके मानण्यात आले आहे.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...