Friday, May 8, 2015

धक्कादायक वास्तव !

माणुस हा अन्य प्राणीविश्वापेक्षा एक "विशेष" प्राणी आहे. त्याला बुद्धी आहे. कृत्रीमरित्या उपलब्ध नैसर्गिक साधनांना स्वसुखासाठी वापरायची, नवनवे शोधायची उपजत कला त्याच्यात आहे. त्याच्यात मिथके बनवायचीही तेवढीच कला प्रबळ असल्याने अनेकदा ती कला त्याच्या बुद्धीवादावर मात करते. स्वसमुह/जाती/धर्म/राष्ट्र हेच त्याच्या जगण्याचे केंद्रबिंदू बनत गेल्याने आपापले समुह व तिची संस्कृती पुरातन व श्रेष्ठ कशी हे ठरवण्याची व ते सिद्ध करण्याची त्याची कला पुराणकाळातच नव्हे तर आजही जीवित आहे. आपापला समुह श्रेष्ठ ठरवायचा म्हणजे अन्य समुहांना दुय्यम स्थान आपसुक दिले जाते. हा प्रकार आजचा नाही. सर्व पुरातन साहित्यातील मित्थके आपण पाहिली तर याचा प्रत्यय येईल. आधुनिक काळात तरी ही प्रवृत्ती कमी होईल असा होरा होता, परंतू दुर्दैवाने तसे झालेले दिसत नाही.

आपल्या पाळामुळांबाबत प्रत्येक समुह उत्सुक असतो. आपण कोण, कोठुन कशासाठी आलो आणि जगण्याचे प्रयोजन काय हे प्रश्न तत्वज्ञानात चर्चिले जातात. पण माणुस तेथेच थांबत नाही. भौतिक दृष्ट्याही आपले मुळ स्थान काय आणि आपण कसे पसरलो यावरही तो विचार करतो हे मात्र विशेष आहे. खरे तर याची सुरुवात युरोपियनांनी अठराव्या शतकात केली. एकोणिसाव्या शतकात या शोधाला सिद्धांताचे स्वरुप येऊ लागले आणि त्याची भिषण परिणती हिटलरच्या उदयात झाली. हे तत्वज्ञान व सिद्धांत म्हणजे आर्य वंश सिद्धांत होय. निळ्या डोळ्यांचे, सोनेरी केसांचे, उंच-धिप्पाड नि गोरेपान असे आर्य कोठल्यातरी मुलस्थानातुन रथांवर आरुढ होत सर्वत्र घोंघावत पसरले, अनेक प्रदेश पादाक्रांत केले, स्थानिक लोकांना जिंकले व त्यांच्यावर आपली भाषा व संस्कृती लादली असा हा सिद्धांत. यालाच आधी आर्य आक्रमण सिद्धांत म्हणयचे. भारतातही याच आर्य टोळ्यांनी आक्रमण करुन दास-दस्युंना गुलाम बनवले व त्यांच्यावर जातीव्यवस्था लादली असा हा सिद्धांत. टिळकांनी या सिद्धांताला नुसते स्विकारले नाही तर पुष्ट्यर्थ ’आर्क्टिक होम इन वेदाज" हा ग्रंथही सिद्द्ध केला. विष्णू शास्त्री चिपळुनकर तर ब्रिटिशांना जाहीरपणे "आमचे पुरातन आर्य रक्ताचे बांधव" म्हणू लागले. दक्षीणेतील प्रतिक्रिया स्वाभाविक तीव्र होती. विजेते आर्य विरुद्ध पराजित द्रविड अशी देशाचीच उभी वांशिक फाळणी झाली. भारतीय राजकारण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या आर्य सिद्धांताभोवतीच फिरु लागले. त्यातुनच मुलनिवासी विरुद्ध परकीय आर्यभट हाही संघर्ष उभा राहिला. भारतीय इतिहास, संशोधने, साहित्य या सर्वांवर या आर्य सिद्धांताची गडद छाया आजही पडलेली दिसते. बहुजनांमद्ध्ये मानसिक हीणगंड निर्माण करायची सोय या भारतातील आर्य सिद्धांतकारांनी लावली तर सध्या मुस्लिम-ज्यु असलेल्या सेमिटिक भाषागटाच्या लोकांना भाषिक/वांशिक/बौद्धिक क्षेत्रात न्युनाने पहायला लावायची सोय युरोपियन (नंतर अमेरिकाही) विद्वानांनी लावली. त्यचेही जागतिक पडसाद आपल्याला युरोपियन विरुद्ध मुस्लिम संघर्षात पडलेले दिसतील.

हिटलरने केलेल्या वंशसंहारानंतर युरोपिय जगाने भाषा बदलली. त्यांनी आर्य हा शब्द वंश या अर्थाने वापरायचे बंद केले तर "पुरा-इंडो-युरोपियन" भाषा बोलणा-यांचा समुह व त्याची आक्रमणे/निगर्मणे या स्वरुपात तोच सिद्धांत कायम ठेवला. भारतीय आर्यवाद्यांनाही आपण आता बाहेरचे आहोत हे सांगणे राजकीय दृष्ट्या गैरसोयीचे वाटू लागल्याने वैदिक आर्य भारतातलेच व ते येथुनच आशिया-युरोपात पसरले हे सांगायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर सिंधु संस्कृतीचे संस्थापक वैदिक आर्यच असे नु७सते दावे करुन ते थांबले नाही तर तो दावा पक्का करण्यासाठी घग्गर-हक्रा नदीला ऋग्वेदातील सरस्वती नदी ठरवायचा घाट घातला. आज इंटरनेटवर तुम्ही शोध घ्याल तर सर्वत्र घग्गरच्या ऐवजी सरस्वतीचे नांव दिलेले आढळेल. भारतीय पुरातत्व विभागानेही, भाजपा सरकार आल्यानंतर, डिसेंबर १४ मधील पुरातत्वीय अहवालांत सरस्वतीचेच नांव घग्गराइवजी वापरल्याचे दिसेल. थोडक्यात संस्कृती वर्चस्वाचा अट्टाहास वैदिकांनी सोडला नाही व युरोपियनांनीही हे उघड आहे. 

पण हे वास्तव आहे काय? संशोधकांनी सत्यांना व भौतिक/लिखित पुराव्यांना स्विकारायला हवे हा विद्वतमान्य संकेत आहे. हा शोध घेण्याची सुरुवात मी प्रथम २००७ मद्ध्ये केली. दोन्ही गट जे पुरावे वापरतात तेही तपासले आणि २०१४ पर्यंत झालेल्या आशिया खंडातील उत्खननांचे अहवालही अभ्यासले. त्यातुनच "Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation" हा ग्रंथ सिद्ध झाला. माझे निष्कर्श सांगण्यापुर्वी आधी आपण या आर्य सिद्धांताचा व सिंधु संस्कृतीवरील मालकीहक्काचा प्रवास कसा झाला हे पाहणे रोचक ठरेल.

सिंधु संस्कृती सापडण्यापुर्वी....

१. वसाहतवादी इंग्रजांना आणि राष्ट्रवादी जर्मनांना आपले वंशश्रेष्ठत्व प्रस्थापित करायचे होते आणि इतिहासही मागे न्यायचा होता.(युरोपचा इतिहास अन्य जागतिक संस्कृत्यांपेक्षा ब-यापैकी अर्वाचीन आहे, ग्रीसचा इतिहासही इसपु आठव्या शतकापार जात नाही. विल्यम जोन्सपासुन ख-या अर्थाने ही सुरुवात झाली. ऋग्वेदाचा, त्यातील भाषा व ल्यटीनादि युरोपियन भाषांतील काही वरकरणी साधर्म्य पुर्वीच त्यांच्या लक्षात आलेले होते. म्यक्समुल्लरने वेद व अवेस्ता यातील आर्य/ऐर्या/अरियाना वगरे समान वाटलेल्या शब्दांतून आर्य वंश सिद्धांत प्रथम मांडला. निळ्या डोळ्याचे, सोनेरी केसाचे, उंच धिप्पाड गोरे आर्य आणि त्यांचे धडाडत आक्रमनासाठी धावणारे रथ याची युरोपवर एवढी मोहिनी पडली कि आपण आशिया-युरोपला संस्कृती देणारे, आर्यभाषांचे निर्माते आहोत असे वाटू लागले. अर्थात म्यक्समुल्लरच्या लक्षात यातील वांशिक धोका लक्षात आल्यावर "आर्य वंश" ही संज्ञा मागे घेतली आणि आपल्याला आर्य भाषा बोलण-या लोकांचा भाषिक गट असे म्हणायचे होते असे त्याने स्पष्टही केले. पण जो काही परिणाम व्हायचा होता तो झालाच. पुर्ण युरोपात आर्याभिमानाची लाट उसळली. अमेरिकेतही १८९९ पासुनच आर्य वंश आणि गोरे याची मांडणी होऊ लागली. 

२. भारतीय लोकांनी, विशेषता: वैदिकांनी, स्वाभाविकपणे ते आक्रमक आर्य म्हणजे आपलेच पुर्वज असा ग्रह करून घेतला. कारण हा शब्द वेदांतुनच आला होता. या सिद्धांताने सत्ताधारी ब्रिटिश आणि वैदिक एकाच मुळाचे ठरत होते. ते ब्रिटिशांच्या पथ्यावरच पडणारे असल्याने त्यांनी या सिद्धांताला खतपाणीच घातले. पुढे टिळकांनी "आर्क्टिक होम इन वेदाज" लिहून वेदांचे निर्माते हे मुळचे उत्तर ध्रुवाजवळ राहणारे होते हे ऋग्वेदातील प्रमाणांवरुन सिद्धही करुन दाखवले. तत्पुर्वी महात्मा फुल्यांनी याच सिद्धांताचा आधार घेत विदेशी आक्रमक आर्य आणि येथील शुद्राति-शूद्र मुलनिवासी अशी मांडणी करत वैदिक व्यवस्थेवर हल्ले चढवले.

३. जर्मनांनी मात्र जर्मन हेच मुळचे आर्य आणि जर्मनी हेच त्यांचे मुळ स्थान असून त्यांच्याच पुरातन पुर्वजांच्या एका शाखेने वेद लिहिले असे दावे सुरु केले. आर्यांच्या मुळ स्थानाबाबत युरोपात अनेक ग्रंथ लिहिले गेले. भारतातही काही वेगळे झाले नाही. या सिद्धांताचा प्रभावच तेवढा होता. पण यामुळे देशात वांशिकदृष्ट्या दोन तट पडले. भारतातील लोकसंख्येची विभागणीही रिस्ली, हिरालाल वगैरे मानवशास्त्राच्या संशोधकांनी, रिस्ली वगैरेंनी, विविध वांशिक आधारांवर केली गेली. (दुर्दैव म्हणजे आपण आजही तेच संदर्भ वापरत असतो.)

सिंधू संस्कृती सापडल्यानंतर:

१. १९२० साली सिंधू संस्कृतीचे अवशेष उजेडात यायला लागले. एवढी प्रगत आणि भव्य संस्कृती येथे असू शकेल याची कल्पनाही त्यावेळीस केली गेलेली नव्हती. उलट आर्य येण्यापुर्वी येथे आदिवासी, अडाणी, भाषाही धड न बोलणारे लोक राहत होते असा समज होता. पण उत्खनित पुरावेच येथील लोक अत्यंत पुढारलेले होते असे सरळ दाखवत असल्याने ते नाकारताही येत नव्हते.

२. मग आक्रमक आर्यांनी सिंधू संस्कृती नष्ट केली व तेथील लोकांना हरवून दक्षीणेत हाकलले असा सिद्धांत पुढे आणला गेला. ऋग्वेदातील काही द्राविडी-सदृष्य शब्द यासाठी आधार म्हणून वापरले गेले. यामुळे द्राविडी लोकांचा वेगळा राष्ट्रवाद उफाळला. उत्तरेतील भाषा आणि तेथील लोक हे त्यांच्या द्वेषाचे कारण बनले. स्वतंत्र द्राविडीस्थान मागण्यापर्यंत मजल गेली. तेथील राजकारण द्राविड्सेंट्रीक बनले. आजही ते तसेच आहे.

३. बहूजनांना सिंधू संस्कृतीचा मात्र मोठाच भावनिक आधार मिळाला. सिंधू संस्कृतीचे निर्माते बहुजन आणि ती नष्ट करणारे आक्रमक आर्य वंशीय असा हा सामाजिक संघर्ष बदलला.

४. वैदिक जनांना आपण या भुमीत परके ठरण्याचा धोका लगेच लक्षातही आला. गोळवलकर गुरुजींनी तर "पुरातन काळी उत्तर धृव वाराणशीला होता" असे विधान करून आर्यही एतद्देशियच ठरवायचा प्रयत्न केला. पुढे डा, नि. र. व-हाडपांडे यांनी नवा ग्रंथ लिहून टिळकांचा सिद्धांत ऋग्वेदाच्याच आधारे रद्दबातल ठरवला व आर्यांचे मुळस्थान भारत आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

५. युरोपियन विद्वान आता "आर्य" हा वंश निदर्शक शब्द वापरायचे बंद झाले. पण त्यांनी इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत पुढे आणला. या सिद्धांतानुसार या इंडो-युरोपियन भाषाकुटुंबाचे पुर्वज पुरातन काळी कोणत्यातरी एकाच ठिकाणी राहत होते आणि त्यांच्या लाटा क्रमश: भारत, इराण, अनातोलिया, ग्रीस ते युरोप अशा पसरल्या असे सांगितले जावू लागले. बरे मूळ स्थान कोणते या वादाचा निकाल अजुनही लागलेला नाही. दक्षीण रशियातील अंड्रोनोवो, सिन्थास्टा संस्कृती ते अनातोलिया अशी वेगवेगळी मुलस्थाने आजही धडाडीने भांडली जात आहेत. विशेष म्हणजे सारेच विद्वान तेच ते पुरावे वापरत सोयिस्कर अर्थ काढत असतात.

६.  १९७० नंतर उपग्रहीय छायाचित्रांमुळे आजची घग्गर ही एके काळी खूप मोठी होती असे जाणवू लागले. मग ती म्हणजेच ऋग्वेदातील हरवलेली सरस्वती नदी होय असे दावे केले जावू लागले. या दाव्यांमागे खरे कारण होते ते हे कि या नदीच्या काठांवर हजारापेक्षा अधिक सिंधू संस्कृतीची स्थाने सापडली आहेत, ती पाकिस्तानातील एकुण संख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहेत. घग्गरला सरस्वती बनवले कि आपोआप त्या संस्कृतीवरही वैदिक मालकी सांगता येणार होती. स्वाभाविकच अनेक विद्वान हरवलेली सरस्वती सापडली असे दावे करू लागले. खरे तर सर आरेल स्टीन यांनी १९४० च्या आसपासच तसा दावा केला होता. पण त्यावेळी आक्रमक आर्यांच्या कैफात असले्ले आणि सिंधू संस्कृतीची प्रगल्भता न समजलेल्या वैदिकांच्या तेंव्हा लक्षात आले नाही. पण १९७० नंतर त्यांनी घग्गर म्हणजेच सरस्वती असे दावे सुरु केले. 

७. पण आता घग्गरच्या प्रत्यक्ष पात्रांत व उपनद्यांत जी भुशास्त्रीय आधुनिक तंत्रज्ञानांनी  जी परिक्षणे केली त्यावरून घग्गर ही कधीही मोठी बारमाही, ऋग्वेदात वर्णण केलेल्या सरस्वतीसारखी हिमालयातून - पहाडांतुन उसळ्या घेत, सर्व नद्यांपेक्षा मोठी नदी, "नदीतमे, अंबीतमे"  नव्हती. ती पावसाळ्यावर अवलंबून असलेली एक सामान्य नदी होती. सनपुर्व १७५० मद्ध्ये जलवायुमान बदलल्याने ती बारमाही वहायची थांबुन फक्त पावसाळ्यापुरतीच वाहणारी नदी बनली. नदीतील पाणीच कमी झाल्याने सिंधू संस्कृतीच्या लोकांनी आपल्या वसाहतपद्धती व पीकपद्धती बदलल्या. हे सर्व जागतीक पातळीच्या भु-पर्यावरण-शास्त्रज्ञांनी व पुरातत्वविदांनी मान्य केले आहे. त्यामुळे सरस्वती म्हणजे घग्गर हा दावा सर्वस्वी निराधार ठरलेला आहे.

८. पण मायकेल ड्यनिनो (नांवावर जावू नका, पाश्चात्य असला तरी हा वयाच्या सतराव्या वर्षापासून हिंदू आहे.) यांनी The Lost River: On The Trail of the Sarasvati हे पुस्तकही लिहिले. आर्य येथीलच हा सिद्धांत बळावला. यात अनेक सामील झाले. त्यात महत्वाचे नांव म्हणजे श्रीकांत तलागेरी. यांनी वैदिक आर्य (तेही फक्त भरत टोळीचे व त्यातीलही पुरु गटाचे) ऋग्वेदाचे निर्माते आहेत आणि ते कसे भारतातून (हरियानातून) क्रमाक्रमाने इराणमद्ध्ये गेले व तेथून पुढे युरोपात कसे आर्य भाषा व संस्कृती नेली याचे विवेचन सुरु केले. इराणी लोकही त्यांच्या दृष्टीने भारतीयच, अनू टोळीचे लोक असा त्यांचा दावा. डेव्हिड फ़्राउली (यांच्याही नांवावर जाऊ नका....हे पाशात्य असले तरी यांनीही धर्म बदलला असुन त्यांचे सध्याचे नांव पंडित वामदेव शास्त्री आहे) हेही या गटात सामील झाले. (किंवा केले गेले)

९. आता युरोपियन विद्वान कसे गप्प बसतील विशेषत: मायकेल विट्झेल या हार्वर्ड विद्यापीठाच्या भाषाविद असलेल्या प्राध्यापकाने तलागेरी यांच्या सिद्धांतावर हल्लाच चढवला. तलागेरीही मग काय गप्प बसतात? त्यांनी दुप्पट आवेशाने त्यांच्यावर हल्ला चढवला. विशाल आगरवाल, कल्याणरमन ई. भारतीय विद्वान त्यांच्या मदतीला आले. एवढेच नव्हे तर ग्रीक विद्वान कझानास हेही मदतीला धावले. अर्थात कझानास यांचा सिद्धांत तलागेरींसारखा नाही. त्यांचे मत असे कि आर्य हे सनपुर्व दीड नाही तर सनपुर्व तीन हजार वर्षांपुर्वी आले, ऋग्वेद हा सिंधू काळापुर्वीचा आहे आणि एवढ्या आधी आर्य भारतात आल्याने ते भारतीयच! या वादात अनेकदा सभ्यतेची मर्यादा ओलांडली गेलेली आहे. 

१०. आता सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्य ठरवायचे म्हटल्यावर ऋग्वेदाचा पुर्वी मान्य असलेला इसपू १५०० हा काळही मागे नेणे गरजेचे होते. रथ आणि घोडॆ तर आर्यांचे प्रिय. सिंधू संस्कतीत त्यांचे अवशेष दुर्मिळातिदुर्मीळ...जे अल्प आहेत तेही उत्तर-सिंधू काळातील. मग आयडियाची आयडिया अशी वापरली गेली कि मानवी प्रतिभा थक्क होईल.

११. आधी एस. आर. राव व बी बी लालांसारखे अर्किओलोजिस्टस सिंधू संस्कृतीला घोडे माहित होते, आ-यांची रथचक्रे माहित होती असा दावा करत होते. आता नवे विद्वान (उदा. विशाल आगरवाल, कल्याणरमण ई.) उलटा दावा करत आहेत. त्यांचे म्हणणे असे कि ऋग्वेदात कोठेही आ-यांच्या चाकांचा उल्लेख नाही. ते रथ होते कि साध्या गाड्या होत्या हेही स्पष्ट नाही. विट्झेल यांनी शतपथ ब्राह्मणात "श्याम-अयस" हा शब्द आला असल्याने, व हा शब्द लोखंडाचा वाचक असल्याने ते इसपू ५०० मद्ध्ये तयार झाले असावे असा दावा केला होता. गंमत म्हणजे आता "श्याम-अयस" चा अर्थ लोखंड होतच नाही, शतपथ ब्राह्मण  खूप आधी, म्हणजे लोहयुग येण्यापुर्वीच लिहिले गेले आहे असाही प्रतिदावा केला गेला.थोडक्यात ऋग्वेद हा सिंधु संस्कृतीपुर्व आहे असे सिद्ध करायला कोलांटउड्या मारल्या गेल्या.

११. काही युरोपियन विद्वान मात्र या वादंगाकडे इकडे दुर्लक्ष करत उत्खनने आणि त्यातून समोर येणारे पुरावे पाहता आपली मते सुधारतही होते. यात एडविन ब्रायंट, केनोयेर, शाफर, एर्दोसी यांसारखे विद्वान अग्रणी म्हणता येतील. भारतात गेल्या सनपुव सात हजार वर्षांपासून शेती, गृहरचना, खाद्य पद्धती ई. मद्धे सातत्यपुर्ण प्रवाह दिसून येतो असे त्यांनी उत्खनित पुराव्यांवरून सिद्ध केले. त्यामुळे काही इंडो-युरोपियन विद्वानांची पंचाईत झाली असली तरी ते मोठ्या प्रमाणावर इंडो-युरोपियनांचे भारतात आगमन झाले नसले तरी "झिरपण्याच्या सिंद्धांता"प्रमाणे (ट्रिकल डाऊन थियरी) सातत्याने आगमन होत राहिले असले पाहिजे व त्यातूनच आर्य भाषा भारतात (उत्तरेत) पसरल्या असाव्यात अशी मांडणी चालुच ठेवली.

१२. भारतीय विद्वान उत्खनित पुरावे लक्षात घेत उलट आपली  "भारतीय आर्य" थियरी रेटतच राहिले. अर्थात त्यांनी अनेक बाबींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले. भारतात जसे कोणते नवीन लोकांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले नाही तसेच ते भारताबाहेर भारतातून झाल्याचेही पुरावे नाहीत. जगभर मनुष्य जवळपास दहा हजार वर्षांपुर्वीच स्थायिक झाला होता याचे अनगिनत पुरावे आज उपलब्ध आहेत. त्यामुळे वैदिक लोक भारतातून अफगाणिस्तानच्या मार्गाने युरोपापर्यंत फोचले, ऋग्वेद हा हरप्पापुर्व आहे वगैरे दावे युरोपियन विद्वानांनी हास्यास्पद ठरवले.

१३. बरे, अवेस्ता आणि खुद्द ऋग्वेदातील भुगोल हा ब-यापैकी समान आहे हे तर उघडच आहे. भाषा, संस्कृती, धर्म, देवासूर संकल्पना यात कल्पनातीत साम्य तर आहेच पण दोन्ही धर्मांना आपापसातील व्यक्तीही माहित होत्या हेही स्पष्ट आहे. यामुळे तलागेरी असे म्हणतात कि भारतीय पुरु आर्य जेंव्हा विस्तारासाठी इराणमद्ध्ये आले त्यापुर्वीच भारतीय अनू टोळीचे लोक तेथे वसलेले होते. ऋग्वेद जेंव्हा निम्म्याहून अधिक रचला गेला होता तेंव्हा अवेस्ताची रचना सुरु झाली. म्हणजे ऋग्वेद हा अवेस्तापुर्वच आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ऋग्वेदाच्या मंडलांची कालानुक्रमणिका सर्वस्वी नव्याने बनवली आहे. यासाठी जिज्ञासुंनी त्यांची “Rigveda: A Historical Analysis” व “The Rigveda and The Avesta: The final Evidence” ही पुस्तके अवश्य वाचावित.

१४. तलागेरींचे विधान चुकीचे अशासाठी आहे कि भारतातून सनपुर्व सात हजार वर्षांपासून जसे नवे लोक आलेले नाहीत तसेच अन्य भागांत विस्थापित झाल्याचे त्या-त्या भागात (इराण-अफगाणिस्तान ई.) कसलेही भौतिक पुरावे नाहीत. व्यापारानिमित्त सिंधू संस्कृतीचे लोक अन्यत्र (मेसोपोटेमिया-इजिप्तपर्यंत) जात होते तसेच तिकडचेही व्यापारी इकडे येत होते. ब्यक्ट्रिया-मार्जियाना अर्किओलोजिकल कोम्प्लेक्स नांवाने ओळखल्या जाणा-या उत्तर-पुर्व इराण, उत्तर अफगाणिस्तान वगैरे भागातील उत्खननांत सापडलेली ही संस्कृती. हिचा काळ सनपुर्व २३०० ते सनपुर्व १७०० एवढा आहे. तिथे सिंधू लिपी असलेली पण त्या संस्कृतीची स्वतंत्र रचना असलेल्या मुद्रा जशा सापडल्यात तशाच सिंधू संस्कृतीच्याही सापडल्या आहेत. अर्थ एवढाच कि त्या दोन्ही संस्कृत्या व्यापारी (व सांस्कृतिकही) आदान-प्रदान होत होते. असे आदानप्रदान जगभरच्या सर्वच संस्कृत्यांत झाले आहे.भारतात वैदिक धर्म कसा आला याचे पुरावे शतपथ ब्राह्मणाने दिलेले आहेत. पण घग्गर म्हणजेच सरस्वती या आग्रहापोटी तिकडेही दुर्लक्ष केले जाते आहे.

१५. प्रत्यक्ष भौतिक पुराव्यांनी सिंधु संस्कृतीचा धर्म हा शिव-शक्तीप्रधान होता याचे मुबलक पुरावे उपलब्ध असतांनाही चुल्हाण व धातुंच्या भट्ट्यांना वैदिक यज्ञांचे अवशेष सिद्ध करायचा प्रयत्न करत सिंधू संस्कृती वैदिक आर्यांचीच असेही दावे केले जाऊ लागले. शिव हा अवैदिक होता व ऋग्वेद लिंगपुजेचा निषेध करतो दोन संस्कृती व धर्मकल्पनांत काडीइतकेही साम्य नाही. खरे तर सिंधु संस्कृती ही शैव संस्कृती होती असे सरळ विउधान करता येईल एवढे पुरावे आहेत, पण वैदिक विद्वान वैदिकतेच्याच कैफात असल्याने त्यांनी ते कदापि केले नाही.

आजवरची समस्या ही होती कि भारतीय हे युरोपियन व वैदिक विद्वानांच्याच मतांवर बव्हंशी अवलंबुन होते. या दोघांचाही वर्चस्वतावादी कावा त्यांच्य लक्षत येणे त्यामुळे शक्यही नव्हते. नवे सरकार आल्याने माध्यमांनीही वैदिक संशोधकांची मते हिरिरेने प्रसिद्ध करायला सुरुवात केली. घग्गर नदी म्हणजेच सरस्वती असा सर्वसामान्यांचा ग्रह होऊ लागला. यातुन आपल्या संस्कृतेचे अपहरण करायचा कट प्रत्यक्षात येतो आहे हे समजणे शक्यच नव्हते. सांस्कृतिक अपहरणे व त्यातुन बहुजनांचा न्युनगंड वाढवायचा प्रयत्न याबाबत प्रत्येकाला खेद वाटला पाहिजे.

यामुळेच मी "Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation"  हा ग्रंथ् लिहायला प्रेरित झालो. आर्य सिद्धांत अथवा पुरा-इंडो-युरोपियन" बोलणा-यांचा समुह व त्यांची निगर्मणे हा सिद्धांत मुळात खरा आहे काय यावर मी यात उहापोह केला असुन प्रत्यक्ष वास्तव धक्कादायक आहे. आपल्याला, अगदी युरोपियनांनाही, मिथकांतुन बाहेर काढ्णारे आहे. घग्गर सरस्वती आहे काय, ऋग्वेद-अवेस्ता यातील आंतरिक संबंध, ऋग्वेद कोठे लिहिला गेला, हा धर्म भारतात कसा आला, ते शुद्र म्हणजे नेमके काय व त्यांचा भारतीय संस्कृतीशी असलेला आंतरिक संबंध काय यावर मी यात उहापोह केला आहे. हे करतांना मी भाषाशास्त्रीय, उत्खनित, आनुवंशिकी, धर्मशास्त्रीय, मानवशास्त्रीय ते मानसशास्त्रीय शेकडो पुराव्यांचा वापर केला आहे. एकार्थाने हा पुर्तातन काळाकडे पाहणारा तिसरा, स्वतंत्र दृष्टीकोन आहे जो तटस्थतेने पुराव्यांच्या प्रकशातच मांडणी करतो. मिथके उध्वस्त करतो...निर्माण करत नाही. स्च्वच्छ नजरेतुन गतेतिहासाकडे पहायचा हा एक प्रयत्न आहे.

वर्चस्ववादी तत्वज्ञान व त्यासाठी पुरावेही मोड-तोड करत वापरणे हे या सुबुद्ध भारतात चालणार नाही याचाही हा एक इशारा आहे.

-संजय सोनवणी
(Published in Lokmudra)

( Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation
लेखक: संजय सोनवणी
प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन, 
३०३, वर्धमान हाईट्स, १३२८/२९ शुक्रवार पेठ, बाजीराव रस्ता, पुणे - ४११००२. मो. ९८९०९५६६९५
मुल्य- रु. ३२०/- मात्र.

9 comments:

  1. प्रिय सोनवणी,
    महाराष्ट्र के एकाध को छोड़कर कितने विचारक आर्य आक्रमण सिद्धांत के पक्ष में थे?
    क्या १९ वी सदी के ९९ प्रतिशत हिंदु चिंतक, नेता और धर्मगुरु इस सिद्धांत के विरोधी नहीं थे. फिर दक्षिण के द्रविड़ सिद्धांत का दोषी उत्तर के हिंदुओ को कैसे बताया जा सकता है. क्या आर्य आक्रमण सिद्धांत का मामला उठाकर उत्तर को हमलावार और दक्षिण को गुलाम बतानेवाले पेरियार रामास्वामी ब्रिटेन और ईसाई मिशनरीयों के हाथों में नहीं खेल रहें थे? मैंने पिछले लेख में आपको पूछा था कि महाराष्ट्र के एकाध को छोड़कर आपको समग्र भारत में कितने हिंदु नेता इस सिद्धांत के पक्ष में यूरोप के साथ खड़े दिखाई देते है? आपने पहले भी उत्तर नहीं दिया, इसलिए मैंने आपसे आशा छोड़ दी है. किंतु गोयबल्स के नियम से एक ही झूठ को हजार बार बोलने से किसका भला होने वाला है? आप कभी उन हिंदु या वैदिक नेताओं का नाम भी नहीं लेते जो युगों से इस बकवास से लड़ रहें है. आपके लेखन का सुर तो ऐसा है मानो देश के वैदिक हिंदु नेताओं में आर्य आक्रमण सिद्धांत को स्वीकारने की होड़ लगी है. किंतु क्या वास्तव में सत्य इसके उलट नहीं है?
    हर देश को अपने अतीत पर अभिमान करने का हक है, अपनी परंपराओं को बचाने का हक है. इसलिए अपने वाले नायक और विदेशी खलनायक बताने की परपंरा है. किंतु उनका यह अभिमान दूसरों को नष्ट करनेवाला नहीं होना चाहिए, हिंसक नहीं होना चाहिए.
    हमारी शानदार परंपराओं को और हमारे नायकों को कमजोर, औसत और नाकारा बता कर आप कौन सा उद्देश्य पूरा कर रहें है? सबसे बड़ी बात, एक तरफ तो आप समग्र मानवता की बातें करते हैं और यहाँ हिन्दुस्थान में जो एकता सदियों पहले हो चुकी है, उसे ही अमान्य करके, वैदिक और अवैदिक का संघर्ष छेड़ते रहते है. गणपति को सरस्वती से अलग करने की कोशिश करते है, रूद्र को शंकर से अलग बताते है, पूना के समस्त ब्राह्मणों को कट्टर, हिंसक और जातीयवादी रूप से गाँधी का हत्यारा बताने में कोई कसर बाकी नही रखते. आपकी अपनी स्केल ही जातीयवादी, परंपरावादी, अपने पराये और उंच नीच की भावना से ग्रसित है, किंतु आप मानवतावादी, अहिंसक और समन्वयवादी होने का दावा भी करते है.
    मेरे प्रिय, मुझे आपसे शिकायत नहीं, बस निराशा है. मैं आपको ठेस नहीं पहुँचना चाहता. अत: मेरे किसी भी शब्द से आपको बुरा लगे तो मैं सार्वजनिक रूप से पहले ही माफ़ी मांग लेता हूँ.
    आपका बंधु
    दिनेश शर्मा


    ReplyDelete
    Replies
    1. प्रियवर, आप वास्तव नहीं समझ रहे है यह आप की गलती है. ख्रिस्ती मिशनरियोंपर या मुसलमानोंपर अपने गलतिय थोपकर आप अपनी गलतिया कितने समय तक छिपा सकते हो? वैदिक लोगों ने भारत का बडा नुकसान किया है! उल्टे वोही मिशनरीयोंके सिद्धांतों के प्रथम और अंतिम समर्थक थे. अअज विरोधक बने है तो सिर्फ यहां के है यह दिखाने के लिये एव्वं दुनिया कि सारी सभ्यताऎ उनकी उपज है यह दिखाने के लिये. हम अब बेवकुफ नही रहे., किताब में मैने शांतिपुर्वक एवं प्रमाणों सहित वास्तव दिखाया है. कडवा लगे मगर सच तो आखिर होता ही है कडवा. मै इतने दिन आपकी प्रतिक्रियाओं का जबाब नहीं दिया क्योंकि संक्षिप्तता में इतनी लंबी बाते सबुतों के साथ नहीं लिखी जाती. किताब हो सके तो पढिये...फिर चर्चा कुछ मायने रखेगी.

      Delete
    2. दिनेशजी, आप कहते हो...."हमारी शानदार परंपराओं को और हमारे नायकों को कमजोर, औसत और नाकारा बता कर आप कौन सा उद्देश्य पूरा कर रहें है? सबसे बड़ी बात, एक तरफ तो आप समग्र मानवता की बातें करते हैं और यहाँ हिन्दुस्थान में जो एकता सदियों पहले हो चुकी है, उसे ही अमान्य करके, वैदिक और अवैदिक का संघर्ष छेड़ते रहते है. गणपति को सरस्वती से अलग करने की कोशिश करते है, रूद्र को शंकर से अलग बताते है, पूना के समस्त ब्राह्मणों को कट्टर, हिंसक और जातीयवादी रूप से गाँधी का हत्यारा बताने में कोई कसर बाकी नही रखते. आपकी अपनी स्केल ही जातीयवादी, परंपरावादी, अपने पराये और उंच नीच की भावना से ग्रसित है, किंतु आप मानवतावादी, अहिंसक और समन्वयवादी होने का दावा भी करते है."

      आप से इस झुठ् कि उम्मीद नहीं थी. मैने परंपराओं को नाकारा कभी भी बताया नहीं हैं. हिंदुस्तान में एकता है उअह आप का वहम है. आप का अजेंडा मुझे मालुम नही., मगत आप वस्तव को नजर अंदाज कर रहे प्रतीत होता है. गणपती और सरस्वती, रुद्र और शिव एक नहीं है यह ऐतिहासिक वास्तव है. वैदिक और अवैदिक अलग समाज घटक है यह तो आप को भ्जी पता है ऐसा सामाजिक एवं ध्गार्मिक वास्तव है. वेदोक्त वैदिकोम के लिये एवं पुराणोक्त अवैदिकों के लिये यह विभाजन सदियों से जीवित है. वैदिक धर्म अलग है. वह खुद को उव्व्ह समझता है तो बेशक समझे. मगर हिंदु धर्म जो कि सिंधु घाटी से लेकरे आज तक प्रवाहित है उस धर्म् से वैदिक धर्म का कोई संबंध नहीं है! समन्वय होने की आस रखते हैं वैदिक लोग तो सर्व प्रथम वैदिक धर्म एवं वेदों का गौरवगान तथा वेदोक्त संस्कारों का त्याग करे. शंकराचार्य सिर्फ वैदिक बने यह परंपरा समाप्त करे. मुंझे पता है, यह आप नहीं करेंण्गे. उपर समन्वय कि बात करेंगे....कैसे होगा समन्वय? इकतर्फा समन्वय कभी नहीं होता.

      Delete
    3. Sanjay, if you think that Vedik and Shaiv (i.e. your Hindu religion) are different then why are you bothered about who becomes shankaracharya? He belongs to different religion as per your opinion, right? Then who gives you any right to speak even one word about that religion? You follow your Shaiv religion and let them follow their vedik religion. But the fact is, you have this inferiority complex in your mind. and hence you keep on talking this useless topic, in which most of the Indian people are least interested.

      Delete
  2. आप्पा - दिनेश शर्मा यांचे खास कौतुक केले पाहिजे . उन्होने सभ्य शब्डोंका प्रयोग करके बहुत कुछ इन बिटवीन लाईन लिखा है
    बाप्पा - संजय सोनावनी हे लक्षात घेत नाहीत की आजचे अर्ध मागास आणि इतर मागास लोक शिक्षणासाठी जी जीवतोड परिश्रमांची पराकाष्ठा करतात आणि त्यातून जे मिळते त्यातून काय साधतात ?कोकणातून इथे आलेल्या टिळक आगरकर या लोकांनीही अत्यंत हलाखीत दिवस काढून शिक्षण संस्था उभारल्या , राष्ट्रीय शिक्षण हि संकल्पना रुजवली आणि असंतोषाचे राजकारण केले
    आप्पा - प्रत्येक काळाला त्या त्या वेळेची बंधने असतात - म्हणून चहा प्यायल्यावर टिळकांनी प्रायश्चित्त सुद्धा घेतले
    बाप्पा - संजय सोनावणी यांच्या लिखाणाचा साचा हाच मुळी विकृत बांधणीवर उभारलेला असतो
    त्याना गैर सोयीचे वाटते त्याला ते कधी उत्तर देत नाहीत
    आप्पा - हा अडेलतट्टूपणा त्याना कुठे घेऊन जात आहे ? आधी ते स्वतःलाच स्वघोषित इतिहास संशोधक म्हणवून घेतात त्यांच्या बोलण्यात प्रचारकी तहात जास्त आणि अभ्यासूपणा जवळ जवळ शून्य असतो हे त्यानाही माहित आहे , आजचा काल असा आहे की सवर्ण सोडून उर्वरीत समाजाला मार्ग्दर्षाकच नाही , त्यांची मने कोरी आहेत त्यावर काहीही लिहायला जागाच जागा आहे , आधी पवार घराण्याने ब्राह्मणद्वेष पोसला , आता मेटे , सदानंद मोरे , आपापली कल्पकता लढवत वेगळ्या प्रकारे ब्राह्मण वर्गाला बदनाम करत आहे
    बाप्पा - लिहिण्यासारखे बरेच आहे , पण गाढवापुढे वाचली गीता , अशी अवस्था आहे
    आप्पा - सोनावणी यांचे एकहाती वैदिक विचारांच्या बद्दलचे युद्ध केविलवाणे आहे
    बाप्पा - शर्मा जे विचारतात त्याला मुद्देसूद उत्तर देण्याची बौद्धिक तयारीही सोनावणी यांची नाही - एकी एकी एक हाच त्यांचा उद्योग आहे ,
    बाप्पा - म्हणूनच परवा कै राजवाडे यांचा पुतळा त्यांच्या भाषणाकडे केविलवाण्या नजरेने बघत होता त्याची त्याना जाणीवही नाही
    आप्पा - त्यांनी अजून १०० पुस्तके लिहिली तरी त्यात काही इसेन्स सुपीक असे काहीच नसल्याने त्याची गच्छंती भेल्वाल्यांकडेच होते ,
    बाप्पा - त्यांनी सांगितले तसे एखाद्या उरोपियान विद्यापीठात त्यांचे पुस्तक असेल , पण त्यात काही अर्थ नाही . अगदीच आचरत वृत्तीचा हा इसम आहे
    माननीय शर्मा ह्यांचे प्रश्न अस्खलित असतात आणि सोनावानींची वृत्ती पळ काढणारी असते
    सोनावणी गर्दी जमवून त्यात सामील होत स्वतःला विद्वान म्हणवून घेतात इतकेच काय ते खरे

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा - बाप्पा...तुमच्या नेहमीप्रमाणेच खवचट प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. राजा शिवछत्रपती आणि आक्षेप या लेखावर तुमची प्रतिक्रिया नाही हे बघुन नवल वाटले! आणि हो, कुणबिणींबद्दलचे तुमचे मत वाचायला नाही मिळाले. तेथे आमचे जुने मित्र दिनेशजीही फिरकलेले नाहीत. आता यावर मलाही खुप खवचट लिहिता येईल....पण जाऊ द्या! असते काहींची बंदिस्त प्रवृत्ती. खुष रहा!

      Delete
  3. आप्पा - बसा - या हो बाप्पा -!कधी नव्हे ते आपल्याशी संजय बोललाय , फार फार बरे वाटले , आपल्याला खवचट म्हणतोय , पण ठीक आहे , लहान मुलाचे बोबडे बोल पण गोड वाटतात , असे समजू या !
    बाप्पा - किती धडपड करत होता त्या दिवशी , प्रकाशन समारंभासाठी !बिचार्याची किती ओढाताण - घसा सुकला होता !
    आप्पा - सर्वात आधी आपण जे सांगायचं ठरवलं ते सांगू
    बाप्पा - जितके म्हणून इतिहास कारांचे फोटो आहेत त्यांची नावे साध्या डोळ्याना वाचतासुद्धा येत नाहीत ,त्यामुळे कोण कसे दिसत असे त्याचा काहीच अंदाज येत नाही
    आप्पा - जर संजयाने एकसारख्या नावाच्या ठळक पाट्या करून प्रत्येक फोटोखाली लावल्या तर फारच बरे होईल आणि फोटोपण जर नजरेच्या टप्प्यात आले तर उत्तमच इतका बिनडोकपणा फक्त इतिहासकाराच करू शकतात !
    बाप्पा - शहाजी शिवाजी आणि संभाजी ( तिन्ही महाराजांचा विजय असो ) यांच्या फोटोखाली जर इवल्याशा अक्षरात नाव लिहिले तर चालेल का ? किंवा तसे पाहिले तर सगळेच संत एकामागोमाग फ्रेम करून लावले आणि नावेच नाही टाकली तर ? सामान्य माणूस काय करणार ?

    आप्पा - आता मूळ विषयावर थोडे जमेल तसे - संजय म्हणतोय की तुम्ही पुरंधरे आणि कुणबिणी या विषयावर का नाही प्रतिक्रिया दिली ?
    बाप्पा - इतक्या प्रतिक्रिया आल्या आहेत आणि त्यासुद्धा इतक्या सुमार दर्जाच्या की आपण अविनाश पाटसकर म्हणतात तसे " गप्प बसा " केलेले बरे असे वाटू लागते .
    आप्पा - आपण इतकी वर्षे राजा शिव छत्रपती वाचत आहोत , त्यांची भाषणे ऐकत आहोत , त्यांच्या बरोबर गडावर गेलो आहोत , हा माणूस त्याची वाणी आणि लेखणी फक्त शिवाजीची भक्ती करण्यासाठी वापरतो आहे , आजचा जमाना व्यावसायिक बनला आहे त्यात पुरंधरे तग धरून आहेत , नव्हे शिखरावर आहेत !तेच अनेकांच्या डोळ्यात सलते आहे !
    बाप्पा - कोण काय बोलते आहे याकडे ते लक्ष देत नाहीत हे योग्यच आहे
    आप्पा - नरहर कुरुंदकर यांचे श्रीमान योगीचे प्रास्ताविक किती सुंदर आहे , शिवाजीचे मूल्यमापन करताना त्यांनी किती सुंदर शब्द वापरले आहेत
    इतकी वर्षे इतका वेळ ,श्रम खर्च करत एखादा माणूस फक्त एखाद्या उत्तुंग व्यक्तीचे वर्णन केवळ जाती विद्वेषामुळे , पाताळ यंत्री पणाने करत बसेल असे विधान करणे हे वेडगळ आणि विकृत वाटते
    बाप्पा - आपल्या प्रत्येकाच्या लहानपणापासून हा राजा आपले जीवन व्यापून टाकतो
    आप्पा - आणि अवघ्या ५०व्या वर्षी हे जग सोडून जातो म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येते
    जात पात याच्या पलीकडे जाउन घरोघरी पुजला जाणारा हा जाणता राजा होता आहे आणि राहील , त्यासाठी दीड दमडीच्या छावा किंवा तत्सम संघटनांच्या सर्टिफिकिटची गरज नाही
    बाप्पा - कोण कोणासाठी लढत होते हे त्या काळात अधोरेखित व्हायचे होते असा तो मध्य युगीन जमाना होता , मोरे घोरपडे असे जुने वतनदार तरी शिवाजीला कुठे जुमानत होते ?शिवाजीने जे स्फुल्लिंग जनतेत जागृत केले होते त्याची जाणच जर त्या कालच्या आणि आजकालच्या नेत्यांना नसेल तर ते आपली पोळी भाजून घेण्यासाठी कोणत्याही पानात विष कालवू शकतात हे ऐतिहासिक सत्य आहे
    आप्पा - संजयाने अत्यंत समतोलपणे बाबासाहेब पुरंधारे यांची बाजू अभ्यासून लिहिले आहे - ते अनेकांच्या पचनी पडणार नाही - कारण साधे आणि सरळ आहे जातीच्या राजकारणाने अनेक सामान्यांचा बळी घेतला आहे त्यांच्याच प्रतिक्रिया वाचताना मन विषण्ण होते .
    बाप्पा - संजयचे मनापासून अभिनंदन !

    ReplyDelete
  4. राजा शिव छत्रपती हे दोन भागात आलेले चरित्रवजा , लिखाण आमच्या समोर गेली
    अनेक वर्षे आहे , सन्माननीय ब मो पुरंधरे यांच्या पूर्वी अनेकांनी चरित्रवजा लिखाण केले आहे पण ओघवती भाषा आणि सुरेख चित्रांची जोड ,प्रसंग प्रभावीपणे जिवंत करून दाखवण्याची त्यांच्या लेखणी आणि वक्तृत्वाची ताकद अफाट आहे
    त्यातून त्याना काय साधायचे होते आणि ते साधले का ? हा प्रश्न आज पुढे येतो !
    पुरंधरे यांनी जेंव्हा सुरवात केली त्यावेळेस , इतक्या वर्षांनी असा भडका होईल असे कुणाला स्वप्नातही वाटले नसेल , पण जसजसे ,
    मराठा मराठेतर राजकारण फुलत गेले आणि त्याची खरी झळ मराठेतर शेतमजूर आणि ओबीसी याना बसू लागली . रोजगार हमी योजने सारख्या योजना राबवून खालच्या वर्गातील
    ग्रामीण अर्थ व्यवस्था स्थिर स्थावर होतानाच सहकारी कारखाने आणि श्रीमंत शेतकरी याना शेत मजुरांचा प्रश्न सतावू लागला , तेंव्हा त्या शोषितांच्या परिस्थितीला ब्राह्मण द्वेषाची झालर लावून काही वर्षे तगून नेली गेली पण नंतर खरा लढा हा मराठा आणि मराठेतर असाच आहे हे उमगल्यावर , राजकारण , ब्राह्मण द्वेष आणि मराठा असे होत गेले तसतसे ,
    मराठा समाजाला शिवाजी या राष्ट्र्नायकावर आपला हक्क दाखवणे गरजेचे वाटू लागले !आणि जणू हे थोर व्यक्तिमत्व त्यांची खाजगी जहागीर झाली !
    कारण आजवर ब्राह्मण , कायस्थ , सीकेपी यांनी सरसकट शिवाजीला आपला मानत त्याचे गोडवे गायले होते त्यातून सुरु झाले विद्वेषाचे राजकारण !
    फुले माळी समाजाचे , आंबेडकर पद दलितांचे , शाहू मराठा समाजाचे असे वर्गीकरण होत गेले आणि त्या विचाराने सर्वांचेच अवमुल्यन होत गेले
    तीच गोष्ट स्वामी समर्थ आणि गजानन महाराज आणि साई बाबा यांची झाली आहे
    कोणतीही अनधिकृत पावभाजी वडापाव किंवा छोटी टपरी हि या साधुसंतांच्या नावाने चालवली जाते , त्यांचा प्रकट दिन किंवा निर्वाण दिन भर रस्त्यात साजरे केले जाते , त्याला सार्वजनिक रूप देत एक सामाजिक कार्य केल्याचा दावा मांडत अनधिकृत कामे अधिकृत म्हणून रेटली जातात
    हे सगळे ओंगळ आहे - भयानक आहे आणि गलिच्छ आहे !
    तसे पाहिले तर पूर्वी हा असा विखारी विचार नसायचा , पण आज प्रत्येकाचे व्यापारीकरण झाले आहे ,
    शिवाजी प्रमाणेच , दुसरे दैवत पंढरपूरचा पांडुरंग , ह भ प बाबामहाराज सातारकर आणि अनेक कीर्तनकार या ना त्या रुपात अभंग कीर्तने या रूपाने आपली प्रवचने लोकांसमोर ठेवत आहेत , त्यांचा उद्देश काय असेल ? त्यात निखळ शुद्ध भक्तिभाव थोडाच असणार आहे ?
    प्रत्येक पूल रस्ते आणि बागा , तलाव यांना प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे नाव देण्याची जी एक फ्याशन सुरु झाली त्यामुळे अनेकवेळा विनोद आणि फजितीची वेळही आलेली दिसते
    सरसकट प्रत्येक विद्यापीठ आणि शाळा यांना थोर प्रभूतींचे नाव दिलेच पाहिजे का ?हा पण एक विचार करण्याचा मुद्दा आहे !
    खरा विकास म्हणजे काय ? खरी सार्वजनिक स्वच्छता म्हणजे काय खरे प्रबोधन म्हणजे काय ? हे बाजूलाच ठेवत कुणाला तरी कशाबद्दल तरी अस्वस्थ करत राहणे , आणि आजच्या त्या वर्गाच्या अपयशाला दुसराच वर्ग जबाबदार आहे असे तिसऱ्या वर्गाने म्हणत सभा जिंकणे हे सूत्र समाज विघातानाचे काम मात्र अस्सलपणे करत आहे , आता समाज एक होण्याची शक्यता दिवसे दिवस कमी होते आहे , हे सर्वात आधी ओळखले ते ब्राह्मण वर्गाने !त्यांनी त्यांची व्युह्राचानाच बदलली - या देशात काहीही चांगले करण्याची किंवा होण्याची शक्यता दुरावत गेल्याने त्यांनी परदेशागमन व्यवहार्य मानले , त्यात काय चुकले आज हाच ब्राह्मण वर्ग मानाने परदेशात त्यांच्या योजना सफल होण्यासाठी जिवाचे रान करत असताना दिसतो - हे कसे ?
    फालतू देवधर्म आणि अवडंबर यात गुंतून न राहता , हा समाज कितीतरी प्रगत झाला आहे !
    आजचे आपले पदाधिकारी कोण आहेत ? रस्ते , पाणी , त्यांची अवस्था , मुंबई शहराची परिस्थिती आणि शिवसेनेने केलेली लूट , तसेच काँग्रेस चा भ्रष्टाचार , त्यांच्या पावलावर पाउल टाकत आज बीजेपी जात आहे - सर्व एका माळेचे मणी आहेत , राजकारणातून समाज कारण कधीही साधत नाही ,प्रबोधन तर नाहीच नाही
    आपल्याकडे मुलाना खेळायला मैदाने नाहीत , एक मूळ एक कुटुंब , त्यामुळे नाती आटत चालली आहेत , मित्र नक्की नेमके चांगले भेटतील याची खात्री नाही , शाळेत शिक्षक आरक्षित त्यामुळे त्यांचे उच्चार दर्जाहीन , प्रत्येक वळणावर दर्जाशी तडजोड करत , हा भ्रष्ट समाज काय साधत आहे ?आणि अशा वेळी परत परत लोकांची जुने सांगाडे उकरून करमणूक होत असेल तर त्या समाजाला परमेश्वरही वाचवू शकणार नाही !
    शिवजयंती ला मिरवणूक काढून आपली रग जिरवणे , नवरात्र आणि गणपती या दिवशी आचरट अंग विक्षेप करत नाचणे म्हणजे सांस्कृतिक वारसा जपणे असा अर्थ होतो का ?
    जितेंद्र आव्हाड हा तर अत्यंत हिणकस प्रवृत्तींचा इसम आहे . त्याच्या बद्दल काही बोलणे म्हणजे त्याची दाखल घेतल्या सारखे होईल , तितकी त्याची लायकीही नाही !

    ReplyDelete
  5. संजयजी इतिहासाला नव्या दृष्टीकोनातून समाजापुढे आणले त्याबद्दल अभिनंदन , आजची पिढी ही फक्त शब्दावर अवलंबून रहाता , वैज्ञानिक संशोधन व पुरावे मागणारी आहे त्यामुळे सत्य तेच बाहेर येईल अशी आशा आहे ,
    मला फक्त एक प्रश्न पडला आहे की २६०० वर्षापूर्वीच्या भगवान बुद्धांनी आपल्या सिद्धांतामध्ये चार "आर्य" सत्य हा शब्द वापरला तसेच जो व्यक्ती विद्या व आचरणाने संपन्न आहे त्याला "आर्य" या विशेषणाने संबोधले , तरी कृपया भगवान बुद्धांनी वापरलेला आर्य शब्द व अलीकडील काळात वापरलेला आर्य शब्द यातील साम्य अथवा फरक याविषयी मार्गदर्शन करावे. धन्यवाद !

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...