Monday, June 8, 2015

"समरसता" श्री. पतंगे...एक समीक्षा (भाग २)

"सम" शब्दाबाबत विवाद नाही. त्यामुळे समतेच्या सिद्धांताशीही विवाद असण्याचे कारण नाही. समता आणि समरसता या वेगळ्या संकल्पना आहेत. स्वातंत्र्य आणि बंधुतेशिवाय समतेचे तत्व अस्तित्वात येत नाही कारण समतेला पृथक असे अस्तित्व सामाजिक परिप्रेक्षात नाही. समान अधिकार, हक्क, जबाबदा-या या समतेत जशा येतात तसेच जे विकलांग आहेत, शोषित आहेत त्यांना आधार देत सम पातळीवर आणनेही समतेच्या सिद्धांतात निहित आहे. नुसते "सम" समजणे, मानने त्यासाठी पुरेसे नाही तर समानतेला आणण्याचे अविरत प्रयत्न समतेच्या सिद्धांतात अभिप्रेत आहे. "ज्याला सारे आत्ममय झाले तो साम्यबुद्धीने सर्वांशी वागतो." हे बृहदारण्यकोपनिषदातील वचन श्री. पतंगे समरसतेच्या तत्वज्ञानाला बळ देण्यासाठी घेतात. समरसता हा अध्यात्मतील भाव असू शकतो. सर्वांकडे सम दटुष्टीने पाहणे आणि सर्वांना समान करण्यासाठी आणि समान मानण्यासाठी यत्न करणे यात फरक आहे. समरसता ही संकल्पना हिंदुंचे संगठन करण्यासाठी उपयुक्त नाही त्यी यामुळेच.

परंतू स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व पाश्चात्य विचारांत न घेता ही तिन्ही तत्वे आपल्या परंपरेतच आहेत असे श्री. पतंगे विवेकानंदांचा हवाला देत सांगतात. "आपल्या पुर्वजांनी धार्मिक विचारांवरील बंधने काढून टाकली होती. त्याबाबतीत पुर्ण स्वातंत्र्य दिले होते. पण  सामाजिक जीवन मात्र त्यांनी नाना प्रकारच्या कठोर नियमांनी करकचून बांधून् टाकले." असे विवेकानंद म्हणतात. (पृष्ठ १०२) हे विधान अर्धसत्य आहे. "आपले पुर्वज" म्हणजे नेमके कोण? त्यांनी कधी कोणती बंधने घात्तली आणि कोणती काढून घेतली? मला वाटते भारतीय सामाजिक/धार्मिक आणि राजकीय इतिहासाचे पुरेसे परिशिलन नसल्याने हे विधान आले आहे. पाश्चात्य संकल्पना ज्याला "स्वातंत्र्य" म्हणते ते स्वातंत्र्य भारतात कधीही अस्तित्वात नव्हते. धार्मिक अथवा राजकीय (स्वकीयांची सत्ता असली तरी) स्वातंत्र्य अस्तित्वात नव्हते. धार्मिक बंधनांपेक्षा राजकीय बंधने अधिक होती हे राजकीय इतिहासावरुनही दिसते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही याबाबत बरीच माहिती मिळेल. व्यक्तीचे राजकीय, आर्थिक, भावनिक स्वातंत्र्य ही कल्पना भारतात कधीही अस्तित्वात नव्हती हे सत्य मान्य करायला काय अडचण आहे? सर्वकाही आमच्याकडे पुरातन काळापासून होतेच हा अट्टाहास सामाजिक ऐक्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे.

समतेचे म्हणावे तर आध्यात्मिक पातळीवर समता/समरसता अनेकांनी सांगितली आहे. शैव (नाथपंथीय/लिंगायत आणि अन्य शैव सिद्धांत) सिद्धांत समतेबाबत बोलतच अले आहेत.आदी शंकराचार्यांना खरा अद्वैतवाद समजला तो शिवाच्याच रुपातुन अशी दंतकथाही आहे. पण हा अद्भूत असा अद्वैततावादही अध्यात्माच्याच पातळीवर घसरला, व्यावहारिक पातळीवर उरला नाही हे आपल्या सर्वच धर्मेतिहासांतून लक्षात येईल. किंबहुना समतेचा ध्यास घेत स्थापन झालेले नवे धर्मही नंतर विषमतेच्याच गाळात अडकले ते परस्परांतील वाईटच घेण्याच्या वृत्तीमुळे हेही स्पष्ट दिसते. त्यामुळे सन २०० नंतरचा भारतीय समतेचा विचार केवळ आणि केवळ आध्यात्मिक स्वरुपाचा होता. समता उरली नाही कारण काही स्वनिर्मित तर काही परनिर्मित (वैदिक/शैवादि अवैदिक) पारतंत्र्यातच गेले. राजकीय पातळीवर समतेचा तर प्रश्नच नव्हता. चंद्रगुप्त मौर्य सम्राट असुनही त्याला चाणक्य "वृषल"च म्हणत राहिला. नंद न्हावी म्हणून त्याचीही हेटाळणीच आहे. विष्णुपुराणासारखी पुराणे सातवाहनांसारख्या मातब्बर घराण्याला शूद्र म्हणून विशेष जागा देत नाहीत. राजालाच समता नसेल तर जनसामान्यांना कशी असणार? मुळात भारतीय धर्मैतिहास आणि राजकीय इतिहास वैदिक दृष्टीकोनातून लिहिला गेला असल्याने तो भेदभावाने भरलेला आहे. तोच भारताचा खरा इतिहास आहे असे मानत त्यातून समतेची मुल्ये शोधायचा आणी भारतात समतेचे तत्वज्ञान होतेच कि हे दाखवण्याचा प्रयत्न्ब करत त्यात अध्यात्मवाद होता...व्यवहारवाद नव्हे हे मात्र सांगण्याचे टाळले जाते.

त्यामुळेच बंधुभावाचा पुरातन विचारही बाद होतो. विवेकानंद म्हणतात "आपला समाज अतिभयंकर, अतिसैतानी बनला." हेही मत अतिरंजित असले तरी त्यात तथ्य नाही असे कोण म्हणेल?

आता पुरातन काळात समता-स्वातंत्र्य व समता आधुनिक परिप्रेक्षातली नसेल तर ती होतीच असा अट्टाग्रहही काय कामाचा? दुस-यांचे चांगले ते घ्यावे असे श्री. पतंगेच एका ठिकाणी म्हणत असता, हा दुस-यांचे चांगले नाकारण्याचा प्रयत्न नाही काय? या पाश्चात्य तत्वांना नाकारण्यासाठीच "समरसता" सिद्धांत जन्माला आला नाही काय?

आज सकाळी सकाळीच मला एका संघ स्वयंसेवकाचा फोन आला होता. "समता कि समरसता" हा पुण्यनगरीत प्रकाशित झालेला माझा लेख वाचून त्याने फोन केला होता. अर्थात त्याला माझा लेख आवडला नव्हता. असे लेखन करु नये असे सुचवत त्याने सांगितले कि जिलेबी जशी एकजीव असते तशीच समरसता असते. हे उदाहरण बालिश वाटले तरी समाजाची जिलेबी करता येत नाही....समाज एकरस...एकजीव करता येत नाही. संघाचे स्वयंसेवकही असे एकरस-समरस बनू शकत नाहीत. कारण मुळात ते मानवी प्रेरणांच्या विरोधात आहे.

हिंदुंचे संघटन का करावे यावर पतंगेंनी भाष्य केलेले नाही. हिंदू धर्मातील जातीअहंकार व जातीपाती, वैदिकांचे वर्णीय अहंकार संघाला मान्य नाहीत एवढेतरी पुस्तकांवरुन दिसते. आपण ते विचार प्रामाणिक आहेत असे समजू. हे अहंकार व भेद तोडण्यासाठी समरसता हवी असे जे म्हणणे आहे ती समरसता म्हणजेच प्रत्यक्षात समता होय असेही आपण थोडा वेळ गृहित धरू. परंतू प्रत्यक्षातील व्यवहारवाद काय आहे हेही मग पहायला हवे. वर्ण-जाती तोडुन हिंदू हीच एकमात्र ओळख समजा सर्वांनी ठेवायची तर वर्णांचे आणि जातींचे तत्वज्ञान संघाकडे कोठे आहे? जोवर वर्ण आणि जाती का नकोत, त्या कशा फिजूल आहेत हे सर्वप्रथम स्पष्ट करावे लागेल. ते स्पष्ट केले कि कृती आली. हिंदू धर्माचे शंकराचार्य वैदिकच का? या प्रश्नाचीही सोडवणूक करावी लागेल. (शंकराचार्यांचा वारस कोण असेल यात संघ आणि काशी विद्वत्परिषद सक्रीय सहभागी असते.)  थोडक्यात एकरुप हिंदू ही ओळख मिटवायची तर वैदिक शंकराचार्य (धर्मगुरू) ही प्रथाच सर्वप्रथम नष्ट करावी लागेल. मी २००६ साली किस्त्रीममद्ध्ये याबाबत सविस्तर लेख लिहिला होता. मा. गो. वैद्यांनी माझा चांगलाच समाचार घेत मला व्ह्यटिकनचा हस्तकही ठरवले होते हा इतिहास फार जुना नाही. धर्मकार्यातील कोणाही लायक व्यक्तीसाठी हे पदच मुळात खुले होत नाही तोवर वर्ण-जाती अभिमान घालवायच्या बाता निरर्थक आहेत. अन्य मंदिरांबाबतही (जसा पंढरपुरबाबत झाला) तशाच निर्णयाची गरज आहे. पण १९८३ साली स्थापन झालेला समरसता विचार मंच याबाबत आपले विचारही मांडत नाही. कृती तर खुपच दुरची झाली. वर्णाभिमानी धर्मसत्तेवर कायम ठेवून लोकांनी मात्र समरस व्हावे ही अपेक्षा विघातक आहे, हिंदुंना मुळीच उपकारक नाही याचे भान संघाने ठेवले पाहिजे.

(क्रमश:)
मागील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

12 comments:

  1. आप्पा - संजय सरांचा विरोध शंकराचार्यांच्या निवडीच्या निकषा ना दिसतो आहे . पण व्ह्याटीकन पोप म्हणा किंवा जामा मशिदीचा इमाम घ्या किंवा दलाई लामा बघा , प्रत्येक गादीची , धर्मपिठाची निवडीची काही वैशिष्ठ्ये आहेत आणि ती त्याना संभाळावीच लागतात हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही . कारण तो तत्वाचा मुद्दा नसून व्यवहाराचा भाग आहे .
    बाप्पा - एक सांगू का - संजयने आपल्याला दोघाना कायमचे काळ्या यादीत टाकले असावे .कारण आपण कितीही पोटतिडकीने लिहिले तरी तो गप्पच असतो ,
    आप्पा - अद्वैतवाद समजावताना आद्य शंकराचार्यांना शैव तत्वज्ञानाचा आधार घ्यावा लागला . म्हणजे नेमके काय ?आणि ती दंतकथा असेल तर संजय सारखा तथाकथित इतिहास तद्न्य ( ? ) ती दाखल्यासाठी का वापरतो ?
    बाप्पा - मुख्य म्हणजे मूळ धर्म आणि त्याची शिकवण आणि त्याचे अधिकृत प्रवक्ते , हे सर्व प्रकरण धर्माच्या रक्षण आणि विस्तारासाठी असते . त्या रचनेत अनेक त्रुटी आणि अन्यायकारक गोष्टी असू शकतात . म्हणून तर पोप आणि खलिफा याना मानणारे आणि न मानणारे असे पंथ निर्माण झाले . आपल्याकडेही इतके पंथ निर्माण झाले . शीख , जैन , बौद्ध हे सर्व मूळ हिंदू धर्मियाच होते का नव्हते ? सॉरी - शैव धर्मियच नव्हते का ? मग त्यांनी शैव धर्म का त्यागला ?
    आमचा संजय कोडी निर्माण करण्यात आणि सोडवण्यात हुषार ! तो म्हणेल हे सर्व वैदिक अवैदिकातून निघाले ! आमचे शैव फार फार थोर !

    आप्पा - आणि इतर धर्मात जातपात नसते असे म्हणणे हे फार धाडसाचे होईल . पाच कोसावर जशी भाषा बदलते तशाच चालीरीती बदलतात , पेहराव बदलतात . आज हिंदू म्हणवणारे , किंवा शैव म्हणवणारे जगभरातले किंवा भारतभर पसरलेले लोक काय एका पुस्तका प्रमाणे थोडेच वागतात ?त्यांचे प्रत्येक बाबतीतील विचार आणि मते काय एकसारखी थोडीच असणार ?
    बाप्पा - व्यवहाराचा विषय बघितला तर , प्रत्येक कुटुंबागणिक विचार वेगवेगळे असतात . गणपतीचे विसर्जन नदीत करावे का हौदात ? मातीचा पार्थिव गणपती असावा का चांदीचा गणपती बसवून त्याचे बादलीत विसर्जन करावे ? असे अनेक व्यावहारिक मुद्दे आहेत डोळस आधुनिक विचार आणि पूर्वापार कल्पना यातून सतत विचारांची फेर आखणी होत असते . मग संघ काहीही म्हणो . किंवा शंकराचार्य काहीही सांगोत सामान्य हिंदू व्यवहाराने वागताना त्यांना अंतिम धार्मिक पीठ मानत नाही हे सत्य आपण विसरतो . उद्या कोणाच्या घरी जाउन त्याला धर्म भ्रष्ट जाहीर करण्याची कोणत्याही हिंदू धर्मपिठाची ताकद उरली आहे का ? पोप काहीही जाहीर करो , त्याला अमेरिकन सरकार किती किंमत देते ? खिलाफत चळवळीचे काय झाले ? मग संघ काय म्हणतो किंवा शंकराचार्य काय फतवा काढतात त्याचा इतका बाऊ करायची काहीच गरज नाही . त्यांच्या अस्तित्वासाठी त्याना असे खेळ करावे लागत असतील तर त्यांची कीव केली पाहिजे . कारण सामान्य हिंदुना त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही .
    बाप्पा - आपल्या कोणाला उद्या शंकराचार्यांनी फोन केला आणि तुम्ही असा असा धर्मद्रोह केला आहे असे म्हटले तर आपण त्याना म्हणू - गाढवाच्या **त जा . कारण आपल्या लेखी त्यांची तितकीच किंमत आहे हे व्यावहारिक सत्य संजय समजून घेत नाही ।
    आप्पा - ही बुजगावणी आहेत आणि त्यांनी काही विधायक काम केले तरच त्यांना काही चांगले दिवस आहेत नाहीतर ती फक्त शोभेची कठपुतळी ठरेल . नव्हे ठरतेच आहे . आपला काळ हा काही पैठण च्या धर्म मार्तंडानी न्यायदान करण्याचा किंवा मंबाजीनी पोथ्या बुडवण्याचा हुकुम देण्याचा आणि तो मानण्याचा नाही हे संजयाने समजून घेतले पाहिजे .
    बाप्पा - आज पुरेशी जनजागृती झाली आहे आज थोडीशी जरी अन्यायाची झलक दिसली तरी सुप्रीम कोर्टा पर्यंत धाव घेतली जाते . मग संजय हा बागुलबुवा का उभा करतो आहे आणि संघाचा इतका धसका घेतो आहे ?
    आप्पा - संजय ! संघ आणि विश्व हिंदू परिषद आणि त्यांचे बगलबच्चे हे फक्त बोल बच्चन आहेत त्याना तुम्हीच मोठ्ठे करत आहात !सामान्य माणसाला त्यांच्या कडे बघायलाही वेळ नाही !

    बाप्पा - अजून एक बाब म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजीचा एकदाही निषेध केला नाही - तुकाराम हे शिवाजी महाराजांचे गुरु असताना त्यांच्या पोथ्या बुडवण्या पर्यन्त गोष्टी गेल्यावरसुद्धा महाराजांनी आपल्या गुरूला न्याय दिला नाही - हे कसे ? इतके शिवाजीचे दुर्लक्ष्य कसे झाले ? का तो रामदासांच्या हातातले बाहुले होता ? संभाजी ब्रिगेडने खुलासा केलाच पाहिजे !

    ReplyDelete
  2. स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्याने बाबासाहेब माणसाला माणूस म्हणून घडवू पाहतात. पण बाबासाहेबांच्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे काय? समता म्हणजे काय? या संकल्पनांना बाबासाहेबांच्या विचारांच्या अनुषंगाने निश्चित अर्थ प्रदान करता येऊ शकेल का?
    बाबासाहेब राज्यसत्ता व सामाजिक सत्ता यांच्या मर्यादेत स्वातंत्र्य शोधतात. म्हणजे सत्तेची मर्यादा जेथे संपते तेथून स्वातंत्र्य सुरू होते. याचा अर्थ सत्ता स्वातंत्र्य मर्यादित करते. म्हणजे सत्तेच्या अभावात माणूस पूर्ण मुक्त असतो. आता बाबासाहेबांना जो माणूस हवा आहे तो सत्तेच्या मर्यादेत स्वातंत्र्य भोगणारा की सत्तेच्या अभावात मुक्त असणारा माणूस असेल? सत्तेच्या मर्यादेत स्वातंत्र्य असेल, तर माणसाच्या कृतीवर कितपत व का मर्यादा घालायची, हे स्पष्ट करता आले पाहिजे. माणूस मग कृती का करतो? कृतीमागे कोणती प्रेरणा असते? कृतीचा उगम कशात असतो? या प्रश्नांची उत्तरे मग निश्चितपणे देता आली पाहिजेत. बाबासाहेब स्वातंत्र्य व समता हे ध्येय सांगतात. परंतु स्वातंत्र्य व समता यापैकी एकाला प्राधान्य द्यावे लागते. कारण स्वातंत्र्याला प्राधान्य देऊन करावी लागणारी समाजरचना ही समतेला प्राधान्य देऊन कराव्या लागणा-या समाजरचनेपेक्षा वेगळी असते. मग बाबासाहेब प्राधान्य कशाला देतात? स्वातंत्र्य की समतेला? बाबासाहेब नि:संदिग्धपणे समतेला प्राधान्य देतात. पण समतेच्या समाजात त्यांना व्यक्ती विरघळून टाकायची नसते. म्हणजे व्यक्ती ही केवळ समाजासाठी असेल. त्यांना समतेच्या समाजात व्यक्ती ही पृथक व केंद्रस्थानी ठेवायची असते. म्हणजे समाज व्यक्तीकरिता असेल. आता समतेच्या समाजात व्यक्ती केंद्रस्थानी ठेवायची असेल, तर सत्तेवर मर्यादा घालणारा निश्चित असा निकष लागेल. बाबासाहेब न्याय हा निकष मानतात. मग न्याय या निकषाने समाजातील आíथक, सामाजिक, धार्मिक, राजकीय संस्थांची अशी बांधणी करावी लागेल म्हणजे संस्थांतील सत्तेचे असे विभाजन करावे लागेल की संस्थांच्या कार्यातून न्याय हे मूल्य प्रकट व ध्वनित होईल. ही मग समाजरचनेची बांधणी असते. पण बाबासाहेब एक प्रश्न उपस्थित करतात. ही सत्ता काढून घेतली तर काय होईल? सत्तेच्या अभावात माणसांचा परस्पर व्यवहार हा स्वातंत्र्य व समता या मूल्याने नियत होईल का? म्हणजे स्वातंत्र्य व समता हा माणसाच्या सहज वर्तनाचा आविष्कार असेल. दुस-याच्या संबंधात होणारे आपले वर्तन हे आपण आपल्या इच्छेने, विवेकाने निवडलेले वर्तन असेल, ते सत्तेने भाग पाडलेले वर्तन नसेल. याचा अर्थ माणसाला हवे ते करण्याकडे त्याचा कल असतो. पण परस्परांच्या संबंधात काय करावे याचा निर्णय तो स्वेच्छेने व विवेकाने करतो. तरीही तो आपला नसíगक कल असतो त्यावर मर्यादा अथवा बंधने घालत असतो. इथे बासत्तेऐवजी स्वेच्छेने बंधने घालायची असतात. म्हणजे स्वातंत्र्य हे नसíगक कलाने वागण्यात नसते, तर पर्यायांतून निवड करून वागण्यात असते.

    ReplyDelete
  3. ऐतिहासिक विकासात सत्ताधारी आपल्या इच्छेने आपल्या हिताकरिता दुस-यांची कृती त्यांच्या इच्छेविरुद्ध नियत करू लागले. या सत्तेच्या जाचातून माणसाला मुक्त करावयाचे आहे. बाबासाहेब सूत्र मांडतात की, एका माणसाला दुस-या माणसाचे वर्तन नियंत्रित करण्याचा अधिकार नसतो. मग माणसाला मुक्त कसे करायचे? यात दोन मार्ग आहेत. समाजातील संस्थांतील सत्तेच्या विभाजनाची पुन्हा मांडणी करणे. म्हणजे संस्थांची पुनर्रचना करणे. म्हणजेच समाजाची पुनर्रचना करणे. दुसरा मार्ग माणसाला दुस-या माणसाच्या इच्छेवर अवलंबून राहण्यापासून मुक्त करणे. म्हणजेच माणसाला त्याच्या इच्छेच्या स्वाधीन करणे. पण यात मूलभूत प्रश्न होता. खरोखर इच्छा अशी काही बाब असते का त्यानुसार माणूस कृती करतो? म्हणजे मूळ प्रश्न होता, की माणसाच्या कृतीचा उगम कशात असतो? या प्रश्नाला दोन उत्तरे होती. एक : माणूस राहतो त्या परिस्थितीत माणसाच्या कृतीचा उगम असतो. दोन : कृतीचा उगम माणसाच्या मनात असतो.
    माणूस राहतो ती परिस्थिती अमानवी असेल तर माणसाला मानव करण्यासाठी तो राहत असलेली परिस्थिती मानवी करणे महत्त्वाचे असते. यात एक गृहीतक असते. माणसाचे मन हे को-या पाटीसारखे असते वा ते रिक्त असते. अनुभवाने ते भरत जाते. माणसाचा अनुभव जर वाईट असेल तर त्याला कारण तो राहतो ती परिस्थिती वाईट असते. बाबासाहेबांचा यावर प्रश्न होता की, माणसाची परिस्थिती चांगली केली, तर माणसांचे परस्परांविषयी वर्तन हे मैत्री, करुणा, बंधुता, प्रेम यानुसार घडेल का? याचे उत्तर पुन्हा एका गृहीतकावर होते. माणसाची जाणीव ही तो जीवन जगण्यासाठी जे काही करतो त्याने घडत असते. म्हणजे जीवनाचे अस्तित्व जाणीव घडवत असते. या सूत्राच्या मुळाशी माणसाचे मन रिक्त असते, हे गृहीतक असते. बाबासाहेब हे सूत्र स्वीकारत नाहीत. त्यांच्या मते मैत्री, करुणा व बंधुता माणसाच्या मनात खोलवर गाभ्यांत असल्या पाहिजेत. याचा अर्थ भौतिक परिस्थिती समतेची केली तरीही समतेच्या व्यवहारासाठी आवश्यक असणारी मैत्रीची वर्तणूक त्या परिस्थितीतून निर्माण होत नाही.
    समतेच्या परिस्थितीच्या निर्मितीबरोबर तसे अनुकूल माणसाचे मन घडवले गेले पाहिजे. याचा अर्थ बाबासाहेब मन रिक्त असते असे मानत नाहीत. म्हणजे ते व्याप्त असते. मनात काहीतरी मूलभूत जैविक असल्याशिवाय त्यात मैत्री वा करुणा रुजू शकत नाही. इरिक फ्रॉम यांनी मार्क्‍सवादातील भौतिक परिस्थितीच्या बदलाच्या संदर्भात हाच प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या मते समतेची परिस्थिती टिकवून धरण्यासाठी प्रेम असणे आवश्यक होते. पण त्यांना प्रेम हे माणसे परस्परांशी निगडित राहण्याच्या गरजेतून अथवा अपरिहार्यतेतून निर्माण होऊ शकते, असे वाटत होते. फ्रॉम यांना मार्क्‍सवादात परिस्थितीने घडत जाणारे कोरे मन ही समस्या वाटत होती. त्यांच्या मते, मार्क्‍स कोरे मन ही संकल्पना स्वीकारत नाही. पण मग ‘जाणीव जीवन ठरवीत नसते, तर जीवन अस्तित्व जाणीव ठरविते’ हे ऐतिहासिक भौतिकवादाचे मूलसूत्रच बाद ठरते. फ्रॉम यांना मार्क्‍सवादात भौतिक परिस्थितीच्या बदलानंतर प्रेमाची प्रस्थापना करण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. याबाबत एक मूलभूत प्रश्न होता. कृतीचा उगम कशात असतो. तो बापरिस्थितीत ठेवला तर सगळा प्रश्न भौतिक परिस्थितीच्या बदलात सामावला जातो. बाबासाहेब स्पष्ट म्हणतात, की कृतीचा उगम बापरिस्थितीत नसतो, तर तो मनात असतो. मग मन कृतीला चालना कशी देते? कृतीच्या मुळाशी काहीतरी हेतू असल्याशिवाय कृती घडू शकत नाही. मग हेतू कसा निर्माण झाला? कार्यकारण परंपरेने हेतूचा उगम सांगितला तर हेतूचा उगम बापरिस्थितीत ठेवावा लागतो. हेतू मग कारणातीत असावा लागतो. कारणाशिवाय अस्तित्व हे देववाद अथवा आत्मा यात पलटी घेऊ शकतो.

    ReplyDelete
  4. बाबासाहेबांनी मग एक गंभीर प्रश्न विचारला. आत्मा नसेल तर कर्म कसे असू शकते? आत्मा कारणातीत असतो. मग कर्माच्या मागील आत्मा काढून टाकला तर कर्म वा कृती घडविण्यामागे कोणती प्रेरणा असू शकेल? त्या दोन प्रेरणा होत्या. एक जैविक प्रेरणा व दुसरी इच्छा. जैविक प्रेरणा म्हणजे मागील कोणताही अनुभव नसताना वा काहीही न शिकता जीवन अस्तित्वासाठी कृती केली जाणे. ही मूल जैविक प्रवृत्ती होती. बाबासाहेबांच्या मते, या जैविक प्रेरणांनी घडणा-या कृतींनी अथवा या जैविक प्रेरणांवर बंधने टाकून घडविल्या जाणा-या कृतींनी सामाजिक संस्था घडल्या गेल्या. ते मग माणसाचे जीवन जगण्याचे नियम होते. ते नियम म्हणजे माणसांच्या परस्परसंबंधांची बांधणी होती. हे परस्परसंबंध माणूस जगतो ती परिस्थिती घडवत असतात. जन्मत: ही परिस्थिती माणसाला प्राप्त होते. ती त्याला स्वीकारावीच लागते. त्याची इच्छा असो वा नसो त्याला जन्मत: प्राप्त झालेल्या सामाजिक संबंधात शिरावेच लागते. माणसानेच निर्माण केलेले सामाजिक संबंध त्याच्यावर वर्चस्व गाजवू लागतात. कारण तो समाजाने मान्य केलेला वर्तणुकीचा ढाचा असतो. त्यामुळे समाज व्यवहार सुरळीत चालतो. कोणी कसाही वागला तर त्यात अराजक असते. मग वर्तणुकीमधील चांगले-वाईट, योग्य- अयोग्य याचा निवाडा करावा लागतो. म्हणजे ती जाणीवपूर्वक, हेतूने निवडलेली कृती असते. ती मग नीती असते. नीती मग हेतूने इच्छेने केली जाणारी कृती असते. आता बाबासाहेबांच्या पुढे समस्या अशी आहे, की आत्मा नाकारला, तर नतिक कृती ही इच्छेने घडणारी कृती असली पाहिजे. आता आत्मा हवे ते करू शकतो. कोणत्याही पूर्वकारणाशिवाय तो कृती करू शकतो. म्हणजे आत्म्याची इच्छा ही कारणातीत इच्छा असते. त्यामुळे तो सार्वभौम असू शकतो. म्हणजे कोणत्याही बाप्रेरणेने अथवा शक्तीने आत्मा नियत होत नसतो. आता आत्मा नाकारला तर माणसाची कृती इच्छेने घडली जाते. पण ही इच्छा अन्य कोणत्याही प्रेरणेने अथवा शक्तीने नियत होता कामा नये. म्हणजे माणूस दैवाने, नियतीने अथवा बाभौतिक प्रेरणेने नियत होणार नाही. तो केवळ व केवळ त्याच्याच इच्छेने नियत होऊ शकेल. माणूस मग स्वयंभू, स्वतंत्र व सार्वभौम असेल. बाबासाहेब म्हणतात की, माणूस केवळ त्याचाच स्वामी असतो, तो मग केवळ स्वत:चेच ध्येय असेल. या गृहितकावर समाजाची बांधणी करायची असते.
    आता बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानात एक समस्या निर्माण होते. माणसाला दुस-याच्या इच्छेवर अवलंबून राहण्यापासून मुक्त कसे करायचे? माणसाला त्याच्या इच्छेच्या हवाली कसे करायचे? बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानातील ही केंद्रीभूत समस्या आहे. मानवाला त्याच्या इच्छेच्या हवाली करणे म्हणजे मानवतेची प्रस्थापना करणे. आंबेडकर विचार या मानवतेची प्रस्थापना करू पाहतो. पण यात समस्या आहे. दैववादात, अद्भुतरम्यवादात न घसरता इच्छेला कारणातीत कशी करायची? कारणातीत इच्छेत मग स्वातंत्र्य असते. नीतीला मग स्वातंत्र्यावर उभी करता येते. पण आत्म्याला काढून त्याच्या जागी इच्छेला ठेवून तिला कारणातीत कसे करायचे? मेंदूच्या उत्क्रांतीत कारणातीत हेतू निर्माण झाला. म्हणजे जाणीव ही निखळ परिस्थितीचे परावर्तन राहत नव्हती. जाणीवेत जीवशास्त्रातून निर्माण झालेला हेतू होता. बाबासाहेबांच्या पुढे प्रश्न होता की, इच्छेशिवाय नीतीला नतिक करता येऊ शकते का? ही समस्या खुद्द बुद्धांसमोर निर्माण झाली होती. प्रतित्य समुत्पादात इच्छेला थारा लाभत नव्हता. अनंत कारणांच्या अज्ञानात इच्छेला मग शोधावे लागत होते. इच्छा मग कारणातीत नाही, पण निश्चित कारणांचे अज्ञान या स्वरूपात येत होती. बाबासाहेब मात्र विज्ञानाकडे येतात. ते मग सिद्धांत मांडतात, की चुंबकत्व हे जसे विद्युतचे क्षेत्र असते, तसे मन हे मेंदूचे क्षेत्र असते. जॉन टायलर हे मेंदूला त्याचे चुंबकीय क्षेत्र असते, असे सांगतात. बाबासाहेब अभौतिक मन हे विज्ञानाच्या कक्षेत आणतात.

    ReplyDelete
  5. आता माणूस हा सार्वभौम इच्छा असलेला नतिक माणूस आहे. तो जीवशास्त्रीय प्राणी नाही. बाबासाहेब सांगतात, की कृतीचा मूळ हेतू जिवाचे अस्तित्व जपणे, टिकविणे हाच असतो. आता माणसाच्या कृतीचे मूळ त्याच्या इच्छेत असेल, तर तो कृती केवळ आपले जीवन अस्तित्व जपण्यासाठीच करीत असतो. याचा अर्थ, माणूस मग स्वार्थी असतो. मग स्पध्रेने संघर्षाने माणूस आपले जीवन अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करतो. हा स्वार्थी माणूस समतेचा सगळा पोत नष्ट करतो. नीती मग स्वार्थी माणसाला नतिक करण्याचे साधन ठरते. बाबासाहेब समतेचा समाज निर्माण करू पाहतात. पण समतेच्या समाजात व्यक्ती विरघळून जाता कामा नये. व्यक्ती ही समाजाकरिता असता कामा नये. समाज व्यक्तिकरिता असला पाहिजे. याचा अर्थ बाबासाहेब समतेच्या समाजात व्यक्ती केंद्रस्थानी ठेवतात. पण यासाठी स्वार्थी व्यक्ती हे गृहीतक विसंगत ठरते. या गृहीतकावर आतापर्यंत सगळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र उभारले गेले. बाबासाहेब माणसांच्या परस्पर व्यवहाराच्या मुळाशी बंधुता व मैत्री ही मूल्ये ठेवतात. याचा अर्थ बाबासाहेबांच्या विचाराच्या मुळाशी माणूस हा मुळात सहकार प्रवृत्ती असतो, हे गृहीतक धरायला हवे. सहकारात मग नीती असते. माणसाचे व्यक्तित्व अथव क्षमता ही मग नतिक बनते. आíथक उत्पादन व वितरण हे स्पध्रेऐवजी सहकाराचा आविष्कार असेल. आíथक विकास हा मानवी स्वातंत्र्याच्या कक्षा विस्तारण्यासाठी असेल.

    ReplyDelete
  6. संजय जी तुम्ही छान समीक्षण केले आहे. धन्यवाद!

    लिहा वाचा यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ठ विचार मांडले आहेत. खूप खूप आभार!!!

    असेच लिहित रहा, मी तुमच्या लेखांची आवर्जून वाट पहात आहे.

    पुन्हा एकदा दोघांचे अगदी मनापासून धन्यवाद!!!

    ReplyDelete
  7. बाप्पा - हे काय रे आप्पा , संजय इतका गप्प कसा ? सुषमा आणि वसुंधरा राजे इतका धुमाकूळ घालत आहेत !
    आप्पा - अरे बाप्पा - इतका अस्वस्थ होऊ नकोस . हे सर्व क्रिकेटमुळे चालले आहे ना ? आणि क्रिकेट मोहनजो दारो मधला खेळ आहे ,म्हणजेच शैव आहे , त्यामुळे स्वराज आणि वसुंधारेबद्दल कसे बोलणार ? आले का लक्षात ?
    बाप्पा - उद्या योग दिवस आहे , आणि योग योग हे शैव प्रकरण आहे त्यामुळे संजय नुसता बागडतो आहे !मगाशीच शिर्सासन घालून कुणाला तरी मुलाखत देत होता .
    आप्पा - पण काय रे , तुला काय वाटते ? क्रिकेट मध्ये आरक्षण हवे असे कुणी का ओरडत नाही ?
    बाप्पा - खरेतर , संजायालाच अध्यक्ष केले पाहिजे म्हणजे तो ठामपणे सांगेल की हा खेळ शैव कसा आणि अवैदिक कसा ते ! आणि हा दुसरा मोदीपण शैव आहे त्याची परदेशात शैव संप्रदाय वाढवण्याची फार इच्छा आहे . त्यासाठी तो वर्गणी मागतो आहे . लोक त्याला चीटिंग म्हणतात - हे सर्व लोक वैदिक आहेत . ललित मोती हा मुळात शैव आणि कट्टर अवैदिक आहे .
    आप्पा - मोहन्जोदारो मधील क्रिकेटच्या ब्याटची प्रतिकृती संजयाने सर्वाना पाठवली पण सर्वांनी ती फेकून दिली , फक्त ललित मोदीनी ती शोकेस मध्ये ठेवली आहे किती थोर आहेत ते , आणि जातीने धनगर आहेत !कमाल आहे . म्हणजे वसुंधरा ग्वालियर च्या आणि मोदी इंदूरचे - वा वा !
    सगळे समरस होऊ या !

    ReplyDelete
  8. संजय सर , आपण योग दिवसाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले याचे वाईट वाटते

    ReplyDelete
  9. आपल्या ब्लोगवर अतिशय उत्तम उपयोगी माहिती वाचायला मिळत आहे आपण इतिहास कार आहात , आपण योग दिनाच्या निमित्ताने बरीच माहिती वाचकाना देऊ शकला असतात
    आम्ही वात बघत आहोत .
    कोणता व्यायाम प्रकार हा कोणासाठी योग्य आहे हे रोगाचे किंवा समस्येची उकल आणि निदान केल्याशिवाय सांगणे अयोग्य आहे , तरीही आपण जनजागृती म्हणून सरकारी उपद्व्याप असे याकडे न बघता , आपण त्यात सिंहाचा वाटा घेऊ शकला असता , निदान खारीचा तरी ?
    आपण या योग्दॆनाकदे भाजप किंवा आरएसेस अशा चष्म्यातून न बघता , साध्या मनाने बघायला हवे होते , पण समरसता आणि इतर वाद उगा निर्माण करून आपण जणू नांदीच केली होती .
    आपण मुलायमसिंग आणि लालूप्रसाद यादव यांच्या लायनीतले वाटता . हे आपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे .

    ReplyDelete
  10. आपण सर्वांनी योग आणि जागतिक योगदिनाचा विषय मांडला आहे , हे चांगलेच आहे .
    संजय सोनावणी हे हाडाचे इतिहासकार आहेत आता ते योग आणि त्याचा जन्म , विस्तार , आणि उपयोग यावर सविस्तर लिहितील अशी आशा करू या ?
    योग हा शैव धर्माचा आहे . शिवाची या मानव वंशाला दिलेली देणगी आहे .
    योग हा वैदिक आहे का ? असा आपोआप प्रश्न पडतो ,
    त्याचे निरसन संजयजी करणार अशी आशा करुया , नव्हे त्यांनी केलीच पाहिजे ,
    कारण वैदिक शक्ती अशावेळी हा सर्व वैदिक संस्कृतीचा भाग आहे असे खपवून मोकळे होतात , तिथे हिरीरीने कुणीतरी ताठ मानेने सांगायला पाहिजे ,की योग हा शैव पंथाची जगाला दिलेली देणगी आहे .
    शंकराने तो प्रथम पार्वतीला सांगितला , तो चोरून गणेशाने ऐकला , आणि तो नारदाने कार्तीकेयास सांगितला , कार्तिकेयाने गणेशास शाप दिला की तू चोरून ऐकलेले विसरशील - इत्यादी इत्यादी ?
    पण ,
    संजयाने काहीतरी सांगावे असे मात्र वाटते ,
    शिवाजी महाराजांना सुद्धा दादोजीनी योग शिकवला होता , त्याचा उपयोग त्याना आग्र्याला पेटाऱ्या तून पळून येताना झाला . त्याना आलेली शिंक त्यांनी प्राणायामाने रोखून धरली . सुमारे २४ तास महाराजांनी श्वास रोखून धरला असे इतिहास सांगतो !
    संजय सरांनी यावर प्रकाश टाकावा .

    ReplyDelete
  11. मार्मिक विश्लेषण केले सर आपण !

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...