Thursday, August 27, 2015

शूद्र म्हणजे कोण?

शूद्र म्हटले कि हा अवहेलनेचा, समाजातील दुय्यमत्व दर्शवणारा शब्द वाटतो. . शूद्र हा हिंदू धर्मातील चवथा वर्ण समजायची एक प्रथा आहे. पण मुळात सत्य काय आहे हे तपासायचे कष्ट कोणी घेतले नाहीत. वैदिक्धर्मात फक्त आणि फक्त तीनच वर्ण आहेत व ते म्हणजे ब्राह्मण, राजन्य (क्षत्रिय) आणि वैश्य. ऋग्वेदात पुरुषसुक्त वगळता शूद्र हा शब्द  कोठेही येत  नाही. पुरुषसुक्तात क्षत्रिय हा शब्दही येत नाही. येतो तो "राजन्य". अन्य अवैदिक समाजांची दास, दस्यू, अशीही  नांवे येतात. पण ऋग्वेतोत्तर काळात ही समाजनामे अचानक गायब होतात. मग अचानक वैदिक ग्रंथांत शूद्र हे नांव कोठूण आले?

वैदिक संस्कार, वेदांचे अधिकार फक्त तीन वर्णांनाच आहेत हे सत्य सर्वांना माहित आहे. म्हणजेच हे तीनच वर्ण वैदिक धर्माचे आहेत. शूद्र वैदिक असते तर त्यांनाही हे अधिकार काही प्रमाणात का होईना असते हे उघड आहे. पण तसे धार्मिक वास्तव नव्हते व नाही. मग शूद्र नेमके कोण आहेत, त्यांचा धर्म काय हे पहायला पाहिजे.

यासाठी आपण अन्य विद्वानांनी शूद्र कोण याबद्दल काय मत दिले आहे हे पाहुयात.

१) "शूद्र हे मुळात एखाद्या अवैदिक (अनार्य) टोळीचे नांव असावे." -राज पृथी,  Indian Caste System, edited by R.K. Pruthi, Discovery Publishing House, 2004, page 72.
२) "तीन वर्णांच्या बाहेर जो समाज होता त्याला शूद्र हे नांव वापरले गेले." - वि. का. राजवाडॆ, राधामाधवविलासचंपू, प्रस्तावना.
३) "शूद्र हे आधी एखाद्या टोळीचे नांव असावे. नंतर हे नांव जोही कोणी अनार्य आहे, अवैदिक आहे वतीन वर्णांच्या बाहेर आहे अशा सर्वांनाच, परकीयांनाही उद्देशून वापरले गेले. सुत्रांच्या दृष्टीने जेही कोणी तीन वर्णांचे नाहीत ते शूद्र."- देवदत्त भांडारकर, Some Aspects of Ancient Indian Culture, By D. R. Bhandarkar, 1989, page 12.
४) "शूद्र हे मुळचे क्षत्रीय होते. ब्राह्मणांनी त्यांचे उपनयन करणे बंद केल्याने शूद्र हा चवथा वर्ण बनला."- डा. बाबासाहेब आंबेडकर, शूद्र पुर्वी कोण होते?

आपण आधीच पाहिले आहे कि ऋग्वेदात शूद्र हा शब्द  एकदाच व सर्वात उशीराची रचना असलेल्या पुरुषसुक्तात येतो. हा धर्म स्थापन झाला तो दक्षीण अफगाणिस्तानात. भारतात हा धर्म आला तो प्रचाराच्या माध्यमातुन. दास-दस्यु हे अफगाणिस्तान-इराणातील लोक. ते मागेच राहिल्याने भारतिय समाजांना काहीतरी संबोधन देणे आवश्यक होते. ते शूद्र या शब्दाने साधले.

सर्वात महत्वाची बाब अशी कि शूद्र या शब्दाला कोणत्याही भाषेत (वैदिकही) काहीच अर्थ नाही. या शब्दाच्या व्युत्पत्ती कोणत्याही भाषेतुन साधता आलेली नाही. त्यामुळे हा शब्द कोणत्यतरी मूळ प्राकृत शब्दाचा अपभ्रंश असावा असे स्पष्ट दिसते. म्लेंच्छ हा शब्द  मेलुहा या शब्दाचा वैदिक अपभ्रंश आहे असे पुरातत्ववेत्ते अहमद हसन दानी व थापर यांनी दाखवून दिले आहे. (The Indus Civilization, by A. H. Dani and B. K. Thapar, page 274,)शूद्र या शब्दाचेही असेच असणार हे उघड आहे. अर्थात आपल्याला आज मूळ शब्द माहित नाही. परंतु "असुरद्र" या शब्दाचा हा अपभ्रंश असू शकेल असे माझे मत आहे.

शूद्र हे तीन वर्णांबाहेरचे लोक हे मत, अगदी बाबासाहेबांचे मत गृहित धरले तरी स्पष्ट होते. ब्राह्मण एवढे प्रबळ होते कि ते अगदी सर्वच (संख्या कितीही असो) क्षत्रियांचे उपनयन करायचे थांबवतील एवढे शक्तीशाली होते हे मत आता पुराव्यांवरुन टिकत नाही. वैदिक साहित्याने, स्मृती-सुत्रांनी  शुद्रंवर बंधने लादली असे साधारणपणे मानले जाते. ते प्रत्यक्षात पाळले गेले काय हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यातच आपल्या सांस्कृतिक प्रश्नाचे मूळ आहे.

शिशूनाग, नंद व सम्राट चंद्रगुप्त (व त्याचे वंशज) हे शूद्र (अवैदिक) होते हे सर्वमान्य आहे. सातवाहन ते यादव या सत्ताही शूद्र होत्या. दक्षीणेत व पुर्वोत्तर बलीदेशात शुद्र राजेच राज्य  करतात हे ब्राह्मण ग्रंथांनी स्पष्ट म्हणून ठेवले आहे. याचाच अर्थ असा कि वैदिक धर्माला लागू असलेल्या धार्मिक बंधने शुद्रांना लागू नव्हती व ती त्यांनी कधी पाळलेली दिसतही नाही. याचे कारण हा भारतातील मुळचा अवाढव्य समाज होता. या पुर्वापार शैवप्रधान धर्म पाळणा-या लोकांना वैदिकांनी शूद्र हे नांव दिले. यापलीकडे शूद्र या शब्दातुन अवहेलना अथवा हरलेले लोक असा अर्थ काढणे अनैतिकासिक आहे. उलट सर्वच महान सम्राट शुद्रांतुन निर्माण झाले हे सत्य आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. नंदांनी नाश केल्याने भविष्यात भारतात सर्वच शूद्र राजे राज्य करतील हे पुराणांतरी येणारे विधान लक्षात घायला हवे.

पाली सहित्यात येणारा "खतिय" हा शब्द क्षत्रियवाचक आहे असे मानण्याचाही प्रघात आहे. वि. का. राजवाडे गौतम बुद्धस "व्रात्य" क्षत्रीय (म्हणजे क्षत्रियत्वाचे वैदिक संस्कार न झालेला) म्हणतात. याचाही अर्थ अवैदिक क्षत्रीय असा होतो. पण खतीय म्हणजे क्षत्रीय नव्हे. मोठ्या प्रमाणात शेती करणा-या लोकांना खतीय (क्षेत्रिय) म्हणत असे डा. आ. ह. साळुंखे यांनी सप्रमाण दाखवुन दिले आहे. हे सत्यही आहे. शुद्धोदनाकडॆ हजार नांगरांनी नांगरावी लागेल एवढी शेती होती त्यामुळे त्याला (व बुद्धालाही) खतीय म्हटले गेले आहे. उत्तरेत शेताला अजुनही खेत म्हणतात. खेतीय-खतीय म्हणजे शेतजमीनींचे मालक. शेतकरी. याचा क्षत्रिय शब्दाशी संबंध नाही.

थोडक्यात शूद्र शब्दातुन काही शोधत बसत, अवहेलनात्मक वापरत बसत आपली फसवणूक करुन घेण्याची आवश्यकता नाही. आज ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो कथित शुद्रांचा धर्म आहे. वैदिक धर्म अजुनही स्वतंत्र असून त्याच्या धर्मप्रथाही स्वतंत्र आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.


27 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Pataskarji tyanchaa blog aahe tyana tyanche mat mandu dya. But tumchyasarkhya deep/profound study asanary genious ni I request u pl.still wait & watch . kaahi lok tumhala bhadkavnyacha pryatn karat asavet.instant opinion do not give. balance it please. Thanks.

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. अविनाश साहेब , मला असे म्हणायचे आहे की मी आपणास काहीच बोललेलो नाही वैयक्तिक रित्या ,
      आपण आपल्या अंगास उगाच चिकटवून घेत आहात !
      मी उदाहरण दिले की आपल्या गल्लीत दुसऱ्याच्या जागेत जाउन धुडगूस घालणाऱ्या माणसाला काय म्हणतात ते . त्यात तुम्हाला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता . आपण क्षमाशील आणि समजूतदार आहात हे आम्ही पेपर गल्लीकर अनुभवतो आहोत . आपण नवीन सुरवात करुया !
      जुने जाउद्या मरणालागुनी जाळून किंवा पुरुनी टाका असे केशवसुत म्हणायचे . ! (१८६६-१९०५)
      कृष्णाजी केशव दामले - म्हणजे बापरे , म्हणजे कोकणस्थ ?
      आज तर तुम्ही संजय सोनवणी सारख्या सज्जन माणसाला , काय बोलत आहात ?
      "भिकारचोट "ब्लोग लेखक ?- हे अतिशय दुःख दायक आहे , आपण खरेतर असे लिहू ,नका अशी नम्र विनंती ! आपण आपापले अहंभाव घेऊन इथे जमलो तर काहीच साध्य होणार नाही .

      Delete
    3. अविनाश साहेब , मला असे म्हणायचे आहे की मी आपणास काहीच बोललेलो नाही वैयक्तिक रित्या ,
      आपण आपल्या अंगास उगाच चिकटवून घेत आहात !
      मी उदाहरण दिले की आपल्या गल्लीत दुसऱ्याच्या जागेत जाउन धुडगूस घालणाऱ्या माणसाला काय म्हणतात ते . त्यात तुम्हाला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता . आपण क्षमाशील आणि समजूतदार आहात हे आम्ही पेपर गल्लीकर अनुभवतो आहोत . आपण नवीन सुरवात करुया !
      जुने जाउद्या मरणालागुनी जाळून किंवा पुरुनी टाका असे केशवसुत म्हणायचे . ! (१८६६-१९०५)
      कृष्णाजी केशव दामले - म्हणजे बापरे , म्हणजे कोकणस्थ ?
      आज तर तुम्ही संजय सोनवणी सारख्या सज्जन माणसाला , काय बोलत आहात ?
      "भिकारचोट "ब्लोग लेखक ?- हे अतिशय दुःख दायक आहे , आपण खरेतर असे लिहू ,नका अशी नम्र विनंती ! आपण आपापले अहंभाव घेऊन इथे जमलो तर काहीच साध्य होणार नाही .

      Delete
    4. आप्पा - आपण अविनाश सराना दुखावले का रे ?
      बाप्पा - आपली तशी इच्छा नक्कीच नव्हती . आपण त्याना दुखावले जाणारे काहीच म्हटले नाही . त्यांच्या आई वडिलांविषयी आपल्याला प्रचंड आदर आहे , सर्वांच्याच आई आणि वडिलांविषयी तसे म्हटले पाहिजे - अरे आप्पा , आई हे एकाच नाते खरे असते , निसर्गाने दिलेले , आपण ९ महिने आईच्या गर्भात , उबदार रहात असतो , तिथे आपल्याला सगळे प्रेम मिळते , ते नाते किती महान आहे !अविनाश सराना खूप दुखावले का आपण ? अरेरे , आम्ही साध्या मुंगीलाही कधी दुखावत नाही .
      आप्पा - अविनाश सर , आमचे चुकले का ? आम्ही काहीतरी मुद्दा सांगताना चुकून काहीतरी म्हटले असेल , आमचा उद्देश साधा आणि मानवतावादी च होता . आता श्रावणाचा पवित्र महिना चालू आहे , आपल्या शैव धर्मात श्रावणी सोमवार फार महत्वाचे . आम्ही पुण्याला आलो तर आपणास नक्कीच भेटू - चालेल ना सर ? बाप्पा - आपणाकडून आम्हास भविष्य शिकायचे आहे , ग्रह गोल आणि माणसाचे भविष्य यांचे काय नाते असते ते आपणाकडून जाणून घ्यायचे आहे
      बाप्पा - किती सुंदर कल्पना मांडतो आहेस आप्पा - चाल , आपण नक्कीच तसे करुया ! आम्हाला आपले विद्यार्थी होणे नक्कीच आवडेल .

      Delete
  3. संजयकाका , अतिशय सोप्या शब्दात इतका गहन विषय आपण सांगितला आहे , त्याबद्दल धन्यवाद . आर्य म्हणा किंवा वैदिक म्हणा , ते अफगानिस्थानातून इकडे खुश्कीच्या मार्गाने आले असे आपण सांगितले आहे . त्यावेळी शुद्र वर्ग नव्हता .
    मनात एक शंका येते की वैदिक हे लढाऊ होते का ? इतका छोटा वैदिक वर्ग , पण त्याने या प्रदेशात येउन आपले विचार , किंवा आपल्या प्रथा इथे चालू केल्या , आणि समाजानेही त्या निमुटपणे मान्य केल्या असे कसे होईल ? मुसलमान आक्रमण हे संख्येने थोडे असूनही प्रभावी का ठरले ? त्यांच्याकडे इथल्या लोकांच्या पेक्षा आधुनिक शस्त्रे आणि युद्धतंत्र होते म्हणूनच ते जिंकले . तीच गोष्ट वैदिकांची समजायची का ?
    मुसलमानांनी इथल्या जनतेला बाटवले , तसेच वैदिकांनी बळाचा वापर न करता इथल्या लोकाना बाटवले असेल का ?आणि चौथा वर्ण म्हणून वैदिकांनी त्याना नंतर सामावले असेल का ? पराभूत वृत्ती काहीही मान्य करते . हा इतिहासाचा स्वभाव आहे .
    यापूर्वी मी भारतीय आणि लिहा वाचा , आप्पा बाप्पा , आगाशे , यांनी चर्चेत मोलाची भर घातली आहे . त्यांच्या टिपण्णी ची वाट बघत आहे .
    सभ्य चर्चा हि नेहमीच वाचनीय ठरते . आप्पा आणि बाप्पा यांची विनोदी शैली चर्चेत नवा खुमार आणते .

    ReplyDelete
  4. बाप्पा - अरे आप्पा , कुठे भरकटत चालला आहेस . संजयाने शुद्रावर लेख लिहिला आहे .
    आप्पा - मी दुसरेच ऐकत होतो -आत्ता विनय सहस्त्रबुद्धे आणि काँग्रेसचे महाजन यांची चर्चा झाली झी वर . किती व्यापक आणि संयमित होती , अगदी आदर्श ." पटेल समाज आणि आरक्षण "- ते असो . मी काय म्हणतो , आपणहून कुणी शुद्र होत नाही , शुद्र कुणाकडून तरी ठरवले जाते . जो जिंकतो तो जेत्याला जीवानिशी मारत नाही तर ,जगवतो आणि समाजाची हलकी कामे देतो - हि आपली इथली संस्कृती ,
    बाप्पा - त्याउलट उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत सरसकट मूळ समाजाचे शिरकाण झाले . कोणती संस्कृती श्रेष्ठ ?
    आप्पा -हजार वर्षे मूलनिवासी लोकांवर मुसलमान लोकांनी आपला धर्म लादला , पण मूळ निवासी लोकांचा धर्म संपला नाही .तो नव्या जोमाने फुलत आहे .
    बाप्पा - म्हणजेच एका अर्थाने वैदिक धर्माने शांततेने मूलनिवासी लोकाना आपल्यात सामावले असेच तुला सांगायचे आहे ना ?
    आप्पा - पण मूलनिवासी लोकांनी आपल्या देवता सोडल्या नाहीत , आपल्या चालीरीती सोडल्या नाहीत . हे एक वेगळेच मिश्रण होत गेले . ग्रामदेवता , जिवती , मंगळा गौरी , नवरात्र , शिवाराधना अशा अनेक पद्धतीने मूलनिवासी लोकांनी आपली जीवन पद्धती बेमालूमपणे टवटवीतपणे जिवंत ठेवली . वैदिकांचे या समाजात मिसळून जाणे हेही अगदी बेमालूम होते .
    बाप्पा - म्हणून आजही आपल्याला मुसलमान परका वाटला तरी वैदिक फारसा परका वाटत नाही . सत्य सांगायचे तर वैदिक हाच मुळी बाटला गेला आहे आणि त्याची नाळ हि पूर्णपणे या मातीशी जोडली गेली आहे . पारशीही इतके नाही एकरूप झाले !
    आप्पा - हाच वैदिक आणि मुस्लिम यांच्यातील फरक आहे !

    ReplyDelete
  5. जर टिळकांचा ध्रुव सिद्धांत चालतो तर या लेखातील शुद्र विषयक थियरी अमान्य करण्याचे काहीच कारण दिसत नाही. परंतु ती अधिक सुस्पष्ट व तपशीलवार हवी. संक्षिप्त नाही.
    क्षत्रिय – खतिय यांतही काही फारसे दोषास्पद वाटत नाही. जर वेदांत ‘ क्षत्रिय ‘ शब्द न येता ‘ राजन्य ‘ येतो तर मग क्षत्रियाची उपपत्ती शोधणे अत्यावश्यक बनते. अर्थात, प्रचलित संस्कृतमधून क्षत्रियाचा शोध घेतल्यास अनेक अर्थ व उपपत्ती मिळतील परंतु त्याकरता मुळात वेद संस्कृतमध्येच लिहिल्याचे सिद्ध करावे लागेल. जे सध्या तरी शक्य नाही.
    वैदिक धर्मियांनी इतरांवर लादलेल्या निर्बंधांचा विचार करता जशी त्यांनी हिंदू / शैव धर्मियांवर लादलेली बंधने त्या लोकांनी जुमानली नाहीत तद्वत वैदिकांनीही आपल्या नीती – नियमांचे पालन केल्याचे दिसून येत नाही. उदाहरणार्थ मनुस्मृतीच्या कित्येक निर्बंधांचे आपद्धर्माच्या नावाखाली सोयीस्कर उल्लंघन केल्याचे शेकडो दाखले इतिहासात नमूद आहेत.
    परंतु ‘ असुरद्र ‘ म्हणजेच शुद्र असं जे आपण लिहिलं आहे तर या ‘ असुरद्र ‘ चा अर्थ काय होतो व तो कोणत्या भाषेतील शब्द आहे याचा खुलासा व्हावा हि विनंती !

    ReplyDelete
    Replies
    1. ध्रुव सिद्धांत कचऱ्याच्या टोपलीत कधीच गेलाय. क्षत्रिय हा शब्द क्षति अर्थात क्षतः अर्थात शस्त्र ह्या समानार्थी शब्दाने आलेला आहे. क्षत म्हणजे खड्डा, भोक! तो जर क्षेत्रीय असला असता तर आधीच संस्कृतकर्त्यांनी तसाच वापरला असता. शुद्र हा शब्द शौच ह्या शुचिता ह्या शब्दावरून आलेला आहे. त्यालाच आपण आत्ता स्वच्छता असे म्हणतो. संस्कृत चा अभ्यास वाटतो तितका सोपा नाही.

      Delete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. अविनाश साहेब , मला असे म्हणायचे आहे की मी आपणास काहीच बोललेलो नाही वैयक्तिक रित्या ,
    आपण आपल्या अंगास उगाच चिकटवून घेत आहात !
    मी उदाहरण दिले की आपल्या गल्लीत दुसऱ्याच्या जागेत जाउन धुडगूस घालणाऱ्या माणसाला काय म्हणतात ते . त्यात तुम्हाला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता . आपण क्षमाशील आणि समजूतदार आहात हे आम्ही पेपर गल्लीकर अनुभवतो आहोत . आपण नवीन सुरवात करुया !
    जुने जाउद्या मरणालागुनी जाळून किंवा पुरुनी टाका असे केशवसुत म्हणायचे . ! (१८६६-१९०५)
    कृष्णाजी केशव दामले - म्हणजे बापरे , म्हणजे कोकणस्थ ?
    आज तर तुम्ही संजय सोनवणी सारख्या सज्जन माणसाला , काय बोलत आहात ?
    "भिकारचोट "ब्लोग लेखक ?- हे अतिशय दुःख दायक आहे , आपण खरेतर असे लिहू ,नका अशी नम्र विनंती ! आपण आपापले अहंभाव घेऊन इथे जमलो तर काहीच साध्य होणार नाही .

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. काका काका , असे एकदम खाडी फोडायची भाषा केली की खूप खूप भीती वाटते .
    तुम्हीपण बोलताकी अगदी तस्सच !किंवा त्यापेक्षाही जास्तच .
    काका अस करू नका आपल्या पाटसकर नावासाठी तरी असं करू नका . लोकाना धमकावू नका ! एखाद्या ब्लोग्वरून अशी शिवीगाळ करणे , किंवा धमकावणे शोभत नाही आपल्या सारख्या उच्च विद्या विभूषित आणि परदेश गमन करून आलेल्या आमच्या काकाना !
    काही काही लोक इथे मनापासून लिहित असतात . मी भारतीय , आगाशे , लिहा वाचा हे कसे लिहितात आणि त्यांचा सुद्धा कधी कधी संयम का सुटतो ? ब्लोग लेखकाला तर भिकारचोट म्हणणे म्हणणे कहरच झाला . मी आपल्या पेक्षा खूप लहान आहे . माझी इतकी विनंती मान्य करा ! ! !
    राखी पौर्णिमा आली काका !

    ReplyDelete
  12. वैदिक संस्कार, वेदांचे अधिकार फक्त तीन वर्णांनाच आहेत हे सत्य सर्वांना माहित आहे. म्हणजेच हे तीनच वर्ण वैदिक धर्माचे आहेत. शूद्र वैदिक असते तर त्यांनाही हे अधिकार काही प्रमाणात का होईना असते हे उघड आहे. पण तसे धार्मिक वास्तव नव्हते व नाही. >>>>>बदरी व संस्कार गणपती या ग्रंथानी शुद्राला उपनयनाचा अधिकार आहे असे म्हटले आहे तसेच शुद्र यध्न्या मध्ये भाग घेउ शकत होते ( शतपथ ब्राह्मण ) जैमिनिने असे म्हटले आहे की शुद्राना वैदीक यध्न्य करण्याचा अधिकार आहे तसेच कात्यायन श्रौत सुत्र 1-4-16 याच्या टीकाकारने असे कबुल केले आहे की शुद्राना वैदीक विधी करण्याचे अधिकार आहेत

    ReplyDelete
  13. शूद्र हे तीन वर्णांबाहेरचे लोक हे मत, अगदी बाबासाहेबांचे मत गृहित धरले तरी स्पष्ट होते. ब्राह्मण एवढे प्रबळ होते कि ते अगदी सर्वच (संख्या कितीही असो) क्षत्रियांचे उपनयन करायचे थांबवतील एवढे शक्तीशाली होते हे मत आता पुराव्यांवरुन टिकत नाही. >>>>>>मुळात सर्वच क्षत्रियांच उपनयन करण्याच ब्राह्मणानी नाकारल हे बाबासाहेब कुठेच म्हणत नाहीत बाबासाहेब क्षत्रियान्मधे अस्णारी एक टोळी शुद्र ( सोदरी च शुद्र झाले असावे अस मला वाटते ) फक्त तिचे उपनयन नाकारण्यात आले आणि त्याना चौथ्या स्थानावर ढकलण्यात आले व त्या संघर्षात जे बंधने निर्माण झाले ते हिंदु धर्मातील शुद्र त्यांच्या पर्यत विस्तार कालांतराने घडवुन आणण्यात आला असे बाबासाहेबांच मत आहे या ग्रंथाच नेमका अर्थ शरद पाटला ना समजला आहे. त्यांच्या खंड 1 मध्ये आंबेडकरांच्या ग्रंथाचा अर्थ सांगितला आहे ( मि शरद पाटलांच ग्रंथ वाचण्यापुर्वी बाबासाहेबांचा ग्रंथ वाचला होता आणि माझ हइ मत शरद पाटलांसारखच होत आणि आहे )

    बाबासाहेब आपल्या प्रस्तावनेत म्हणतात - " शुद्रांच्या प्रश्नाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या प्रश्नाचा मध्यवर्ती बिंदु शुद्र लोक होत नाहीत . तर त्यांच्यावर ज्या देहदंडाची व निर्बंधांची कायदेशीर पद्धत लादण्यात आली आहे ती पद्धत त्या प्रश्नाचा मध्यबिंदु ठरते " म्हणुन बाबसाहेब ते निर्बंध कसे निर्माण झाले या प्रश्नाच्या शोधार्थ हा ग्रंथ लिहतात

    बाबासाहेब पुढे म्हणतात - " मुळच्या शुद्रांसाठी जे कायदे कानुन केले गेले होते ते कायदे कानुन मुळचे शुद्र अस्तित्वात राहिले नाहित तरी अस्तित्वात राहिले व मुळच्या शुद्रांशी ज्यांचा कसलाही संबंध नाही अशा हिंदु समाजातील सर्व कनिष्टह दर्जाच्या लोकाना सध्या ते कायदे कानुन लागु करण्यात आले "

    ReplyDelete
  14. शुद्रानी आपली अधोगती कशी हौउ दिली ह्या आक्षेपासाठी बाबासाहेब उत्तर देतात - " सध्याच्या हिंदी समाजाची जी लोकसंख्या आहे त्यात जास्त भरणा शुद्रांचा आहे यावरुन असे अनुमान जर काढले की पुर्विच्या आर्य हिंदी समाजाच्या लोकसंख्येत शुद्रांचाच भरणा जास्त असला पाहिजे तर ते अनुमान पोषक असेच आहे परंतु असे अनुमान काढावयास मुळीच वाव नाही कारण की हिंदी aआर्य समाजातील शुद्र हे आजच्या हिंदु समाजातील शुद्रा हुन वांशिक द्रुष्टीने अगदी वेगळे आहेत .आजच्या हिंदु समाजातील शुद्र हे पुर्वीच्या हिंदी समजातील शुद्रांच्या वंशात जन्मले नाहीत"

    म्हणजेच बाबासाहेब हिंदु समाजातील शुद्र व आर्य समाजातील शुद्र वेगळे आहेत असे सांगतात व आर्य समाजातील शुद्रांवर घातलेली निर्बंध हिंदु समाजावर हळुहलु लाद्ण्यात आली असे सांगतात. या निर्बंधाची निर्मिती शोधण्यासाठी लिहलेला ग्रंथ आहे

    या ग्रंथानंतर बाबासाहेबानी सिद्धांतात फरक केला नाही तरी त्यानी एक मत मात्र बदलेल आहे ते म्हणजे आर्य समाजातील शुद्र हे हे हिंदुसमाजातील शुद्रांमधुन च धर्मांतरीत झालेले होते व असच kकाहीस मत महात्मा फुले यानी मांडलेल आहे व यासाठी धर्मग्रंथात पुरावा देखील आहे -

    1 अथर्ववेद 15-8-1(Muir Vol 1 p.22) " तो (व्रात्य) काममोहीत झाला व तेथुन राजन्य उत्पन्न झाला "

    2 अथर्ववेद 15-9-1 (Muir Vol 1 p.22) " या बद्दलचे द्न्यान असलेला व्रात्य जरeएखाद्या राजाच्या घरी पाहुणा म्हणुन आला तर तो राजापेक्षा श्रेष्ठ आहे अशी राजाने जाणीव करुन द्यावी व तसे वागण्यास त्याला भाग पाडावे. असे केल्याने राजा स्वताच्या इभ्रतीला कींवा राज्याला जे बांधक होइल असे काही करत नाही .त्याच्या पासुन ब्राह्मण व क्षत्रिय उत्पन्न झाले . ते म्हणाले आम्ही आता कशात प्रवेश करावा ?"

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा -आदरणीय निशांत ,आपले लिखाण वाचून अतिशय आनंद झाला , कात्यायन आणि
      जैमिनीने शुद्राना वेद अभ्यासण्याचे अधिकार दिले आहेत हे वाचून खरोखर आनंद झाला .
      बाप्पा - आम्हीतर म्हणतो , भारतीय घटनेने आज आपल्याला हा अधिकार दिलेलाच आहे , पण आपण हजारो वर्षापूर्वी हा अधिकार वैदिकांनी दिलेलाच होता असे मत मांडून एक क्रांतिकारक विचार मांडला आहे .
      आप्पा - खरेतर आपण अनेक ग्रंथांचे पुनर्संस्करण करून कालानुसार दुरुस्ती करून बदल करायला काहीच हरकत नसावी ,ख्रिश्चन चर्चने सुद्धा असे बदल केले आहेत . आपला भारत देश तरअसे बदल करत जीवन जगण्यात उत्तम मार्ग सांगू शकेल. आज खरी गरज त्याचीच आहे . जे फेकून देण्यासारखे आहे ते फेकून देत नव्याने मांडणी झाली पाहिजे . भाषा सोपी झाली पाहिजे , संत ज्ञानेश्वरानीही अशीच मांडणी करत भक्तीचा मार्ग सांगितला होता .
      बाप्पा - पण आज काय दिसते . इतक्या संतांनी सांगूनही , माणूस सुधारला का ? अध्यात्म हे एक वेगळे खाते जीवनात तयार झाले . त्या त्या तिथीला त्याचे महात्म्य . असे आपले जीवन झाले आहे .
      आपण रूढी आणि संतांचा संदेश या कात्रीत सापडलेले आहोत .
      आप्पा - निशांत जाधव , आपण असेच आवडीने या ब्लोगवर लिहित जा अशी मनापासून नम्र विनंती . , आपण दाखवलेली अभ्यासपूर्ण लिखाणाची चुणूक आनंद देणारी आहे . आपण डॉ . बाबासाहेबांच्या ज्या ग्रंथांचा संदर्भ घेतला आहे त्यांची नावे दिली असती तर आम्ही प्रयत्न पूर्वक ती आवडीने वाचली असती .
      बाप्पा - आजचा काळ घटनेचे आपल्याला सोयीस्कर अर्थ लावण्याचा आहे . आणि प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याचा आहे , अशा वेळी या थोर पुरुषाने किती अभ्यास पूर्वक आपली घटना लिहिली आहे ते पाहून त्यांच्या बद्दल ऊर अभिमानाने भरून येतो .
      आप्पा - अगदी खरे बोललास बघ तू बाप्पा - घटनेने आरक्षण ५० % मर्यादेत ठेवले आहे हे बाबासाहेबांचे फार थोर कार्य आहे ! पटेल असोत किंवा मराठा , त्याना या मर्यादेचे भान येईल त्यावेळेस भडक प्रचारी आंदोलने बंद हतील !
      आप्पा आणि बाप्पा - परम मित्र निशांत यांचे अभिनंदन !

      Delete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. संजय सर मला राहून राहून असे मांडावेसे वाटते की आज जितक्या आत्मीयतेने महाराष्ट्रात रक्षाबंधन साजरे केले जाते तितके छत्रपति शिवाजी महाराज काळात साजरे होत होते का ?आपण हजारो वर्षांच्या पूर्वीच्या मोहनजो दारो बद्दल सखोल अभ्यास करून मते मांडली आहेत , आपण रक्षा बन्धनाबद्दल काही ताजे लिहाल का ?
    मला आपल्या अनेक सणांबद्दल संत वाग्मायात दाखले मिळाले आहेत , त्यामुळे ते सन मराठी माणसांच्या हृदयाचा ठेवा होते असे स्पष्ट होते . पण संत वाङ्ग्मयात कोठेही रक्षाबंधन बद्दल उल्लेख नाही , उपमा अलंकार म्हणूनही नाही , संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , एकनाथ , गोरोबा , चोखामेळा , जनाबाई , मुक्ताबाई कोणीही या सणाबद्दल बरा हि काढत नाहीत , किंवा राजकीय कागद पत्रातही हा सण गायबच दिसतो ,
    मग हा सन इथे रुजला कधी हा नक्कीच संशोधनाचा विषय होतो - नाही का ? आज लाखो रुपयांची उलाढाल महाराष्ट्रात या दिवशी राखी या नावाखाली होते . त्याचा आणि आपल्या शिवशाहीचा काहीच संबंध नाही , लोकमान्य टिळक , महात्मा फुले , डॉ आंबेडकर , म. गांधी यांनी कधी रक्षाबंधन केल्याचे ऐकिवात नाही . म्हणजे अगदी अलीकडे पर्यंत या सणाला प्रतिष्ठा नव्हती असे दिसते , पण त्याचवेळी नारळी पौर्णिमा या सणाला एक वेगळे महत्व आहे , कोकण किनारपट्टी तर या पौर्णिमेला फार मानते , अशावेळी राष्ट्रीय ऐक्याचा आणि कुणातरी मुस्लिम राजा आणि राजपूत राणी यांचा संदर्भ देत हा सन आपल्या महाराष्ट्रात चंचू प्रवेश करता झाला का ?
    संजय सरांनी एक अभ्यासाचा विषय म्हणून जर हि बाब खोलात जाउन मांडली तर फारच बरे होईल आणि मराठी बांधवाना , जरा माहितीही मिळेल .

    ReplyDelete
  17. हिंदू धर्म म्हणजे वर्ण आणि जातींचा धर्म आहे असे म्हटले तर काही वावगे ठरू नये. शूद्र वर्ग कधीही हिंदू नाही कारण त्यांचा उपनयन विधी होतच नसतो . धर्म शास्त्रे जर तपासली तर ज्या माणसाचा उपनयन विधी होईल तो हिंदू पण उपनयन विधी नाकारल्या मुळेच शूद्र वर्ण अस्तित्वात आला .म्हणजे ते हिंदू उरतच नाही.कागदोपत्री जरी ते हिंदू म्हणून वावरत असले तरी हिंदू शास्त्रांप्रमाणे ते हिंदू ठरत नाहीत .म्हणजे ते ज्या धर्माला आपला मानतात त्या धर्माची शास्त्रे त्याला आपल्या पासून वेगळे अस्तित्व देतात . ह्या धर्माबाहेर ढकललेल्या लोकांना हिंदू धर्माला चिकटवून ठेवण्यासाठी ब्राम्हणी व्यवस्थेने ह्यांच्या साठी पुराणोक्त पद्धत तयार केली. न त्यांच्या समारंभात वापरली . ते जर ह्या धर्माचे असते तर त्यांना शास्त्रे शिकवण्यासाठी हिंदू व्यवस्थेने अडचण केलीच नसती पण इतकी साधी गोष्ट पण लक्षात येऊ नये हे विशेष कदाचित धर्माचा पगडा , न श्रद्धा न अंधश्रद्धा ह्या चक्रात अडकल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होत नसावी . हिंदूंची सेवा करण्यासाठी निर्माण केलेला वर्ग तो शूद्र .असो कधीतरी त्यांना ह्यातील सत्य कळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही . पण व्यवस्थेने लाथ मारलेली असतांना सुद्धा त्यांच्याशी प्रामाणिक राहण्याचे इतर उदाहरण भारताशिवाय इतर देशात भेटणार नाही हे नक्की .

    ReplyDelete
  18. संजय सर ,
    बेडेकर बाईंनी चर्चा जरी शुद्र या विषयावर असली तरी आजच्या नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर एक नवीन उपविषय मांडला आहे त्याबद्दलही चर्चा झाली तरी ते शोभूनच दिसेल
    विशेषतः बेडेकर बाईना हा मुद्दा जाणवला हेच विशेष !
    आज एकेका हातावर १० - १० राख्या बांधत मोटार सायकल वरून तरुण फिरताना दिसतात . आणि त्याला काय इतिहास आहे असे कोणाला वाटले तर ते नक्कीच कुतुहला पोटी विचारले आहे असे समजून त्याचा खुलासा कोणीतरी करावा ही अपेक्षा आहे . आजकाल कोणताही उत्सव लगेच लोकप्रिय होतो तसेच याचे आहे . समाजात कोणती पोकळी या राखी बंधनाने भरून निघाली ? कारण आपल्या मराठी समाजात , सर्व जातीमध्ये लोकप्रिय आणि परंपरा असलेला भाऊ बहिण नात्याचा सण आहे तो दिवाळीतला भाऊबीज आहे हे आठवले तर मग हा राखीचा सण कसा कधी आणि कुठून आला ? त्याची सुरवात मुंबई सारख्या मिश्र समाजातून झाली का ? गुजराथी आणि राजस्थानी मारवाडी समाजातून तो इतरत्र पसरला का ? संजय सर आपण किंवा मी भारतीय किंवा लिहा वाचा हे या बाबतीत काही लिहितील अशी आशा करुया !

    ReplyDelete
  19. आप्पा - राखी पौरीमा हा सन मराठी लोकांचा नाहीच , आजकाल जसे व्हेलेंटाईन किंवा फ्रेन्डशिप डे साजरा करतात तसा काही उच्चभ्रू गुजराथी सिंधी कुटुंबात हा सन साजरा होत असेल , कारण आम्ही रहातो त्या गिरगावात नारळी पौर्णिमा हा जास्त लोकप्रिय असे , वारली पासून वासी पर्यंत सागराची पूजा हीच महत्वाची ,
    बाप्पा - पाटसकर यांनी हा प्रश्न अतिशय सजगपणे विचारला आहे . खरोखर दिवाळीतली भाऊबीज हाच आपली खरा भावा बहिणीचे नाते सांगणारा दिवस . लहानपण आठवते त्यावेळी पहिले ३ दिवस कंटाळवाणे वाटत असत , नरक चतुर्दशीला उगाच भल्या पहाटे थंडीचे उठून गारगार उटणे अंगास फासले जात असे , पण खरा आनंद मिळायचा तो भाउबिजेला न! आपापल्या ताईला भेटायला भाऊ उत्सुक असत .
    आप्पा - आता सगळेच बदलत गेले . दिवाळी आली हि हवेतला गारवा सांगत यायचा , चला फटाके यादी करा . नवे कपडे घेऊया , नवा रंग काढूया . गिरगाव आणि दादरला एकाच धुमाकूळ असायचा . असो . गेले ते दिवस !पण काहीही म्हणा , राखी पौर्णिमा कधी ओवीत भेटली नाही की अभंगात दिसली नाही , सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती , ओवाळीते भाउराया , वेड्या बहिणीची वेडी ही माया - असे अस्सल मराठी गाणे राखीबद्दल कधी ऐकले नाही , राखी पौर्णिमा आली ती सिनेमातून !

    ReplyDelete
  20. सोनावणी तुम्ही या पाटस्कर, आप्पाबापा, अमित असल्या भिकार लोकांना सहन कसे करता? ते लिहावाचा, झेन वगैरे छान लिहितात. लेख काय आणि हे लोक बरळतात काय...छी...किळस वाटते या लोकांची. हाकला यांना. उगा आमचा रसभंग होतो.

    मीरा भोईटे

    ReplyDelete
  21. शिव रूद्र यांना मानणारे ते शूद्र आहेत आर्य शिवपूजक नाहीत ते शैवांचा शूद्र म्हणून उल्लेख करू शकतात, अग्नी पूजक आर्य हे मूळ इराणी/पारशी आहेत सुपीक भूमीच्या शोधात ते समृद्ध भारताकडे आले आहेत. वर्ण व्यवस्था ही मुळ भारतातील समजरचना आहे. योग्यता असणारा कोणीही त्या योग्यतेच्या वर्णमध्ये प्रवेश करू शकत होता. परंतु आर्यांनी देशात प्रवेश केल्यानंतर वरील तीन वर्णामध्ये त्यांची संख्या वाढविली व पराजित वर्गास प्रथम सेवक वर्गात सामील केले त्यानंतर स्थानिक वर्गास हळू हळू या तीन वर्णतून निष्कासित केले व धर्मसत्ता राजसत्ता अर्थसत्ता यावर पूर्ण वर्चस्व मिळवून सर्व सत्ता ताब्यात घेतली यासाठी शेकडो वर्षांचा काळ गेला आर्यांनी वर्ण व्यवस्थेची लवचिकता संपवून टाकली, असे करणे हे चिरंतन सत्तेसाठी आवश्यक होते ते त्यांनी केले कोणत्याही समूहाने सत्तेसाठी जे केल असत ते त्यांनी केलं आहे. आत्ताही तेच घडत आहे. फक्त ज्यांची सत्ता गेली व ज्यांना मिळाली त्यांचा चस्मा वेगळा असल्याने प्रत्येकाला वेगळं दिसतं बाकी काही नाही.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...