Tuesday, October 13, 2015

अरे साशंक जंतुंनो ....

राखोळलेली
मयत इतिहासाची
गळलेली हाडे चघळत
त्या हाडांच्या कणाकणात
भरलेल्या
आता वासही न मारणा-या
नसलेल्या इतिहासाची
विकृत घाण पोटात गिळत
त्याची नशा मस्तकात भिनवणारे
त्याची धिंड काढणारे
आणि त्याच धिंडीलाच "गौरवगाथा" म्हणनारे...
कशाची हाडे चघळत आहेत?
त्या हाडांची जनुकीय चाचणी केलीय का?
ते हिंदू धर्माची व्याख्या करत नाहीत, कारण
त्यांनाच ती प्रचंड अडचणीची आहे
कारण तेच मुळात हिंदू नाहीत!
ते म्हणतात...हिंदू ही जीवनपद्धती...
ठीक आहे...
पण लेको, कोणाची जीवनपद्धती?
धर्म नसेल तर मग कोणत्या धर्माबद्दल गळे काढताय?
संस्कृती म्हणता तर कोणाची संस्कृती?
जर "वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म"
तर लेकाच्यांनो
गाय-बैल आज
कोणी खात असेल तर तो तुमचाच वैदिक धर्म
किंवा संस्कृती
किंवा जीवनपद्धती जी होती
तीच पाळतात की...
ते तर तुमचे भावबंद व्हायला हवेत
ओरडताय कशाला विकृतासारखे?
कशाला मारकाट करत सुटलात किंवा
तशा वल्गना करत सुटलात?
कशाला हिंदुंच्या कळपात लांडगे होता आहात?
आणि हिंदू धर्म हा तुमच्या दावणीला बांधलेला नाही
आमच्या धर्माचे तुम्ही नव्हते
आणि नाहीत
उगा हा धर्म आणि तो धर्म
असले फुकाचे धर्म आम्हाला शिकवू नका
पहिले
हिंदू धर्मातून चालते व्हा!
आम्हाला इतिहास आहे
इतिहास नसलेले
आपले मूळ नेमके काय
हे माहितही नसलेले
युरोपियनांसारखेच तुम्हीही
बेसलेस आहात
म्हनून तुमच्या मुळाच्या शोधात असता
कधी हे मूळ तर कधी ते...सोयीच्या कोलांटौड्या मारत राहता...
अरे साशंक जंतुंनो
आम्हाला असला फालतू प्रश्न कधीच पडला नाही
कारण आमची नाळ आमच्या भुमीशी आहे...
तुमची नाही!
आणि बांडगुळांना शेवटी कोणती संस्कृती असते?
कसली जीवनपद्धती असते?
तुमचा धर्म, तुमची मुळे तुम्ही अवश्य पहा...शोधा
पण आमच्या धर्मात, आमच्या सहिष्णू वैचारिकतेला
विकृत करू नका
तुमचा धर्म तुम्ही पहा
आम्हाला आमचा धर्म आणि संस्कृती
आणि मानवतेचे गाभारे
जपू द्या
त्यात वीष कालवू नका
ही मानवतेची विनंती आहे...
कोणालाही अमानवी
बनवायचा प्रयत्नही करू नका...
असे सातत्याचे प्रयत्न
तुमच्याच
अंगावर उलटू शकतात
हेही लक्षात घ्या
जर थोडी जरी सुज्ञता असेल तर!

9 comments:

  1. खरे आहे संजय सर मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी हडप करायची स्पर्धाच लागली आहे. शिवसेना तिकडे जवान सीमेवर मारले जातात म्हणून इथे मुंबईत लोकांच्या तोंडाला काळे फासते, पण त्यांना जवानांची खरेच किती काळजी आहे कि राजकीय, आणि सामाजिक दहशत माजवून स्वतःचा फायदा साधायचा आहे? इकडे दुष्काळ पडला म्हणून आपल्याला शेतकऱ्यांचा कळवला आलाय म्हणून आपण दुष्काळ पडला कि सरळ गाई-गुरे शेतकऱ्यांनी कापून खाव्यात अर्थात कसायला विकाव्यात हे बौद्धिक पाजळताहात. खरेतर जवानांना काय वाटते किवा शेतकऱ्यांना काय वाटते ह्याच्याशी कोणालाही देणेघेणे नाही. त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत फक्त राजकीय बांधणी चालू आहे असे आम्हाला सामान्य लोकांना वाटू लागले आहे.

    ReplyDelete
  2. बाप्पा-मूळ मुद्दा तोच आहे बर का आप्पा ,संजय स्वतःला निरीश्वरवादी समजतो आणि त्याचा त्याला अभिमान आहे
    आप्पा-मग त्याचा हा आरडाओरडा का चालू आहे ?भारतात आता वैदिक आणि शैव चालीरीती यातून गेली १००० वर्षे मिश्र धर्म चालू आहे , काळानुसार त्या चालीरीती हळूहळू आधुणूक रूप घेत जातील , खरे नागोबा गेले म्हणून मातीचे येतील ,नदीचे प्रदूषण सहन न झाल्यामुळे आपण हौदात विसर्जन करतो आणि शेजारी सनातनचे कार्यकर्ते बोर्ड घेऊन उभे असतात त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही ,आता मंगळागौर वगैरे बाद होत आहेत जागा नाही आणि वेळ नाही इच्छा नाही .
    बाप्पा- वैदिक धर्म आणि बहुजनांचा धर्म यांचा सुंदर मिलाफ गेली १००० वर्षे आपण बघतो आहोत, भारतात कोणत्याच धर्माने कडवेपणा शिकवला नाही ,त्यामुळे मुस्लिम आपणास कायम परके वाटत रहातील , पण एखादा ए आर रेहमान फतव्या विरुद्ध बोलू लागला की बरे वाटते .
    आप्पा- आज खरेतर शिवसेनेबद्दल विरोधात कुणीतरी अभिनेता बोलेल असे वाटत होते पण अगदी बाबा आमटेंचा वारसा सांगणारा नाना पाटेकर सुद्धा गप्प बसतो म्हणजे काय ?कोणताही लेखक आज सेनेबद्दल निषेधाचे बोलत नाही - असे का ?आपल्या इथे मेणबत्या जाळत फिल्मी निषेध व्यक्त करायची फ्याशन झाली आहे. पण शिवसेनेबद्दल बोलायला जावेद अख्तर वा शबानाला वेळ नाही ,धारिष्ट नाही. नसलेले मुद्दे उकरत बसण्यात संजय वेळ घालवतो , मुळात वैदुक मूर्तिपूजक नव्हते हा किती थोर मुद्दा आहे , पण कदाचित नंतर वैदिक पुरोहित भ्रष्ट झाले असतील पण त्यांच्या मूळ वृत्तीचे कौतुक करायला तो टाळतो .त्याची गाडी बौद्ध जैनांकडे जाउन विसावते . हा काय प्रकार आहे ?
    आज महाराष्ट्रात काय किंवा दक्षिणेत काय , कोणालाही या विषयात स्वारस्य नाही,त्यामुळे शैव वैदिक वाद उभाच राहू शकत नाही , कारण आपला तथाकथित हिंदू धर्म हा मिश्र धर्म झाला आहे .
    बाप्पा - त्याला सारखे दुभाजानाचे स्वरूप देणे हास्यास्पद आहे . आपले सण, चालीरीती,आणि जीवनपद्धतीत जमीन अस्मानाचा फरक पडला आहे ,पडत आहे , आज कोणीही ब्राह्मण संध्या करत नाही, मराठा समाज तलवारीवर लिंबू फक्त लग्नात ठेवून मिरवतात, शिक्षणाने आजकाल जात ठरते आहे , अंतर जातीय लागणे होत आहेत , अशावेळी त्याचे स्वागत न करता वारंवार अशा भावना व्यक्त करणे म्हणजे स्वतःची फसवणूक आहे .

    ReplyDelete
  3. संजयचे हे नक्राश्रू आहेत . अगदी १००%!
    असे पहा . एकसारखे एकामागून एक एखाद्या भूभागात वसाहती होत असतात , कधी सामोपचाराने तर कधी बळजबरीने , वैदिक इथे जसे आले तसेच नंतर मुसलमान आले असे मानले तर ? त्यांनी आपली मंदिरे पाडली , विचार परिवर्तन करून नाही तर बळजबरीने आपणास बाटवले , पण आपली त्याबद्दल काहीच तक्रार नाही .
    वैदिक इथले असोत की बाहेरचे - त्यांनी त्यांची संस्कृती लादली का ?
    जर ते मुसलमाना सारखे इतराना जिंकून इथे ठाण मांडून राहिले असतील तर पराभूताला कसला आलाय निवडीचा हक्क ?इथले हिंदू जर मुसलमान संस्कृतीविरुद्ध जागृत होतात तेंव्हा त्याना आजही धर्मांध मानले जाते - हा कसला दुतोंडीपणा आहे संजयजी ?आणि त्याच हिंदुनी वैदिकांबद्दल कडवटपणाच बाळगला पाहिजे हा हट्ट काय आहे ? हे तर्कशास्त्रच विकृत आणि अजब आहे.शांत विचार करा !तुम्ही कोणाच्या हाताचे खेळणे झाला आहात ?इतक्या स्वस्तात ?
    फार पूर्वी सेंट थोमस इथे केरळात आला त्याने बाटवले लोकांना त्याबद्दल तुमचे म्हणणे काही नाही.वैदिकांनी हिंदुंवर त्यांचे विचार लादले तर मात्र भाषा बदलते -
    सुफी लोकांचा खरा इतिहास पाहिला तर ते काय कौतुकास्पद होते काय ?पूर्वीच्या काळी येनकेन प्रकारेन पराभूताना आपल्या विचारधनाचा आणि प्रवृत्तीचा स्वीकार करायला लावायचा ही परंपरा होती.आता प्रश्न असा आहे की,आपण ज्याला वैदिक आणि सनातनी अशी मखलाशी करून नावे ठेवत आहात तो चक्क "ब्राह्मण विरोध " आहे. किंवा सोयीसाठी पुरोहित विरोध आहे.

    आता तपासून बघुया की आज खेडेगावात सत्ता कोणाची आहे ? मराठा वर्गाची ! त्याना ब्राह्मण सलतात ते का ? त्यांच्या निरंकुश सत्तेला तेच आव्हान देऊ शकतात !खरा लढा ब्राह्मण मराठा असा आहे, इतर वर्ग मराठा समाजाचे आज आर्थिक गुलाम आहेत , युपी बिहार महाराष्ट्र गुजराथ कुठेही हेच चत्र आहे. आज ऊस तोडणीला त्याना मनुष्यबळ लागते ते काय ब्राह्मण थोडेच असते ?ते इतर जातीचे असते आणि त्यावर त्याना आपले कायमचे वर्चस्व हवे असते. हा काही नवा शोध नाही - हे पूर्वापार चालत आलेले सामाजिक वास्तव आहे , पण ते लापवण्यासाठी ब्राह्मण विरोध करत राहायचे हे तंत्र काँग्रेसच्या मुशीत यशवंतराव यांच्या पासून सुरु झाले. पवारांनी त्याचा कळस गाठला.सत्ताधीशाला जी निरांकुशता हवी असते त्यात त्याना विचार करणाऱ्या वर्गाची अडचण होते म्हणून त्याना बदनाम करायचे काम हा वर्ग पैसे दवून करून घेत असतो , संजय सोनावणीचे विचार हे मूलभूत चिंतनातून आलेले वाटत नाहीत.
    संजय सारखे वांझोटे तत्वज्ञान सांगणारे हे अशा सत्तांना विकले गेलेले असतात.
    वैदिकांनी केले नसतील असे अत्याचार मुसलमानांनी केले त्याविरुद्ध छत्रपति उभे राहिले आणि त्यांनी ब्राह्मण मराठा आणि बहुजन समाजाची नेतृत्वाची एकत्र फळी तयार केली, पण ब्राह्मण द्वेष इतका नसानसात भिनवायचा प्रयत्न ना ना मार्गाने होत आहे की लोकाना समजत नाही की इतका द्वेष कशा साठी ?ज्यांनी छत्रपतींच्या काळा पासून आजवर हिंदू स्त्रियाना आपल्या जनानखान्यात खेचले , बाटवले त्याना निधर्मिपणाच्या भोंगळ विचारांनी क्षमा करायची आणि आपल्या शेतकरी वर्गाच्या वरच्या बेलगाम सत्तेच्या आड येणाऱ्या ब्राह्मण वर्गाच्या बद्दल ओरड करायची हा पवित्रा कशा साठी ?

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. hidden ajendya वरील वास्तव दर्शन म्हणावे लागेल. या सर्व घटनांच्या निमित्ताने निदान सामान्य माणूस जो भाबडेपणाने /सांस्कृतीक गुलामगिरीत आहे हे तो अजुनही मान्यच करायला तयार नाही. किंवा असला तर तो हतबलतेने केवळ कुजबूजतो व गप्प बसून आहे. त्याच्या गरजा वेगळया आहेत. त्याला जगायचे आहे. त्याला हया वादात इन्टरेस्ट राहिला नाही.. तो नव्या जगाबरोबर चालू पाहतो. त्या क्षितीजाबरोबर जाऊ इच्छितो ज्यामध्ये त्याची कुटुंबाची प्रगती ज्ञान पैसा कार्यक्षमता वाढेल व रोजचे जगणे सुलभ होईल. अर्थात या राजकीय भानगडीत तो ओढला जात आहे. मात्र त्याला याबाबत काहीतरी भूमिका घ्यावीच लागेल. मात्र त्यात त्याची गरज सोय बघता भूमिकेत संदिग्धता/अनियमतता /अधिक खरे बोलण्याचा भाबडेपणा न करता आपले ते बरे असणार आहे. हे सारे अव्याहतपणे अनियमितपणे चालूच राहणार आहे. कधी ते अतिशय काटेकोरपणे कधी अत्यंत अजागळपणे स्वत:च्या सोयीने सगळे वागणार आहेत. कवितेतील मागणी योग्य असली तरी हजारो वर्षांपूर्वीच ती दैवते/ परंपरा हायजॅक झाली आहेत. जा एकदा एकविरेला , लेण्याद्रीला अजून त्याही आधी. माझे म्हणणे आहे केवळ भक्ती श्रध्दा यातून पोटभरु परंपराच पोसल्या गेल्यात. खऱ्या जाणीवा शिकवण यासुध्दा ओळखणाऱ्या नव्या पिढया येणार. तुम्ही आम्ही गप्पगार आहोतच. एक नक्की आहे जुने सारखे उगळत बसल्याने आपण आऊटडेटेड झाल्यासारखे वाटते. शहानिशा करायला, ऐकायला मनोरंजक किंवा धारणेसाठी जरी ते योग्य वाटत असले तरी नवी दिशा व झेप घेण्यासाठी लागणाऱ्या ताकदीला अवरोधकारकच आहे. शेवटी सांकृतिकरणामध्ये त्या त्यावेळचे वेगवेगळे दिशांचे विचारसरणीचे सक्षम प्रवर्तक प्रचारक गरजे प्रमाणे आवश्यक असलेले घटक येणारच. इस्लाम काय, किंवा युरोपियन जे जे चांगले ते ते ही भारतीय संस्कृती नव नविन पिढयांद्वारे स्वीकारत राहणारच. ते कालसुसंगत आहे. मात्र सध्या फाटाफटीने गलितगात्र झालेल्या कुटुंब व्यवस्थेची हिंदुत्ववाद्यांना गंभीर काळजी लागली आहे. हे ही तेवढेच खरे तेवढे सीरीयस मात्र सेकयुलर समजणारे लोक घेत नाहीत. संजय सरही त्यांच्या जुन्या हिंदू संस्कृतीतील या बाबीबाबत सध्या तरी विचार करत नाहीत. पण हिंदूत्ववादी किंवा संजय सर यांचेजवळही त्याचे सामाजिक मानसशास्त्रीय उत्तर नाही. जातीव्यवस्था त्यातील अत्याचाराबाबतही अजूनपर्यंतही हिंदूत्वादी सोयीस्कर मौनस्थ असतात. त्यांच्या ते आवाक्याबाहेरचे आहे कि काय असे श्रध्दा दुखावल्या, गोमास असे भडक व सोपे कार्यक्रम घेऊन हिंदूंची एकजूट करु पाहतात. मात्र अहिंसेची किंवा इतर तत्वांची प्रतिकांची उसनवारी ही प्रत्येक संस्कृतीच्या त्यात्यावेळच्या कालौघात होतच असते. त्याचे जे ते फायदे तात्पुरते का होईना होतच असतात. कविता उत्कृष्ट मर्मभेदी त्याबददल अभिनंदन. अभय, मुंबई

    ReplyDelete
  6. eka zundila virodh karnyasathi dusri zund nirman karne hi vaicharik divalkhori aahe. globalisationchya aajchya kalat he vaidik avaidik asa hasyaspad mudde kadhat aahet. ha wad purvich settle zala aahe. strisattak vyavastha hi avaidik asel tar tichya khuna aajhi aahet yacha arth vaidikani apli sanskriti ladali nahi. ya ulat abrhamni dharmache anuyayi sagale jag ekach rangat rangavanyachi swapne pahtat aani asha dharmandh lokanchi sobat ghevun inclusiveness chi lecture ithalya hajaro varshachya paramprela detat.

    ReplyDelete
  7. अभय पवार सुमती वाळेकर आणि खोत सरांचे अभिनंदन , आता वात बघायची ती लिहा वाचा यांची आणि मी भारतीय तसेच कऱ्हाडे सरांची . आप्पा बाप्पा आणि पाटसकर सरांचे विचार मौलिक आहेतच , आता प्रतीक्षा करुया नवीन विचारांची ! आणि खुद्द संजय सरांच्या समारोपाची !

    ReplyDelete
  8. Sanjay Sir !

    Kavita far far chaan !!!! manatale vichar bolalat....
    As usual lekhacha aani comments cha kahich sambandh nahiye.

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...