Thursday, October 15, 2015

माझ्या विरोधक अमुकभक्त मित्रांनो...!

माझ्या विरोधक अमुकभक्त मित्रांनो, माझे म्हणने सत्य आहे कि नाही ते सोडा. माझ्या सध्यस्थितीवरील पोस्टमधील निरिक्षणे चुकीची आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. ते अधिक चांगले राहील.
विरोधी विचारांना "गद्दार,, मोदी द्वेषी" म्हणून झिडकारता येणार नाहीत. मोदी भारतीय आहेत आणि प्रत्येक भारतियाचा आम्ही आदर करतो. ओबामांनी त्यांना पार मागच्या रांगेत उभे केले हा त्यांचा नव्हे, देशाचा अपमान होता. याचा सल भक्तांना वाटला नाही कारण ते महानिर्लज्ज आणि अविचारी आहेत हेच वरील भक्तांच्या प्रतिक्रियांवरून सिद्ध होते. "इतने बडे शहर में ऐसी छोटी-मोटी घटनाऎं होती रहती है!" असे नामुराद उद्गार काढणा-यांचा आम्ही जेवढा तीव्रतेने निषेध केला त्यापेक्षा जास्त तीव्रतेने निरपराध राष्ट्रभक्त मुसलमानाच्या धर्मांध हत्येचा करणार!
बरे ही एक घटना नाही. धर्मांध सत्तेत नव्हते तेंव्हाही ते तसेच होते पण आता तर जास्त चेकाळले आहेत. विरोध या चेकाळना-या मुर्खांना आहे आणि या चेकाळना-यांची बोलती बंद न करु शकणा-या कृतीहीन पंतप्रधानांना व त्यांच्या बेसुमार मुर्ख विद्वेशी वक्तव्ये व कृत्या करण-या मंत्र्यांना व साधू-सध्वी या अधर्मी लोकांना आहे.
राष्ट्राचे प्रश्न तसेच आहेत आणि वर निर्लज्जपणे गेल्या साठ वर्षात काय केले हा प्रश्न विचारण्याची वारंवार बेमुर्वतखोरी आहे. हे संगणक, तुमचे मोबाईल आणि मंगळावरची स्वारी काय आभाळातून पडली कि काय? पहिला अणूस्फोट घडवून आक्ख्या जगाला चकीत करना-या आणि निर्बंध लादुन घेणा-या इंदिराजी गेल्या साठ वर्षातच झाल्या ना? आण्विक तंत्रज्ञानाचा पाया नेहरुंनी घातला हे तुम्ही विसरलात की काय? आधुनिकीकरणाला सतत विरोध करत ती प्रक्रिया लांबवणारे झारीतील शुक्राचार्य कोण हे देश विसरला आहे या भ्रमात काय बरळत सुटलाय हे तुम्हाला कळते काय?
याचा अर्थ ते नेहमीच बरोबर होते असाही नाही. जेथे ते चूक होते तेंव्हा त्यांनाही झोडपले गेले आहे. माझी "सव्यसाची", "गुडबाय प्राईम मिनिस्टर", "आभाळात गेलेली माणसं", "काळोख" इत्यादि कादंब-या आणि गेल्या चार वर्षातील अर्थव्यवस्थेवरील लेख हे कोणावर टीकेची झोड उठवत होते? तुमचे सरकारच नव्हते त्यामुळे तुमच्यावर नक्कीच नाही.
पण एक फरक स्पष्ट दिसतो. कोंग्रेसवाले कधी अंगावर येत उपटसुंभांसारखे तुमच्यासारख्या येडपट, विषय सोडून प्रतिक्रिया देत नव्हते. ते समजावून घेण्याचा प्रयत्न करत. भले ते करायचे तेच करायचे किंवा अल्प-स्वल्प स्वत:त्य बदल करायचे. तुम्ही मात्र झुंडशहा आहात आणि याच झुंडशाहीला विरोध आहे हे समजायची अक्कल तुम्हाला नाही. उन्मादाची नशा ही सर्वात भयानक विनाशक असते हे तुम्हाला अजून कळालेले नाही. आणि आम्हाला भारतीय समाजव्यवस्थेच्या पायाला धक्का लावनारे असांस्कृतिक जंत तर आजीबात नकोत. त्यांना वैचारिक विरोध होतच राहणार आणि तो विरोध समजावून घेण्याची पात्रता अंगी बानवा एवढे मी नक्कीच म्हणेल.
"तुम्ही लिहू शकता, मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आलाय असे विधान कसे करता?" असा एकाने बेमुर्वत प्रश्न विचारलाय. दादरी करुन टाकु, मारुन टाकु वगैरे धमक्या मला मिळाल्यात...तुम्हा भेकडांना नाही. धमक्या देवुनच आवाज बंद करायचे, अभिव्यक्तीचा संकोच करता येईल अशी बिले पास करण्याचा (अयशस्वी) प्रयत्न करायचा...राईट टू प्रायव्हसीवर गदा आण्न्यासाठी झटायचे....हे काय आहे? तुम्ही आंधळे असाल, भारतीय नाहीत हे मला तुम्हाला ठासून सांगायचे आहे.
मला कोणी घाबरवू शकत नाही कि घाबरवून अथवा पैशांनी/पदांनी कोणाच्या विचारसरणीचा गुलाम करु शकत नाही. सर्वच प्रकारच्या सांस्कृतिक/राजकीय बाजारुंना मी विरोध केला आहे आणि करेन. असे आजही असंख्य लोक आहेत. त्यांच्या नादाला झुंडशाही करत लागु नका. भले याला इशारा समजा.
जोवर आताचे सरकार फालतू टुक्कार संदर्भहीन संघीय लाड पुरवत विकासाभिमुख कृती करत नाही तोवर हा विरोध राहणारच. पंतप्रधानांना याची जाणीव करुन देणे हे तुमचेही काम आहे. भविष्यात लिहिल्या जाणा-या इतिहासाचे विकृत खलनायक बनू नका. इतिहस तुम्हा नामर्दांना क्षमा करणार नाही!
माझ्यावर बिन्धास्त टीका करा, शिव्या द्या....कारण मी म्हणजे देश नाही. मला काहीएक फरक पडत नाही. मी माझ्याशी ठाम होतो आणि आहे. पण स्वत:ला तपासून पहा. भांग पिलेल्या उन्मादी अवस्थेत जाऊ नका...
ते आज तुम्हाला तुमच्या भल्याचे अथवा मनासारख्या हिंसक गोष्टी साध्य करण्याचे वातावरण वाटत असेल....
तर मला एकच म्हणावे लागेल...
तुमच्याएवढे देशद्रोही आणि मानवताद्रोही कधीच झाले नव्हते!

40 comments:

  1. Thanks a lot, Mr. Sonawani, keep it up!!!

    ReplyDelete
  2. आप्पा - आज करत आहात , उठवणारी चिल्लीपिल्ली अनेक झाली , आणि स्वतःस थोर म्हणवून घेऊ लागली , पण मोरारजी आणि चरणसिंग आणि राजनारायण यांच्या सर्कशीत त्याना काहीच महत्व उरले नाही , पुल आणि दुर्गा भागवत सारख्या लोकांचा भ्रम निरास झाला .
    बाप्पा - कालच अनुपम खेरने सर्व भोंगळ लोकांच्या पारितोषके परत करण्याच्या लागलेल्या स्पर्धेची जी खिल्ली उडवली आहे ती पाहिलीत का ?एफटीआयआय चे खरे लफडे समजावून घेतले आहे काय आपण ?
    आप्पा-आपण संघ विरोधाने इतके आंधळे झाला आहात की आपल्यास मोडी हे डोळ्यास सालात आहेत, संघाने राष्ट्रविरोधी कोणताच विचार मांडलेला नाही ,नेहरूंनी नेताजींची फ़ाइल आजवर का लपवून तेवली होती ?आता जानेवारीत नेहरूंची लाज निघेल. अतिउच्च विचारांचा ध्येयवाद म गांधीनी बाळगला आणि ते फाळणीमुळे तोंडघाशी आपटले तसेच नेहरूही पंचशील आणि निधर्मी राष्ट्रवाद अशा दुध्खुळ्या स्वप्नांनी तोंडघाशी आपटले . त्यांच्या मानास्पुत्रांनी त्यांचा खून आधीच केला होता , गोडसेने क्ट्यांचे शरीर मारले.
    बाप्पा - सरदार सरोवराचा चमत्कार कोणी घडवला ? अतालानिनी देश मुख्य हायवे आराखडा करून जोडला त्याचे काय ?पंचवार्षिक योजनात देशाची बांधणी रशियाप्रमाणे करायला गेलेले नेहरू जेआरडी ना वेटिंग मध्ये तासन्तास बसवण्यात धन्यता मानत असत - हा कुठला सुसंस्कृतपणा ?
    आप्पा - तुम्ही जसे वैदिकांच्या विरुद्ध आघाडी उघडून काहीही घडवू शकला नाहीत तसेच या सरकार विरुद्ध आपण काहीही दाखल घेण्या सारखे करू शकणार नाही , जरा मागे वळून पहा , तुम्ही एकटेच आहात , काही दिवसांनी कंटाळून तुमची सावलीही तुम्हाला सोडून जाइल , त्याची काळजी करा !

    ReplyDelete
  3. आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे….
    'औकातीपेक्षा जास्त मिळाल त पेलत नाहि…'
    भाजपचे आणि भक्तांचे असेच झाले आहे .

    ReplyDelete
  4. अहो संजय राव , उगीच कुठला विषय कुठे नेताय ?आपला विषय चाललाय समाज प्रबोधनाचा , तुम्ही निरीश्वरवादी आहात तर तुम्हाला हिंदूंची काळजी वाहायची काहीच काळजी नाही , ते एक असो , वैदिकांनी हिंदुना हाय्ज्याक केले तरीही तुम्ही त्याना निरीश्वरवाद शिकवू शकता , ते सोडून वैदिकाना झोदाआआपान्यात काय पुरुषार्थ आहे , आणि अभय पवारांनी आणि खोतानी लिहिल्याप्रमाणे वैदिक जर मातृसत्ताक पद्धती नष्ट करणारे होते तर त्याच्या खुणा आजही कशा दिसतात ?आपल्या मिश्र धर्माचे कौतुक करायचे सोडून तो समजून घ्यायच्या ऐवजी आपण समाजात फूट पडत आहात !आपल्या सारखे उगा अस्वस्थ होणारे एकटे तुम्ही नाहीत असे अतृप्त आत्मे निर्माण होताच असतात , त्याची कारणे वांझोट्या समाजवादी तत्वज्ञानाकडे जातात . सरकारीकरणाने ब्राष्टचार सोकावला आणि शेवटी अरुण शौरीना कारखाने विकावे लागले . आपण संघाला नावे ठेवता , पण कोन्ग्रेस संस्कृतीत गांधी घराण्याने काय गोंधळ घालून काय काय उद्योग केले ते आपणास माहित नाही का ? सत्तांतरा नंतर नवीन सत्तेला आपले रिझल्ट ध्यायला वेळ हा लागणारच , त्यातच दुष्काळाचा राक्षस उभा आहे , शेतकरी उसाचे पिक सोडायला तयार नाही , अनेक शेतीताद्न्य वेगळी पिके घेण्याचे सुचवत आहेत , पण आपल्या सारखे लोक त्याचा पाठ पुरावा करताना दिसत नाहीत . तुम्ही कॉंग्रेसचे पोसलेले शिपाई असल्यागत वागत आहात - काय हे संजय सोनावणी - आपल्याला शोभत नाही !तुम्ही याला दुसरी आणीबाणी म्हणत आंदोलने उभाराल , पण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा , तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक कधी राहिले होतात शेवटचे ?
    विकास सारखे तुमचे कायम कौतुक करणारे भोळे लोक अनेक असतील त्यांची फसवणूक थांबवा !

    ReplyDelete
  5. सर तुम्ही ज्या हिंदू किवा तत्सम झुंडशाही बद्दल बोलत आहात तसे काही वास्तव नाही. हिंदू हा संघटीत होण्यास अतिशय अवघड असा मानवप्राणी आहे. त्यामुळे एकेकाळी जगभर नैसर्गिक मानव नावाचा प्रकार (त्यालाच हिंदू म्हणतात) होता तो आता जगातून कमी कमी होत चालला आहे. हे सत्य आहे आणि ह्या मानवाला समाप्त करायचे काम २१ व्या शतकात महान धर्माचे अनुयायी जगभर करत आहेत. व्हियेतनाम, इराक मध्ये येझदी, शिया आणि भारतात हिंदूंचे तेच होत आले आहे, आणि महान धर्माच्या लोकांनी ते आपल्या हक्काने केले आहे. आजही भारतात लोकशाही नसती तर इस्लामी हुकुमशाही असली असती. किवा लोकशाही संपली तर इस्लामी हुकुमशाही सुरु होईल. किवा अमेरिका किवा चीन भारताच्या उरावर बसतील. हे सत्य आहे हे तुम्हाला किवा कोणाला घाबरवण्यासाठी मी म्हणत नाही, पण आपल्यासारख्या इतिहास जाणणाऱ्या माणसाला हे सत्य समजत नसेल तर तुमच्या अंगात आले आहे का? कॉंग्रेसच्या स्वरुपात जी घराणेशाही निर्माण झाली होती वरून खाली झिरपत होती तिला लोकांनी डोक्यावरून उचलून फेकले, हे जर लोकशाहीचे मुल्य तुम्हाला समजत नसेल तर तुमचातला पुरोगामी विचारवंत नावाचा अहम (ज्याला इगो म्हणतात) दुखावला गेला आहे म्हणून तुम्ही आज इतके तिळपापड करून घेत आहात. शैव वैदिक वादावरून क्षणात तुम्ही फुलपाखरासारखी हिंदू दहशतवाद ह्यावर उडी घेताय म्हणजे अवघड आहे तुमचे मोदींना ऐकणारे करोडो आहेत. तुमच्यासारख्या लोकांना फारतर हजार नाहीतर लाख लोक विचारतात. मोदी कोणाला मार म्हटले तर म्हणून लोक मारणार नाहीत, पण हे मात्र नक्की कि हिंदू बहुसंख्य भारतात हिंदूंना आता कोणी मारायला लागले तर ते त्याला सोडणार नाहीत. ह्याला प्रतिकार असे म्हणतात. ह्यामुळे तुम्हाला स्वतःलाच त्रास होतोय.

    ReplyDelete
  6. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नक्कीच तुमच्यापेक्षा महान इतिहास संशोधक होते. त्यांनी त्या ज्ञानातूनच फाळणी आणि बहुसंख्य हिंदू राष्ट्र हा सिद्धांत उचलून धरला होता. त्यांना त्यात झुंडशाही दिसत नव्हती. ते नक्कीच अधिक दृष्टे होते. तुम्ही फक्त घराच्या खिडकीतून जग आणि समाज बघता का हो? कधी स्वताला चिकटलेला मीपणा सोडून रस्त्यावर येउन एक मानव म्हणून जगला आहात का? तुम्हालाच काय स्त्रियांना आज आपल्या देशात इतकी भीती वाटत असली असती तर त्या निर्भीडपणे रस्त्यावर फिरल्या नसत्या. मला मान्य आहे कि तुम्ही एका हजारो वर्षे अन्यायग्रस्त समाजाचे प्रतिनिधी आहात, विद्रोही आहात, तुम्ही नास्तिक आहात, किवा ती एक फेशन असल्याने तसे स्वतःला म्हणवून घेत आहात. पण स्त्रिया तर त्यापेक्षा अधिक वर्षे हातात बांगड्या घालून जागल्या आणि आता तितक्याच उस्फुर्तपणे त्यातून बाहेरही पडत आहेत. शांत व्हा, काही होणार नाही. हिंदू इतके क्रूर नव्हते आणि नाहीत. तुम्ही आत्ता मुस्लिमांचे म्हणत आहात पण अजून २० वर्षांनी हिंदूंनी वैदिकांसार्खेच त्यांना आपल्यात सामावून घेतले असेल. हीच हिंदूंची शक्ती आहे. तुम्ही त्या शक्तीला विकृती म्हणत असाल तर आई दुर्गा तुम्हाला सदबुद्धि देवो. आणि कृपया हिंदू लोकशाहीला दुषणे देऊ नका. अन्यथा लोक काय काहीही बोलतातच.

    ReplyDelete
  7. तुम्ही जे विखारी आणि उलट्या शेपटीचे लिहित असता त्यामुळे लोक तुम्हाला अद्वातद्वा बोलतात. विरोधाभासी विचार मांडून आपण वासरात लंगडी उर्फ दिग्विजय बनायचा

    ReplyDelete
  8. अंदमान येथे झालेल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांनी "पुरोगामी दहशतवादा‘चा उल्लेख करावयास नको होता. शेषरावांच्या या अवचित झालेल्या हल्ल्यामुळे राज्यभरातील तमाम "पुरोगामी‘ विचारसरणीच्या सरदार दरकदारांना अचानकपणे शौर्याचे भरते आले; आणि त्यांनी विविध लेखांच्या माध्यमामधून जवळपास सगळ्या प्रकारची अश्‍लाघ्य विशेषणे वापरत शेषरावांच्या एकंदर बुद्धिनिष्ठतेविषयी शंका उपस्थित केली. अर्थातच, या जगातील समग्र पुरोगामित्वाचा स्वामित्वहक्क आपल्याकडेच असून आपणच पुरोगामी कोण ते ठरविणार, अशी अत्यंत गर्हणीय मानसिकता असलेल्या या विचारवंतांपैकी बहुसंख्य जणांचा लेखन कामाठीपणा शेषरावांच्या व्यासंगाच्या तुलनेत काडीइतकाही नसताना निव्वळ या शब्दप्रयोगामुळे त्यांच्या या लेखनाची दखल घेणे आता क्रमप्राप्त आहे. "पुरोगामी दहशतवाद‘ या शब्दप्रयोगामुळे राज्यातील अनेकांच्या शेपटीवर पाय दिला गेला असून गेल्या काही दिवसांमध्ये यामुळे महाराष्ट्राच्या विचारवंत व माध्यमांच्या वर्तुळात अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. तेव्हा शेषरावांनी हा शब्द प्रयोग का केला, त्यामागील पार्श्‍वभूमी काय असावी, त्यामध्ये सत्यता आहे; वा निव्वळ उद्वेग आहे, अशा विविध स्वरुपाच्या प्रश्‍नांची उत्तरे शोधणे आवश्‍यक आहे.

    महाराष्ट्रामध्ये शतकापेक्षा जास्त काळ चाललेल्या वैचारिक घुसळणीची या वादास पार्श्‍वभूमी आहे. महाराष्ट्राच्या निर्भिड सामाजिक, संस्कृतिक मनास या वादाने असीम उर्जा पुरविली आहे. किंबहुना "पुरोगामी विचारसरणी‘ हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित असून देशामध्ये मराठी समाजाची वेगळी ओळख प्रस्थापित करण्यामागील एक मुख्य कारण आहे. परंतु, काळाच्या ओघामध्ये इतर कोणत्याही विचारसरणीप्रमाणेच कधी नितळ वाहत्या जीवनप्रवाहाप्रमाणे असलेल्या पुरोगामी विचारसरणीचे आज अत्यंत दुर्गंधीयुक्त डबके झाले असून येथे राजकीय नेत्यांच्या गरजेनुसार हुकमी भूमिका घेणाऱ्या भुक्कड विचारवंतांची चलती सुरु झाली आहे. पुरोगामी कोणास म्हणावे, या प्रश्‍नाचे आता काही ओबडधोबड ठोकताळे तयार झाले असून कालपरत्वे त्याचा मूळ पुरोगामी मूल्यांशी असलेला संबंध लयास गेला आहे. कोणत्याही विचारसरणीमधील मुलभूत मूल्ये चिरंतन असली; तरी या मूल्यांवर आधारित प्रवास हा कालसुसंगत व योग्य दिशेने चालला आहे काय, याची पडताळणी अत्यंत काटेकोरपणे करणे गरजेचे असते. या प्रवासामध्ये काही बदलांशी जुळवून घ्यावे लागते, स्वीकारलेल्या विचारव्यवस्थेचा संदर्भ काळाच्या कसोटीवर सतत पारखून घ्यावा लगतो, आधी कर्मठपणे नाकारलेल्या काही सत्यांचा नव्याने स्वीकार करावा लागतो, काही काळाच्या प्रवासानंतर संस्था वा विचारसरणीमध्ये आलेले शैथिल्य व सनातनी कर्मठपणा कॉंग्रेस गवताप्रमाणे सतत उपटत रहावा लागतो; मुख्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या विशिष्ट प्रतिमेचे कैदी होऊन आपण सत्याकडे दुर्लक्ष करत नाही ना; याची खातरजमा अत्यंत निष्ठेने करावी लागते. वास्तवाकडे दुर्लक्ष करुन ज्या विचारसरणीचे स्वघोषित पाईक आपल्या मतांना ब्रह्मवाक्‍याचा वज्रलेप प्रदान करतात; ते काळाच्या कराल दाढांखाली विनासायास चिरडले जातात. अर्थात, हा पराभव त्या विचारसरणीचा नव्हे; तर त्याची उपासना आंधळेपणाने वा स्वत:च्या क्षुद्र स्वार्थासाठी करणाऱ्या उपासकांचा असतो. जगाच्या इतिहासापासून हा न्याय चालत आला आहे.

    ReplyDelete
  9. महाराष्ट्रामध्येही स्वत:स पुरोगामी म्हणवणारी विचारपरंपरा आज काही विशिष्ट "टॅबू‘ असलेली कपाटबंद व्यवस्था होऊन बसली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून कल्पना उसनी घेऊन सांगायचे झाल्यास, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये कधी काळी सिंहाचा वाटा असलेली पुरोगामी परंपरा ही आता वरुन बंद असलेल्या पाण्याच्या टाकीप्रमाणे होऊन बसली असून यामध्ये नव्या विचारप्रवाहास सामावून घेण्यासाठी वाव उरलेला नाही. उदाहरणार्थ, मानवाच्या आयुष्याचे केंद्रस्थान असलेल्या; व त्याच्या शोषणाचाही एक अत्यंत महत्त्वपूर्ण स्त्रोत असलेल्या धर्माची चिकित्सा हे पुरोगामी विचारपरंपरेचे मुख्य मूल्य आहे की नाही? गेल्या सुमारे शतकापेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या हिंदु धर्माच्या कठोर धर्मचिकित्सेचा रुढिग्रस्त हिंदु समाजास अमाप फायदा झाला आहे की नाही? हिंदु धर्माच्या या चिकित्सेची परंपरा कालपरत्वे अशीच पुढे नेण्याची आवश्‍यकता आहे की नाही? वरीलपैकी कोणत्याच प्रश्‍नाचे उत्तर पुरोगामी विचारपरंपरेपैकी नकारार्थी देता येणार नाही. धर्म हा मानवाच्या शोषणाचा एक मुख्य स्त्रोत आहे, यामुळे आता "त्या‘ कुठल्यातरी कथित देवाऐवजी मानवास केंद्रस्थानी ठेवून जगामधील सर्व व्यवस्थांची रचना करावयास हवी; मानवासमोर असलेल्या सर्व प्रकारच्या प्रश्‍नांची उत्तरे ही कोणत्याही स्वरुपाच्या कथित दैवी शक्तीवर सोडून न देता आपल्या बुद्धीचा वापर करुन सोडवावयास हवीत, हाच तर पुरोगामी विचारपरंपरेचा गाभा आहे. तेव्हा हिंदु धर्मासहित मानवाच्या शोषणाचे स्त्रोत असलेल्या जगामधील इतर धर्मांचीही या स्वरुपाची कठोर चिकित्सा होणे आवश्‍यक आहे, हे मत पुरोगामी विचारपरंपरेचा घटक मानता येणार नाही काय? अर्थातच मानावे लागेल. अशा वेळी पुरोगामी विचारनिष्ठेचे व्रत अंगीकारलेल्या संस्था, व्यक्तींवर एकाच विशिष्ट धर्मास लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केल्यास त्या आरोपाचे उत्तर अंतर्मुख होऊन देणे अत्यावश्‍यक आहे. प्रश्‍न विचारलेल्या व्यक्तीवर दोषारोप करणे अगदीच सोपे आहे. शिवाय, अनेक वेळा असे प्रश्‍न विशिष्ट हेतू डोळ्यांपुढे ठेवून विचारले जातात, हेही मान्य करता येईल. परंतु, यामुळे सर्व धर्म चिकित्सेच्या मूळ पुरोगामी मूल्यावर आपण अन्याय करत असल्याचे भान बाळगणे आवश्‍यक आहे. उदाहरणार्थ, कुठल्या तरी जत्रेमध्ये बोकडाचा बळी दिल्याने त्या गावचे ग्रामदैवत प्रसन्न होते, ही अंधश्रद्धा आहे काय? अर्थातच आहे. मात्र कुठल्या तरी सैतानास दगड मारणे ही अंधश्रद्धा आहे काय? या प्रश्‍नाचे उत्तर टाळण्याची सोय सच्च्या पुरोगामी व्रतामध्ये असता कामा नये. सध्या स्वत:ला पुरोगामी म्हणविणाऱ्या वर्तुळांची परिस्थिती इतकी चमत्कारिक आहे की, हा प्रश्‍न विचारल्या विचारल्या तुम्ही कधी हिंदुत्ववादी ठरविले जाल, हे तुमचे तुम्हालादेखील कळायचे नाही! "इस्लामची चिकित्सा‘ हा सध्याच्या पुरोगामी व्यवस्थेमधील असा विशिष्ट टॅबू होऊन बसला आहे. मुळात इस्लाममध्येही हिंदु धर्माप्रमाणेच अनेक अंधश्रद्धा आहेत, हे आताच्या पुरोगामी म्हणविणाऱ्यांना आधी मान्य करावे लागेल; आणि त्यानंतर त्या अंधश्रद्धेचा प्रसार रोखण्यासंदर्भातील प्रयत्न करावे लागतील. उदाहरणार्थ, "शिवाजी कोण होता‘ या कॉम्रेड पानसरे यांच्या पुस्तकाच्या प्रसिद्धीच्या निम्मी प्रसिद्धी जरी थोर मुस्लिम सत्यशोधक विचारवंत हमीद दलवाई यांच्या "भारतीय मुसलमान‘ या पुस्तकास सध्या पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या वर्तुळांनी दिली असती; तरी त्यांच्याकडून महाराष्ट्रास सुजाण व धर्मनिरपेक्ष करण्याच्या प्रयत्नांत भरीव योगदान दिले गेले असते. अर्थात, "भारतीय मुसलमान‘ या पुस्तकाची दलवाई यांनी लिहिलेली पहिली आवृत्ती प्रकाशित करावयास हवी. नंतर त्यांचे लेखन "सौम्य‘ करुन काढण्यात आलेल्या आवृत्त्या नकोत! इस्लामची चिकित्सा करता येत नसेल, तर त्यामागील कारणेही पुरोगामी परंपरेस द्यावी लागतील. जीवाचे भय, राजकीय अपरिहार्यता वा अशा अन्य स्वरुपाच्या कारणांस्तव इस्लाम हा चिकित्सेचा विषय असू शकत नाही, अशा स्वरुपाच्या भूमिकेकडेही एकवेळ सहानुभूतीने बघता येईल. परंतु, "इस्लाम हा परिपूर्ण धर्म असल्याने त्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही; अर्थातच यामुळे इस्लामच्या चिकित्सेची आवश्‍यकताही नाही,‘ अशी भूमिका मात्र खऱ्या पुरोगामी परंपरेमध्ये कालत्रयीही घेता येणर नाही.

    ReplyDelete
  10. शेषरावांनी महाराष्ट्रामधील पुरोगाम्यांच्या दृष्टीने दोन अत्यंत मोठे प्रमाद केले असून त्याची त्यांना या जन्मामध्ये क्षमा मिळणार नाही. शेषरावांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्याप्रमाणे इस्लामची शास्त्रशुद्ध चिकित्सा केली आहे; आणि सध्याच्या महाराष्ट्रामधील बहुसंख्य विचारवंतांचा द्वेषविषय असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध करण्यात आलेले आरोप पुराव्यानिशी खोडून दाखविले आहेत. एवढ्या गंभीर अपराधांनंतरही करुनही शेषरावांची त्यांना प्रतिगामी म्हटले जाऊ नये, अशी अपेक्षा असेल; तर ते अगदीच भोळे आहेत, असे म्हणावे लागेल. महाराष्ट्रामधील निस्पृ:ह पुरोगामी विचारपरंपरा कधीच संपली असून आता त्या सरणावर असलेल्या मूल्यांना स्वत:च्या स्वार्थासाठी हवे तसे वाकविणाऱ्या कावळ्यांचे राज्य आल्याची पुसटशी जाणीवही त्यांना दिसत नाही. मात्र या विषयाचे आणखी विश्‍लेषण करण्याआधी, शेषरावांच्या भाषणाचे काळजीपूर्वक परीक्षण करणे गरजेचे आहे. पुरोगामी दहशतवाद या शब्दप्रयोगामुळे शेषरावांच्या भाषणामधील अन्य कुठलाही मुद्दा एखादा लेख वगळता ध्यानी घेण्यात आलेला नाही. किंबहुना या शब्दप्रयोगामुळे त्यांनी मांडलेल्या अन्य मुद्यांवरुन लक्ष वळविण्याची आयती संधी सर्व माध्यमसक्रिय विचारवंतांना मिळाली. अर्थातच, यामधून माध्यमांमधील लोप पावलेल्या वैचारिक प्रगल्भतेचाही अंदाज यावयास हरकत नाही. पुरोगामी दहशतवादाचा संदर्भ हा शेषरावांच्या संपूर्ण जवळजवळ 30 पानी भाषणामध्ये अवघ्या दोन परिच्छेदांमध्ये सामावला आहे. इतरत्र कुठेही फारसे उल्लेख न होणारे अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे भाषणामध्ये मांडण्याचे धैर्य त्यांनी दाखविले आहे. परंतु, त्यासाठी ते भाषण पूर्ण वाचावे लागेल. "पुरोगामी दहशतवाद‘ त्या शब्दप्रयोगास सर्वाधिक वृत्तमूल्य असल्याने त्यास विशेष प्रसिद्धी मिळाली. अर्थातच, शेषराव याखेरीज अन्य काही बोलले आहेत की नाही, असा प्रश्‍न पडावा, अशी परिस्थिती सध्या आहे. अर्थातच, सध्याच्या व्यावसायिक मूल्ये जपणाऱ्या माध्यमांमध्ये या स्वरुपाची संवेदनशीलता राहिलेली नाही. माहितीवरील नियंत्रण हीच माध्यमांची ताकद असल्याने बहुतांश वाचकांची शेषरावांच्या भाषणाबद्दलची उत्सुकता ही या टप्प्यामध्येच संपण्याची पुरेशी शक्‍यता आहे. अर्थातच, हा प्रकार सगळ्याच घटनांबाबत घडत असल्याने त्याचा अभ्यास स्वतंत्ररित्या करणे भाग आहे.

    शेषरावांनी त्यांच्या भाषणामध्ये काही अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना मांडल्या आहेत. सावरकरांच्या मुख्य विषयाखेरीज महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाची गरज, शेती या व्यवसायाचा भावनामुक्त विचार करण्याची निकड आवश्‍यकता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारताच्या अधोगतीचे एक मुख्य कारण बनलेल्या जातिव्यवस्थेची हळूहळू शिथील होणारी बंधने, हे मुख्य घटक त्यांनी भाषणामधून हाताळले आहेत. अन्य एक अत्यंत महत्त्वाची बाब या पार्श्‍वभूमीवर ध्यानी घेणे आवश्‍यक आहे. हे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचे भाषण आहे. मात्र भाषणामध्ये कुठेही ललित साहित्याचा चंचुप्रवेश, नर्मविनोदाचा शिडकावा, कवितेची झालर असा प्रकार आढळून येत नाही. शिवाय मराठी साहित्य संमेलनांमध्ये "बेळगावसह महाराष्ट्र झालाच पाहिजे‘छाप रिवाज व औपचारिकता म्हणून रुढ झालेले ठराव नाहीत; मराठी भाषा मरते आहे, अशा आशयाचा टाहो नाही. मराठी भाषा ही विचारांच्या प्रसाराचे साधन म्हणून वापरणाऱ्या अभ्यासकाचे हे भाषण आहे.

    ReplyDelete
  11. "फुले शाहु आंबेडकरांच्या काळामधील महाराष्ट्र आज राहिलेला नाही. जातिव्यवस्थेची, बेटीबंदीचा अपवाद वगळता उर्वरित बंधने तुटली आहेत हे वास्तव मांडणाऱ्या कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके लिहिली जात आहेत काय? दलित विद्यार्थ्याला दुरून छडी मारणारा मास्तर आता कोठे सापडतो? आता दलित हा गुरुजी होऊन सवर्ण त्याचा आनंदाने शिष्य बनला आहे, हे वास्तव नाही काय? समाजात झालेले हे क्रांतिकारक परिवर्तन साहित्यात का येऊ नये? परिवर्तनवादी म्हणून नावलौकिकास आलेल्या साहित्यात आजच्या परिवर्तनाचे चित्र येत नसून मागच्या काळातील अपरिवर्तनीय समाजाचे येत आहे. जातिव्यवस्थेसंदर्भात आणखी बरेच परिवर्तन व्हावयाचे बाकी आहे, हे मान्य करुनही जे परिवर्तन झाले आहे ते स्वागतार्ह मानायचे की नाही?,‘ अशी विचारणा शेषरावांनी या भाषणामधून केली आहे. हा विचार पुरोगामी दहशतवादाच्या पेल्यातल्या वादळापेक्षा फारच मोठा आहे. समाजामध्ये होणाऱ्या बदलाची चाहूल आधी साहित्यिकांना लागते, असे म्हणतात. तेव्हा किमान महाराष्ट्रामधील जातिव्यवस्थेचे वास्तव मुंगीच्या गतीने का होईना बदलत आहे, या सकारात्मकतेचे प्रतिबिंब साहित्यामध्ये पडावयास हवे, हा विचार कमी मोलाचा नाही. समाजाच्या मनाची रचना करण्याची ताकद साहित्यामध्ये असते. यामुळे जातिव्यवस्थेसंदर्भातील लिखाण हे केवळ "पीडित, वंचितांचा न्यायासाठी हुंकार‘ या प्रतिमेमध्ये अडकून न राहता कालसुसंगत होणे गरजेचे आहे. जातिव्यवस्थेचे रुदन आशयघन शब्दांत मांडणारे अनेक सिद्धहस्त लेखक आपल्याकडे आहेत, मात्र जातिव्यवस्थेचे वास्तव आता बदलत असून त्याचा दलितांना फायदा होतो आहे, ही सकारात्मक बाब मांडणे आवश्‍यक नाही काय? गेल्या साठ वर्षांत या दिशेने एकही सकारात्मक पाऊल पडले नाही काय? नक्कीच पडले आहे. समाजामध्ये अत्यंत संथ गतीने का होईना; रुजणाऱ्या या बदलाचे प्रतिबिंब साहित्यात पडावे, अशी शेषरावांची अपेक्षा त्यांच्या वैचारिक धैर्याची साक्ष देणारी आहे. शिवाय, या निमित्ताने केवळ राजकीय स्वार्थासाठी जातिव्यवस्था अधिकाधिक सनातन व असहिष्णु कशी व्हावी, अशा केल्या जाणाऱ्या प्रयत्नावरही लिखाण करता येईल. या विचारास माध्यमांमध्ये प्रतिनिधित्व देण्याची आवश्‍यकता होती.

    "शेती हा शेतकऱ्याने भावनेचा विषय करुन ठेवला असून शासनाने त्याचे कितीही व कितीदाही कर्ज फेडले तरी तो शेती करणार आहे तोवर त्याचा कर्जबाजारीपणा संपणार नाही. तेव्हा कर्जबाजारी व्हावयाचे नसेल तर त्याने शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. आपण वा सर्वांनी शेती केली नाही तर देशाला अन्न कसे मिळेल? अशा देशभक्तीपासून मुक्त झाले पाहिजे. आणि ही देशभक्ती हवीच असेल तर कर्जबाजारीची तक्रार कशी करत येईल? दुदैवाची गोष्ट ही की, शेती करणाऱ्या वा न करणाऱ्या विद्वानांना व अर्थतज्ज्ञांना हा भावनेचा प्रश्‍न आहे हेच समजत नाही. तेव्हा शेतकऱ्यांसंबंधातील मूलभूत समस्या शेतीविषयक भावनेपासून त्यांना मुक्त कसे करावे, ही आहे,‘‘ असा प्रागतिक विचार शेषरावांनी यावेळी मांडला. ते केवळ अभ्यासक नसून हे एक यशस्वी शेतकरीदेखील आहेत. आत्महत्या करणारे शेतकरी हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील विषय आहे. परंतु, या समस्येचा सर्व दोष हा निसर्गाकडे वा राजकीय व्यवस्थेकडे ढकलण्याची सामान्यत: आपली भूमिका असते. परंतु शेती या क्षेत्रास स्पर्धात्मक व्यवसायाचे नियम जोपर्यंत लावले जात नाहीत, तोपर्यंत त्यामधील जुनाट समस्या सुटणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट करणारे कडू औषध कुणालाच नको असते. स्पर्धात्मक व्यवसायाच्या प्राथमिक नियमानुसार शेतकऱ्यास आपल्या मालाची किंमत ठरविता येईल काय, हा प्रश्‍न शेषरावांना या निमित्ताने विचारता आला असता. शेषरावांच्या एकंदर सार्वजनिक वाटचालीचे समान सूत्र "अप्रिय पण...‘ हेच राहिले असून देशाच्या फाळणीकडेही भावनात्मक दृष्टीने न पाहता वास्तवाच्या कठोर परिप्रेक्ष्यामधून पहा, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. विषयाप्रमाणे त्यांची वैचारिक बांधिलकी बदलण्याची पुरोगामी चलाखी त्यांना जमत नसल्याने शेतीचा विचार करता त्यांना दिसलेले हे न्यून भल्याभल्यांना बोलायची हिंमत झालेली नाही. त्यांच्या एकूण भाषणामधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून यासंदर्भातील भूमिकेकडे पहावयास हरकत नाही. परंतु, सर्वच क्षेत्रात दांभिकतेची सवय अंगवळणी पडलेल्या या व्यवस्थेमध्ये अशा विचारावर चर्चा दूर राहिली; त्याला प्रतिगामी वा धंदेवाईक म्हणवून हिणविले जाण्याचीच जास्त शक्‍यता आहे.तासे म्हणावे लागणे हे खरेच दुदैवी आहे; परंतु शेषराव हे "मोरे‘ आहेत हेही नशीबच म्हणावे लागेल. नाहीतर प्रतिगामीच्या जोडीला शेती न कळणारा जातीयवादी असेही विशेषण लाभण्याची शक्‍यता होती.

    ReplyDelete
  12. शेषराव हे सावरकरप्रेमी असतील; मात्र सावरकरवादी वा सावरकरभक्त नाहीत. हिंदुत्ववादी तर मुळीच नाहीत. अन्यथा अन्य सावरकरवाद्यांप्रमाणेच त्यांनीही अखंड भारताचे आंधळे समर्थन केले असते. अखंड भारत हा भारतामधील हिंदुच्या हिताच्या मुळावर येणारी गोष्ट आहे, हे आंबेडकरांना प्रत्यक्ष दिसलेले वास्तव शेषरावांनी तपशीलवार मांडून दाखविले आहे. परंतु त्यांच्यावर करण्यात येत असलेला इस्लामोफोबियाचा आरोप आंबेडकरांवरही करण्याची विचारवंतांची तयारी आहे काय? अर्थात, यामुळे काय झाले? त्यांनी सावरकरवाद्यांना दुखविले, "अखंड भारत, समर्थ भारत‘ अशी घोषणा देणाऱ्यांना दुखविले, धर्मनिरपेक्ष विचारवंतांना दुखविले, राष्ट्रवादी मुसलमानांना दुखविले. त्यांनी जवळजवळ सगळ्यांनाच दुखविले. परंतु शेषरावांनी सावरकरांकडून व कुरुंदकरांकडून बुद्धिवादाची प्रेरणा घेतल्याने त्यांच्याकडे सावरकरांच्या वैचारिक भूमिकेत अभ्यासानंतर बदल झाल्याचे मान्य करण्याचा प्रांजळपणा आहे. सावरकरांनी इस्लामचा अभ्यास केला नसल्याने त्यांना इस्लामचे राज्य, जिहाद व इराणच्या शहाच्या सैन्याच्या भारतावरील आक्रमणामागील गांभीर्य लक्षात आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. शेषराव निखळ सावरकरभक्त असते; तर सावरकरांच्या अगदी बरोबर उलटी मांडणी करणारे 1857 चा जिहाद हे अभ्यासपूर्ण पुस्तक त्यांनी लिहिले नसते. सावरकरांसंदर्भात त्यांनी मांडलेल्या अन्य मुद्यांचे विश्‍लेषण करणे आवश्‍यक आहे. "गांधीजींचा खून एवढाच सावरकरांबाबतचा वादाचा मुद्दा नाही. मुसलमानांविषयीची त्यांची मते आणि अन्य धर्मीयांबद्दलची त्यांची भूमिका ही कोण्याही पुरोगामी आणि आधुनिक विचारांना मान्य होणारी नसल्याने सावरकरवादी बाजूला फेकले गेले,‘ असे मत ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ जयदेव डोळे यांनी यासंदर्भात व्यक्त केले आहे. आंबेडकरांनी सावरकरांपेक्षा कितीतरी कठोर शब्दांत इस्लामची चिकित्सा केली आहे. तेव्हा आंबेडकरदेखील पुरोगामी नाहीत, असे डोळे यांना म्हणावयाचे आहे काय? शिवाय, सावरकर हे अखंड भारताचे स्वप्नाळू समर्थक होते; मात्र आंबेडकरांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत फाळणीचे समर्थन केले आहे. किंवा "सावरकरांना विज्ञानवादी म्हणवणे हा भ्रम समाजवादी मंडळीतदेखील आहे.‘ अशा आशयाचे एक विधान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी शेषरावांच्या भाषणानंतर लिहिलेल्या लेखात केले आहे. चातुर्वण्याचे उच्चाटन व्हावे व जात्युच्छेदन व्हावे, अशी सावरकरांची स्पष्ट भूमिका होती व त्यांनी ती अक्षरश: वारंवार मांडली होती. किंबहुना ज्याप्रमाणे आंबेडकरांनी सावरकरांपेक्षा जास्त कडक शब्दांत इस्लामची चिकित्सा केली; त्याचप्रमाणे सावरकरांनीही आंबेडकरांपेक्षाही कठोर शब्दांत जातिव्यवस्थेवर टीका करुन गुणांवर आधारित जातिविहीन समाजव्यवस्था निर्माण केली पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका अनेकदा मांडली आहे. "मानवाचा देव आणि विश्‍वाचा देव‘ या त्यांच्या सुप्रसिद्ध निबंधामध्ये मुळात मानव हीच विश्‍वाच्या या अथांग व अप्रतिहत चाललेल्या प्रक्रियेमधील अत्यंत क्षुल्लक व तात्पुरती निर्मिती आहे, असे प्रतिपादन केले आहे. बुद्धिनिष्ठ सावरकर हे धर्माकडे व एकंदरच मानवतेकडे कोणत्या दृष्टिकोनामधून पाहत होते, हे या निबंधामधून अत्यंत स्पष्टपणे व्यक्त होते. अशा वेळी सावरकरांना जातीयवादी, इस्लामद्वेष्टे ठरविणारे "पुरोगामी‘ त्यांच्या या पैलुकडे इतके सोयीस्कर दुर्लक्ष करतात की, त्यांच्या सावरकरांविषयी असलेल्या या द्वेषाचा खेदकारक विस्मय वाटल्याशिवाय राहत नाही. आणि पुन्हा हे गांधीवादी विचारवंत!

    ReplyDelete
  13. सावरकरांनी केवळ हिंदुधर्माची चिकित्सा केली असती; तर सर्व पुरोगामी त्यांना डोक्‍यावर घेऊन नाचले असते. मात्र त्यांच्या बुद्धिनिष्ठतेच्या कचाट्यामधून इस्लामही सुटला नाही. सावरकरांच्या मांडणीनुसार, सर्व धर्मग्रंथ कालबाह्य झाले असून मानवांचे इहलौकिक जीवनासाठीचे नीतिनियम, कायदे, शिष्टाचार इत्यादी सर्व काही आजच्या समाजाने, म्हणजे समाजातील लोकप्रतिनिधींनी ठरवायचे आहे. यापेक्षा धर्मनिरपेक्षता वेगळी अशी काय असते? सावरकरांचा काळ वेगळा होता. त्यामध्ये अशी अस्सल पुरोगामी भूमिका समाजाला पचणे शक्‍यच नव्हते. परंतु, आजतरी आपण पुरोगामी असलेल्याचा ढोल बडवून घेणाऱ्यांपैकी कितीजण जगातील सर्व धर्मांचे सर्व धर्मग्रंथ कालबाह्य झाले असल्याची भूमिका घेतील? खूपच कमी घेतील. कारण, आधुनिक राज्यघटनेस अपेक्षित असलेला धर्मनिरपेक्षतावाद (सेक्‍युलॅरिज्म) हा जगामधील सर्वच धर्मांच्या शिकवणुकीचा भाग नाही, याची पक्की जाणीव या कथित पुरोगाम्यांना आहे. शेवटी धर्मनिरपेक्ष धोरण म्हणजे काय आहे? मुळात धर्म म्हणजे काय आहे? धर्म म्हणजे एखाद्या व्यक्तिस वा समाजास दुसऱ्या व्यक्ती; वा समाजापासून वेगळं करणारी विशिष्ट श्रद्धा आहे. आधुनिक राज्यघटनेनुसार, अशी पारलौलिक श्रद्धा ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य कोणत्याही व्यक्तिस आहे. मात्र "या लौकिक‘ जगामध्ये कोणतीही धार्मिक श्रद्धा त्या देशाच्या राज्यघटनेपेक्षा श्रेष्ठ ठरु शकत नाही. या जगामध्ये कोणत्याही व्यक्ती व समाजाने कसे वागायचे आहे, याचे नियम शासनसंस्थेस करावयाचे आहेत. उदाहरणार्थ, इस्लामनुसार जन्नत व अल्लावर श्रद्धा ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. परंतु उद्या हिझाब वापरण्याने राष्ट्रीय, सामाजिक सुरक्षा धोक्‍यात येऊ शकते अशी शासन संस्थेची धारणा होऊन हिझाब वापरण्यावर निर्बंध आणले गेल्यास त्यास धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच म्हणता येणार नाही. इस्लामनुसार काफिरांना जगण्याचा अधिकार नाही, असे मानून बिगर मुस्लिम व्यक्तींचे जीव घेण्याच्या कृतीस धार्मिक स्वतंत्र्य नव्हे; तर धार्मिक दहशतवाद असे संबोधले जाईल. त्याचप्रमाणे गणपतीची उपासना करण्याचे घटनेनुसार पूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे. परंतु, उद्या सार्वजनिकरित्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात एक निश्‍चित नियमावली असावी, असे शासनाने निश्‍चित केल्यास त्यास धार्मिक स्वातंत्र्यावरील आक्रमण; वा हिंदुविरोधी धोरण म्हणता येणार नाही. सावरकर; वा शेषरावांना अपेक्षित असलेली धर्मनिरपेक्षता ही अशी आहे. या धर्मनिरपेक्षतेस सध्या पेव फुटलेले किती पुरोगामी मान्यता देऊ शकतील?

    ReplyDelete
  14. शेषरावांनी काय केले आहे? गांधी हत्या वा इतर विविध कारणांवरुन सावरकरांची सतत होत असलेली बदनामी पुराव्यानिशी खोडून दाखविण्याचे धैर्य त्यांनी दाखविले आहे. गांधीहत्येमधून सावरकरांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही अजूनही कपूर आयोगाच्या बुद्धिभ्रम करणाऱ्या एका विधानाची साक्ष काढून सावरकरांकडे संशयाची सुई सतत वळविण्याचे कार्य स्वत:ला पुरोगामी म्हणविणाऱ्यांकडून सुरु असते. सावरकर आधीच गांधीवधासंदर्भातील खटल्यामधून पूर्णत: निर्दोष सुटलेले असल्याने त्यांच्यासंदर्भात कोणताही निष्कर्ष काढण्याचा अधिकार या आयोगास नव्हता. शिवाय, आयोग हे समांतर न्यायालय नव्हे. आयोगाने काढलेला निष्कर्ष हा न्यायालयाने दिलेला निवाडा नव्हे. किंबहुना न्यायालय विरुद्ध आयोग असा संघर्ष होण्याची सुतराम शक्‍यता नाही; कारण न्यायालय हे आयोगाच्या तुलनेमध्ये केव्हाही श्रेष्ठच असते. इतक्‍या मुलभूत बाबी स्वत:ला विचारवंत म्हणून मिरविण्याची हौस असणाऱ्यांना माहिती नाहीत काय? परंतु, सावरकरांना त्यांच्या मृत्युनंतरही बदनाम करत रहायचे, असा चंगच या स्वघोषित पुरोगाम्यांनी बांधलेला दिसतो. हाच तो पुरोगामी दहशतवाद म्हणावा लागेल. दहशतवाद म्हणजे केवळ हिंसाचार नव्हे. हिंसाचार ही शब्दांमधून पुरस्कृत करण्यात येत असलेल्या दहशतवादी तत्त्वज्ञानानाची केवळ एक अभिव्यक्‍ती आहे. मूळ दहशतवाद कुठल्या तरी लाल वा हिरव्या पुस्तकांमधूनच जन्मास येतो, याची स्वत:ला अभ्यासक म्हणविणाऱ्यांना जाणीव नाही काय? स्वत: शेषरावांनी पुस्तके लिहून सावरकरांवरील किटाळ दूर करण्याचे अथक प्रयत्न केले आहेत. हेच शेषरावांविषयी इतक्‍या विद्वेषाचे कारण म्हणावे लागेल. मुळात, सावरकरांचे हिंदुत्व हे भारतीयत्वाच्या विरोधामध्ये उभे ठाकत नाही, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ध्यानी घेण्याची आवश्‍यकता आहे. सावरकरांना अपेक्षित असणाऱ्या राज्यव्यवस्थेमध्ये अल्पसंख्याकांची काळजी घेणारे व संपूर्णत: धर्मनिरपेक्ष शासन अपेक्षित आहे. धर्माधिष्ठित वैचारिक बांधिलकी विरुद्ध राष्ट्रीयत्व असा संघर्ष सावरकरांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वामधून उभा राहत नाही. सावरकरांचे राजकीय धोरण हे मुसलमानांवर अन्याय करणारे नाही. खुद्द शेषरावांनी यासंदर्भातील पुरावे त्यांच्या भाषणामधून स्पष्ट केले आहेतच. सावरकरांना अभिप्रेत असलेल्या व्यवस्थेमध्ये हिंदुंना बहुसंख्यांक म्हणून कोणताही विशेषाधिकार मिळणार नव्हता. ""आमचे पार्लमेंट अशा स्वरुपाचे तयार होईल की, त्यामध्ये पाऊल ठेवताच हिंदु, मुसलमान, पारशी या भेदाचा मागमूसही राहणार नाही. सारेच्या सारे भारतीय नावाने संबोधले जातील. खरा देशाभिमानी तोच की, जो मुसलमान अल्पसंख्य, हिंदु बहुसंख्य असले काही जाणत नाही. त्याच्या दृष्टीला सारे हिंदीच दिसले पाहिजे,‘‘ ही सावरकरांची देशाच्या राजकीय व्यवस्थेकडून अपेक्षा होती. शिवाय सावरकर हे मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये राखीव प्रतिनिधित्व देण्यास तयार होते. आजही अशा स्वरुपाचे प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. या मांडणीमध्ये जातीयवादी दृष्टिकोन जे शोधू पाहतात, त्यांना तो लखलाभ असो. मात्र यापेक्षा प्रखर राष्ट्रवादी, बुद्धिनिष्ठ, पुरोगामी आणि सेक्‍युलर मांडणी सापडणे निव्वळ अशक्‍य आहे.

    अनेक संवेदनशील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या या भाषणामधील सर्वांत महत्त्वाचा घटक जर कुठला असेल; तर तर तो राज्यघटनेस सर्वोच्च महत्त्व देण्यासंदर्भातील आवाहनाचा मानावा लागेल. "जो स्वत:चा (किंवा स्वत:चे) पवित्र धर्मग्रंथ व भारताची राज्यघटना यांच्यात विरोध आला तर धर्मग्रंथापेक्षा राज्यघटना श्रेष्ठ आहे, असे जाहीरपणे सांगतो व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो तो खरा भारतीय,‘‘ अशी "राष्ट्रीय व वैचारिकदृष्ट्या खऱ्या भारतीया‘ची व्याख्या शेषरावांनी केली आहे. भारतामध्ये वेगाने बदलणाऱ्या सद्यस्थितीमध्ये यापेक्षा धर्मनिरपेक्ष विचार कुठला असेल, असे वाटत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. Dainik Sakal madhla lekh ahe ha Yogesh Parale cha....!! kay rao Copy-Paste kartay???

      Delete
    2. Dainik Sakal madhla lekh ahe ha Yogesh Parale cha....!! kay rao Copy-Paste kartay???

      Delete
  15. पाटसकर सर , प्रथमच आपल्याला भेटावे असे वाटत आहे , त्याचे कारण आपले हे सुंदर लिखाण ! अतिशय संयम राखून आणि वर्मावर बोट ठेवून आपण नेमके हिंदू धर्माचे मर्म सांगितले आहे . भारतात राजकारणात धार्मिक अभिमान बाळगणे हा गुन्हा धरला जातो , त्याला कारण कॉंग्रेसचे वर्षानुवर्षाचे भोंगळ राजकीय संस्कार आहेत.साधारणपणे समाजवादी लोक याला जोडूनच अंधश्रद्धा हा विषय त्यात असा काही माळतात की आपल्याला धर्माभिमान जपणारे लोक खुनी आणि तामसी वाटायला लागतात .
    आपण हिंदू हा कसा सहिष्णू आहे आणि त्याने कसे वैदिकाना सामावून घेतले आणि काही दशकांनी तो मुस्लिमाना पण कसा मुख्य भारतीय धार्मिक प्रवाहात सामावून घेईल ते अतिशय सुंदर रीतीने आणि सहजतेने सांगितले आहे.
    आपण या ब्लोगवर असेच लिखाण करत राहिलात तर हा ब्लोग विचारांनी समृद्ध होईल आणि कदाचित संजयचे पण नव्याने आत्म निरीक्षण होईल. संजय सोनावणी हे अत्यंत तरल मनोवृत्तीचे सद्गृहस्थ आहेत आणि अशा निर्मळ लिखाणाने त्याना नक्कीच आत्म परीक्षण करण्याची सद्बुद्धि होईल , आणि ते व्यर्थ वैदिक अवैदिक वाद काहीकाळ बाजूला ठेवून हिंदू विचारांच्या प्रचंड विचार प्रवाहात स्वतःला झोकून देऊन,आणि चिकित्सक रटाळ संशोधक वृत्ती काहीकाळ बाजूला ठेवून आत्मानंदात स्वतःला हरवून बसण्याचा आनंद लुटतील अशी आशा करुया , शेवटी आत्मचिंतन हा विषय गहन आहे
    अभिनंदन !

    ReplyDelete
    Replies
    1. Agashe tumchya manasarkhe lihle ki abhinanadan nahitar Pataskarana shivya...!! Waa... kay nyay tumcha

      Delete
    2. Agashe tumchya manasarkhe lihle ki abhinanadan nahitar Pataskarana shivya...!! Waa... kay nyay tumcha

      Delete
    3. अमित मोरे सर , आपला हा गैरसमज आहे .
      वंदनीय शेषराव मोरे यांचे लिखाण वाचायला मिळाले त्या आनंदातून मी पाटसकर यांचे कौतुक केले आणि लगेच मूळ लेख ई- सकाळवर वाचला
      मला वाचनाची आवड आहे , आदरणीय रा चिं ढेरे ,नरहर कुरुंदकर आणि शेषराव मोरे हे माझे प्रिय लेखक आहेत . मी सावरकर भक्त नाही किंवा गान्दिवादुही नाही अगदी सामान्य माणूस आहे , आपल्या वाचनाने आपल्या विचारात भर पडते त्यावेळी आनंद हा होतोच
      इतिहासातले काहीही काळात नसले तरी आपल्या पूर्वजांच्या बद्दल जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडत असावे . त्यातूनच सरदेसाई शेजवलकर बेंद्रे आणि राजवाडे यांच्या वाचनाची आवड निर्माण झाली . असो . आपण म्हणता तसे काही नाही हे मात्र नक्की. कारण वाचनाचा आनंद घेता घेता वेळच मिळत नाही स्वतःचे मत बनवायला . जितक्या बाजू असतात त्या समजून घेता आल्या तर बरे वाटते !आमचे जे कार्यक्षेत्र आहे त्यात आम्हाला सर्वच योग्य वाटतात जोपर्यंत अश्लील भाषा लेखनात नसते तोवर ते वाचायला काहीच प्रत्यवाय नसावा - खरे ना ? धन्यवाद !मी व्यक्तीशः संजय सोनावणी यांचा चाहता आहे आणि कधीकधी त्यांच्यावर टीका करण्याचे स्वातंत्र्य घेतो
      यापूर्वी अनानिमस म्हणून अनेक लोक अत्यंत खालच्या पातळीवरचे लिखाण करत असत , मी व्यक्तीशः संजय सराना गळ घालून अनानिमस लिखाण बंद होण्यासाठी काहीतरी क्लुप्ती योजण्याची विनंती केली , आता इथे तसले आचरत प्रकार होत नाहीत .

      Delete
  16. भारतामध्ये वा एकंदरच जगामध्ये डाव्या वा समाजवादी विचारपरंपरेशी मिळताजुळता नसलेला विचार अनुल्लेखाने मारण्याची वा हिणविण्याची एक परंपराच गेल्या सुमारे अर्धशतकाच्या काळामध्ये रुढ झाली. एखाद्या वेगळ्या दृष्टिकोनाच्या अभ्यासकावर जातीयवादी, प्रतिगामी, धर्मवादी अशा स्वरुपाचे शिक्के मारुन त्याला सार्वजनिक चर्चेमधून बेदखल करण्याचा हा डाव जगातील जवळपास सर्व देशांमधील डाव्या विचाराचे "पुरोगामी‘ विचारवंत खेळत आले आहेत. भारतामध्ये तर ही परंपरा कमालीची यशस्वी झाली. पदोपदी अभिव्यक्ती स्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्याची महती गाऊन प्रत्यक्षामध्ये इतकी वैचारिक अस्पृश्‍यता क्वचितच इतरत्र कोठे जपली गेली असेल. मात्र इतकी वर्षे ही योजना यशस्वी कशी झाली, हा खरा प्रश्‍न आहे. या वरवर कूट दिसणाऱ्या प्रश्‍नाचे उत्तर खरे पाहता अगदीच सोपे आहे. गेल्या सुमारे चार दशकांपेक्षा जास्त काळापासून समाजास शिक्षित करणारी माध्यमे समाजवादी व डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांच्या नियंत्रणामध्ये होती. माहितीवरील नियंत्रण हे या यशाचे खरे सूत्र होते. मात्र गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून जगामध्ये माहितीच्या क्षेत्रामध्ये क्रांती झाली. यामुळे आता माहिती देणारा सर्वोच्च स्थानी नसून माहिती पुरवठादार व वाचक हे संबंध आता परस्पर देवाणघेवाणीच्या स्तरावर आले आहेत. पत्रकारिता व माध्यमांमध्ये झालेल्या या क्रांतीनंतर या कथित डावे व समाजवाद्यांचे बिंग उघड करणाऱ्या विचारांना समाजामध्ये खऱ्या अर्थी प्रतिनिधित्व मिळू लागले आहे. कोणत्याही स्वरुपाची माहिती ही सार्वजनिकरित्या सहजगत्या उपलब्ध होत असल्याने डाव्यांच्या ध्यानीमनी नसलेली, माहितीचे "डिसेंट्रलायजेशन‘ करणारी खरीखुरी लोकशाही पहावयास मिळू लागली आहे. यामुळे कोण पुरोगामी आहे; व कोण संधिसाधु, याची पावती आता सामान्य वाचक आपल्या विशिष्ट विचारसरणीने माहिती प्रदुषित करणाऱ्या कोणत्याही "माध्यमा‘शिवाय थेट देऊ शकतील.

    अर्थात, शेषरावांच्या या भाषणामध्ये पुरोगामी दहशतवादाचा मुद्दा फारच संवेदनशील आहे, कारण शेषराव असोत; वा सावरकर असोत, ते कुठल्या कसोटीच्या आधारावर प्रतिगामी ठरतात, हे पुरेसे स्पष्ट झालेले नाही. राज्यघटनेचे प्रामाण्यत्व, लोकशाही व दरडोई एकमताचा पुरस्कार, विचारस्वातंत्र्य व अभिव्यक्‍ति स्वातंत्र्याचा पुरस्कार, शांततापूर्ण मार्गाने प्रतिवाद करण्याची तयारी, चातुर्वण्य व जात्युच्छेदक भूमिका, विज्ञानवादी दृष्टिकोन अशा कोणत्याही घटकाची कमतरता या विचारवंतांमध्ये नाही. तेव्हा पुरोगामी होण्यासाठी अशी कुठली कसोटी आवश्‍यक आहे; जी हे विचारवंत अद्याप उत्तीर्ण झालेले नाहीत, हे समजावून घेण्यासाठी फार अभ्यास करण्याची आवश्‍यकता नाही. पुरोगामी असणे; आणि पुरोगामी म्हणून मान्यता मिळणे या दोन भिन्न गोष्टी आहेत, ही बाब या निमित्ताने समजावून घेतली तरी पुरेसे आहे. मुळात महाराष्ट्रातील पुरोगामी वर्तुळे व सनातन धर्माचा अट्टाहास धरणाऱ्या संस्था, या दोन्हींमध्ये एक आश्‍चर्यकारक साम्य आहे. एकमेकांचा पराकोटीचा द्वेष करणाऱ्या या संघटनांमध्ये इतरांविषयी आढळणारी कमालीची असहिष्णुता हा समान दुवा आहे. तेव्हा असल्या वर्तुळांमधून मान्यता मिळणे वा शिव्या मिळणे; दोन्हीला फारसे महत्त्व नाही. सावरकरांनी आयुष्यभर ही अवहेलना व द्वेष झेलला. शेषरावांनीही याची फारशी खंत बाळगण्याची आवश्‍यकता नाही.


    समाप्त..........टीप: शेषराव मोरेंचे सावरकर ह्यांचाबद्दल विचार जे आहेत त्याच्याशी मी १००% सहमत नाही. बाकी विषयावरील त्यांचे ९९ % मुद्दे अचूक आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. अस्सल पुरोगामी दांभिकपणा
      - योगेश परळे


      खर पाहिलं तर लेख वाचयला सुरवात केली आणि लेखक प्रतिगामी असल्याचा संशय आला, मग पुढे वाचत गेलो तर कधी या तीरावर तर कधी त्या तीरावर असे हिंदळत राहिलो. मग ह्या हिंदोळ्यात कधी बाबासाहेब आंबेडकरांचा आसरा घ्यावा लागला (बहुजानाने दोष देऊ नये आणि आपला अजून शेषराव होऊ नये म्हणून) तर कधी सावरकरांना हाताशी घ्यावे लागले.(आपल्या मनातील खरा विचार समोर आणायला) .....बर्याचदा लेखक वकील आहे असे दिसले. पण शेषराव चे सर्वच विचार कसे लेखक जणू शकतील अशी अतिशयोक्ती दिसली. सावरकर पुराण जर जास्तच ...... काय कुणास ठाऊक सावरकरांना भारतरत्न देण्यासाठीचा प्रयत्न तर नाही ना..... यांनी यांचेच ठोक टाळे ठरवलेले दिसले. कधी कधी लेखात बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून रोष कमी करण्याचा लाजीरवाणा प्रयत्न केला आहे. पण असो विचार प्रक्रियेला दाद द्यावी लागेल. लेख परिपूर्ण असा नाही. फक्त पुरोगामी लोकांवर उडवलेला एक मार्मिक आसूड आहे. कदाचित प्रतिगामी दहशतवाद असावा.......

      Delete
  17. शैव धर्माचे काश्मिरी पंडित काश्मिरातून हाकलून लावले गेले त्याबद्दल संजय सरंना काही म्हणायचे आहे का? वैदिक तिकडूनच घुसले होते ना मग त्यांनी काश्मिरी पंडितांना कसे जिवंत ठेवले? तेव्हा शैव धर्माचे पालक कुठे शेपट्या घालून बिळात बसले होते.

    ReplyDelete
  18. शेषराव यांच्या बद्दल श्री पाटसकर यांनी जी बहुमोल माहिती या ब्लोगवर दिली आहे त्याने अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले . सावरकर हे काळाच्या पुढे होते हे नक्कीच , तसेच त्यांचे विचार धार्मिक म्हणजे जुनाट अजिबात नव्हते , खरेतर त्यांची पुस्तके शालेय अभ्यास क्रमात लावली पाहिजे इतकी ती मुलभूत विचार मांडणारी आहेत . माननीय शेषरावानी जो पुरोगामी दहशतवाद हा मुद्दा मांडला आहे तो संजय सोनावणी याना जाणवत नाही हे त्यांचे आणि आपले दुर्दैव म्हणावे का ?
    पाटसकर सरांनी , अतिशय समयोचित पाने हा विषय मांडून लोकांची मने जिंकून घेतली आहेत . अशा लिखाणाला व्यासपीठ लाभत नाही हे दुर्दैव . अशा विचारणा मनमोकळेपणे संजय सर हा ब्लोग उपलब्ध करून देतात हा त्यांचा मोठेपणा आहे हे नक्की !
    श्री पाटसकर सर , शेषराव मोरे यांचे हे विचार आम्हास पुस्तकरूपाने किंवा पत्रिकेच्या रूपाने वाचावयास मिळतील का ?
    संजय सर अशी निर्मिती करून लोकांपुढे ठेवतील का ?
    संजय सराना या निमित्ताने कळकळीची विनंती करावीशी वाटते की त्यांनीपण शेषराव यांचे विचार आणि त्यावर संजय सरांची मते असे विश्लेषण ब्लोग वर द्यावे , म्हणजे लोकाना संजय सरांबद्दल आदर वाटू लागेल !नाहीतर त्यांची स्थिती दिवसेदिवस दयनीय होत चालली आहे .
    पाटसकर काकांचे पुन्हा एकदा अभिनंदन ! काका आपले नाव सर्थ केलेत .आय आम प्राउड ऑफ यू !

    ReplyDelete
  19. आप्पा अरे बाप्पा , अरे जसा असशील तसा ये
    बाप्पा - काय रे काय झाले तरी काय एव्हडे ?
    आप्पा - अरे काय झाले नाही ते विचार , आपणपण इतके बुद्दू आहोत हे आज समजले. म्हातारपण आपल्याला पंगु बनवत आहे आणि आपण या पाटसकराना उगाच धोपटत होतो ,चल, कान पकडून त्यांची क्षमा माग !
    बाप्पा - तू म्हणतो आहेस म्हणून हं,पाटसकर साहेब आम्ही जर पूर्वी काही आगळीक केली असेल तर या म्हाताऱ्याला माफ करा . नक्कीच आप्पा म्हणतो आहे ते आहे तरी काय ?
    आप्पा - अरे या ब्लोगवरच प्रा.शेषराव मोरे यांच्या विचारांबद्दल पाटसकर सरांनी पुढाकार घेऊन पुरोगामी दहशतवाद हा मुद्दा समजावून सांगितला आहे. इतका महत्वाचा नाजूक विषय त्यांनी इतका सरळ मांडला आहे म्हणून आधी अध्यक्ष प्रा.शेषराव मोरे यांचे शतशः आभार !
    बाप्पा - आणि संजयचे पण आभार , त्याने हे सर्व आपल्या ब्लोगवर मांडू दिले यालाही लोकशाही मन लागते ! हो की नाही पाटसकर सर ? तुमचा मुद्दा बरोबर आहे की शैव काश्मिरी ब्राह्मणाना मारले जात होते - त्यावर संजय काहीतरी लिहिलच . आप्पा - आता जरा जरा मजा येऊ लागली आहे या ब्लोगवर जिवंतपणा आला आहे . पातास्कारांनी तर ब्रह्मांड मांडले आहे , शेश्रावांचे हे विचार संजयाने का स्पर्शाले नाहीत ? हे एक आश्चर्य आहे ! काय म्हणतोस तू संजय ? जरा बोल ना !

    ReplyDelete
  20. माननीय अगाशेसाहेब, आप्पा-बाप्पा, आणि चि. सौ. का. मानसी आपण माझी प्रशंसा केलीत ह्याबद्दल धन्यवाद! शेषराव मोरे ह्यांचा भाषणाचा उहापोह करणारा लेख दै. सकाळ वर योगेश परळे ह्यांनी लिहिला आहे तो मला वाचनीय वाटला म्हणून मी इथे प्रस्तुत केला. अर्थात जगात सर्वांचे विचार सर्वांनाच पटतील असे नाही. आपलेही ह्याच ब्लोगवर बरेच खटके उडाले आहेत पण जिथे विचार जुळतात तिथे हो म्हणायचा मोठेपणा अंगी आपण सगळे आणता हे आपण सर्वांचे सुभाग्य आहे.

    ReplyDelete
  21. Sanjay, don't you think "Dehati Aurat" remark was insulting to our Nation? I did not see any anger in your blog/writing on that remark. Or was that ok for you, as it was a great appreciation and victory of your beloved Ex Prime Minister?

    ReplyDelete
  22. आप्पा-अरे अमीत ,असतो तरी कुठे हल्ली तू , संजयला आत्ता जी तू मार्मिक शाब्दिक चपराक मारली आहेस त्याबद्दल अभिनंदन ! कारण हा नेमकेपणा तुझ्यात आहे आणि आमच्यात नाही .
    बाप्पा - संजयचे लाडके चहातेपण या वादात पडत नाहीत , तो विकास उगाच आपला मधेमधे काहीतरी लिहित असतो , ते एक असो . पण जरा नियमित या ब्लोगवर नजर असुदे !बाय !

    ReplyDelete
  23. नमस्कार सर. मी आपला वोरोधक नाही. मला आपले लेखन खूप आवडते. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की बर्याच लेखांत जणू आपण अट्टाहासाने प्रत्येक महापुरुष, देव, राजा पशुपालक म्हणजे धनगर असल्याच सिद्ध करण्याच्या नादात कधी कधी भरकटत जाता. म्हणजे आपला अभ्यास खरच खूप दांडगा आहे. पण कधी कधी अस जाणवत की आपण जे सिद्ध करायचं आहे ते आधीच ठरवून मग मिळालेल्या पुराव्यांना हेवे तसे ताणून साध्या पर्यंत पोहचवता. ही गोष्ट जरा लक्षात घेतली तर बर होईल. आपल्या पुढील लेखन प्रवासास शुभेच्छा. काही चूकल असल्यास क्षमस्व.

    आणि हो स्वानुभवाने सांगतो… भारतीय अध्यात्मिक ज्ञान खूप गूढ आहे आणि साधनेत खूप सामर्थ्य आहे. आपल्या सारख्या चिकित्सक व्यक्तीने खरच एकदा तरी योग्य गुरुंच्या माध्यमातून याची चिकित्सा करावी आणि स्वतः अनुभव घ्यावा. कारण माहिती कुठेही मिळेल पण ज्ञान साधनेनेच मिळेल.

    आपले कल्याण होवो!!!

    ReplyDelete
  24. आप्पा-सचिन सावंत सर ,मला आपले वय माहित नाही पण आपण लिहिले आहे ते फारच सकस आहे विशेषतः दुसरा प्यारिग्राफ अगदी मनापासून आचरणात आणावा असा आहे
    बाप्पा-खर आहे साधना हा विषय अतिशय महत्वाचा आहे , आणि विचाराना जशी आचरणाची जोड लागते तशीच जर साधनेचीही असेल तर फारच दुग्ध शर्करा योग !
    आप्पा - आपल्या सारख्या लोकांनी अशा ब्लोगवर वरचेवर लिहित जावे अशी आम्ही अपेक्षा करतो कारण इथे ठराविक पद्धतीचे विचार मांडले जातात आणि तेचतेच लोक अगदी आमच्या सकट तिचतीच पुनरावृत्ती करत असतात , आपले लेखन चर्चेला नवे परिमाण देईल
    बाप्पा- नवी दिशा देईल
    आप्पा - नवी खोली देईल
    बाप्पा - नवी उंची देईल,
    आप्पा-लेखन आणि त्यामागचे विचार आणि मूळ विषय यात अनेकदा तारतम्य रहाताना दिसत नाही, ते काम आपण कराल अशी आशा करतो , अभिनंदन !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर. माझ वय 33 आहे.

      Delete
  25. न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठीचा न्यायिक आयोग घटनाबाह्य – सर्वोच्च न्यायालय
    कॉलेजियम पद्धतीनुसारच न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले

    न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठीचा न्यायिक आयोग घटनाबाह्य – सर्वोच्च न्यायालय
    न्यायमूर्ती जे. एस. खेहर यांच्या नेतृत्त्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठामध्ये यासंबंधीच्या याचिकांवर सुनावणी झाली
    सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या माध्यमातून करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी घटनाबाह्य ठरविला. कॉलेजियम पद्धतीनुसारच न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायिक नियुक्ती आयोगासाठी संसदेने मंजूर केलेली ९९ वी घटनादुरुस्ती न्यायालयाने घटनाबाह्य ठरविली. त्याचबरोबर हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाकडे वर्ग करण्याची केंद्र सरकारची मागणीही न्यायालयाने फेटाळली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे.
    न्यायमूर्ती जे. एस. खेहर यांच्या नेतृत्त्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठामध्ये यासंबंधीच्या याचिकांवर सुनावणी झाली आणि त्यावर निकाल देण्यात आला. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ नोव्हेंबरला होणार आहे. कॉलेजियम पद्धती अधिक परिपूर्ण करण्यासाठी काय उपाय करायला हवेत, यावर पुढील सुनावणीवेळी विचार करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
    राष्ट्रीय न्यायिक नियुक्त्या आयोग कायद्याखाली (नॅशनल ज्युडिशियल अ‍ॅपॉइंटमेंट्स अ‍ॅक्ट) सर्वोच्च न्यायालय आणि राज्यांच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करण्यासाठी ‘राष्ट्रीय न्यायिक नियुक्त्या आयोग’ या नावाने सहा सदस्यांची एक समिती स्थापन केली जाणार होती. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम २ न्यायमूर्ती, केंद्रीय कायदा मंत्री आणि दोन ‘ख्यातनाम व्यक्ती’ यांचा समावेश असेल. पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते किंवा सगळ्यात मोठय़ा पक्षाचे नेते यांची समिती या दोन ‘ख्यातनाम व्यक्तींची’ नामनियुक्ती करणार होती
    राष्ट्रीय न्यायिक नियुक्त्या आयोगाच्या (एनजेएसी) घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. ९९ वी घटनादुरुस्ती कायदा आणि एनजेएसी स्थापन करण्याच्या घटनात्मकतेशी संबंधित असलेले सर्व मुद्दे तीन सदस्यीय खंडपीठाने पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपवले होते.

    ReplyDelete
  26. मुस्लिम इथे निश्चिंतपणे राहू शकतात, पण त्यांना गोमांस सोडावे लागेल – खट्टर

    त्यांच्या या नव्या विधानामुळे सत्ताधारी भाजप सरकार आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे
    मुस्लिम इथे निश्चिंतपणे राहू शकतात, पण त्यांना गोमांस सोडावे लागेल – खट्टर
    खट्टर सरकारला या महिनाअखेर एक वर्ष पूर्ण होते आहे. त्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दादरी प्रकरण आणि गोमांस यावर आपली बाजू मांडली.
    मुस्लिम निश्चिंतपणे देशात राहू शकतात. पण त्यांना गोमांस खाणे सोडून द्यावे लागेल, हे विधान आहे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे. त्यांच्या या नव्या विधानामुळे सत्ताधारी भाजप सरकार आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
    ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत खट्टर यांनी दादरी आणि गोमांस या दोन्ही विषयांवर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, दादरीमध्ये जे काही घडले, ते अत्यंत चुकीचे होते. केवळ गैरसमजुतीतूनच हा प्रकार घडला. गीता, सरस्वती आणि गायीला देशातील मोठा समाज आजही पवित्र मानतो. अनेकांची यावर श्रद्धा आहे. त्यामुळे त्याचा विचार करून मुस्लिमांना गोमांस खाणे सोडून द्यावे लागेल.
    खट्टर सरकारला या महिनाअखेर एक वर्ष पूर्ण होते आहे. त्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दादरी प्रकरण आणि गोमांस यावर आपली बाजू मांडली. खट्टर गेल्या चार दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. हरियाणा विधानसभेने मंजूर केलेले गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन विधेयक ही आपल्या सरकारची मोठी कामगिरी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    ReplyDelete
  27. Sanjay Sir, there is tooooo much noise created against your article.... There is absolutely no connection between what your article is saying and what the responses are. Responses are typically trying to project/protect good image of vaidiks/brahmins. Somebody mentioned that you were trying to create a rift between vaidik's and hindus and you failed. He is wrong on both accounts... you were not creating a rift but your message has reached many. Although my voice is also very weak and small.... but I hear you and I understand you... keep saying it ! I won't hate anybody be it vaidik's or brahmins... who gives a shit anyway? But yes, I will ensure that I am not pelting stones on masjid/muslims because these intellectual bastards are inciting me. and I believe that's a good start. :-)

    Please keep going !

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
  28. Those who are asking for explanation on kashmiri pandits and 'dehati woman' should first give explanation for so many things... can you start with what Mangesh quoted of Mr. Khattar? Or what the supreme court said?

    P.S.
    Marathi type karayala far vel lagato mhanun english madhye lihitoy.


    PPS
    It's funny how some people are still using the word 'lekhan seema' in today's online comments ?! There is no one who can change your comments once you have posted them. :P

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
  29. Pataskar saheb... tumche comments changalech aahet... pan lekkhacha mudda to nahiye na ! Aani hach problem tumachya bahutek comments vishayie mala vaatato.
    BTW I don't agree to most of your comments though. But hey, you are entitled to have an opinion.

    BTW congrats now appa+ bappa have jumped ship and became your friends ! It brings chuckle ! :-)

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
  30. नीरज साहेब आपण अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. चर्चा भरकटते आहे हे खरे आहे, ह्या लेखावर काय बहुतेक सर्वच लेखांत असेच तुम्हाला आढळेल. पण आता उशिरा का होईना तुम्ही आला आहात म्हणजे सगळे सुरळीत होणार हे नक्की. आपणास मराठी लिहिण्यात अडचण असेल किवा वेळ कमी असेल म्हणून होय, पण चर्चा कुठे भरकटते तिथे सगळ्यांच्या निदर्शनास आणून नेमके बुच ठोकले तर फार बरे होईल. आणि आप्पा बाप्पा आणि समस्त मित्रमंडळी ह्यांचे आमचे असेच कभी हा कभी ना चालू असते. आता मी म्हटले कि सावरकर जरी ब्राम्हण असले तरी जन्म पत्रिकेप्रमाणे ते शुद्र वर्णीय व राक्षस गणाचे होते, त्यामुळे त्यांचा अखंड हिंदुस्तान हा मुद्दा पोकळ होता, उद्या समस्त पाकिस्तान्यांना भारतात बॉम्ब फोडायचे खुले लायसन त्यामुळे मिळाले असते वगैरे तर आप्पा बाप्पा, समस्त मित्र मंडळी ह्यात पुन्हा धुमश्चक्री चालू होईल. व्यक्ती तितकी मते, आणि विचार. पण आपण इथे आलात बरे वाटले. असेच येत जा.

    ReplyDelete
  31. Pataskar saheb... me ajun "saheb" level var nahi gelo... to maan tumha lokanchach. Aani booch vagaire marnara me kon? Keep posting... I will know what to take and what to leave :P

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
    Replies
    1. नाही नाही नाही नीरज साहेब! अहो तुम्ही इतके महान म्हणून तुम्हाला मुद्दे भरकटतात हे कळले. आम्हा बावाल्यांना थोडेच असे कळते. त्यामुळे पूर्वी गोरे साहेब आणि आता तुम्ही साहेब. आणि बुच मारायचे नसते. पाईपला बुच ठोकतात. तुम्ही मारायचा अर्थ काढलात तो वेगळा! पण असूद्यात. तुम्ही मारा किवा ठोका आम्हाला सगळे चालेल. पण काहीतरी करा म्हणजे आम्हाला काहीतरी कळेल. तुम्ही काहीच केले नाही तर मात्र ह्या ब्लोगचे अवघड आहे.

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...