Monday, October 5, 2015

वैदिक धर्म म्हणजेच हिंदू धर्म?


डा. सदानंद मोरे यांच्या "अज्ञात पैलू थोरांचे" या स्तंभातील "व्यासांचे वारसदार ज्ञानेश्वर!" या लेखात काही अनैतिहासिक विधाने आली आहेत. वैदिक धर्म पुरातन असून वैदिक धर्म म्हणजेच आजचा हिंदू धर्म अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे. वैदिक धर्म वेदांवर आधारित असून तो यज्ञयागाच्या कर्मकांडाभोवती फिरतो हे त्यांना मान्य आहे. त्यात मुर्तीपुजेला स्थान नाही. वैदिक धर्म भारतात इसपू १५०० च्या आसपास आला. तो आर्य आक्रमकांमुळे किंवा धर्मप्रचारकांच्या माध्यमातून आला असे प्राच्यविद्येचे बहुसंख्य विद्वान मानतात. पण त्याहीपुर्वी सिंधू काळापासून आजतागायत चालत आलेला जो लिंगपुजकांचा/प्रतिमापुजकांचा धर्म होता त्याबाबत मात्र डा. मोरे यांनी त्यांच्या लेखात अवाक्षरही काढलेले नाही. वैदिक धर्मात यज्ञद्वारे आहूति देणे हेच अमूर्त देवतांना संतुष्ट करण्याचे माध्यम असून प्रतिमापुजा या धर्माला मान्य नाही. हिंदू हे आजही प्रतिमा/मुर्तीपुजक आहेत व ते वैदिक धर्मतत्वांच्या विरोधात आहे. एवढेच नव्हे तर हिंदू ज्या देवता पुजतात त्यातील एकही देवता ऋग्वेदात उल्लेखली गेलेली नाही. तीन वर्णाच्याच लोकांना वेदाधिकार होता हे मान्य करत असतांना ज्यांना वेदाधिकारच नाही ते वैदिक धर्मीय कसे असू शकतील याकडेही डा. मोरे यांनी कसे दुर्लक्ष केले हाही प्रश्न आहे. वैदिक स्त्रीयांनाही पुर्वकाळात वेदाधिकार होते. ते नंतर काढून घेतले हेही डा. मोरेंनी नमूद केले असते तर जरा वास्तवपुर्ण झाले असते.
या पार्श्वभुमीवर वैदिक धर्माला प्राचीन काळी पर्यायच (म्हणजे प्रतिस्पर्धी धर्म) नसल्याने या धर्माला फक्त "धर्म" म्हटले जायचे हे डा. मोरे यांचे विधान विपर्यस्त आहे हे उघड आहे. डा. रा. ना. दांडेकर यांनी सिंधू संस्कृतीचा धर्म हा मुर्ती/लिंग/मातृपुजकांचा असून नंतर कधीतरी जन्माला आलेल्या वैदिक धर्मापेक्षा तो पुर्णतया वेगळा होता. या संस्कृतीच्या मुख्य देवाला "सिब" असे म्हटले जात असून सिंधू संस्कृतीचा धर्म आदिशिवाचा होता हे स्पष्ट होते, असे नमूद केले आहे. (संदर्भ- Hinduism- Dr. R. N. Dandekar) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही आपल्या "वैदिक संस्कृतीचा विकास" या ग्रंथात तसेच पाश्चात्य विद्वानांनीही आपल्या विवेचनांत सिंधू संस्कृतीचा धर्म शिव-शक्तीप्रधान असल्याचे स्पष्ट नमूद केलेले आहे. वेदपुर्व काळातच व्यापक प्रमाणात शिवप्रधान धर्माचे उत्खनित पुरावेही मिळत असता "वैदिक धर्माला पर्यायच नव्हता." ही डा. मोरे यांची मांडणी अनैतिहासिक व विपर्यस्त आहे हे उघड आहे. वैदिक धर्म हा शिव-शक्तीप्रधान, पुजा हेच कर्मकांड असलेला धर्म नव्हे हे उघड आहे. मग वैदिक धर्म हा हिंदू धर्म कसा हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो.
आजही सिंधूकाळातील मुर्ती-प्रतिमापुजकांचाच धर्म सर्वव्यापी असून वैदिक धर्माने त्याचे स्वतंत्र अस्तित्व राखलेले आहे. त्यामुळे वैदिक धर्म म्हणजेच हिंदू धर्म ही मांडणी सत्याला धरून नाही. वैदिक धर्मीयही बहुसंख्याकांच्या धर्म मुर्तीपुजकांचाच (म्हणजे शैव अथवा हिंदू) असल्याने कालौघात मुर्तीपुजक बनले असले तरी त्यांनी आपले वैदिकत्व त्यागलेले नाही या वास्तवाकडेही त्यांनी लक्ष द्यायला हवे होते असे मला वाटते.

24 comments:

  1. अगदी बेछूट लिहिलेला लेख आहे, मोरे काय लिहितात हा भाग वेगळा ठेऊ, ह्या लेखात जे मुद्दे मांडले आहेत त्याचाच आधी विचार करू,
    १) आपल्याला थोडी का होईना रुग्वैदिक संस्कृत कळते म्हणून त्यावर आपण भाष्य करतो, पण सिंधू लिपीचा उलगडा अजिबात झालेला नसताना नुसत्या चित्रांवरून अर्थ काढणे म्हणजे विनोद आहे.
    २) ज्याला योगी पुरुष म्हणून पशुपती सिंधू प्रवर्तक लोक म्हणतात त्या पुरुषाच्या प्रतिमा नाहीत. कारण त्यांच्या हातात बांगड्या आहेत. त्याही पूर्ण दंडापासून मनगट पर्यंत. अश्या बांगड्या पुरुष कधीच घालत नाहीत. मात्र अश्या बांगड्या आजही राजस्थान गुजरात मध्ये घातल्या जातात. वरती दिलेले शब्द ग्रीक किवा रोमन अंकदर्शक आहेत कारण तीच तीच अक्षरे नेहमी येतात. म्हणजे ह्या स्त्रीचे ते व्यापारी मुल्य असावे असे वाटते.
    ३) खास जातीच्या वृषभाचे हि तसेच आहे. त्याचे मुल्य वरती दिलेले आहे. हे सगळे व्यापारिक पुरावे आहेत त्याला ओढून ताणून धार्मिक म्हणणे अगदी चूक आहे.
    ४) शिवलिंग फक्त १ सापडले!! इकडे जर शोधायचे तर हजारो काय लाखो, घरोघरी २-२ शिवलिंग सापडतात आणि तिकडे फक्त एकाच सापडले म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणे असे आहे. तेही शिवलिंग मूळ शिवलिंग प्रकारापेक्षा अगदी वेगळे आहे. असा शिवलिंगाचा आकार आजकाल मशीन ने बनवल्यासारखा वाटतो. जेजुरी द्विलिंग, १२ ज्योतिर्लिंगे, असंख्य शिवलिंगला खाली लाम्बुळका भाग नसतो. तर ते सपाट जमिनीत असते. त्याला स्त्रीचा भाग ठरवणे म्हणजे काहीतरीच आहे. जेजुरीचे लिंग पहा. दोन लिंगे चिकटून आहेत. ते वेगळे ठेवले जाते. विरगळातील लिंगे अशीच स्वतंत्र आहेत.

    ReplyDelete
  2. ५) हातातील बांगड्या ह्या स्त्रीच्या गुलामगिरीचे प्रतिक आहेत. त्यामुळे ती फार शक्तीपुर्वक प्रतिकार करू शकत नाही. फार कष्टाची कामे ती करू शकत नाही. ती जवळ असल्याल किवा लपली असल्यास तिच्या अस्तित्वाचा सुगावा बांगड्यामुळे सहज लागतो. म्हणजे हे मातृ -पितृ पूजक संस्कृतीचे पुरावे नसून पुरुषसत्ताक समाजाचे पुरावे आहेत. अश्याच बांगड्या लमाण स्त्रिया घालतात त्यांचे माल वाहण्याचे वाहन बैल आहे. म्हणजे सिंधू लोक माल वाहून नेणारे होते का?
    ६) अर्धाक्र्ती मानवाचा पुतळा शिवाशी कुठेही जुळत नाही तो युरोपीय किवा पर्शियन माणसाशी जुळतो.
    ७) स्त्रियांच्या ज्या भाजलेल्या मातीच्या बाहुल्या सापडल्या त्या फक्त स्त्री शरीर दाखवणाऱ्या आहेत. शक्ती ह्या देवीच्या रूपाशी त्यांचा अर्था अर्थी संबंध नाही. ना त्यांच्या हातात कुठले अस्त्र आहे ना शास्त्र. शक्ती ह्या वैदिक शोधाचा उपयोग आता बहुजनांना गन्दावायला सिंधूचा शोध म्हणून रेटून देतात ते मिथ्य आहे. शिवाय ह्या मूर्ती भाजलेल्या मातीच्याच का? पाषाणाच्या का नाहीत? कारण त्या फक्त लहान मुलांच्या बैलगाड्या व मोठ्यांच्या स्त्री बाहुल्या खेळणे म्हणून तात्पुरत्या वापराच्या होत्या. मूर्तिपूजक अशा तात्पुरत्या मुर्त्या बनवत नाहीत हे पुढे येतेच.
    ८) पशुपती म्हणून जो सर्प हाताने दूर धरणारा शिक्का आहे तो आणि शिव ह्यांचा काहीही संबंध नाही. ती एक स्त्री आहे. तिच्या डोक्यावर हरणासारखी शिंगे आहेत. शिवाय बर्याच ठिकाणी स्त्रीचे स्तन स्पष्ट दिसत असून तिला बळेच पशुपती म्हणणे म्हणजे गम्मत आहे.
    ९) बांगड्या ज्या स्पष्ट दिसतात त्या पितळाच्या बाहुलीच्या हातात. ती कुठल्याही देवीची मूर्ती नाही. अश्याच बांगड्या बाकीच्या योग्मुद्रेतील स्त्रीच्या हातात दिसतात.
    १०) सिंधूच्या हत्तीचा आणि गणपतीचा काडीमात्र संबंध नाही.
    ११) सिंधू अवशेषावरून त्यांचा शिव धर्माशी संबंध जोडणे म्हणजे चक्क ओढाताण करणे आहे. परदेशी शोध घेणारे आपल्या मनाप्रमाणे काहीही शोध सांगतात आणि आपण तेच दाखले इथे देत फिरतो. स्वताच्या डोळ्याचा आणि मेंदूचा अजिबात वापर करत नाही हे आपले दुर्दैव.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. डा. रा. ना. दांडेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, हि आपली नेहमीची गिऱ्हाईके शोधून त्यांना झोडपायचे काम करणे ह्यावरून कोणाची अक्कल किती चालते ह्यांची तुलना अजिबात होत नाही. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांच्या काळात इंटरनेट उपलब्ध नव्हते, तेव्हा त्यांना जे पुस्तकी ज्ञान उपलब्ध होते त्यावरून जे काही लिहित होते त्याचा अर्थ किवा डॉ. दांडेकर जे लिहितात ते ब्रम्हवाक्य म्हणून घाणेरड्या वृत्तीने वापरणे हे निंदनीय आहेच शिवाय संस्कृत भाषेचा डॉ. असलेल्या लोकांना हे लोक अतिशय हिणकस प्रकारे अपमानित करतात. हेही स्वतः सिंदू लिपीचा उद्बोध न झालेल्या लोकांनी फेकाफेकी करणे ह्यातच ह्या लोकांची मुजोरी आणि खोटारडेपणा स्पष्ट होतो. म्हणजे स्वतःचे काहीच नाही पण दुसर्याचे उधार घेऊन त्यांनाच अक्कल शिकवायचे काम करणे म्हणजे उपकार्कार्त्याला त्याचा उपकाराचा जोड्याने मारून मोबदला देणे हे आहे. ह्यात सिंधू संस्कृतीचा जो उदोउदो चाललेला आहे तो नगररचनेच्या व जल व्यवस्थापनाशी संबंधित विषय आहे त्यावर शास्त्रीय असे काहीही संबोध हे लोक सांगत नाहीत, फक्त वैदिक लोकांचे नावाने खडे फोडतात. उलट सिंधू लोक हे जरी नगर शास्त्राप्रमाणे पुढारलेले होते तरीही ते ह्यात वैदिक अंतर्भाव किती आहे हे अवैदिक लोकांना माहित नाही. वरुण, उदःक, जल अर्थात जल, ह्यावर पूर्ण सृष्टी निर्भर आहे त्यावर हे लोक जल ह्या वरुण शब्दाचा अर्थ मुद्दाम शोधत नाहीत, वरुण हा विशेषतः शुद्ध जल देणारी व मानवी जीवन वाढवणारी देवता आहे, हे इंद्रावरुण हे ह्यांच्या मेंदूत न घुसणारे वैदिक आहे. प्रदूषित जलातून व अन्नातून विषाणू अंगात प्रवेश करतात हे साधे शास्त्र रुद्राध्यायात दिले आहे, "ये अन्नेषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान" हेही रुद्राध्यायात स्पष्ट आहे, पण तरीही वैदिक रुद्र हा संहारक कसा असा उलट शोध घेणारे लोक मोठे चमत्कारी विदुषक आहेत, यापेक्षा त्यांची किंमत काहीच नाही. सिंधू लोक जी जल सुचिता करत होते त्याचा पाया हा वैदिक आहे. अन्यथा ती एक जंगली आणि स्त्री शोषण करणाऱ्या संस्कृतीच होती हे स्पष्ट होते. आर्कीमिडीसने जे जल तत्व शोधले ते फार उशिरा, पण सिंधूने ते प्रात्यक्षिकपणे शोधले ह्याचा हे तथा.क. युरोपियन लोकांचे गुलाम सांगायला पुढे येत नाहीत. विहीर खोदताना, ओढे-नाले बुजवताना जे वरून सुक्त म्हटले जायचे त्याचा साती आसरा ह्या देवतेचा काय संबंध आहे हे ह्या लोकांना काहीच माहित नाही. नंतर नुसते दुष्काळ दुष्काळ करून बोम्बलता आणि गाई बैलांचे बळी देता? सिंधू लोक वृषभ मोठ्या अभिमानाने पाळत होते. तुमची का इतकी हातघाई झाली कि तुमच्या ५० किलोच्या देहाला आणि तुमच्या सव्वाशे किलोच्या कुटुंबाला २०० किलोचा गाई बैल म्हैस रेडा खायला लागतो? कारण तुम्ही कर्म करत नाही. फुकट बसून तुम्हाला सगळे पाहिजे. आणि स्वतःचे खाऊन झाले कि फेकून द्यायचे हीच वृत्ती आहे, त्यातून काय रोग पसरतात ते तुम्हा अडाण्यांना काळात नाहीत.

      Delete
  4. इतके ग्रीक रोमन अक्षरांचे पुरावे सिंधू लिपीत सहज आणि स्पष्ट दिसत आहेत तरीही संजय सोनवणी त्याबद्दल स्वतः काही लिहिणार नाहीत, किवा अवाक्षर हि काढणार नाहीत, ते युरोपियन किवा एखाद्या वैदिक माणसाच्या सोधाचा आधार घेऊन ते नुसते च्याव्च्याव करणार.. ज्याला स्वतःचे काहीच नसते पण राक्षसी राजकीय महत्वाकांक्षा असते तो माणूसच असली कामे करू शकतो. नाहीतर जे संजय सोनवणी स्वतःचे समाजवादी आत्म दाखवतात त्यांना सिंधू लिपीत "शिब" अगदी रात्री झोपेत सापडायला सहज शक्य आहे. बघा मी सांगतो ते १०१ % सिंधू लिपीतून "शिब" शोधून दाखवणार. आणि समस्त युरोपि आणि पाश्चात्य संशोधक तोंडात बोटे घालून बसणार.. संजय सर, संजय सर, प्लीज सांगा ना ते शिब सिंधू मध्ये कुठे लिहिले आहे.. सांगाना, सांगाना, अम्हा शैव वेड्यांना फारच उत्कंठा लागली आहे. आधीच तुम्ही शैव चे व्यसन लावले आणि आता शिब सांगणार नाही असे करू नका, फार आतुरतेने तुमच्या शिब्ची वाट बघतोय आम्ही तुमचे भक्त!!

    ReplyDelete
    Replies
    1. are appa-bappa, manasi, beduk kaku, agashe, ani shewati gore bhubal hya manav sanskarachya baheril lokanna kay jhale ahe aaj? ya na.. far motha waad pethlay.. to shaniwar pethetlya nirodhcha nahiye, naa to khandobachya muralicha ahe.. to far purvichya sindi shiv dharmacha ani waidik dharmacha waad chalu ahe, tumachi pitre urakali ka? ki tumhich pitr banun pind khat aahat ki ksy? kuthe mele sagle, ya ya ya tumache nirodh, murliche dnysn ithe psjala

      Delete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. राम आणि क्रुष्ण हे अवैदिक हिंदु देव होते अस मानल जात. त्यांच्या सूद्धा बुद्ध पुर्व मूर्त्या कोठे सापडलेल्या आहेत ? ते वैदिक किवा काल्पनिक होते की काय ?

    ReplyDelete
  7. शिवाय वैदिक त्र्यंबक शब्दाचा अर्थ हे साहेब ३ बापांचा असा (अग्नी) म्हणून ठासून सांगतात. ३ बापांचा म्हणजे किती घाणेरडा अर्थ होतो तरीही तो ते अगदी बिनदिक्कतपणे वापरतात. म्हणजे शोध घेता घेता आपण कुठल्या थराला जात आहोत? चिखल फेका पण तोही थोडा विचार करून. मुळात त्र्यंबक शब्दाचा अर्थ त्रि- अंबक म्हणजे तीन डोळे असणारा, त्रिकालज्ञानी असा आहे. हे संस्कृत शिकणाऱ्या शेंबड्या पोराला सुद्धा ठाऊक असेल. पण ह्यांचे विश्वच वेगळे.. काय तर म्हणे ३ बापाचा.

    ReplyDelete
  8. https://en.wikipedia.org/wiki/Halaf_culture#/media/File:Syrian_-_%22Tel_Halaf%22_Fertility_Figurine_-_Walters_482741_-_Three_Quarter.jpg ह्या लिंकवर मेसोपोटामिया येथे हलाफ काळात इसपू ५००० सालच्या भाजलेल्या मातीच्या (स्त्री) बाहुलीचा अवशेष चे चित्र आहे त्या चित्रात आपल्या सिंधू बाहुलीत काय फरक आहे? कि दोन्ही मातृ देवताच आहेत?

    ReplyDelete
  9. जो एकमेव शिवलिंगाचा पुरावा सगळीकडे फिरत असतो तो म्हणजे वत्स ह्यांनी हरप्पा येथे शोधलेल्या लिंगाचा. पण हरप्पा च्या अधिकृत माहितीस्थालावर त्याबद्दल चकार शब्द काढलेला दिसत नाही. हिंदुवादी संकेतस्थळावर तीन शिवलिंगे सापडली असे म्हटले जाते पण फोटोत फक्त एकाच दिसते. दुसरे फोटो दाखवले जातात ते कालीबांगण राजस्थानचे पण त्याचेही तसेच आहे, दोन्हीची अधिकृत माहिती कुठल्याही जबाबदार संस्थेने घेतलेली नाही.

    ReplyDelete
  10. म्हणजे सिंधू काळात शिवलिंगच नव्हते तर शिष्णदेव आला कुठून? शिवलिंग म्हणजे शिश्नपूजा आहे ह्याला कसलाही शास्त्रीय आधार नाही. ती फक्त एक समजूत आहे. लिखित श्रुत पुरावा ऋग्वेदाशिवाय कुठलाच नाही. तोही ओढून ताणून काढलेला अर्थ आहे. ऋग्वेदातील त्र्यंबक आणि यजुर्वेदातील त्र्यंबक वेगळे कसे असू शकतात? म्हणे ऋग्वेदात त्र्यंबक म्हणजे तीन बापाचा अग्नी आणि हे कोणी सांगितले तर रा. ना. दांडेकर, तर्कतीर्थ जोशी, सहस्त्रबुद्ध्ये, वा. वि. मिराशी, विट्झेल ह्यांनी म्हणून, स्वतःचे काय मत हे आम्हाला माहित नाही. बरे ऋग्वेद कालीन संस्कृत वेगळे असेही आपण तूर्तास मानू. पण अखंड सिंधू इतिहासात काय त्यानंतर ऋग्वेद काळापर्यंत एकही शिवलिंग सिंधुत सापडले नाही, आणि रुग्वैदिक लोकांचा फक्त फारतर सिंधू लोकांशी संबंध आला होता तर ते सिंधू सारख्या पुढारलेल्या लोकांना शिष्ण्देव म्हणून का हेटाळतील, सिंधुतील https://s-media-cache-ak0.pinimg.com/originals/ee/90/20/ऎ९०२०१६६फ़१४ए७३द४०३च२ए७८४ब६८ब्च४ज़्प्ग इथे खाली दाखवलेले सातही भक्त पूर्ण वस्त्र घातलेले आहेत, म्हणजे वैदिक लोक सिंधुंना नागडे म्हणून शिष्ण्देव असे हिणवत नव्हते हे अगदी स्पष्ट होते. शिष्ण्देव चा अर्थ फारतर जंगली आदिम नग्न मानवाशी असण्याची दाट शक्यता आहे, त्याशिवाय शिश्नदेव ह्याचा दुसरा कुठलाही अर्थ तयार होत नाही किवा तसे काही उत्खानीत पुरावेही नाहीत. म्हणजे आधी सिंधू हि आमचीच हि मखलाशी करायची, त्यासाठी शिवलिंगाचे खोटे फोटो गोळा करायचे, नंतर तेही उलटले कि दांडेकर, तर्कतीर्थ, सहस्त्रबुद्ध्ये, मिराशी, विट्झेल अशी दुसर्यांची (वैदिकांची) अक्कल वापरून स्वतःचा स्वार्थ साधायचा. तेही नाही जमले कि तुम्ही बेअक्कल म्हणून पुढे जायचे... ह्याला संशोधन म्हणत नाहीत. त्याला स्वार्थवाद म्हणतात..

    ReplyDelete
  11. https://s-media-cache-ak0.pinimg.com/originals/ee/90/20/ee9020166f14e73d403c2e784ba68 link parat det ahe..

    ReplyDelete
  12. सिंधू काळात सापडलेले सगळे शिक्के हे त्यांच्या मागच्या बाजूला एक गोलाकार उंचवटा बनवून त्यात एक छिद्र (होल) असलेले असल्याने, सिंधू लोक ते गळ्यात घालण्यासाठी वापरत असा कयास आहे. असे असूही शकते. पण वृषभ शिक्का गळ्यात घालणे म्हणजे शिवाच्या आधी नंदी ?? मंदिरात ठीक आहे. पण प्रत्यक्षात कितीही नंदी मांडा, शिवाशिवाय नंदीची किंमत शुन्य आहे. मग सिंधू लोक फक्त वृषभाचे चिन्ह गळ्यात का घालून फिरत होते? इथे शिव नाही त्या नंदीची काय किंमत? तो फक्त बीफ बनवायचा कामाचा, हो कि नाही! अर्थात सिंधू लोकांचे दैव दैवत विषयक सिद्धांत, त्यांची लिपी ह्यांचा उलगडा अजून झालेला नाही. त्यामुळे लगेच काही निष्कर्ष काढणे फार घाईघाईचे आहे. अशी घाई करून सगळे होत नसते बाबा सोनवणी. ते आपले धनगर पुराण पुढे चालूच ठेवा. ज्या धनगर लोकांनी काहीच इतिहास लिहून ठेवला नाही पण गीत काव्याच्या माध्यमातून जे पुढे आले आहे त्याला वैदिकांनी आदर देऊन ते शब्दबद्ध केले ह्याचा उपकाराची परतफेड जर तुम्ही अशी करणार असाल तर तुमचेही सगळे साहित्य बाहेर काढा, लोकगीते, शाहिरी ह्यावर शोध घ्या नुसते वैदिक लोकांचे शेन किती दिवस चाघालणार?

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  17. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  20. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  21. न कोई आर्य है और न कोई द्रविड़ः स्टडी
    टाइम्स न्यूज नेटवर्क| Sep 25, 2009, 09.02 PM IST
    हैदराबाद ।। इंडिया को नॉर्थ और साउथ में अलग करके दिखाने वाली रेखा नई स्टडी से काफी धुंधली हो चुकी है। हार्वर्ड यूनिवर्सिटी और अपने देसी रिसर्चरों की स्टडी कहती है कि हम सभी भारतीय आपस में एक हैं। मतलब यह कि सभी भारतीय अनुवांशिक रूप से आपस में जुड़े हुए हैं। सभी का एक-दूसरे से नाता है। इसके साथ ही सदियों से चला आ रहा यह कथन कि आर्य उत्तर भारतीय हैं और दक्षिण भारतीय द्रविड़ हैं एक कपोल कल्पना के अलावा कुछ नहीं।
    सेंटर फॉर सेल्युलर ऐंड मॉलिक्यूलर बयॉलजी (सीसीएमबी) ने इस स्टडी को हार्वर्ड मेडिकल स्कूल, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, ब्रॉड इंस्टिट्यूट ऑफ हार्वर्ड और एमआईटी की मदद से अंजाम दिया। स्टडी बताती है कि आज के भारतीयों में उत्तर और दक्षिण भारतीयों के पुरखों का जिनेटिक अंश है।
    इस स्टडी के को-ऑथर लालजी सिंह कहते हैं कि यह रिसर्च पेपर इतिहास को नए सिरे से लिखेगा। सीसीएमबी के सीनियर साइंटिस्ट के. तंगराजन कहते हैं कि आर्य-द्रविड़ थेअरी में जरा भी सचाई नहीं है। यह थेअरी उत्तर भारतीय और दक्षिण भारतीयों के अपनी-अपनी जगह जम जाने के सैकड़ों साल बाद आई।
    स्टडी कहती है कि करीब 65,000 साल पहले दक्षिण भारत और अंडमान में बस्तियां वजूद में आना शुरू हुईं। इसके करीब 25000 साल बाद उत्तर भारत आबाद होने लगा। धीरे-धीरे दक्षिण और उत्तर भारतीयों का आपस में मिलन हुआ और ऐसे एक नई तरह की पैदाइश ने आकार लिया। आज के भारतीयों को उत्तर और दक्षिण के पुरखों का मिक्स्ड कहें तो गलत नहीं होगा।

    ReplyDelete
  22. Vedic Mythological Tracts
    published from Delhi. In Dandekar's own recent
    words (1997: 39):
    (1) The Ëgvedic mythology cannot be said to have assumed
    a finite and finished form at any given moment. It would,
    therefore, be wrong to study that mythology as if it was a
    static phenomenon. The Ëgvedic mythology had been
    throughout reacting and responding to the various
    vicissitudes in the cultural history of the Ëgvedic age.
    (2) A particular Vedic god is seen to have been dominant in a
    particular period, because the personality and character of
    that god adequately reflected the ethos of that period.
    (3)
    Even after a Ëgvedic god had been once conceived, his
    character did not remain unchanged. His personality, as it
    were, 'grew' - it often assumed a heterogeneous character on
    account of the different elements which came to be
    assimilated into it in conformity with the mythological
    ideology which had been undergoing constant modification.
    (4)
    The relationships among the various rgvedic gods were
    governed by certain culture-historical compulsions.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...