Sunday, March 6, 2016

कन्हैय्या.....



जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थी नेता कन्हय्याकुमारने जेलमधुन सुटका झाल्यानंतर दिलेले भाषण सध्या फार गाजते आहे. कन्हैय्या  एक उत्कृष्ठ वक्ता आहे यात शंका बाळगण्याचे कारण नाही. तो साध्या सरळ शब्दांत थेट तुमच्या हृदयाला हात घालु शकतो. तो तुमचीच भाषा बोलतो. तरुणाईचा जोश आणि युवकांत स्वाभाविक असलेला व्यवस्थेबद्दलचा रोष त्याच्या देहबोलीतुन आणि शब्दाशब्दातुन अगदी अंगावर येईल असा जाणवतो. त्याचे हे भाषण वक्तृत्वाचा उत्कृष्ठ नमुना होते. इतके कि मोदींना वक्तृत्वात प्रबळ प्रतिस्पर्धी मिळाल अशीच चर्चा सोशल मिडियात आहे.

याहीपेक्षा महत्वाची बाब घडतेय ती ही कि कन्हैय्याकडे सध्यस्थितीतील अराजकावर मत करु शकणार संभाव्य त्राता म्हणुन, भविष्यातील एक नेत म्हणुन त्याच्यकडे पाहिले जात आहे. आंबेडकरी व अन्य बहुजनवादी चळवळीम्तेल विचारवंत वकार्यकर्तेच नव्हेत तर अन्यही सामान्य ते बुद्धीवादी कन्हय्याकडे आकृष्ट झाले आहेत हे सध्याचे चित्र आहे. आम्हा भारतियंना कधे अण्णा हजारे तर कधी केजरीवाल, कधी मोदी तर कधी हर्दिक पटेल यांच्या रुपात आपला एकमेव त्राता पाहण्याची एक खोड आहे. एकाने निराश केले कि दुसरा शोधायचा हा धंदा आपल्याला नवा नाही. यामुळे देशाचे व आपले काय भले झले आहे, वैचारिकतेत काय गुणात्मक वाढ झाली आहे याचा विचार केला तर उत्तर निराशाजनक आहे हे मात्र खरे.

कन्हैय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासाठी जे पुरावे जमा केले गेले, विशेषता: व्हिडियो क्लिप्स या छेडछाड करण्यात आल्याचे समोर अल्याने देशभर वादळ उठले. माध्यमांच्या विकावू भुमिकांवर झोड उठली. कन्हय्या प्रकरणाचे राजकारण तत्पुर्वीच सुरु झाले होते. वादग्रस्त वक्तव्ये सत्ताध-यांतील अनेक बुजुर्गांनी केली. त्याहीपेक्षा संतापजनक घटना म्हणजे कन्हैय्याला कोर्टाच्या आवारात खुद्द वकीलांनीच मारहान केली. पोलिस स्टेशनमध्येही भाजपा कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारले. न्यायव्यवस्थेची अशी विटंबना भारतात पुर्वी कधी झाली नसेल. त्यात् ज्या उमर खालिदसह त्यच्या सहका-यांनी देशविरोधी घोषणा दिल्या असा आरोप आहे ते मात्र फरार झाले. कन्हैय्याच्या वाट्याला सहानुभुती येणार हे उघडच होते. सत्ताधारी भाजपा हे प्रकरण हतालण्यात अपेशी ठरलेच व उन्मादी वर्तन/वक्तव्ये करत त्यांनी सरकारला चार पावले मागे नेले. त्यांचे वर्तन निषेधार्हच् आहे यात शंका बाळगण्याचे काहीएक कारण नाही.

कन्हैय्याने देशद्रोही घोषणा दिल्या किंवा त्य घोषणा दिल्या जात असतांना तो तेथे उपस्थित होता याबाबतचे निर्णायक पुरावे अद्यापही समोर आलेले नाहीत. असे असतांना आरोप ठेवले जाणे, आधी कस्टडी व नंतर तब्बल १५ दिवस त्याला जेलमद्ध्ये रहावे लागणे हा आपल्या पोलिस यंत्रणॆतील त्रुटींचा भागाहे. म्हणजे एकदा का गुन्हापत्रात तुमच्यावर काही कलमे लावली गेली कि न्यायालयिन प्रक्रियेत, प्रत्यक्ष सुनावनीच्या वेळी ,जोवर तुम्ही ती कलमे चुकीची आहेत अथवा तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करु शकत नाही तोवर या अटक-जेल या मांडवाखालून जावेच लागते. पोलिस अनेकदा अज्ञानाने किंवा जाणीवपुर्वक अशी काही कलमे गुन्हापत्रात टाकुन देतात कि हा सारा छळवाद सहन करणे आरोपीला भाग पडते.

जेलमद्ध्ये गेल्यावर, एक दिवस जरी घालवावा लागला तर, माणसावर तो एक आघातसतो. एक तर मानूस अधिक कट्टर बनतो, व्यवस्थेचा द्वेष करु लागतो किंवा शहाणा असेल तर आत्मचिंटन करत अधिक तेजाने उजळु शकतो. कन्हैय्याने जेलमधुन बाहेर पडल्यावर दिलेले भाषण त्या द्रूष्टीने पहावे लागते. तो स्थिरचित्तहोत, आपल्या विचारांशी प्रामाणिक होता हे महत्वाचे आहे.

पण भाजप/अभाविप/भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा उन्माद थांबला नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. "कन्हैय्याला गोळी घाला...११ लाख रुपये मिळवा." किंवा "कन्हैय्याची जीभ छाटा...५ लाख रुपये मिळवा" या अक्षरश: तालिबानी घोषणांनी सत्ताधारी पक्षातले काही लोक आयसिसच्या आतंकवाद्याम्च्या पंक्तीला बसत आहेत असे विदारक व विषण्ण करणारे चित्र निर्माण झाले  आहे. शासनाने अशी वक्तव्य करणा-यांवर व पोस्टरे छापणा-यांवर अद्याप तरी कारवाई केलेली नाही. पक्षातुन निलंबन ही काही कायदेशीर कारवाई नाही. त्यांच्यवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

कन्हय्याला पाठिंबा आहे तो त्याच्या न्यायाच्या लढाईसाठी. एका तरुणाचे भवितव्य न्यायालयीन त्रुटींमुळे बरबाद होऊ नये यासाठी. या देशात घटनात्मक राष्ट्रवाद राहिल कि संघाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद याचा एकदाचा निवाडा आवश्यकच आहे. सध्या वातावरण असे आहे कि विरोधी पक्ष अथवा विचारवंतही हा लढा कसा लढायचा या संभ्रमाने ग्रस्त आहेत. कन्हैय्यामधे ते एक त्राता किंवा संधी शोधु लागले आहेत हे त्यांच्या वैचारिकतेचा पाया भक्कम नसल्याने असे म्हणावे लागेल.

कन्हैय्याचे भाषण प्रभावी झाले असले तरी त्यातील एकही मुद्दा नवा नाही. वेगळे तत्वज्ञान नाही. भुखमरी...मनुवाद...भांडवलवाद इइइइ पासून आजादी हा त्याच्या भाषणाचे मुख्य सुत्र. याबाबत भारतात आजतागायत अस्म्ख्य समाजसुधारक, विचारवंत आणि राजकीय नेतेही बोलत आले आहेत. लिहित आले आहेत. आंदोलनेही झाली आहेत. अण्णा हजारेंचे जनलोकपालसाठीचे आंदोलन तर जगभर्गाजले. अण्णा त्या वेळचे हिरो होते. ती जागा केजरीवालांनी कशी हिरावली हे समजलेच नाही. लगोलग त्यानंतर विकासाचा नारा देत मोदी सर्वांवर हावी पड्ले. अलीकडेच हार्दिक पटेल हा देशभरच्या चर्चांचा केंद्रबिंदु बनला होता. रोहित वेमुलाच्या आत्पहत्या प्रकरणाने निर्माण झालेले रोषाचे वातावरण पेटत असतांनाच जे एन यु मधील हे प्रकरण घडले. त्यातुन कन्हैय्या एका नवीन मुक्तिदात्याच्या स्वरुपात अवतरला आहे असा आभास अगदी विचारवंतांना व्हावा याचे नेमके कारण काय?

भाजपा सरकार सत्तेत आल्यापासूण चर्चेत राहिले आहे ते विकासकामांसाठी नाही, अर्थव्यवस्थेच्या तब्बेतीला सुधरवण्याच्या प्रयत्नांसाठी नाही...तर शिक्षणाचे वैदिकीकरण, गोमांस बंदी व अखलाखची हत्या, साधु-साध्व्यांची वादग्रस्त वक्तव्ये, आरक्षणावरची संघप्रमुखांची संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये, पुरस्कार वापस्या, महिलंना मंदिरप्रवेश इइइइइ. या सा-या चर्चांतच देश ढवळत राहिला. विकासाची चर्चा करायला विशेष वावच उरला नाही. निष्प्रभ पडलेल्या विरोधी पक्षांनीही अशी चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला नाही. विचारवंतही सत्ताधा-यांनी निर्माण केलेल्या या वायफळ, समाजात फुट पाडणा-या प्रयत्नांना केवळ प्रतिक्रियावादी होत केवळ त्याला विरोध कसा करायचा या प्रश्नात अडकले. नको त्य चर्चांमद्ध्ये उभयपक्षांनी आपला वेळ वाया घालवला.

भाजपा/संघ हा पुरोगाम्यांचा विरोधाचा पहिल्यापासून केंद्रबिंदु राहिला आहे. पलटवार म्हणूण संघवादीही पुरोगाम्य्यांना "फुरोगामी" "सिक्युलर" असे हिणवाय़चे प्रमाण तर अजब वाटावे एवढे वाढलेले आहे. खरेतर एका सुंदर संकल्पनेलाच, घटनेच्या मुळ गाभ्यालाच बदनाम करन्याचा हा उद्योग आहे. हे खरे असले तरी गोंधळलेले पुरोगामीही त्याला जबाबदार नाहीत असे कोण म्हणेल?

या गोंधळातुन बाहेर येत तत्वचिंतकाच्या आणि प्रबोधकाच्या भुमिकेत शिरुन आजच्या परिस्थितीला तोंड देवू शकेल अशी मांडणी नव्याने करायची आवश्यकता होती व आहे. घटनात्मक राष्ट्रवादाचे जतन हाच आपल्या देशापुढील मुख्य प्रश्न आहे. संघाचा सांस्कॄतिक राष्ट्रवाद रोखला पाहिजे. हे सर्व खरे. पण कन्हैय्याच्या रुपात ज्यांना एकाएकी एक मसिहा दिसू लागला आहे हे चिंताजनक व कदाचित बौद्धिक दिवालखोरीचे लक्षण आहे.

कन्हया ज्या कम्युनिस्ट विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतो त्यांना तरी घटनात्मक राष्ट्रवाद मान्य आहे काय? मुळात "लाल सलाम’ मद्ध्ये रक्तरंजित राज्यक्रांतीचे सुचन आहे. साम्यवादाला अंतिम उद्दिष्ट म्हणूण लोकशाही मान्य आहे काय? माओवाद कोणाचे अपत्य आहे? माओवादाचे वाढते समर्थक आणि वारंवार होणा-या हिंसा कशाचे लक्षण आहे? संघाच्या जशा अनेक उपशाखा आहेत तशाच साम्यवाद्यांच्या आहेत हे सत्य नाही काय? एकीकडे धर्मवाद आहे तर दुसरीकडे मानवी जीवनाला विसम्गत, अनैसर्गिक असा पोथिनिष्ठच साम्यवाद आहे. साम्यवादी राष्ट्रांचे अखेर काय झाले हे आपल्याला सोव्हिएट रशियाच्या पतनातुन चांगले माहित आहे. चीनने साम्यवादी राज्यव्यवस्था स्विकारली असली तरी अर्थव्यवस्था मात्र भाम्डवलशाहीवादी का बनवावी लागली याचा विचार केला पाहिजे.

परंतू केवळ भाजपा-संघाचे शत्रु म्हणूण दुस-या कोनत्याही शत्रुलाच आपला भागीदार बनवायचा विचार कोणत्या शहाणपणाचा निदर्शक आहे? साधनशुचितेचा विचार कोठे गेला? डा. आंबेडकर साम्यवादाचे खंदे विरोधक होते. त्यांनी मार्क्स नव्हे तर बुद्ध निवड्ला. हे त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण होते. पण आज आंबेडकरवादीही, कन्हैय्या म्हनतो म्हणून, लाल-निळ्य़ाची युती कशी होइल या तंद्रीत आज असतील तर त्यांना बाबासाहेबांचा मार्ग मान्य नाही असा अर्थ घ्यायचा काय? तसेही माओवादाचे आकर्षण आज शिक्षित वंचितांमद्धे अनिवार वाढलेले आहे. काही नेते तर उघडपणॆ नक्षक्लवादाचे समर्थन करतात. त्यात आता कन्हैय्या त्यांचा, शेतक-यांच्या मुलांचा आदर्श होत असेल, विचारवंतही मोहून जात कन्हैय्याचे समर्थन करण्याच्या नादात, भाजपाला / संघाला विरोध करण्याच्या नादात, नकळतपणे आपण कोणत्या विघातक विचारसरणीला देशात मोकळे रान देणार आहोत  हाही विचार करत नसतील तर मोठाच दुष्काळ पडला आहे असे समजावे लागेल.

आपला प्रश्न घटनात्मक राष्ट्रवादाचा आहे. विकासाच्या दिशा त्यातच आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता ही तीउदात्त मुल्यांचे जतन झाले तरच सामाजिक सौहार्द वाढेल व त्यातुनच विकासाच्या वाटा मिळतील यात शंका असायचे कारण नाही. सांस्कृतिक राष्ट्रवाद हा जसा धोका आहे तसाच साम्यवादी राष्ट्रवादही धोका आहे. एका धोक्याला तोंड देता येत नाही म्हणून दुस-या धोक्यला जे जवळ करतात ते एका परीने भस्मासुरालाच जन्म देतात याचे भान ठेवायला हवे.

कन्हैय्या वरकरणी घटनेवर विश्वास् दाखवतो. मग तो तसाही इतर अनेक दाखवतात. जोवर व्यापक संधी मिळत नाही तोवर या देशात प्रत्येकाला तो दाखवणे भाग आहे. हे राजकारण झाले. त्यामुळे कन्हैय्याने घटनेवर विश्वास्दाखवला म्हणून हुरळुन जाण्यात अर्थ नाही. आम्ही भारतीय आदर्शांच्या नेहमीच शोधात असतो व स्वत:ला  कोना न कोणाचे गुलाम बनवून घेण्याच्या नादात असतो. मानवी स्वातंत्र्याचे महत्व आम्हाला अजुन समजलेले नाही. आमचा इतिहासच अशा बौद्धिक गुलामीचा आहे. राजकीय गुलामगि-या त्यातुनच आलेल्या आहेत. स्वतंत्र तारतम्याने विचार करण्याची क्षमता आम्ही गमवुन बसलो आहोत. वैचारिक नव्हे तर भावनिक लाटांवर आरुढ होण्य़ात आम्ही धन्यता मानतो. कोणाचे ना कोणाचे भक्त होतो. ज्याक्षणी माणुस कोणाचा भक्त बनतो तो त्याक्षणी आपल्या स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेची आहुती देत असतो.

कन्हैय्याला न्याय मिळालाच हवा. त्याच्या स्वातंत्र्य़ाचे रक्षण, मग त्याची विचारसरणी कोणतीही असो, व्हायलाच हवे. त्याच्या हत्येच्या धमक्या देना-यांना गजाआड करावे. पण त्याच्यात हिरो शोधणॆ, त्याची तुलना भगतसिंगांशी करणे हे मात्र अतिरेकी झाले. कन्हैय्याचे राजकीय, वैचारिक भवितव्य काय असेल हे माहित नाही. त्याला त्याच्या विचारांना पसरवण्याच्या कार्यालाही शुभेच्छा. पण सुज्ञ नागरिकांणी साम्यवादाच्य विळख्यात नकळत जावु नये. संघ भाजपाचा विरोध करायला सम्यक, घटनात्मकच मार्ग वापरले पाहिजेत.

16 comments:

  1. संजय सर ,
    देशाला वाचवण्यासाठी संजय सरांच्या पक्षाशिवाय पर्याय नाही .
    साम्यवाद हा देशाला भांडवलशाही पासून वाचवू शकतो
    १२५ कोटी लोकसंख्या असलेला देश स्वप्नांवर जगू शकतो का ?
    असे लाखो कन्हैय्या झाले पाहिजेत भाजप आणि काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
    संजय सरांच्या शैव धर्माचे स्मरण करून आपण महाशिवरात्रीला देशाच्या उद्धाराचे काम हाती घेऊया !
    नमः शिवाय !त्यासाठी आधी कन्हैय्या शैव आहे का वैदिक ते पाहिले पाहिजे . मला तर हा वैदिकांचा मास्टर प्लान वाटतो आहे

    ReplyDelete
  2. देशद्रोह, साम्यवाद ह्यांची विनाकारण भीती घातली जात आहे. सामान्य गरीबाच्या दृष्टीने भांडवलशाही पेक्षा साम्यवाद नक्कीच आकर्षक आहे. साम्यवादाचा खरा धोका तथाकथित सरंजाम आणि सवर्ण ह्यांच्याच वंशजांना आहे. कारण ते आधीच गडगंज श्रीमंत होते, शिवाय जातीचे आणि वर्णांचे राजकारण विचारात घेता किमान १५० वर्षे साम्यवाद हवाच होता. आपण ब्रिटीश किवा फ्रेंच लोकशाही कॉपी पेस्ट करायची फार घाई केलीय असे वाटते. आपल्या लोकशाहीच्या तत्वात समानता ह्या प्रकारचे स्वरूप फारच लंगडे आणि असमर्थ आहे, त्यापेक्षा तिथे साम्यवाद असला असता तर गेल्या हजारो वर्षांचे सरंजाम शाहीचे मळभ स्वच्छ धुवून निघाले असते. सरंजामपुत्र हे नेहमी रस्ता भरकटवयाचा प्रयत्न करतात, मनुवाद, खोटे विदिओ, लाल सलामला विरोध, कन्हैयाला आतंकी ठरवणे ह्या सर्वांना एकच उत्तर म्हणजे साम्यवाद!

    ReplyDelete
  3. असहिष्णूता—असहिष्णूता म्हणजे तरी काय? तर ते हेच, जीभ कापुन आणा! पाच लाखाचे बक्षिस, ठार करा दहा लाखाचे बक्षिस.

    ReplyDelete
  4. कन्हैया बाबत सध्या नेटवर त्याचे संपूर्ण भाषण बघायची सोय आहे .त्याचे बोलणे अति सौम्य आहे आणि हा डावीकडे कल असलेला नेता होणार हे आता उघड आहे . मात्र यापुढे भारतात डावी विचारधारा कायम पराभूत होणार हे सत्य नाकारता येणार नाही .डावी विचारसरणी आणि व्यक्ती स्वतात्त्र्य या गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत , म्हणजेच फक्त समाजात खरोखरची जागृती करण्यापेक्षा आहे ती व्यवस्था मोडण्यासाठी भाषण लेखन स्वातंत्र्याच्या गप्पा करायच्या असे दावे धोरण असते हे सर्व जगाने अनुभवलेले आहे . अराशिया आणि चीन ही जिवंत उदाहरणे आहेत.
    ममता ही शेवटी काँग्रेसचीच आहे,डावी विचारसरणी पराभूत होण्यासाठी तिचा वापर होतो आहे आणि टीएमसी हा प्रादेशिक पक्ष बनला आहे.दावे हतबल झालेले पक्ष कन्हैय्या सारख्या नवीन उमेदवारात आशेचे किरण शोधत असतात , परंतु पटेल आणि जाट यांचे आरक्षण आणि इतर मुद्दे यामुळे डावी चळवळ मागे पडते आहे .
    आजच्या वेगाने फोफावणाऱ्या भांडवलशाही विचारधारेपुढे डावे तत्वज्ञान फिके पडते आहे . पं. नेहरूंच्या काळात जो डाव्यांचा उदोउदो होत होता तो नंतर कमी होत गेला मजूर आंदोलने फक्त पगारवाढ आणि इतर गोष्टींशी अडकून पडल्या आणि मूळ तत्वज्ञान पुस्तकातच राहिले , त्यातील काहीना लोकशाहीशी काडीमोड घेत बंदुका खुणावू लागल्या आणि डाव्या पक्षांना फुटीचे ग्रहण लागले ते कायमचेच !आणि हळूहळू एक प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांच्यावरही शिक्कामोर्तब झाले
    जातींचे तुष्टीकरण हा दावी विचारसरणी पराभूत करण्याचा राजमार्ग आहे हे भाजप आणि काँग्रेसने जाणले आहे. अतिशय वेगाने द्विपक्षीय राजकीय पुनर्रचना होताना दिसते आहे आणि जातीचे राजकारण त्यास पूरक ठरते आहे .
    हार्दिक पटेल,कन्हैय्या हे काहीकाळ टिकणारे बुडबुडे आहेत असे म्हणावेसे वाटते.
    आज सर्वच धर्माना मूलतत्ववादाने भुरळ घातली आहे हेही भांडवलशाही पक्षाना पूरकच आहे. अशावेळी कन्हैय्या किंवा हार्दिक यांच्या नेतृत्वाचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे नसतात हे काळ ठरवेलच
    अशावेळी धार्मिक लोकप्रिय मुल्ये जपून आणि भांडवलशाही राजकीय विचार रुजवून लोकप्रियता मिळवणारा भाजप हा बरेच वर्षे समाजावर पकड ठेवेल असे वाटते.
    आता गरज आहे ती सर्वंकष जनजागृतीची ! राजकीय सामाजिक आणि धार्मिक ! आज चित्र काय दिसते ? धार्मिक बाबतीत ? जात पंचायत आणि तद्दन प्रकारात ब्राह्मण वर्गाचा सहभाग शून्य असतो , पुरोहित वर्ग हा एकूण ब्राह्मण वर्गाच्या किती टक्के आहे ? आणि त्याची समाजाची पिळवणूक करायची ताकद किती तोकडी आहे हे आपल्या सर्वाना माहित आहे , म्हणजेच ब्राह्मण सोडून इतर जो उच्च साधन वर्ग आहे त्याच्याकडे खरेतर सामाजिक पिळंवणुकीचे पाप जाते. महाराष्ट्र बिहार पंजाब आणि इतर प्रांतांचा अभ्यास केला तर हे सत्य स्पष्ट होते की हा उच्च साधन वर्ग ब्राह्मण नसून ब्राह्मणेतर आहे मराठा ,जात,यादव आणि असे प्रांतोप्रांती अनेक आहेत त्यामुळे हार्दिक पटेल हा सर्व समाजाचा नेता होऊ शकत नाही . आणि तीच गोष्ट कन्हैय्याची !
    खरी गरज आहे ती जातीचे महत्व मान्य करून प्रगतीचे राजकारण करायची कुवत असलेले नेतृत्व शोधण्याची ! सध्यातरी भाजप ने नरेंद्र मोदी या रुपात असा नेता पुढे आणला आहे . बिहार मध्ये नितीश कुमार हेही तसेच नेतृत्व देत आहेत एमपी मध्ये चौहान आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. पुरोहित वर्ग हा एकूण ब्राह्मण वर्गाच्या किती टक्के आहे ? >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
      अहो आनंद पाटसकर, त्यांच्या टक्केवारी वर जाऊ नका, हजारो वर्षांपासून यांनी अक्षरशः समाजाला छळले आहे, लुटले आहे आणि अविरतपणे छळणे-लुटणे चालूच आहे!

      मधुसूदन

      Delete
    2. मधुसूदन राव , एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये !
      मी ब्राह्मण नाही त्यामुळे ,खरेतर ,
      विषय कन्हैय्याचा आणि तुम्ही ब्राह्मणांवर उगीच घसरता आहात.त्यांच्या शेंड्या कापल्यात तरी आम्हाला काहीही घेणेदेणे नाही ,पण हि सवय बरी नाही .
      परम पूजनीय महात्मा गांधी तर म्हणायचे की एकाने एकीकडे मारली तर परत दुसरीकडे मारून घ्यावी तुमच्या घरी विचारा हवे तर - ते पण असेच म्हणतील !
      नरेंद्र मोदींचे महात्मा गांधी आदर्श आहेत सोनिया गांधींचेही ते आदर्श आहेत आणि आपल्या नोटेवरही ते आहेत.त्यामुळे पुरोहित किती टक्के आहेत हा विषय महत्वाचा नाही . त्यांच्यावर आग पाखड केली जाते त्याबद्दल आपण म. गांधींचा आदर्श पाळूया !
      संजय सर आता नवा पक्ष काढत आहेत त्याचे सभासद होऊन आपण पुरोहितांचा निःपात करून त्यांच्या शेंड्या झाडाला टांगू या ! वट पौर्णिमेला घरच्या लोकाना सांगुया की त्या शेंडीवाल्याना आंबा देऊ नकोस.शिवधर्मात वट पौर्णिमा नाही .विचारा संजयला ,ते सर्टिफाय करेलच ! खरेतर संजयाने लिस्त द्यायला हवी कोणते सन शैव आणि कोणते वैदिक , आणि शैव क्यालेंडर काढून समाजाला संस्कारित करावे. लवकरात लवकर संजयच्या पक्षाचे सभासद होऊया !चला चला हो वढू ला ! संभाजी महाराज की जय ! शेंडीचा धिःकार असो ! वैदिकांचा धिःकार असो !

      Delete
  5. अहो सोनवणी महाराज, ह्या जातीयवादी, धर्मांध, आगलाव्या लोकांपेक्षा ते मार्क्सवादी परवडले!

    अलोक राव

    ReplyDelete
  6. कन्हैया तुला सलाम, रैनाकडून कन्हैयाचे कौतुक!
    भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने कन्हैयाचे समर्थन केले आहे.
    नवी दिल्ली | March 7, 2016 2:13 PM
    देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगून नुकताच जामिनावर सुटलेला जेएनयूचा विद्यार्थी कन्हैया कुमारच्या समर्थकांमध्ये आता आणखी एका व्यक्तीचे नाव जोडले गेले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू सुरेश रैनाने कन्हैयाचे समर्थन केले आहे. कन्हैयाने शुक्रवारी जेएनयूमध्ये केलेल्या भाषणाने रैना प्रभावित झाला असून, त्याच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशात तो म्हणतो की, फारच छान! कन्हैयाच्या प्रत्येक शब्दांत खरेपणा झळकतो. त्याचा मान राखा. लढाऊ आणि प्रामाणिक व्यक्ती. तुला सलाम! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारसह देशातील अनेक राजकीय नेत्यांनीदेखील कन्हैयाची प्रशंसा केली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. कन्हैया एक वक्ता म्हणून चांगला आहे,भाषणही चांगलं होतं,त्याअनुषंगाने रैनाने समर्थन केलं असावं,बाकि रैनाला कन्हैयाचा मुखवट्याच्या आतील चेहरा माहित नसावा,
      थोडक्यात काय दोन्ही बाजू तपासाव्या लागतात.

      Delete
  7. छान अगदी सोप्या भाषेत डावी विचारधारा बद्दल समजावून सांगितलेले लेख ...

    ReplyDelete
  8. कन्हैयाने आधी आपला मुखवटा उतरवावा,
    देशविरोधी कार्यक्रम होणार होता हे त्याला माहित होते आणि तो रद्द झाल्यावर कार्यक्रम रद्द का केला?अशी विचारणा केली होती,
    ही माहिती रजिस्ट्रारने न्यायालयात पत्र पाठवून दिली आहे.
    त्यामुळे कम्युनिस्ट विचारसरणी किती खालच्या थराला जाते याचा प्रत्यय येतो,
    अफजलगुरूबाबत प्रश्न विचारला असता त्याच्या चेहर्यावर बारा वाजतात.
    त्यामुळे अश्या देशविरोधी डाव्यांना न जुमानलेलेच बरे असे वाटते,
    थोडक्यात काय?
    झोपलेल्यांना जागे करता येते,पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करता येत नाही

    ReplyDelete
  9. सर्व बांधवाना नम्र विनंती ,
    विषय गंभीर आहे आणि त्यास जातीयतेचा रंग देऊ नये , कोणीतरी सांगितले आहे कि साम्यवादी चळवळीत अनेक धुरीण हे ब्राह्मणच होते, सुरवातीच्या काळात प्रत्येक समाज सुधारणेत ब्राह्मण वर्ग पुढे होता , त्याचे कारण त्यांच्याकडे जास्त शिक्षित लोक होते , राष्ट्रीय शिक्षणासाठी त्यांनीच शाळा काढल्या , भारतरत्न धों के कर्वे यांनी विधवा विवाह सुरु केले स्त्री शिक्षण सुरु केले त्यापूर्वी महात्मा फुले यांनी त्याचा पाया रचला होता , टिळक आगरकरांनी प्रयत्न केले होते ,
    समाजात अनेक वर्ग आपापल्या शक्तीनुसार समाज उत्थानाचे कार्य अविरत करत होते आणि रिकाम टेकडे त्याना छळत होते , पूर्वी संत एकनाथ याना नदीकाठी त्यांच्या धोतरावर थुंकणारा भेटला होताच सर्व संताना आणि समाज सुधाराकाना या वाटेवर असे लोक भेटले होतेच !
    आपण त्यांचे नाव घेणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे आवश्यकच आहे . अपरान्तु त्याच वेळेस दुसऱ्या जातीना बदनाम न करण्याचा विवेकही आपण दाखवला पाहिजे . यालाच सुसंस्कृत पणा म्हणतात
    राजकीय मार्ग हे समाज सुधारणेसाठी असतात का ? साम्यवाद असो नाहीतर भांडवलशाही,शेवटी त्यांचे मार्ग भिन्न असले तरी स्वप्न एक असतातच का ? राजकारण हे गालीच्छाच असते का ?
    घुसखोरी भारतातच का होते ? आपले भारतीय बांगला देशात का जात नाहीत , कारण जिथे सुबत्ता असते तिथेच रोजगारासाठी लोक एकत्र येणार , म्हणजेच या उपखंडात भारत हा जास्त प्रगत आहे हे सत्य आहे , परंतु अफाट लोकसंख्या आणि एकूण उत्पादन यामुळे एकूण प्रगती उठून दिसत नाही ,
    डाव्यांच्या हातात सत्ता आली तर काय होईल हे नुसते कल्पनेने बघितले तरी चक्कर येते - सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण हा त्यांचा आवडता उद्योग असतो , शेती , कारखाने , जमिनी सर्व सरकारी आणि सर्व शेतकरी हे मजूर ! खाजगी शेती नाहीच ! असे चालेलका इथे ?
    शेती उत्पादन अपरंपार घटेल ,प्रचंड यादवी सुरु होईल कारण शेतीबाबत काही प्रांत खूपच प्रगत आहेत आणि काही मागास !कारकाने राष्ट्राची मालमत्ता झाले कि काय होईल ?भूसंपादनात भूमिधाराकाला योग्य पैसे मिळतील का ? सरकारी इच्छेपुढे आज कोर्टात दाद मागता येते तो मार्गाच खुंटला जाइल , अफझल गुरु बद्दल आज सभा होऊ शकते ,
    स्वतात्त्र्य असते तोवर त्याची किंमत नसते आणि नंतर झगडून बलिदान करून मिअलवायला गेले तर साम्यवादी रचनेत ते चिरडले जाते . चीन आणि रशियापासून आपण हे शिकायला हवे .
    आणि साम्यवादी विचारांचा स्वीकार करायचा का नाही ते आपल्या कुटुंबापासून विचार करत ठरवायला हवे .

    ReplyDelete
  10. मधुसूदन सरकार ,
    विषय चालला आहे कन्हैय्या कुमार चा , आणि आपण मध्येच पुरोहित आणि ब्राह्मण वर्गावर का घसरला ते समजत नाही . त्यामुळे मूळ विषय बाजूला राहतो .
    प्रदीप साळुंखे यांनी अगदी मुद्द्यावर बोट ठेवले आहे त्यांचे अभिनंदन केले पाहिजे पण हीच गोष्ट मधुसूदन सराना का जमत नाही ?- वैदिक आहात का ?
    साम्यवादी विचार सरणी कितीही कागदावर आकर्षक असली तरी ती व्यवहार्य नाही हे चीन आणि रशियात सिद्ध झाले आहे असे जे म्हटले आहे ते खरे आहे , रशिया आणि चीन मध्ये प्रचंड दडपशाही आहे हे सर्व जगाला माहित आहे , आपण इथे बसून लोकशाहीतले स्वातंत्र्य उपभोगत साम्यवादाला कवटाळतो आहोत यासारखी विकृती कोणती असू शकते ? सांगा हो मधुसूदना !
    आणि हो , मधुसूदन - म्हणजे तुम्ही वैदिक ! श्री अनंत मधुसूदन पद्मनाभ नारायण म्हणजे वैदिक , म्हणूनच तुम्हाला अशी अवदसा आठवत असेल , नाही का हो संजय सर ?
    आमच्या शैव धर्माला पर्याय नाही असे म्हणाल तर काहीतरी अर्थपूर्ण बोललात असे म्हणता आले असते ,

    ReplyDelete
  11. "लाल सलाम’ मद्ध्ये रक्तरंजित राज्यक्रांतीचे सुचन आहे....आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा सशस्त्र क्रांती झाली, मग त्याला रक्तरंजित म्हणायचे नाही का? ती का केली गेली किवा माओ, नक्षल असे सशत्र हल्ले का करत असतील ते समजून घेणे महत्वाचे आहे.

    ReplyDelete

  12. बोलायचे म्हटले तरी देशद्रोहाची भीती- आढाव
    8 मार्च 2016 - 04:29 PM IST
    पुणे - 'चौकशीच्या नावाखाली मुस्लिम तरुणांना पोलिस कधीही उचलून नेत आहेत. त्यामुळे मुस्लिम तरुणांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांना ओलिस ठेवलेय की काय, असे वाटते. साधे बोलायचे म्हटले तरी आपल्याला देशद्रोही ठरवतील, अशी सध्याची स्थिती आहे', अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

    मुस्लिम सत्यशोधक मंडळ व मुस्लिम सत्यशोधक महिला मंचच्या वतीने मुस्लिम महिलांच्या अधिकारासंदर्भात पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. आढावा बोलत होते. ते म्हणाले, 'सर्व समाजातील स्त्रीयांप्रमाणेच मुस्लिम स्त्रियाही स्वतःच्या हक्कासाठी पुढे येऊन आपल्यावरील अन्याय-अत्याचाराविरुद्ध महिला दिनी आवाज उठविला जात आहे. ही नक्कीच आनंदाची बाब आहे.' यावेळी प्रा.शमसुद्दीन तांबोळी, मंचच्या प्रमुख तमन्न शेख-इनामदार, डॉ.बेनझीर तांबोळी, जरीना मेहबूब तांबोळी आदी उपस्थित होते.

    तोंडी तलाक, बहुपत्नीत्व या प्रथा बंद करण्यासाठी कायदा करावा, जिल्हा पातळीवर कौटुंबिक न्यायालये, समान नागरी कायद्यासाठी समिती नेमावी, मुस्लिम महिलांसह सर्वच महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी कायदा करावा, सच्चर समिती, न्या. रंगनाथ मिश्रा आयोग, डॉ. महेमूद उर रेहमान अभ्यासगटाच्या शिफारसी अंमलात आणण्यासाठी धोरण आखावे.

    ReplyDelete
  13. संघ कार्यकर्त्यांचा पोलिस स्थानकावर हल्ला
    8 मार्च 2016 - 03:40 PM IST
    कोल्लम (केरळ) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी कोल्लम येथील पोलिस स्थानकावर हल्ला केला असून त्यामध्ये पोलिस निरीक्षकासह सहा पोलिस जखमी झाले आहेत.

    रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन कार्यकर्ते जात होते. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी एका कार्यकर्त्याने पोलिसांशी वाद घातले. त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिस स्थानकात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मध्यरात्री एक वाजता संघाचे कार्यकर्ते पोलिस स्थानकाच्या बाहेर जमा झाले. त्यांनी पोलिस स्थानकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच पोलिस अधिकाऱ्यांचे तीन वाहनांचेही नुकसान केले. या प्रकरणी तपास सुरु असून संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...