Thursday, March 24, 2016

वैदिक आणि हिंदूवादाचे तत्वज्ञान


भारतात वैदिक धर्मियांना कर्मकांडात्मक व तात्विक आधारावर विरोध करणारे अनेक लोक होऊन गेले. आजही आहेत. महात्मा फुलेंमुळे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला नवतत्वज्ञान मिळाले. या वादात ब्राह्मण/क्षत्रीय व वैश्यही हिंदुच आहेत असे गृहित धरले गेले होते व इतर दोन वर्ण सोडून टीकेचा भर केवळ ब्राह्मणांवरच होता. या वादाला ब्राह्मणांनी भीक घातली नाही, कारण त्यांचचे उच्चवर्णीय हे स्थान अबाधित राहत होते. बहुजनांमद्ध्ये धर्मेतिहासाचे अध्ययन/विश्लेशन करण्याची परंपरा जवळ जवळ नाहीच असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे वैदिक धर्मव्यवस्थेवरील हल्ले हे पोकळ, अर्धवट ज्ञानावर व बव्हंशी शि्वीगाळ करतच झाले. हा मार्गच चुकीचा होता. वैदिक धर्मच मुळात स्वतंत्र, वेगळा धर्म असून परकीयांनी एतद्देशियांना दिलेल्या हिंदू नांवाचा वैदिक धर्मियांनी खुबीने उपयोग करुन घेतला हे लक्षातच आले नाही.

पाश्चात्य विद्वान हा फरक जाणून होते. त्यांनी हिंदू धर्म व ब्राह्मणी धर्म (Brahmanical Religion) अशी आपल्या विवेचनात ठळक विभागणी केली होती. भारतातही हा धर्म सनातन अथवा सनातन वैदिक धर्म या नांवानेच ओळखला जात होता. भारतातील विद्वानही वैदिक धर्म, वैदिक संस्कृती व अवैदिक अथवा अनार्य संस्कृती या नांवाने हे दोन स्वतंत्र धर्म व संस्कृतींचे विभाजन मान्यच करत होते व आजही करत आहेत. असे नसते तर सिंधू संस्कृतीला वैदिक संस्कृती ठरवण्याचे आटोकाट प्रयत्न आधुनिक काळातही केले गेले नसते. सरळ "हिंदू संस्कृती" म्हणुन तिचा उल्लेख केला गेला असता व तेच संयुक्तिक झाले असते. वैदिक संस्कृती-धर्म हे स्वतंत्र आहेत याची जाणीव, विशेषत: ब्राह्मणांना, होती व आहे. तिचे वर्चस्व/श्रेष्ठत्व व भारतातील जेही काही चांगले आहे, अगदी भाषाही, ती वैदिक संस्कृतीची देणगी आहे असे सिद्ध करत बसण्याचे उद्योग विसाव्या शतकात तर फार वाढले. आर्य आक्रमण सिद्धांताने वैदिकही स्वत:ला आद्य आक्रमक समजत आपले मुळस्थान अन्यत्र (भारताबाहेर) शोधू लागले. अलीकडचेच मराठी पुस्तक, मधुकर ढवळीकर यांचे, "आर्यांच्या शोधात" हे पुस्तक या आर्यवादाच्याही प्रभावाचा व भारतीय संस्कृतीचे मूळ वैदिकच असल्याच्या प्रयत्नांचा एक उत्तम नमुना आहे. आर्य सिद्धांताच्या विरुद्ध आजकाल बोलायची पद्धत आली आहे तीही शास्त्रीय कारणांनी नव्हे तर आपण परकीय वंशाचे ठरतो या भयातून हेही लक्षात घ्यावे लागते.

म्हणजेच वैदिक धर्म वेगळा आहे, श्रेष्ठ आहे याची स्पष्ट जाणीव वैदिकांच्या जाणीवेत व नेणीवेत असतेच. वैदिक धर्म स्वतंत्र असल्याची मान्यता पुरातन काळातच होती. हिंदू धर्माचा उदय पौराणिक काळात झाला असे विद्वान मानतात. पण वैदिक धर्म वेगळाच राहिला. म्हणजे वैदिकांसाठी वेदांतील मंत्र तर हिंदूसाठी पौराणिक मंत्र अशी वाटणी आरंभीपासुनच होती. जेही काही संस्कृतात आहे ते म्हणजे केवळ वैदिकांचे हा समज तर नंतरच्या क्लाळात एवढा प्रबळ बनवला गेला आणि इतर भाषांना अपभ्रंश अथवा संस्कृतोद्भव ठरवत एतद्देशियांना स्वतंत्र भाषाही नव्हती कि काय असे वाटायला लावणारा न्यूनगंड निर्माण केला गेला. वैदिक वर्चस्व ठेवत ही सर्व मांडणी केली गेली व हिंदुंच्या बोकांडी वैदिक भूत बसले. ते कसे क्रमश: बसत गेले, कोणत्या काळापासून आणि त्यासाठी कोणत्या राजकीय/सामाजिक/आर्थिक परिस्थित्या कारणीभूत ठरल्या याचे विवेचन मी स्वतंत्रपणे केलेलेच आहे. येथे एवढेच सांगणे महत्वाचे आहे कि वैदिक कर्मकांडे आणि तत्वज्ञान सर्वस्वी वेगळी होती तर शिव-शक्तीदि मुर्तीपुजा करणा-यांची संस्कृती व धर्म हा वेगळाच होता. शिव-शक्तीप्रधान पुजकांच्या संस्कृतीचे स्पष्ट भौतिक पुरावे सिंधू कालापासून देशभर आढळतात...आज तर ते मोजता येत नाहीत एवढे विपुल आहेत. पण त्यांची गणना अर्वाचीन केली गेली. य धर्माची हजारोंने आगमादि शस्त्रे उपलब्ध असतांना वैदिक साहित्याच्या अभ्यासाकडे जेवढे लक्ष द्यायला हवे होते तेवढे लक्ष दिले गेले नाही. त्याला दोष देत नाही. काही कारणही नाही. आम्हीच आमच्य धर्माभ्यासाची परंपरा त्यागली असेल तर कोणाला का म्हणून दोष द्यावा?

अनेक विद्वान (व माझे विरोधकही) दावा करत असतात कि वैदिक व अवैदिक (आर्य व अनार्य) धर्मांत संम्मीलन होउन हिंदू धर्म निर्माण झाला आहे. दोन विभिन्न टोकांच्या धर्मात होणारे सम्मीलन स्वागतार्ह आहे यात शंका नाही. समजा तसे झालेच असते तर खालील बदल दिसले असते:

१) वैदिक कर्मकांड व वेदोक्त अधिकार, ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सरसकट खुले झाले असते.
२) अवैदिक देव स्विकारतांना त्यांच्यावर वैदिक "संस्कार" करण्याची व भाकडकथा निर्माण करण्याची गरज न भासता त्यांना त्यांच्या मुळच्याच स्वरुपात वैदिकांनी स्विकारले असते.

थोडक्यात वैदिक व अवैदिक हा फरकच शिल्लक राहिला नसता. ते खरे समान पायावरील सम्मीलन झाले असते. विभेद राहिलाच नसता. सर्वांना एकधर्मीय म्हणवुन एकत्र येता आले असते. पण तसे झालेले नाही.

पण विभेद आहे. स्पष्ट व ठळक विभेद आहे. व तोही वैदिकांचे हिंदुंवरील वर्चस्व या पद्धतीचा आहे. जणु काही हिंदू धर्माची मालकी कोणीतरी वैदिकांना देवून टाकली आहे. इतकी कि वैदिक म्हणतील तोच हिंदू धर्म असे मानण्याची प्रथा जनमानसात निर्माण झाली आहे. या देशातील सर्व काही निर्मिती वैदिकांचीच असून हिंदू हे त्यांचे गुलाम होते, त्यांचे पुर्वज हे कुचकामी, वैदिकांनी हरवलेले, जातीव्यवस्था लादून घेत स्वत:ला अजुन अवमानित करुन घेणारे होते अशी विचारधारा सामान्यांचीच नव्हे तर सुशिक्षित हिंदूचीही बनल्यामुळे ते हीणगंडाचे शिकार झाले आहेत. बरे, तशी वस्तुस्थिती असली...तसे पुरावे असले तरी मान्य करायला हरकत नाही...पण या बौद्धिक आंधळेपणातुन वास्तव शोधायचही प्रयत्न कोणी केला नाही व हिंदुंचे योगदान उच्च रवाने संशोधन करत मांडण्याचा प्रयत्न केला नाही. जेंव्हाही कोणी असा प्रयत्न केला त्यांना, "कशाला हिंदू धर्मात फुट पाडता...?" असे विचारत नाउमेद करण्याचे प्रयत्नही कमी झालेले नाहीत.

जी फुट होती व आहे ती सांगण्यात फुट पाडण्यासारखे मुळात काही नाही. कोणाला यामुळे आपले वर्चस्व संपेल, माहात्म्य संपेल असे वाटत असेल तर तो त्यांच्या न्यूनगंडाचा प्रश्न आहे. स्वतंत्र धर्म असुनही, तसे वागत असुनही ते मान्य न करुन त्यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करण्याचे खरे तर काही कारण नाही. ज्यांना हे माहित नाही त्यांना माहित करुन स्वत्व समजावुन घ्यायला प्रेरित करण्याचा हा प्रयत्न आहे. असंख्य सामाजिक समस्या या अभ्यासातून सुटतील याची मला खात्री आहे.

आणि वैदिक गेली दोनशे वर्ष आपली पाळेमुळे शोधण्याच्या आकांतात शेकडो ग्रंथ आणि हजारो लेख लिहित असतांना हिंदुंनी मात्र आपली पाळेमुळे शोधु नयेत, शोधली तर त्याला "फुट पाडणे" म्हणायचे ही विकृती आहे, दांभिकपना आहे. असे करतांना तात्विक प्रश्न अथवा उत्तरे न घेऊन येता वैदिक मंडळी प्राय: दिशाहीण प्रश्न विचारुन भरकटवण्याचा मुर्ख प्रयत्न करत बसतात. याचे कारण यातुन आपण एकाकी पडू अशी भिती त्यांना वाटते हे आहे. म्हणजे आपल्या वैदिक रक्षणाला आयते हिंदू गुलाम भेटावेत हे त्यांची आंतरिक इच्छा आहे. त्यामुळेच समतेच्या विरोधात हेच नेहमी असतात. त्यांना प्रश्न न विचारणा-या समाजाची "समरसता" हवी असते. संस्कृती म्हणजे त्यांच्या दृष्टीने वैदिक संस्कृतीच असते व तिचेच माहात्म्य गायचे असते. हिंदुंनी मात्र आपल्य संस्कृतीबाबत बोलायचे नाही. बोलले तर तुम्ही फुट पाडणारे, ब्रिगेडी, कम्युनिस्ट अथवा ब्राह्मण द्वेष्टे ठरवले जाता. मला हे चारी ठरवण्यचे प्रयत्ब्न आजतागायत झालेले आहेत.

कारण त्यांना वैदिक गुलामीतुन हिंदुंना स्वतंत्र होऊ द्यायचे नाही. हिंदुंना मुस्लिम-ख्रिस्त्यांचे भय दाखवत वैदिक धोका मात्र समजू द्यायचा नाही. ते स्वाभाविक आहे. वर्चस्ववादी मनोवृत्त्या हेच करणार, त्यात वावगेही काही नाही.

पण आम्हाला आमचे अस्तित्व व परंपरा समजावून घेण्याचा आम्हा हिंदुंना अधिकार आहे कि नाही?

मी तोच प्रयत्न करतो आहे. मी वैदिक धर्माचाच काय कोणत्याही धर्मियाचा द्वेष करत नाही. मी माझे...माझ्या धर्माचे अस्तित्व समजावून घेत माझ्या बांधवांना ते समजावुन सांगण्याचाच नव्हे तर त्यांनीही आपल्या धर्मेतिहासाचे स्वतंत्र अध्ययन करत वैदिक कचाट्यातून हिंदू धर्म सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत हा प्रयत्न आहे. ज्याचे योगदान त्याला दिले जायलाच हवे यात शंका असण्याचे कारण नाहे. पण ज्यात ज्यांचा काडीइतकाही संबंधच नाही त्यांनी ते योगदान लुबाडावे हे काही योग्य नाही. वर्तमानातही मी पाहतो आणि या प्रवृत्तीचा खेद वाटतो. माझा विरोध असेल तर या प्रवृत्तीला आहे.

असे समजा ही सांस्कृतिक स्वातंत्र्याची लढाई आहे. सत्य समजावून घेत विद्वेषरहित आत्माभिमानाने प्रेरित हिंदू समाज हवा...वर्चस्वाखली पिचलेला नाही हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल. लबाड्या दाखवल्या कि वैदिक आणि बाटगे वैदिक फारच चिडतात. ते चिडतात हाच त्यांच्या लबाड्यांचा मोठा पुरावा आहे. त्यांच्याकडे उत्तर नाही...!

याला अल्प अपवाद आहेत आणि मी त्यांच्याबदल कृतज्ञच असतो.

थोडक्यात, वैदिक धर्म आणि हिंदू धर्म पुर्णतया वेगळे आहेत. हिंदुंनी हे समजावून घेतल्याखेरीज त्यांच्या मानसिकतेत क्रांतीकारी बदल होत त्यांचा अभ्युदय होणे शक्य नाही. 

31 comments:

 1. वैदिक आणि तथाकथित हिंदू धर्म हे भिन्न आहेत, हे तुम्ही कितीहि पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा आता काहि उपयोग होईल असे मुळीच वाटत नाही. तो धर्म वैदिकवाद्यांनी पुर्णपणे गिळंकृत करून टाकला आहे. त्यापासुन आता तुमची सुटका नाही. हे तुम्हीही जाणून आहात तरी सुद्धा हा खाटाटोप का?

  ReplyDelete
 2. सोनवणी सर आपण वैदिक व हिंदू यांच्या वादात न पडता एक नवीन धर्म स्थापन केला तर? किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या सर्वात चांगल्या धर्माला जवळ केले तर? वैदिक हा ब्राह्मणांचा धर्म तर हिंदू हा तर धर्मच नाही, अशावेळी काय करावे हे तुम्हीच सुचवा बुवा!

  अजिंक्य साठे, मालवण.

  ReplyDelete
 3. उद्बोधक
  फक्त मला एक प्रश्न पडतो आर्य आणि अनार्य या शब्दाविषयी भगवान बुद्ध ज्यांनी सर्व परावलंबित्व सोडून स्वतः जागे व्हा हा संदेश दिला त्यांनी जो व्यक्ती धम्माचे पालन करत चांगल्या अवस्थेला पोहोचतो त्याला आर्य म्हणाले आहे तसेच त्यांनी त्यांच्या प्रतिपादित सत्याला देखील आर्यसत्य म्हणाले आहे त्याबद्दल सांगावे

  ReplyDelete
  Replies
  1. आर्य हा शब्द मुळात वंशवाचक नव्हता. आर्य म्हणजे सभ्य, आदर्श, उत्कृष्ठ य अर्थाने वापरला जाई. अरीय ह मुळच्व्हा शब्द, त्याचे संस्कृतकरण म्हणजे अर्य. बुद्ध आर्यसत्ये म्हणतात ती उत्कृष्ठ वा श्रेश्ढ्ठ सत्ये या अर्थाने.

   Delete
  2. नमस्ते सर,
   महर्षी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाबद्दल व त्यांच्या वैदिक धर्माबद्दलच्या विषयी आपले काय मत आहे?

   Delete
 4. “हिंदू” या शब्दाच्या उत्पत्ती बाबत अनेक विद्वानांनी संशोधन करून हिंदू शब्द परकीय असल्याचे सिद्ध केले आहे. गतकाळातील अनेक भारतीय नेत्यांनी हे मान्यही केले. स्वामीदयानंद सरस्वतींनी (१८२४-१८८३) वेदाकडे परत चला असे म्हटले होते तर अरविंद घोष हे (१८७२-१९५०) वेदांना वैदिक धर्माचे मूळ स्थान मानतात. स्वामी विवेकानंद हिंदू या शब्दाला चुकीचा ठरवीत म्हणतात, the word Hindu is a misnomer; the correct word should be a Vedantins, a person who follows the Vedas.याउलट तथाकथित ब्राम्हण नेते वी. दा. सावरकर यांनी आपल्या साहित्याद्वारे हिंदू ह्या शब्दाची फारच स्तुती केलेली दिसते. सावरकर हे हिंदू शब्दाची उत्पत्ती व विकास बहुजन समाजापासून लपवून ठेवण्याची कारस्थानी करतात. वी. दा. सावरकराचीच री राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने व शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांनी ओढली.भारतीय व विदेशी विद्वानांच्या संशोधनात ‘हिंदू’ हा शब्द कोणत्याही वेदात, उपनिषदात, पुराणात, मनुस्मृती, रामायण, महाभारत, भगवतगीता, जैन धर्म व बौध्द धर्माच्या साहित्यात कधीही आलेला दिसत नाही. महावीर, बुध्द, सम्राट अशोक, चाणक्य, पतंजली, मनु व शंकराचार्य यांनीही हिंदू हा शब्द कधीही उच्चारला नाही वा कोठे कोरून ठेवलेला नाही. ‘हिंदू’ कसल्याही प्रकारे धार्मिक शब्द नसून कोणत्याही पुरातन वैदिक मंत्र उच्चारणात शोधूनही सापडत नाही. मुस्लीम आक्रमणानंतर हिंदू या शब्दाचा उदय तर ब्रिटिशांच्या काळात हिंदुवाद हा शब्द प्रचलित झालेला दिसतो. त्यामुळे उदयास आलेला ‘हिंदू’ हा पुरातन शब्द नसून त्याला आलेले धर्माचे स्वरूपही आधुनिक आहे.बहुसंख्य हिंदू लोक हिंदू शब्दाचे मूळ व त्याची उत्पत्ती या संबंधात अनाभिंज्ञ आहेत. भारतात हिंदू ह्या शब्दाचा वापर मुख्यत: वैदिक वंशाचे लोक (ब्राम्हण) व मुस्लीम अधिक करताना दिसतात. बहुसंख्य मुस्लीम हे कट्टर धर्मवादी असतात. मुस्लिमांच्या धर्मवादामुळे ते दुस-याकडे बघताना धर्माच्या चष्म्यातून बघतात. स्वातंत्र्योत्तर भारताच्या झालेल्या फाळणीला ते हिंदू व मुस्लिमांची फाळणी मानतात. त्यामुळे जावेद अख्तर पासून ते असगर अली इंजिनियर, सलमान खान, आमिरखान, इतिहासकार जावेद हबीब व बुखारी यांच्या तोंडी नेहमी हिंदू, हिंदुस्तान व हिंदुस्थानी हे शब्द ऐकायला मिळतात. हिंदू शब्दाचा प्रचारकरण्यात मुस्लिमांचा सिहाचा वाटा आहे.संविधानाच्या उद्देशिका मध्ये नमूद केलेले “आम्ही भारताचे लोक” व अनुच्छेद १ मध्ये या संघराज्याचे नाव इंडिया, अर्थात भारत असे असेल व हा राज्याच्या संघ असेल असे स्पष्ट केले आहे. तरीही संघीय लोक व हिंदू तत्त्वप्रणालीलामानणारा मिडिया भारत या शब्द ऐवजी हिंदुस्थान या शब्दाचा वारंवार वापर करताना दिसतात. ही भूमिका राज्यघटनेतील तत्वाविरोधी असून तो षडयंत्राचा भागआहे असे मानायला पाहिजे.वैदिक लोक ‘हिंदू’ या शब्दाला इतर धर्माच्या विरोधात अधिक प्रमोट करताना दिसतात. वस्तुत: हिंदू व इंडिया हे दोन्ही शब्द परकीय आहेत. ‘हिंदू’ हा संस्कृत शब्द नसून तो कोणत्याही भारतीय भाषेत आलेला नाही. ग्रीक लोक इंदू नदीला सिंधू म्हणत असत. इंदू नदी ही पाकिस्तान व भारतात वाहते. ग्रीकांच्या काळापर्यंत केवळ सिंधू हा शब्दप्रयोग होत असे. परंतु त्यानंतर भारतात आलेल्या पर्शियन लोकाना “स” चाबरोबर उच्चार करता येत नसल्यामुळे ते ‘स’ ला ‘ह’ म्हणत त्यामुळे पुरातन पर्शियन लोक सिंधूला हिंदू म्हणू लागले. भौगोलिक दृष्ट्या सिंधू नदीच्या आसपास राहणारे लोक म्हणजे हिंदू अशी त्यांची नामावली होवून गेली. हिंदू या शब्दाचा कोणत्याही धार्मिक परंपरेशी नातेसंबंध नाही.

  अंकुश हिंदुराव पवार

  ReplyDelete
 5. हिंदू हा शब्द भारतीय भाषेच्या कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. परंतु अरबी,फारसी भाषेच्या पुस्तकात मिळतो. त्यचा अर्थ अत्यंत अपमानकारक आहे. ज्यांनी-ज्यांनी हिंदू शब्दाचा अर्थ जाणून घेतला त्यांनी स्वताला हिंदू समजाने बंद केले. लक्षात ठेवा, सारे बौद्ध, जैन, शीख व दलित इत्यादी पंथांनी स्वताला हिंदू म्हणण्यास विरोध केला. केवेल अंधविश्वासी मूर्ख भारतीय ब्राम्हणांच्या जाळ्यात फासून स्वताला 'गर्व से कहो हम हिंदू हें' असे म्हणून अजाणतेपणे स्वत:स्वत:लाच शिव्या देत फिरत आहेत. परंतु मुसलमानांनी ब्राम्हनाद्वारे दिलेलें अपमानसूचक शब्द " म्लेछ " कधीच स्वीकारला नाही. अरबांनी बिन-कासीम यांच्या नेतृत्वाखाली २०० घोडेस्वार व इतर सैनिकांचा पराभव केला. त्यात राजा दाहीर मारला गेला व त्यानंतर अर्धे राज्य अरबांनी काबीज केले व अर्धे राज्य राजा दाहीर याच्या मुलाला दिले.
  हिंदू शब्दाबद्दल आपण एवढेच म्हणू शकतो की, ती मोगलांकडून किंवा अरबांकडून दिली जाणारी एक शिवी आहे. परंतु आंबेडकरवादी विचारवंत दलित व्हाईसचे संपादक व्ही.टी. राजशेखर यांनी हिंदू शब्दाची उत्पत्ती, त्यचा अर्थ व इतिहास मे २००७ मध्ये 'कल का हिंदू आज का अहिंदू' या सदराखाली प्रसिद्ध करण्यात आला होता, टी माहिती दै'सम्राट' च्या वाचकांकरिता सादर करीत आहे.
  फारच कमी लोक हिंदू शब्दाची उत्पत्ती, त्यचा अर्थ व इतिहास जाणतात. परंतु त्यांची माहिती स्वत: हिंदूकारिता तथा इतर लोकांकरिता माहित करून घेणे तेवडेच महात्व्वाचे आहे. कारण हिंदू हा शब्द हिंदुच्या कोणत्याही धार्मिक पुस्तकात नाही. सर्व वेद, पुराणे, वेदांत, गीता, रामायण व महाभारत इत्यादी पुस्तकात हिंदू शब्दाचा उल्लेख झालेला नाही. तसेच स्वत:राम , कृष्ण, अर्जुन, द्रोण, विवेकानंद, दयानंद, लाला लजपतराय यांनी स्वत:ला काही हिंदू म्हटले नाही. मग प्रश्न निर्माण होतो की, हा शब्द कुठून व कसा आला?

  ReplyDelete
 6. यांचा एक साधारण व सोपा इतिहास आहे, जो की, मनुवादी ब्राम्हणांनी लपून ठेवला आहे व हा शिविवाचक शब्द सर्व भारतीयांवर जबरदस्तीने लादण्यात आला. तसेच आजसुद्धा काहीजन ओरडून सांगतात की, भारतात राहणारे सर्व मुसलमान, शीख, जैन, बौद्ध, तसेच चामर, अस्पृश्य, शुद्र ye@कवर्ड हें सर्वच्या सर्व हिंदू आहेत. अशा प्रकारे मनुवादी ब्राम्हण सर्व भारतीयांना एक प्रकारे गळी-गलोच करीत आहेत व भारतीय गरीब बिचारे ते सहन करीत आहेत. भारतीय जनतेच्या भल्यासाठी इज्जतीसाठी मनुवादी पतिक्रिया ब्राम्हणांची पोल खोलणे अत्यंत आवश्यक आहे.
  प्राप्त माहिती नुसार आठव्या, नवव्या शतकात कराची शहरावर रोज दाहीर यांचे राज्य होते. राजा दाहीर क्रूर शासक होता. एकदा त्याच्या सैनिकांनी अरबाच्या जहाजातील माल लुटला. हें जेव्हा माहित झाले तेव्हा सर्व अरब राजा दाहीर यांच्या कडे गेले व म्हणाले, आमच्या जहाजातील सर्व माल तुमच्या सैनिकांनी लुटला, म्हणून तुम्ही त्या मालाची भरपाई द्यावी किंवा तो माल परत करावा. राजा क्रूर असो व दयावान, त्यांचे सल्लागार मात्र ब्राम्हणाच असायचे. तसेच राजा दाहीर यांचे सल्लागारसुद्धा ब्राम्हणच होते. जेव्हा अरब लोक भरपाई मागायला आले तेव्हा राजा दहीरणे आपल्या ब्राम्हण सल्लागारांना विचारले की, अरबांना नुकसान भरपाई द्यावी की नाही? ब्राम्हण कधीही न्याय देऊ शकत नाही, हा इतिहास आहे व तसेच झाले सुद्धा. ब्राम्हणांनी राजा दहीरला सांगितले की, अरबांना नुकसान भरपाई देऊ नये तसेच नुकसान भरपाई मागितल्यामुळेअराबंसोबत युद्ध करावे, असा सल्ला ब्राम्हणांनी राजा दहीरला दिला. अरबांनी हें आवाहन अविकारले व राजा दाहीरसोबत युद्ध करण्यचे ठरवले.

  ReplyDelete
 7. ब्राम्हणांना या शब्दाचा अर्थ माहित होता. परंतु त्यांनी सांगितले नाही व सारे भारतीय एक-दुसर्याला हिंदू-हिंदू म्हणून शिव्या देत आहेत. परंतु मुसलमानांनी आपल्या लोकांना कधीही म्लेछ म्हटले नाही व आपल्या समाजाला शिव्या खाण्यापासून वाचविले. शिवाय त्यांनी नवीन नारा दिला 'गर्व से कहो हम हिंदू हें||'
  हिंदू हा शब्द भारतीय भाषेच्या कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. परंतु अरबी, फारसी, भाषेच्या पुस्तकात मिळतो. त्यचा अर्थ अत्यंत अपमानकारक आहे. ज्यांनी ज्यांनी हिंदू शब्दाचा अर्थ जाणून घेतला त्यांनी सावताला हिंदू समाजाने बंद केले. लक्षात ठेवा, सारे बौद्ध, जैन, शीख व दलित इत्यादी पंथांनी स्वताला हिंदू म्हणण्यास विरोध केला. केवळ अंधविश्वास मूर्ख भारतीय ब्राम्हणाच्या जाळ्यात फासून स्वताला 'गर्व से कहो हम हिंदू है' असे म्हणून आजान्तेने स्वत:स्वतालाच शिव्या देत फिरत आहेत. परंतु बुद्धिमान मुसलमानांनी ब्राम्हनाद्वारे दिलेला अपमानसुचक शब्द "म्लेछ" कधीच स्वीकारला नाही. अरबांनी बिन-कासीम यांच्या नेतृत्वाखाली २०० घोडेस्वार व इतर सैनिकांची तुकडी कराची शहरावर चालू करून गेली. त्या वेळेस बिन-कासीम याचे वय १६ वर्षाचे होते. त्यांनी राजा-दाहीर यांच्या दीड लाख सैनिकांचा पराभव केला. त्यात राजा दाहीर मारला गेला व त्यानंतर अर्धे राज्य अरबांनी काबीज केले व अर्धे राज्य राजा दाहीर याच्या मुलाला दिले.
  कराची शहरात अरब लोक स्थायी झाले. हळू-हळू भारतीय ब्राम्हणांनी मुसलमानांचे रिती-रिवाज बघून त्यांच्या करिता "घडा-म्लेछ" हा शब्द शोधून काढला व भारतीय मनुवादी ब्राम्हण मुसलमानांना म्लेछ_म्लेछ म्हणून ते त्यांची हसी-मजाक करीतअसे. ब्राम्हण आपल्याला म्लेछ क म्हणतात, ते जणून घेण्यासाठी मुसलमानांनी काही ब्राम्हनाना बोलावले व म्लेछ या शब्दाचा अर्थ विचारला.
  ब्राम्हणांनी या शब्दाचा अर्थ गंधा, नीच, हलकट, अस्पृश्य व असभ्य असा सांगितला कारण मुसलमान लोक गाईचे मास खात होते, शेंडी ठेवीत नव्हते. इत्यादी कारणावरून भारतीय लोक ब्राम्हणांच्या सांगण्यावरून मुसलमानांना म्लेछ-म्लेछ म्हणून चिडवीत होते.
  हें सर्व ऐकून मुसलमान लोक हसायला लागले. ब्राम्हणांना म्हणाले, तुम्ही लोक आपल्या ३०-४० टक्के लोकांना शुद्र व अस्पृश्य म्हणतात, तुम्ही दगड धोंड्यांना पुजता, तुम्ही इतके बेशर्म आहेत की, आपल्याच आई, बहिण व मुलीनसोबत व्यभिचार करिता. वास्तविक तुम्ही लोक चोर, बेईमान, अस्पृश्य, गंधे, नीच, हलकट आहात आणि खरोखर "हिंदू" आहात. अरबी-फारसी भाषेत हिंदू शब्दाचा हाच अर्थ होतो.
  हा घृणास्पद शब्द ब्राम्हणांनी सर्व भारतीयांवर जबरदस्तीने लादला.

  ReplyDelete
  Replies
  1. हिंदू शब्द सर्वप्रथम पारशांचा धर्मग्रंथ अवेस्त्यात येतो व तो ऋग्वेदाचा समकालीन ग्रंथ आहे. त्यामुळे हिंदू शब्द नंतर कधीतरी अवमानास्पद अर्थाने दिला हे चुकीचे आहे. स च उच्चार पर्शियन भाषेत ह असा होतो. सिंधू नदीवरुन हिंदू शब्द बनला. तो धर्माच्या आधारावर नव्हता तर प्रदेशिक होता याचे कारण सिंधुपार लोक एकच एक मुर्तीपुजकांचा शैवप्रधान धर्म पाळत त्यामुळे धर्मालाही हे नांव चिकटले. वैदिक धर्म भारतात इसपुर्व १००० च्या आसपास आला.

   Delete
  2. इतिहास के पन्ने कहते है,प्राचीन इरानी लोग 'स' का उच्चारण 'ह' करते थे और 'सिन्धू' का उच्चारण 'हिन्दू' करने लगे! यदि काश ऐसी होती तो सेव का उच्चारण 'हेव'; कश्मीर, मुसलमान, पारसी अादि का उच्चारण क्रमश: कहमीर,मुहलमान, पारही आदि होता; परन्तु ऐसा नही हुआ इससे स्पष्ट है कि इरानी भाषा 'पारसी' मे 'ह' का अभाव नही थी | हिन्दू शब्द पारसी के धर्म ग्रंथ 'अव्स्ता' मे मिलता है, प्राचीन संस्कृत साहित्य मे नही , इसका अर्थ होता है "काफीर" यानी गुलाम, दास, नीच | हिन्दू शब्द फारसी मे दासत्व की भावना से प्रस्तुत किया गया है इस शब्द का सही अर्थ हम सबो को जानना चाहिए|

   Delete
  3. हिंदू या शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती सांगितल्या जातात. पैकी पहिली साधारण हिंदू म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे लोक. इराणी भाषांमध्ये स चा उच्चार ह असा होतो. म्हणून सिंधू चे हिंदू झाले. ही फारशी पटण्यासारखी व्युत्पत्ती नाही. कारण इराण ला तुलनेने जवळ असलेले पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या लोकांना आजही सिंधीच म्हणतात.

   Delete
 8. हिंदु धर्माची ओळख
  अशा मंडळींना की जे ब्राह्मण नाहीत पण स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात अशांना या हिंदू धर्माची ओळखच पटलेली नाही.आमच्या वाड-वडीलांचा धर्म म्हणून हा आमचा धर्म यापलीकडे ते हिंदू असल्याचा पुरावा देऊ शकत नाहीत.जसे एखाद्याने त्रिसरण किंवा पंचशील ग्रहन केले तर तो बौद्ध होतो,एखाद्याची सुनता झाली तर तो मुसलमान होतो,एखाद्याचा बाप्तिस्मा झाला तर तो ख्रिश्चन होतो.एखाद्या ब्राह्मणाला विचारा तु कशावरून हिंदू आहेस ? तर तो पटकन आपले जाणवे काढून दाखवतो.जाणवं हेच बाह्मण हिंदू असल्याचा पुरावा आहे.असा एखादा विधी स्वत:ला हिंदू म्हणवून घेणार्या ब्राह्मणेत्तरांपैकी कोणाचाही होत नाही तरीही ते हाच धर्म धारण करतात.
  ब्राह्मणी व्यवस्थेचे एक मोठे परीणामकारक शस्त्र आहे आणि ते म्हणजे हिंदू धर्म.हिंदु धर्माच्या गोंडस नावाखाली जवळजवळ समाजातील बहुतांशी लोकं बळी पडतात.सामाजिक बंडासाठी उगारलेले हात थंड पडतात,पोलादी देहयष्टी लढवय्ये कुचकामी ठरतात आणि आपल्या वाड-वडीलांचा धर्म तो वाईट कसा असेल असे म्हणुन भले भले संघर्षाच्या कल्पनेपासून दुर पळतात.महिलांना या धर्माने शुद्र मानले,गुलामापेक्षाही हीन वागवले तरीही तो आपल्या वाड-वडीलांचा धर्म म्हणून येथील महिलांनी त्यांच्यावर होणारा अन्याय मुकाटपणे सहन केला.असंख्य मागासवर्गीय बांधवांनी आपले मागच्या जन्माचे पाप मानून हिंदू धर्माने त्यांच्यावर केलेला अन्याय सहन केला.पण एवढे होऊन देखील आपली संस्क्रुती सोडलेली नाही.आजच्या काळात त्यांचा धर्म आणि अंगीकारलेली संस्क्रुती यामध्ये फ़ार तफ़ावर आढळते.या विशाल हिंदू समुहामध्येच असा एक वर्ग आहे ज्यांनी हा हिंदू धर्म कोणी स्थापन केला ? व तो कोणार्या भल्यासाठी केला ? आपले आणि आपल्या वाड-वडीलांचे या धर्माशी नेमके नाते तरी काय ? याचा विचार कधी केला नाही.डोळे झाकून या हिंदू धर्माचे पालन करीत राहिले.केवळ पालनच करीत राहिले नाहीत तर त्या धर्माचे रक्षणही करू लागले आणि त्या धर्मासाठी ते बलीदानाची देखील तयारी ठेवू लागले.त्यामुळे ब्राह्मणांचे कार्य आधीक सोपे झाले.विनासायास ब्राह्मणांना त्यांच्या पिढ्यांना पोसणारे फ़ुकटचे गुलाम मिळु लागली.

  प्रमोद कारंडे

  ReplyDelete
 9. हिंदू धर्म हिंदूंचा आणि हिंदूत्ववाद्यांचा
  आज बर्याच इतिहास संशोधकांचे यावर एकमत झाले आहे की हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही.तरीही आपण मानून चालू की हिंदु धर्म अस्तित्वात आहे तर काही गोष्टींचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.सत्य परिस्थिती ही आहे की सामान्य जनतेचा हिंदू धर्म आणि हिंदूत्ववाद्यांचा हिंदू धर्म हा वेगळा आहे.स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे फ़क्त त्यांच्या ब्राह्मणी-हिंदू परंपरेला आपली मानतात.पण त्यांची ब्राह्मणी-हिंदू परंपरा आणि सामान्य जनतेची हिंदू परंपरा यात जमीन आसमानचा फ़रक आहे.सिंधू संस्क्रुतीची परंपरा हीच ती महान परंपरा.[या विषयी डॉ.भारत पाटणकर यांच्या "हिंदू की सिंधू" या पुस्तकामध्ये सविस्तर वाचायला मिळेल].सामान्य जनतेला तिच्या स्वत:च्या भाषेतला हिंदू धर्म कळतो.सामान्य जनतेचा हिंदू धर्म आणि हिंदुत्ववाद्यांचा हिंदू धर्म वेगळा आहे.हिंदुत्ववादी म्हणवून घेणार्यांचा धर्म हा भारतीय संस्क्रुती आणि परंपरेवर हल्ला करणार्यांचा धर्म आहे.भारतीय संस्क्रुतीला उध्वस्त करण्यार्यांचा धर्म आहे.हिंदुत्ववादी मंडळी हिंदू धर्माचे ग्रंथ पुराणं,उपनिषीदं म्हणून सांगतात.थोडक्यात हे सामान्य माणसांना न कळणारे भारतीय संस्क्रुतीचे व पर्यायाने हिंदू जनतेचे आद्य व पुजनीय ग्रंथ आहेत हे हिंदूत्ववादी म्हणवणार्यांचे म्हणने निकालस खोटे आहे.आद्य भारतीय संस्क्रुतीला परकीय लोकांनी उध्वस्त करण्याचे सर्वात पुरातन प्रतिक म्हणजे हे ग्रंथ आहेत.सिंधु संस्क्रुती हीच भारतीयांची आद्य संस्क्रुती परंपरा आहे.
  सामान्य जनतेचा हिंदू(सिंधु) धर्म हा बळीराजाच्या परंपरेतला आहे तर स्वत:ला हिंदुत्ववादी समजणार्यांचा धर्म हा वामनाच्या परंपरेतला आहे.या संदर्भात राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फ़ुलेंनी निदर्शनास आणून दिलेली आणि महाराष्ट्रातील घराघरातील एक प्रथा फ़ारच बोलकी आहे.दसर्याचे सोने लुटून घरी आल्यावर "इडा पिडा जावो,बळीचे राज्य येवो" असे म्हणून पुरुषांना घरच्या स्त्रियांनी ओवाळण्याची ही प्रथा आहे.बळीराजा म्हणजे जनतेशी चांगला वागणारा,समता-सम्रुद्धीचे जीवन देण्यासाठी झडणारा,दानशूर राजा असे कथाही सांगतात.याउलट या राजाची कोणतीही चुक नसताना त्याला राक्षस म्हणून,त्याला फ़सवून मारून टाकण्याची पाताळयंत्री परंपरा "वामन" या विष्णु च्या तथाकथित अवताराच्या रुपाने पुढे येते.बाबरी मशीद पाडणारे क्रुत्य करणार्या हिंदुत्ववाद्यांना शोभणारे असेच हे उदाहरण आहे.
  बहुसंख्य जनता बळीराजाच्या परंपरेतल्या हिंदू(सिंधु) धर्माचे पालन करते तर स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे वामनाच्या परंपरेतील हिंदू धर्माचे पालन करतात.

  प्रमोद कारंडे

  ReplyDelete
 10. या संदर्भात दोन्ही प्रवाहांच्या धार्मिक व्यवहारांमधले फ़रक आपण स्पष्टपणे पुढे आणू शकतो.
  हिंदू(सिंधु) धर्माची बहुसंख्य जनता अनेक दैवतांना अत्यंत जवळची,महत्वाची(सर्वात महत्वाची) मानते. विठठल, जोतिबा,खंडोबा,बिरोबा इत्यादी पुरुष दैवते आणि काळूबाई, बाणाई, जोखाई, अंबाबाई इत्यादी स्त्री-देवता ही महाराष्ट्रातील उदाहरणे आहेत.या दैवतांचा साधा उल्लेखही हिंदुत्ववादी ज्यांना हिंदुंचे प्रमुख धर्मग्रंथ म्हणतात त्या धर्मग्रंथामध्ये नाही.एवढंच नाही तर ज्या फ़ुले-शाहू-आंबेडकर यांना बहुसंख्य हिंदू(सिंधु) आपले प्रेरणास्थान मानतात त्यांचेच वावडे आहे हिंदुत्ववाद्यांनाया. बहुसंख्य जनतेचे बहुसंख्य सण घटस्थापना,दसरा,नागपंचमी,बेंदूर किंवा बैलपोळा,होळी इत्यादी सण हिंदुत्ववाद्यांच्या धर्मग्रंथामध्ये नाहीत.महाराष्ट्रीय संस्क्रुतीय अविभाज्य आद्य दैवत "विठोबा" सुद्धा त्यांच्या धर्मग्रंथामध्ये नाहीत.हे सर्व सण आणि दैवते बहुसंख्य जनतेच्या कष्टमय आणि निर्मितीक्षम अशा शेतीजीवनाशी आणि त्या संदर्भात होणार्या जीवणसंघर्षाशी जोडलेले आहेत.त्या जीवनातून त्यांचा उगम झालेला आहे.सिंधु संस्क्रुतीच्या मात्रॄप्रधान,क्रूषीमायेवर आधारलेल्या परंपरेशी या सामान्य जनतेचा अत्यंत निकटचा संबंध आहे.
  हिंदुत्ववाद्यांच्या धर्मग्रंथामध्ये यापैकी काहीही नाही.जे आहे ते बहुजनांचे आधिकार हिरावून घेणारे आहे.त्यांना गुलामीत ठेवायला सांगणारे आहे.सर्व स्त्रियांना गुलामांच्या बराबरीने वागविण्याचा उपदेश त्यात केला आहे.कष्ट करणार्या जनतेला खालच्या दर्जाचे लेखून,त्यांच्यापैकी काहींना अस्प्रुष्य ठरवुन व जनावारांपेक्षा वाईट वागणून देऊन त्या सर्वांना जातिव्यवस्थेच्या उतरंडीत कोंबून फ़ुट पाडून भरडण्याचा उपदेश या धर्मग्रंथामध्ये केलेला आहे.असे हे धर्मग्रंथ बहुसंख्य जनतेच्या हिंदू(सिंधु) धर्माचे असूच शकत नाहीत.बहुसंख्य जनतेला व सर्व स्त्रियांना गुलाम बनविणारा व अज्ञानात ठेवणारा हिंदू(ब्राह्मणी) धर्म हिंदुत्ववाद्यांनाच लखलाभ होवो.

  प्रमोद कारंडे

  ReplyDelete
 11. हिंदू आणि हिंदूस्थान यांचे खरे अर्थ काय हे पाहिले पाहिजे. सध्या हिंदू या शब्दाचा धर्मवाचक अर्थ घेतला जातो. परंतू हिंदू हा धर्मवाचक शब्द नाही हे अनेक अभ्यासकानी सिद्ध केले आहे. सिंधु नदीच्या पलीकडील लोकांचा हिंदू असा उल्लेख पश्चीम आशियातील आक्रमकानी करायला सुरुवात केली. त्या अर्थाने आज सर्व भारतीय हिंदूच ठरतात. परंतू पुढच्या काळात अनेक सामाजिक, धार्मिक स्थित्त्यंतरे झाली आणि हिंदू या शब्दाचा प्रदेशवाचक अर्थ मागे पडला. नंतर त्याचा संबंध धर्माशी जोडला गेला. त्यामुळे भारतातील अनेक पंथ, धार्मिक प्रवाह जरी त्यांच्यात कमालीचे भेद असले तरी हिंदू या एकाच धाग्यात गुंफले गेले. इथल्या धर्मव्यवस्थेला सर्व समाजावर वर्चस्व ठेवण्यासाठी याचा खूप उपयोग झाला. पुढे ब्रिटीशानीही हाच कित्ता गिरवत फोडा आणि राज्य करा या तत्वासाठी हिंदू शब्दाचा वापर केला. महाराष्ट्रात मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे. पण त्याही शब्दाचा खरा अर्थ मागे पडून मराठा या शब्दाला एका जातीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तोच प्रकार हिंदू/हिंदुस्थान या शब्दांच्या बाबतीत झाला आहे. त्यामुळे प्रदेशवाचक अर्थाने सर्व भारतीय हिंदूच ठरतात आणि हिंदूंचा देश तो हिंदूस्थान. परंतू भाजपच्या काही लोकानी हिंदू/हिंदुस्थानचा जो जयघोष लावला आहे तो याच अर्थाने लावला असेल असे वाटत नाही. हिंदू या शब्दाचा धर्मवाचक अर्थच त्याना अभिप्रेत असतो. परंतु अशा संकुचित भुमिकेमुळे समाजात वाद निर्माण होतात. हिंदू/हिंदुस्थान या शब्दाकडे प्रदेशवाचक अर्थाने पाहिले तर वादाचा प्रश्नच राहणार नाही.

  प्रकाश, इंदापूर

  ReplyDelete
 12. सारांशाने बघायचे तर ,
  सोनावणी सरांनी सांगितले की वैदिक धर्म भारतात इसपू १००० नंतर आला .त्यांनी संस्कृत भाषा आणली ,वेद आणले श्रुती स्मृती आणल्या
  परंतु त्यापूर्वी मूर्तीपूजा करणारा शैव पंथ कोणती भाषा वापरत असावा आणि त्यांच्या त्याकाळच्या प्रार्थना कोणत्या ,मुर्तिपुजेचा प्रकार कसा असे ?
  अभिषेक ही पद्धत शैव आहे का वैदिक ? शंकरावर अभिषेक असतो , म्हणून ही शंका !
  मुर्तीपुजेत इ स १०००पूर्वी वैदिकपूर्व काळात फुले पाने यांचा वापर होत असेल का ?
  वैदिक पूर्व काळात शिव आणि आदिमाया संप्रदायात बळी देण्याची प्रथा होती का ?
  त्याचा नैवेद्य दाखवण्याचे आणि पौरोहित्य करण्याचे काम कोण करत असे ?
  वैदिक धर्मात जाती खूप नंतर आल्या ,परंतु शैव धर्मात पुरोहित आणि कर्मप्रधान जाती होत्या का ? कुणालाही पुरोहित होता येत असे का ? पुरोहित या पदाची शैव धर्मात आवश्यकताच नव्हती का ? त्याचे काही क्वालिफिकेशन होते का ?
  तसेच संस्कृत ही वेदांची भाषा म्हणजेच ब्राह्मणी भाषा , मग शैव पुरोहित शिव शक्तीच्या स्तुतीपर कवने कोणत्या भाषेत करत असत ?
  या काही व्यवहार्य शंका निर्माण होतात आणि आज जे संस्कृत शैव वाग्मय दिसते ते सर्व त्याज्य धरायचे का ?आद्य शंकराचार्य यांनी ज्या अनेक शिवस्तुतीपर रचना केल्या त्या शैव धर्माच्या मान्यताप्राप्त आहेत का ? ४ दिशाना ४ शैव पीठे त्यांनी निर्मिली ती शैव मानायची का वैदिक धर्माचे राजकारण म्हणून त्याज्य समजायची ?
  २२ एप्रिल पासून उज्जैन ला कुंभमेळा होत आहे ! उज्जैन हे उच्च शिवस्थान मानले जाते ते वैदिक पूर्व आहे का ? कुम्भमेळ्याला आपली मान्यता आहे का ? आणि का ?
  आपण स्वतःला हिंदू मानता किंवा शैव समजता असे दिसते आणि पर्यायाने मीही तसेच समजू इच्छितो ,तरी आपण मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

  ReplyDelete
  Replies
  1. संस्कृत भाषा इसपु ३०० ते सन २०० या कालात क्रमश: विकसित झाली. वेद आज आहेत त्या भाषेत मुळचे नव्हते...भाषा प्राकृत होती. यासाठी याच ब्लोगवर भाषाविषयक लेबल आहे त्यात अनेक लेख आहेत...ते वाचावेत. बाकी प्रश्न : शैवांचेही पुजारी होतेच ...आजही आहेत. शतपथ ब्राह्मणने त्याबाबत नोंद केलेली आहे. बाकी माहिती पुढील लेखांत स्वतंत्रपणे येइलच. सारे काही वैदिक आणि भाषाही वैदिकांची या ब्रमातुन बाहेर यावे. संस्कृत शैव, बौद्ध, जैन व वैदिकांनी काही स्वतंत्र-कही एकमेकांपासुन...विकसित केली...वरच्या काळात. त्यामुळे आधीच्या संस्कृत रचना या हायब्रीड (म्हनजे प्राकृत व विकसित प्राकृताचे मिश्रण) संस्क्रुत तयार होत होत नंतर तिने एक अंतिम रुप घेतले. पाणिनी वैदिक नव्हता. (या ब्लोगवर पाणेनीवरहे सविस्तर लेख अहे.) आदी शंकराचार्यांवर माझा किस्त्रीममद्ध्ये सविस्तर लेख आहे (२००९) तो अवश्य वाचा.

   Delete
 13. Meaning and Origin Of The Word
  "Hindu"
  The word Hindu is very much misunderstood and misused.
  Many people have no idea how the word originated. In India,
  some politicians use the the words Hindu and Hindutva with
  communal overtones either to promote or oppose some
  ideology or party. To the rest of the world, Hindu and
  Hinduism refer to a set of people belonging to definite
  religious system.
  The fact is that the BOTH the words "Hindu" and "India"
  have foreign origin. The word "Hindu" is neither a Sanskrit
  word nor is this word found in any of the native dialects and
  languages of India. It should be noted that "Hindu" is NOT a
  religious word at all. There is no reference of the word
  "hindu" in the Ancient Vedic Scriptures.
  It is said that the Persians used to refer to the Indus river as
  Sindhu. Indus is a major river which flows partly in India
  and partly in Pakistan. However, the Persians could not
  pronounce the letter "S" correctly in their native tongue and
  mispronounced it as "H." Thus, for the ancient Persians, the
  word "Sindhu" became "Hindu." The ancient Persian
  Cuneiform inscriptions and the Zend Avesta refer to the
  word "Hindu" as a geographic name rather than a religious
  name. When the Persian King Darious 1 extended his
  empire up to the borders of the Indian subcontinent in 517
  BC, some people of the Indian subcontinent became part of
  his empire and army. Thus for a very long time the ancient
  Persians referred to these people as "Hindus". The ancient
  Greeks and Armenians followed the same pronunciation,
  and thus, gradually the name stuck.
  The word "India" also has a similar foreign origin. Originally,
  the native Indians used to address the Indian subcontinent
  as "Bharat". As a matter of fact in Mahabharat,which is one
  of the two "Itihasa", we find reference of the word "Bharat".
  As per legend, the land ruled by the great King "Bharata"
  was called Bharat.

  Raju Chavan

  ReplyDelete
  Replies
  1. सिंधू पासून हिंदू झाले हे पटत नाही, तसे अनेक पर्शियन शब्द स युक्त आहेत त्यांचा उचार स नेच केला जातो. जसे सलाम, सही, सलमान, सलामत, सलाह असे असंख्य.. काहीतरी चुकतंय!

   Delete
 14. छान लेख अन् लेखापेक्षा प्रतिसादच मोठे,यावरून लोकांना या गोष्टीत किती रस आहे ते कळते.

  ReplyDelete
 15. Nice article and comments also!

  Thanks to all.

  ReplyDelete
 16. श्री. सोनवणी साहेब,
  ‘अनिता पाटील विचार मंच’वरील हा लेख वाचा.
  यात हिंदु नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नसल्याचे पुराव्यासह दाखवून दिले आहे. हिंदू धर्मच अस्तित्वात नसेल, पुढची सारी चर्चाच निरर्थक ठरत नाही का? आणखी विशेष म्हणजे आपण अनिता पाटील यांना आशीर्वाद दिल्याचे ‘अपाविमं’वरच एका लेखात दिसून येते. यावर आपण काही स्पष्टिकरण दिल्यास बरे होईल. हिंदु धर्म आहे की नाही, याचीच एकदा तड लावू या का?
  ....................
  हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!Part-1
  +हिंदू नावाचा कोणताही धर्म जगात अस्तित्वात नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म अस्तित्वात आहे+ असे विधान मी काही पोस्टमध्ये केल्यानंतर हिंदूत्ववादाचा बुरखा पांघरणारया ब्राह्मणवाद्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. ब्राह्मणी विकाराने रोगग्रस्त झालेल्या काही लोकांनी माझ्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. तीच तीच वाक्ये अनेकांगानी लिहून टीकेचा आकार हे लोक वाढवित आहेत. माझे विधान कसे सत्य आहे, हे मी आज सूज्ञ वाचकांस सांगणार आहे.
  धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही
  हिंदू म्हणविणारयांच्या धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे.
  ब्राह्मणांची राक्षसी महत्वाकांक्षा
  समस्त भारतवर्षात स्वत:ला वैदिक म्हणवणारया ब्राह्मणांची संख्या दीड ते साडेतीन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. +कृण्वंतो विश्वम आर्यम+ अशी प्रतिज्ञा ब्राह्मणी वाङ्मयात आहे. प्राचीन काळी +अष्टपूत्र सौभाग्यवती भव+ असा आशीर्वाद ब्राह्मणी धर्मात दिला जात असे. स्त्रीने किमान ८ मुलांना जन्म द्यायलाच हवा, असा दंडकही होता. संख्यावाढ करून संपूर्ण विश्वात आपला वंश वाढविण्याचा विचार यामागे आहे. बेडकाने कितीही पोट फुगवले तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही. याच न्यायाने वैदिक ब्राह्मणांनी रात्रंदिवस घाम गाळला असता तरी त्यांची लोकसंख्या विश्वाला व्यापू शकली नसती. त्यामुळे कालांतराने वैदिकांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली. लोकसंख्या वाढविण्याऐवजी ब्राह्मणी विचार पसरवून विश्वाला आर्यमय करण्याची व्यूहरचना त्यांनी केली. +आब्रह्म ब्राह्मणो ब्रह्मवर्चसि जायताम् + असे नवे मंत्र त्यातून निर्माण केले गेले. सर्व विश्वात ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण झाले पाहिजे, अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा त्यातून दिसून येते.
  वैदिक धर्म समूळ नष्ट झाला
  ब्राह्मणांची ही राक्षसी महत्त्वाकांक्षाही पूर्ण होऊ शकली नाही. मुळात वैदिक ब्राह्मणी विचार रानटी असल्यामुळे इथला मूळ भारतीय समाज त्याकडे आकृष्ट होऊ शकला नाही. तसेच कालांतराने भगवान श्रीकृष्ण, भगवान गौतम बौद्ध आणि भगवान महावीर यांनी आपापल्या पद्धतीने वैदिक धर्मावर हल्ले केले. भगवान श्रीकृष्णांचा वैदिक धर्मविरोध हा थोडासा सौम्य स्वरूपाचा होता. (या तिन्ही थोर पुरुषांविषयीचे माझे लेख जिज्ञासूंनी वैदिक धर्मविषयक माझ्या लेख मालेत जरूर वाचावेत.) भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांनी मात्र उघडपणे वेदप्रामाण्य नाकारले. त्यांनी पशुहत्येला पापाच्या कक्षेत नेऊन बसवले. पशुहत्या हा तर वैदिक धर्माचा मूळ पाया होता. त्यामुळे भारतभूमीतून वैदिक धर्म समूळ नष्ट झाला. या काळात ब्राह्मणांनी एक हुशारी केली. आपले वाङ्मय नष्ट होऊ दिले नाही. ते त्यांनी दडवून ठेवून टिकवले. लोकहितवादींनी वैदिकांना आपले वाङ्मय का दडवून ठेवावे लागले, याचे वर्णन अनेक ठिकाणी केले आहे. वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. आज हिंदू लोक मानतात त्या रामकृष्णादी देवता वेदांत नाहीत.
  (‘अपाविमं’वरून साभार) To be continued...

  ReplyDelete
 17. हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही! Part-2
  शंकराचार्याचे कुटिल कारस्थान
  कालांतराने कुमारिल भट्ट, आद्य शंकराचार्य आदी ब्राह्मणवादी वैदिकांचा उदय झाला. त्यांनी छळ कपटाचा अवलंब करून बौद्ध आणि जैन विचारांतून चोरी करून आपल्या धर्माची नवी मांडणी केली. प्राचीन काळापासूनचे महादेवाचे उपासक शैव आणि विष्णूचे उपासक वैष्णव, नाथपंथी, चैतन्यपंथी व इतर अनेक अहिंसावादी धर्मही शंकराचार्य प्रणित धर्माने गिळले. सनातन धर्म या संज्ञेखाली त्यांना एकत्रित केले गेले. पंढरपूरचे पांडुरंग हे खरे म्हणजे लोकदैवत. पण त्याला वैदिक करून शंकराचार्यांनी संस्कृतमध्ये पांडुरंगाष्टक लिहिले. वारकरयांचे सर्व वाङ्मय प्राकृत मराठीत असताना एवढे एकच पांडुरंगाष्टक संस्कृतात आहे. आज हिंदू धर्माचे जे स्वरूप आहे, ते अशा प्रकारे वैदिकांनी केलेल्या चोरयांमारयांमधून आकाराला आले आहे. बौद्ध आणि जैनांनी ब्राह्मणांचे सर्व विशेषाधिकार काढून घेतले होते. शंकराचार्यांनी ब्राह्मणांना पुन्हा धर्माच्या सर्वोच्च स्थानी बसविले. त्यासाठी नवे ग्रंथ रचले गेले. भागवतादी पुराणांची रचना याच काळात केली गेली.
  अठरा पगड जाती फक्त ब्राह्मणांच्या सेवेसाठी
  पारंपरिक वैदिक धर्मातील वर्णाश्रम व्यवस्थेने शूद्र वगळता क्षत्रिय आणि वैश्यांना कर्तव्याच्या पाशांत बांधून काही अधिकार दिले होते. शंकराचार्यांनी तेही काढून घेतले. कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण आहेत, असा नवा सिद्धांत मांडला गेला. याचाच दुसरा अर्थ असा झाला की, ब्राह्मण वगळता इतर सर्व जातींना कोणताही वैध धार्मिक अधिकार राहिला नाही. ९७ टक्के समाजाने ३ टक्के ब्राह्मणांची सेवा करावी. ब्राह्मणांना दान द्यावे. ब्राह्मण भोजने घालावी. कोणताही धार्मिक विधी बाह्मणाच्या हस्तेच करावा, अशी बंधने समाजावर लादण्यात आली. ठराविक लोकांना फुकटच्या लाभाची मक्तेदारी देणारा हा जगातील एकमेव धर्म आहे. याला ब्राह्मणी धर्म म्हणू नये तर काय?

  अकबराची ब्राह्मण नवरत्ने
  कालांतराने या देशात इस्लामचे आगमन झाले. एतद्देशीय क्षत्रियांच्या हातातील सत्ता मुस्लिम राज्यकरत्यांच्या हातात गेली. त्यामुळे नव्याने तयार होणारया ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करण्याच्या स्थितीत क्षत्रिय नव्हते. कोणतीही परकीय सत्ता एतद्देशियांच्या सहाय्याशिवाय राज्य चालवू शकत नाही. समाजावर हुकुमत असलेल्या एखाद्या स्थानिक गटाची मदत राज्यकर्त्यांना लागत असते. इस्लामी राज्यकत्र्यांनाही अशी मदत हवी होती. ती तत्कालीन ब्राह्मणांनी पूर्ण केली. इस्लामी राज्यकत्र्यांच्या पदरी ब्राह्मण मंत्री असत. अफजलखानाचा मंत्री कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा सर्वांना माहीतच आहे. अकबराच्या दरबारात ९ रत्ने होती असे म्हणतात. बिरबल, तानसेन यांच्यासकट ही नऊच्या नऊ रत्ने ब्राह्मण होती. ही सगळे रत्ने कालांतराने मुसलमान झाली. तानसेनाचे मूळ नाव तन्ना मिश्रा होते. तो मुसलमान झाल्यानंतर मियाँ तानसेन नावाने ओळखला जाऊ लागला. तानसेनाने तयार केलेल्या सर्व रागांच्या आधी मियाँ लावण्याची प्रथा आजही कायम आहेत. उदा. मियाँ मल्हार. भारतीय शास्त्रीय संगीतात मुस्लिम गायक वादकांचा वरचष्मा आहे. त्याचे कारणच हे आहे. तानसेन आणि इस्लाम धर्म स्वीकारणारया इतर गायकांचे हे सगळे वंशज आहेत. या गायकीत इस्लाम नाही. सर्व चीजा भारतीय देवी देवतांचे गुणवर्णन करतात. अगदी पाकिस्तानी शास्त्रीय गायकही भारतीय देवी देवतांचे महिमा वर्णन असलेल्या चीजा गातात. या काळात ब्राह्मणांची धर्मावरील पकड आणखी मजबूत झाली.
  (‘अपाविमं’वरून साभार) To be continued

  ReplyDelete
 18. यात हिंदु नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही...part-3
  इंग्रजी राजवटीतही तेच
  ब्राह्मणांच्या मदतीची ही परंपरा पुढे इंग्रजी राजवटीपर्यंत कायम होती. इंग्रजी राजवटीतील ९९.९९ टक्के एतद्देशीय सरकारी अधिकारी आणि कर्मचारी ब्राह्मण होते. या संपूर्ण काळात ब्राह्मणी व्यवस्था मजबूत होण्यासाठी आवश्यक ती रसद राज्यसत्तेकडून अशा प्रकारे मिळत गेली. त्यातून या देशात ब्राह्मणी धर्म अधिकाधिक मजबूत झाला.
  हिंदू ही धार्मिक नव्हे राजकीय संज्ञा
  प्राचीन काळी ग्रीक व इतर पाश्चात्य लोक सिंधूपलीकडील लोकांना हिंदू म्हणत असा एक सिद्धांत सर्वांना माहीतच आहे. पण त्यात फारसे तथ्य आहे, असे दिसत नाही. सम्राट अलेक्झांडर द ग्रेटने भारतावर स्वारी केली हे सर्र्वाना माहीतच आहे. पण अलेक्झांडरच्या आधी आणि नंतरसुद्धा मध्य आशियातून हूण, यूची, शक आदी टोळ्यांची आक्रमणे होतच राहिली. या पाश्र्वभूमीवर ग्रीक किंवा इतर पाश्चात्य वाङ्मयात कुठे ना कुठे हिंदू हा शब्द यायला हवा होता. पण ग्रीकांच्या कोणत्याही वाङ्मयात हिंदू शब्द सापडत नाही. उलट या काळात भारतात बौद्ध धर्माचा बोलबाला होता असे पुरावे सांगतात. शकांचा एक वकील मिनँडर आणि बौद्ध पंडीत नागसेन याचा संवाद प्रसिद्धच आहे. त्यातून मिनँडरने एक ग्रंथ सिद्ध केला. +मिलिंद पन्हो+ असे या ग्रंथाचे नाव. मिलिंद हे मिनँडरचे पाली रूप आहे. या संवादाच्या स्मृतीरूपाने डॉ. आंबेडकरांनी औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाच्या परीसराला नागसेनवन असे नाव आहे.
  हिंदू हा शब्द इस्लामची देण
  लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राज्यकत्र्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला. त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो.
  इंग्रजी राजवटीत हिंदू शब्दाचे धार्मिकीकरण
  पुढे हजारभर वर्षे हिंदू हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरला जात होता. इंग्रजी राजवटीत इस्लाम आणि हिंदू हे समूह घटक प्रकर्षाने समोर आले. इंग्रजी राजवटीत या देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे धर्माची अधिकृत नोंद करणे अनिवार्य ठरले. तेव्हा हिंदू हा शब्द अधिकृतरित्या धर्म म्हणून कागदोपत्री नोंद होऊ लागला. शीख, जैन धर्मांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. तसे ते आधीपासूनच होते. जगभरात पसरलेला बौद्ध धर्मही आधीपासूनच स्वतंत्र होता. परंतु त्याचे अस्तित्व लेह-लदाख, आणि इशान्यभारतापुरते मर्यादित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह धर्मांतर केल्यानंतर बौद्ध धर्माचा टक्का वाढला.
  हिंदूत्ववादी धार्मिक नाहीत,
  अनिता पाटील, औरंगाबाद
  (‘अपाविमं’वरून साभार) To be Continued

  ReplyDelete
 19. यात हिंदु नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही... Part-4

  धार्मिक लोक हिंदूत्ववादी नाहीत!
  आज हिंदूत्व ही संज्ञाही राजकीय संज्ञा आहे. हिंदू हा धर्म नाही, हे सिद्ध करण्यास हाही एक मुद्दा सहाय्यक ठरतो. ख्रिश्चन, इस्लाम बौद्ध, जैन qकवा जगातील इतर कोणत्याही धर्माची अशी राजकीय संज्ञा अस्तित्वात नाही. युरोपात चर्च आणि राजकारण या दोन गोष्टी भिन्न आहेत. इस्लामी देशात धर्म आणि राजसत्ता हातात हात घालून चालतात, हे खरे मात्र; राजकारणासाठी इस्लामियत असे कोणतेही तत्वज्ञान किंवा संज्ञा अस्तित्वात नाही. इस्लामच्या नावे राजकारण करणारे लोक धार्मिक दृष्ट्याही कडवट इस्लामी असतात. औरंगजेबाने इस्लामच्या आधारे राज्य केले. तो इस्लामची सर्व तत्त्वे आयुष्यभर पाळित होता. त्याने कधी दारूला स्पर्श केला नाही. वैयक्तिक उदरभरणासाठी तो टोप्या बनवून विकीत असे. मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबरही दारू पित नव्हता. आज सौदी व इतर इस्लामी देशात इस्लामचा कडक अंमल आहे. हिंदूत्ववादी नेते असे कडवट हिंदू आहेत का? एकही हिंदूत्ववादी नेता, हिंदू धर्माचे कसोशीने पालन करीत नाही. प्रचलित मान्यतेनुसार हिंदूंना मद्यमांस वर्ज्य आहे. देशातील सर्वांत मोठे हिंदूत्ववादी नेते बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत आपण बिअर घेतो, असे सांगितले होते. हिंदूत्वाच्या संकल्पनेला जन्म देणारया सावरकरांनी इंग्लंडात असताना गोमांस खाल्ले होते. हिंदूत्वाच्या लाटेवर आरुढ होऊन पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, +मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नव्हे.+ आता गंमत पाहा, अविवाहित असताना स्त्रीसंग करणे, हिंदू म्हणविणारया लोकांच्या दृष्टीने पापाचरण आहे. अशा पापाचरणास व्याभिचार असे म्हणतात. अशा व्यक्तीला पुराणांत विविध प्रकारच्या मरणोत्तर शिक्षा सांगितलेल्या आहेत. वाजपेयी रामाला आपला आदर्श मानतात आणि राम हा एकपत्नी होता. महात्मा गांधी मात्र खरया अर्थाने रूढ हिंदू तत्त्वांचे पालनकर्ते होते. पण ते हिंदूत्ववादी नव्हते. अशा वेळी येथे अगदी विपरीत परिस्थिती निर्माण होते. हिंदू म्हटल्या जाणारया लोकांत मान्य असलेली तत्वे हिंदूत्ववादी पाळीत नाहीत. उलट हिंदूत्वादी ज्यांच्यावर हिंदूविरोधी म्हणून टीका करतात ते महात्मा गांधी मात्र या तत्त्वांचे प्राणपणाने पालन करतात. हा विरोभास विचित्र आहे.
  गांधी आणि नथुराम दोघांच्याही हाती गीता!
  ख्रिश्चनांचा मुख्य धर्मग्रंथ बायबल आहे. मुस्लिमांचा कुराण, तर शिखांचा गुरूग्रंथसाहिब आहे. हिंदू हा धर्म असेल, तर त्याचा धर्मग्रंथ कोणता? काही लोक म्हणतात की, गीता हा हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ आहे. चैतन्य, वैष्णवादी परंपरा गीतेला आपला मुख्य आधार मानतात. जसे- महाराष्ट्रातील वारकरी पंथाचा मुख्य आधार असलेली गीता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणली. गीतेला हिंदूंचा मुख्य ग्रंथ मानल्यास आपली फसगत थांबत नाही. महात्मा गांधी यांनी आयुष्यभर गीता हाती घेऊन राजकारण, समाजकारण केले. गांधींच्या पुतळ्यांच्या हातातही गीता आहे. काव्यगत न्याय कसा असतो बघा, नथुराम गोडसे याने गीता हातात घेऊनच गांधीजींना गोळ्या घातल्या. गीतेला जर हिंदूंचा मुख्य धर्मग्रंथ मानायचे असेल, कोणाची गीता स्वीकारायची नथुरामची की गांधींची हा मोठा प्रश्न आहे.

  पूर्ण.
  अनिता पाटील,
  (अपाविमंवरून साभार)

  ReplyDelete
 20. श्री. सोनवणी साहेब,
  वर दिलेल्या लेखावर आपली काय प्रतिक्रिया आहे, हे वाचकांना कळू द्या.

  ReplyDelete
 21. The word Hindu is derived from the Indo-Aryan[18] and Sanskrit[18][4] word Sindhu, which means "a large body of water", covering "river, ocean".[19][note 1] It was used as the name of the Indus river and also referred to its tributaries. The actual term 'hindu' first occurs, states Gavin Flood, as "a Persian geographical term for the people who lived beyond the river Indus (Sanskrit: Sindhu)",[4] more specifically in the 6th-century BCE inscription of Darius I.[20] The Punjab region, called Sapta Sindhava in the Vedas, is called Hapta Hindu in Zend Avesta. The 6th-century BCE inscription of Darius I mentions the province of Hi[n]dush, referring to northwestern India.[20][21][22] The people of India were referred to as Hinduvān (Hindus) and hindavī was used as the adjective for Indian in the 8th century text Chachnama.[22] The term 'Hindu' in these ancient records is an ethno-geographical term and did not refer to a religion.[4][23] The Arabic equivalent Al-Hind likewise referred to the country of India.

  ReplyDelete
 22. "हिंदू" नांवाचा धर्म अस्तित्वात नाहे हे खरे आहे आ आता हे नांव स्विकारले गेले असल्याने त्या नांवाचा उल्लेख अपरिहर्य ठरतो. या हिंदू धर्मात वैदिक आणि शैवप्रधान मुर्तीपुजक असे दोन धर्म येतात. हे दोन स्वतंत्र धर्म आहेत. वैदिकही स्वत:ला हिंदू म्हणवून घेत असल्याने भारतीय धर्मात गोंधळ माजलेला आहे. नांवाचा तिढा एवढा महत्वाचा नसून तो सोडवता येइल. "हिंदू धर्माचे शैव रहस्य" या पुस्तकात मी ते केले आहे. आता लवकरच त्याची सुधारित नवी आवृत्ती येत आहेच. त्यात सविस्तर उहापोह आहे. येथे महत्वाचे हे आहे कि वैदिक व मुर्तीपुजकांचा धर्म वेगळा आहे. आज वैदिकही मुर्तीपुजा करत असले तरी त्यांनी त्यावर "वैदिक" संस्कार केलेत. म्हणजे संबंध नसतांना शिवावर रुद्राभिषेक घ्हालणे, देवपुजेत पुरुषसुक्त म्हणजे इत्यादि. या बाबी बारकाइने समजावुन घ्याव्या लागतात.

  ReplyDelete
 23. धर्म ,संस्कृती, भक्ती या तीन बाबी चा विचार केला तर सर्वच प्रश्न सुटतील।लोकांना धर्माची सत्ता नको पण भारतीय संस्कृती हवी आहे।भक्ती हवी पण देव नको।असं ।कसं चालेल साहेब।धर्म -धारयते इति धर्म।जो धरून ठेवतो।त्याचे दुसरे नाव-कर्तव्य।गीतेत भगवान क्रष्ण सांगत आहेत-परधर्म भयावह।अर्जुन कर्तव्य च्युत होत होता।तसे म्हणजे अहिंसेचा पहिला सत्याग्रही अर्जुन आहे।कर्तव्य म्हणजे धर्म होय। हिंदु धर्म कर्तव्य।पुत्रधर्म,पिता धर्म,पतिधर्म वगैरे।हीच भारतीय. संस्कृती आहे।काही विद्वान मंडळी ज्ञानाचा मिथ्या अभिमान बाळगून आहेत।काहीनी राजकीय स्वार्थासाठी धर्म शब्द वापरून वापरून गुळगुळीत केला आहे।भक्ती चे क्षेत्र भोंदु बाबा आणि मुर्ख लोकांनी भरले आहे।आजचे शिक्षण जबाबदार आहे।त्याचे कारण लार्ड मेकालो।------

  ReplyDelete