Sunday, June 25, 2017

मोहम्मद अयुबची निघृण हत्या


Ayub Pandith lynching


काश्मिरमध्ये गुरुवारी रात्री मोहम्मद अयुब पंडित या डीएसपीची कर्तव्य बजावत असतांना हिंसक जमावाने निघृण हत्या केली. श्रीनगरमधील ऐतिहासिक असलेल्या जामा मशिदीबाहेरच ही घटना घडली. ती शब-ए-कद्रची रात्र होती. ही रात्र मुस्लिम आपल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थनांत घालवतात. साध्या वेशातील मोहम्मद अयूब मशीदीबाहेर येणा-या लोकांची छायाचित्रे त्यांच्या ड्युटीचा एक भाग म्हणून काढत होते. लोकांनी त्याला नुसता आक्षेप घेतला नाही तर ते हिंसक बनू लागले. सर्व्हिस रिव्हाल्वर मधून चिडलेल्या जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही केला. लोकांनी तरीही त्यांच्यावर हल्ला करत त्यांना विवस्त्र करत पाशवी मारहाण करत दगडांनी ठेचायला सुरुवात केली. त्यात त्यांच मृत्यू झाला. त्यांचे प्रेत मखदूमसाहिब या सुफी संताच्या कबरीच्या चौकापर्यंत फरफटत नेण्यात आले.

ज्या सुफी संतांच्या शिकवणुकीवर आपण चालत आहोत असा अभिमान काश्मिरी मुस्लिम बाळगत होते त्या संताच्या कबरीच्या दारात अयुबचे प्रेत फरफटवत आणने हा सुफी तत्वज्ञानाचा खुनच नाही काय असा प्रश्न पडल्यास नवल नाही. मशिदीबाहेर येणारे लोक आपल्या जीवनातील पापाची क्षमा मागून आलेले होते. नवे पाप करायला आपण मोकळे झालो आहोत असे त्यांना वाटले असेल. या घटनेने काश्मिर समूळ हादरला. मुस्लिमांकरवी होणा-या मुस्लिम हत्या काश्मिरमध्ये गेली तीन वर्ष नव्या दमाने सुरु झालेल्या हिंसाचारात नवीन नाही. पण सरकारी अधिका-याची हत्या व तीही रमजानमधील एका पवित्र दिवशी ज्या पद्धतीने केली गेली आहे ती इस्लामियांना शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.

या घटनेने १९९८ सालची अजून एक निघृण घटनेची आठवण काही पत्रकारांनी काढली आहे. शब्बे कद्रच्याच रात्री एका गांवात काश्मिरमध्ये २३ पंडितांची अशीच ठेचून निघृण हत्या केली गेली होती. या हत्याकांडाबद्दल खुद्द काश्मिरी मुस्लिमांत संतापाची लाट उसळली होती. पण आता झालेल्या शब्बे कद्रच्या रात्रीची हत्या राजकीय व सरकारी अधिका-यांच्या गोटातील संताप व निषेधात्मक प्रतिक्रियांपुरती उरलेली दिसते. याची शरम अन्य मुस्लिमांना वाटतेय असे काही अद्याप तरी दिसलेले नाही. 

प्रश्न केवळ पवित्र रमजानचा वा शब-ए-कद्रच्या दयावंत रात्रीचा नाही तर एकुणातच काश्मिरी मुस्लिमांत भडकत असलेल्या निघृणतेच्या भावनांचा आहे. सरकारवर त्यांचा विश्वास उरलेला दिसत नाही. सरकार विश्वास मिळवायचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे असेही दिसत नाही. अनेक टाळता येवू शकणा-या बाबीही केल्या जातात व असुरक्षिततेला खतपाणी घातले जाते. अयुब साध्या वेशात असायला हवे होते काय? ड्रेसवर असते तर ते वाचू शकले असते काय? हे प्रश्न जरी पडले तरी प्रशासनाचीही चूक होते आहे. रात्रीच ही घटना घडली पण प्रेत पुरते ठेचलेले असल्याने ओळखही पटलेली नव्हती. सकाळी सहा वाजता अयुबच्या घरच्यांचा "मोहम्मद अयूब अजून घरी आलेले नाहीत..." हा फोन जाईपर्यंत ते प्रेत अनोळखीच राहिले. डीएसपी स्तरावरच्या अधिका-यासोबत दुसरे काही पोलिसही असायला हवे होते असे त्यांच्या वरिष्ठांना का वाटले नाही? एक रिपोर्ट सांगतो की त्यांच्यासोबत एक पोलिस होता, पण जमाव हिंसक झाल्यावर तो पळून गेला. तो पोलिस सांगतो की त्याला मोहम्मद अयुबनेच रिलीव्ह केले होते. खरे काय ते समजेल किंवा समजणारही नाही, पण झाली घटना ही प्रशासनालाही खाली मान घालायला लावणारी आहे.

काश्मिरमध्ये, विशेषत: दक्षीण भागात पुर्वी कधी न ऐकलेली "काश्मिरी तालीबान" ही नवीच संघटनाही उदयाला आली आहे. अल कायदा तर आहेच. फुटीरतावादी दहशतवादी हत्याकांडांना नागरिक व मुलांची दगडफेकही सामील झाली आहे. काश्मिर पुर्वी धुमसत होता, आता ज्वालामुखी फुटतो आहे. अयुबच्या हत्येकडे एक गंभीरतेचा इशारा म्हणून पहात तातडीने सामंजस्याचे व मनोमिलनाचे प्रामाणिक प्रयत्न करने ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. हा राजकारणाचा विषय नाही. धार्मिक तेढ माजवणा-यांच्या मुजोरीला खपवून घेण्याचा तर आजीबात नाही. हा राष्ट्रीय प्रश्न आहे. सर्वांनीच तो सुटण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे.

4 comments:

  1. संजय सर ,
    अगदी असेच जर गोव्यात किंवा पॉण्डेचारीत घडू लागले तर काय म्हणायचे ?
    वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या सीमा सलग असाव्यात या भावनेने हैद्राबादची कारवाई करून तो प्रांत भारतात आणला ,जुनागड आला ,गोवा आला,सिक्कीम आले , त्यापैकी कुणाला जर असे वाटू लागले की आम्हाला भूतान सारखे स्वतंत्र राहायचे होते ,पण भारत सरकारनेच ने मुजोरी करत आम्हाला एक प्रकारे दाबून टाकले आहे ,तर ?
    मुळात काश्मीर हा अस्मितेचा प्रश्न आहे का ?
    त्यात लष्करी महत्व असण्याच्या मुद्द्याचा किती भाग आहे ?
    कन्हैय्या कुमार आणि जेएनयु मध्ये काय घडले ? भारतातले कम्युनिस्ट दबा धरून वाट बघत बसतात , आणि वेळ आली कि काहीही करून देशाचे विघटन करू इच्छिणाऱ्या शक्तीना खतपाणी घालत असतात . हा इतिहास आहे .समाजवादी यापेक्षा वेगळे नाहीत !चीन भारत युद्धाने हे आपल्या हृदयावर कायमचे कोरले आहे.
    हायपोथेसिस म्हणून जरी क्षणभर असे मानले - काश्मीर हा स्वतंत्र देश म्हणून अगदी प्रामाणिकपणे त्याला भारतापासून भारतानेच स्वातंत्र्य दिले - तर काय होईल ?
    अतिरेकी कारवाया करत उर्वरित काश्मीरवर पाकिस्तान क्षणात कबजा करेल !

    अखंड बंगाल,आणि अखंड पंजाब हे असे प्रांत आहेत कि त्यांचे वेगळे देश होण्याइतपत त्यांची सांस्कृतिक ताकद आहे पूर्वीच धर्माने त्यांची फाळणी करत त्यांचे दोन तुकडे करण्याचे महान कार्य इंग्रजानी केले !याच पद्धतीने तामिळनाडू हाही अचानक खदखदत आपल्या स्वातंत्र्याचा उद्घोष करू लागला तर आश्चर्य वाटायला नको !! श्रीलंकेतला जाफना भाग हा असाच मोह पाडणारा आहे !

    अशा गोष्टींवर एकाच उपाय म्हणजे काश्मीरला दिलेला वेगळा दर्जा नष्ट करणे - कारण इतर प्रांतांनीही तशी सुरवात केली आहे !
    ज्यावेळी इतर प्रांतीय लोक काश्मिरात आपल्या इच्छेने जमिनी विकत घेऊन उद्योग उभारून तिथे सुबत्ता आणतील त्यावेळेसच काश्मीर खऱ्या अर्थाने भारतात विलीन होईल .
    असे नेहमीच झालेले आहे .
    आदिवासीना डावलत स्थलांतरे करत, नवीन रस्ते , योजना राबवाव्या लागतात,देशातील ५४० संस्थाने जर इंग्रजानी वेगळीच ठेवून ते गेले असते तर ? एकप्रकारे तो महान दृष्टिकोन ठेवून वल्लभभाई यांनी द्रष्टेपणा दाखवत अखंड भारत घडवला - हे सत्य आहे . समाजवादी आणि कम्युनिस्ट याला नक्कीच भांडवलदारांची एक क्रूर चाल मानतील !प्रत्येक संस्थान वेगळे आहे आणि आपल्याला अखंड रस्ते वीज पाणी यांची व्यवस्था करायची आहे तर काय झाले असते ? किती आडवाआडवी झाली असती ?आजचे राज्य पाणीवाटपाचे प्रश्न पुरेसे बोलके आहेत .
    काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले हे खरे आहे , पण ते टिकवायला जो पाया रचायला पाहिजे तो रचण्यात आपण कमी पडलो .
    टिळक आगरकर वादात खरे कोण ? इतिहास अभ्यासताना आपल्याला अनेक पदर तपासावे लागतात ! चीन आणि त्याचे हिंदी महासागरात उतरण्याचे स्वप्न विसरून चालणार नाही . आपण प्रत्येक आंदोलन हे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातले युद्ध समजून वागत आहोत आणि संसदेचा योग्य उपयोगही करत नाही .आपले पगार आणि भत्ता वाढवून घेताना सर्व पक्षीय आमदार खासदार एक होतात हेही भयानक सत्य आहे .
    जीएसटी चे राक्षसी स्वरूप अजूनही समजून घेतले नाही .
    भारतात अजूनतरी लष्करी क्रान्ती झाली नाही हे आपले नशीबच आहे . परंतु आपल्या सैन्याची नैतिक पातळी काश्मीर प्रश्नामुळे फारच खालावत जात आहे हे नक्की .! एखाद्या वाघासारखे गरजणारे , बीजेपीवाले ३ वर्षे सत्तेत असूनही काश्मीर बाबत काहीही करत नाहीत याचा अर्थच ते कडेलोट होईपर्यंत वाट बघणार आणि २०१९ साली काशीर युद्ध घडवून किंवा ३७० कलमा बाबत ओरडा करत पुन्हा जनतेचा कौल मागणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे .
    इंदिरा गांधींचा १९७१ चा विजय हेच सांगतो .आणि भाजप सारख्या हुकूमशाही वृत्तीच्या पक्षाला हा मोह टाळणे अशक्य आहे . समजा खरोखरच भारतीय जनतेने ३७० कलाम रद्द करण्याचा कौल दिला तर ? काश्मीर शब्दशः चिरडला जाईल हे नक्की . काश्मिरींची तीच लायकी आहे का ? का त्यांना तिथपर्यंत ढकलत नेण्यात येत आहे ?

    ReplyDelete
  2. vikasacha drushtikon naslele pudhari jo parynat kashmirmadhe tayr nahit toparyant Kashmir asech horpalat rahanr. national conference , pdp, huriyat confercne ya Kashmiri partikade lokana bhadkawane ani swatchi khurchi shabut rakhne hech kam shekh Abdulla pasun che nete karat aalet .
    Kashmir jar shant hoyache asel tar tithe sudharnawadi netyacnhi garaj aahet . maharshatra rajya deshat sarvat pude aahe karan desh azad zalyapasun aplya rajyala sarva sudharnawadi chief minister bhtelt (sadhyache akhi apwad sodle tar) ani tyachi fale apan chakhat aahot . 40 varashapurviche pale chief minister jar amrathi asmita etc ase gondas shabd vaprun lokana bhulwit aste tar aapli pn halat Kashmiri sarkhi zali asti.

    ReplyDelete
  3. आपल्याला पूर्वी कधी चांगले मुख्यमंत्री भेटले ? आपल्याकडे दक्षिण मध्य महाराष्ट हाच कायम राज्य करत होता - अगदी मुंबई इलाखा असल्यापासून हेच सत्य आहे .
    मराठवाडा आणि विदर्भ हे निजामी भाग अजूनही आपले मानले जात नाहीत हेच सत्य आहे
    यशवंतराव यांच्या काळापासून फक्त सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर यांचाच विकास केला गेला - इथले नेते - वसंतदादा शरद पवार , सुशीलकुमार शिंदे हेच खरे नेते होते , मुंबईमधील रेक्लमेशनचे गाजर वैदर्भी नेत्यांना दाखवत , दक्षिण मध्य महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला गेला , त्यामुळे वसंतराव , सुधाकर राव नाईक मंडळींनी चक्क आपल्या भागाकडे कानाडोळा केला . आणि मुंबईची रेक्लमेशनची मलाई खाल्ली !आजही मराठी राजकारणावर दक्षिण मध्य महाराष्ट्राचीच पकड आहे .. आणि मंत्रालयात ब्रह्मन् वर्गाची नोकरशाही आहे . मराठा ब्राह्मण हे कॉम्बिनेशन शिवाजीच्या काळापासून यशस्वी झाले आहे .काश्मीरची व्यथा वेगळीच आहे , त्यांना मुख्य प्रवाहात आलो तर आपले स्वत्व आपण गमावून बसू असे बिंबवले गेल्यामुळे आणि फक्त पर्यटन हाच एकमेव आधार असे सांगितल्यामुळे काश्मिरी लोक आज हा त्रास सहन करत आहेत .
    आजही जर ३७० कलाम रद्द होऊन नागरी वस्तीमध्ये जर पंजाबी गुजराथी मराठी बंगाली असे लोक वस्ती करून आले तर काश्मीर हा देशाशी जोडला जाईल सर्वार्थाने . काँग्रेसच्या नेत्यांची दळभद्री विचारसरणी आज त्रासदायक ठरत आहे . हेच सत्य आहे

    ReplyDelete
  4. Sir,

    1947 chi deshaachi faalni hone hech muli islam chya tatvaat basat naahi. Islaam kadich mansaana wegle honyachi/karnyachi shikvan det naahi. Jyaani musalmaanana bhartaatun wegle kele tyaani lokaana chukicha Islam shikvun islaam chya naavala kalima faasla aahe. Bhartiy musalmaan Islaamchi mansaala jodnyachi taakad olakhto mhanunach aaj hi bhaartaatach rahatoy. Jey bharat sodun gelet tey aata sairbhair zaalet. Lokaana Islam jar samjla astaa tar bhaartaachi faalni zaalich nasti.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...