Tuesday, February 27, 2018

मरणाचा भात!


Image result for Madhu killed kerala


मला मारायचे म्हणता
जरा थांबा
आधी माझे उपाशी
पोट भरायला
तुम्ही
काहीतरी श्रेष्ठ म्हणून जे जपले
त्याची मला चोरी करु द्या
ते मी गिळायच्या आत
मग तुम्ही मला ठेचून मारु शकता
त्यासाठी मी
बहाना तरी द्यायला
हवा की नको...?

उगा तुम्हालाच लोक पागल समजतील की!

मी तर पैदाईशी पागल
उगाच रोपे पेरत राहिलो
वांझ हृदयांत
मरायची वेळ आली कधी हेही न कळण्याएवढा
ठार वेडा मी
कळालेच नाही कसे व्हायचे डिप्लोमेटिक
यालाही नाही...त्यालाही नाही...
कोणालाच न दुखावता
ओरपायचा कसा चोरलेला भात?

आता
मला तुम्हाला मारायचेच आहे
बघा नीट
मी भात उघड उघड चोरला आहे
आणि मला तो गुपचूप खायची इच्छाही
नाहीहे
मला तो चोरलेला भात
तुम्हालाच खायला घालायचाय
माझ्या मरणातून...
...
मरणाचा भात!

No comments:

Post a Comment

माणूस जिवंत करण्यासाठी!

  आमचे डोळे फुटलेले आहेत कानात लाव्हा भरला आहे कोणत्या ज्वालामुखीवर आम्ही बसलो आहोत हे कळेना व्हावे एवढे बौद्धिक बधीर आम्ही झालो आहोत पिशाच्...