Sunday, May 13, 2018

व्यावसायिकांचा मित्र : म्युच्युअल फंड



खेड्यापाड्यापासुन ते शहरांतील छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे आहे त्या व्यवसायाच्या आकारापेक्षा अजुन मोठा आकार व्हावा. व्यवसायाची एक शाखा असली तर तिच्या अनेक शाखा व्हाव्यात. थोडक्यात व्यवसायाचा विस्तार व्हावा. त्यबरोबरच व्यवसायात नुसते प्रतिष्ठेचे नव्हे तर उच्च दर्जाचे आर्थिक स्थान निर्माण करावे. अशी शिस्तबद्ध प्रगती साधणारे अनेक व्यावसायिक आपल्याला दिसतात. त्यासाठी त्यांना कराव्या लागणा-या संघर्षाच्या कथाही आपल्याला माहित असतात. किंबहुना त्या कथा प्रेरकच असतात हे जरी खरे असले तरी त्याच वेळीस अपयशाच्या खाईत कोसळलेले किंवा आहे त्या मर्यादेतच व्यवसाय करत राहिलेले जास्त असतात हे मात्र आपण लक्षात घेत नाही.

कोणत्याही व्यवसायाचा पाया असतो आणि ते म्हणजे भांडवल. भांडवलाबरोबरच आवश्यक असते ते म्हणजे आर्थिक नियोजन. व्यवसायात तेजी-मंदीची चक्रे सातत्याने येत असतात. तेजीच्या कालात नीट आर्थिक नियोजन केल्याने अनेक व्यवसाय मंदीच्या काळात गडगडलेले आपल्याला दिसतात. किमान टिकुन राहण्यासाठी तरी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. याच बरोबर कधी कधी अचानक बदलणा-या सरकारी धोरणांचा, एकुण मागणीच्या बदलणा-या कलांचाही व्यवसायावर भलाबुरा परिणाम होत असतो. या सर्व स्थितींवर मात करायची असेल तर शिस्तबद्ध अर्थिक नियोजन लागते आणि ते आपण म्युच्युअल फंडांद्वारे साधु शकतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

लघु मध्यम व्यावसायिकांनी त्यासाठी सुरुवातेपासुन घ्यायची काळजी म्हणजे भविष्याचे आर्थिक नियोजनही अशा रितीने करावे की ज्या योगे विपरित परिस्थितीत त्याला नुसता तग धरुन नव्हे तर बळकटीने उभे राहता येईल. याशिवाय व्यवसाय वृद्धीच्या, विस्ताराच्या नव्या संधी समोर आल्या तर त्या पकडता येतील अशी अतिरिक्त आर्थिक भांडवलाची निर्मिती करुन ठेवणे. अर्थात यासाठी योजनाबद्ध गुंतवणुक करणे आवश्यक असते. म्युच्युअल फंड यासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो. कसा ते समजावुन घेणे गरजेचे आहे.

समजा तुमच्या व्यवसायात सध्या तेजी आहे. या काळात नफ्यातील ठरावीक भाग तुम्ही नियमितपणे म्युच्युअल फंडात गुंतवत जाऊ शकता. यासाठी सिप (Systematic Investment Plan) ही योजना जास्त योग्य फायदेशीर ठरु शकते. आपली गरज पाहुन योग्य वाटना-या म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला शक्य असेल त्या नियमिततेने गुंतवणूक करता येते. यात करबचत होतील अशा प्रकारचेही काही म्युच्युअल फंड असतात. त्यांचाही योग्य उपयोग आपण आपल्या कर सल्लागाराच्या मदतीने आपण करुन घेऊ शकता.

म्युच्युअल फंडातील नियमित गुंतवणूक आपल्याला संपत्तीचा म्हनजेच भावी प्रगतीसाठी भांडवलाचा एक स्त्रोत निर्माण करायला मदत करु शकते. त्यामुळे तुम्ही व्यवसायाच्या विस्तारासाठी या भांडवलाचा उपयोग करुन आहे त्या व्यवसायात भरारी घेऊ शकता. एखादी नवी व्यावसायिक संधी चालुन आली तर तुम्ही बेसिक भांडवल म्हणून या गुंतवणुकीचा उपयोग करु शकता. मंदीच्या स्थितीतही तग धरण्यासाठी या भांडवलाचा उपयोग होऊ शकतो. म्युच्युअल फंडाचा रोकड तरलता हा सर्वात महत्वाचा वैशिष्ट्यपुर्ण भाग असल्याने अन्य गुंतवणुकी विकुन पैसा उभा करण्यासाठी ज्या अडचणी येतात तशी अडचण येथे येत नाही. म्युच्युअल फंड आपल्याला रोख तरलता (Liquidity) उपलब्ध करुन देतात त्यामुळे आवश्यक वाटेल तेंव्हा पैसे उभे करु शकता.

म्हणजेच एका अर्थाने म्युच्युअल फंडांतील तुमची गुंतवणूक ही तुमच्या भविष्यकालीन योजनांचे भांडवल ठरु शकते. यामुळे तुमच्या आर्थिक जीवनालाही एक शिस्त लागते. व्यवसाय वृद्धी करत, त्याचा विस्तार करत एक समर्थ व्यावसायिक बनण्यासाठी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक तुम्हाला एक आधार बनु शकते. त्यासाठी योग्य फंडांची निवड करुन नियमित गुंतवणुकीची सवय तेवढी लावायला हवी. तुम्ही किमान पाचशे रुपयांपासुन गुंतवणुक सुरु करु शकता. त्यामुळे किमान रक्कम किती हीही अडचण तुम्हाला रहात नाही. मोठे व्यावसायिक स्वप्न स्वत:च निर्माण केलेल्या संपत्तीतुन तुम्हाला साकार करता येऊ शकते व त्यासाठी स्मार्ट व्यावसायिक बनणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या

https://www.reliancemutual.com/campaigns/RMFContest/index.html


(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...