Tuesday, May 22, 2018

विश्वभान हे गा

हे अमिट अमिट
प्रिय प्रिय जे
हे प्रेय गीत तु गा...
हे स्वरील स्वरील ते स्वर पकड अन
शब्द अमर ते गा....!
सुर्याला तु भान दे अन
चंद्राला घेउन कवेत तु
गीत तारकांचे गा...
त्या प्रकाशबिंदुंना पिवून तु
विश्वभान हे गा...
हे अमिट अमिट
हे प्रिय गीत तु गा...
हे स्वरील स्वरील ते स्वर पकड अन
शब्द अमर ते गा....!
कुशीत घेउनी विश्व-प्रियेला
तू अमर शब्द ते गा
अजरामरतेच्या प्रिय गीताचे
नि:शब्द शब्द ते गा
शब्द अमर ते गा....!

No comments:

Post a Comment

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मर्यादा

     चीनच्या डीपसीकने अलीकडेच जगभर कसा हादरा दिला याचे वृत्त सर्वांनीच वाचले असेल. त्यावर चर्चाही केल्या असतील. भारतही आपने स्वत:चे ए....