Friday, June 8, 2018

एका निरपराधाची ससेहोलपट : "जमानत"


भारतातील न्याय व्यवस्था ही एक चिंतेची बाब बनून गेलेली आहे. वर्षानुवर्ष पेंडींग असलेल्या कोट्यावधी केसेस, कमी जज, वकीलांनी केलेला कालापव्यय यामुळे न्यायव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. त्यात राजकीय व पोलीस यंत्रणेतील दोषांमुळे निरपराधही भरडले जातात. अनेक सामान्य आणि गरीब गुन्हेगार केवळ जामीन न मिळाल्यामुळे अथवा जामीनाची पुर्तता करता येत नसल्याने अपराध सिद्ध होऊन जेवढी शिक्षा झाली असती त्यापेक्षाही अधिक काळ तुरुंगात राहतात. असे भारतात साडेपाच लाखांहुनही अधिक कच्चे कैदी आहेत. त्यांना घटनेने दिलेले स्वातंत्र्य आणि कायद्यासमोर सारे समान हे तत्व लागू केले जात नाही. मानवी हक्कांची ही पायमल्ली न्याययंत्रणेकडुनच केली जावी ही बाब भारतीय समाजाला शोभा देणारी नाही.

या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी "जमानत" या लघुपटाचा जन्म झाला. एक सामान्य अपंग मेंढपा्ळाला कसलाही संबंध नसतांना केवळ एका दरोड्यात आरोपी मिळत नसल्याने आणि अटक तर दाखवणे भाग असल्याने अटक केली जाते. त्याची दुर्दशा आणि करुण अंत, एका तरुण वकीलाने त्याच्या सुटकेसाठी केलेला प्रयत्न आणि त्याचीही होणारी हार आपले भेदक समाज वास्तव दाखवते.

य लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन संजय सोनवणी यांनी केले. निकिता ओंबासे आणि मयुर लोणकर यांनी मुख्य भुमिका निभावल्या तर न्यायस्थितीसमोर हार मानलेल्या सिनिअर वकीलाची भुमिका स्वत: संजय सोनवणी यांनी केली. मेंढपाळाची भुमिका वास्तव जीवनातही मेंढपाळच असलेल्या आनंद कोकरे यांनी केली. त्यांचा मूक अभिनय मूक समाजाचे प्रतिनिधित्व करते. या लघुपटाला मोठ्या प्रमानात यु ट्युबवर प्रेक्षक मिळत असून लवकरच ही फिल्म आंतरराष्ट्रीय फेस्टिवल्समध्येही दाखवली जाणार आहे. या लघुपटाची निर्मिती पेशाने पत्रकार असलेले शरद लोणकर यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...