Saturday, December 7, 2019

जीवन खूप सुंदर आहे...

जीवन खूप सुंदर आहे
फुलारलेल्या वसंतात
बालकांच्या नि:ष्पाप हास्यात
श्रद्धाळुंच्या आत्यंतिक भक्तीत
आणि प्रेमिकांच्या मूग्ध प्रणयात
कष्टक-यांच्या घामात
स्वप्नांच्या पाठलागात
उभरत्या...ढासळत्या
भाग्यात
आणि तरीही आसुसून जगण्याच्या
वत्सल मातेच्या
अशिर्वादांसारखं
जीवन खूप सुंदर आहे.
विखारांचे अमानवी भेसूर
भिषण चेहरे
जीवनाला विकृत करण्याचा
प्रयत्न करत राहतात हेही खरे
कधी कधी ते जगणेच नकोसे करतात
एवढेच नाही तर जगण्याला
नरकसमान बनवण्याचा प्रयत्न करतात
हेही खरे
पण आम्ही माणूस आहोत
जगण्याच्या विशाल पटावरील
हे अमानवी भाव
दूर सारत आम्ही आमच्या
इवल्या जगण्यातील
जगणे पाहतो...
कारण जीवन फारच सुंदर आहे...
आम्हा जगणा-यांसाठी!

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...