Wednesday, December 1, 2021

महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव वाफगाव (खेड) येथे

 

महाराजा यशवंतराव होळकर जयंती उत्सव वाफगाव (खेड) येथे
?पुणे : अखिल भारताच्या स्वातंर्त्याचा पहिला एल्गार पुकारत इंग्रजांविरुध्द एकहाती युध्द करत त्यांना तब्बल अठराच्या अठरा युध्दांत पराजित करणार्या महाराजा यशवंतराव होळकर यांची 237 वी जयंती वाफगांव (ता.राजगुरुनगर) येथील त्यांच्या होळकर किल्ल्याच्या जन्मस्थानी विविध पक्ष व संघटनांच्या वतीन सोमवार दिनांक 3 डिसेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराजा यशवंतराव गौरव प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय सोनवणी आणि सचिव प्रकाश खाडे यांनी दिली.
ते म्हणाले, यशवंतराव होळकरांनी स्वसामर्थ्याने शिंदे-पेशव्यांनी गिळंकृत केलेले आपले राज्य परत मिळवले व सहा जानेवारी 1799 रोजी आपला वैदिक पध्दतीने राज्याभिषेक करुन घेत सार्वभौमता घोषित केली. 1803 पासून यशवंतरावांनी इंग्रजांविरुध्द युध्द घोषित केले. त्यासाठी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी शिंदे, भोसले ते भारतातील सर्वच राजे-रजवाडय़ांना केले. दुर्देवाने त्यांना कोणीही साथ दिली नाही, तरीही त्यांनी आपले युध्द एकहाती सुरु ठेवले.
''प्रथम आपला देश:मग इतर सर्व'' अशी व्यापक भुमिका घेणारे यशवंतराव हे भारतातील आद्य राष्टिय विचाराचे योध्दे होते. यशवंतरावांनी इंग्रजांशी दिलेलले मुकंद-याचे व भरतपुरचे युध्द हे जागतीक युध्दाशास्त्रात अभ्यासले जातात, एवढी ती महत्वाची आहेत. मुकंद-याच्या युध्दातील दारुण पराभवानंतर इंग्रजांना भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. अन्य सारे रजवाडे मांडलिक बनलेले असतांनाही केवळ यशवंतरावांशी शांततेच्या तहाच्या वाटाघाटी कराव्या लागल्या. परंतु दुर्देवाने 18 ऑक्टोबर 1811 रोजी वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी त्यांचा अकाली मृत्यु झाला. तरीही त्यांचे पत्नी तुळसाबाई व कन्या भीमाबाई यांनी 1820 पर्यंत इंग्रजांना आपल्या राज्यात प्रवेशु दिले नाही. या महायोद्धयाचे वीरस्मरण करण्यासाठी व राष्टीयतेची यशवंतरावांची भावना सर्वाप्रत पोहोचण्यासाठी या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्व स्वातंर्त्यप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे आम्ही करत आहोतअसे ते म्हणाले.

1 comment:

  1. सर 18 ऑक्टोबर 1811 रोजी पुण्यतिथी असते का ??

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...