Friday, May 27, 2022

सत्याचा एंटिव्हायरस

 पेटून उठतील ना लोक

हो नक्कीच
आज त्यांचे रक्त शेण झालं असलं
मेंदुत गुलामीचा व्हायरस घुसला असला
आणि जे सांगितलं जातंय
तेवढच सत्य आहे
असं त्यांना वाटत असलं
आणि कन्हत कुथत
जगत जरी असले ते
तरी सत्याचा एंटिव्हायरस
करेल ना त्यांना जागं
एक दिवस
तू फक्त सांगत रहा
त्याच निर्भयतेने!
होय...
पेटून उठतील ना लोक...
एक दिवस!

1 comment:

  1. इ. १ ली ते इ. ७ वी साठी आता वर्ष भरासाठी फक्त तीनच पुस्तके.
    एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक इ. १ ली ते इ. ७ वी
    नवीन पुस्तके येथे पहा / download करा.
    https://zpshikshan.blogspot.com/2020/07/blog-post.html

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...