Wednesday, April 26, 2023

आर्थिक दहशतवाद आणि आपण!

 



 

बलाढ्य संस्क्रुत्यासमाजधर्मराष्ट्र यांनी पुरातन काळपासुन आर्थिक दहशतवादाचा वापर केला आहे असे आपण इतिहासाचे परिशीलन करतांना स्पष्टपणे पाहु शकतो. अलीकडे तुलनेने निर्बल असनारे घटकही याच दहशतवादाचा वापर करत आहेत. एकुणात आजाहे जगभरात कोणत्या ना कोणत्या मार्गाने आर्थिक दहशतवाद फोफावत आहे.


वरकरणी हा दहशतवाद फार सौम्य वाटतो. यात शक्यतो जीवितहानी नसते. या दहशतवादात विशिष्ट समाजधर्मीयराष्ट्रे वा प्रांतांवर आर्थिक बंधने लादुन वा आर्थिक संकटे क्रुत्रिम रित्या कोसळवुन त्यांची आर्थिक नाकेबंदी करत त्यांचे जीवनमान व एकुणातील अर्थव्यवस्था पराकोटीच्या खालच्या पातळीवर नेणे व जोवर ते स्वानुकुल धोरणे राबवत नाहीत वा अपेक्षित क्रुत्ये करत नाहित तोवर त्यांना नाडत राहणे हा प्रमुख उद्देश असतो. त्यामागील मुख्य हेतु प्रसंगपरत्वे व काळानुरुप बदलत आले आहेत. या दहशतवादामागे काही वेळा नैतिक द्रुष्टीकोन असल्याचाही कांगावा केला जातोपण ते तसेच असेल याची खात्री अशी बंधने लादणारे देवु शकतीलच असे नाही. किंबहुना कोनत्याही दहशतवादामागे कोनतीही नैतिकता असु शकत नाही हे उघड आहे.


मानवी जीवनात आर्थिक घटक फार महत्वाची भुमिका पार पाडतात. मानवी जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक राष्ट्र एकुणातील समाजाची आर्थिक प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्नरत असते. त्यासाठी उत्पादन व्रुद्धीव्यापारव्रुद्धी तसेच बौद्धिक संपदांची निर्मिती करत एकुनातील नागरिकांचे जीवन किमान सुसह्य तरी व्हावे यासाठी सत्ता प्रयत्न करत असते. जागतिक परिप्रेक्षात हा साराच अर्थव्यवहार परस्परावलंबी असल्याने निर्यात अधिक व्हावी आणि आयात कमी व्हावी असा प्रयत्न सर्वच अर्थव्यवस्था करत असतात. परंतु प्रत्यक्षात त्यात समतोल होतोच असे नाही. काही राष्ट्रे (भुप्रदेश) विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक उत्पादने करत असतील आणि तशी नैसर्गिक साधनसंपदा अन्यत्र उपलब्ध नसेल तर एक वेगळाच तीढा निर्माण होतो हे आपण तेल-उत्पादक राष्ट्रांबद्दलच्या अन्य राष्ट्रांसहितच्या अमेरिकेच्या कुटील कारवायांतुनलादल्या जाणार्या आर्थिक निर्बंधांतुन तसेच प्रसंगी झालेल्या युद्धांतुन पाहु शकतो. अनेकदा बलाढ्य राष्ट्रेही अनेकदा दहशतवादी कारवायांतुन त्या-त्या शत्रु राष्ट्रे/राज्यांची आर्थिक व्यवस्था खिळखिळी करुन त्यांना जेरीस आणण्याचेही प्रयत्न करत असते हेही आपल्या लक्षात येईल. मागे झालेले इराकविरुद्धचे युद्ध किंवा अलीकडचेच अमेरिका व चीनमधील व्यापार युद्ध  हे अन्य काही नसुन आर्थिक दहशतवादाचाच एक प्रकार होता.


आर्थिक दहशतवादासही पुरातन इतिहास आहे. जिंकलेल्या राज्यांवर जबर आर्थिक खंडण्या लादण्याची प्रथा जगभर होती. त्यात युद्ध खर्च भरुन घेणे तसेच आपल्या तिजो-या भरणे हे हेतु होतेच पण त्याच वेळीस शत्रु राज्याने पुन्हा आक्रमणाच्या स्थितीत येवुच नये यासाठी त्याला आर्थिक द्रुश्टीने विकलांग करुन सोडणे हा मुख्य हेतु असे. इजिप्त पासुन ते जर्मेनियापर्यंत रोमनांनी आर्थिक दहशतवादाचा निरलसपणे उपयोग केला. तत्पुर्वी इजिप्तने कोनान प्रांतातील ज्युंवरही पराकोटीचे आर्थिक निर्बंध लादून त्यांना जवळपास गुलामीचे जीवन जगायला भाग पाडल्याचे आपल्याला दिसते. भारतात ऋग्वेदातील काही ऋचांतुन वैदिक मंडळी कालवे, नद्यांवरील बांध व नगरांना उध्वस्त करून शत्रू जमातींना आर्थिक संकटांत आणित असत असे दिसते.


अति-अत्यल्प मोबदल्यात (बव्हंशी फुकट) काम करुन घेण्यासाठी जी गुलामगिरीची प्रथा आली त्यामागे आर्थिक दहशतवादाचा मोठा भाग होता. या दहशतवादामुळे हजारो वर्ष मानवी समाजाला अधोगतीचे जीवन जगणे भाग पडले. भारतातील वेठबिगारी पद्धत म्हणजे आर्थिक दहशतवादच होती. या पद्धतीमुळे अत्यंत स्वस्तात अवाढव्य कामे राजसत्तांना करुन घेता आली. ही पद्धत विशिष्ट जातींवर लादल्याने त्यांचे आर्थिक व सामाजिक अवमूल्यन झाले असेही आपण पाहू शकतो. या दहशतवादाचा वरिष्ठ वर्गाला फायदा असा झाला कि हा शोषित वर्ग बंड करु शकण्याच्याही स्थितीत राहिला नाही.

.
आफ़्रिकन गुलामांबद्दल वेगळ्या अर्थाने असेच घडले. लक्षावधी आफ्रिकन लोकांना गुलाम केले गेलेत्यांच्याच भुमीतील नैसर्गिक साधनसामग्री ओरबाडुन लुटण्यात आलीत्यासाठी याच भुमिपुत्रांचा फुकटात निर्दयपणे उपयोग करुन घेतला गेलातोही वेतन वा कसलाही मोबदला न देताया आर्थिक दहशतवादामुळे युरोपियन/अमेरिकनांची आर्थिक भरभराट झाली तर त्याचा उलट परिणाम म्हणजे ल्क्षावधी लोक पिढ्यानुपिढ्या नुसते गुलाम बनले नाहित तर त्यांची विचारशक्तीही कुंठीत करुन टाकण्यात आली.


इस्लामिक आक्रमकांनी आर्थिक दहशतवादाचा पुरेपुर वापर करुन घेतला आहे. त्यांनी पश्चिम आशिया ते चीनपर्यंत आर्थिक दहशतवादाचा निरलसपणे वापर केला. अनेक साम्राज्ये कंगाल करून टाकली. जे मुस्लीम नाहित त्यांच्यावर "जिझिया" कर बसवणे हा आर्थिक दहशतवादाचाच एक भाग होता. आजही इस्लामी कट्तरपंथीय राजवटी जेथे आहेत अशा तालीबान्यांनीही या कराची वसुली सुरु करुन अन्य धर्मियांचे जीवन नकोसे करण्याचे पराक्रम केले आहेत. भारतीयही आर्थिक दहशतवादात मागे नव्हते हे आपण मध्ययुगातील खंडण्या आणि राजरोस शत्रू राज्याच्या लुटीवरून पाहू शकतो. दिलेल्या खंडण्याची वसुली होई ती नागरीकांकडून. शेवटी तेही देशोधडीला लागत हाही एक इतिहास आहे.


आर्थिक दहशतवाद हा हिंसक दहशतवादापेक्षाही एखाद्या मानवी समुदायाचे जीवन कसे हीणकस बनवत प्रलयकारी ठरतो याची अगणित उदाहरणे इतिहासात भरलेली आहेत. दुस-या महायुद्धात बहुतेक हल्ले हे सैनिकांना मारण्यासाठी नव्हे तर शत्रु राष्ट्रांचे कारखाने, संशोधन केंद्रे,  शेती ई. नष्ट करुन त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी केले गेले आहेत. आर्थिक दृष्ट्या विकलांग झालेले राष्ट्र लवकर शरण येते हा एक अनुभव आहेच.

कोणतेही राष्ट्र आपनास कोणत्याहीप्रकारे आव्हान देण्याच्या स्थितीत येवु नये यासाठी वापरला जाणारे विघातक हत्यार म्हणजे आर्थिक निर्बंध. इंदिराजींनी पहिला अणुस्फोट घडवुन आणल्यानंतर अमेरिकेने व त्याचा भाट राष्ट्रांनी भारतावर आर्थिक निर्बंध घातले होते व त्याची पुनराव्रुत्ती वाजपेयी सरकारच्या काळातही झाली होती हे सर्वांच्या स्मरणात असेलच. या आर्थिक निर्बंधांत अशा राष्ट्रांना आर्थिक सहकार्यविशिष्ट उच्च-तंत्रद्न्याने/धातु याची निर्यात न करणे व त्यांच्या कडील आयातीवरही बंदी घालणे याचा समावेश होतो. असे आर्थिक निर्बंध तिस-या जगातील अनेक राष्ट्रांवर वेळोवेळी घातलेले आहेत.


१९४५ ते १९९० पर्यंत सुरक्षा समितीने फक्त दोनदा असे निर्बंध घातले होते पण १९९० नंतर ११ राष्ट्रांवर असे निर्बंध वारंवार घातले गेलेले दिसतात. इराकवरील आर्थिक निर्बंधांमूळे इराकमधील २३७००० मुले व व्रुद्धांचा कुपोषण आणि जलजन्य रोगांमुळे म्रुत्यु झाला. प्रत्यक्ष आखाती युद्धातील ४०,००० मृत्युंपेक्षा हे म्रुत्युचे प्रमाण भयंकरच म्हटले पाहिजे. अन्यत्रची स्थिती वेगळी नाही. आर्थिक निर्बंध हे युद्धांपेक्षा किती गंभीर परिणाम घडवुन आणु शकतात याचे हे एक उदाहरण आहे.


आर्थिक निर्बंधांचा वापर स्वत:ची स्वयंघोषित महासत्ता हीच जगाची नियंत्रक आहे हे सिद्ध करण्यासाठी केला जातो. आपल्या जागतिक ध्येयधोरणांना कसलाही छेद जावु नये हीच महत्वाकांक्षा यामागे असते. परंतु या निर्बंधांच्या दहशतवादामुळे त्या-त्या संबंधित देशातील आर्थिक वाढ खुंटते आणि त्याचवेळीस तंत्रद्न्यानाचीही गळचेपी होते. यामुळे एकुण विकासदर खालावत जातो आणि त्याची परिणती संबंधीत देश विकलांग होण्याची वेळ येते. या बंद्या तेंव्हाच ऊठवल्या जातात जेंव्हा संबंधित राष्ट्रे वर्चस्ववाद्यांना शरण जातात. जगाने आर्थिक दहशतवादापासून सतर्क असणे आवश्यक ठरते ते यामुळेच!

-संजय सोनवणी


No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...