Wednesday, November 29, 2023

येते अवचित भान

 येते अवचित भान

रात्रीस कधी दिवसाचे

पदरात गोळा करी आभाळ

चंद्र अन ता-यांचे..

पांघरून उजळता शेला

भाळी कुंकव ते सुर्याचे

मार्दवी उषा हसवते गाली

पण स्मरण रात्र क्षणांचे

प्रणयी आभाळाचे

अन गात्र गात्र चिंबण्याचे...
पुन्हा रात्र होण्याचे....

No comments:

Post a Comment

शोध चष्म्याचा!

  कोणाला चष्मा लागला तर एके काळी त्याला चष्मीस, ढापण्या, ढप्पण अशा शेलक्या विशेषणांनी हिणवले जायचे. चष्मा लावणाऱ्या विद्यार्थ्यास बुद्धीमान ...