Wednesday, November 29, 2023

विश्वनाथ



विश्वनाथ

-शंकर माने

मानवी स्वभावाचे अनेक पैलू आहेत. पैकी महत्वाकांक्षा , साहस, सदाचार, दुराचार, निंदा, रक्तपात आणि दहशत इत्यादी पैलू सर्रासपणे कित्येक वेळा पाहिल्या जातात आणि त्यांचा अनुभव हि घेतला जातो. जसे जसे माणसाच्या कामाची व्याप्ती वाढत जाते, जसे त्याचा व्यक्तीसंपर्क वाढतो तसे तो त्या कामात प्रगल्भ होत जातो आणि जीवनाचे अगणित पैलूंचाही साक्षात्कार त्याला होत राहत असतो. मानवी जीवन एक झंझावात असतो ज्यात त्याने संघर्ष केलेला असतो , तडजोडी केलेल्या असतात आणि अशक्य गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टाहि केलेली असते.

एकंदर मानवी जीवनाचा प्रवास जन्मापासून मृत्युकडे वाटचाल करीत असताना त्यात अनेक गोष्टी समाविष्ट झालेल्या असतात. महात्वाकांक्षा माणसाला जीवन जगण्याची प्रेरणा देत असते. ध्येय नसेल तर जीवनाचा अर्थ काय?
मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी लिहिलेली "विश्वनाथ" हि कादंबरी अशाच एका मानवी जीवनाच्या प्रवासावर आधारित आहे जी आपल्याला या पैलूंचा साक्षातकार घडवते.
हि कथा अतिशय उत्कंठावर्धक असून वाचताना पुढे काय होईल आणि होऊ शकते या प्रश्नांवर आपल्याला ती खीळवून ठेवते.
गुन्हेगारी विश्वातील अनेक पात्रांचा समावेश व त्यांच्या रक्तरंजित कुकर्मांचा परिचय आपल्या मनाचा थरकाप उडवून देतात. अंडरवर्ल्ड क्षेत्रातील दिगग्ज एकमेकांच्या साथीने जगभरातील दहशतवाद कसे बोकाळु शकतात आणि त्यांना राजकारणी लोक कसे साथ देऊ शकतात याचीही प्रचिती प्रस्तुत कादंबरी तुन येऊ शकते.
विश्वनाथ नावाचा "डॉन" याचा झंजावात , त्याने दाखवलेले प्रसंगसावधान, शून्यातून निर्माण केले विश्व आणि ते टिकवण्या साठी त्याने दिलेली झुंज अतिशय उत्कंठा वर्धक आहे. वयाच्या उतरत्या काळात विश्वनाथला जीवनाचे उमगलेले रहस्य ही गोष्ट या कथेची उजवी बाजू असून या क्लायमॅक्स मुळे या कादंबरीला झळाळी प्राप्त झालेली आहे.
सोनवणी सर यांनी लिहिलेली हि कथा मराठी विश्वात अतिशय नाविन्यपूर्ण आहे. अतिशय समर्पक अशी कथेची मांडणी केलेली असून वाचताना एखादा गॅंगवार , गँगस्टर , माफिया च्या जीवनावर आधारित चित्रपटच पाहत आहोत असे वाटते. या कादंबरीत लेखकाने अनेक दृष्ये जिवंत केलेली आहेत . मग ती हिंसक दृश्ये असो कि रोमँटिक दृश्ये कि दुःखदायी प्रसंग असो !
या कथे मध्ये मला अनेक दृष्ये आवडली. -पैकी एक दृश्य इथे देत आहे.
".....तो जयंतला शांत स्वरात म्हणाला होता, 'मुला, महत्वाकांक्षा प्रत्येकात असते; पण ती पूर्ण करण्यासाठी जे बौद्धिक व शारीरिक सामर्थ्य हवं असतं ते प्रत्येकात नसतं. निसर्गानेच हि व्यवस्था केली आहे. सारेच एकाच सामर्थ्याचे असतील तर पृथ्वीवर एकही माणूस शिल्लक राहणार नाही. काही माणसं आज्ञा देण्यासाठी जन्माला येतात, तर काही आज्ञा पाळन्यासाठी. विश्वनाथांमध्ये जे आहे ते प्रत्येकात असू शकत नाही. श्रेष्ठत्व कर्तृत्वावर ठरतं. आज विश्वनाथ हा स्वयंप्रकाशीत सूर्य आहे. त्यांना कोणीही काही शिकवलं नाही. ते स्वतःच शिकले. त्यांनी स्वतःचं आपलं तत्वज्ञान बनवलं आणि समर्थपणे राबवलं. विश्वनाथाना ठार मारून कोणी विश्वनाथ बनु शकणार नाही. अशी व्यक्ती पुनः पुनः जन्माला येत नाही .."
नक्की वाचा
विश्वनाथ
लेखक: संजय सोनवणी
सुपर्ण प्रकाशन

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...