(खरे तर या विषयावर मी "हिन्दु धर्माचे शैव रहस्य" हा ग्रंथ लिहिला आहे...पण अजुनही "आर्य" हा वादग्रस्त मुद्दा आहे असे दिसल्याने येथे मी त्यावर थोड्क्यात प्रकाश टाकतो.)
१. आर्य नावाचा कोणताही वंश भुतलावर कधीही अस्तित्वात नव्हता. "आर्य" हा शब्द रुग्वेदात फक्त ३४ रुचान्त ३६ वेळा येतो....आणि तो वैदिक धर्माचे पुरस्कर्त्या राजा सुदास आणि त्याच्या वंशजांना उद्देशुन वापरला गेला आहे. हा शब्द वंश्वाचक नाही.
२. रुग्वेदात वैदिक धर्मीय कोठुन बाहेरुन आल्याचा एकही उल्लेख नाही.
३, या कथित आर्यांनी येथील "मुलनिवासी" दास, दस्यु, असुर इ. जमातींना पराभुत केले व आपली संस्क्रुती लादळी असे दावे केले जातात. पण प्रत्यक्ष या वैदिकांच्या नावातच दास, दस्यु हे शब्द येतात...उदा. सुदास, त्रसदस्यु, दिवोदास इ. वैदिकांची सर्वश्रेश्ठ देवता वरुण याला वारंवार "असुर वरुण’ असे गौरवाने म्हटले आहे तसेच अग्नीलाही "असुर अग्नी" असे म्हटले आहे. म्हणजे वैदिकही कधीकाळी असुर/दास/दस्यु यांच्याशीच निगडीत होते. सुदासाच्या काळात यद्न्यधर्माची सुरुवात झाली...सिन्धु संस्क्रुतीमधील मुर्तिपुजा (लिंग्पुजा) त्यांनी सोदली आणि तसे अनेक उल्लेख रुग्वेदात येतात. शिवाची ते "शिस्न्देव" म्हणुन निर्भत्सना करतांना दिसतात...व्रुषाकपि (हनुमानाचे पुरातन सिन्धु रुप) वेदांत डोकावतो.
४. याचा अर्थ वैदिक आनि शैवजनांत जो विभेद होता तो धर्मिक स्वरुपाचा होता...वांशिक नव्हे.डा, बाबासाहेब आंबेड्करांनीही हेच मत मांडलेले आहे.
५. आजतअगायत आर्य बाहेरुन आल्याचा एकही भौतिक पुरावा कोठेही सापडलेला नाही.
६,. संस्क्रुत भाषा मुळची व त्यातुन प्राक्रुत भाषा निर्माण झाल्या हा एक गैरसमज आहे. प्राक्रुत भाषा ग्रांथिक कारणासाठी विकसित करुन जी परकोटीचे संक्षिप्तीकरण करता येइल अशा पधतीने संस्क्रुत बनवली गेली. ही कधीएही भारतातील बोलीभाषा नव्हती...संस्क्रुत ही शिकावीच लागत असे. फुलपाखरासाठी संस्क्रुतमद्धे प्रतिशब्दच नाही.अशी अनेक उदाहरणे आहेत.
७. ग्रीक भाषेत काही संस्क्रुत/प्राक्रुत शब्द मिळतात...पण त्याचे कारण आर्य वैदिक नसुन सिंधु जनांचा जो विदेश व्यापार होत असे त्यातुन झालेली ही देवाण-घेवाण आहे.
८. हेर्मान याकोबी आणि माक्स-मुल्लर या जर्मन विद्वानांनी प्रथम इंडो-आर्यन ही संद्न्या आणली. हे भाषातद्न्य होते...वंशशास्त्रद्न्य नव्हते. रुग्वेदासारखी रचना करणारे या "अडाणी" देशातील मुळचे असु शकत नाही हा अहंगंडही होताच. त्यांना काय पुरावे मिळाले तर ग्रीक ल्यटीन भाषेत आढळणारे काही शब्द. यावरुन एकदम घाइचे निष्कर्ष त्यांनी काढ्ले. १५-१६ शब्द समान सापडतात म्हणजे युरोपियन आणि भारतातील ब्राह्मण एकाच वंशाचे आणि कोठल्या तरी मुळ प्रदेशातुन त्यांनी स्थलांतर केले असा निष्कर्ष त्यांनी काढला. पण त्यामधील धोका लक्षात आल्यावर माक्स-मुल्लरने आपला सिद्धांत मागे घेतला.
९. पण भारतीय ब्राह्मणानी तो सिद्धांत उचलुन धरला. इतका कि टिळकांनी "आर्क्टिक होम इन वेदा’ज" असा चक्क ग्रंथही सिद्ध केला. यामागे इंग्रज अनुनयाचे धोरण होते. कारण ब्राह्मण आणि इन्ग्रज एकवंशीय ठरत होते....ते ब्राह्मणाना जेवढे हवे होते तसेच इन्ग्रजांनाही. विश्णुशास्त्री चिप्ळुण्कर तर इन्ग्रजांना "आमचे पुरातन आर्य रक्ताचे बांधव..." असे म्हनत.
१०. यामुळे व्यक्तिगत अपवाद वगळले तर ब्राह्मणी संघटना स्वातंत्र्य लढ्यात उतरल्या नाही. आर. एस. एस., हिंदु महासभा ही मुख्य उदाहरणे आहेत. सावरकर तर दुसर्या विष्वयुद्धात सैनिकांनी मोठ्या प्रमणावर भरती व्हावे असा प्रचार देशभर करत होते.
११. याची पुढील प्रतिक्रिया म्हणजे आर्य-द्रविड संघर्ष. दक्षीणेत पराकोटीची हिंसक आंदोलने झाली...हिंदी नाकारली गेली. आर्य जर बाहेरचे तर त्यांनी या देशातुन चालते व्हावे अशा स्वरुपाच्या चळवळी सुरु झाल्या...मुलनिवासी विरुद्ध परकिय ब्राह्मण असा संघर्ष पेटवण्यात आला. आजही तो आहेच...आणि तो इतका पराकोटीचा द्वेषमुलक आहे कि आर्य सिद्धांताला विरोध म्हणजे "भटाळला" अशा शिव्या खाणे.
१२. आजकाल मायकेल बाम्शाद याचा आधार घेत डी. एन. ए. चाचणीनुसार ब्राह्मण (खरे तर त्याने उच्च जातीय हा शब्द वापरला आहे...ज्यात क्शत्रिय-वैश्य सुद्धा येतात.) हे युरेशियन वंशाचे आहेत असे सांगीतले जात आहे. बामशादचे हे संशोधन २००१ मधील आहे. या निष्कर्षासाठी त्याने ६० नमुने तपासले आहेत असा त्याचा दावा आहे. २००४ मद्धे बाम्शाद काय म्हनतो ते पहा,: The success of many strategies for finding genetic variants that underlie complex traits depends on how genetic variation is distributed among human populations. This realization has intensified the investigation of genetic differences among groups, which are often defined by commonly used racial labels. Some scientists argue that race is an adequate proxy of ancestry, whereas others claim that race belies how genetic variation is apportioned. Resolving this controversy depends on understanding the complicated relationship between race, ancestry and the demographic history of humans. Recent discoveries are helping us to deconstruct this relationship, and provide better guidance to scientists and policy makers.
१३. २००६ साली national Institute of Biologicals या राष्ट्रीय संस्थेने ३२ आदिवासी जमाती आणि ४५ जातीन्चे सर्वेक्षण केले आणि हे सिद्ध केले कि युरोपियन रक्तसंबंध अभावानेच आढळतो.
१४. २००९ साली सेंटर फ़ोर सेल्युलर आणि मोलेक्युलर बायोलोजी (हैद्राबाद) या संस्थेने हार्वर्ड मेडिकल स्कुल इ. अशा तीन अमेरिकन संस्थांच्या सहाय्याने व्यापक सर्वेक्षण केले व त्यांचा निष्कर्ष असा होता कि भारतातील कोणत्याही जातींत जेनेटिक फरक नसुन त्या भारतातीलच मुळच्या आदिम जमातींतुन विकसीत झाल्या आहेत. आर्यन आक्रमण वा घुसखोरीशी काही संबंध नाही.
१५. द्न्यान पुढे जात असते. सिंधु संस्क्रुती उजेडात येण्यापुर्वी भारताचा इतिहास हा फक्त वैदिक काळापर्यंत मागे जात होता. १९२० साली ती उजेडात येताच सारी समिकरणे बदलली. २००१ साली बामशाद याने जे मत निरिक्षण मांडले ते अपुर्या अर्ध-विकसीत साध्नांवरुन. २००९ सालचा रिपोर्ट मात्र काही मडळी लक्षात घ्यायला तयार नाहीत हे स्पष्ट आहे आणि त्यात मुलनिवासीवादीच आहेत असे नव्हे तर आर्य गंडाने बाधीत ब्राह्मणही आहेत.
१६. आर्य सिद्धांताने भारताचे पराकोटीचे वाटोळे केले आहे...आताच त्यापासुन बोध घ्यायला हवा नाहीतर भारतात एक वांशिक तणाव निर्माण होत त्याची परिणती सर्वविनाशात होइल.
मी येथे फार थोडक्यात मुद्दे मांडले आहेत...काही शंका असतील तर विचाराव्यात वा स्वतन्त्र संशोधन करावे. मी त्याचे स्वागतच करेल...पण द्वेषमुलक...फक्त सोयीचे संशोधन स्वीकारणे मला पुर्ण अमान्य आहे हेही क्रुपया लक्षात घ्यावे.