प्रथम आपण "हिंदु" धर्माच्या आधुनिक काळात केल्या गेलेल्या व्यख्या पाहु. या व्याख्या
संबंधीतांच्या मतांचा सारांश आहे...तशी व्याख्या अद्याप कोणीही केलेली नाही.
१. जो वेदप्रामाण्य मानतो, भगवद्गीतेवर श्रद्धा ठेवतो, श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त जीवनयापन करतो त्यास हिंदु म्हणावे." - लो. टिळक
२. जो हिंदुस्थानात रहातो, पुरातन संस्क्रुतीचा अभिमान बाळगतो, अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न पहातो त्यास हिंदु समजावे- गोळवलकर गुरुजी.
३. हिंदु हा धर्म नसुन एक जीवनपद्धती आहे. - सुप्रीम कोर्ट
४. जे जैन, बौद्ध, मुस्लिम, शिख, ख्रिस्चन नाहीत ते सर्व हिंदु समजावेत. (ब्रिटिश राज कालीन व्याख्या.)
वरील व्याख्या पाहिल्या तर खालील गोंधळ निर्माण होतात. प्रथम आपण टिळकांची व्याख्या पाहुयात.
-वेदप्रामाण्य म्हणने ठीक आहे...पण वेद कोणतेही स्माजघटनेचे मार्गदर्शन करत नाही तर वेद म्हणजे यद्न्य प्रसंगी विविध देवतांना केलेया प्रार्थनांचा संग्रह आहे.
-वेद ऐकायला, वाचायला आम्हाला नसली तरी आमच्या पुर्वजांना बंदीच होती. म्हनजे ते आमचे धर्मग्रंथ असु शकत नाहीत.थोदक्यात वेदप्रामाण्य माननारा धर्म आमचा असुच शकत नाही.
-भगवद्गीतेकडे एक तत्वद्न्यान म्हणुन पहाणे ठीक आहे...पण धर्म्गरंथ म्हणुन त्याच्याकडे पहाता येत नाही. गीता नेमकी कोणत्या धर्मियांची निर्मिती आहे तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण संस्क्रुतात असल्याने तोही १३व्या शतकापर्यंत बंदिस्तच होता.
-स्म्रुतीनी वैदिक वर्ग सोडता सार्यांचेच जीवन जनावराच्या पातळीवर नेवुन ठेवल्यामुळे, धार्मिक समानता नाकारल्यामुळे त्यावर वैदिक सोडुन कोणाची कधी श्रद्धा असण्याची शक्यताच नाही.
गोळवलकर गुरुजी जास्त व्यापक वाटतात...वरकरणी. कारण त्यांची व्याख्या मान्य केली कि मुस्लिम, ख्रिस्च्चन, बौद्ध, जैन, शिख हेही आपोआप हिंदु ठरतात. बौद्ध, जैन, शिख हे हिंदुच आहेत असा त्यांचा दावा आहे हेही खरे. पण ते वास्तव नाही. आदिवासींच्या धर्माचे काय? ते आपापला स्वतंत्र धर्म जपत आहेत...त्यांचे हिंदुत्वीकरन ते ख्रिस्तीकरन करण्याचे प्रयत्न होत आहेत. बरे पुरातन संस्क्रुतीचा अभिमान बाळगा तर मग नेमकी कोणाची संस्क्रुती? सिंधु संस्क्रुती, द्रवीड संस्क्रुती कि वैदिक संस्क्रुती? आदिवासी संस्क्रुती (जी खरी पुरातन आहे) कि या सर्व संस्क्रुत्यांतुन जी एक भेसळयुक्त संस्क्रुती निर्माण झाली आहे ती संस्क्रुती?
हिंदु हा धर्म नसुन एक जीवनपद्धती आहे ही सुप्रीम कोर्टाने केलेली व्याख्या अधिक भोंगळ आहे, कारण भारतात प्रत्येक जातीची, समुहाची स्वतंत्र अशी जीवनशैली आहे. त्याला धर्म म्हनायला गेलो तर हिंदु धर्मात असंख्य धर्म आहेत असे मानावे लागेल.
जे इतर धर्मात बसत नाहीत त्यांना हिंदु म्हनने ब्रिटिशांना सोयीचे होते...पण त्याला कोणताही धर्मशास्त्रीय आधार नाही...नव्हता. कारण आदिवासींचे धर्म स्वतंत्र आहेत, देव-देवता-कर्मकांडॆ, श्रद्धा, जीवन-पद्धती स्वतंत्र आहे आणि त्याची स्वतंत्र नोंद ठेवायला हवी होती तसे केले गेलेले नाही.
म्हनजे येथे आपण एका तिठ्यावर येवुन थांबतो. येथे विचार करावा लागतो. प्रथम, धर्म म्हणजे काय हे पाहुयात.
" धर्म म्हनजे सर्वांसाठी समान धर्मग्रंथ, समान कर्मकांड, समान पुजनीय दैवत /दैवते आणि समान धर्माचार असतात त्याला धर्म म्हणावे."
आता बघा भारतात हिंदु म्हनवणार्या धर्मात किती धर्म आहेत:
१. वेदप्रामाण्य मानणारा, स्म्रुती-श्रुती-पुराणोक्त धर्म मानणारा एक वर्ग आहे. या वर्गाची वेदांवर श्रद्धा आहे, वैदिक कर्मकांडे ते फक्त स्वता:साठीच करतात, त्यांची धर्मसंस्कारही पुर्णतया स्वतंत्र आहेत...त्याला आपण वैदिक धर्म म्हणतो. वेदपठण शाळांत आजही वैदिकेतरांना प्रवेश मिळत नाही. या धर्माचे शंकराचार्य फक्त याच धर्मातील लोक असतात...इतरांना ती अनुमतीच नाही...कारण तो स्वतंत्र धर्म आहे आणि त्यात वावगे काही नाही...वावगे एवढेच आहे कि ते स्वता:ला अन्यधर्मियांत घुसडत स्वता:चाही धर्म जतन करत आहेत.
२. वेद-प्रामाण्य नसणारा मुर्तीपुजकांचा आगमिक धर्म. सिंधु संस्क्रुतीपासुन हा धर्म चालत आला असुन तो शैवप्रधान आहे. आगम म्हनजे आधीचा...वेदांना निगम म्हणतात...निगम म्हणजे नंतरचा. हा धर्म, त्याची पुजामय कर्मकांडे ही वैदिकांपेक्षा स्वतंत्र आहेत...वैदिकांना त्यांच्या धर्मानुसार मुर्तीपुजा मान्य नाही...करताही येत नाही. करत असतील तर ती स्वधर्माशी प्रतारणा आहे. मुळात पुजा हा शब्दच वैदिक संस्क्रुत भाषेतील नसुन द्रावीड भाषेतील आहे.
३, समण धर्म: या धर्माचा उदयही सिंधु काळातच झाला. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रहादि मुलभुत सिद्धांतावर आधारित ही स्वतंत्र विचारधारा होती ती पुढे २ धर्मांत बदलली...ते धर्म म्हणजे जैन व बौद्ध.
३. गोंड, मुंड, चेंचु, संथाल अशा हजारो आदिवासी जमाती या देशात लखो वर्षांपासुन रहात आहेत. त्यांच्या धर्मश्रद्धा, दैवते, सामाजिक आचार-विचार, विवाहप्रथा इ. स्वतंत्र आहेत आणि त्यांचा अन्य कोणत्याही सुसंस्क्रुत म्हनवणार्या नागरी धर्माशी काहीही संबंध नाही...
"हिंदु" शब्द स्वीकारणे हेच मुळात अनैतिहासिक आहे. अद्न्यानमुलक आहे.
आधुनिक काळात आमचे व्यवस्थेबाबत डोळे उघडु लागल्याने आणि आमची पाळे-मुळे वैदिक धर्म/संस्क्रुतीशी संबंधीत असणे शक्य नाही हे लक्षात आल्याने मग "आम्ही कोण?" हा अस्तित्वाचा प्रश्न, मुळांचा प्रश्न पडल्याने आमचे डोके आमच्या धडावर ठेवत हा शोध प्रपंच करावा लागला आहे. कोणता धर्म श्रेष्ठ आणि कोणता कनिष्ठ ही चर्चा अभिप्रेत नसुन आम्ही कोण आहोत याचा शोध घेण्याची ही प्रक्रिया आहे.
याचा एकच अर्थ असा कि आमचा धर्म "हिंदु" तर नाहीच नाही...वैदिकही नाही. आमची कर्मकांडे, मुर्तीपुजा, जीवनशैली स्वतंत्र आहे...जीवनश्रद्धा स्वतंत्र आहेत...म्हणुन आमचा धर्मही शैवप्रधान असुन स्वतंत्र आहे. प्रत्येक आदिवासि जमातींचा धर्म स्वतंत्र आहे. सध्या एवढेच.
Saturday, February 19, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
व्रात्य कोण होते?
हा शब्द वैदिक वाड्मयात अनेकदा येतो. सामान्यपणे व्रात्य म्हणजे समण संस्कृतीतील व्रत करणारा तपस्वी असा अर्थ घेतला जातो. जैन धर्मात व्रतांचे ...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...