Saturday, February 19, 2011

मी हिंदु का नाही?

प्रथम आपण "हिंदु" धर्माच्या आधुनिक काळात केल्या गेलेल्या व्यख्या पाहु. या व्याख्या
संबंधीतांच्या मतांचा सारांश आहे...तशी व्याख्या अद्याप कोणीही केलेली नाही.

१. जो वेदप्रामाण्य मानतो, भगवद्गीतेवर श्रद्धा ठेवतो, श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त जीवनयापन करतो त्यास हिंदु म्हणावे." - लो. टिळक
२. जो हिंदुस्थानात रहातो, पुरातन संस्क्रुतीचा अभिमान बाळगतो, अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न पहातो त्यास हिंदु समजावे- गोळवलकर गुरुजी.
३. हिंदु हा धर्म नसुन एक जीवनपद्धती आहे. - सुप्रीम कोर्ट
४. जे जैन, बौद्ध, मुस्लिम, शिख, ख्रिस्चन नाहीत ते सर्व हिंदु समजावेत. (ब्रिटिश राज कालीन व्याख्या.)

वरील व्याख्या पाहिल्या तर खालील गोंधळ निर्माण होतात. प्रथम आपण टिळकांची व्याख्या पाहुयात.
-वेदप्रामाण्य म्हणने ठीक आहे...पण वेद कोणतेही स्माजघटनेचे मार्गदर्शन करत नाही तर वेद म्हणजे यद्न्य प्रसंगी विविध देवतांना केलेया प्रार्थनांचा संग्रह आहे.
-वेद ऐकायला, वाचायला आम्हाला नसली तरी आमच्या पुर्वजांना बंदीच होती. म्हनजे ते आमचे धर्मग्रंथ असु शकत नाहीत.थोदक्यात वेदप्रामाण्य माननारा धर्म आमचा असुच शकत नाही.
-भगवद्गीतेकडे एक तत्वद्न्यान म्हणुन पहाणे ठीक आहे...पण धर्म्गरंथ म्हणुन त्याच्याकडे पहाता येत नाही. गीता नेमकी कोणत्या धर्मियांची निर्मिती आहे तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण संस्क्रुतात असल्याने तोही १३व्या शतकापर्यंत बंदिस्तच होता.
-स्म्रुतीनी वैदिक वर्ग सोडता सार्यांचेच जीवन जनावराच्या पातळीवर नेवुन ठेवल्यामुळे, धार्मिक समानता नाकारल्यामुळे त्यावर वैदिक सोडुन कोणाची कधी श्रद्धा असण्याची शक्यताच नाही.

गोळवलकर गुरुजी जास्त व्यापक वाटतात...वरकरणी. कारण त्यांची व्याख्या मान्य केली कि मुस्लिम, ख्रिस्च्चन, बौद्ध, जैन, शिख हेही आपोआप हिंदु ठरतात. बौद्ध, जैन, शिख हे हिंदुच आहेत असा त्यांचा दावा आहे हेही खरे. पण ते वास्तव नाही. आदिवासींच्या धर्माचे काय? ते आपापला स्वतंत्र धर्म जपत आहेत...त्यांचे हिंदुत्वीकरन ते ख्रिस्तीकरन करण्याचे प्रयत्न होत आहेत. बरे पुरातन संस्क्रुतीचा अभिमान बाळगा तर मग नेमकी कोणाची संस्क्रुती? सिंधु संस्क्रुती, द्रवीड संस्क्रुती कि वैदिक संस्क्रुती? आदिवासी संस्क्रुती (जी खरी पुरातन आहे) कि या सर्व संस्क्रुत्यांतुन जी एक भेसळयुक्त संस्क्रुती निर्माण झाली आहे ती संस्क्रुती?

हिंदु हा धर्म नसुन एक जीवनपद्धती आहे ही सुप्रीम कोर्टाने केलेली व्याख्या अधिक भोंगळ आहे, कारण भारतात प्रत्येक जातीची, समुहाची स्वतंत्र अशी जीवनशैली आहे. त्याला धर्म म्हनायला गेलो तर हिंदु धर्मात असंख्य धर्म आहेत असे मानावे लागेल.

जे इतर धर्मात बसत नाहीत त्यांना हिंदु म्हनने ब्रिटिशांना सोयीचे होते...पण त्याला कोणताही धर्मशास्त्रीय आधार नाही...नव्हता. कारण आदिवासींचे धर्म स्वतंत्र आहेत, देव-देवता-कर्मकांडॆ, श्रद्धा, जीवन-पद्धती स्वतंत्र आहे आणि त्याची स्वतंत्र नोंद ठेवायला हवी होती तसे केले गेलेले नाही.

म्हनजे येथे आपण एका तिठ्यावर येवुन थांबतो. येथे विचार करावा लागतो. प्रथम, धर्म म्हणजे काय हे पाहुयात.

" धर्म म्हनजे सर्वांसाठी समान धर्मग्रंथ, समान कर्मकांड, समान पुजनीय दैवत /दैवते आणि समान धर्माचार असतात त्याला धर्म म्हणावे."

आता बघा भारतात हिंदु म्हनवणार्या धर्मात किती धर्म आहेत:

१. वेदप्रामाण्य मानणारा, स्म्रुती-श्रुती-पुराणोक्त धर्म मानणारा एक वर्ग आहे. या वर्गाची वेदांवर श्रद्धा आहे, वैदिक कर्मकांडे ते फक्त स्वता:साठीच करतात, त्यांची धर्मसंस्कारही पुर्णतया स्वतंत्र आहेत...त्याला आपण वैदिक धर्म म्हणतो. वेदपठण शाळांत आजही वैदिकेतरांना प्रवेश मिळत नाही. या धर्माचे शंकराचार्य फक्त याच धर्मातील लोक असतात...इतरांना ती अनुमतीच नाही...कारण तो स्वतंत्र धर्म आहे आणि त्यात वावगे काही नाही...वावगे एवढेच आहे कि ते स्वता:ला अन्यधर्मियांत घुसडत स्वता:चाही धर्म जतन करत आहेत.
२. वेद-प्रामाण्य नसणारा मुर्तीपुजकांचा आगमिक धर्म. सिंधु संस्क्रुतीपासुन हा धर्म चालत आला असुन तो शैवप्रधान आहे. आगम म्हनजे आधीचा...वेदांना निगम म्हणतात...निगम म्हणजे नंतरचा. हा धर्म, त्याची पुजामय कर्मकांडे ही वैदिकांपेक्षा स्वतंत्र आहेत...वैदिकांना त्यांच्या धर्मानुसार मुर्तीपुजा मान्य नाही...करताही येत नाही. करत असतील तर ती स्वधर्माशी प्रतारणा आहे. मुळात पुजा हा शब्दच वैदिक संस्क्रुत भाषेतील नसुन द्रावीड भाषेतील आहे.
३, समण धर्म: या धर्माचा उदयही सिंधु काळातच झाला. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रहादि मुलभुत सिद्धांतावर आधारित ही स्वतंत्र विचारधारा होती ती पुढे २ धर्मांत बदलली...ते धर्म म्हणजे जैन व बौद्ध.
३. गोंड, मुंड, चेंचु, संथाल अशा हजारो आदिवासी जमाती या देशात लखो वर्षांपासुन रहात आहेत. त्यांच्या धर्मश्रद्धा, दैवते, सामाजिक आचार-विचार, विवाहप्रथा इ. स्वतंत्र आहेत आणि त्यांचा अन्य कोणत्याही सुसंस्क्रुत म्हनवणार्या नागरी धर्माशी काहीही संबंध नाही...

"हिंदु" शब्द स्वीकारणे हेच मुळात अनैतिहासिक आहे. अद्न्यानमुलक आहे.
आधुनिक काळात आमचे व्यवस्थेबाबत डोळे उघडु लागल्याने आणि आमची पाळे-मुळे वैदिक धर्म/संस्क्रुतीशी संबंधीत असणे शक्य नाही हे लक्षात आल्याने मग "आम्ही कोण?" हा अस्तित्वाचा प्रश्न, मुळांचा प्रश्न पडल्याने आमचे डोके आमच्या धडावर ठेवत हा शोध प्रपंच करावा लागला आहे. कोणता धर्म श्रेष्ठ आणि कोणता कनिष्ठ ही चर्चा अभिप्रेत नसुन आम्ही कोण आहोत याचा शोध घेण्याची ही प्रक्रिया आहे.

याचा एकच अर्थ असा कि आमचा धर्म "हिंदु" तर नाहीच नाही...वैदिकही नाही. आमची कर्मकांडे, मुर्तीपुजा, जीवनशैली स्वतंत्र आहे...जीवनश्रद्धा स्वतंत्र आहेत...म्हणुन आमचा धर्मही शैवप्रधान असुन स्वतंत्र आहे. प्रत्येक आदिवासि जमातींचा धर्म स्वतंत्र आहे. सध्या एवढेच.

24 comments:

  1. sanjayji apli mandni chyan aahe!pratekachi jivanshaili jivanshradha veglya aahet.ami khare dharmik aahot ka he jast mahatwache.

    ReplyDelete
  2. सर,
    ये रही................. एक लोहार की.

    काय मांडणी केलित राव. हे हिंदु म्हणुन मिरविणा-यांसाठी बेतोड उत्तर आहे.

    ReplyDelete
  3. Sir mi ek bhartmuktiwalya mitrachi fb profile pahili. Kay ashcharya ki tyacha dharm thik HINDU aahe. Ani vishesh mhanje, SAMBHAJI BRIGRD walyancha ek pustak aahe HNDU NAVACHA DHARMACH ASTITWAT NAHI. Kiti ha virodhabhas

    ReplyDelete
  4. ही सत्यशोधनाची प्रक्रिया आहे. मी हिंदु ठरु शकत नाही आणि त्याचवेळीस असंख्य अन्य (कदाचित आपणही) "हिंदु" नसतानाही केवळ अद्न्यानाने स्वता:ला "हिंदु" समजत असतील तर त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवुन त्यांना विचारप्रयुक्त करण्यासाठी ते ब्लोगवर टाकले आहे. यामद्धे कोणाहीबद्दल द्वेषाची भुमिका नाही हे आपल्या लेख वाचुन लक्षात आले असेलच. हिंदु म्हणवणार्या धर्मात समता का नाही याचे उत्तर सोपे आहे...कारण या धर्म नाव्मक संघटनेतच अनेक धर्म आहेत...मग समानता अपेक्षिता येतच नाही. किंबहुना तशी अपेक्षाच चुकीची आहे हेच मला सर्वांना स्पष्ट करावयाचे आहे. अपेक्षा नसेल तर आजकाल उच्च-वर्णीयांविरुद्ध जी द्वेषमोहीम राबवली जात आहे तिचे कारणच उरत नाही. ज्याने-त्याने आपापला धर्म खुशाल पाळावा...त्यात कोणी आडकाठी उपस्थित करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आपसी संबंधांवर परीणाम होण्याचे काही-एक कारण नाही. हे एक प्रबोधनाचे काम आहे. स्वता:ची पाळेमुळे शोधण्याची प्रक्रिया आहे आणि हेच मी लेखातही स्पष्ट केले आहे. आणि त्यात्न साध्य काय होणार तर सारेच आपापली पाळेमुळे शोधु लागतील.

    ReplyDelete
  5. >> ...वावगे एवढेच आहे कि ते स्वता:ला अन्यधर्मियांत घुसडत स्वता:चाही धर्म जतन करत आहेत. << ... that's right ! and they say, "Hindu dharm mhanaje Vaidic Dharm !" this is totally false.

    ReplyDelete
  6. Sanjay Sir,
    Can you please translate this in Hindi or English. I feel this is the good one but can not understand it fully. The translation will really be helpful.

    ReplyDelete
  7. बहुत बढ़िया ! धन्यवाद !

    ReplyDelete
  8. The following is an accurate list of Indian religions often wrongly confounded under the term `Hinduism'. The colloquial English term is first, with the technically correct English term in round brackets, followed by the colloquial Sanskrit terminology in triangular brackets, and the technically correct Sanskrit term in square brackets at the end.

    A) Brahmanism ( Brahmanism, `Hinduism' ) < Brahmana Dharma > [ astika brahmana dharma , sanatana dharma ]
    1. Vedanta
    * Sri-Vaishnavism < "Sri-Vaishnava sampradaaya" > [ Vishisht Advaita Vedanta ]
    # Tengalai (Southern; Tamil)
    # Vengalai (Northern; Sanskrit)
    * Madhva Vaishnavism < "Maadhva sampradaaya" > [ Dvaita Vedanta ]
    * Bengali Vaishnavism < "Gaudiya-Vaishnava sampradaaya" > [ Bheda-bheda Vedanta ]
    # Mahapurushiya Sect Assam
    # ISKCON (International Society for Krishan Consciousness)
    * West Indian or Gujarati Vaishnavism < "Vallabha sampradaaya" > [ Shuddh Advaita ]
    * Smartism ( Smarta Pantheism ) < Smaarta sampradaaya > [ Advaita Vedanta ]
    2) Yoga
    3) Mimamsa ( Vedist Ritualism )
    4) Samkhya ( Brahmanic Analytical Atheism )
    5) Nyaya ( Logical Theism )
    6) Vaisheshika ( Atomic Naturalism )

    B) Sudra Religion ( Shaivism ) < Shaiva Dharma > [ Shaiva Dharma ]
    1) Dravidian Shaivism Proper
    * Old Dravidian Shaivism ( Adishaivism ) [ adisaivar ]
    * Tamil Shaivism < Shaiva Siddhanta > [ saiva siddhanta dharma ]
    * Kannada Shaivism < Lingayat Shaivism > [ virasaiva dharma ]
    2) Chandalla Shaivism (Dalits & Adivasis)
    * Gond Religion
    * Bhil Religion
    3) Kol Shaivism ( Kolarian Religions ) < kol shaivar >
    * Munda Religion
    * Santal Religion
    * Kaul Shaktism
    * Others
    C) Sramanism ( Sramanic Heterodoxies ) < nastika sramana dharam >
    1) Buddhism [ bauddhas ]
    2) Jainism [ jainas ]
    3) Carvaks or Materialists [ carvakas ]
    4) Shaktism [ shaktas ]
    * Right-Handed ( "Daskhinachari")
    * Left-Handed (" Bamachari" )
    * Kowls or Extreme Shaktas : cf. Kolarian Religion
    5) Rajput Religion ( Rajput Solar Religion ) < Saura Dharma >
    6) Tantrism ( Tibetic Tantric Religions ) < Tantra >
    * Bon or Old Tibetan Religion
    * Kashmir Shaivism
    * Lamaism


    It is hence evident that Hinduism consists of different religions. The fallacious concept of `One Hindu Religion' is entirely baseless and arises from ulterior motives desiring to suppress non-Vaishnava faiths.

    ReplyDelete
  9. very good sanjayaji, I am with you. The poor people of india has been mis-guided by so called religious leaders/ brahmans who kept everybody away from the so called Dhrma/Dhrmagranth. We have not learned from our past and still belive in various castes and creeds. my blame is on brahamans as well as those hardliner Sambhaji-brigade marathaas, so called Dalits(who want every facility based on caste), muslims (who live in this country and consider themselves attached to those brainless islamic fundamentalists).
    वोह सुबह कभी तो आएगी जब हम सिर्फ भारतीय होंगे, ना की हिन्दू मुस्लिम सिख इसाई बौद्ध.

    ReplyDelete
  10. Mastach Sir, Mi aajpasun tumacha fan zaloy. Maze vichar tumachya vicharashi purnpane julatat.

    asech lihit raha.

    ReplyDelete
  11. aadarniy sonawani ji
    ek vichar mandayacha prayatna karato ...
    ( with ref of wiki )
    The word Hindu is the Persian name of the Indus River (Sanskrit Sindhu) in the northwestern part of the Indian subcontinent.[3] The Persian term was further loaned into Arabic as al-Hind referring to the land of the people who live across river Indus,
    tar HINDU ha shabd dharm vachak nasun to sthan vachak aahe ase mhatle tar kahi chuk hoil kay ?

    ReplyDelete
  12. tribal religion are totally different but there is lack of writing on it .thank u for tacking initiative

    ReplyDelete
  13. Nicelly articulated. But you should have given some touch to the birth of "HINDU" name.

    ReplyDelete
  14. Hindu is corrupt form of Sindhu. The people residing in the basin of Sindhu river were called Hindi (Iranians /persians pronounce H for S. So this was a regional name and not of religion. All people were refered as Hindu's.

    ReplyDelete
  15. Well, Sanjay, suddenly in between you start speaking the RSS language and then everything you said earlier becomes zero. I give you a chance to again tell us the birth of the name Hindu. I hope this time you will research better.

    ReplyDelete
  16. Neo, this is not RSS language. Another meaning is "Slave" as per persian dictionery. But this meaning was derived during Islamic slavery Originally it couldn't have been the same meaning. If you have some more references I would welcome.

    ReplyDelete
  17. Hi Sanjay,

    Below is a good research done by Baldev Singh. Please find the complete article link below.

    "It is preposterous for anyone to suggest that Persians could not pronounce the word “Sindhu.” In the Persian-Punjabi Dictionary there are about 58 pages of words that start with “S“ and “SH” in contrast to 33 of “H” words. In Punjabi language there are many Persian words of “S” and “SH” sounds. Moreover, the claim that the Persians pronounced “Sindhu” as “Hindu” or called the river and people who lived around it as “Hindu” does not explain why the river or the people who lived around it did not acquire the name “Hindu.” This river is still called Sindh and the people are called Punjabis and Sindhis. Nobody calls the state of Sindh as Hind or Sindhis as Hindis.

    http://www.sikhspectrum.com/072008/hindu.htm

    ReplyDelete
  18. Dear Fiend, you are forgetting Sapta sindhu" is called "hapt Hindu" in Avesta and "Indus" in Indiaca...a book by a Greek Traveller.

    ReplyDelete
  19. Indus may be Indiaca and there is no problem with it...Give me more concrete references of the word Hindu in whicht Avesta? and how relevant it is in naming a whole set of people? It obviously seems that you have not read through the link that I gave above.

    ReplyDelete
  20. हिंदू शब्दाचा सत्य इतिहास..........

    हिंदू हा मराठी शब्द नाही,
    हिंदी पण नाही,
    संस्कृत पण नाही,
    इंग्रजी पण नाही
    मागधी, पाली पण नाही, तसेच
    हा शब्द भारतीय सुध्दा नाही..

    तो शब्द "परशियन" "फारशी" शब्द आहे..

    इ.स १२ व्या शतकात मोघल जेव्हा भारतात आले. त्यांची बोली भाषा व लेखणी 'परशियन' 'फारशी' होती.
    भारतात येऊन जेव्हा भारतीयांना, भारतातल्या लोकांना हरवले तेव्हा त्यांनी हरलेल्या लोकांना हरविलेल्या लोकांना "हिंदू" हि तुच्छास्पद शिवी घातली. तेव्हा पासून "हिंदू" शब्द प्रचलित झाला.

    { भारतात कलकत्ता येथे मोठी लायब्ररी मध्ये परशियन डिक्शनरी (फीरोजुल्लगात) आहे त्यात हिंदू शब्दाचा अर्थ तुम्ही सुद्धा बघू शकता.}

    (हिंदू शब्दाची समीक्षा :- परशियन डिक्शनरी मधल्या हिंदू शब्दाचा अर्थ
    हिनदू = गुलाम, चोर, घानेरडा, काल्या तोंडाचा.
    हिंदू हा शब्द दोन शब्दाचा बनलेला नसून तिन शब्दाचा {हि+न+दू} असा आहे त्याचा अपभ्रष होऊन दोन शब्दी हिंदू असा झाला आहे.)

    दयानंद सरस्वती स्वतः १८७५ ला मान्य करताे व त्याच्या "सत्यार्थ प्रकाश" ह्या पुस्तकात 'हिंदू हि मोघलांनी दिलेली शिवी आहे' असे नमुद करताे..

    शिवाय तो हिंदू समाज स्थापन न करता, "आर्य समाज" स्थापन करतो.

    नंतर हिंदू पासून 'हिंदूस्थान' मोघलांनीच केला..

    (हिंदुस्तान :-
    हिन =म्हणजे तुच्छ, दलिद्र, घाणेरडा.
    दून= म्हणजे लोक, प्रजा, जनता..
    स्तान (स्थान)= म्हणजे ठिकाण , जागा..)

    "भारत" कधीही 'हिंदूस्थान' नव्हता आणि नाही.

    इ.स १२ व्या शतका आगोदर हिंदू शब्द कोणत्याही ग्रंथात, बोलण्यात किंवा लिहीण्यात आलेला नाही, म्हणून तर खाली दिलेले
    (ब्राह्मणी ग्रंथ - रामायण, महाभारत, उपनिषध, भगवत गीता, ज्ञानेश्वरी, श्रृति, स्मृति, मनुस्मृति, दासबोध,
    ४ वेद, १८ पुरान, ६४ शास्त्र किंवा बहुजन संतांच्या अभंग वाणीत, गाथेत, दोहात, भारूडात कशातच "हिंदू" हा शब्द सापडत नाही)

    इतिहास तपासून घ्यावा. किंवा बरोबर असेल तो सांगावा.

    "हिंदू" हा शब्द या भारत देशाला किंवा प्रचलित धर्माला मोघलांनी दिला, आणि ब्राह्मण आपल्याला सांगत असतो "गर्व से कहो हम हिंदू है"

    दयानंद सरस्वती स्वतः १८७५ ला मान्य करताे व त्याच्या "सत्यार्थ प्रकाश" ह्या पुस्तकात 'हिंदू हि मोघलांनी दिलेली संज्ञा आहे' असे नमुद करताे..
    शिवाय तो हिंदू समाज स्थापन न करता, "आर्य समाज" स्थापन करतो.

    ReplyDelete
  21. हिंदू शब्द जर सिंधू शब्दाचा अपभ्रंश असेल तर सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे व्यक्ती पंजाबी अथवा सिंधी असे म्हटले जातात, त्यांना हिंदू हे नाव का प्राप्त झालेले नाही? पर्शियन लोकांना सिंधू उच्चारण्यात अडचण येत होती हे प्रमेय आधारहीन व हास्यास्पद आहे. उदा. पर्शियन जे शिया मुस्लिम आहेत ते शिया, सुन्नी व शरियत हे शब्द कसे उच्चारतात? पंजाबी भाषेत बरेच पर्शियन शब्द आहेत ते ज्यांची सुरुवात 'स' किंवा 'श' पासून होते. उदा. सरदार, शहीद, शेर इ. पंजाब हा शब्द सुद्धा पर्शियन शब्द पांच आणि आबा (पाच पाणी) पासून तयार झाला आहे.
    याच बाबीचा पुनरुच्चार मुद्रारक्षक यांनी धर्मग्रंथोन्का पुनर्रपाठ या ग्रंथात याप्रकारे केला, "इतिहासकारोंने कहा की चूंकि फारस के लोग 'स' को 'ह' बोलते थे, इसलिये उन्होंने सिंधू को हिंदू कहा और यहां रहने वालोंको हिंदू कहना सुरू कर दिया. यह विचित्र तर्क था. ईराण के लोग अपनी भाषा को फारसी कहते रहे, फारही कभी नहीं कहा, सुलतान बोलते थे हुलतान नहीं, पर सिंध को उच्चारित नहीं कर शकते थे, यह अविश्वसनीय हैं. विजेता अक्सर विजित समुदाय को निंदनीय मानता हैं और घोषित करता हैं. मुसलमान ने भी भारत को जीतकर यही किया. हर विजेता की तरह वह भी भारत के विजित लोगों को हेच समजता और बताता था. उसने भारत में रहने वालों को इसीलिये हिंदू कहा. फारसी में हिंदू का अर्थ होता हैं काला, माशूक के चेहरे का तिल, चोर, लुटेरा या गुलाम. ये अर्थ फीरोजुल्लगात नामक विख्यात शब्दकोश में हैं. पर यह विचित्र इत्तफाक है और ऐसा शायद ही किसी दूसरी संस्कृति में हुआ हो कि पराजित कौम ने अपने लिये विजेताओ दवारा प्रयुक्त की गई एक अपमानजनक संज्ञा को गौरव के साथ स्वीकार कर लिया हो. भारत में यह हो गया."

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...