इसवी सनाच्या पहिल्या शतकातील गाथा सप्तशती मधील अप्रतिम गाथा लिहिणा-या कवयित्री-
१. रेवा
२. प्रहता 
३. आंध्रलक्ष्मी
५. शशिप्रभा
६. मृगांकलक्ष्मी
७. रेखा
८. गिरिसुता
९. झेज्झा
१०. रेहा
११. कुरंगी
१२. कुब्जरंगी 
(आणि अजून किमान १६)
(“या गाथासप्तशतीतील गाथा ग्रामीण कबीनी ग्रामीणांसाठी लिहिल्या आहेत....गाथा सप्तशतीत ब्राह्मनांचा उल्लेख कोठेही आलेला नाही.....त्यावेळी ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र या वर्गाचा वा वर्णाचा गाथा सप्तशतीमध्ये मागमूसही आढळत नाही. समाजात व्यवसाय आहेत पण त्याचे जातीत वर्गीकरण झालेले नाही.....आर्य संस्कृतीचा मुलाधार मानलेल्या यज्ञसंस्थेची येथे हेटाळनी केलेली आहे....कदाचित ब्राह्मण सातवाहनांच्या राज्यात अत्यल्प असावेत...- स. आ. जोगळेकर, गाथा सप्तशतीच्या प्रस्तावनेत.) 
पुरुष व स्त्रीयांना हजारो वर्ष शिक्षण नाकारले गेले हा एक लाडका आरोप असतो. स्त्रियाही नुसते लिहू-वाचू शकत नव्हत्या तर काव्य लिहून आपल्या प्रतिभेचे दर्शन देत होत्या. ही परंपरा पुढेही सुरु राहिली. ती डोळ्यांसमोर असूनही तिकडे दुर्लक्ष करून चळवळीच्या सोयीसाठी न्युनगंडात्मक सामाजिक सिद्धांत बनवणे आणि प्रचारित करणे हा एक सामाजिक गुन्हा नाही काय?