Sunday, February 6, 2011

पुसु नको कधी मला

पुसु नको कधी मला
हे का असे ते का तसे...?
पण जगत जा...जगत जा..
जगात या जमेल तसे!

जे कळे ना तुला
ते मला कळेल कसे?
फक्त जीवनगीत ते
लावी हृदयाला पिसे!

मृत्यूस जे न माहिती
जीवनासही अगम्य जे
ते गूढ गीत गऊनी
कोणास तू समजाविते?

ये जरा विसाव अता
या विनम्र सृष्टीसोबती
असू अशा एकांती कि
वेदना जिथे विसावती!

घेवुनी जीवन हाती तू
मृत्युसही हुलकाविते
घेवून वेदना मिठीत तू
मज क्षितीज दूरचे दावते

पण पुसू नको जे अगम्य ते
पुसूही नको जे गम्य ते
कि गम्य मी जिथे असे
अगम्यही होतो तिथे

त्या व्यर्थ सा-या वेदना
त्या व्यर्थ सा-या वंचना
घनतिमिर ओलांडूनी ये
तव प्रकाश माझ्या अंगना

पण पुसू नको मला कधी
इथेच का...तिथेच का?
हे असेच का ते तसेच का?
हे अश्रू का ते हास्य का?
अन तुझाच तेवता असा
तो मंद स्नेहल प्रकाश का?

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...