Wednesday, May 25, 2011

आता श्वानांमागोमाग प्राण्यांवरही संक्रांत!

अखिल विश्व श्वान संघटनेच्या पदाधिका-यांच्या तातडीच्या बैठकीनंतर त्याला जी अचाट प्रसिद्धी मिळाली त्यामुळे अन्य प्राणि-पक्षीजमात अस्वस्थ झाली. त्यांनीही अरण्यात आपासातील वैर-शत्रुत्व विसरून आपापल्या प्रतिनिधींची तातडीची बैठक भरवली. या परिषदेवर चिंतेचे आमाप सावट होते. प्रत्येक प्राणीजातीला आपापल्या भुमिका मांडायची संधी देण्यात आली. यात प्रामुख्याने बैल, उंदीर, गरुड, वाघ, सिंह, सर्प, हत्ती, मोर या प्राण्यांनी आपापल्या भीत्या व्यक्त केल्या. त्याचा थोडक्यात सारांश असा:

मानवी जमातीने प्राणी जगतावर सुड उगविण्याचे ठरवले दिसते आहे. आजवर उंदीर सुखनैव गणेशासोबत तर मोर कार्तिकेयाचे वाहन म्हणुन नांदत होता. वाघ-सिंह हे तर जगदंबेची वाहने. नंदी हे शिवाचे वाहन व त्याला शिवपिंडीसमोर नित्यादराचे स्थान. सर्पाचे शिवगळ्यात प्रिय स्थान. विष्णुची शय्या बनण्याचा मान शेष नागाला. त्याचे वाहन गरुड...हत्तीला सर्व मंदिर-शिल्पांत महत्वाचे स्थान. पण आता श्वानांमागोमाग या प्राण्यांवरही संक्रांत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे व त्यांची शिल्पे हटवण्यात येतील अशी भीति व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही देवचरित्त्रात मुळात एकाही प्राण्याचे स्थान नाही. ज्या पुराणांत हे प्राणी दैवत-जीवनात घुसवण्यात आले आहेत ती धादांत खोटी असून इतिहासाची मोडतोड आहे आणि ती त्या-त्या मुळच्या बहुजनीय दैवतांना बदनाम करण्यासाठी ब्राह्मणांनी घुसवली आहेत, त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय मानवी संघटनांनी घेतला आहे आणि त्यांचा निषेध करत आहोत असा ठराव शेवटी पारित करण्यात आला.

परंतू हा ठराव नेमका कोणाकडॆ पाठवावा आणि कोणामार्फत पाठवावा यावरचा निर्णय अद्याप झालेला नाही असे कळते.

ताजी बातमी: आताच हाती आलेल्या बातमीनुसार प्राणीजगताने आपापल्या संन्निध दैवतांनाच गार्हाणे घालायचे ठरवले पण आजकाल ही दैवतेही कोठे राहतात याबद्दल ते अनभिद्न्य असल्याने मिटल्या डोळ्याने इतिहासाचे शुद्धीकरण पाहण्याचा निर्णय झाला आहे.

2 comments:

  1. देवचरित्त्रात गाड़वाना स्थान नाही हे गाड़वानचे नशिबाच म्हणावे लागेल आणि देवचरित्त्रात गाड़वाना स्थान न दिल्याबद्दल गाडवाणी ब्राह्मणांचे आभार मानले पाहिजेत. नाहीतर गाड़वा वर संक्रांत आली असती हे निश्चित..........

    ReplyDelete
  2. निषेध असो ... आत्ता खरी भीती मायावतीला आहे. हत्तीचे एवढे पुतळे उभारलेत बघू काय होतेय. संभाजी ब्रिगेड मुळात एक पुरोगामी संघडना आहे. आणि तिचे कामही मस्त चालू होते. दादू ला हटवून बुद्धिभेद करमार्‍यांच्या थोबाडीत सणसणीत चपराक हाणणारी देखील ब्रिगेडच होती. माझी नम्र विनंती आहे प्रविणदादा प्लीज आत्ता काही तोडफोड करू नका .. तुमच्याकडे विधायक कार्य करण्याची अफाट शक्ती आहे. पुन्हा पहिल्यासारखे होउया.. आणि त्रयस्थ पद्धतीने इतिहासाचे शुद्धीकरण करूया ...

    ReplyDelete