Saturday, May 28, 2011

दलितांना वापरून घ्यायचे...

दलितांना वापरून घ्यायचे...उपयोग संपला कि चुरगाळुन फेकुन द्यायचे हा पुरातन अमानुष धंदा आजही सुरू आहे. सध्य:स्थितितील राजकारणातही त्याचे प्रतिबिंब आपण पाहू शकतो. या भोळ्या-भाबड्या, सामाजिक स्तरावर आजही समता नाकारलेल्यांना अजून संभ्रमीत करणा-या वर्गावर कोणी हिंदुत्ववादाचे गोमुत्र शिंपू पहातो तर कोणी बुद्धाचेच हिंदुत्वीकरण करतो.. आणि या शोषित घटकाचे विखंडीकरण, बुद्धीभेद आणि करुणेचा आव आणत दोस्ती करू इछ्छितो....तीही स्वस्वार्थासाठी...हाच एक निषेधार्ह भाग आहे या कथित हिंदुत्ववादी नव-तत्वद्न्यानाचा. कारण त्यामागे जणु काही आपण त्यांच्यावर फार मोठे उपकार करत आहोत ही छुपी का होईना भावना असते....आणि स्वयंघोषित करूणामयतेचे जीवंत पुतळे असे दाखवण्यात धन्यता वाटते. मुस्लिमांबरोबरच्या (त्यांच्या धर्मांतरापुर्वीच्या जाती माहित नसता...) इफ़्तार पार्ट्या जोषात येतात...पण दलित वस्त्यांवर जावून दलितांसोबत दोन घास खाणारे या देशात अति-अपवादात्मक असावेत हा विरोधाभास नाही का?

आठवले यांना हिंदुत्ववादी पक्ष-संघटनांचा आधार घ्यावा वाटावा यामागे आठवलेंचे स्वार्थ आहेत कि हिंदुत्ववाद्यांचे याचे विश्लेषन करावेच लागेल. वर्चस्वतावाद हा हिंदुत्ववाद्यांचा प्राण आहे. दलितांना आजही पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व नाही. ते द्यावे असा कोणत्याही...अगदी निधर्मी म्हनवणा-या पक्षांचाही इरादा नाही. यात दलित नेत्रुत्वाची ससेहोलपट होत आहे आणि दलित समाज दिवसेंदिवस दिग्भ्रमित केला जात आहे आणि असेच व्हावे असा या सर्वांचा इरादा स्पष्ट दिसतो आहे. दलितांत जेवढ्या फुटी पडतील तेवढ्या यांना हव्याच आहेत कारण दलित ऐक्य नावाची बाब आस्तित्वातच येवू नये अशी ही खेळी आहे...आणि त्यातुन दलित नेत्रुत्वही दिग्भ्रमित करण्यात या वर्चस्ववादी पक्षांना-संघटनांना यश लाभत आहे...

माझ्या मते...राजकीय सत्ता कि सामाजिक सत्ता यात दलित नेत्रुत्वांना-दलितांना सुयोग्य निवड करावी लागणार आहे. माझ्या मते सामाजिक सत्ता हा दलितांचा पहिला अधिकार आहे. धर्म कोणता निवडायचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे, पण शोषित-वंचित म्हणुन सर्वांची अभेद्य एकता आणि त्यावर मात करत हजारो वर्ष गमावलेली द्न्यानात्मक आणि समतात्मक सत्ता पुन्हा प्राप्त करणे हेच एकमेव ध्येय असायला हवे.

मला जाणीव आहे कि माझे कोट्यावधी दलित बांधव या विलक्षण संक्रमणातून जात आहेत आणि ते दिव्य यशे प्राप्तही करत आहेत. पराकोटीचा अन्याय होवूनही शस्त्रे उचलण्याचा वेडेप्णा त्यांनी कधीही, हजारो कारणे असतांनाही, केला नाही यातच त्यांनी मानवतेची महनीय मुल्ये किती जपली याचे सार आले. बाबासाहेबांनी जो मार्ग आखुन दिला त्याचे अनुसरण सर्वांनी केले. वेद-ब्राह्मणे, रामायण-महाभारताने...पुराणांनी सांगितलेल्या मार्गांवर लाथ मारत अहिंसेचे...समतेचे मानवतावादी तत्वद्न्यान स्वीकारत अन्यायी...न्रुशंस अशा व्यवस्थेला जाळा-कापा अशी भाषा न करता स्वत:चे मार्ग शोधले याबद्दल अखिल मानवतावादी आपल्याबद्दल क्रुतद्न्य आहेत...असायलाच हवे. नाहीतर ते आज हे वाचायलाही जीवंत नसते. जे सहज मिळते त्यअचे कौतुक नसते. आज या देशाला शांती मिळाली आहे ती केवळ सर्व शोषितांनी शस्त्र नव्हे तर शांती हे तत्वद्न्यान अंगिकारल्यामुळे. सारी मानवजात क्रुतद्न्यच असायला हवी.....

1 comment:

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...