Sunday, June 12, 2011

वाघ्याचे स्मारक...इतिहास आणि समाज!

(This article is published verbatim in daily Lokmat, all editions on 12th June 2011.)

http://epaper.lokmat.com/ArticleText.aspx?article=12_06_2011_006_001&mode=1


इमानी, रक्षक मानल्या गेलेल्या एका कुत्र्याचे स्मारक हे एका संघर्षाचे कारण बनु शकेल असे कोणालाही वाटले नसते पण ते तसे झाले आहे खरे. संभाजी ब्रिगेडने ६ जुनपुर्वी शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवले नाही तर ते आम्ही उद्द्वस्त करू असा इशारा दिला अणि एरवी राखणासाठी कुत्रे पाळण्याची सवय असलेल्या मराठी समाजाला वाघ्याच्याच स्मारकाच्या रक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला जाण्याची घटना पहावी लागली. का तर ब्रिगेडी इतिहासकारांचे दावे!

काय होते हे दावे? तर दावा १) शिवचरित्रात कोणत्याही कुत्र्याचे स्थान नाही, तसे लिखित पुरावे नाहीत. २) वाघ्या कुत्रा हा नाटककार राम गणेश गडकरींच्या कल्पनेतुन निर्माण झालेले पात्र असून त्यांनी राजसंन्यास या त्यांच्या अपुर्ण नाटकाच्या प्रस्तावनेत त्याचा प्रथम उल्लेख केला आहे. ही गडकरींची विक्रुती आहे. ३. शिवस्मारकासमोरील ज्या चौथ-यावर वाघ्याचा पुतळा बसवला गेला आहे तेथे सईबाई, पुतळाबाई वा सोयराबाईंची मुळ समाधी असली पाहिजे. त्यांचा अवमान करण्यासाठी ब्राह्मणांनी (म्हणजे श्री. न.चिं.केळकरादि) मुद्दाम तेथे कुत्र्याला आणले. ४. वाघ्या कुत्रा हा विलायती कुत्र्यासारखा दिसतो म्हणुन तो शिवकालीन असू शकत नाही. ५. वाघ्या या कुत्र्याचे स्मारक असलेच तर ते शिवरायांच्या स्मारकापेक्षा छोटे असायला हवे होते, पण प्रत्यक्षात ते शिवरायांच्या स्मारकापेक्षा उंच आहे, सबब हा जाणीवपुर्वक केला गेलेला शिवरायांचा अवमान आहे. हे सारे मुद्दे लक्षात घेता हे वाघ्याचे स्मारक हटवणे आवश्यक आहे, ते न हटवले गेल्यास संभाजी ब्रिगेड आपल्या "पद्धतीने" ते उद्ध्वस्त करेल असा इशारा दिला गेला. त्यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एक नवे वादळ उठले.

येथे या वादळांत वा विवादांत न जाता, मी व माझे मित्र श्री. हरी नरके यांनी या संदर्भात सखोल संशोधन करून जे पुरावे मिळवले ते सर्वच ब्रिगेडी दाव्यांना धुडकावून लावणारे आहेत हे सिद्ध केले. शिवचरित्रात वाघ्या कुत्राचे स्थान नाही हा दावा निखालस खोटा असल्याचेही पुढे सामोरे आले. एवढेच नव्हे तर या स्मारकासाठी व शिवस्मारकासाठीसुद्धा मुळात सवाई तुकोजीमहाराज होळकर यांनी देणगी दिली असल्याने, हे स्मारक हटवणे हा होळकरांचा व पर्यायाने धनगर समाजाचा अवमान असल्याचे सत्य पुढे आल्याने धनगर समाजही अस्वस्थ झाला व श्री महादेव जानकर यांनी संभाजी ब्रिगेडला त्यांच्याच भाषेत इषारा दिला. शेवटी ब्रिगेडने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. कदाचित ब्रिगेडला मिळालेला हा पहिलाच घरचा आहेर असावा.

पुरावे सांगतात कि, सईबाईंची समाधी ही राजगडावर आहे, म्हणजे ती रायगडावर असू शकत नाही. कारण त्यांचा म्रुत्यु सन १६५९ मद्ध्ये झाला होता. आजही त्यांचे स्मारक राजगडावर आहे. वाघ्याचे स्मारक जेथे आहे तेथे पुतळाबाईंची समाधी असू शकत नाही कारण सतीची समाधी बांधण्याचा मुळात प्रघात नाही. त्यांची सती-स्मारक शीला रायगडावर आजही अस्तित्वात आहे. सोयराबाईंचे ते स्मारक असल्याचा कसलाही पुरावा आस्तित्वात नाही. मुळात सोयराबाईंचा म्रुत्यु कसा आणि कधी झाला याबद्दल इतिहासात मतैक्य नाही.

राहिला प्रश्न वाघ्याचा. तो इतिहासात होता कि नाही याचा. वाघ्या ही एक दंतकथा आहे असे मानण्याकडे कल आहे. कै. राम गणेश गडकरींनी आपल्या राजसंन्यास या नाटकाच्या प्रस्तावनेत त्याचा उल्लेख केला आहे व ती दंतकथा आजही वाघ्याच्या स्मारकावर कोरलेली आहे. पण राजसंन्यासपुर्वीच १९०५ साली "महाराष्ट्रातील किल्ले" या पुस्तकात श्री. चिं. ग. गोगटे यांनीही वाघ्याची दंतकथा नोंदलेली आहे. त्यात महाराजांची पालखी परततांना मोकळी जात असलेले पाहुन वाघ्याने अस्वस्थ होवून जळत्या चीतेत उडीघेवून प्राणार्पण केले असे नोंदलेले आहे. म्हणजे त्यांनीही वाघ्याची दंतकथा कोठे तरी ऐकलेली होती. दंतकथा म्हणजे इतिहास नव्हे असे मानले तरी दंतकथांना सत्याचा काहीएक तरी आधार हा असतोच. लोकस्म्रुती या पीढ्यानुपीड्या इतिहास संक्रमित करत राहतात. कालौघात त्यात अतिशयोक्तीही होत जाते. रामायण-महाभारतातही अशी अतिशयोक्ति आपण पाहू शकतो. ही अतिशयोक्ति वगळुन इतिहास पहाता येवू शकतो. म्हणजे वाघ्या नव्हताच असे म्हनता येणे अशक्यप्राय होते. भले त्याने चीतेत उडी घेतली नसेल...

पण इतिहास असा सहजी हुलकावण्या देत नाही. छ. शिवाजी महाराजांच्या जीवनात कुत्रा होता याचा पुरावा त्यांच्याच हयातीत कोरल्या गेलेल्या एका शिल्पात उपलब्ध झाला. त्याची हकीगत अशी: सन १६७८ मद्धे महाराजांनी दक्षीण दिग्विजय करुन परततांना कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी या छोट्या गढीस वेढा घातला होता. तिथला ठाणेदार येसाजी देसाई मराठ्यांकडुन मारला गेला. पण त्याची पत्नी मल्लाबाईने हार न मानता युद्ध सुरुच ठेवले. यात शेवटी तिला तह करावा लागला, पण शिवरायांनी तिचे राज्य तिच्या मुलाच्या दुधभातासाठी परत दिले आणि पतीच्या म्रुत्युनंतरही ती लढली म्हणुन तिला सावित्रीबाई हा किताब दिला.

ही आठवण कायमस्वरुपी रहावी म्हणुन सावित्रीबाईंनी शिवरायांची अनेक पाषाणशिल्पे बनवली. त्यांत वरील भागात शिवराय अश्वारोही असून दोन मावळे अब्दागि-या घेवून आहेत तर एक कुत्रा त्यांच्या बाजुनेच झेपावत निघालेला आहे.

हे शिल्प बोलके आहे. शिवरायांच्या जीवनात कुत्रा होता, तो त्यांना प्रिय होता हे उघड आहे. अन्यथा त्याचे त्या छोट्या शिल्पात स्थान असण्याचे कारण नव्हते.

शेवटी असे कि, मुळात शिवरायांच्या स्मारकाकडे लक्ष द्यायला खुद्द त्यांच्याच वंशजांकडे वेळ नव्हता. महात्मा फुले यांनी शिवसमाधी प्रयत्नपुर्वक शोधली, एवढी तिची विटंबना झाली होती. भोसले नामक कोणा एका ग्रुहस्थाने १८७५ साली धनलोभाने महाराजांच्या समाधीत खोदकाम करण्याचा उपक्रम केला होता. अशा स्थीतित पुढे शिवस्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला तो लो. टिळक आणि त्यांच्या अनुयायांनी. टिळक-शाहु वादामुळे शाहू महाराजांनी टिळकांच्या या प्रयत्नांना दाद दिली नाही. पुढे मदतीला आले ते सवाई तुकोजी होळकर. त्यांनी रु. ५०००/- ची शिवस्मारकासाठी मदत दिली व उर्वरीत पैशांतुन शिवस्मारकासमोरील उध्वस्त चौथ-यावर वाघ्या कुत्र्याचे स्मारक बनवले गेले.

हा झाला इतिहास. आता शिवरायांच्या इतिहासात कुत्रा होता हे स्पष्ट आहे. आता वाघ्याचे स्मारक जेथे आहे तेथे शिवरायांच्या एकाही पत्नीचे स्मारक असल्याचा एकही पुरावा, अगदी ब्रिगेडकडेही, नाही. या स्मारकाला दान देणारे तुकोजी होळकर. गेली ८५ वर्ष वाघ्या उन्हा-तान्हात तेथे इमान आणि स्वामीनिष्ठेचे प्रतीक म्हणुन आहे. धनगर समाजाला कुत्रा हा देवासमान आहे आणि म्हणुनच तुकोजींनी वाघ्याचेही स्मारक करायचे घाटले. यात कोणता ब्राह्मणी कावा आहे? यात शिवरायांचा अवमान कसा होतो? बरे वाघ्याच्या स्मारकाची उंची शिवस्मारकापेक्षा मोठी आहे हा आरोप तर अत्यंत चुकिचा आहे.

5 comments:

  1. आधी बामन, आता धनगरडे, मग माळी त्यानंतर वंजारी... कुत्र्याचीही (मराठा) जात आता महत्वाची आहे.वाघ्याच्या पुतळ्याची डी.एन.ए.टेस्ट करून हा प्रश्न सोडविता येवू शकेल काय?

    ReplyDelete
    Replies
    1. माजला काय कुणबटा.

      Delete
  2. इथे जातप पात महत्वाची नाही आहे, खरे तर श्वानाची समाधी असण्यावर आक्षेप घेण्याची काहीच गरज नव्हती. होळकर यांनी देणगी दिलेल्या पैशातून हे स्मारक झाले आहे ते ब्रीगेदींच्या डोळ्यात का खुपते, काही करण केधून येनकेनप्रकारे त्यांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे. अरे तुमचे एवढे शिव शंभू प्रेम उतू जाते तर औरंग्याला द्रोही अन धर्मांध म्हणू शकत नाही तुम्ही? औरंग्या हिंदू अन मुस्लीम एकतेचे प्रतिक असल्या सिमीच्या कार्यकर्त्याच्या लेखकाचे भंगार पुस्तक त्याचे प्रकाशन करायला तुमचे लोक जातात, यावरूनच कळून येते तुमचे देशप्रेम.

    ReplyDelete
  3. "शिवस्मारकासाठीसुद्धा मुळात सवाई तुकोजीमहाराज होळकर यांनी देणगी दिली असल्याने, हे स्मारक हटवणे हा होळकरांचा व पर्यायाने धनगर समाजाचा अवमान असल्याचे सत्य पुढे आल्याने धनगर समाजही अस्वस्थ झाला."

    => याचा संबंध फक्त सवाई तुकोजीमहाराज होळकर यांनी देणगी दिली व वाघ्याचा पुतळा हटवल्याने त्यांचा अवमान किंवा समस्त धनगर समाजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला जातोय...!!!

    खरं सांगायचं तर, हे कारण पटतंय का आपल्या सारख्या अभ्यासकास...?


    "शिवरायांनी तिचे राज्य तिच्या मुलाच्या दुधभातासाठी परत दिले आणि पतीच्या म्रुत्युनंतरही ती लढली म्हणुन तिला सावित्रीबाई हा किताब दिला. आठवण कायमस्वरुपी रहावी म्हणुन सावित्रीबाईंनी शिवरायांची अनेक पाषाणशिल्पे बनवली. त्यांत वरील भागात शिवराय अश्वारोही असून दोन मावळे अब्दागि-या घेवून आहेत तर एक कुत्रा त्यांच्या बाजुनेच झेपावत निघालेला आहे."

    => हा पुरावा सोडला तर दुसरा मजबुत पुरावा सापडत नाही. तसा तो ही जर तरचा म्हणजे शंकास्पदच आहे. तो कर्नाटक म्हणजे पर साम्राज्याचा आहे. एव्हढे मराठा साम्राज्य उभारले शिवरायांनी त्यात कोणीही वाघ्याचा सोबती म्हणुन उल्लेख नाही. तसेच त्या काळात कुत्र्याचा कारनामा पर संदर्भ नाही.


    क़ाहीही असो, जिथे सरळ शिवरायांच्या कर्तुत्वावर अधुनमधुन शंका घेणे चालुच आहे व संभाजीराजेंचा चुकीचा इतिहास सांगितला जात होता. तिथे एका कुत्र्यावरुन राजकारण करणे चुकीचे आहे. उगाचच एक समाजाला भडकावुन देणेही चुकीचे.

    जिथे शंका तिथे तरी आपल्यासारख्या कडुन तात्पुरते तरी मौन अपेक्षीत आहे...

    --
    सिद्धार्थ सरवदे

    ReplyDelete
  4. दुधात भेसळ केली जाते ..... धान्यात भेसळ केली जाते........... इतिहासात भेसळ झाली हे मान्य करावे लागेल......मग आता खरा इतिहास कोणी लिहला.........हे शोधायचे झाले कि तर्क वितर्क आपल्यालाच लावावा लागणार......आता बघा .......... वाघ्या कुत्र्याची समाधी......तर्क असा कि वाघ्या कुत्र्याने शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली......हे मान्य केले तर........आता हाडांची सवड करताना काय चितेतून कुत्र्याची वेगळी आणि शिवाजी राजेंची हाडे वेगळी केली होती का ? ....हे शक्य नाही ना.......मग कुत्र्या समाधी का प्रश्न पडतो.........मग त्याचे कारण नक्कीच शिवाजी महाराजांची बदनामी हेच असू शकते...........मग वाघ्या कुत्र्याचे समर्थन करणारे जेवढे इतिहासकार असुदेत ते सगळे इतिहासकार बाद ठरतात........

    ReplyDelete

अमेरिकन शेतीचे भविष्य आणि आपण!

  २०५० पर्यंत ,  वाढत्या जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी शेतीत व शेतीउत्पादनपद्धतीत काय बदल करावे लागतील यावर जगभरच्या प्रगत राष्ट्रांत नुसते...