Thursday, June 9, 2011

हिंदू धर्माची सर्वमान्य व्याख्या होवू शकत नाही हे खरे नाही.

हिंदू धर्माची सर्वमान्य व्याख्या होवू शकत नाही हे खरे नाही. त्यासाठी आपण पुर्वसुरींनी काय व्याख्या केल्या आहेत त्याचा आढावा घेवू आणि त्यातील त्रुटी शोधुयात.
खालील व्याख्या मी श्री. ज.स.करंदीकर, श्री. दा.न. शिखरे, पं. महादेवशास्त्री दिवेकर व डा. रा. ना. दांडेकर यांच्या विवेचनातुन घेतल्या आहेत.

१. "ज्याचे आईबाप हिंदू असतील तो हिंदु."
या व्याख्येतील त्रुटी अशी कि अहिंदू माता-पित्यांच्या संततीला हिंदु करुन घेतले तर ती त्याला लागु होत नाही.

२. हिंदुस्तानात जन्म झाला तो हिंदू.
या व्याख्येत परदेशात जन्म झालेल्या हिंदुंना बाहेर टाकले जाते तर ज्या मुस्लिम अथव अन्य धर्मियाचा जन्म हिन्दुस्थानात झाला आहे त्यांनाही हिंदू मानावे लागते.

३. जातीभेद मानतो तो हिंदू.
असे मानल्यास लिंगायतादी जातीभेद न मानणारे संप्रदाय अहिंदु ठरतात. एवढेच नव्हे तर ही व्याख्या जातीभेदाला गंभीर रुप देते.

४. जो हिंदु कायदा मानतो तो हिंदु.
काही विद्वान ही व्याख्या मानतात. पण दत्तक, वारसा, विवाह याबाबतीत हिंदु कायदा संदिग्ध आहे.

५. सावरकरांची व्याख्या:
"आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका
पित्रुभू: पुण्यभुश्चैव स वै हिंदुरेते स्म्रुत:
अर्थात सिंधु नदीपासुन समुद्रापर्यंत पसरलेली ही भारत्भूमी ज्याला वाडवडीलांची भूमी आणि पुण्यभुमी वाटते तो हिंदू होय.

ही व्याख्या प्रादेशिक आहे आणि भावनिक आहे. राष्ट्रवादासाठी ती योग्य असली तरी ती धर्माचे दिग्दर्शन करत नाही.

६. लो. टिळक यांची व्याख्या अशी आहे:

प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाननेकता
उपास्यानामनियमं एतद्धर्मस्य लक्षणम

अर्थात: वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य नेमके कोण असावे याविषयी निश्चित नियम नसने, हे हिंदु धर्माचे लक्षण होय.

श्री. दा. न. शिखरे या व्याख्येवर आक्षेप घेतात ते असे: "वेदप्रामाण्य मान्य नसलेला चार्वाकापासून ते संतांपर्यंत एक अवाढव्य प्रवाह आहे तो या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरत नाही. एवढेच नव्हे तर स्त्रीया आणि शुद्रांना मुळात वेदांचा अधिकारच नाहे. याखेरीज महत्वाचा प्रश्न असा कि वेदांच्या पुर्वीही हिंदु धर्म आस्तित्वात होताच कि! शिवाय "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त अशीही व्याख्या करता येत नाही कारण श्रुती अनेक असून त्यात खुपच मतभिन्नता आहे. पुराणांतील मतभेदांबाबत तर बोलायलाच नको. तसेच कोणते आचार आवश्यक आहेत हेही लोकमान्यांनी स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे अव्याख्येयता हीच हिंदु धर्माची व्याख्या आहे असे म्हटले तर त्याचा व्यवहारात काही उपयोग होत नाही." ("सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म": श्री. दा.न.शिखरे)

सर्वोच्च न्यायालयाने "हिंदु हा धर्म नसून एक जीवनपद्धती आहे" अशी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात कोणताही धर्म आस्तित्वात येतो तेंव्हा एक विशिष्ट जीवनपद्धतीही आस्तित्वात येत असल्याने ही व्याख्या अत्यंत ढोबळ आणि दिशाभुल करणारी आहे हे उघड आहे.

थोडक्यात हिंदू धर्माची व्याख्या करण्यात विद्वानांना, त्यांचे प्रकांड पांडित्य मान्य करुनही, अपयश आले आहे हे अमान्य करता येत नाही.

पण तरीही हिंदू धर्माची व्याख्या करता येते. प्रत्येक धर्म हा कोणत्या तरी तत्वद्न्यान आणि कर्मकांडावर उभा असतो. तत्वद्न्यान आणि कर्मकांड हे परस्परपुरक असते. य दोहोंचा संबंध तत्वद्न्यानात्मक पातळीवर कधी परस्परसमर्थनीय वा विरोधाभासात्मकही असू शकतो. परंतू ते सर्वस्वी एकमेकांना विघातक नसतात. यासाठी आपण आधी प्रथम या धर्माची अव्यवच्छेदक कर्मकांडात्मक व तत्वद्न्यानात्मक वैशिष्ट्ये पाहुयात, जी या धर्माला अन्य धर्मांपासुन आपसूक वेगळे करतात.

१. हिंदु धर्माची निर्मिती वेदपुर्व काळातच सुफलनतायुक्त तंत्रविधीतून झालेली आहे. लिंग आणि योनीपुजा हा या धर्माचा मुळ स्थायीभाव आहे. वेदांनी या धर्माचा निषेध केला आहे. वैदिक धर्म पुरुषप्रधान व यज्ञात्मक कर्मकांड पालतो त्यामुळे हा धर्म आपसुकच वेगळा ठरतो.

२. पुजा, व्रते-वैकल्ये, योग, तप, संन्यास ही इष्ट दैवताला प्रसन्न करणे ते मोक्ष मिळवणे या धेयासाठी वापरली जाणारी, प्रत्येकाच्या आध्यात्मिक कुवतीनुसार वापरण्यास दिलेली कर्मकांडात्मक साधने आहेत. (पहा सर्वच पुराणे)

३. तत्वद्न्यानात्मक पातळीवर अद्वैत सिद्धांत हा परमोच्च सिद्धांत असून तो मनुष्य, प्राणिमात्र आणि सर्वच दैवतांत एकत्व/अभिन्नत्व पहातो. (पहा: आदी शंकराचार्य: ब्रह्मसुत्र भाष्य)

४. हे सिद्धांत सेश्वर असूनही इश्वर मानवी जीवनात कसलाही हस्तक्षेप करत नाही, तो सदय नाही कि निर्दय नाही, हे वैद्न्यानिक तत्वद्न्यान परमोच्च पातळीवर स्वीकारले गेले आहे.

५. आध्यात्मिक प्रगतिच्या पाय-या स्वयंनिर्दिष्ट असून स्थुलाकडुन सुक्ष्माकडे आणि सुक्ष्माकडुन शुन्याकडे नेणारे तत्वद्न्यान उपलब्ध आहे. (पहा-ब्रह्मसुत्रे)

६. जोवर प्राणिजात स्थुलाकडुन सुक्ष्मात आणि शेवटी शुन्यात जाणा-या पाय-या ओलांडत नाही तोवर पुनर्जन्म अटळ आहे हा एक सिद्धांत. (त्याला मी कर्मविपाक सिद्धांत म्हणत नाही. त्यावर वेगळे स्वतंत्र विवेचन मी करणार आहे.) याला खरे तर मी चढत्या प्रगतीचा सिद्धांत मानतो.

७. आत्मा हा अमर असून त्यावर कसल्याही क्रुत्याचा परिणाम होत नाही एवढा तो अलिप्त आणि निर्विकार आहे.

८. विश्वाची निर्मिती ही शिव आणि शक्ति या एकातुनच दोन अशा विभक्त झालेल्या अद्वैताचे द्वैत यातुन झालेली आहे. (अर्धनारीनटेश्वर)

थोडक्यात नाव काहीही दिले तरी वरील आठ मुद्दे या धर्माला अन्य सर्वच धर्मापासुन वेगळे करतात. धार्मिक/आध्यात्मिक आणि कर्मकांडात्मक स्वतंत्र वैषिष्ट्ये येथे विद्यमान आहेत. ही अन्य धर्मांत नाहीत. ही वैशिष्ट्ये वैदिक ते ज्यु धर्मातही आढळनार नाहीत. यामुळे हिंदु धर्माची व्याख्या करणे अशक्यप्राय बाब नव्हती हे तरी स्पष्ट व्हावे. कोणत्याही धर्मात विश्वनिर्मिती, तत्वद्न्यान आणि धार्मिक कर्मकांड हेच त्या-त्या धर्माला आस्तित्व देणारे घटक असतात.

हा मुळचा शैव प्रधान धर्म विस्कळीत होता आणि त्याला एकसुत्रात गुंफण्याचे कार्य वैदिक धर्माने केले हे माझे मित्र श्री. हर्षवर्धन देशपांडे यांचे मत मला नाईलाजाने नाकारावे लागत आहे. तत्वद्य्नात्मक पातळीवर वा कर्मकांडात्मक पातळीवर वैदिक धर्मतत्वांचा वा अगदी दैवतांचाही कसलाही प्रभाव आजच्या हिंदु धर्मावर नाही, हे वरील मुद्द्यांवरून लक्षात आले असेलच वा त्यावर अजून चर्चाही होवू शकते.

पण येथे महत्वाची बाब अशी आहे कि वैदिक वर्चस्वतावाद दहाव्या शतकानंतर वाढल्याने जातीभेद याचा या धर्मात शिरकाव होवून काही अनिष्टे घडली आहेत. पण त्यावर स्वतंत्र चर्चा करू. वैदिक वर्णभेदाची लागण व्यावसायिक जातींना झाली आणि  उच्च-नीच भाव हिंदुंत शिरला. पण ते हिंदु धर्माचे मुलचे अंग नाही.

हिंदु धर्म स्त्री-पुरुष समानतेच्या पायावर उभा आहे. वैदिक धर्मात मातृदेवता ही संकल्पनाच नाही. अनेक हिंदु ग्रंथांचे वैदिकीकरण केले गेल्याने गैरसमजातुन लोक वैदिकांनाही हिंदु समजतात. तीन वर्णाचे वेदाधिकार असलेले लोकच केवळ वैदिक असून बाकी सारे हिंदू आहेत.


8 comments:

 1. मुळात त्या आठ व्याख्यांतून देखील हिंदू या शब्दाची किंवा त्या संकल्पनेची व्याख्या करणे केवळ अशक्य आहे. त्यापेक्षा सोपे म्हणजे हींदू हा शब्द आणि त्याचे फारसी किंवा अरबी भाषेशी असलेले नाते उलगडून पहायला हवे

  ReplyDelete
 2. एक तर ’हिंदू’ हे नाव आपल्या धर्माचे नाही. अरब/ग्रीक लोकांनी आपल्यादेशाला सिंधच्या पलीकडील देश असे नाव दिले. सिंधचा अपभ्रंश म्हणजे हिंद. हे कसं झालं माहित नाही. काही जणं म्हणतात की त्यांचा भाषेमधे ’स’ अक्षराचा उच्चार ’ह’ केला जातो. म्हणून सिंधचं हिंद झालं. आणि त्यापलीकडील माणसं हिंदू.

  ReplyDelete
 3. हिंदू धर्माचे पुढीलप्रमाणे चार संप्रदाय आहेत असे बृहदारण्यकोपनिषद सांगते. या चार संप्रदायांचे वेदप्रामाण्य मानणारे व वेदप्रामाण्य न मानणारे असे विभाग आहेत -
  १)सुख-दुःखाची जाणीव फक्त जागृत स्थितीतच (इंन्दिये कार्यक्षम असतानाच) होऊ शकते. स्वप्नावस्था व निद्रावस्था या अवस्थात होणाऱ्या सुखदुःखाची जाणीवच होत नसल्याने त्या अवस्थांचा विचार करण्याची जरूर नाही असे हा संप्रदाय मानतो. चार्वाक हा याचा वेदप्रामाण्य मान्य नसलेला उपसंप्रदाय. दुसऱ्या संप्रदायाला वेदप्रामाण्य मान्य आहे. मी या संप्रदायाला पितृपूजक संप्रदाय असे नाव दिले याचे कारण योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याने परलोक साध्य होतो असे हा संप्रदाय मानतो. या संप्रदायाने सुखाचा वृद्धी व दुःखाचा निरास करण्यासाठी वेदांसकट सर्व विद्या व कलांचा विकास केला. असुर, देव, दानव, पिशाच, यक्ष, गंधर्व वगैरे संप्रदाय हे या संप्रदायाचे उपसंप्रदाय आहेत. निगमशास्त्रे ही या संप्रदायाचे तत्वज्ञान आहे.
  २) सुखदुःखाची जाणीव जागृतावस्थेबरोबर स्वप्नातही होते असे हा संप्रदाय मानतो. याचा वेदप्रामाण्य न मानणारा संप्रदाय जैन हा होय. अष्टावक्र संप्रदाय हा याचा उपसंप्रदाय वेदप्रामाण्य मानतो. त्याचे तत्वज्ञान अष्टावक्र गीतेत आले आहे.
  ३) जागृती, स्वप्नावस्था व निद्रावस्था या तीनही अवस्थांत सुखदुःखाचा अनुभव येतो असे या संप्रदायाचे म्हणणे आहे. निद्रावस्थेत (निर्वाणावस्थेत) मनुष्य अलिप्त असल्याने त्याला सुखदुःखाचे महत्त्व नसते एवढेच. याचा दत्तसंप्रदाय हा उपसंप्रदाय वेदप्रामाण्य मानतो तर बौद्ध संप्रदाय वेदप्रामाण्य मानीत नाही.
  ४) या संप्रदायात साक्षात्काराला महत्त्व असून वेदप्रामाण्याला चित्तशुद्धिकारक एवढेच महत्त्व आहे.
  वेदप्रामाण्य मान्य नसले तरी चार्वाक वगळता सर्व संप्रदायाना निगमप्रामाण्य मान्य आहे.

  ReplyDelete
 4. मी जे चौथ्या संप्रदायाबद्दल लिहिले ते अपुरे आहे. जागृती, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था यांवर नियंत्रण ठेवणारी माणसाची चौथी अवस्था आहे असे हा संप्रदाय मानतो. या चौथी अवस्था जाणविणाऱ्या माणसाच्या दृष्टीने सुख-दुख याना अर्थ नसून त्या फक्त जगरहाटी चालू रहाण्यासाठी घडत असलेल्या घटना आहेत.

  ReplyDelete
 5. सर मला अजूनही हि व्याख्या पटत नाही.....
  १. प्रतिमा/मुर्ति पुजा: वैदिक म्हणवणारे ब्राह्मण ते आदिवासीं हे आज मुर्तिपुजक आहेत. या सर्वच, श्रेष्ठ ते सर्वच गौण दैवते ही कोणत्या-ना-कोणत्या प्रकारे पुरांणांत वा स्थलपुराणांत निर्दिष्ट आहेत.

  बरेच पंथ हे मूर्तीच काय देव सुद्धा मानत नाहित....
  निरीश्वरवादी....पण ते स्वताला हिंदू म्हणवतात....  २. पुजा, व्रते-वैकल्ये, योग, तप, संन्यास ही इष्ट दैवताला प्रसन्न करणे ते मोक्ष मिळवणे या धेयासाठी वापरली जाणारी, प्रत्येकाच्या आध्यात्मिक कुवतीनुसार वापरण्यास दिलेली कर्मकांडात्मक साधने आहेत. (पहा सर्वच पुराणे)

  या धर्मात सामील व्यायची किव्हा बाहेर पडायचे कुठलेही कर्म कांड नाही. अगदी अंत्यसंस्कार पण वेगवेगळ्या पद्धती ने करता येतात....
  ३. तत्वद्न्यानात्मक पातळीवर अद्वैत सिद्धांत हा परमोच्च सिद्धांत असून तो मनुष्य, प्राणिमात्र आणि सर्वच दैवतांत एकत्व/अभिन्नत्व पहातो. (पहा: आदी शंकराचार्य: ब्रह्मसुत्र भाष्य)

  अद्वैत हा एक सिद्धांत आहे.
  द्वैत - विशिष्टद्वैत - अद्वैत हे तीन सिंद्धांत आणि प्रत्येकाचे पंथ आणि विचारक आहेत.
  यात निरीश्वर वाद पण सामील करत येवू शकतो.
  सांख्य - नैयायिक - मीमांसक के तत्वज्ञानाचे शाखा आहेत
  सध्या भारतात मीमांसक आणि त्यातल्यात्यात उत्तर-मीमांसक (वेदान्तिकांचा भाग) यांचाच पक्ष जोरात आहे. बाकी कालौघाताने - कमी विचारक - अवघड पणा या मुळे मागे पडले.
  ४. हे सिद्धांत सेश्वर असूनही इश्वर मानवी जीवनात कसलाही हस्तक्षेप करत नाही, तो सदय नाही कि निर्दय नाही, हे वैद्न्यानिक तत्वद्न्यान परमोच्च पातळीवर स्वीकारले गेले आहे.
  ५. आध्यात्मिक प्रगतिच्या पाय-या स्वयंनिर्दिष्ट असून स्थुलाकडुन सुक्ष्माकडे आणि सुक्ष्माकडुन शुन्याकडे नेणारे तत्वद्न्यान उपलब्ध आहे. (पहा-ब्रह्मसुत्रे)
  ६. जोवर प्राणिजात स्थुलाकडुन सुक्ष्मात आणि शेवटी शुन्यात जाणा-या पाय-या ओलांडत नाही तोवर पुनर्जन्म अटळ आहे हा एक सिद्धांत. (त्याला मी कर्मविपाक सिद्धांत म्हणत नाही. त्यावर वेगळे स्वतंत्र विवेचन मी करणार आहे.) याला खरे तर मी चढत्या प्रगतीचा सिद्धांत मानतो.
  ७. आत्मा हा अमर असून त्यावर कसल्याही क्रुत्याचा परिणाम होत नाही एवढा तो अलिप्त आणि निर्विकार आहे.
  आत्मा अजर-अमर आहे.

  त्याला कोणी हि मारू, जाळू, भिजवू, कापू, तोडू, फोडू शकत नाहि.
  तो फक्त एक शरीर (वस्त्र बदलल्या सारखे) सोडून दुसरे शरीर धारण करतो.
  (थोडक्यात आत्म्यात कोणतेही भौतिक , रासायनिक, जैविक बदल करू शकत नाहि. आत्मा या तिन्ही गोष्टीन पासून वेगळा आहे.)
  आत्मा हा मुक्त असतो. मन आणि चित्त हे आत्म्याचे आवरण बनून दुसर्या शरीरात जातात. त्या मुळे तो या परिस्थिती मध्ये आहे असे वाटते. (जगात, संसारात, मायेत, भवसागरात, इतर अनेक नावे आहेत )
  बाकी सगळे सिद्धांत, विचार, कर्म-कांड, इतर धार्मिक अंगे नाहि मानली तरी चालतील. (तसेच हा सिद्धांत नाहि मनाला तरी चालेल - आहे ना Contradiction)
  जगातील प्रत्येक धर्म त्याचे एक पंथ, अंग शोभावे एवढा मोठा वारसा आहे.....

  ReplyDelete
 6. थोडक्यात माझे म्हणणे

  कर्माद्वारे(सध्याचे - मागच्या जन्माचे - या जन्माचे) नराचा(माणसाचा) नारायण(देव - जो तुम्हाला आवडतो तो - अगदी शून्य सुद्धा) होऊ शकतो.
  हे सांगणारा जगातील एकमेव धर्म.

  ReplyDelete
 7. मनुष्य,प्राणी, किंबहुना सर्व जीवसृष्टी याच्यां हितासाठी माणुसकीच्या भावनेतुन कर्तव्य तत्परतेने मानवानी केलेली निस्वार्थ-नि:पक्ष सेवा (उपकार नव्हे) म्हणजे 'हिंदू धर्म'
  कधीही न संपणार्‍या वरील विषयी ईतकेच सांगावेसे वाटते की, आपल्या कागदो-पत्री सध्या नोंद असलेला धर्म व जात ऎवजी सध्या प्रचलित असलेल्या प्रत्येक धर्माच्या गाभानितीनुसार (धर्म स्थापनेचा मुळ उद्देश)प्रत्येकानी माणुसकी व मानव ही नोंद आजच बदलुन घेतली तर संपूर्ण विश्वाचा केवळ एकच धर्म होईल तो म्हणजे "माणुसकी व मानव"
  उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असे म्हणतात. मी माझ्या मुला-मुलींचे शाळेत प्रवेश घेतांना वरील प्रमाणे बदल करुन घेतलेला आहे. प्र्त्येकानी केवळ संवेदंशील न राहता कृतिशिलता अंगी बाणावी हीच विनंती वजा अपेक्षा.
  avikant@yahoo.com(09403464907)

  ReplyDelete
 8. नाही,सरांच्या हिंदू बाबत सरमिसळअही संकलनातुन मुददे आहेत, मुळात हिंदू शब्दाबाबत मुददा निकालात निघतो, मध्ययुगीन geopolitical definition ठिक वाटते. तो सारसंग्रह आहे,मात्र मानव विकासासाठी कपपेबंद विविधतेचयच्या ततकालीन मर्यादा सगळ्यांनाच लागू होतात.देवदेव पोटभरु पाखंडही बरेच आहे जे भारतभर सणांचे schedule मधये बसवले आहे, काय करणार ,देवाला पोट नाही पण माणसाला आहे ना, जुनयन्यात सोने कितीकाळ सापडवनार, मलाही रददीची दुकानात पुस्तके चाळण्याची जुनी सवय आहे.

  ReplyDelete