जोवर स्वत:चे काम होत आहे तोवर कोणी कोणाला भ्रष्ट वाटत नाही. भ्रष्टाचार हा आपल्या ख-या योग्यतेपेक्षा अधिक उच्च जीवनमान हवे या हव्यासापोटी जसा सुरु होतो तसाच व्यवस्थेमुळे भ्रष्टाचार करने अपरिहार्य ठरते म्हणुनही होतो. भ्रष्टाचाराला खरा विरोध करणारे नीतिमान या देशात नुसते अव्यवहारी ठरत नाहीत तर तेच खोट्या आरोपांत अडकवले जाउन संपवले जातात. अनेकांचे खुन झालेले आपण पाहिलेले आहे. यामुळेच कि काय असंख्य नागरिक या व्यवस्थेच्या विरोधात असुनही गप्प आहेत. सध्याचा उद्रेक हा भारतीय जनमानसाला भ्रष्टाचाराचा तिटकारा वाटतो म्हणुन आहे कि भावनोद्रेकित फ़्याशन म्हणुन आहे यावर विचार करावा लागतो. जनलोकपालपेक्षा भ्रष्टाचाराच्या केसेस साठी स्वतंत्र द्रुदगती न्यायालये असावीत हा आग्रह योग्य नाही काय? भ्रष्टाचारविरोधी अम्मलबजावणी खाते (anti corruption beuro) अधिक शक्तिशाली करण्यासाठी काय करता येइल? भ्रष्टाचार झाल्यानंतर कारवाई हवी कि मुळात तो होणारच नाही यासाठीची समाजमानसिकता बनवायला हवी? लहानपणापासुन मुलांवर संस्कार होतात ते भ्रष्ट आचरणाचे...बनवणुकिचे, लबाडीचे....याला जबाबदार असनारे पालक दोषी नाहीत काय? कि सारे नैतीक आहेत आणि नियुक्त प्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारीच तेवढे भ्रष्ट आहेत? खाजगी क्षेत्रातील भ्रष्टाचार (कर्मचारी स्तरावरचा) केवढ्या धोकेदायक पातळीवर जावून पोहोचला आहे याचे द्न्यान व भान सर्वांना आहेच. उच्च स्तरावरील तर विचारायलाच नको. आज नळस्टोप चौकात एकीकडे "मी अण्णा हजारे आहे" अशा टोपीवाल्यांचे आंदोलन सुरु आणि समोर मी पहातोय कि ट्राफिक पोलिस पैसे जमा करतोय....हा विरोधाभास ही आपल्या सामाजिक स्वास्थ्याची विडंबना नव्हे काय? कलमाडी पुढच्या निवडनुकिपर्यंत जरी आत राहिले, त्यांना पक्षाने तिकिट दिले नाही तरी ते तुरुंगातुन उभे राहुन निवडुन येवू शकतात....६०० कोटी खर्च केले कि झाले...पुढच्या ६००० कोटींची तर्तुद पक्की. पुण्यातील गुंड नगरसेवक म्हणुन निवडुन येतात...त्यांचे काय वाकडे झाले आहे? वाकडे झाले नाही याला न्यायसंस्था जबाबदार नसून पैसे घेवून वा दमदाटीला घाबरुन साक्षी बदलनारे आपलेच समाजबांधव जबाबदार नाहीत काय?
कोनत्याही सुसंस्क्रुत समाजात कायद्यांची/नियंत्रनांची गरज कमी कमी होत जाते. जो समाजच भ्रष्ट आहे त्यालाच अधिकाधिक कायद्यांची आणि नियंत्रणांची गरज भासते...आणि अशी नियंत्रणे हवीत यासाठी जेंव्हा आंदोलने होतात त्याचा एकच अर्थ असतो तो हा कि आपण असंस्क्रुतीचीही मर्यादा ओलांडली आहे. आपण मुक्त स्वतंत्र समाजाकडे वाटचाल करत नसून एका बंधित, अधिक नीतिभ्रष्टतेकडे वाटचाल करत आहोत.
मी अण्णांच्या विरोधात नाही. तेवढी माझी योग्यताही नाही. (जे त्यांचे कर्तुत्व पहायचे ते मी १७-१८ वर्षांचा असतांनाच पाहिले आहे....आणि नंतर १९९८ साली त्याचा पुनर्प्रत्यय घेतला आहे.) आज सरकारने त्यांना अटक केली हे निषेधार्हच आहे. याची प्रतिफळे या पक्षाला वाईट मिळतील याचीही शक्यता विरोधी पक्षच जवळपास आस्तित्वहीन आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याची नैतीकता हरवून बसला असल्याने दिसत नाही.
भ्रष्टाचार नको आहे. पण तो आपणच थांबवु शकतो...त्यासाठी एकाही नव्या कायद्याची वा लोकपालाची गरज नाही...माहितीचा अधिकार हे शस्त्र आपल्या हाती अण्णांनीच दिले आहे...त्याचा दुरुपयोग करणा-या शक्तींना विरोध करत त्याचाच चांगला उपयोग करुयात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी
ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
sanjay, you nail it.....this is something we must think about...
ReplyDeleteअण्णानी सरकारी विधेयकाला विरोध करण्यापेक्षा तेच विधेयक सक्षम करावयास हवे होते/आहे.
ReplyDeleteसाहेब. आपला सरकारी कारभार आणि नियम असे बनबले आहेत की लोकांना लाच देणे जरुरीच पडते. तुम्ही घराचे एखादे सरकारी कागदपत्र बनवायला गेलात की तुमचे सगळे कागदपत्र बरोबर असून सुद्धा तुम्हाला सरकारी कागद हातात यायला कमीत कमी तीन महिने लागतात. अर्थातच तेव्हडे थांबायला कोणाला वेळ नसतो. मग तेच काम करायला आपण लाच देतो आणि तो कागद दोन दिवसात मिळवतो. ते सुद्धा त्यांची मेहेरबानी घेऊन.
ReplyDeleteसंजयजी नमस्कार..
ReplyDeleteसर्व सामांन्याच्याही भ्रष्टाचार इतका अंगवळ्णी पड्ला आहे की पैसे दिल्या
शिवाय काम होणार नाही हे समजुन लोक सरकारी कार्यालयात जातात.
ही मानसिकता बद्लण्यासाठी मला वाट्तं कोणत्याही विधेयकाची गरज नसावी.आणि मला आशा वाटते अण्णांच्या आंदोलनामुळे ही मानसिकता कमी होइल,आणि आंदोलन यशस्वी होइल
आपले वैचारिक विश्लेषण आत्मपरिक्षणाला खाद्य पुरविणारे आहे. भ्रष्टाचारविरोधी द्रुतगती न्यायालये स्थापण करणे,निवडणुक सुधारणा कायदा आणणे,रोजच्या जीवनात निर्धाराने भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहण्यासाठी जनमानसिकता तयार करणे,असे उपाय करावे लागतील.प्रश्न आहे तो सत्ताधा-यांच्या आकलनाचा.आज कोणत्याही राजकिय पक्षाची त्याविरुद्ध ईच्छाशक्ती दिसत नाही.त्यांनी देशातील जनतेची ताकद अंडरईस्टीमेट केली आहे.जनतेत असलेल्या संतापाचा त्यांना पत्ताच नाही.बहुदा जे.पीं.च्या वेळेपेक्षाही यावेळी जास्त तरुण आंदोलनाला पाठींबा देत आहेत.त्याचे कारण तरुणांची काहीतरी करण्याची ईच्छाशक्ती,समकालीन राजकारणाची तीव्र नफरत,नेत्यांचे भ्रष्ट वर्तन, मस्तवाल आणि बेदरकार सत्त्ताधिश आहेत.स्वातंत्र्यानंतर प्रथमच भ्रष्टाचारावरुन एव्हढे माजी मंत्री/खासदार/प्रशाषक तुरुंगात गेलेले असावेत.हे सारे संतापजनकच आहे.लोकभावनेचा आदर करुनही केवळ भाबडेपणाने हा महाभयंकर प्रश्न सुटेल असे मानता येत नाही.अण्णांच्यामागे असणारे काही बेरकी लोक कोण आहेत याचाही विचार झाला पाहिजे.त्यांचा आणखी काही छुपा अजेंडा नाही ना याचाही शोध घेतला जाणे आवश्यक आहे.संसदेला वळसा घालण्याऎवजी आगामी निवडणुकीत सहभागी होवुन स्वच्छ चारित्र्याचे लोक संसदेत जातील असेही अण्णांनी पाहिले पाहिजे.
ReplyDelete